गाभा:
शांता शेळके ह्यांची पावसाच्या धारा येती झरझरा ही कविता कुठल्यातरी इयत्तेला होती असे आठवते आहे. कुणाला ही कविता आठवते आहे का?
कितवीला होती ही कविता?
मला एवढेच आठवते
पावसाच्या धारा
येती झरझरा
झाकोळले नभ
सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहळ
जाती खळखळ
जागोजागी खाचांमधे
तुडुंबले जळ
प्रतिक्रिया
21 Feb 2009 - 1:03 am | मानस
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
डोईवरी मारा झाडांचिया तळी
गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हासली,
वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली
21 Feb 2009 - 2:21 am | llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद मानसशेठ.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
21 Feb 2009 - 9:15 pm | हुप्प्या
ही सुंदर कविता पुन्हा आठवून दिल्याबद्दल आभार.
22 Feb 2009 - 4:42 pm | हेरंब
ही आधी माहित नसलेली पण सुंदर कविता वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.
23 Feb 2009 - 2:08 pm | पक्या
खरोखर सुंदर कविता. धन्यवाद मानस.
मी पहिलीत असताना मराठीच्या पुस्तकात एक कविता होती. छान होती कविता. खूप दिवसांपासून शोधत आहे. कोणाला आठवल्यास द्यावी हि विनंती
केळीच्या बागा मामाच्या
हिरव्या घडांनी वाकायच्या
....
असंच पुढं मामाच्या बागेचे , घराचे वगैरे वर्णन होतं त्यात.
23 Feb 2009 - 9:31 pm | मानस
केळीच्या बागा मामाच्या
हिरव्या घडांनी वाकायच्या
मामा आमुचा प्रेमाचा
घडावर घड धाडायचा
आत्या मोठी हौसेची
भरपूर केळी सोलायची
आई मोठ्या हाताची
भरपूर साखर लोटायची
आजी मोठ्या मायेची
सायच साय लोटायची
ताई नीटस कामाची
जपून शिकरण ढवळायची
(इथे एक कडवं आहे आठवत नाही ....)
भरपूर शिकरण रिचवायची
मामाला ढेकर पोचवायची...