न्यू-जर्सी कट्टा: २३ एप्रिल, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी, सकाळी ११ वाजता

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in काथ्याकूट
14 Apr 2017 - 1:42 am
गाभा: 

ऐका हो जर्सीकर,

मेरील पार्क, इजलीन इथे भेळ-कट्टा करायचा विचार आहे. अधिक पार्कची माहिती इथे मिळेल. भेळेचे साहित्य घरून आणायचे आहे.

ऍक्टिव्ह आणि रोमातील मिपाकर यांनी बाहेर येऊन धाग्याला प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती कळवावी.

येत्या विकांताचे हवामान छान आहे त्यामुळे लवकरात लवकर तारीख निवडावी.

एप्रिल १५, शनिवार सायंकाळी ४ वाजता

एप्रिल १६, रविवार सायंकाळी ४ वाजता

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 1:50 am | पिलीयन रायडर

लाईट्निंग स्पीडने आणलात की धागा!!

भेळेचे सामान आणुयात की भेळच करुन आणुयात? की ज्याला जे जमेल ते आणुया आणि ते एकत्र करुन त्याला भेळ म्हणुया!?

मला कोणतीही तारिख चालेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2017 - 1:52 am | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्याला शुभेच्छा !

सचित्र वर्णन येईलच, त्याची प्रतिक्षा आहे.

नुमविय's picture

14 Apr 2017 - 4:40 am | नुमविय

मी आणि आमचे कुटुंब नक्की ...तारीख कोणतीही चालेल

जयंत कुलकर्णी's picture

14 Apr 2017 - 4:50 am | जयंत कुलकर्णी

मी आहे.... :-)

जयंत कुलकर्णी's picture

14 Apr 2017 - 4:58 am | जयंत कुलकर्णी

अर्थात कोणी लिफ्ट दिली तर - दोन्ही बाजूने
:-)

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Apr 2017 - 7:38 am | आषाढ_दर्द_गाणे

आधी कळले असते तर सहज येऊ शकलो असतो.
असो. कट्ट्यासाठी शुभेच्छा. भेळ वगैरे म्हणजे काय ऐश आहे!

अभ्या..'s picture

14 Apr 2017 - 8:58 am | अभ्या..

न्यू राघवेंद्र भय्या भेळ सेंटर, न्यूजर्सी.
आमच्या इथे पावचटनी,भेळ, पाणीपुरी, कचोरी,स्पेशल दहिवडा मिळेल.
.
.
आणि गाड्यात नहेरु शर्ट पायजाम्यावर बसलेला राघवभय्या.
.
ओ तै, स्पेशल करू का भेळ?

राघवेंद्र's picture

14 Apr 2017 - 6:20 pm | राघवेंद्र

अरे अभ्या, कर चेष्टा लेका!!!

पाव-चटणी खाऊन बरीच वर्षे झाली आहेत आणि त्याची आठवण काढू नकोस.

हरिभाई ला १०० वर्षे झाली मला पावचटणी ला मिळाली नाही म्हणून वाईट वाटते. काय ते शाळेचे संस्कार ....

भेळेमुळे लोक धाग्याला प्रतिसाद द्यावेत असा हेतु आहे.

हाती घ्याल ते तड्डी द्या. ;)

सही रे सई's picture

14 Apr 2017 - 8:09 pm | सही रे सई

या वर्षी तरी काही करून मिपा कट्ट्याला हजेरी लावायचीच असं ठरवलं होत. खरंतर मीच एक धागा काढणार होते.

पण.. हा पण फार वाईट आहे.. हा धागा आला तेव्हा मस्त वाटल.. आणि तारखा बघून थोड वाईट.. इतक्या अचानक आणि कमी वेळ असताना या तारखा आल्या आहे. मला दिसतंय की छान हवामानामुळे कट्टा या तारखांना ठरवला गेला असावा. काही इतर कार्यक्रम आधीच ठरले आहेत. तरी प्रयत्न करून बघते. कट्ट्याला शुभेच्छा.

अजून एखादा कट्टा मे जून मधे इकडे connecticut मधे करायचा विचार आहे. कोणाला जमेल का यायला?

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 8:20 pm | पिलीयन रायडर

जयंत कुलकर्णी काका इथे ३० एप्रिल पर्यंत आहेत म्हणुन पटकन ठरवला कट्टा.

सही रे सई's picture

14 Apr 2017 - 8:47 pm | सही रे सई

ओह्ह हे माहित नव्हतं.
अजून एखादा कट्टा केला तर चालेल न?

अभिजीत राजवाडे's picture

16 Apr 2017 - 8:21 am | अभिजीत राजवाडे

आम्ही हार्टफोर्ड कनेक्टिकट मध्ये आहोत. आपण भेटू शकतो.

अभिजित

उद्या एप्रिल १५ ला संध्यकाळी ४ वाजता आपण सर्व जण मेरील पार्क मध्ये मुलांची खेळणी असलेल्या भागातील बेंच वर भेटू. माझा मोबाईल नंबर व्यक्तिगत संदेशातून कळवेल.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 8:56 pm | पिलीयन रायडर

चालेल!

भेळेचं नक्की आहे का?

एप्रिल १५, शनिवार सायंकाळी ४ वाजता कदाचित जमेल. रविवार नक्किच नाही.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 9:02 pm | पिलीयन रायडर

सासं - धाग्याच्या टायटल मध्ये टाकाल का? "१५ एप्रिल-मेरील पार्क-सायंकाळी ४ वाजता"

आता आठ दिवस सुट्टी असल्यानं मोठ्या आशेनं तारखा बघितल्या, पण................लगेच उद्या काऽऽऽय........कसं जमवायचं माणसानं. ते कनेटिकटवाले येऊन नाही र्‍हायले तर आम्हाला कसं जमावं?

सही रे सई's picture

23 Apr 2017 - 7:07 am | सही रे सई

आम्ही येऊन राहिलो बघा रेवती तै.. आणि कट्टा पण पुढे ढकलला आहे.. तरी येण्याचे करावे ही विनंती.. नव्हे आग्रहच..

जयंत कुलकर्णी's picture

14 Apr 2017 - 9:10 pm | जयंत कुलकर्णी

नम्स्कार !
मला कोणीतरी लिफ्ट देतील अशी आशा आहे आणि विनंतीही आहेच....

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 9:14 pm | पिलीयन रायडर

अजिबात चिंता करु नका... राघवेंद्र करतीलच काही तरी =))

आता @बाकी सगळे...

पुढच्या वीकांताला कट्टा केला तर याल का? कोण कोण येऊ शकेल?

मला जमणार आहेच. हवामान वाईट असले तर विचार करु त्याचा. इनडोअर कट्टा जमेल का ते पाहु. पण तुम्ही लोक नक्की येणार असाल तरच...

रेवती's picture

14 Apr 2017 - 9:22 pm | रेवती

तुम्ही करून घ्या ना! माझ्याकडे लोक्स जेवायला यायचेत पंध्रा वीस.

राघवेंद्र's picture

14 Apr 2017 - 9:26 pm | राघवेंद्र

बॅाम्बे टाॅक जवळच आहे. तिकडे वडापाव, भेळ मस्त मिळेल.

घरुन आणायला किती जण तयार असतील??

जयंत काका, तुम्ही या माझ्या बरोबर.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 9:31 pm | पिलीयन रायडर

हो मग खादाडीची सोय जवलच असेल तर राहु देत मग! तिथेच जाऊया!

डन मग! उद्या संध्याकाळी ४ वाजता भेटु!

जयंत कुलकर्णी's picture

14 Apr 2017 - 9:51 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Apr 2017 - 10:12 pm | आषाढ_दर्द_गाणे

पुढच्या म्हणजे २१-२२ येप्रिल?
येऊ शकतो. नक्की कळवा काय ते.
आणि जमल्यास न्यूयॉर्कमधून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी पटकन पोचता येईल अश्या ठेवल्यास अधिक सुलभ होईल.
उत्तराच्या प्रतीक्षेत.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 10:26 pm | पिलीयन रायडर

तू उठ आत्ता आणि ये! रेवाक्काला तरी लोकांना जेवु घालायचंय..

पुढच्या आठवड्यात मेजोरिटीला जमणार असेल तर करु. सईबाई येणार का?

राघवेंद्र, तुमचे काय मत?

पुढच्या आठवड्यात शनिवारी जमेल. म्हणजे अजून एक कट्टा ठरवायचं म्हणत आहात कि हाच कट्टा पुढे ढकलायचा म्हणत आहात ?

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Apr 2017 - 11:06 pm | आषाढ_दर्द_गाणे

आमाला पावर नाय! =))
उद्या सकाळी लोक मला उचलून (म्हणजे, pickup करून) क्रिकेट खेळायला नेणारेत आणि मग दुपारी आलो की आयकर भरायचे कंटाळवाणे काम आहे.
तेव्हा उद्याचे नाय जमणार.
परवाचं.... नको, धावपळ होईल फार
फूडच्या शनिवारचं बघा की....

राघवेंद्र's picture

14 Apr 2017 - 11:07 pm | राघवेंद्र

एक चांगला उन्हाळी कट्टा नियोजन करून करू. त्यात सगळ्यांना सामील करता येईल.

जयंत काकांना उद्या भेटू !!!

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2017 - 12:54 am | पिलीयन रायडर

ही लोकं येतील की काकांना भेटायला..
मला कसंही चालतंय.. फुडच्या शनिवारी पण..

राघवेंद्र's picture

15 Apr 2017 - 1:11 am | राघवेंद्र

बरेच मिपाकर पुढच्या विकांताला भेटू म्हणत आहेत. तर पुढील आठवड्याची तारीख नक्की करा आणि उद्याचा कट्टा पुढील आठवड्यात नक्की करू.

४/२२ - सकाळी
४/२२- संध्याकाळी
४/२३- सकाळी ( CT , MA , DC ,PA , VA च्या मिपाकरांच्या सोयोयीचे)
४/२३ - संध्याकाळी

कृपया लवकर प्रतिसाद द्या

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2017 - 1:24 am | पिलीयन रायडर

हो प्लिझ आता काय ते सांगा.. तुमच्यसाठी करतोय पहा अ‍ॅड्जस्ट!

आषाढ_दर्द_गाणे's picture

15 Apr 2017 - 1:48 am | आषाढ_दर्द_गाणे

बापरे, म्हंजे आता यावेच लागेल :प
बा/तेवीस काहीही चालेल...
ठिकाण ठरवा आणि कळवा

आषाढ_दर्द_गाणे's picture

15 Apr 2017 - 1:52 am | आषाढ_दर्द_गाणे

हो आणि ऍडजस्ट केल्याबद्दल धन्यवाद!
भेटायची उत्सुकता आहे सगळ्यांना....

सही रे सई's picture

16 Apr 2017 - 8:32 am | सही रे सई

+ 1

मिहिर's picture

15 Apr 2017 - 3:46 am | मिहिर

२३ (रविवार)ला प्राधान्य. कोणतीही वेळ चालेल. २२ असेल तर खात्री नाही.

अभ्या..'s picture

15 Apr 2017 - 1:52 am | अभ्या..

संध्याकाळी चालेल मला.
काही हरकत नाही. ;)

राघवेंद्र's picture

15 Apr 2017 - 1:56 am | राघवेंद्र

हो हो लोकप्रिय मध्ये ये ...

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2017 - 1:59 am | पिलीयन रायडर

ह्याच भागात २३ ला संध्याकाळी संदीप आणि वैभव ह्यांचा "इर्शाद" हा कार्यक्रम आहे. इच्छुकांसाठी - https://www.facebook.com/events/1651866975117026??ti=ia

अभ्या..'s picture

15 Apr 2017 - 2:01 am | अभ्या..

छान आहे कार्यक्रम. आम्ही परवाच पंढरपूरला केला.

आषाढ_दर्द_गाणे's picture

15 Apr 2017 - 2:21 am | आषाढ_दर्द_गाणे

मग काय तिकडे (इर्शाद आहे तिथे) करायचा का कट्टा?
मला चालेल.
मिपासाठी मुलाखत घेऊ हवं तर सादरकर्त्यांची :D

आषाढ_दर्द_गाणे's picture

15 Apr 2017 - 3:41 am | आषाढ_दर्द_गाणे

काय ठरलं नक्की?
अच्छा, मला ना शक्यतो तेवीस चालेल
२२ ला काम आहे जरा

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2017 - 3:53 am | पिलीयन रायडर

मलाही २३ जास्त चांगली वाटतेय. इर्शादला जायचं असेल ते जातील. मला तर ते जमणार नाहीये.

स्रुजा पण प्रयत्न करणारे!!!!

इस्ट कोस्ट कट्टा होतोय हा मस्त!!

माझा प्रयत्न फेल होणारे. मी कालच तिकीटं बघत होते. एक तर ४०० $ वगैरे ला जातायेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला थेट विमान मिळत नाहीये. ७ तासांचा प्रवास होतोय विमानाने तो ही एकीकडे. जेमतेम दिड तासाचा प्रवास आहे जर थेट विमान मिळालं अस्तं तर. त्यामुळे कट्ट्याला कोरड्या शुभेच्छा देऊन गप बसावं लागणारे :(

पिलीयन रायडर's picture

17 Apr 2017 - 9:07 pm | पिलीयन रायडर

तू निरुपयोगी आहेस.

नुमविय's picture

15 Apr 2017 - 5:15 am | नुमविय

मला चालेल ...२३ जास्त सोयीचा आहे..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एका धाग्यात मिपाचा कट्टा होत नाही. कृपया अजुन तीन धागे काढा. तोपर्यंत मी इनो घेतो जरा.

सहमत, धागा धागा अखंड विणूया!! =))

सही रे सई's picture

16 Apr 2017 - 8:31 am | सही रे सई

23 रविवारी सकाळी सगळ्यांनाच जमत असेल तर मी पण तयार आहे यायला.. होऊनच जाऊदे आता कट्टा

मी न्यू हॅम्पशायर आणि मास्सेचूसेट्स च्या सीमेवर (नाशुहा) राहतो. मिसळपाव चा नियमित वाचक आहे.
या भागात कुणी मिपाकर असतील तर त्यांच्या संपर्कात यायला आवडेल.

समर्पक's picture

17 Apr 2017 - 10:08 pm | समर्पक

अधिक आगाऊ सूचना असती तर बरे झाले असते. लांब असले तरी पुढील वेळी नक्की प्रयत्न करेन...
ई-भेट शक्य आहे का?

-समर्पक कोलोरॅडोकर

राघवेंद्र's picture

17 Apr 2017 - 10:59 pm | राघवेंद्र

समर्पक,

कट्टा करायला आम्ही केंव्हाही तयार असतो. कधी इकडे आलात तर अवश्य कळवा.

राघवेंद्र's picture

17 Apr 2017 - 11:07 pm | राघवेंद्र

२३ तारीख ही सर्वांच्या सोयीची दिसत आहे पण तो पावसाचा दिवस असल्यामुळे आणि बरेच जण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असल्यामुळे जर्सी सिटी न्यू पोर्ट मॉल चा विचार चालू आहे.

आषाढ_दर्द_गाणे's picture

17 Apr 2017 - 11:42 pm | आषाढ_दर्द_गाणे

न्यू पोर्ट मॉल चांगली, सोयीची आणि चांगल्या सोयींची जागा दिसते आहे.
किती वाजता? आणि सकाळी भेटतोय तर भेळेचा बेत आहे की अजून काही?

सही रे सई's picture

18 Apr 2017 - 12:04 am | सही रे सई

एक आइड्याची कल्पना आली आहे.. त्या दिवशी ज्यांना तिथे प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांच्या साठी ई कट्टा करायचा का? म्हणजे एखादा वेब्मिनार करू सुरु आणि बाकी सगळे त्याला ऑनलाईन जॉईन होतील. न्यु पोर्ट मॉल मधे वाय फाय आहे का?

समर्पक's picture

18 Apr 2017 - 12:54 am | समर्पक

मी ई-कट्ट्यास येईन. बाहेर किंवा मॉल मधे हे कसे जमेल हे तिकडे पहावे लागेल.

गेल्या वेळी मिपा-भटकन्ती-महागुरु म्हात्रे काका आलेले तेव्हाही इच्छा होती, पण जमले नाही...

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Apr 2017 - 12:31 am | आषाढ_दर्द_गाणे

आयडिया चांगली आहे!
आणि वायफाय नसले तरी लोड नाही, फोनच्या हॉटस्पॉट वरून करता येईल इ-कट्टा...

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 12:58 am | पिलीयन रायडर

वेबिनारची आयडीया मस्तच! सई तू दे इथे डिटेल्स. ज्यांना जॉइन व्हायचे आहे हे ते जॉईन होऊ शकतील!

आदगा, सकाळी सकाळी भेळ कुठे करणार आणि खाणार कुठे? त्यापेक्षा तिथल्या फुडकोर्टलाच जाऊया. सकाळी ११ च्या सुमारासची वेळ आत्ता गृहित धरत आहे.

तर मंडळी.. आत्ता ह्या क्षणाला फायनल झालेले डिटेल्स -

२३ एप्रिल, सकाळी ११ वाजता, न्युपोर्ट मॉल येथे भेटुया.

येणारे सदस्य :-

उत्सवमुर्ती - जयंत कुलकर्णी!

१. राघवेंद्र, वृषाली आणि पिल्लु
२. पिरा, मि.पिरा आणि पिल्लु
३. नुमविय कुटुंबिय आणि पिल्लु
४. आषाढ दर्द गाणे
५. सही रे सई
६. मिहिर
७. रोशनी, मि.रोशनी आणि पिल्लु

अजुन कुणाकुणाचे नक्की आहे?

राघवेंद्र's picture

18 Apr 2017 - 1:08 am | राघवेंद्र

जॅक बावर आणि कुटुंब
येडा अण्णा आणि' कुटुंब
लढवय्ये सूर्याजीपंत

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 1:11 am | पिलीयन रायडर

क्या बात!!!

ज्यांच्या फेसबुकच्या पोस्टवरुन हा विषय निघाला त्यांचा मिपा आयडी काय आहे? आणि ते (आणि त्यांना ट्रेनमध्ये अचानक भेटलेले दुसरे मिपाकरही) येणारेत का?

राघवेंद्र's picture

18 Apr 2017 - 1:15 am | राघवेंद्र

तेच ते सूर्याजीपंत!!!

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 1:17 am | पिलीयन रायडर

अस्संय होय!

जयंत कुलकर्णी's picture

18 Apr 2017 - 1:12 am | जयंत कुलकर्णी

उत्सवमुर्ती ? :-)
काय चेष्टा लावली आहे पिरा.....
तुम्ही सगळे भेटणार आहात वेळ काढून हाच उत्सव आहे....

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 1:15 am | पिलीयन रायडर

बास का काका!! तुमच्यासाठी काहिही करुन ३०च्या आत भेटायचे आहे! बाकी सगळे इथेच आहेत.

आहातच तुम्ही उत्सवमुर्ती!

{पण खादाडीचं बिल आपापलं द्यायचंय हे लक्षात ठेवा रे =)) }

जयंत कुलकर्णी's picture

18 Apr 2017 - 2:03 am | जयंत कुलकर्णी

:-)

जयंत कुलकर्णी's picture

18 Apr 2017 - 2:05 am | जयंत कुलकर्णी

काही हरकत नाही....

मिहिर's picture

18 Apr 2017 - 2:06 am | मिहिर

जागा न्यूपोर्ट मॉल झाली हे चांगलं झालं. येणं सोपं होईल आता. नक्की येणार.

सही रे सई's picture

18 Apr 2017 - 1:04 am | सही रे सई

स्काईप वर ग्रुप व्हिडिओ काल्लिंग उपलब्ध आहे असे दिसते. दुसरा ऑप्शन webminar किंवा gotomeeting करू शकतो?
काय जास्त सोयीचे होईल?

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 1:13 am | पिलीयन रायडर

ग्रुप स्काईपसाठी लॅपटॉप वापरला आहे, पण मोबाईलवरुन ग्रुप कॉलिंगला इश्यु येतो. वेबिनार ऑफिसमध्येच वापरले आहे, पण ग्रुप व्हिडिओ कॉल केलेला नाही.

लंबूटांग's picture

18 Apr 2017 - 2:55 am | लंबूटांग

बहुतेक २५ जणांची लिमीट आहे पण त्याला. नुसतेच लाइव्हस्ट्रीम करायचे असेल तर ustream चांगला पर्याय आहे.

नुमविय's picture

18 Apr 2017 - 3:46 am | नुमविय

न्यूपोर्ट मॉल हा उत्तम उपाय आहे.. मुख्य म्हणजे पार्किंग चा प्रश्न सुटला...:)... नक्कीच भेटू..

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Apr 2017 - 4:21 am | आषाढ_दर्द_गाणे

चला, न्यूपोर्ट मॉलात वीर आणि वीरांगना दौडूदेत सात!

एक शंका, खाण्याचे काही विशेष उल्लेखनीय ऑप्शन्स नाही दिसत तिथे...
म्हणजे मला काही नाही, पण शाकाहार्यांसाठी पंचाईत होऊ शकते.
जाणकार काय म्हणतात ह्यावर?

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 4:37 am | पिलीयन रायडर

ह्या जागेवरची मागच्या कत्ट्याची खादाडी..

1

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Apr 2017 - 5:17 am | आषाढ_दर्द_गाणे

ओह अच्छा, बरंच काही मिळतं असं दिसतंय #पडलोतोंडघशी
रच्याकने, आख्खा तीनबायतीन कोलाज न टाकता निव्वळ 'आहेत बरेच पर्याय' म्हटलं असतं तरी चाललं असतं =))
#कर्बयुअरएंथ्युझियाझम #आवरा

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 6:37 am | पिलीयन रायडर

#नाहीआवरतजा

या मॉलमधे पहील्या माळ्यावर एक फुडकोर्ट आहे. तीथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चिकन तेरीयाकी हा एक बर्‍यापैकी मिळणारा आणि परवडणारा प्रकार आहे. दुपारी जेवणाच्या वेळेत गेलात तर तीथल्या हाफीसातल्या लोकांना जेवायला एक मोठी जागा आहे तीथे भारतीय जेवणही मिळते.

बाजुलाच हडसन नदी आहे तीथे जाउन या. काही वर्षापूर्वी त्या नदीवर एका विमानाचे आपात्कालीन लँडींग झाले होते. जे लोक पाथ रेल्वेने जाणार असतील ते पुढे जाउन ३३ स्ट्रीटला जाउन न्युयोर्कमधील काही प्रेक्षणीय स्थळे बघू शकतात.

सही रे सई's picture

18 Apr 2017 - 7:19 pm | सही रे सई

चेपू वरती व्हिडीओ कॉल्लिंग सुरु झालेले दिसतय.. कोणी आधी वापरलं आहे का?

इथे अधिकची माहिती मिळू शकेल
http://www.theverge.com/2016/12/19/14006752/facebook-messenger-group-vid...

व्हिडीओ कॉलिंग करायला कोण कोण उत्सुक आहेत?

आषाढ_दर्द_गाणे's picture

19 Apr 2017 - 3:45 am | आषाढ_दर्द_गाणे

आता जर २३ तारीख, ठिकाण आणि वेळ नक्की झाली असेल तर धाग्याच्या नावात बदल करायला पाहिजे, नई का?

छ्या! अजून दोन-तीन धागे आल्याशिवाय नाही. ;-)

पिलीयन रायडर's picture

19 Apr 2017 - 7:10 pm | पिलीयन रायडर

डन!

राघवेंद्र's picture

19 Apr 2017 - 7:22 pm | राघवेंद्र

मॉल मध्ये कुठे ?

फूड कोर्ट AMC सिनेमा च्या समोर असे काही तर असायला हवे .

पिलीयन रायडर's picture

19 Apr 2017 - 7:33 pm | पिलीयन रायडर

हो की! मागच्या वेळेसारखे नको व्हायला!

वातावरण चांगले असेल तर? मग बागेत जायचे आहे ना?

१. मॉलच्या पाथ स्टेशनच्या बाजुने - चिपोतले समोर
२. मॉलच्या पार्किंगच्या बाजुने - तिसर्‍या मजल्यावर फुडकोर्ट वर - ए.एम.सी समोर

असे दोन पर्याय ठेवु. पण बागेत जायचे असेल तर २रा पर्याय कटकटीचा आहे.

राघवेंद्र's picture

19 Apr 2017 - 7:44 pm | राघवेंद्र

पावसाचा अंदाज ७०% वरून ९०% झाला आहे. त्यामुळॆ न्यू पोर्ट ग्रीनला विचार मॉल मध्ये आल्यावर करू.

आषाढ_दर्द_गाणे's picture

22 Apr 2017 - 1:05 am | आषाढ_दर्द_गाणे

ह्या दोनपैकी नक्की कुठे भेटायचंय?

राघवेंद्र's picture

22 Apr 2017 - 1:55 am | राघवेंद्र

मित्रा , फूडकोर्ट मध्ये भेटू. मी कॉल करेल पोहचल्यावर.

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2017 - 3:08 am | पिलीयन रायडर

वातावरण चांगलं असेल तर आधी ३ र्‍या मजल्यावर जाऊन मग बागेत जाऊन परत खायला यायचं की आधी निवांत खाऊन पिऊन मग वाटलं तर बागेत जायचंय?!

राघवेंद्र's picture

21 Apr 2017 - 6:28 pm | राघवेंद्र

रविवारचे वातावरण मस्त होत आहे. पाऊस नसेल बहुतेक.
त्यामुळे कट्टा जोरात होऊन जाऊदे.

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2017 - 7:43 pm | पिलीयन रायडर

येस्स!!!

सही रे सई's picture

21 Apr 2017 - 11:16 pm | सही रे सई

अगदी अगदी.. मी कालपासून बघत आहे तर पाऊस हळूहळू कमी होऊन अता तर दिसेनासा च झाला..
मी आणि माझा नवरा मुलगी थोडेसे उशीरा पोहोचू.. साधारण ११:३० - १२ पर्यंत.

वाह! कट्ट्याला आगामी शुभेच्छा राखून ठेवल्या जात आहेत. सचित्र वृत्तांत आला की मग मिपाच्या परंपरेनुसार तेव्हा दिल्या जातील! :-P

वेल्लाभट's picture

22 Apr 2017 - 9:13 am | वेल्लाभट

शुभेच्छा !

खटपट्या's picture

22 Apr 2017 - 11:27 pm | खटपट्या

कट्टा झाल्याचे फोटो टाका ओ

इ कट्टा करण्यासाठी कोणी अजून आहे का उत्सुक?

स्रुजा's picture

23 Apr 2017 - 6:38 am | स्रुजा

कट्ट्याला खुप सार्‍या शुभेच्छा ! ई कट्ट्याला हजर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. पिराकडे माझे सगळे डिटेल्स आहेतच.

राघवेंद्र's picture

23 Apr 2017 - 7:57 am | राघवेंद्र

तर मंडळी, उद्या म्हणजे रविवारी सकाळी ११ वाजता न्यू पोर्ट मॉल मध्ये AMC सिनेमा समोर फूड कोर्ट मध्ये भेटू.

पिलीयन रायडर's picture

23 Apr 2017 - 8:47 pm | पिलीयन रायडर

मस्त उन्हात कट्टा सुरु झालेला आहे!

राघवेंद्र's picture

24 Apr 2017 - 6:17 am | राघवेंद्र

धन्यवाद उपस्थित आणि इ-उपस्थित मिपाकर !!! कट्टा जोरदार झाला आणि आता वृंतान्तातची प्रतीक्षा.

सूर्याजीपंत आणि नूमविय तुमची अनुपस्थिती जाणवली.

सूड's picture

25 Apr 2017 - 1:48 pm | सूड

वृत्तांत कधी?

अभ्या..'s picture

25 Apr 2017 - 1:51 pm | अभ्या..

हो, फोटोसहित हवा.
राघवाला ओळखतो, तो गाववालाच आहे.
पिरा हा कोण माणूस आहे ते पहायचंय. ;)

संजय पाटिल's picture

25 Apr 2017 - 3:47 pm | संजय पाटिल

पिरा हा कोण माणूस आहे ते पहायचंय. ;)

खातंय मार आता.....

पिरा हा कोण माणूस आहे ते पहायचंय. ;)

=))

नुमविय's picture

25 Apr 2017 - 4:28 pm | नुमविय

काही कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागल्याने कट्टा चुकला ... रुख रुख राहील जोपर्यंत परत कट्टा होत नाही....

पद्मावति's picture

25 Apr 2017 - 4:32 pm | पद्मावति

वृत्तांताची वाट पाहतेय...

बिन्नी's picture

25 Apr 2017 - 4:33 pm | बिन्नी

किती मजा करता तुम्ही लोक !

मला पण कट्ट्याला जावे असे वाटू लागले आहे.

मस्त मजा केली दिसतेय.. किती दिवसात मिपा वर कट्ट्याचा खमंग वृत्तांत आला नाही.
येऊ द्या !!!

आताशा कट्टे होत नाहीत पुण्यात. पूर्वीचं पुणं राह्यलं नाही.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2017 - 6:06 pm | पिलीयन रायडर

येणार येणार... वृतांत लवकरच येणार..! नवमिपाकर आषाढ दर्द गाणे ह्यांना घोड्यावर बसवण्यात आलेले आहे!

@ अभ्या - फेसबुकवर "मिपाकर" असा ग्रुप आहे. त्यात आम्ही लाईव्ह गेलो होतो. तिथे तुला पिरा नावाचा माणुस दिसेल!!

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 3:13 am | आषाढ_दर्द_गाणे

येणार येणार... वृतांत लवकरच येणार..! नवमिपाकर आषाढ दर्द गाणे ह्यांना घोड्यावर बसवण्यात आलेले आहे!

उतरलेलो आहे. वृत्तांत इथे वाचा.