रामराम मंडळी..
काही दिवसांपुर्वी कुठल्याशा मराठी वाहीनीवर एक कार्यक्रम चालु होता. छोटीशी स्पर्धा होती २ मिनीटे मराठीत बोलण्याची. पण बघुन अतीशय वाईट वाटले की फार कमी लोक असे करु शकले. ईतकी अवघड आहे का माझी भाषा बोलण्यास ? उत्तर आहे नाही. तीस आपण तसे केले. आज जर आपण १०० ते २०० वर्ष जुनी मरठी पुस्तके वाचलीत तर आज आपल्या ती मराठी समजत नाही या गोष्टी बद्दल मला खेद वाटतो.
असो.. मराठी वाचवा.. मराठी वाचवा असे म्हणण्या पेक्षा आपणच काहीतरी केले पाहीजे. यात सर्वप्रथम असलेली भाषा सुधारणे हे ओघानेच आले. आज आपल्याला वापरात असलेल्या बर्याच ईंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ माहित नाहि. अर्थात ते शब्द वापरण्यास सोपे असतील तर अति उत्तम. अशाने ते व्यवहारामधे देखील येतील. मि कुठल्याही भाषेचा विरोधी नाही पण मला माझी भाषा देखील तितकीच प्रिय आहे जीतकी ईतरांना त्यांची भाषा असते आणि त्यात मी काहीही वावगं मानीत नाही. तर एकत्र या आणी माहित असेल त्या शब्दांचा अर्थ सांगा. माझ्या जवळील काही शब्द खालील प्रमाणे:
Mobile : भ्रमणध्वनी
Calculator : गणकयंत्र
Telephone : दुरध्वनी
प्रतिक्रिया
20 Feb 2009 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
संगणक अभीयंता (B. E.)
(B. E.) ला मराठी प्रतीशब्द हवा आहे. आमच्या एका मित्राला तो शब्द अर्पण करुन आम्हाला 'आपण काहितरी केले पाहिजे' ह्या अभियानाची सुरुवात करायची आहे ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
20 Feb 2009 - 11:58 am | फ्रॅक्चर बंड्या
पदवी bachelor
पदविका diploma
20 Feb 2009 - 12:00 pm | शेखर
(B. E.) = अविवाहीत अभियंता ;)
20 Feb 2009 - 2:00 pm | सुनील
M. E. = विवाहित अभियंता
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Feb 2009 - 12:00 pm | सुचेल तसं
अभियांत्रिकी पदवीधर
तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर
20 Feb 2009 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार
प्रेषक सुचेल तसं ( शुक्र, 02/20/2009 - 12:00) .
अभियांत्रिकी पदवीधर
आपले धन्यवाद !
आता हा शब्द आम्ही अत्यंत उदात्त भावनेने 'बाप्पा' ह्यांना अर्पण करत आहे. आता जा आणी आपल्या माहीती पुस्तकात योग्य बदल करा !
ब्रम्हज्ञानी कोरडा पाषण
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
21 Feb 2009 - 7:32 pm | हरकाम्या
इंजिनियरला प्रतिशब्द " अभियंता " आहे हे आपणास माहित नाही काय ?
सरकारी पाट्या वाचा .
20 Feb 2009 - 12:00 pm | विसोबा खेचर
मराठी वाचवा असे म्हणण्या पेक्षा आपणच काहीतरी केले पाहीजे
आंतरजालावर मराठीचा अधिकाधिक प्रसार आणि प्रचार व्हावा या दृष्टीने जी काही मराठी संस्थळे आहेत त्यात मिपाची भर टाकून आम्ही थोडासा हातभार लावला आहे...
शिवाय होता होईल तोवर आम्ही इतरही सगळीकडे मराठीचाच आग्रह धरतो..
तात्या.
20 Feb 2009 - 12:05 pm | बाप्पा
तात्या, आम्ही आपणाशी निर्विवाद पणे सहमत आहोत.
20 Feb 2009 - 12:09 pm | सातारकर
कर्णपिशाच्च
20 Feb 2009 - 2:13 pm | मराठी_माणूस
ऑफिस मधे मराठी माणसाशी मराठीतच बोलतो , भले तो कोणत्याही भाषेत बोलो. बर्याचदा तो , आजुबाजुला अन्य भाषीक असतील तर हींदी किंवा ईंग्रजीत बोलतो , पण मी त्याच्याशी मराठीतच चालु ठेवतो.
(अवांतरः ऑफिस मधल्या मराठी चा आग्रह धरणार्या अन्य एका सहकार्याचा दुसरा एक मराठी भाषीक 'राज' चा माणूस म्हणून उपहास करतो आणि तेही परप्रांतीया समोर)
20 Feb 2009 - 2:15 pm | दशानन
सही करता !
मला तसं करता येणार नाही .. इकडे कोणी मराठी नाहीच आहे.. पण मी महाराष्ट्रात कुठे ही फोन केला तर ९९% मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न करतो.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
20 Feb 2009 - 4:13 pm | विटेकर
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन
आवडले.
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
21 Feb 2009 - 4:18 am | अमित.कुलकर्णी
नवीन मराठी शब्द तयार करून वापरणार असू तर चांगलंच आहे पण हल्ली ऐकू येत असलेल्या काही साध्या वाक्यरचनांमध्ये थोडे बदल केले तर ते जरा बरे वाटतील.
काही उदाहरणे -
१. मी त्याची हेल्प केली --- मी त्याला मदत केली
२. त्याचं पॅकेज सेव्हन पॉईंट फाईव्ह आहे ----- त्याला साडेसात लाख रुपये पगार मिळतो
३. पहिल्या वन डे मधे सचिनची फिफ्टी --- पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिनचे अर्धशतक (एका वृत्तमित्रात असली वाक्ये असतात.. पत्र नव्हे मित्र. आणि हे उदाहरण फक्त वृत्तपत्रीय लेखी भाषेबद्दल दिले आहे रोजच्या बोलण्याबद्दल नाही.)
४. मला फोन करायला टाईम भेटला नाही - मला फोन करायला वेळ झाला नाही ("फोन" शब्द न बदलताही दुसरे वाक्य अधिक मराठी वाटते)
५. संडेला तू बिझी आहेस का? ---- रविवारी तुला काम आहे का?
(आणि जमेल तितके शुद्धलेखनाकडेही लक्ष दिल्यास उत्तम. कारण "तू" या शब्दातल्या उकाराचा उच्चार मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत दीर्घ केला जातो - केवळ म्हणून तरी "तु" असे लिहू नका असे माझे म्हणणे आहे. हे करणे आपण आज थांबविले आणि प्रत्येकजण स्वतःच्या नियमांप्रमाणे लिहू लागला तर तर अजून १० वर्षांनी "तू" हा एकेकाळी दीर्घ का लिहिला जायचा हे कुणाला सांगताही येणार नाही. त्यात काही वावगे वाटत नसल्यास सोडून द्या!)
-अमित
21 Feb 2009 - 5:18 am | विकास
आपण इंग्रजीला मराठी आणि मराठी म्हणले तर कदाचीत नवीन इंग्रजीच्या म्हणजेजुन्या मराठीच्या वेडापायी आपोआप खरी मराठी वाचेल. :-)
अर्थात तसे वेड लागण्यासाठी काय लागेल? - अर्थातच मराठी माणसाकडे मराठीपणा न सोडता देखील भांडवलासारखा पैसा आहे आणि त्याचे उद्योग आहेत अथवा ज्याच्यात तो आहे त्याच्यात तो पैसा करू शकतो, आंतर्राष्ट्रीय होवू शकतो, असे समजल्यास आपोआप मराठी वाचेल...
21 Feb 2009 - 7:08 am | १.५ शहाणा
१. मी त्याची हेल्प केली --- मी त्याला मदत केली
२. त्याचं पॅकेज सेव्हन पॉईंट फाईव्ह आहे ----- त्याला साडेसात लाख रुपये पगार मिळतो
३. पहिल्या वन डे मधे सचिनची फिफ्टी --- पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिनचे अर्धशतक (एका वृत्तमित्रात असली वाक्ये असतात.. पत्र नव्हे मित्र. आणि हे उदाहरण फक्त वृत्तपत्रीय लेखी भाषेबद्दल दिले आहे रोजच्या बोलण्याबद्दल नाही.)
४. मला फोन करायला टाईम भेटला नाही - मला फोन करायला वेळ झाला नाही ("फोन" शब्द न बदलताही दुसरे वाक्य अधिक मराठी वाटते)
५. संडेला तू बिझी आहेस का? ---- रविवारी तुला काम आहे का?
सहमत मी जरुर याच प्रकारे बोलेन (इंप्लिमेंट ?करेन)
21 Feb 2009 - 10:25 pm | शिवापा
मार्लिश मधे मध्यंतरी एका मुलिचे दुसर्या मुलीबरोबर चाललेले एक गॉसिप कानावर पडले होते. "चांगला आहे गं तो. स्वताची सॉफ्टवेअर कंपनी आहे पण देअर आर सो मेनी छोट्या छोट्या कंपन्याज ना!
आता मला गॉसिप शब्दासाठि तेव्हढाच मसालेदार शब्द द्या.
स्वगत. (इंग्लिश भाषेवर असे बलात्कार करनार्या विरोधात इंग्रज लोक मराठी लोकांचे काहिच कसे करत नाहित?)