४-५ हिरव्या मिरच्या,
अर्धा छोटा चमचा साखर,
चिमुट्भर मीठ,
१ चमचा दाण्याचं कूट
कृती:
मिरच्या gas वर भाजून घ्या. अगदी कोळसा नका करू. पण व्यवस्थीत भाजून घ्या.
मिरचीचं देठ काढुन टाका.
वाटी किंवा बत्त्यानी मिरच्या साधारण ठेचुन घ्या.
त्यात साखर, मीठ आणि दाण्याचं कूट घालून हातानी एकजीव करा.
ठेचा तयार. खाउन बघा आणि मला सांगा. अप्रतिम लागतो हे निश्चित.
सालो
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 9:00 pm | प्राजु
हा ठेचा जबरीच लागतो....
मी यात लसूण सुद्धा घालते मिरच्या तव्यात भाजतानाच.
भाकरीसोबतचा फोटो टाकला असता ठेच्याचा तर..... छे! विचारू नका.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Feb 2009 - 9:58 pm | चकली
सोपी आणि एवरग्रीन पाकृ.
चकली
http://chakali.blogspot.com
10 Feb 2009 - 10:31 pm | सुक्या
जबरा टेस्ट असते. बाजरीची भाकरी, ठेचा अन् हातनं फोडलेला कांदा. आहाहा . . फाइव स्टार हाटेलातलं जेवण सुध्दा मचुळ लागत ह्याच्यापुढे.
शिळा ठेचा तर अजुनच भारी.
(गावरान) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
10 Feb 2009 - 11:00 pm | शेणगोळा
...आणि मूळव्याध झाली तर या पाककृतीसोबत 'कैलास जीवन' विनामूल्य मिळणार का? :)
सर्वांचाच लाडका,
(कुल्याला मोड आलेला) शेणगोळा.
11 Feb 2009 - 12:23 am | नाटक्या
मुगाला किंवा मटकीला मोड आलेते तर तात्या त्याची झणझणीत मिसळ बनवतात. तुमच्या मोडाचे काय करतील सांगणे कठीण आहे, कारण तो मोड मुळातच झणझणत असेल >:)
18 Feb 2009 - 7:53 am | विसोबा खेचर
आम्ही बिगरफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही..
तात्या.
18 Feb 2009 - 12:05 pm | सालोमालो
२ दिवसांत पाकृ पुन्हा करून फोटो टाकतो. असा फोटो टाकतो की बास्स.....
सालो
21 Feb 2009 - 11:57 am | अश्विनि३३७९
ह्यात थोड दही घातल्यास उत्तम लागेल का?
21 Feb 2009 - 12:38 pm | विशाल कुलकर्णी
साखर आणि दाण्यांचं कुट न घालता केला तर अजुन झणझणीत होतो. सोलापुरकडे त्याला खरडा असेही म्हणतात. तव्यावर मिरच्या भाजुन तिथेच वाटीने खरडायचा. लाल गळायला लागणार याची शाश्वती.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)