आमची फटाफट झणझणीत मिसळ

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
1 May 2017 - 1:31 pm

कृती:

आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली.

आता कट करायचं ठरवलं :)

कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा, ४ छान लालभडक पण ओल्या मिरच्या आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी १ टी-स्पून घातलं होतं. मी मिसळ नुसतीच तिखटजाळ करण्यापेक्षा ती सणसणीत होईल पण घशात येणार नाही अशी करते. हे परतल्यावर त्यात चिमूट्भर साखर घालून पाणी घातलं. चवीनुसार मीठ आणि यातही थोडी आमचूर पावडर घातली. तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं ;) हवी तेवढीच दाट होते याने तर्री.

मग नेहमीप्रमाणे बाउल मध्ये आधी उसळ, मग तर्री, मग फरसाण घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सजवली. एक लिंबाची फोड आणि गव्हाचा पाव याबरोबर फन्ना पाडण्यास दिली घरच्यांना. 

झाली सुद्धा मिसळ. हाकानाका :)

.

.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

1 May 2017 - 1:43 pm | पद्मावति

क्लास्स!!

फरसाण पीठ करून लावण्याची आयडिया आवडली आहे ! नक्की करण्यात यील !

फोटू पाहणारच नाही ;)

अभ्या..'s picture

1 May 2017 - 5:49 pm | अभ्या..

स वि ता ता ई
जब्बरदस्त आयडीया फरसाणाची.
नेक्स्टटैम जेंव्हा मिसळ करशिल तेंव्हा आठवणीने काचेच्या भांड्यात न ठेवता दुसर्‍या (पोर्सलीन, स्टील वगैरे) मध्ये ठेवून हाय रेझोलुशन फोटो काढशील?
आपल्या मिपावर मिपाकरानेच बनवलेली मिसळीचा फोटो असावा अशी फार इच्छा आहे.

सविता००१'s picture

1 May 2017 - 8:04 pm | सविता००१

सौताताई च म्हण. अरे मला हे माहित नव्हत. छान स्टील च्या भांड्यात असलेली मिसळ मी काचेच्या बाऊल मधे काढ्ली• अाता नक्की

एक महिन्या पासून झारखंड मध्ये आहे कामानिम्मित. पडवळ खाऊन वैतागलो आहे. तुमची पाककृती पाहून तोंडाला पाणी सुटले. कधी परत घरी जातोय असे झाले आहे.

फरसाण ची आयड्या आवडली...

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 7:43 pm | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म..! इसमे नया तो है कुछ!

निच्चीत करूण पाहनेत यील!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2017 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या बघताक्षणी भूक खवळणार्‍या पाकृवर बंदी घाला रे ! ;) =))

जबरीच आहे. फरसाण वापरायची आयडिया आवडेश..

भारीये! झटपट मिसळ असल्याने बटाट्याच्या भाजीला फाटा दिलाय की तुमच्याकडे ती मिसळीत घालतच नाहीत?
ते काही असो, फोटू छान आलाय.

सविता००१'s picture

2 May 2017 - 6:41 am | सविता००१

हो ग रेवती ताई. बटाटा नाही घातला यावेळी. नेहमी घालते. पोहे वगैरेही नाही केले

रुपी's picture

2 May 2017 - 2:04 am | रुपी

वा.. मस्त फोटो..

छोट्या बाउलमध्ये काय आहे?

सविता००१'s picture

2 May 2017 - 6:35 am | सविता००१

छोट्या बाऊल मध्ये कट आहे. मिसळीवर वरून घ्यायला.

विशाखा राऊत's picture

2 May 2017 - 2:16 am | विशाखा राऊत

मस्त मिसळ

केडी's picture

2 May 2017 - 6:05 am | केडी

एक नंबर!

रातराणी's picture

2 May 2017 - 6:57 am | रातराणी

म्म्मम्म्मम्म्मम्ममस्त!!!

मनिमौ's picture

2 May 2017 - 7:24 am | मनिमौ

भारी दिसतीये की मिसळ

पैसा's picture

2 May 2017 - 9:16 am | पैसा

मस्त दिसतेय! खाऊन मग सांगेन कशी झाली ती! =))

किसन शिंदे's picture

2 May 2017 - 9:35 am | किसन शिंदे

हे एक भारीये की फरसाणची आयडीया. फोटो झक्कास आहेत.

दशानन's picture

2 May 2017 - 1:58 pm | दशानन

झक्कास!!!!!

सपे-पुणे-३०'s picture

2 May 2017 - 3:08 pm | सपे-पुणे-३०

झक्कास मिसळ आणि फोटो. फरसाणाची आयडिया नवीन समजली.

सूड's picture

2 May 2017 - 4:03 pm | सूड

फोटो दिसत नाहीत.

सविता००१'s picture

2 May 2017 - 4:26 pm | सविता००१

का रे? तुला एकट्यालाच दिसत नाहियेत बहुतेक.

एस's picture

2 May 2017 - 8:13 pm | एस

बास! खूप झालं! आता स्वयंपाकगृहावर स्वारी याच पाककृतीने केली जाईल. धन्यू.

(ता. क. - टीव्र निषेढ. जीभ खवळली आहे. कधी एकदा करतो आणि खातो असं झालं आहे!)

कंजूस's picture

3 May 2017 - 5:23 am | कंजूस

साखर?

सविता००१'s picture

3 May 2017 - 6:23 am | सविता००१

हो. चिमूट्भर साखर फोड्णीत घातली आणि तिखट घालून लगेच पाणी घातल की छान लाल भडक तर्री येते. थोड्या तेलात•

संजय पाटिल's picture

3 May 2017 - 11:37 am | संजय पाटिल

वा ! झकास मिस्सळ.. फरसाण आणि साखरेची आयडिया आवडली..

रुस्तम's picture

3 May 2017 - 12:04 pm | रुस्तम

हो. चिमूट्भर साखर फोड्णीत घातली आणि तिखट घालून लगेच पाणी घातल की छान लाल भडक तर्री येते. थोड्या तेलात•

मदनबाण's picture

3 May 2017 - 9:47 am | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieu

नूतन सावंत's picture

3 May 2017 - 10:15 pm | नूतन सावंत

मस्त मस्त,आता पुण्याला आले की एक फराळ तुझ्याकडे.

सविता००१'s picture

3 May 2017 - 11:08 pm | सविता००१

पुण्याला आले की नाही ग, माझ्याकडे म्हणून ये.

इरसाल कार्टं's picture

4 May 2017 - 11:57 am | इरसाल कार्टं

पूर्ण रेसिपीही वाचू शकलो नाही, मसाले वाचता वाचता तोंपासु. नंतर वाचीन.

पियुशा's picture

4 May 2017 - 2:28 pm | पियुशा

हे देवा वाचव सव्या पासुन मिपाला ;) झक्कास हो !

तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं

करुन पाहिल्याशिवाय मत देववत नाही
पण घट्टपणासाठी फरसाण .... मनात कल्पना करुन उगीच खटकतंय. नुसती पापडी किंवा गाठी वापरुन कदाचित जास्त बरं वाटेल.

ओव्हरऑल, अ गुड रेसिपी.

ता.क.

कोंकणातल्या फरसाणाची सर मुंबईपुण्याच्या आणि देशावरच्या फरसाणांना नाही. खासकरुन मिसळीला योग्य फरसानाबाबत.

कोंकणवासीयांकडून / कोंकणप्रेमीयांकडून अनुमोदने स्वीकारली जातील.

कोंकणातल्या छोट्यामोठ्या बसस्टँडांवर आणि खाडीच्या फेरीसाठी वाट पाहताना तिथे असलेल्या टपरीत मिसळ खाल्लीय का कोणी? तर मी म्हणतो ते लगेच पटेल.

सविता००१'s picture

4 May 2017 - 4:18 pm | सविता००१

फरसाण फिरवून लावलं म्हणाले त्यात पापडी आणि गाठीच होती हो.अगदी डाळमूठ वगैरे नाही.

इथे पुण्यात सुद्धा एक साधं फरसाण मिळतं आणि एक मिसळीकरता. साधं फरसाण म्हणजे अगदीच बोअर असतं. (वैयक्तिक मत) त्यात फक्त सपक पापडी, तेवढीच सपक जाड शेव असते. मिसळीच्या फरसाणात मस्त सगळी भरताड असते. आणि खमंग. तेच वापरलं आहे मी. (मिसळीत. मिक्सरला लावताना नाही). तुम्ही पहा एकदा करून.

कोंकणातल्या फरसाणाबद्दल काही म्हणके काही माहीती नाही मला.

तुम्हीच द्या ती इथे.

तुम्ही यात सगळ्या पदार्थांचे प्रमाण न दिल्याने थोडा पिरॅब्लेम झालाय माझा. आता माझ्या हिशेबाने बनवण्याचा प्रयत्न करतो. आय ब्लेम यू, सविताताई! :-P

सविता००१'s picture

5 May 2017 - 7:25 pm | सविता००१

अर्र..एकडाव माफी. मी फक्त उसळीच प्रमाण नाही दिल मी. मी एक पावशेर मटकी कुकर मध्ये वाफवून घेतली. आणी फोडणी मध्ये ती घालून मग एक छोता चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातल होत. आणि उसळ सरसरीत होइल एवढ पाणी.

झकास सवे! मस्त दिसतेय मिसळ!

रामदास२९'s picture

20 Jul 2017 - 2:32 pm | रामदास२९

मस्त !!!

गणामास्तर's picture

20 Jul 2017 - 2:52 pm | गणामास्तर

ठीकठाक रेसिपी आणि फोटो.
मिसळ हा पदार्थ असा आहे की त्याचा फोटो पाहूनचं तोंडाला पाणी सुटले पाहिजे, तसे काही झाले नाही. मिसळमध्ये रस्सा आणि तर्री (वाटीतली सेपरेट तर्री मला तर्रीसारखी दिसत नाहीये) दिसतंच नाहीये आणि वरून पेरलेला टोमॅटो खटकला.