शर्ली टेंपल

जुइ's picture
जुइ in लेखमाला
8 Mar 2017 - 6:43 am

.

नमस्कार,

आपल्याला वाटत असेल की महिला दिन विशेषांकाचा आणि या बालकलाकाराचा काय संबंध? ही बालकलाकार दुसरी तिसरी कोणी नसून शर्ली टेंपल आहे. कॅलिफोर्नियातल्या सॅन्टा मोनिका येथे २३ एप्रिल १९२८ रोजी शर्ली टेंपलचा जन्म झाला. गरट्रुड आणि जॉर्ज टेंपल या दांपत्याचे हे तिसरे अपत्य. कालांतराने हे कुटुंब लॉस एंजिल्स येथे स्थलांतरित झाले. तिथे शर्लीच्या आईने मुलीच्या नृत्य, गायन आणि अभिनय या गुणांना प्रोत्साहन दिले. शर्लीला तिच्या पालकांनी मेगलिनच्या नृत्यशाळेत टाकले.
याच सुमारास तिची आई तिचे केस रिंगलेट्स (केस कुरळे करून) त्याची केशरचना करू लागली. ही केशरचना तिच्या प्रसिद्धीमागचे एक कारण होते.

Young temple

Charles Lamont या कास्टिंगचे काम पाहणार्‍याने शर्लीला नृत्यशाळेत पाहिले. त्याने तिला ऑडिशनसाठी बोलावले. शर्लीला त्याने करारबद्ध केले. त्या वेळी Educational Pictures ही कंपनी लघुपट काढत होती. हे लघुपट त्या काळच्या राजकीय घडामोडींवर आणि चित्रपटांवर भाष्य करणारे होते. तसेच या लघुपटांमध्ये काम करणारी सगळी बालके होती. या सिनेमांच्या निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी शर्ली आणि इतर बालक यांच्यासह अभिनेते ब्रेकफस्ट सीरियल्समध्ये आणि इतर उत्पादनांच्या जाहिरातीत काम करायचे. पुढे १९३३ साली जेव्हा Educational Picturesने आपली दिवाळखोरी जाहीर केली, त्या वेळी शर्लीच्या वडिलांनी तिचे काँट्रॅक्ट $२५ला विकत घेतले.

पुढे फॉक्स फिल्म्समध्ये काम करणाऱ्या एका गीतकाराने शर्लीला Stand Up and Cheer! या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावले. या ऑडिशनमध्ये तिची निवड होऊन तिला $१५० प्रति आठवडा असे २ आठवड्यांचे काँट्रॅक्ट मिळाले. शर्लीचा एकंदरीत गोडवा आणि तिने गायलेले गाणे आणि नृत्य पाहून फॉक्सने तिचे काँट्रॅक्ट १ वर्षाचे केले. तसेच तिच्या आईला पर्सनल कोच आणि हेअर ड्रेसरचे $२५चे काँट्रॅक्ट मिळाले. Stand Up and Cheer! हा चित्रपट १९३४ साली प्रदर्शित झाला आणि त्या काळी चांगलाच गाजला. लवकरच शर्लीचे नाव कौटुंबिक मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाले. छोट्या शर्लीची प्रसिद्धी इतकी वाढली होती की तिला पॅरामाउंट कंपनीत Little Miss Marker या चित्रपटात काम करायला फॉक्सने loan-out केले.

Signing contract

शर्ली फॉक्स फिल्म्ससाठी काँट्रक्टवर सही करताना

Original

तिच्या पहिल्या तीन चित्रपटांच्या यशानंतर टेंपल दांपत्याच्या असे लक्षात आले की शर्लीला आर्थिक मोबदला कमी मिळत आहे. शर्लीचे छायाचित्र अनेक व्यावसायिक उत्पादनांवर विनापरवानगी छापून येऊ लागले. यावर उपाय म्हणून त्यांनी एका वकिलाची नेमणूक केली, जो फॉक्सशी तिच्या अनाधिकृत छायाचित्राच्या वापराबद्दल त्यांच्याशी बोलू शकत होता. यासाठी पुढे शर्लीचा पगार $१००० प्रति आठवडा एवढा वाढवण्यात आला आणि तिच्या आईचा पगार $२५० प्रति आठवडा इतका करण्यात आला. शिवाय प्रत्येक सिनेमा पूर्ण केल्यावर $१५, ००० बोनस मिळू लागला.

१९३४ साली Bright Eyes हा चित्रपट प्रदर्शित झाला. या छोट्या मुलीच्या कलागुणांना पूर्ण वाव देणारा हा पहिला चित्रपट होता. या सिनेमासाठी पहिल्यांदा शर्लीचे नाव टायटलवर प्रकाशित करण्यात आले. या चित्रपटासाठी 'On the Good Ship Lollipop' हे तिने गायलेले गाणे अतिशय गाजले होते. त्या गाण्याच्या सुमारे पाच लाख प्रती खपल्या.

Brighteyes

१९३५ साली Juvenile Oscar मिळवणारी शर्ली ही पहिली बालकलाकार ठरली. तसेच तिच्या हाताचे आणि पायांचे ठसे प्रसिद्ध Grauman's Chinese Theatre, हॉलिवूड वॉक ऑफ फेम कॅलिफोर्निया येथे लावण्यात आले.

hand print

पुढे फॉक्स फिल्म्स आणि Twentieth Century Pictures यांचे रूपांतर 20th Century Foxमध्ये झाले. शर्ली त्यांच्यासाठी एक मोठी स्टार होती. तिचे सुपरस्टारपद आणखी बळकट करण्यासाठी खूप योजना आखल्या. शर्ली टेंपल डेव्हलपमेंट टीमची स्थापना झाली, ज्यात १९ लेखक काम करत होते. त्यांनी सुमारे ११ नवीन कथा आणि काही जुन्या कथा नव्या स्वरूपात तिच्यासाठी लिहिल्या. त्या काळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मंदी होती. त्यामुळे शर्लीचा सिनेमातील वावर अनेकांसाठी आशा दाखवणारा, हुरूप वाढवणारा आणि लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा होता. राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रुझवेल्ट यांनी तिच्याबद्दल असे म्हटले आहे की फक्त १५ सेंट देऊन अमेरिकन जनता अतिशय गोड हसर्‍या चेहर्‍याच्या एका बालिकेकडे पाहून आपले कष्ट, दुःख विसरू शकते.

सुरुवातीच्या काळात शर्लीचे सिनेमे कमी पैशात तयार केलेले असायचे. मात्र जशी तिची प्रसिद्धी वाढत गेली, तसे तिच्या सिनेमांचे बजेट आणि दर्जा सुधारला. त्याबरोबर शर्लीचा पगारही -;). Wee Willie Winkie या सिनेमासाठी मोठे सेट लावण्यात आले, ज्यात एका मोठ्या दगडाचा समावेश होता. नंतर 'शर्ली रॉक' म्हणून हा दगड प्रसिद्ध झाला. हा सिनेमा खूप गाजला. ब्रिटिश लेखक व चित्रपट समीक्षक ग्रॅहम ग्रीन याने सिनेमा आणि शर्ली याबद्दल बरेच काही वादग्रस्त लिहिले. त्यासाठी त्याला शर्ली आणि 20th Century Fox यांनी त्याच्यावर दावा दाखल केला, ज्याचे त्या काळी ३,५०० पाउंड मिळाले. हे पैसे एका ब्रिटिश बँकेत ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले. शर्ली २१ वर्षाची झाल्यावर ते पैसे धर्मदाय संस्थेला दान देण्यात आले.
शर्लीच्या चित्रपटांचे विषयही नाट्यमय, करुण इत्यादी असायचे. शर्लीचा रोलही बर्‍याचदा समेट घडवून आणणारीचा असायचा. जशी शर्ली मोठी होऊ लागली, तसे तिचे चित्रपट आणि त्यांचे विषयही बदलू लागले.

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना शर्लीबाबत अनेक अफवाही पसरल्या होत्या. या पसरवण्यात 20th Century Fox/Fox Films यांचाही समावेश होता. उदा., शर्लीला गाण्याचे / नृत्याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नव्हते, जे खरे नव्हते. काही काळासाठी शर्लीला प्रशिक्षण मिळाले होते. खरी गंमत तर युरोपियन देशात असलेल्या तिच्या चाहत्यांची होती. युरोपात अशी अफवा होती की शर्ली ही लहान मुलगी नसून एक ३० वर्षीय उंची न वाढलेली बुटकी व्यक्ती आहे ;-). या अफवेची सत्यता पडताळण्यासाठी व्हॅटिकनने Father Silvio Massante यांना ती खरेच एक लहान बालिका आहे का हे पाहण्यासाठी पाठवले!!
शर्लीची लोकप्रियता इतकी होती की सत्तरीच्या दशकातील 'The Brady Bunch' या मालिकेतील लहान मुलगी सिंडी शर्लीसारखी वेषभूषा केलेली दाखवली आहे.

पुढे शर्लीने तिच्या पहिल्या रंगीत चित्रपटात काम केले. या चित्रपटाचे नाव होते 'द लिटल प्रिन्सेस'. Susannah of the Mounties हा 20th Century Foxद्वारा निर्मित चित्रपट तिचा शेवटचा अतिशय यशस्वी चित्रपट ठरला. आता शर्ली वर्षागणिक चारऐवजी केवळ दोन चित्रपटांमध्ये काम करू लागली. १९४० साली तिचे दोन चित्रपट अयशस्वी झाले. हे चित्रपट होते द ब्लू बर्ड आणि यंग पीपल. यानंतर तिने 20th Century Foxसाठी काम केले नाही. पुढे MGMने तिला तिच्या पुनरागमनासाठी करारबद्ध केले. Kathleen या सिनेमासाठी शर्लीने एका दु:खी किशोरवयीन मुलीचे काम केले. दुर्दैवाने हा चित्रपट यशस्वी झाला नाही. MGMबरोबर असलेले काँट्रॅक्ट दोन्ही बाजूंच्या सहमतीने रद्द करण्यात आले.

Little Princess

त्यानंतर शर्लीने सुमारे दोन वर्षे चित्रपटांमध्ये काम केले नाही व अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. १९४४ साली तिने परत २ हिट चित्रपटांमध्ये काम केले - Since You Went Away आणि I'll Be Seeing You. Kiss and Tell, The Bachelor and the Bobby-Soxer, Fort Apache हे शर्लीचे त्या काळातील काही चांगले चित्रपट. १९४७-४९ दरम्यान शर्लीचे चित्रपट चालतही नव्हते आणि पडतही नव्हते. ती साचेबंद भूमिकांमध्ये अडकू लागली होती. पुढे फारशी चांगली कामे न मिळाल्याने तिने चित्रपटविश्वातून कायमस्वरूपी निवृत्ती घेतली.

School

या सगळ्या दरम्यान १५ वर्षीय शर्ली आर्मीतील John Agar याच्या प्रेमात पडली आणि १९४५ साली शर्लीच्या वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी लग्न केले. १९४८ साली त्यांना मुलगी झाली. पुढे दोघेही चित्रपटांमध्ये काम करू लागले, पण त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते १९५० साली विभक्त झाले. १९५० साली पुढे शर्लीला नेव्हीतील एक तरुण सिल्व्हर स्टार ऑफिसर भेटला. त्याचे नाव होते Charles Alden Black. हा त्या काळातील कॅलिफोर्नियातील एक श्रीमंत तरुण होता. हाच तरुण पुढे शर्लीचा अनंतकाळातील सोबती ठरला. या जोडप्याला एक मुलगा आणि मुलगी अशी अपत्ये झाली.

Agar

शर्ली आणि John Agar

married

शर्ली आणि Charles Alden Black

१९६७ साली शर्ली कॅलिफोर्नियातील रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाली. १९६७ साली तिने अमेरिकन काँग्रेससाठी एक अयशस्वी लढत दिली. तिच्या राजकीय कारकिर्दीला चालना मिळाली ती १९६७ सालच्या अयशस्वी निवडणूक लढतीतून. हेन्री किसिंजर यांनी तिला नामिबियाविषयी बोलताना ऐकले आणि तिच्या याविषयीच्या माहितीबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. पुढे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांनी १९६९ साली संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीमध्ये डेलिगेट म्हणून तिची नेमणूक केली. तर प्रेसिडेंट गेराल्ड फोर्ड यांनी तिला घाना येथे अमेरिकेची राजदूत (१९७४-१९७६) म्हणून पाठवले.
1965

Chief of Protocol of the United States या पदावर नियुक्त होणार्‍या पहिल्या स्त्रीचा मान शर्लीला मिळाला. या पदाची जबाबदारी म्हणजे प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलविषयी सल्ला देणे. शिवाय प्रेसिडेंट जिमी कार्टर यांच्या इनॉग्युरेशन आणि इनॉग्युरल बॉल सोहळ्यांच्या आयोजनाची पूर्ण जबाबदारी तिच्याकडे होती. तिने अमेरिकेची राजदूत म्हणून Czechoslovakiaमध्ये १९८९ ते १९९२ दरम्यान काम पाहिले. प्रेसिडेंट जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी ही नेमणूक केली होती. Czechoslovakiaसाठी राजदूत म्हणून काम करणारी ती पहिली आणि शेवटची अमेरिकन महिला ठरली.

1990

शर्ली Czechoslovakiaच्या कम्युनिझम विरोधातील लढाईतील दोन घटनांची प्रत्यक्ष साक्षीदार होती. १९६८ साली एका आंतरराष्ट्रीय परिषदेला तिने हजेरी लावली होती. Czechoslovakian पक्षाचे नेता Alexander Dubček यांच्याबरोबर तिची भेट ठरली होती. त्याच दिवशी सोव्हियत संघाचा पाठिंबा असलेल्या सैन्याने देशावर हल्ला चढवला. पुढे Prague Springच्या उठावानंतर Dubček हा सोव्हियत संघाच्या खप्पामर्जीत गेला. शर्लीने त्या वेळी एका हॉटेलच्या छतावर आश्रय घेतला होता. त्या वेळी काही रणगाडे धडधडत आले आणि एका निःशस्त्र महिलेला सोव्हियत सैनिकांनी गोळ्या घालून ठार मारले. हे दृश्य शर्ली आपल्या पुढील आयुष्यात कधीच विसरू शकली नाही. पुढे Czechoslovakiaची राजदूत म्हणून काम करू लागली, त्या वेळी Velvet Revolution झाले, ज्याने Czechoslovakiaतील कम्युनिझमचा अंत झाला. शर्लीने त्या वेळी कम्युनिझमच्या विरोधात काम करणार्‍याना उघड पाठिंबा जाहीर केला. Václav Havel यांचे नवीन सरकार स्थापन झाल्यावर डिप्लोमॅटिक पातळीवर संबंध स्थापन केले. तिने त्या काळी पुढाकार घेऊन Václav Havel यांची प्रथम वॉशिंग्टन भेट आयोजित केली. तसेच त्यांच्याबरोबर विमानातून एकत्र प्रवास केला.

१९७२ साली वयाच्या ४४व्या वर्षी शर्लीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. शर्लीने ही घटना दुसर्‍या दिवशी रेडियोवर आणि टीव्हीवर जाहीर केली. ब्रेस्ट कॅन्सरविषयी उघडपणे बोलणारी त्या काळात शर्ली पहिलीच महिला होती. बालकलाकार आणि पुढे परराष्ट्रदूत म्हणून शर्ली अतिशय समृद्ध असे जीवन जगली. १० फेब्रुवारी २०१४ रोजी वयाच्या ८५व्या शर्लीचा मृत्यू झाला.

माहिती आणि फोटोंचा स्रोत- विकिपीडिया आणि शर्लीटेंपल.कॉम

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

एक यशस्वी बालकलाकार ते समर्थ परराष्ट्रदूत असा प्रवास करणाऱ्या शर्ली टेम्पल ची सुंदर ओळख.

बालकलाकार ते राजदूत केवढा मोठा कॅनव्हास आहे तिच्या आयुष्याचा. छान ओळख जुइ.

पैसा's picture

9 Mar 2017 - 5:50 pm | पैसा

खूप छान ओळख. चित्रपटातून तिने तशी लवकर निवृत्ती घेतली. पण त्यानंतर अतिशय समृद्ध असे आयुष्य जगली.

खूप वेधक शब्दात ओळख करून दिली आहे. मस्त!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 10:38 pm | प्रीत-मोहर

ग्रेट!! खूप सुंदर ओळख झाली शर्ली टेंपलची.

सविता००१'s picture

10 Mar 2017 - 3:23 am | सविता००१

ओळख. किती गोड चेहरा होता हिचा...

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 11:37 pm | जव्हेरगंज

आवडला लेख!!

पिशी अबोली's picture

12 Mar 2017 - 1:36 pm | पिशी अबोली

अरे, यावरचा माझा प्रतिसाद गायब झाला..

एवढ्या छोट्या वयात तसं तिला एवढं प्रसिद्धीचं वलय मिळालं, त्यामुळे पुढे कदाचित त्रास झाला असता, पण ती पुढेही समृद्ध आयुष्य जगली हे महत्त्वाचं.. खूप सुंदर ओळख..

इनिगोय's picture

13 Mar 2017 - 12:22 am | इनिगोय

+1 ओळख आवडली.

मंजूताई's picture

12 Mar 2017 - 3:00 pm | मंजूताई

सुंदर ओळख!

सगळ्या युरोपिअन गोर्‍यांचे लहानपणीचे गोल चेहरे मोठेपणी उभट कशे होतात?
.
बाकी मुग्गी गोग्गो.

रेवती's picture

13 Mar 2017 - 9:02 pm | रेवती

शर्लीचे माहिती आवडली.

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 12:04 am | इडली डोसा

शर्लीच्या समृद्ध वाटचालीचा छान आढावा घेतला आहे.

इशा१२३'s picture

15 Mar 2017 - 12:36 pm | इशा१२३

लहानपणीची गोड शर्ली ते जबाबदार राजदूत किति वैविध्यपूर्ण आयुष्य!प्रत्येक भूमिकेत यशस्वीहि .समृद्ध आयुष्य जगणार्या शर्लिची ओळख आवडली.

नूतन सावंत's picture

15 Mar 2017 - 5:22 pm | नूतन सावंत

जुइ,छान लिहिला आहेस लेख.बालकलाकार म्हणून सुरुवात होऊन किती विविधता होती शर्लीच्या आयुष्यात याची सुरेख ओळख करून दिलीस.

कविता१९७८'s picture

16 Mar 2017 - 2:19 pm | कविता१९७८

छान लेख

Maharani's picture

17 Mar 2017 - 11:45 pm | Maharani

छान ओळख.. लेख आवडला.

सुचेता's picture

20 Mar 2017 - 3:46 pm | सुचेता

सुंदर ओळख.

रुपी's picture

18 Apr 2017 - 2:12 am | रुपी

लेख आवडला