कांदा आणि कैरीची चटणी

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in पाककृती
15 Apr 2017 - 10:13 am

====================
कांदा आणि कैरीची चटणी
====================
साहित्य

  1. दोन मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
  2. अर्धी कैरी (कमी आंबट आणि लहान असेल तर पूर्ण )साल काढून चिरलेली
  3. हिरव्या मिरच्या ५-६
  4. चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
  5. लसूण पाकळ्या २-३
  6. तेल २-३ चमचे
  7. गूळ चार चमचे
  8. हिंग चिमुट भर
  9. पाव चमचा मेथीचे दाणे
  10. जिरे एक चमचा
  11. ओवा पाव चमचा
  12. मोहरी फोडणी पुरती
  13. कढीपत्ता ५-६ पाने
  14. मिठ चवीनुसार
  15. कृती (१) साधारण अर्धा तास
    ======================================

    1. तव्यावर थोडेसे तेल घालून हिरव्या मिरच्या परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
    2. त्याच तव्यात मेथीचे दाणे, जिरे, लसूण्, हिंग हलकेसे परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
    3. ग्राइंडर मध्ये प्रथम कोरडे पदार्थ आणि नंतर चिरलेला कांदा, साल काढलेल्या कैरीच्या फोडी, कोथिंबीर, गूळ,घालून सरबरीत वाटून घ्या
    4. चवीनुसार मिठ टाकून परत एकदा वाटून घ्या
    5. बाउल किंवा वाटीमध्ये चटणी काढून घ्या.
    6. छोट्या कढी मध्ये फोडणी करा, त्यात मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी थंड होउ द्या. हळद घालू नका रंग संगती बिघडते
    7. थंड झालेली फोडणी चटणी वर टाका
    8. झाली चटणी तयार.

    कृती (२) साधारण पंधरा मिनीटे
    ही कृती पुरूष करत असतील तर सर्वात महत्त्वाची तुम्हाला खरा आदर या मुळेच मिळेल ( एंड टू एंड प्रोसेस)

    1. मिरचीची देठे कांद्याची साले, कैरीची साले ओल्या कचर्‍याच्या डब्यात टाका
    2. मिक्सरची भांडी सुरी किंवा विळी व्यवस्थित स्वच्छ धुवुन ठेवा
    3. फोडणिचे भाडे आणि तवा जागच्या जागी घासायला ठेवा.
    4. ओटा चकाचक करा

    एंजॉय अँड बी हॅपी.
    =========================================
    ..

ओली चटणीकैरीचे पदार्थ

प्रतिक्रिया

मितान's picture

15 Apr 2017 - 10:58 am | मितान

पर्फेक्ट !!!!
आमचे हे अशीच चटणी करतात :))

कापूसकोन्ड्या's picture

18 Apr 2017 - 7:28 am | कापूसकोन्ड्या

म्हणजे नक्कीच कृती नं २ करत असणार तर.

पैसा's picture

15 Apr 2017 - 11:59 am | पैसा

फारच छान! अगदी पद्धतशीर कृती लिहिली आहे! त्याबद्दल १०० मार्क्स. पण फटु कुठे आहे?

कापूसकोन्ड्या's picture

18 Apr 2017 - 7:21 am | कापूसकोन्ड्या

हाय की वो!

सविता००१'s picture

15 Apr 2017 - 12:09 pm | सविता००१

मस्तच.

पद्मावति's picture

15 Apr 2017 - 1:49 pm | पद्मावति

वाह!

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2017 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर

कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून काढणे पटले नाही
मी कैरी कांदा किसून घेतो आणि नुसतेच गूळ आणि तिखट घालून करतो. फोडणी बिडणी काहीच नाही. ट्रस्ट मी टेक्स्चरमुळे फरक पडतो चवीत.
तरीपण एकदा तुम्ही लिहिले तसे मेथी दाणे, लसण, कोथिंबीर वापरुन साग्रसंगीत करुन बघावे लागेल.

आप्पा विदौट ग्रायंडरचीच भारी लागते.

कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून काढणे पटले नाही
मी कैरी कांदा किसून घेतो आणि नुसतेच गूळ आणि तिखट घालून करतो.

अगदी अगदी.. आमच्या कडे पण अगदी असाच करतात.. त्याला कांदा आंबा म्हणतो आम्ही. मस्त लागतो तो..

अगदी अगदी मान्य आपण काय हो थोडासा बदल करून खात रहायचे.

कापूसकोन्ड्या's picture

18 Apr 2017 - 7:29 am | कापूसकोन्ड्या

अगदी अगदी मान्य आपण काय हो थोडासा बदल करून खात रहायचे.

प्रसाद गोडबोले's picture

17 Apr 2017 - 6:25 pm | प्रसाद गोडबोले

ह्यालाच कैरीचा तक्कु म्हणतात काय ?

तक्कूत भौतेक कांदा नसतो बे.

कापूसकोन्ड्या's picture

18 Apr 2017 - 7:26 am | कापूसकोन्ड्या

तक्कूत भौतेक कांदा नसतो बे. खरं आहे. आमच्याकडे (सांगली तासगव कडे, तक्कू म्हणजे लाल मिर्च्या आणि फोडणी वगैरे घालून मुरवलेली चटणी त्यात मिरच्या तुकडे स्वरूपात असतात.

अभ्या..'s picture

18 Apr 2017 - 7:28 pm | अभ्या..

तो छुंदा झाला

सरनौबत's picture

17 Apr 2017 - 7:30 pm | सरनौबत

आम्ही कांदा-कैरी ला च तक्कु म्हणतो. १ नंबर लागतो.

होय, कैरी कांदा किसून घेतला की तक्कूच!!

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2017 - 10:05 pm | पिलीयन रायडर

करेक्ट. तो तक्कु. चटणी मिक्सरमधुन काढतात. छुंदा आणखीन थोडा वेगळा असतो.

ही पाकृ आवडली!

मोनाली's picture

18 Apr 2017 - 10:57 am | मोनाली

मस्त!

मस्तच! नक्की करून बघणार!

तेजस आठवले's picture

24 Apr 2017 - 7:53 pm | तेजस आठवले

आम्ही टक्कू करतो त्यात कांदा घालत नाही. साधारण कृती अशी, कैरी किसून, त्यात गूळ, मीठ आणि थोडे तिखट घालून कालवायचे आणि वर मेथी मोहरी जिरं हिंग यांची चुरचुरीत फोडणी द्यायची. आंबट गोड चवीत सगळी मज्जा आहे.
कांदा कैरी मध्ये पण तसेच, फक्त कांदा किसून अधिकचा.
पांढरे कांदे (अलिबाग नागोठणे इकडे मिळतात ते) किसून त्यात कैरीचा किस, हिरवी मिरची ठेचून, मीठ आणि थोडी साखर घालून पण मस्त कांदा-कैरी होते. दिसायला एक्दम पांढरी शुभ्र आणि चवीला भन्नाट.
चुंदा हा गुजराती गोड प्रकार आहे. त्याची बरणी ८ दिवस रोज उन्हात ठेवायची. सूर्याच्या उष्णतेने त्यातील साखर कैरीच्या किसात एकजीव होते आणि एक वेगळीच चव लागते.

राघवेंद्र's picture

25 Apr 2017 - 9:10 am | राघवेंद्र

चुंदा हा गुजराती गोड प्रकार आहे. त्याची बरणी ८ दिवस रोज उन्हात ठेवायची. सूर्याच्या उष्णतेने त्यातील साखर कैरीच्या किसात एकजीव होते आणि एक वेगळीच चव लागते.

एकदम आवडीचा पदार्थ

मनिमौ's picture

4 May 2017 - 10:43 am | मनिमौ

डब्यात आणली आहे चटणी. लसूण घालून कधीच करत नाही. एकदा पहाते तशी करून

पियुशा's picture

4 May 2017 - 2:43 pm | पियुशा

म्ला फोतु नय दिसत :(