गाभा:
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारीला 'मराठी भाषा दिन ' साजरा होतोय. मध्यंतरी मराठी - अमराठी वाद खूपच रंगला. पण, झाले गेले विसरून जाऊन पुढे चालताना आपण अन्य भाषांवर राग काढण्याऐवजी मराठी दिन कसा साजरा करायचा यावर चर्चा करू. यासाठी तुमच्या कल्पना सूचवा...
प्रतिक्रिया
22 Feb 2009 - 5:19 pm | मराठी_माणूस
ह्या धाग्या बद्दल धन्यवाद.
काही सुचलेले खाली देत आहे.
१. एक मराठी पुस्तक स्वतः साठी विकत घ्यावे. जमले तर अजुन एक घेउन कोणाला तरी "मराठी दिना निमित्त ' असे लिहुन भेट द्यावे.
२. आपल्या मित्रा पैकी जो मराठी असुन ही मराठी बोलत नसेल त्याला मराठी दिनाची आठवण करुन "आज तरी मराठी बोल ' असा आग्रह धरावा. बोलताना तक्रारीचा सुर नसावा. दिनाचे निमित्त करुन पटवण्याचा प्रयत्न करावा.
३.स्वतः बोलताना , अमराठी शब्दांचा वापर होणार नाही हे पहावे.
४.वाचण्याची इच्छा असलेल्या पण अजुन पर्यंत वाचु न शकलेल्या मराठी पुस्तकांची यादी करुन पुढच्या मराठी दिना पर्यंत वाचण्याचा संकल्प सोडावा
अजुन सुचल्यास नंतर टाकेन
22 Feb 2009 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार
आपले सदस्य नाम बदलुन मराठीत लिहावे हे हे हे
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
22 Feb 2009 - 6:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपले सदस्य नाम बदलुन मराठीत लिहावे हे हे हे
माननीय मिपा-सभासद प.रा., आपणांस 'देवनागरी'त लिहावे असे तर म्हणायचे नाही आहे ना?
आमी तर बा त्या दिवशी विज्ञान दिनाची (२८ फेब्रुवारी) तैय्यारी करनार! आमच्या जी.एम.आर.टी.त तेव्हा मोठ्ठं प्रदर्शन आसतं आन तिकडे जाऊन मला मराठीत भाशान द्याचं हाय. तुमालापन २८ फेब किंवा १ मार्चला येळ असंल तर जरूर या आमच्या ग्रम्टला!!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
22 Feb 2009 - 7:32 pm | परिकथेतील राजकुमार
पण तिकडे आल्याबद्दल पुढार्यांच्या वगैरे सभेला गर्दी केल्याबद्दल जसे 'मानधान' मिळते तसे मिळेल काय? 'पोटपुजेची' तसेच आवागमनाची काय व्यवस्था ? संपुर्ण तपशीलासह भेटा !
||महाराजे||
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
22 Feb 2009 - 7:44 pm | अवलिया
चांगली चर्चा आहे... चालु द्या
-अवलिया
23 Feb 2009 - 2:10 am | अजय भागवत
अशा संकेतस्थळांच्या चालकांना कौतुकाचे दोन शब्द पाठवा-