ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव.
१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.
२) करंजाची हिरवीगार कोवळी पालवी परीसरात जणूकाही रोषणाईच.
३)
४) काटेरी पांगारा वर्षभर काट्यावर राहून वसंतात मात्र लाल पुष्पपताकांनी बहरतो.
५)
६) काळाकुडा बहरताना आपल्या नावातील काळा रंग झाकून टाकताना दिसतो.
७) पांढर्या कुड्याची फुले डोंगर दर्यात डोकावताना दिसतात.
८)
९) पळस उर्फ फ्लेम ऑफ फॉरेस्ट पहाता अगदी मशाली पेटवल्याचा भास होतो.
१०) काटेसावर उर्फ शाल्मलीची फुले नववधूप्रमाणे लाजरी-गईजीरी वाटतात.
११) करवंदाच्या जाळीतून फुलांचा दरवळणारा सुगंध हवा हवासा वाटत असतो.
१२) वसंतातल्या सुगंधाची राणी म्हणजे सुरंगी असे वाटते मला. वर्षातून एकदाच मिळणारा सुरंगीचा सुगंध अनुभवणे म्हणजे स्वर्गसुख.
१३)
ही तर आपल्या फांद्यांनाही नैसर्गिक गजर्यात गुंफते.
१४) गगनाच्या सुशोभीकरणासाठी गिरीपुष्प भरभरुन फुलतो.
१५) गगनाला भिडण्याची आस ठेवणारा पांढर्या रंगातील गिरीपुष्प
१६)
१७) बाळकैर्या बाळसं धरतायत.
१८) ऐटदार कांचन.
१९) पर्जन्य वृक्षावर पुष्पवर्षाव.
२०) उन्हात जणू चांदण पसरलय अस पैशाच झाड म्हणजे वावळ.
२२)
प्रतिक्रिया
21 Mar 2017 - 4:44 pm | रुस्तम
मस्तच
21 Mar 2017 - 4:47 pm | पिशी अबोली
जागूताई, अहाहाच!
कुसुंबी रंग काय ते आज कळलं..
21 Mar 2017 - 5:09 pm | दिलिप भोसले
लाजवाब !!!! सुरेख फोटोग्राफी
21 Mar 2017 - 5:22 pm | पैसा
WebP फाईल फॉर्मॅट्मधली चित्रे फायरफॉक्स ब्राऊझरवर दिसत नाहीत.
21 Mar 2017 - 5:32 pm | किसन शिंदे
मस्तच आहेत सगळे फोटो. वसंतातली बहरलेली झाडं पाहणं ही तुमच्या डोळ्यांसाठी पर्वणी असते.
21 Mar 2017 - 11:25 pm | स्रुजा
सु रे ख !!!
22 Mar 2017 - 12:10 am | संजय क्षीरसागर
सर्व फोटो छानेत. पण काही आऊट ऑफ स्क्रीन जातायंत. सासं तेवढं जरा बघाल का ?
22 Mar 2017 - 5:29 am | मदनबाण
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty
22 Mar 2017 - 12:02 pm | कंजूस
उरणच्या द्रोणागिरीवर खूप लावलेत गिरिपुष्प. सर्वच फोटो आवडले.
सुरंगी एक नंबर!
22 Mar 2017 - 12:58 pm | जागु
कंजूस हो तो डोंगर गिरीपुष्पांनी भरला आहे. तुम्ही गेला होतात का ?
रुस्तम, अबोली, दिलीप, किसन शिंदे, स्रुजा, मदनबाण धन्यवाद.
पैसा क्रोम मधे दिसतील फोटो.
संजय पिकासा फंक्शन बंद झाल्याने आता साईज सिलेक्शन कठीण झाल आहे.
15 May 2017 - 3:09 pm | इरसाल कार्टं
यातल्या काही फुलांचे फोटो मी ट्रेक दरम्यान घेतले या वसंतातच.
15 May 2017 - 6:15 pm | सत्यजित...
अतिशय सुंदर,मनमोहक,जिवंत छायाचित्रे व मांडणी!
या निमित्ते,आम्हीही एक वसंतोत्सव जगलो!
धन्यवाद,शुभेच्छा!