ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
14 Nov 2016 - 3:22 am
गाभा: 

नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.

या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :

१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.

२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.

३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.

माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...

काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.

त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.

बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.

केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.

इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.

मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.

हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.

आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.

परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2017 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

एकाच कारवाईतून सगळे आलबेल व्हायला ही काय बंद काँप्युटरमधून काढलेली आणि नंतर स्वमग्नतेने दिवास्वप्नांत मग्न होण्यासाठी वापरलेली शक्कल आहे काय ? देश म्हणजे एखाद्याच्या मनाचा बंद पडलेला काँप्युटर नसतो, हे तुमच्या ध्यानात येत नाही याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही ! :)

आत्मानंदात मग्न रहा आणि आमचे मनोरंजन करत रहा ! ;) :)

***************

एकदा कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन पाहा (माझा या खात्यांशी कायम संबंध येतो)

केवळ काकदृष्टीने असलेले-नसलेले वाईट निवडून काढून त्याची टिमकी पिटत राहणे एका स्तरापर्यंत ठीक आहे. पण तेवढेच करून थांबणारा आणि लांबून दगड मारून पळून जाणारे बदमाष पोर यांच्यात काहीच फरक राहत नाही !

एक आर्थिक व्यवहारात काम करणारा (आणि न थकता ठासून ठासून दुसर्‍यांना उच्च जीवनानुभवाचे व उच्च विचारसरणीचे सल्ले देणारा स्वघोषित तज्ज्ञ) नागरीक म्हणून तुमचे त्या भ्रष्टाचारासंबंधी कर्तव्य कसे पार पाडता आहात (पक्षी : त्या भ्रष्टाचाराला विरोध करत आहात की त्यात एक हितसंबंधी म्हणून त्यात सामील होत आहात) तेही खरे खरे सांगा. म्हणजे मग, तुमचे तुम्हालाही स्पष्ट होईल की तुम्ही समस्येचा भाग आहात की तिच्या उपायाचा ! असेल हिम्मत तर सांगा खरे काय ते ! मग देशाची ही अवस्था का आहे हे सांगायला इतर कोणाचीच गरज राहणार नाही.

नितिन थत्ते's picture

9 Mar 2017 - 1:14 pm | नितिन थत्ते

ऐला, मे २०१४ पूर्वीचे दिवस आठवले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2017 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वतःचे उपाय सांगा म्हटले की पळून जायचे किंवा गोलपोस्ट बदलणे हे काही लोकांची "खात्रीची वागणूक" बनली आहे =)) =)) =))

"दगडफेक + मनोरंजन ब्रिगेड" का पर्दाफाश हो गया है ! =)) =)) =))

"..आणि धक्का बसून जाग आली"

असे कांही झाले का..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2017 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्यासारख्या, स्वयंघोषित तज्ज्ञाने, यापेक्षा पुढे जाऊन, सरकारला अजून न सुचलेले, न जमलेले व व्यवहात शक्य असणारे (वैयक्तिक अध्यात्मावर आधारीत नव्हे) उपाय कारणां-विश्लेषणांसह, सांगणे अपेक्षित आहे... ते जमले तर करा. नुसते मोघम विरोधी वाक्यांचे दगड मारून पळून जाणे शोभून दिसत नाही !

संजय क्षीरसागर's picture

9 Mar 2017 - 10:17 pm | संजय क्षीरसागर

नोटाबंदी यशस्वी झाली की फेल ?

सरकारनं ही मोहिम भ्रष्टाचार थांबवण्याच्या मुख्य हेतूनं राबवली आणि चलनातून काळा पैसा बाद झाला की महागाई आपोआप कमी होईल असा प्लान होता. तुम्ही धागा काढलायं म्हणजे निदान इतक्या बेसिक मुद्यांवर तरी तुम्हाला प्रतिवाद करता यायला हवा.

तुमचं आपलं भलतंच चाललंय. अध्यात्म काय, सर्वज्ञानी काय, दगड काय.... काय वाट्टेल ते.

मी म्हणतो भ्रष्टाचार जैसे थे आहे आणि महागाई वाढली आहे तस्मात स्कीम पूर्ण फेल झाली आहे आणि ज्या योजनेच्या समर्थनार्थ तुम्ही हा धागा काढलायं तो ही पूर्णपणे हुकलायं.

मी भ्रष्टाचार कमी करण्याच्या योजना सरकारला शिकवाव्या यासाठी हा धागा नाही. तस्मात मुद्याला धरुन प्रतिवाद करता येत नसेल तर विषय सोडून द्या कारण योजना फसली आहे हे उघड आहे आणि ते मान्य करायला तुमच्या होकाराची गरज नाही.

संजय क्षीरसागर's picture

9 Mar 2017 - 11:20 pm | संजय क्षीरसागर

हा तुमच्या धाग्याचा विषय नाही पण माझ्या व्यक्तिगत जीवनाविषयी तुम्हाला कुतूहल आहे म्हणून लिहीतो

त्या भ्रष्टाचाराला विरोध करत आहात की त्यात एक हितसंबंधी म्हणून त्यात सामील होत आहात) तेही खरे खरे सांगा.

मी केस घेतांनाच केस किती मोठी आहे हे पाहाण्याऐवजी मूळात क्लायंट काय आहे ते पारखून घेतो. त्यामुळे मला कधीही आऊट ऑफ वे जाऊन काहीही करायला लागत नाही. गेल्या वीस वर्षात मला जेमतेम ५/ ६ वेळा इन्कमटॅक्स ऑफिसमधे जायला लागलं आहे . ते सुद्धा कॅड (कंप्युटर एडेड स्क्रुटिनी केसेस) संदर्भात. जिथे रँडम सिलेक्शननी कोणतीही केस सिलेक्ट होऊ शकते आणि फक्त सिक्लेक्टेड प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. अशा केसेस मी लीलया डिल करतो कारण सही करण्यापूर्वी साद्यंत माहिती गोळा केलेली असते. माझ्या एकाही क्लायंटवर आजतागायत रेड पडली नाही की माझी एकही केस अपीलमधे नाही. माझे सगळे क्लायंटस लॉ कल्पायंट आहेत. आज ९ तारीख आहे आणि कालच सगळ्यांचा अ‍ॅडवान्स टॅक्स भरला गेला आहे. माझ्या या कार्यप्रणालीमुळे मला भ्रष्टाचाराचा काहीही त्रास नाही.

अर्थात, मित्रांशी सद्यस्थितीबाबत चर्चा, वेगवेगळ्या सेमीनार्समधून त्यांच्याशी होणारी व्यक्तिगत बातचीत आणि माझे जे मित्र इतर व्यावसायात आहेत (कंस्ट्रक्शन, पीडब्ल्यूडी आणि एमेसीबी सिवील काँट्रॅक्टस, आर्किटेक्टस, वगैरे) त्यांचे अनुभव, यावरनं भ्रष्टाचार जैसे थे आहे. त्यात काहीही घंटा फरक पडलेला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 1:05 am | डॉ सुहास म्हात्रे

१. हे अंग चोरून काम करणे झाले.

२. भ्रष्टाचाराची (पक्षी : गुन्ह्याची) खात्रीची माहिती आहे असे तुम्ही इथे लिहिले आहे. अशी माहिती लपवून ठेवणे व ती योग्य त्या काँपिटंट ऑथॉरिटीला (इथे, पोलिस किंवा इतर भ्रष्टाचार विरोधी सरकारी यंत्रणा) न देणे हा भारतिय कायद्याप्रमाणे गुन्हा आहे.

३. एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही ती माहिती योग्य त्या अधिकार्‍यापर्यंत पोहोचवून आपले नागरी कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नीतिमान असल्याचे, जाणकार असण्याचे, सर्वज्ञ असण्याचे, दुसर्‍याच्या चुका काढण्याचे, इत्यादी सर्व दावे केवळ अरण्यरुदन ठरेल !

नितिन थत्ते's picture

10 Mar 2017 - 10:23 am | नितिन थत्ते

>>एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही ती माहिती योग्य त्या अधिकार्‍यापर्यंत पोहोचवून आपले नागरी कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.

मी या विषयावर एक धागा काढला होता. त्यात असे दिसून आले की सरकारला कळवून कारवाई होऊ शकेल अशी (गेल्या दहा वर्षात आपल्या आजूबाजूस माहितीतल्या लोकांच्या बाबतीतली- त्यांनी केलेल्या किंवा त्यांना कराव्या लागलेल्या) भ्रष्टाचाराची माहिती कुणाकडेच नाही. सगळेच लोक गेली काही वर्षे भ्रष्टाचार वाढतोय असे नुसते ऐकीव माहितीच्याच आधारे म्हणतायत किंवा कन्जेक्चर म्हणून म्हणतायत. बोकील म्हणतात तशी ऒपरेशन करायची वेळ मुळीच आली नव्हती बहुधा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे

मी बराच वेळ नोटबंदीच्या सर्व विरोधकांना "नुसता विरोध न करता तुमच्या दृष्टीने सरकारने कोणते उपाय करायला हवे होते, ते सांगा" असे सतत विचारत आहे. त्याच्याकडे तुमच्यासकट सर्व विरोधक सोईस्कर दुर्लक्ष करत असलेले सर्वांच्या ध्यानात आले आहेच !

स्वतः काही सकारत्मक उपाय सुचविण्याला ज्ञान, अनुभव आणि सकारात्मक विचार करण्याची गरज असते. काकदृष्टीने दुसर्‍याच्या असलेल्या-नसलेल्या (विशेषतः तार्किक कार्यकारण भाव न देता) चुका काढणे फार सोपे असते. त्यासाठी आंधळा विरोध, टोकाचा हेकटपणा आणि अंगावर येणारा मुद्दा भरकटवण्याचे कसब पुरेसे असते.

समजा तुमच्या मते नोटाबंदी यशस्वी झाली नाही, तर मग तुमचे मत सिद्ध करण्यासाठी, हिम्मत असेल तर, तुमच्या दृष्टीने कोणते उपाय भ्रष्टाचाराचे निर्मुलन करतील ते लिहा. तरच तुमच्या विरोधाला काहीतरी पाया असेल, नाहीतर प्रतिसादामागून प्रतिसाद म्हणजे केवळ हेकटपणे केलेली दगडफेक असेल.

**************

नोटाबंदी यशस्वी झाली की फेल ?

हा प्रश्न विचारण्यामागे "नोटाबंदी ही कारवाई" आणि "तिचे अनेक भ्रष्टाचारविरोधी कारवायांच्या साखळीतले स्थान" याबद्दलचे प्रगाढ अज्ञान दिसत आहे. "याच अज्ञानामुळे" आणि "मी एक (इथे, विरोधी) भूमिका घेतली आहे मग आता दुसरे काही खरे असूच्च शकत नाही" या तुमच्या हट्टाची पुरेपूर माहिती असल्याने, तुम्ही दुसरा कोणताही मुद्दा ऐकणार नाही (पण नुसते प्रश्न विचारत राहणार) याची खात्री आहेच. पण तरीही, अर्थसंबंधी व्यवसायात काम करत असलेल्या तुम्हाला खालील माहिती असायला व त्यावर विचार करण्याला हरकत नाही...

नोटाबंदीपासून पासून मिळालेले पूर्ण परिणाम समजायला अजून बरेच दिवस जातील. कारण...

(अ) त्यातून मिळालेल्या डेटावर सरकार आणि करविभाग अनेक कारवाया करत आहे व त्यासंबधिच्या बातम्या माध्यमांत सतत येत आहेत. कायदेशीर कारवायांसाठी वेळ लागतो हे काय मी तुम्हाला सांगायला हवे ?!

(आ) नोटाबंदी कारवाईत अनेक करचुकवे पकडले गेले आहेत, आर्थिक वर्ष संपेपर्यंत अजून बरेच सापडतील,

(इ) आतापर्यंतचे अनेक करचुकवे करप्रणालीत आलेले आहेत आणि भविष्यातही ते करप्रणालीला चुकवू शकणार नाहीत, इ इ इ

अश्या अनेक गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत आणि अजून काही काळ घडत राहतील... त्यांचे परिणाम सकारात्मक असतील हे जर तुमच्यासारख्या अर्थकारणात काम करत असलेल्याला दिसत/समजत नसले तर ते एकतर हास्यास्पद आहे किंवा अंधपणे विरोध करणे आहे. झोपेचे सोंग घेणार्‍याला उठवणे कठीण असते असे म्हणतात !

त्यामुळे आजूबाजूच्या माहितीकडे दुर्लक्ष करायचे असे हट्टाने ठरवलेल्यासाठी पुढे काही लिहिणे वेळेचा व्यत्यय आहे हे नक्की. तेव्हा, यापुढे माझा प्रतिसाद न आल्यास त्याचे हेच कारण असेल असे समजावे ! :)

संजय क्षीरसागर's picture

10 Mar 2017 - 1:16 am | संजय क्षीरसागर

(अ) त्यातून मिळालेल्या डेटावर सरकार आणि करविभाग अनेक कारवाया करत आहे व त्यासंबधिच्या बातम्या माध्यमांत सतत येत आहेत.

नोटाबंदी कारवाईत अनेक करचुकवे पकडले गेले आहेत, आर्थिक वर्ष संपेपर्यंत अजून बरेच सापडतील

उगीच संदिग्धपणा नको. आतापर्यंत अशा कारवाईतून एकूण किती काळा पैसा उघड झाला ? तुम्हाला कल्पना दिसत नाही, नोटा छापण्याच्या खर्चा इतकाही टॅक्स अजून वसूल झालेला नाही.

अश्या अनेक गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत आणि अजून काही काळ घडत राहतील... त्यांचे परिणाम सकारात्मक असतील हे जर तुमच्यासारख्या अर्थकारणात काम करत असलेल्याला दिसत/समजत नसले तर ते एकतर हास्यास्पद आहे किंवा अंधपणे विरोध करणे आहे

तुमच्याकडे काहीही डेटा नाही. सरकारप्रमाणे उगीच `अच्छे दिन'चं गाजर पब्लिक दाखवून काही उपयोग नाही. अर्थात हे देशातल्या जवळजवळ सर्वांना समजलंय पण तुम्हाला समजायला वेळ लागेल असं दिसतंय.

उगीच फेकू प्रतिसाद टाकण्यापेक्षा दोनच गोष्टींचं प्रामाणिक उत्तर द्या. (१) भ्रष्टाचार कमी झाला का ? आणि (२) महागाई कमी झाली का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 1:35 am | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच, तुमचाच्च प्रतिसाद शेवटचा आहे, हे सांगायला हा प्रतिसाद लिहिला आहे, त्यामुळे याची प्रतिसादात गणना होत नाही असे समजावे =)) =)) =))

संजय क्षीरसागर's picture

10 Mar 2017 - 1:41 am | संजय क्षीरसागर

दोनच गोष्टींचं प्रामाणिक उत्तर द्या. (१) भ्रष्टाचार कमी झाला का ? आणि (२) महागाई कमी झाली का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 1:58 am | डॉ सुहास म्हात्रे

(१) भ्रष्टाचार कमी झाला का ? आणि (२) महागाई कमी झाली का ?

दोन्हीसाठी उत्तर, "होय" असेच आहे. याची काही कारणे अगोदर दिली आहेत, इतर (हवी असल्यास) खालील प्रश्नावरच्या तुमच्या उत्तरांनंतर दिली जातील, अगोदर नाही.

आता तुमच्यासाठीचे प्रश्न (परत एकदा)...

१. तुमच्या मते नोटाबंदी यशस्वी झाली नाही, तर मग तुमचे मत सिद्ध करण्यासाठी पुरावे द्या.
(केवळ मला माझ्या मित्रांनी सांगितले हे पुरावे होत नाहीत. सरकारचे आकडे खोटे म्हणायचे आणि स्वत:च्या काल्पनिक मित्रांचे म्हणणे खरे म्हणायचे, हे विनोदी प्रकारात गणले जाईल !)

२. हिम्मत असेल तर, न घाबरता तुमच्या दृष्टीने कोणते उपाय भ्रष्टाचाराचे खात्रीने निर्मुलन करतील ते लिहा. (अन्यथा, विरोधाकरिता केलेला विरोध हा दगडफेक ब्रिगेडच्या कारवायांत गणला जाईल !)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 1:42 am | डॉ सुहास म्हात्रे

अवांतर : अशिष्ट भाषा काय कोणाही असुसंकृत माणसाला सहजपणे वापरता येते. मात्र, अध्यात्मिक गफ्फा मारणार्‍याने उद्धटपणे लिहिणे फारच विनोदी दिसते.

जरातरी अध्यात्म समजणार्‍या माणसाचा आपल्या मनावर, भावनेवर आणि म्हणुनच भाषेवरही ताबा असतो असे म्हणतात.

(हा पण प्रतिसाद नसल्यासारखे समजावे.)

ट्रेड मार्क's picture

8 Mar 2017 - 8:56 pm | ट्रेड मार्क

सरकारने कितीही प्रयत्न करू दे पण जनतेची मानसिकता काही बदलत नाहीये. भ्रष्टाचार वरिष्ठ सरकारी पातळीवर नक्कीच कमी झालाय. पण काळात नकळत, सवयीने वा नाईलाजाने भ्रष्टाचार करणारे कनिष्ठ सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य लोक यांची मानसिकता कशी बदलणार? इथे तर काही शे लोक योजना राबवण्यासाठी झटत आहेत व काही कोटी लोक योजना कशी फसेल यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. सगळ्या योजनांचा लोकच ठरवून वा नकळतपणे बोजवारा उडवतात. साधं उदाहरण म्हणून स्वच्छ भारत योजना घ्या. काय वाईट होतं या योजनेत? - सरकारने योजना जाहीर केली, मोदींनी, सरकारातील मंत्र्यांनी, बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी स्वतः झाडू हातात घेऊन सुरुवात केली. पण पुढे काय? या योजनांमध्ये लोकसहभाग तेवढाच आवश्यक आहे. लोक घाण तर करणार आणि मग वर नावंही ठेवणार. एकटा पंतप्रधान अगदी सरकारातील सगळे मंत्री हाताशी असूनही काय करेल?

डिमॉनेटायझेशन केल्यावर काश्मीरमधे काही दिवस शांतता होती. पैसे खाणे, चोऱ्या काही दिवस कमी झाल्याच होत्या. पण भ्रष्टाचार ही एक मानसिकता आहे. यात नुसते पैसे खाणे नसून कुठलीही भ्रष्ट असलेली वर्तणूक येते.

ढिस्क्लेमरः एकूण एक सरकारी कर्मचारी व सर्वसामान्य लोक भ्रष्टाचारी आहेत असं माझं म्हणणं नाहीये. जे आहेत त्यांचे त्यांना माहित असेलच, जे नाहीत त्यांनी उगाच स्वतःवर ओढवून घेऊ नये.

अभिजीत अवलिया's picture

5 Mar 2017 - 6:46 pm | अभिजीत अवलिया

रोकड उपलब्ध होऊ लागल्यामुळे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी मध्ये कॅशलेस व्यवहारात २१% घट झाली. मी राहतो तिथे बऱ्याच दुकानदारांनी नोटाबंदीच्या काळात स्वाईप मशीन आणले होते ते काढून टाकलेय. असो. :)

आणि आता तर सगळं पुन्हा पूर्ववत चालू झालं आहे.

पुढील विधान या लेखातून उद्धृत According to Pronab Sen, former chief statistician of India, the informal sector in India accounts for about 45% of gross domestic product (GDP) and nearly 80% of employment. If this sector is not taken into account, then the metadata not only remains inadequate but also may be seen as a deliberate move to mislead.

अनुप ढेरे's picture

7 Mar 2017 - 4:25 pm | अनुप ढेरे

जीडीपी आणि त्यावरच्या आरोपांबद्दल
http://www.thehindu.com/opinion/lead/cracking-the-gdp-mystery/article174...

हे द हिंदू कडून आलय हे विशेष.

नितिन थत्ते's picture

8 Mar 2017 - 12:12 pm | नितिन थत्ते

त्या लेखातून

Owing to such guesswork, it is quite likely that the quarterly GVA estimate, which mainly uses data from the formal sector, painted a rosier picture of growth than the ground reality.

आणखी

CSO estimates do show that some sectors of the economy took it on the chin in the demonetisation quarter. Manufacturing saw its GVA growth slide from 12.8% in Q3 2015 to 8.3% in Q3 2016. Finance, real estate and services saw growth collapse from 10.4% to 3.1%. Construction weakened from 3.2% to 2.7%.

While GVA growth is pretty close to private forecasts, what lifted the GDP is the strong 12.3% surge in indirect taxes that the CSO estimates for this fiscal. This is a plausible number, given that the Centre’s indirect tax collections already surged by 25% in April-December 2016, powered by higher excise duty on fuel and service tax.

इन्फॉर्मल सेक्टरचा डेटा तिमाही बेसिसवर उपलब्ध नसतो हे खरे आहे. त्यामुळे सीएसओ ला दोष देता येणार नाही असे लेखक म्हणतो.

टाळ्या पिटण्याची घाई (कोणत्याच बाजूने) करू नये हे खरे.

अनुप ढेरे's picture

8 Mar 2017 - 12:25 pm | अनुप ढेरे

टाळ्या पिटण्याची घाई (कोणत्याच बाजूने) करू नये हे खरे.

बरोबर! डेटा डॉक्टर्ड आहे, खोटा आहे वगैरे आरोप करण्याआधी असे लेख वाचायला हवेत.

नितिन थत्ते's picture

9 Mar 2017 - 10:16 am | नितिन थत्ते

नोटाबंदीमुळे अब्जाधीश का कमी झाले याचं काही विश्लेषण वाचायला मिळालं तर आवडेल.

या अब्जाधीशांकडची संपत्ती कमी झाली याचा अर्थ त्यांच्या कडे असलेल्या अ‍ॅसेट्ची किंमत कमी झाली. [यांच्याकडचे पैसे काळे होते म्हणून ते नष्ट झाले किंवा त्यांनी सरकारला मजबूत कर भरला म्हणून संपत्ती कमी झाली असे संभवत नाही]. जर काही झाले असेल तर त्यांच्याकडील विविध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती घसरल्या असतील. ते ज्या कंपन्यांचे अध्वर्यू आहेत त्या कंपन्यांची परिस्थिती खालावली असेल.

हे अंग चोरून काम करणे झाले.

एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही ती माहिती योग्य त्या अधिकार्‍यापर्यंत पोहोचवून आपले नागरी कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.

माझ्या व्यावसायात माझ्यासारखी प्रॅक्टीस करणारा मला तरी अजून एकही भेटला नाही. तुम्ही स्वतःला अण्णा हजारे समजत असाल तर एकेके केस घेऊन उपोषणाला बसून बघा. त्यात खरी कळकळ दिसेल.

२. भ्रष्टाचाराची (पक्षी : गुन्ह्याची) खात्रीची माहिती आहे असे तुम्ही इथे लिहिले आहे. अशी माहिती लपवून ठेवणे व ती योग्य त्या काँपिटंट ऑथॉरिटीला (इथे, पोलिस किंवा इतर भ्रष्टाचार विरोधी सरकारी यंत्रणा) न देणे हा भारतिय कायद्याप्रमाणे गुन्हा आहे.

तुमच्या कायदेविषयीच्या या अगाध ज्ञानाची सेक्शन्स सकट माहिती देऊ शकाल का?

केवळ मला माझ्या मित्रांनी सांगितले हे पुरावे होत नाहीत.

म्हणजे मी तुमच्यासमोर लाच देऊन दाखवू म्हणता की काय ? पुन्हा सांगतो साध्या आरटीओच्या ऑफिसमधे जाऊन बघा. लाचखोरी तशीच चालू आहे फक्त नोटा बदलल्यात !

हिम्मत असेल तर, न घाबरता तुमच्या दृष्टीने कोणते उपाय भ्रष्टाचाराचे खात्रीने निर्मुलन करतील ते लिहा.

मी उपाय सुचवण्याचा आणि तुम्ही नोटाबंदी फेल झाली ही कबुली द्यायचा सुतराम संबंध नाही.

अध्यात्म समजणार्‍या माणसाचा आपल्या मनावर, भावनेवर आणि म्हणुनच भाषेवरही ताबा असतो असे म्हणतात.

किती पळवाटा शोधणार ? मी तुमच्याच भाषेत प्रतिवाद करतो आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 4:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

अच्छा, म्हणजे, "स्वतः फक्त विनापुरावा, बेजबादार आणि असमंजस भाषेत ठासून विधाने करणार; मात्र, दुसर्‍यांना तज्ज्ञाचा आव आणत प्रश्न विचारणार आणि पुराव्यासह सिद्ध करा म्हणणार (पक्षी : लपून दगडफेक करणार). स्वतःवर उत्तर/पुरावा देण्याची किंवा कृती करण्याची पाळी आली की थातूरमातूर कारणे देऊन "मेरा वचन गांगाकी कसम" टाईप सारवासारव करत पळून जाणार." हा तुमचा कावा तुम्ही मान्य करताय तर !

म्हणजे, तुमच्या कुठल्याच प्रश्नाला गंभीरपणे घेऊन उत्तर देण्याची गरजच उरत नाही ! त्यामुळे, यापुढे तुमच्या कोणत्या धाग्याला अथवा प्रतिसादाला उत्तर दिले नाही तर "जितं मया !" असे समजू नये. फाट्यावर मारले आहे असे समजावे.

धन्यवाद आणि राम राम !!!

विशुमित's picture

10 Mar 2017 - 5:19 pm | विशुमित

घाई घाई ने पुन्हा पळाले (पक्षी: फक्त वाट पहा; उत्तर मिळणार नाही).

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ विशुमित फक्त,

वस्तूस्थितीकडे व तर्काकडे, सोईस्कर अंधत्वाचा आणि बहिरेपणाचा आधार घेत, दुर्लक्ष करणार्‍यांचे मतपरिवर्तन करण्याची अजिबात इच्छा नसल्याने तो प्रतिसाद दिलेला आहे... तसे वागणार्‍या सगळ्यांनाच तो लागू आहे.

मात्र, आपापल्या स्वप्नरंजनात मश्गुल राहत त्यांनी आमचे मनोरंजन करत राहण्यास अजिबात हरकत नाही ! :)

ट्रेड मार्क's picture

11 Mar 2017 - 1:10 am | ट्रेड मार्क

काही लोक चष्मे घालूनच बघत असतात, त्यामुळे अश्या बातम्या त्यांना दिसत नाहीत.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/demonetisat...

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Banknote-ban-cripples-und...

http://timesofindia.indiatimes.com/currency-ban-the-effects-of-demonetis...

https://www.theguardian.com/global-development/2016/dec/22/india-currenc...

http://in.reuters.com/article/india-trafficking-demonetisation-idINKBN14...

आता यावर हे लोक म्हणतील की असे परिणाम तर थोड्या काळासाठी दिसले, पुढे काय? एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की मग त्याने काहीही केलं तरी काही लोकांना प्रॉब्लेम असतो आणि नाही केलं तरी प्रॉब्लेमच असतो. मोदी नवाज भेटत होते तेव्हाही प्रॉब्लेम होता, सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हाही होता. हवाला आणि पैसे फिरवण्यावरून विविध देशांबरोबर करार करत होते तेव्हा पण होता आणि आता डिमॉनेटाझेशन केलं म्हणूनही आहे.

मी आधी पण म्हणलंय की मनोवृत्ती बदलायला पाहिजे. सरकारने काय किंवा न्यायव्यवस्थेने काय, कोणीही कितीही प्रयत्न केले तरी जनता जो पर्यंत बदलायचं मनावर नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2017 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

यालाच मी, "वस्तूस्थितीकडे व तर्काकडे, सोईस्कर अंधत्वाचा आणि बहिरेपणाचा आधार घेत, दुर्लक्ष करणे" म्हणतो. हे बहुदा स्वार्थी हितसंबंध राखण्यासाठी आणि त्यांना असलेला धोक्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी (चेंजिंग गोलपोस्ट) केले जाते.

"सर्वसामायिक भल्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ फार जास्त महत्वाचा वाटणारे आणि त्या स्वार्थासाठी कोणतीही तडजोड करायला तयार असणारे लोक या जगात काही प्रमाणात तरी असतातच" हे सार्वकालिक सत्य आहे. राजकारणी नेता, धार्मिक गुरु, अध्यात्मिक अधिकारी, तत्ववेत्ता, तज्ज्ञ, सामान्य नागरिक, इत्यादी अनेक रुपात ते वावरतात... पण मुख्य हेतू एकच.. वैयक्तिक स्वार्थ... हाच असतो.

तेव्हा "वस्तूस्थितीकडे व तर्काकडे सोईस्कर अंधत्व" या आजाराबद्दल काहीच आश्चर्य नाही. त्यामुळे, टोकाचे निष्कर्ष काढून टोकाच्या विधानांची खिरापत वाटत फिरणार्‍या या लोकांना माध्यमात सहज मिळणारी तुमच्या प्रतिसादात दिलेली आणि मी अगोदर आणि आता खाली दिलेली प्रातिनिधिक (खरी व्याप्ती त्यापेक्षा खूप मोठी आहे) नोटाबंदीच्या परिणामांची आणि फॉलोअप कारवायांची उदाहरणे दिसणे अथवा ऐकू येणे शक्यच नाही ! :) ;)

१. Demonetisation will impart far reaching changes going forward, says RBI Governor Urjit Patel
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/demonetisatio...

२. Arun Jaitley on note ban: Tax collection up, more new notes of Rs 500 soon
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/arun-jaitley-...

३. Large deposits by 60 lakh individuals and companies under scrutiny, no mercy for evaders, says government
• About Rs 7 lakh crore deposits have been made by some 60 lakh individuals and companies post demonetisation: Govt
• Post demonetisation, unaccounted wealth holders have an option to avail of a tax evasion amnesty scheme Pradhan Mantri Garib Kalyan Yojana
• The tax department is armed with systems to track those with multiple banks accounts as well as those who are depositing in accounts of others and tax department will not leave anyone who is trying to evade taxes
http://timesofindia.indiatimes.com/india/large-deposits-by-60-lakh-indiv...

४. Rs 4 lakh crore of cash deposits so far may be suspect, estimates I-T
• I-T dept suspects a large chunk of this amount could have come from those who dodged taxes
• It has already served around 5,000 notices to those who have deposited unusually large amounts of cash in banks
• Bengal and Karnataka have seen maximum deposits in Jan Dhan a/cs
• Data with the income tax department shows that till December 17, cash deposits of Rs 80 lakh or more added up to nearly Rs 4 lakh crore, which flowed into 1.14 lakh bank accounts.
• For instance, between November 10 and the end of November, 1.77 lakh borrowers had repaid loans of over Rs 25 lakh using old notes — with the repayments adding up to nearly Rs 50,000 crore. The list included companies and firms apart from individuals. Officials said the tax department intends to go after those who made large repayments in cash. Similarly, the tax department, sources said, has come across instances where bank accounts that were not compliant with KYC norms saw deposits of over Rs 1 crore.
• While deposits in Jan Dhan accounts have come under the scanner, officials said the amount involved was not very large. Contrary to the notion of widespread misuse of the nofrills bank accounts, a mere 34 saw deposits of Rs 10 lakh or more with the highest deposit being Rs 58 lakh.
• Sources said the maximum number of deposits into Jan Dhan accounts were made in West Bengal and Karnataka, with Delhi topping the list among 'urban centres'.
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/rs-4-lakh-cro...

५. Frequent rule changes done to corner the corrupt: PM Modi
http://timesofindia.indiatimes.com/india/frequent-rule-changes-done-to-c...

६. Over 1,100 searches, 5,100 notices in demonetisation so far:FM
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/over-1100-sea...
Post-note ban, 18 lakh depositors under I-T scanner
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/post-note-ban...

७. 156 public sector bank officials suspended for note ban irregularities
http://timesofindia.indiatimes.com/india/156-psb-officials-suspended-for...
Lens on Rs 10 lakh crore high-value deposits after demonetization
• Over Rs 10 lakh crore of deposits in old notes were made after demonetisation
• Over one crore bank accounts were used
• Deposits of more than 80 lakh were made in 1.48 lakh accounts with average deposit size of Rs 3.31crore
As a result, the initial round of scrutiny on "suspect" deposits is limited to 18 lakh accounts where over Rs 5 lakh were deposited and the stack added up to nearly Rs 4.2 lakh crore for which e-mails and SMSes are being sent out.
http://timesofindia.indiatimes.com/india/lens-on-rs-10-lakh-crore-high-v...

इत्यादी, इत्यादी, इत्यादी. :)

नोटाबंदी फेल झाली, लोकांत भयंकर प्रक्षोभ आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली, मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट, लिगॅलाईज्ड प्लंडर, नेपोलियन मोमेंट, इत्यादी शेलक्या संबोधनाने नोटाबंदीला विरोध करणार्‍या विरोधकांना, सर्वसामान्य लोकांचे मत आणि ते मारत असलेल्या लाथांची जाणीवही होत नाही, इतके ते स्वमग्न झालेले आहेत !

गेल्या काही महिन्यांतल्या राज्य व स्थानिक निवडणूकांत जनतेने नोटाबंदीबद्दल तिचे मत विरोधकांना सांगितले होतेच, तेही "सोईस्कर अंधत्व आणि बहिरेपणामुळे" कळले नाही.

आज बाहेर येत असलेल्या उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्यातिल निवडणूकांचे निकाल विरोधकांना खणखणीत चपराक देत आहेत असेच दिसत आहे. पण, तरीही त्यांचे जुनाट "सोईस्कर दुखणे" बरे होईलच याची खात्री नाहीच =)) =)) =))

चौकटराजा's picture

12 Mar 2017 - 9:08 am | चौकटराजा

नोटबंदी लोकाना थोडीशी त्रासदायक ठरली पण युद्धस्थितीसदृश चित्र जे विरोधकानी निर्मिले होते त्याचा पूर्ण फज्जा उडालेला दिसत आहे. यातून काय साध्य झाले याचा हिशेब किती बेकायदेशीर पैसा बाहेर आला व नोटा नव्याने छापायला किती खर्च आला एवड्यावरच होईल. बाकी जनतेचे हाल तर उन्हाळ्याने देखील होतात. आपल्या लोकशाहीचा फोर्मॅट च मुळात शत्रुत्वावर आधारलेला आहे. " विरोधी पक्ष " नावाची घातक संज्ञा आपण अमेरिकन व ब्रिटीश राज्य घटनांवरून घेतली आहे. सबब काही झाले तरी युद्ध सोडले तर बाकी सर्व बाबतीत विरोधासाठी विरोध करायचा हेच तत्व सर्वजण पाळतात. त्यात त्याना तरी दोष कशासाठी ? सत्तेत मतदानाच्या प्रमाणात मतदान हक्क पराभूत उमेदवारासही मिळाला तर लोकांची खरी नाडी काय आहे ते पुढे येईल. जेता तो शहाणा व पराभूत तो अगदीच गाढव असे जीवन नसते हो !

यातून काय साध्य झाले याचा हिशेब किती बेकायदेशीर पैसा बाहेर आला व नोटा नव्याने छापायला किती खर्च आला एवड्यावरच होईल.

अहो पण कधी मिळणार हा हिशेब? नोटबंदीवर लोक नाराज नाहीत वगैरे माहित होतंच की. मोदींचा करिश्मा अजून शाबूत आहे, त्यांच्यावर जनतेचा विश्वास अजून देखील intact आहे हे उप्र निकालावरून सिद्ध झाले आहे. पण निश्चलनीकरणाच्या निर्णयाबद्दलचा सर्व डेटा कधी मिळणार हा प्रश्न विचारायला नको काय?

संग्राम's picture

12 Mar 2017 - 9:54 am | संग्राम

सत्तेत मतदानाच्या प्रमाणात मतदान हक्क पराभूत उमेदवारासही मिळाला तर लोकांची खरी नाडी काय आहे ते पुढे येईल.
हे नाही समजलो
बाकी आजकाल बऱ्याच लोकांना लगेच रिझल्स हवे असतात .... त्यामुळे प्रॉब्लेम होतात

चौकटराजा's picture

12 Mar 2017 - 10:15 am | चौकटराजा

माझी कल्पना खरे तर मस्त पण कुणालाही ( अगदी जगात ) पटणारी नाही. पण ती अशी आहे. समजा चौरा , संग्राम व धागाकर्ते म्हात्रे निवडणूकीस उभे आहेत.आताच्या घटनेप्रमाणे चौरा, संग्राम व म्हात्रे याना अनुक्रमे ४०, ३२, २८ टक्के मते पडली तर फक्त चौरा निवडून जात असल्यानी त्यानी दिलेल्या होकाराला वा नकाराला फक्त ४० टक्के लोकांनाच प्रतिनिधित्व मिळते. आजच्या निवडणूक पद्धतीने सम्ग्राम व म्हात्रे याना काहीही किंमत नाही. मग त्यांच्या दोघांचा एखाद्या ठरावाला विरोध असेल तरीही चौरा याना मिलालेल्या ४० टक्के प्रतिनिधित्वाच्या जोरावर ठराव पास होतो. यालाच लोकांची नीट नाडी न कळणे म्हणतात. अशी नाडी कळवून देण्याची संधी लोकाना पाच वर्षातून एकदाच मिळत असल्याने जनतेचा आवाज व राजकीय आवाज यात फरक पडतो. उत्तम उदाहरण म्हणजे नोटाबंदी. अनेक विरोधकानी , अर्थ तज्ञानी बोम्ब ठोकूनही लोक मोदीना अजून नेते मानत आहेतच. आता समजा माझ्या पद्धतीप्रमाणे जर लोकसभेत मतदान करायचे झाले तर चौरा , संग्राम व म्हात्रे याना एकेक मताचा अधिकार राहील पण त्याचे वजन ४०: ३२:२८ असे प्रमाणबद्द असेल. चौरा सध्याच्या पद्धतीप्रमाणे १०० युनिट इतके वजन वापरतात ४० टक्के प्रतिनिधित्व असूनही.

संग्राम's picture

14 Mar 2017 - 1:16 pm | संग्राम

सहमत पण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे "खरे तर मस्त पण कुणालाही ( अगदी जगात ) पटणारी नाही"

विरोधी पक्ष सुद्धा फक्त विरोध न करता सत्तेत अप्रत्यक्षरित्या का होइना पण सहभागी असावा .... उत्तरदाई असावा आणि त्यासाठी सत्ताधारी पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावी

उदाहरणार्थ, स्वछ भारत अभियान मध्ये जसे सेलिब्रिटीना नॉमिनेट करत होते, आवाहन करत होते तसे विरोधी पक्षाच्या नेत्यांना पण नॉमिनेट करा .... त्यांनाही उत्तरदाई बनवा

जोपर्यंत जबाबदारी आणि उत्तरदायित्व मिळत नाही तोपर्यंत फक्त विरोधासाठी विरोध होत राहील आणि तुम्ही असं केलं तर मग आम्ही केलं तर काय बिघडलं ही प्रवॄत्ती बदलणार नाही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2017 - 11:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरेच्च्या नोटाबंदीनंतरही दणदणीत यश मिळालं की बी.जे.पी. ला. बरेचं जणं धाडकन तोंडावर आपटले की ओ इथे. बाकी अभ्यास वाढवा, इनो घ्या, मिपासंन्यास घ्या थोडे दिवस. कसं?

जेपी's picture

12 Mar 2017 - 12:03 pm | जेपी

ऑं..
अच्च नै करायच कॅप.!
आधीच बिचारे तोंडावर आपटलेत त्यात तु अस बोलतोस.
अरे पाठीवरुन हात फिरवुन सांत्वन दे.
जल्ला तुझ्या सारख्या लोकांमुळे असहिष्णुता वाटली आणी आता वापस करायला पण काय उरल नै.