वृद्ध माता-पित्याची जबाबदारी

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
19 Feb 2009 - 3:07 pm
गाभा: 

"वृद्ध माता-पित्याची जबाबदारी टाळणाऱ्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाचा निर्णय"

आजच्या लोकसत्तामधील बातमी

www.loksatta.com

कायद्याने प्रश्न सुटत नाही, पण कायदा असला की प्रश्न आहे हे तरी ध्यानात येते. खरतर असा कायदा करावा लागणे किंवा त्याचा आधार घेणे हे समाज म्हणुन आणि व्यक्ती म्हणुनही आपले अपयश आहे.

देव करो आणि कुणावरही या कायद्याचा आधार घेण्याची वेळ न येवो.

प्रतिक्रिया

या कायद्याचा आधार घेण्यापर्यंत गोष्ट किती विकोपाला गेलेली असेल? पाश्चात्य संस्क्रुतीचे अनुकरण करताना आज आपणही उद्याच्या पिढी समोर काय आदर्श ठेवित आहोत याचा सारासार विचार व्हावयास हवा.

आनंदयात्री's picture

19 Feb 2009 - 5:27 pm | आनंदयात्री

हा कायदा फक्त भारतातच लागु असणार काय ? एखादा मुलगा नॉन रेसिडेंट असेल तर त्याला या कायद्यात त्याचे आई वडिल कसे आणतील ?

ऍडीजोशी's picture

19 Feb 2009 - 5:38 pm | ऍडीजोशी (not verified)

का NRIs वर घसरतोयस???? इथे अशी नालायक मुलं कमी आहेत का? आधी त्यांना सुधारा मग NRIs कडे वळा. ते केवळ भारतात रहात नाहीत म्हणून त्यांना अशी वागणूक? भारता बाहेर राहिल्याने प्रेम कमी होते का? ते भारतात डॉलर पाठवून इकॉनॉमी स्ट्राँग करतात. तुम्ही काय करता???

वाहीदा's picture

19 Feb 2009 - 7:12 pm | वाहीदा

बाकी आपण ही वार्धक्या कडे झुकणार आहोत कधी ना कधी , हे कसे काय विसरतात हे लोक्स ??
बिचारे आई वडील ईभ्रत ईज्जतापोटी चार लोकां ना आपले त्रास सांगू ही शकत नाहीत ...
ऐसे बच्चोंसे तो, बेऔलाद मरना अच्छा !
जो बुढापे के हालत मैं कोर्ट कचहरी के चक्कर काटने लगाये :-(
बाकी बायको आली ,की काही पुरुष कसे काय ईतके बदलतात समजत नाही ...Sad !!
(हे observation सगळ्या पुरुषांच्या बाबतीत नाही )
आई वडीलां नी मरे पर्यंत घर हे आपल्याच नावावर ठेवावे असे मला वाटते...
आई वडील हे असे नाते आहे जे मतलबी नसते...बाकी उरलेली सगळी नाती काही ना काही कारणांनीच जवळ येतात अन मतलबी च असतात ..
~ वाहीदा

विकास's picture

19 Feb 2009 - 7:23 pm | विकास

बाकी बायको आली ,की काही पुरुष कसे काय ईतके बदलतात समजत नाही ..

हा दोष त्या स्त्रीपेक्षा तीच्या पदराआड लपणार्‍या नवर्‍याचा असतो ही वस्तुस्थिती आहे. हीच गोष्ट आत्ताच्या काळात उलट देखील होते/होऊ शकते, "आमच्या ह्यांना..." असे म्हणत.

विकास's picture

19 Feb 2009 - 7:21 pm | विकास

मधे एकदा खूपच अस्वस्थ करणारी बातमी वाचल्याचे आठवते: त्या बातमी प्रमाणे, एका वृद्ध महीलेस कँन्सर होता. हॉस्पिटलमधे उपचार वगैरे चालू असताना, शुद्ध हरपवून का हरपली म्हणून तेथील कर्मचार्‍याच्या मदतीने तीला तीच्या मुलाने आणि मुलीने(अर्थातच प्रौढ असलेल्या), सरळ मृत म्हणून जाहीर करून घेतले आणि अंत्यविधीस स्मशानात आणले. सुदैवाने अथवा दुर्दैवाने त्या महीलेस चितेवर जाग आली आणि तेंव्हा तेथील डोंबाच्या हा सर्व प्रकार लक्षात आला म्हणून ती वाचली. ती वाचली हे जरी तीचे सुदैव मानले तरी त्यानंतरच्या पोटच्या पोरांनी दिलेल्या यातना मिळणे हे दुर्दैव वाटते.

बाकी, सुस्थितीत असुनही, स्वतःच्या आईकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे महाभाग पण पाहीलेत आणि स्वतःचे आई-वडील गेलेत, बाकी वडील व्यक्ती पण गेलेल्या असल्याने, स्वतःच्या नव्वदीच्या घरातील आजीची पण मनापासून काळजी घेणारे नातू-नातसून पण पाहीलेत. म्हणून वाटते कायद्याने नक्की काय होईल ते माहीत नाही, कारण जे काळजी घेतात त्यांना कायद्याची गरजच नाही आणि ज्यांना पडलेले नाही ते पळवाटा शोधणार ही कुठल्याही कायद्याप्रमाणे येथेही वस्तुस्थितीच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2009 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकासराव, यावरुन वपुंच्या काही ओळी आठवल्यात त्या खरडतो..

'' मरण म्हणजे तिरडीवरुन नेऊन स्मशानात जाळणं, तेरावं करुन मोकळं होणं असं नाही. ती कृती झाली. तुमच्या आक्रोशाची नोंद न घेतली जाणं हे मरण. अशी किती प्रेतं किती परिवारात एका बाजूला पडून असतील ते प्रत्येकानं पहावं .त्या मरणाचा प्रत्यय आला म्हणजे आपल्या सदेह अस्तित्वाचं ओझंही परिवारावार टाकू नये असे त्यांना वाटत असेल''

वृद्ध माता-पित्याची जबाबदारी घेण्यासाठी कायदा करावा लागतो. किती वाईट..!

-दिलीप बिरुटे

विकास's picture

19 Feb 2009 - 11:05 pm | विकास

बिरुटेसर!

अगदी बोलक्या ओळी आहेत....

सर्वसाक्षी's picture

19 Feb 2009 - 7:32 pm | सर्वसाक्षी

फार वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट.

म्हातारा, त्याचा मुलगा, त्याची सून व नातु असे चौघे रहात असतात. हळुहळु म्हातार्‍याचे ओझे होऊ लागते. एक दिवस काहीतरी वाजते, म्हातारा संतापुन काही बाही बोलतो. बायको नवर्‍याला बजावते की यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा नाहीतर मी तरी जाते. अखेर मुलगा वडिलांना जायला सांगतो. म्हातारा घर सोडुन जायला निघतो. जाताना म्हातारा पांघराला एखादी घोंगडी मागतो, बाहेर रस्त्यावर रहायचे तर पांघरुण तरी असावे! म्हातार्‍याचा मुलगा आपल्या मुलाला म्हणजे नातवाला आतुन घोंगडी आणायला सांगतो. नातु अर्धी फाडलेली घोंगडी घऊन बाहेर येतो. म्हातारा कपाळाला हात लावतो - डोळ्यात पाणी आणुन विचारतो की एक घोंगडी देखिल नाही मिळणार? मुलगा नातवाला जाब विचारतो.

नातु सांगतो, "बाबा, मी मोठा होइन तेव्हा तुम्हाला घराबाहेर काढीन ना त्यावेळेला तुम्हाला घोंगडी लागेल म्हणुन अर्धी फाडुन ठेवुन दिली आहे.

वाहीदा's picture

19 Feb 2009 - 8:00 pm | वाहीदा

मां बाप सिर्फ दुवा देते है, बद्-दुवा नहीं देते
लेकीन जब उनकी रुह तड्पती हैं ना ,
तो उसका असर दुर तक जाता है !
यहीं फेडना है हर चीज का हिसाब ...
~ वाहीदा

नीधप's picture

19 Feb 2009 - 7:34 pm | नीधप

यात फक्त मुलालाच दोषी धरण्यात आलेय का?
मुलीने आईवडीलांचा सांभाळ केला पाहिजे हे बंधन नाही का?
की तिला तिच्या सासरच्या परवानगीशिवाय आईवडीलांची काळजी पण घेण्याचा हक्क नाही?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

या साठी पण सासरच्या लोंकाची परवानगी लागते ना ग राणी ...
नवरा समजुत दार असला तर ठीक नाहीतर ...
शोहर की मां , मां होती है ,
बिवी के मां - बांप बेटी के घर का पानी नही पिते
या ला ईज्जत म्हणतात म्हणे :-(
नवरा असो कि बायको असो आई वडील दोघांनाही असतात ना ??
~ वाहीदा

टारझन's picture

19 Feb 2009 - 8:06 pm | टारझन

=))
मस्त धागा ... आता पब्लिक भितीपोटी आईबाबांना संभाळेल .. झालं कल्याण

विसोबा खेचर's picture

19 Feb 2009 - 11:02 pm | विसोबा खेचर

"वृद्ध माता-पित्याची जबाबदारी टाळणाऱ्याला

मुळात अशीही लोकं असतात याचा संताप येतो...!

आपला,
(मातृभक्त) तात्या.

बाप वारला बिचारा..!

स्वातीदेव's picture

20 Feb 2009 - 12:02 am | स्वातीदेव

तुमचा मुद्दा बरोबर आहे. कायद्याप्रमाणे मुलीनेसूद्धा आईवडीलांचा सांभाळ केला पाहिजे हे बंधन आहे. बंधनापेक्शा कायदा इथे मुलगा व मुलगी यांचे हक्क व जबाबदार्या समान मानतो. पण सध्याच्या परीस्थीतीत जरी ती स्वता कमवत असेल तरीही तिला तिच्या आईवडीलांची काळजी घेण्यासाठी सासरच्या लोकांची परवानगी लागते, हे एक दुर्दैवच आहे.

नीधप's picture

22 Feb 2009 - 3:44 am | नीधप

>>पण सध्याच्या परीस्थीतीत जरी ती स्वता कमवत असेल तरीही तिला तिच्या आईवडीलांची काळजी घेण्यासाठी सासरच्या लोकांची परवानगी लागते, हे एक दुर्दैवच आहे.<<
दुर्दैव बघा. ह्या मुद्द्याला पण वळसा घालून दुर्लक्ष करून निघून गेले लोक.
मुलाचे आईवडील खस्ता खातात. मुलीचे आईवडील काहीच करत नाहीत.
सुनेच्या नावाने गळा काढणार्‍या इथल्या प्रत्येकाला विचारा की बायकोने आपल्या आईवडीलांची जबाबदारी उचलायचा निर्णय घेतला तर राहता येईल का तुम्हाला त्यांच्याबरोबर?
एक दिवस बायकोचे आईवडील आले तर डोकं फिरणारे नवरे काय कमी नाहीत. एक दिवस सासूसासर्‍यांच्याबरोबर काढावा लागला तर किटकिट करत असतात पण बायकोने वेगळं रहायची इच्छा दाखवली तर ती वाईट. याला म्हणतात दुतोंडीपणा.
बायकोच्या आईवडिलांना नावं ठेवणं ह्यात एकालाही गैर वाटत नाही. विनोदी साहित्य या नावाखाली हे पण खपवलं जातं. पण यातला एक शब्द नवर्‍याच्या आईबद्दल बोलला गेला की सून वाईट ठरते.
कायद्याने आईवडिलांची जबाबदारी घेण्याचं बंधन घालावं लागणं ही गोष्ट दुर्दैवी तर आहेच पण त्याचं खापर केवळ सुनेवर फोडून कसे मोकळे होता?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 1:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सासू-सासरे आले की त्रास पण बायकोनी मात्र आई-वडीलांचं केलंच पाहिजे असेच म्हणणारे लोक असतील असं नाही पण बहुसंख्य लोक असेच असतात हे माझ्याही पहाण्यात आहे.
नवरा-बायको वेगळे झाले म्हणजे आई-वडिलांना या वयात एकटं टाकलं असं मानणारेच लोक आहेत आणि सगळा दोष सुनेचा! मुलालाही आई-वडीलांच्या बरोबर रहायचं नसतं याचा विचार कोणी करत नाही. माझ्या पहाण्यात अशीही कुटुंब आहेत जिथे वेगळं झाल्यावर भांडणं कमी झालेली आहेत आणि म्हातारा-म्हातारीला आता स्वातंत्र्य जास्त आवडतं. अशीही मुलगी आहे जी अनेक वर्ष कामानिमित्त एकटी राहिली आहे आणि आता घरी आई-वडीलांबरोबर जास्त दिवस राहिली की भांडणंच होतात. त्यापेक्षा एकाच शहरात राहून फक्त शनिवार-रविवार घरी जाऊन रहाते. अर्थात हे सगळं आई-वडील किंवा सासू-सासरे स्वतःचं सगळं करू शकतात म्हणूनच! असेही महाभाग पाहिले आहेत की ज्यांना एकुलत्या एक मुलीशी लग्नं करायचं नसतं कारण म्हातारपणी सासू-सासर्‍यांचं करायला लागेल.

जबाबदारी टाळणार्‍यांचं समर्थन नाही, राजेंनी सांगितलेली गोष्टच प्रत्येक वेळी असेल असंही नाही. पण सामान्यतः टाळी एका हाताने वाजत नाही. फक्त म्हातारे आहेत म्हणून आई-वडील किंवा सासू-सासर्‍यांना सहानुभूती हे पटत नाही. चूक त्यांचीही असू शकते. आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचे निर्णय घेता येतात, घ्यायचे असतात एवढा विचार जरी मोठ्या लोकांनी केला तरी अशी अनेक भांडणं टळू शकतात.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मराठी_माणूस's picture

22 Feb 2009 - 1:11 pm | मराठी_माणूस

मुलालाही आई-वडीलांच्या बरोबर रहायचं नसतं याचा विचार कोणी करत नाही.

बरोबर रहायचं नसतं ह्याचे कारण काही समजले नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वय वर्ष २४च्याही पुढे, लग्नंसुद्धा झालेलं आहे, नोकरी अतिशय जबाबदारीची आणि त्यातही सफल, आणि मुख्य स्वतःचे निर्णय स्वतःचे घेण्याची सवय आणि क्षमता असताना कोणी 'बाळा'सारखं वागवलेलं स्वयंपूर्ण माणसाला आवडत नाही. 'प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत।' हे नाही झालं आणि मुलाला (मुलीलाही) त्याची जाणीव झाली की आई-वडील अनेक बाबतीत उगाचच बॉसिंग करतात असं वाटतं.
विषय अगदी साधा असेल पण सुट्टीच्या दिवशी लवकर (म्हणजे अगदी साडेसहा-सातला) उठ यावरूनही वाद होतात.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मराठी_माणूस's picture

22 Feb 2009 - 1:25 pm | मराठी_माणूस

आई-वडील अनेक बाबतीत उगाचच बॉसिंग करतात असं वाटतं.

हे गृहीतक असेल तर आणि मुलाला ह्याचा निव्वळ त्रास आणि त्रासच होत असेल तरच. कारण त्यांचे बॉसिंग कींवा सौम्य भाषेत उपदेश हे मार्गदर्शन असू शकते त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा असू शकतो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 2:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
  • अहो, तुम्हाला मला काय वाटतं आणि योग्य काय याचा काय संबंध? त्या मुलाला काय वाटतं किंवा आई-वडील सांगताना, "अमुक एक गोष्ट मी म्हणतो/ते म्हणून कर" असं सांगतात का "मला असं वाटतं, शेवटी तुमचं काय ते तुम्ही बघा!" असं म्हणतात हे महत्त्वाचं असतं ना?
  • वडील सारखे "आपलं घर"च्या ऐवजी "माझं घर" म्हणत असतील आणि घरातले निर्णय इतरांना न विचारता स्वतःच एकटे घेत असतील तर कोणत्या स्वयंपूर्ण मुलगा सुनेला ते आवडेल?
  • अनुभवी माणसं चुकीचे निर्णय घेतच नाहीत का?
  • अननुभवी माणसंच काही जगावेगळे पण उपयुक्त शोध लावतात असं का?
  • स्वतः निर्णय घेऊन अनुभव घेतल्याशिवाय माणसाला अनुभव कसा येणार?

मी कॉलेजात गेल्यावर कधी कुठे दिवसभर बाहेर जायचं म्हटलं की बाबा पैसे काढून द्यायचे, मी मागायचे त्यापेक्षा जास्तच! आणि वर मुंबईच्या कोणत्या भागात कोणतं रेस्तराँ चांगलं आहे याची माहिती आणि एक ठरलेलं वाक्य ऐकवायचे, "खिशात पैसे आणि डोक्यात बुद्धी असेल तर कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाहीत." प्रश्न आर्थिक परिस्थितीचा नव्हता पण माझ्या काही मित्र-मैत्रिणींच्या घरी मात्र प्रचंड कटकट व्हायची. आज माझ्या वडलांसाठी काय वाट्टेल ते करायला मी तयार झाले असते; आणि त्या मित्र-मैत्रिणींच्या घरी सतत वादविवाद असतात.

मोठे आहेत म्हणून योग्यच असतात यावर माझा फारसा विश्वास नाही आणि अविश्वासही नाही, तारतम्य महत्त्वाचं!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मराठी_माणूस's picture

22 Feb 2009 - 4:16 pm | मराठी_माणूस

अननुभवी माणसंच काही जगावेगळे पण उपयुक्त शोध लावतात असं का?

मला वाटते शोध लावणे आणि हा चर्चेचा विषय वेगळा आहे. घरात असणार्‍या ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा व्यवहारात होणार उपयोग ही वेगळी गोष्ट आहे.

नर्मदेत ला गोटा's picture

20 Feb 2009 - 12:30 am | नर्मदेत ला गोटा

आता पब्लिक भितीपोटी आईबाबांना संभाळेल ..

आशा संभाळण्या ला काय अर्थ आहे?

छळ जास्त होईल त्यात.

दशानन's picture

20 Feb 2009 - 6:55 am | दशानन

ब द ला !

येथेच मानेसर मध्ये.. एका सधन कुटंबात घडेलेली सत्य परिस्थीती.

एकुलता एक मुलगा... घरात गडगंज संपत्ती... १५-२० एकड जमीन त्यांचा बाजार भाव काही करोडांमध्ये होता.
मुलाचे लग्न एकदम धुमधडक्यात केले... त्या मुलाची आइ लग्नानंतर काही महिन्यातच गेली... व सुनेला तीचा सासरा घरात अडगळ वाटू लागला
येता जाता बोलत असे.. शिव्या देत असे.... एकदा ती रागात बोलता बोलता बोलली... म्हातारी गेली .. हा म्हातारा का माझ्या उरावर बसला आहे असे.

झाले... त्यांने काही केलं नाही... जे मृत्युपत्र तयार केलं होतं... ते त्या सुनेच्या समोरच चुलीत घातले व सरळ गावच्या सरपंचाकडे गेला व म्हणाला पंचायत बसवा उद्याच्या उद्याच.

भर पंचायत मध्ये त्यांने आपली १२० करोड ची संपत्ती फक्त १ करोड ला विकली .. लिलाव करुन... ७५ लाख रुपये गावाच्या शाळेसाठी व मंदिरासाठी दिले व पंचविस लाख घेऊन गाव सोडून निघून गेला... व हरिद्वार मध्ये जाऊन राहिला मस्त पैकी.

मुलगा व सुन आता भाजी विकतात रस्त्यावर... पण गावातील कोणीच त्याच्याकडून काही घेत नाही... जो बाहेरुन आलेला कर्मचारी वर्ग आहे तोच त्यांच्या कडुन घेतो व त्यांचे पोट चालते ;)

माझ्या मित्राचे वडिल नेहमी म्हणतात मला.. हे खाली वाक्य.

पुत सुपुत तो काहे जोडे धन !
पुत कुपुत तो काहे जोडे धन !

सुचेल तसं's picture

20 Feb 2009 - 8:15 am | सुचेल तसं

>>पुत सुपुत तो काहे जोडे धन !
पुत कुपुत तो काहे जोडे धन !

एकदम बेष्ट राजे... आणि तुम्ही सांगितलेली घटना पण आवडली.

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

मराठी_माणूस's picture

20 Feb 2009 - 8:30 am | मराठी_माणूस

मानल म्हातारबाबांना

विकास's picture

20 Feb 2009 - 8:40 am | विकास

वरील राजेंनी सांगितलेली गोष्ट वाचून खालील (ही मात्र नक्की) गोष्ट आठवली... थोडे विषयाशी संबंधीत थोडा विरंगुळा/अवांतरः

एका घरात एक म्हातारी स्त्री तशी टुणटुणीत पण तशी बिछान्यावर बसून असलेली असते. पंचेंद्रीये चालत असली तरी ती पुर्वीइतकी चालत नव्हती... तर अशा या म्हातारीच्या नातीचे लग्न ठरते. सगळ्यांना आनंद होतो. म्हातारीलापण आनंद होतो. जाता येता लग्नाच्या गडबडीत बसल्या बसल्या उत्साहाने किमानपक्षी गप्पा मारत काही सल्ले देत सहभागी होण्याचा ती प्रयत्न करत असते. पण आता स्वतःच्या मुलाला, सुनेला, नातवंडांना आणि इतर नातेवाईकांना तिच्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो.

त्यात कोणी बाहेरून आले अथवा फोनवरून तीची चौकशी करू लागले की घरच्यांचा एक नेहमीचा वाक्प्रयोग झाला होता, "चचेना (मरेना) का म्हातारी!" म्हातारी हे वाक्य कान पाडून ऐकायची. जेंव्हा ते जरा अतीच होत आहे असे वाटले तेंव्हा तीने आपल्या (साठीच्या घरातील) मुलाला बोलावले आणि साळसूदपणाचा आव आणत विचारले की बाबा 'चचेना का म्हातारी म्हणजे" काय? तीला वाटले मुलाला चूक समजेल. पण त्याने उलट पांघरूण घालायच्या नादात सांगितले, "अग आई, चचेना का म्हणजे म्हातारीस म्हणजे तुला उदंड आणि सुदृढ आयुष्य लाभू देत!"

डोळे मिचकावत म्हातारी म्हणाली, "असं व्हयं त्याचा अर्थ! अरे मग पहील्यांदा माझा होणारा नातजावई चचूंदेत, मग माझी नात चचुंदेत, मग माझी इतर नातवंड, सुना, जावई, लेकी, तुझ्यासकट माझी मुलं, सर्वजण चचुंदेत! माझं काय रे बाबा म्हातारीचे, चचले तर चचीन नाही तर ताकभात खाउन बचीन!" ;)

शैलेन्द्र's picture

20 Feb 2009 - 7:13 pm | शैलेन्द्र

वा,

खमकी म्हातारी,

कधी कधी मला वाटत, आपल्याकडचे वृध्ध ऊगीचच बिचारे होतात, खास करुन जेंव्हा आपण परदेशात जातो तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवते. आपल्या आइ वडिलांची आपल्यामधे भावनीक गुंतवनुक जास्त असते. हे जितके चांगले तितकेच नंतर त्यांन क्लेश्दायक होते.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2009 - 7:22 pm | प्रकाश घाटपांडे

पुर्वग्रहांच्या झापडापलिकडे हा अनुभव आक्टोबर २००८ मधील विलास पाटील यांचा लेख वाचा. वृद्धाश्रमावर एक वेगळाच लेख आहे. आन लिंक वरचा मजकुर जपुन ठेवा. या लिंकवरील पाने बदलतात.
प्रकाश घाटपांडे

शैलेन्द्र's picture

20 Feb 2009 - 7:38 pm | शैलेन्द्र

"प्रेम अबाधित राखायचं असेल तर त्या नातेसंबंधांवर अधिक ताण येणार नाही, याची साऱ्यांनीच दक्षता घ्यायला हवी. त्यात दोघांनाही आनंद आहे, आणि कल्याणही!"

सुन्दर लेख

विकास's picture

20 Feb 2009 - 7:46 pm | विकास

हा लेख आवडला पण कदाचीत ते फार तर फार एक दशांश सत्य आहे, अर्धसत्य पण नाही...

सर्वप्रथम, आई-वडीलांना काम, जागा इतर कुठल्याही "प्रॅक्टीकल" कारणाने प्रेम-जिव्हाळा वगैरे न सोडता वृद्धाश्रमात ठेवणारे आणि तसे ठेवून घेणारे असतील ही. पण ही काही सरसकट वस्तुस्थिती नसते.

दुसरे म्हणजे सर्व वृद्धाश्रमांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होते अशातला भाग नाही. मी काही अत्यंत अन्याय्य गोष्टी जवळून पाहील्या नसल्या तरी ऐकल्या आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2009 - 8:00 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे. तरी पण हा ही एक प्रवास चालु झाला आहे.
प्रकाश घाटपांडे

मृदुला's picture

22 Feb 2009 - 2:10 am | मृदुला

दुव्यावरील लेख वाचला. छान वाटले अनुभव वाचून. हे खरेच अनुभव असावेत अशी आशा. दुव्याबद्दल आभार.

बाकी, वृद्धांचा संभाळ मुलांना (म्हणजे मुलामुलींना) करायला लावून सरकार स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे असे माझे मत झाले आहे.

मुलगा = म्हातारपणीसाठीची गुंतवणूक -> स्त्रीभ्रूणहत्या
याच्याशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2009 - 2:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे साहेब, लेख चांगला आहे. पण असे होणे फार अवघड आहे.
आपल्या कुटूंब व्यवस्थेत भाव-भावनांची मोठी गुंतागुंत आहे. तेव्हा असे अभावानेच घडू शकेल असे वाटते.

विकास's picture

20 Feb 2009 - 8:09 pm | विकास

अभिषेक बच्चन आणि इतर काही चांगले कलाकार यांचा एक जास्त न चाललेला चित्रपट काही वर्षांपुर्वी असाच "चुकून" पाहीला. तो वृद्धाश्रम आणि त्या जागेवर डोळा असलेल्या बिल्डरवर होता. नाव आठवत नाही तसेच चित्रपट पण जास्त आठवत नाही, मात्र त्यात शेवटी गांधीजींचे सांगितलेले वाक्य (किमान त्यांच्या नावाने सांगितलेले वाक्य कारण त्यावेळेस वृद्धाश्रम होते का?) चांगले लक्षात राहीले:

गांधीजींना एकदा वृद्धाश्रमाच्या उद्घाटनास बोलावले होते. त्याला उत्तर देताना गांधीजी म्हणाले होते की मी याच्या उद्घाटनास येऊ शकत नाही पण उद्या ते जेंव्हा बंद करायची वेळ येईल तेंव्हा मात्र दरवाजे बंद करायला जरूर येईन!

सुचेल तसं's picture

21 Feb 2009 - 7:02 am | सुचेल तसं

माझ्या मते तो पिक्चर - शरारत. अमरीश पुरी पण होते त्याच्यात.

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

स्वामि's picture

20 Feb 2009 - 9:19 pm | स्वामि

आपल्या समाजात मुलाकडे म्हातारपणाची काठी म्हणुन बघतात तर मुलीला परक्याचं धन म्हणुन.पालक मुलामध्ये 'गुंतवणुक' करतात,का तर हा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल.आयुष्यभर त्याला दाखवायचं की बघ्,आम्ही तुझ्यासाठी किती कष्ट करतो.मुलाकडे एक व्यक्ति म्हणुन कधि बघायचच नाही,जणु काही मुलगा ही एक 'मुल्यवान वस्तु' आहे जी आपल्या म्हातारपणाची सोय आहे.त्यालापण त्याचं एक आयुष्य स्वतंत्ररित्या जगायचं असतं.मग ज्यावेळेस तो स्वतःचा संसार सुरु करतो,तेंव्हा सुरु होतो वाद.मुलासाठी आपण आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि तो बघा कसा बायकोच्या पुढे पुढे करतोय!स्त्रीभ्रुणहत्येचं हे एक फार मोठं कारण आहे.आपल्या आइ बापांचा सांभाळ करावा हे मुलाला आतुनच वाटलं पाहीजे,कायद्याचा उपयोग नाही.आज खरी गरज कसली असेल तर ती जबाबदार पालकत्वाच्या कायद्याची.

शितल's picture

21 Feb 2009 - 7:25 am | शितल

उत्तम प्रतिसाद. :)

ज्या मुलांना आई-बाबांची किंमतच नाही त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकून बळजबरी करण्यात काहीच अर्थ नाही. कायद्याचा आधार घेऊन मुलाजवळ राहणे हे कोणत्याही आई-बाबांना रूचणार नाही. उतरत्या वयात मुलाचा आधार हवा असणारे वृध्द आहेत त्याचप्रमाणे आई-बाबांच्या मायेची खरी गरज असणारी मुलेही या जगात आहेत. रक्ताचेच नाते खरे असते असे नाही. त्यामुळे मुलाचा आधार हवा असणा-या वृध्दांना आणि आई-बाबांच्या मायेचा ओलावा हवा असणा-या तरूणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाल्यास असा कायदा करण्याचीही गरज भासणार नाही.