अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे.
एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो.
कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते.
तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे.
यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं.
नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे.
..............
गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली.
शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो.
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 1:02 pm | संजय क्षीरसागर
हा बाराशे रुपयाचा स्पिकर घेतला. बेस्ट साऊंड, पोर्टेबिलीटी, तीन तास चालणारा रिचार्जेबल बॅटरी बॅक-अप (बॅटरी इन-बिल्ट) आणि रेडिओ अशी फिचर्स आहेत.
8 Mar 2017 - 1:09 pm | गवि
मस्त दिसतोय. बाराशे ही किंमतही झकास.
मी नुकतीच बोसची स्टार्टिंग रेंज पाहिली. ८-१० हजार या रेंजमधे:
मल्टिमीडिया (कनेक्टेड) दोन स्पीकर्स असा एक ऑप्शन होता.
ब्लूटूथ स्पीकरचा सिंगल ब्लॉक हा दुसरा ऑप्शन होता.
मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन टीव्हीला जोडला. अक्षरशः थिएटरचा अनुभव.
अर्थातच ही स्टार्टिंग रेंज आहे. बोसची वरची रेंज नक्कीच शतपट उजवी असणार. पण तरीही बोसची रेंज शेवटी...!!!
8 Mar 2017 - 2:38 pm | गणामास्तर
मॉडेल नंबर वगैरे डिटेल्स सांगा ना.
मी नुकताच बोसचा साउंड बार बघितला, जबरा अनुभव होता परंतु ७०००० रुपडे किंमत पाहून घेतला नाही.
काही दिवस थांबून तोच घ्यावा असा विचार केलाय पण तुम्ही म्हणताय तो सुद्धा एकदा चेकवेन.
14 Mar 2017 - 3:47 pm | विशाल कुलकर्णी
हे मस्त आहे. मी पण परवाच घेतला हा स्पीकर. खणखणीत आवाज आणि रिचार्जेबल बॅटरी बॅकप असल्याने नंतर कसली खिटपिट नाही .
8 Mar 2017 - 3:03 pm | सुमीत भातखंडे
४-५ महिन्यापूर्वी बोसचे ब्ल्यूटूथ हेडफोन (साउंडलिंक २) घेतले. आत्तापर्यंतचा अनुभव उत्तम आहे. वजनाने हलके असल्यामुळे अतिशय कंफर्टेबल आहेत.
आवाज बर्यापैकी न्युट्रल आणि क्लिअर आहे.
बेस मात्र मध्यम आहे. बेस हेवी गाणी ऐकायला तितकिशी मजा येत नाही.
14 Mar 2017 - 3:55 pm | अकिलिज
भरपूर प्रकारच्या म्युझीक सिस्टीम वापरून या मतावर आलो कि, बेस मध्यमच असला पाहीजे. बीट्स् च्या हेडफोनचा बेस दोनचार गाणी ऐकताना छान वाटतो पण नंतर डोक्यात जायला लागतो. मग फायनल बोसच. कमी बेस = अवीट अनुभव.
8 Mar 2017 - 3:57 pm | कवितानागेश
जखमेवर मीठ भुरभुरणारा धागा. :(
प्रत्यक्ष काय ऑनलाईन खरेदीलाही वेळ मिळत नाही हल्ली.
तरी अॅमेझॉनवरुन डायपर्स आणि वेट वाईप्स मागवते हल्ली! :)
8 Mar 2017 - 4:01 pm | मराठी_माणूस
त्या मस्त टर्नटेबल चे डीटेल्स काय ?
8 Mar 2017 - 4:18 pm | सावत्या
नुकतीच मी बोसची लाइफस्टाइल 535 अकोस्टिमस साऊंड सिस्टिम बघितलि. यूएईमध्ये रुपयात साधारणत: 180000 पर्यंत मिळतेय. भारतातील किंमत ३३१००० आहे. पण बोस - सॅमसंग टीव्ही कॉम्पॅटिबिलिटी बद्दल शंका आहे. एका मित्राकडे हारमन कार्डन आहे. मित्राच्या सल्ल्यानुसार दोघांची साऊंड क्वालिटी सेम आहे. पण मला बोस साऊंड सिस्टिम उजवी वाटते. हारमन कार्डन निम्म्या किमतीत मिळत आहे. पण मुंबईत हारमन कार्डनच सर्विस सेंटर नाही. बोसच आहे. मिपावरील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला हवाय.
14 Mar 2017 - 4:15 pm | अकिलिज
ते अकोस्टीमास तंत्रज्ञानाचे पैसे आहेत. आवाज अतिशय फिल्टर करून बॅलन्स केलेला आहे. तुमच्या बसण्याच्या जागेला तो नवीन ईन्स्टॉलेशनच्या वेळी टुयून करावा लागतो. अनुभव शब्दात सांगता येणार नाही.
कितीही आवाज वाढवला तरी कानाला कर्कश्य वाटतच नाही. पैसे वसूल सिस्टीम आहे.
आणि महत्वाचे - त्या सिस्टीमचं टिव्हीच्या ब्रॅडशी काहीही घेणं देणं नाहीये. ऑप्टीकल साऊंड ईनपुट असल्यास उत्तम.
15 Mar 2017 - 9:15 pm | अंतु बर्वा
ह्याला जोर्दार अनुमोदन. बोसची लाइफस्टाईल सिस्टिम घेतली आहे. ऑप्टिकल आउट्पुटला लावलेली असताना आवाज म्हणजे एक्दम तोड. नक्की समजावता येइल का महित नाही पण प्रयत्न करतो - टीव्हीत ट्रेन दाखवली असेल तर अक्षरशा: एका कानातुन आवाज जाउन दुसर्या कानातुन बाहेर आल्यासरखं फिलींग येतं. म्हणजे आत्ता या क्षणी ट्रेन आपल्या डाव्या बाजुने आली आणी आपल्या मागुन उजव्या बाजुला गेली असं वाटतं! :-)
16 Mar 2017 - 2:33 am | चतुरंग
लाईफस्टाईल गेली ६ वर्षे वापरतोय. अप्रतिम हा एकच शब्द. पैसा दणकून घेतात पण एकदम वसूल.
तुम्ही एरवी जी गाणी ऐकत असाल तीच या सिस्टिमवर अगदी नवी वाटतात.
स्टीरिओचा खरा आनंद इतक्या उच्च दर्जाचा असू शकतो हे तेव्हाच समजतं!
(बोसप्रेमी) रंगा
8 Mar 2017 - 4:21 pm | प्रचेतस
अॅमेझोनवर मिट्टीका अत्तर फारच महाग दिसतंय. पुण्यात बाजीराव रोडवर हे कनौजी अत्तर १०० रुपयात तोळाभर येतं. गंधही सुरेख, पहिल्या पावसानं भिजलेल्या ओल्या मातीचा.
8 Mar 2017 - 4:48 pm | गवि
अमेझॉनवरही पुष्कळ स्वस्त पर्याय आहेत.
कुठल्या प्रतीचं बेस ऑईल वापरलंय (रेंज : लिक्विड पॅरॅफिनपासून सँडल ऑईलपर्यंत) त्यावर किंमत ठरते. शिवाय ब्रँडवरही.
10 Mar 2017 - 9:36 am | चौकटराजा
प्रचेतस, याच्यापेक्षाही मोगर्याच्या गजर्याचा सुवास मस्त . तो सुद्धा मनगटाभोवती असलेला नव्हे तर वेणीत असलेला. :)))
10 Mar 2017 - 9:55 am | प्रचेतस
=))
हिरवट काका
30 Mar 2017 - 3:21 pm | प्रसाद गोडबोले
=))
19 Apr 2017 - 10:54 am | आनंदी गोपाळ
दुकानाचे नांव कळेल काय?
8 Mar 2017 - 4:31 pm | मी बरवा
टर्न टेबल ची लिन्क डकवाल का?
8 Mar 2017 - 4:45 pm | गवि
टर्नटेबल Jensen या नावाने कुठेही शोधल्यावर सापडेल.
काही तपशील:
साधारण आठ हजाराला पडला. ५-६ हजारापासून पुढे ऑप्शन्स आहेत.
सर्व आरपीएमच्या रेकॉर्ड चालतात.
पीसीला जोडून एम्पीथ्री बनवता येतात.
एक्स्टर्नल स्पीकर्स लावता येतात.
आर्म हलका आहे. पण मॅग्नेट टाईपचा स्टायलस आहे.
घरी बसून पूर्ण पोर्टेबल प्लेअरवर समाधानकारक स्पष्ट आवाजात जुन्या रेकॉर्ड ऐकण्यासाठी उत्तम आहे.
अगदी साऊंड टेक्निशियन्स / इंजिनियर लोकांसाठी हा बनलेला नाही.
कमी किंमत हे बलस्थान आहे. एकदम हाय एंड , थिएटर इफेक्टवाले, ७.१ चॅनल, इक्वलायझर इत्यादि अपेक्षा असतील तर किंमत लाखावर जाईल.
8 Mar 2017 - 10:06 pm | विहंग
Gavi, tumhi 8k la ghetlelya turntable chi link dakvaal ka?
8 Mar 2017 - 10:42 pm | गवि
http://www.amazon.in/gp/aw/d/B00BCA4116/ref=mp_s_a_1_1?ie=UTF8&qid=14889...
8 Mar 2017 - 10:11 pm | पिलीयन रायडर
मस्त धागा! बर्याचदा मला कुणाला काय गिफ्ट द्यावं हे कळत नाही. आता ह्या धाग्यातुन बर्याच नव्या गोष्टी कळतील. जसं की हे अत्तर. माझी आई वेडी आहे मातीच्या सुगंधासाठी. तिला हे अत्तर दिलं तर जामच खुश होइल ती. धन्यवाद!!!
8 Mar 2017 - 10:42 pm | स्रुजा
उत्तम धागा. वाचते आहे.
8 Mar 2017 - 11:07 pm | मी बरवा
२ आठवड्या पूर्वी gearbest.com या site वरून हा डॅशकॅम मागवला. गाडी मध्ये पुढील काचेवर लावता येतो. गाडी चालताना हा व्हिडियो रेकॉर्ड करत राहतो. सध्याच्या ट्राफिक परिस्थितीत आपली चूक नसताना काही अपघात झाला तर आपल्या बाजूने काही असावा हा मुख्य उद्देश
http://www.gearbest.com/car-dvr/pp_142025.html
8 Mar 2017 - 11:09 pm | मी बरवा
"आपल्या बाजूने काही पुरावा असावा हा मुख्य उद्देश "
8 Mar 2017 - 11:35 pm | सतिश गावडे
Different looks better अशी टॅगलाईन असलेला हा फोन अफलातून आहे.
लाल पेनाची रिफील संपली ;)
9 Mar 2017 - 5:17 pm | सस्नेह
इन्टरनेट, स्पीड, स्टोअरेज वगैरे कसे आहे ?
स्लिमनेस आणि डायमेन्शन्स किती mm ?
11 Mar 2017 - 9:32 pm | सतिश गावडे
इन्टरनेट - 3G आणि 4G VoLTE तपासले. चालते. मुळात मी रिलायन्स जिओचे 4G वापरता यावे म्हणून हा फोन घेतला.
स्पीड - चांगला आहे. मी ३ वर्षांपूर्वी घेतलेल्या सॅमसंग ग्रँडवरुन अपग्रेड झाल्यामुळे मला अतिशय स्मुथ वाटला.
स्टोअरेज - दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. ३ जीबी रॅम + ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज किंवा मग ४ जीबी रॅम + ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज. पहीला १६ हजारात तर दुसरा १८ हजारात येतो.
कॅमेरा - मुख्य १६ एमपी तर फ्रंट कॅमेरा ८ एमपी
Dimensions
Width 75.35 mm
Height 151.35 mm
Depth 7.85 mm
Weight 163 g
काही वापरातून कळलेल्या गोष्टी:
१. फोन जरी ड्युअल सिम असला तरी सेकंडरी स्लॉट हायब्रिड आहे. ज्यामध्ये एक तर सेकंडरी सिम टाकता येते किंवा मग मायक्रो एसडी कार्ड. दोन्ही एका वेळा वापरता येत नाहीत.
२. बॅटरी लाईफ मोटोच्या याआधीच्या फोनच्या तुलनेत जरा कमी आहे. (3050 mAh)
३. फोनचे उभ्या कडांना थोडा स्लोप आहे. त्यामुळे बाजारातील सध्याच्या टेम्पर्ड ग्लासेस जर लावण्याच्या प्रयत्न केला तर दोन्ही उभ्या कडांना एअर गॅप राहते.
४. माझा फोन ६४ जीबीचा आहे. त्यातील १०.६२ जीबी अँड्रॉईडने घेतली आहे. हे जरा अती होतंय. कारण ३२ जीबीच्या फोनमध्येही जर हे होत असेल तर कमी मेमरी वापरायला उरेल.
12 Mar 2017 - 11:54 pm | रॉजरमूर
अगदी याच कारणामुळे हा फोन रिजेक्ट केला .
ड्युअल सिम +मेमरी कार्ड हे फिचर पाहिजेच .
बाकी फोन एकदम जबरदस्त .
मला हे एक कळत नाही की एवढाले मोठे स्क्रीन असतात फोनला
मागे जागाही बरीच असते मग आताच या कंपन्यांनी हे हायब्रीड सिम चं फ्याड का काढलं ?
खरं तर भारतीय पब्लिक सरावलीय ड्युअल सिम फोनला .
फोनची इंटर्नल मेमरी कितीही असली तरी कमीच पडते .मेमरी कार्ड हे लागतेच.
13 Mar 2017 - 1:21 am | सस्नेह
तपशीलासाठी धन्यवाद !
मेमरी कार्ड बरे पडते बॅकप वगैरेसाठी. बाकी internal storage 50 GB भरपूर आहे.
मोटो च्या battery life चाच problem आहे. शिवाय battery replacement किचकट व खर्चिक आहे. मुलाचा मोटो जी एकदा बॅटरी बदलूनही जेमतेम दोन वर्षे गेला .
13 Mar 2017 - 6:40 am | रेवती
आधीची चर्चा वाचून अॅमेझॉनच्या कार्ट्यात टाकलेला स्यामसंग राहू दिला व मोटो पहायला सुरुवात केली तर लोकांनी ब्याटरी व जीपीएसचा प्रॉब्लेम बराच सांगितलाय म्हटल्यावर पुन्हा स्यामसंगचा विचार करतिये.
13 Mar 2017 - 8:12 am | गवि
वरील सर्व ड्रॉबॅक नसणारा Lenovo vibe P1 मस्त आहे. सुखद अनुभव.
P1 ५००० mAh बॅटरी. फास्ट चार्जिंग (अर्ध्या तासात फुल). बॅटरी संपण्याची चिंताच नको. कोठार आहे ही बॅटरी.
P1 ला हायब्रीड स्लॉट नसून वेगळे ड्युअल सिम स्लॉट्स आणि वेगळा १२८ जीबी मेमरी कार्ड स्लॉट. शिवाय एका बटणात फोनची सर्व स्मार्ट फीचर्स बंद करुन फक्त कॉल आणि एसेमेस चालू ठेवण्याची सोय (बेसिक फोन). बॅटरी कितीही कमी असली तरी या मोडमधे फोन पुढे अनेक दिवस चालू शकतो.
बॅटरी उत्कृष्ट आहेच पण हा फोन खुद्द पॉवरबँक बनू शकतो इतर मोबाईल्ससाठी.
14 Mar 2017 - 3:20 am | रेवती
बघते.
9 Mar 2017 - 6:33 am | रेवती
एवढ्यात अॅमेझॉनवर बर्याच वस्तू घेतल्यात. मोठ्या नाहीत पण लहानसान.
मुलाचे ग्लव्हज हेड कंपनीचे. टचस्क्रीन असल्याने खेळताना मध्येच फोन आला तर उपयोगी.
बॉल कंपनीच्या जार्सची कॅनिंगची झाकडे बदलून प्लास्टिकची घेतलीत. ती चांगली आहेत.
एका बॉक्समध्ये ८ मिळाली.
फुलांचा स्कार्फ आवडला. रोज एकदा घेऊ का नको असे वाटत होते. मग घेतला पण तो इन्फिनिटी स्कार्फ आहे हे वाचले नव्हते.
तरी आवडलाच. स्कार्फ ट्रेडिंग इन्कॉ. यांच्याकडे भरपूर प्याटर्न्स उपलब्ध आहेत.
नॉर्डिक वेअर यांचा अॅल्यूमिनिअम बेकींग ट्रे (हाफ शीट) ग्रेट दर्जाचा आहे.
बाकी कपडे बिपडे आपापल्या पसंतीने होतात पण साधे लाँग स्लीव्हजचे टीशर्टस हे मेसिक विमेन्स चे बरे मिळाले.
त्यात कमी रंग उपलब्ध आहेत पण मला हवे ते मिळाल्याने गप्प बसले.
आणखी मागवायची वेळ आली तर मागवेन.
बाकी स्वेटर वगैरे गोष्टी घेतल्या.
वॉटरफॉल प्रकारातला स्वेटर ठीकठाक आहे. फ्याशनमार्क कंपनीचा.
मांजराच्या पिलांचे चित्र असलेले किचन मॅट अॅन्टीस्लिप प्रकारातले आवडले. चांगले दिसतेय. असंच काय काय दुकानात न हिंडता घरपोच आल्याने शांत वाटतेय. ;)
9 Mar 2017 - 8:26 am | योगी९००
नुकताच क्रोमा मधून फिलीप्सचा साऊंडबार खरेदी केला.
http://www.philips.co.in/c-p/HTL2163B_12/soundbar-speaker
अतिशय उत्तम क्वालिटी, होमथेअरचे फिलिंग आले. विषेश म्हणजे या साऊंडबार ला सगळे connectivity options आहेत. USB, Bluetooth, HDMI HRC, Optical आणि नॉर्मल ३.५ mm.... १२० W RMS आउटपुटमुळे सर्व प्रकारची गाणी ऐकायला छान वाटतात.
9 Mar 2017 - 8:30 am | योगी९००
HD Vision Night Visor कोणी वापरते का गाडी चालवताना. विषेश म्हणजे रात्री गाडी चालवताना उलट्या दिशेने येणार्या गाड्यांच्या दिव्यांचा त्रास कमी होतो असे म्हणतात. कोणाला अनुभव आहे का याच्या वापराचा?
9 Mar 2017 - 10:59 am | सतिश गावडे
मी ही असं काहीतरी शोधतोय.
9 Mar 2017 - 11:09 am | गवि
कसे असतात नेमके हे वायजर? फोटो आहे का जालावर कुठे?
9 Mar 2017 - 5:21 pm | योगी९००
hd night visor असे गूगलले तर इबे आणि बर्याच साईटवर दाखवते. युट्युबवर व्हीडीओपण आहेत. पण प्रत्यक्ष कोणी वापरले आहे का त्यांचा अनुभव हवा आहे.
9 Mar 2017 - 5:20 pm | सस्नेह
खरोखर असलं काम करू शकतं का हे ?
9 Mar 2017 - 11:55 am | स्रुजा
सध्या मी चांगल्या प्रतीचं पण फार महाग नसलेलं आणि डिजिटली प्रोग्राम करता येऊ शकणारं कॉफी मेकर शोधते आहे. अमेझॉन वर बघते. काही सजेशन्स असतील तर प्लीझ द्या. एखादा वाईट अनुभव असेल तरी सांगा.
दुसरं म्हणजे स्प्रिंग कोट ! ते ही अमेझॉन वर बघते. अजुन काही ऑनलाईन पर्याय आहेत का स्प्रिंग कोट साठी?
9 Mar 2017 - 4:25 pm | रेवती
समजल्यास सांगीन पण मागील महिन्यात अॅमेझॉनवाल्यांकडे जो विंटर कोट मी मागितला ती ऑर्डर परस्पर त्यांनीच क्यान्सल केली होती.
9 Mar 2017 - 12:46 pm | प्रफुल्ल
मी काही दिवसांपुर्वी इन्स्टग्राम वरुन JBL चार्ज२+ हा स्पीकर घेत्ल ३००० मध्ये
इन्स्टाग्रम वर Gadgetotic म्हणुन आहे. बर्याच इलेक्ट्रोनिक वस्तु first copy available आहेत
9 Mar 2017 - 1:06 pm | गवि
वेगवेगळे स्पीकर्स सध्या हॉट आयटेम दिसताहेत.
मला एक प्रोजेक्टर घेऊन मोठ्या स्क्रीनवर टीव्ही बघायची इच्छा आहे. पण स्वस्त प्रोजेक्टर्सच्या ब्रँडची फॅन्सी नावं वाचून घ्यायचं धाडस होईना.
एक मर्लिन म्हणून पॉकेट प्रोजेक्टर घेतला होता ११ हजार. पण फारच डीम आहे. मिट्ट काळोख केल्याशिवाय दिसत नाही.
जरा लो बजेटमधे पण पूर्ण डार्करुमची गरज नसलेला ब्राईट दृश्य दाखवणारा प्रोजेक्टर कोणी सांगू शकेल का?
9 Mar 2017 - 1:47 pm | अप्पा जोगळेकर
मला ६ फूट बाय ३ फूटचा जुना बेड विकायचा आहे. कोणाला पाहिजे असल्यास कळवा व्यनितून.
9 Mar 2017 - 5:36 pm | किसन शिंदे
=))
30 Mar 2017 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
=))
9 Mar 2017 - 4:43 pm | ५० फक्त
@ योगि ९००, ते नाइट व्हिजन अतिशय फालतु आहे, काही उपयोग नाही. त्यापेक्षा ओरिजनल पोलोराइड गागल घ्या त्याचा उपयोग होतो ब-यापैकी.
यापेक्षा वाईट आणि बेकायदेशीर उपाय म्हंजे, हेल्ला चे दोन फॉग लॅम्प लावुन घ्या समोर.
@मी बरवा, हे गॅजेट फार कामाचे आहे, मी गेले दिड वर्षे वापरतो आहे, कायदेशीर पुरावा तर झालंच पण बाकी इतर वेळी म्हणजे अपघात, मारामारी, इ. मध्ये उपयोगी पडतो, हलता सिसिटिव्हि आहे, फक्त मेमरी लिमिट आहे, आणि रात्रि तुमच्याच गाडीच्या हेडलाईटने चमकल्यानं पुढच्या गाडीची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही, याला काही उपाय नाही.
ब-याच दिवसापुर्वी मी ए८ नावाचा हेड अप डिस्प्ले घेतला आहे, आता गाडीचं स्पिडोमिटर कडं बघायची गरज पडत नाही, डायरेक काचेवर , अगदी दिवसासुद्दहा स्पष्ट दिसतात सगळे पॅरामिटर.
आता विशलिस्ट मध्ये टिपिएमेस आणि रेन सेन्सर आणि अॅटो लाईट सेन्सर आहे,
9 Mar 2017 - 5:28 pm | योगी९००
आभारी आहे..
हेड अप डिस्प्लेचा उपयोग आणि गरज पुर्णपणे समजली नाही. जर गाडी मध्ये आलरेडी स्पीडोमीटर आहे तर काचेवर त्याचा परत डिस्प्ले कशाला? आणि त्या डिस्प्लेमुळे तुमची व्हीजीबीलेटी कमी नाही का होणार?
12 Mar 2017 - 9:04 pm | मोदक
Viaibility आजिबात कमी होत नाही. 50 रावांच्या गाडीत हा प्रकार बघून लैच आवडला.
डॅशबोर्ड आणि उजवा कॉलमबार यांच्या फटीत हा डिस्प्ले बसतो आणि चार इंच बाय तीन इंच इतक्या भागात एक काळपट पण पारदर्शक चौकोनी टेप वर सगळे आकडे डिस्प्ले होतात.
13 Mar 2017 - 2:20 am | आदूबाळ
मला यांच्या बरोब्बर उलटं करणारा प्रकार हवा आहे. म्हणजे ड्रायव्हरने टाईप केलेलं मागच्या स्क्रीनवर बाहेरच्या बाजूने उमटायला हवं आहे.
कारचा मुख्य त्रास म्हणजे मागच्या लोकांना इफेक्टिवली शिव्या घालता येत नाहीत. या उलट्या स्क्रीनमुळे मागच्या हॉर्नमारक माणसाला "विमान घे ना भुकनळ्या" वगैरे म्हणता येईल.
13 Mar 2017 - 5:19 am | पिलीयन रायडर
=))
मलाही द्या! मी टु व्हिलरवर मागे अशी काच बसवुन घेईन खास!
13 Mar 2017 - 6:39 am | चतुरंग
लै भारी! किंवा लै हार्न मारायलाय तर मागच्या स्क्रीनवर "मध्यमा" दिसेल अशीही सोय चालेल! ;)
रास्पबेरी पाय वापरुन एखादा प्रोजेक्ट करता येईल का बघायला हवे! ;)
-रंगा
13 Mar 2017 - 8:01 am | गवि
मला अशावेळी शक्य तेवढी साईड देत मागच्याला "जा बाळ..!" असा संदेश दाखवायची फार इच्छा होते.
17 Mar 2017 - 8:26 am | सुखी
असली उत्पादन ऑलरेडी मार्केट मध्ये आहेत :)
https://www.motormood.com/
http://www.thinkgeek.com/product/d138/
13 Mar 2017 - 9:15 pm | आदूबाळ
इन ऑल सिरियसनेस, रंगापा - हे प्रॉडक्ट बनवण्यात मला लैच इन्ट्रेस्ट आहे.
(स्टीव जॉब्जच की नै मी...)
13 Mar 2017 - 8:23 am | स्रुजा
हाहाहा
हाँकिंग करतात राणीच्या हुच्च देशात? अरारारा.. काय मॅनर्स !
13 Mar 2017 - 1:43 pm | आदूबाळ
नै हो. मी पुणे 30, 51 आणि 2 मध्ये ट्रेन्ड डायवर असल्याने दुसऱ्या देशात गाडी चालवून लोकांना टेनशन देत नाही.
16 Mar 2017 - 9:34 am | सतिश गावडे
या यादीत पुणे ५१ वाचून डोळे पाणावले. पीक अवरला पुणे ५१ मध्ये वाहन चालवणे हा अतिशय दिव्य प्रकार आहे.
9 Mar 2017 - 5:05 pm | मोल
१) Xiaomi Redmi 3S 4G- SEAL PACKED- 2GB RAM, 16GB ROM, Dual Sim, HD Display, Grey Rs. 7,699
२) Columbus Tab-5005 Mesh Sports Shoes for Men Rs.499
३) Prestige Omega Deluxe Induction Base Non-Stick Kitchen Set, 3-Pieces Rs.1,499
11 Mar 2017 - 2:02 pm | इरसाल कार्टं
चांगले आहेत का?
9 Mar 2017 - 6:04 pm | ओसु
माझी पण थोडी खरेदी
१. FM हेडफोन - TV साठी
रात्री TV च्या आवाजाचा (इतरांना :)) त्रास न होता सिनेमा बघण्यासाठी. व्हॅल्यू फॉर मनी म्हणता येईल असा. ५०० रुपयात, तीन महिने वापरतोय विना तक्रार. आवाजाची क्वालिटी पण चांगली आहे
https://www.amazon.in/gp/product/B00D6EG7FO/ref=oh_aui_detailpage_o08_s0...
२. ऑटोमॅटिक वॉटर प्रेशर पंप
मी तळ मजल्यावर राहतो. टाकी पहिल्या मजल्यावर आहे. त्यामुळे बाथरूम मध्ये गॅस गिजर आणि शॉवर ला पाणीच येत नव्हते. सगळे प्लम्बिंग बदलून झाले पण प्रश्न कायम राहिला. शेवटी गुगल वर पर्याय बघितले आणि हा अमेझॉन वर दिसला.
विजेवर चालणार हा पंप नळ सुरु केला कि सुरु होतो आणि बंद केल्यावर थांबतो. वीज पण जास्त जळत नाही.
https://www.amazon.in/gp/product/B01BMSFFR6/ref=oh_aui_detailpage_o05_s0...१
9 Mar 2017 - 6:11 pm | ओसु
त्यामुळे बाथरूम मध्ये गॅस गिजर आणि शॉवर लापाणीच च्या पाण्याला प्रेशर येत नव्हते.
11 Mar 2017 - 8:53 pm | कंजूस
>>माझी पण थोडी खरेदी
१. FM हेडफोन - TV साठी
रात्री TV च्या आवाजाचा (इतरांना :)) त्रास न होता सिनेमा बघण्यासाठी.>>
- TV ला स्पिकर आउट पोर्ट नसले ,फक्त A/V out असले तर जोडायला येईल का?
9 Mar 2017 - 6:09 pm | मराठी कथालेखक
१.४ ली ची आईस बकेट दुकानातून घेतली. एम आर पी पेक्षा १०% सवलत (२९० ल मिळाली)
घेतल्या पासून अजून 'कार्यक्रम' केला नाही (हाय कमांडकडून अजून परवानगी मिळाली नसल्याने), पण एकदा बकेटमध्ये बर्फाचे खडे ठेवून प्रात्यक्षिक बघितले किमान पाच-सहा तास खडे अगदी चांगले राहिले होते..सोबत बर्फाचा खडा उचलण्यासाठीचा चिमटा (tong) आहे
10 Mar 2017 - 12:22 am | मोदक
माझ्या सततच्या फिरतीला पुरक असा गोप्रो हिरो ५ घ्यावयाचा विचार करतो आहे. किंमत ३० ते ३५ हजार रू. च्या दरम्यान.
हा कॅमेरा घ्यावा की आणखी कोणता घ्यावा हे कृपया सुचवावे.
(अॅक्शन कॅमेर्यासाठी किंमत जास्त वाटत आहे पण SJ Cam १५ हजार पर्यंत येतो आहे आणि मला फारसा आवडला नाहीये, गोप्रोचे आणखी मॉडेल २५ ते २८ हजार पर्यंत जात आहेत, पण मग ते घेण्यापेक्षा लेटेस्ट आणि अनेक फिचर असलेला हाच चांगला वाटत आहे)
आणखी कोणता अॅक्शन कॅमेरा कोणी वापरला आहे का..? गोप्रोला एखादा चांगला ऑप्शन आहे का..?
10 Mar 2017 - 12:41 am | स्रुजा
गो प्रो ला एक चांगला आणि स्वस्त पर्याय आहे, तुला संध्याकाळी सांगते विचारुन.
10 Mar 2017 - 12:44 am | मोदक
हो चालेल. वाट बघतो.
हाच कॅमेरा अमेरिकेत ४०० $ ला म्हणजे २६ हजाराच्या दरम्यान आहे. :(
10 Mar 2017 - 12:48 am | स्रुजा
अरे तुला घाई नसेल तर येता जाता कुणाच्या ही हातुन पाठवता येईल. तो जो पर्याय आहे तो पण बहुधा इथे स्वस्त असेल.
10 Mar 2017 - 1:00 am | मोदक
हे शक्य झाले तर सोन्याहून पिवळे..!!! :)
10 Mar 2017 - 3:44 am | पिलीयन रायडर
आजच एक जण गेला की रे भारतात. थोडं आधी कळवलं असतंस तर नक्की पाठवला असता मी. आता कुणी सापडलं तर कळवेन.
14 Mar 2017 - 1:06 pm | कपिलमुनी
कोणता पर्याय कळेल का ??
14 Mar 2017 - 3:15 pm | मोदक
अरे हो.. पर्याय सांगा..
तसेच Garmin Virb Elite बद्दल काय मत आहे ..?
10 Mar 2017 - 12:48 am | गवि
अॅक्शन कॅमेरा म्हणजे काय?
10 Mar 2017 - 1:12 am | मोदक
हा वॉटरप्रूफ कॅमेरा असतो आणि आपल्या डोक्यावर / कपाळावर / छातीवर तसेच साईकलवर / बाईकच्या समोरच्या चाकाजवळ / अक्षरशः कुठेही माऊंट करता येतो.
उदा.
हा कॅमेरा वापरून खाली दिसत आहेत तसे अफलातून व्हिडीओ शूट करता येतात. मी म्हणतो आहे ते मॉडेल तर ड्रोनला सुद्धा बसवू शकता.
डॅनी मॅकास्किल (तोच तो "द रिज" वाला)
मॅक्स युअर डेज
12 Mar 2017 - 9:18 pm | चौथा कोनाडा
भन्नाट आहेत तिन्ही व्हिडो !
मोदका, डोळे गोड केलेस रे बाबा ! :-)
15 Mar 2017 - 9:13 pm | मोदक
म्याडम... आहात इथे की आयडी उडाला..?
:-D
15 Mar 2017 - 9:39 pm | स्रुजा
लोल .. आहे, आहे .. पण चेक करत राहा बाबा. इथलं आयुष्य क्षण भंगुर आहे ;)
तर, मिळालेली माहिती अशी: की तो ९९ $ ना इथे मिळतो (पर्याय) पण ती डिस्काऊंटेड प्राईस आहे. रीटेल थोडी जास्त पण ४५०$ पेक्षा (गो प्रो ची किंमत) कमीच आहे . रिव्यु असा आहे की पाण्याखाली हा गो-प्रो अॅड्जेसंट फार भारी रीझल्ट्स देतो. पाण्याबाहेर खुप भारी नाही तरी चांगले देतो . आता शेवटची माहिती राहिली आहे - नाव आणि मोडेल नंबर( नेमकी ती इन्फो आज दिवसभरात मिळेल - मी माझं बुकमार्क पेज हरवलं )- ज्याने वापरलं आहे त्याने आज नक्की सांगतो असं सांगितलं आहे.
30 Mar 2017 - 5:46 pm | मोदक
..तर मी गार्मिन वर्ब एलिट घेतला. मित्राने वर्षभर वापरलेला कॅमेरा मला स्वस्तात मिळाला म्हणून घेतला. सध्या टेस्टिंग सुरू आहे.
मागच्या आठवड्यातील एका इव्हेंटला ट्राय केला. माऊंट आणि कॅमेर्याचा फोकस थोडा खालच्या दिशेने हवा आहे हे कळाले.
10 Mar 2017 - 9:31 am | अनन्त्_यात्री
हा धागा अशासाठी आवडला की कोणकोणत्या वस्तू॑शिवाय आपण आरामात जगू शकतो ते कळत जाते .
11 Mar 2017 - 2:05 pm | इरसाल कार्टं
+1111111111111111111111111111
30 Mar 2017 - 3:08 pm | पुंबा
+१११
19 Apr 2017 - 11:11 am | साहेब..
मलापण असंच वाटते.
10 Mar 2017 - 9:47 am | चौकटराजा
Xiaomi Redmi 3S 4G- SEAL PACKED- 2GB RAM, 16GB ROM, Dual Sim, HD Display, Grey Rs. 7,699
हा मोबाईल मी घेतलाय कारण हा उत्तम फोटो काढणारा आहे. मला एप्रिल मे मधे युरोपात इटली स्वीस फ्रान्स असे स्वतंत्र भटकायचे असल्याने एरवीच्या १६ एक्स कॅमेर्या बरोबर हवाच.
बाकी मला भारतात बसून युरोपात काही गोष्टींचे बुकिंग त्यांच्या पैशात करायचे आहे . उदा .व्हर्साय चे आगाउ बुकिंग . ते करण्यासाठी उत्तम उपाय काय ? नेट बॅन्किंग वापरले तर प्री लोडेड फोरेक्स कार्ड चालते का ?
30 Mar 2017 - 3:37 pm | प्रसाद गोडबोले
मीही नुकताच मि मॅक्स आणि नोकिआ १३० घेतला !
(पण खरं सांगु का , एकुणच मोबाईल ही संकल्पनाच अनावश्यक वाटायला लागली आहे गेल्या महिन्याभरात . )
10 Mar 2017 - 11:26 am | सुधांशुनूलकर
जानेवारीत माझा पहिला स्मार्टफोन - मोटो जी ४ प्ले अॅमेझॉनवरून घेतला. दोन जीबी रॅम, १६ जीबी अंगभूत साठवणक्षमता (इंटर्नल मेमरी) आहे, याच्या जोडीला ३२ जीबीचं साठवणकार्डही घेतलं. अंगभूत 'मार्शमेलो' प्रणाली आहे. फोनमधला कॅमेरा ही माझी कधीच मुख्य गरज नव्हती, त्यामुळे या फोनला असलेल्या ८ एमपी / ५ एमपी अशा 'कमी' क्षमतेच्या कॅमेर्याबद्दल तक्रार नाही. (तरी फोटो छान येतात.)
माझी गरज भागते, मस्त, मी समाधानी आहे.
ता.क. : २६ जानेवारीपूर्वी आठ हजारला मिळाला, आज अॅमेझॉनवर सहज पाहिलं तर ८९९९ रुपये किंमत दिसते आहे.
१०००० एमएएच्या दोन पॉवरबँकही प्रत्येकी ७९९ रुपयाला घेतल्या. अनुभव - फोन रपारप चार्ज होतो.
त्यापूर्वी लिनोव्हो योगा ८" टॅब घेतला. सर्वोत्कृष्ट!! आता त्याची किंमतही खूपच कमी - साडेबारा हजार इतकी - झाली आहे. तेव्हा कुणाला टॅब घ्यायचा असेल, तर नक्की याचा विचार करा.
अवांतर - @गवि : शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अॅबा, बॉनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. : हे वाचून जळून खाक झालो आहे याची नोंद घेणे. एकट्याने नॉस्टॅल्जियात बुडणे ई ना चॉलबे. आता हे सर्व ऐकण्यासाठी कधीतरी तुमच्या घरी येऊन धडकणार, ही आगाऊ (!.. या शब्दाचे दोन्ही अर्थ घेणे.) सूचना देऊन ठेवतो.
10 Mar 2017 - 5:58 pm | कंजूस
गोप्रो चा रिव्ह्यु cnbc आवाज चानेलच्या टेकगुरू कार्रक्रमात झाला होता तो युट्युबवर आहे पाहा.
# स्पिकरमध्ये/ फ्रिक्वन्सी रिस्पॅान्स डेटा दिलेला असतो. 100 Hz च्यापेक्षा कमी 30Hz, 60Hz दिलेली असेल तर { आणि मूळ रिकॅार्डिंगमध्ये दाबून टाकलेली नसेल supressed} तरच Bass आवाज उत्तम येण्याची अपेक्षा ठेवू शकतो.
11 Mar 2017 - 1:01 am | ज्योति अळवणी
आजवर एकदाही on line शॉपिंग केलेलं नाही. अजूनही प्रत्यक्ष बघून, वस्तू आणि किंमत यांची तुलना करून मगच काही खरेदी करते. त्यामुळे हा धागा आणि त्यावरील चर्चा वाचून बरच काही समजलं. धन्यवाद!
11 Mar 2017 - 2:13 am | सही रे सई
मी काही दिवसापुर्वी हा नाईफ शार्पनर घेतला अमेझोन वरुन :
https://www.amazon.com/dp/B01FVW3DUA/ref=sr_ph_1?ie=UTF8&qid=1489178349&...
अमेरिकेत सुरीला धार काढून देणार कोणी नाही.. त्यामुळे सुरुवातीला सुरी ची धार कमी झाल्यावर पुन्हा नवीन सुरी घ्यायच्या ऐवजी शार्पनर घेऊन बघूया असा विचार केला आणि त्याचा आत्तापर्यंत खूपच छान उपयोग झाला आहे.
14 Mar 2017 - 2:44 am | लंबूटांग
14 Mar 2017 - 2:45 am | लंबूटांग
14 Mar 2017 - 2:46 am | लंबूटांग
https://www.amazon.com/gp/product/B008M5U1C2/ref=od_aui_detailpages00?ie...
$२९ ला सेल वर होती म्हणून. आता इतकी धारदार सुरी आणल्यामुळे जास्तीच काळजीपूर्वक कापाकापी करून जवळपास दुप्पट वेळ लागतोय काहीही चिरायला.
म्हटले त्या शेफ लोकांसारखे कापून बघू भाज्या म्हणून youtube वर बघून प्रयोग करायला गेलो तर बोट कापून घेतले.
13 Mar 2017 - 10:07 am | प्रकाश घाटपांडे
पुणे व मुंबई असे एम रेडिओ स्टेशन स्वच्छ आवाजात बेडरुम मधे ऐकता येतील असा रेडिओ हवा आहे. पुर्वी ते व्हॉल्व चे रेडिओ लै भारी होते.
14 Mar 2017 - 11:38 am | मराठी_माणूस
तुम्हाला MW म्हणायचे आहे का ? मी पण अशा चांगल्या रेडीओच्या शोधात आहे. एक कारण म्हणजे आकाशवाणीकडे शास्त्रिय संगीताचा खजाना आहे आणि सातत्याने तेच लोक शास्त्रिय संगीत क्षेपीत करत असतात पण रीसीव्हर्स चांगले नसल्याने आनंद घेता येत नाही.
खाली AM रेडीओ ची एक लिंक मीळाली आहे , पण अनुभव नाही.
http://www.amazon.in/Crane-CCRadio-EP-Analog-Radio-CEP/dp/B004GAKIKW?tag...
अगदी. वर्षानुवर्ष विनातक्रार चालयचे . त्यांना एक लांब जाळीचा अँटेना असयचा.
16 Mar 2017 - 7:17 pm | सुधांशुनूलकर
काही वर्षांपूर्वी मिताशीचा सिक्स-इन-वन घेतला, त्यात एएमवर मुंबई ब, विविध भारती, मुंबई अ चांगले ऐकता येतात.
याव्यतिरिक्त त्यात एफएम रेडिओ, सीडी/डीव्हीडी प्लेयर, कॅसेट प्लेयर याही सोई, तसंच मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरूनही ऑडिओ/व्हिडिओ ऐकता-बघता येतात. (अर्थातच, व्हिडिओ बघण्यासाठी तो टीव्हीला जोडायचा.)
पूर्वी ते व्हॉल्वचे रेडिओ लै भारी होते. : सहमत. आमच्या घरी माझ्या वडिलांनी स्वतः बनवलेला दोन स्पीकरवाला व्हॉल्व रेडिओ होता, त्याची आठवण झाली.
13 Mar 2017 - 4:41 pm | कंजूस
kichibo कंपनीचे दहा बँडचे रसत्यावरही मिळतात. एएम एफेम दणदणीत. घराजवळून टिव्ही केबल गेल्या असल्यास गोंगाट येतो एएम ला.
14 Mar 2017 - 2:52 pm | वेदांत
रविवारी झारा मधून ४ परफ्युम्स घेतले . झारा ९.०, सेउल,ट्यूबरोज (निशिगंध), रोज (गुलाब) .
मीट्टी अत्तर च्या प्रेमात पडलेल्यानी झाराचे फिग परफ्यूम वापरुन पहावे.
परफ्युम्स एकदम स्वस्त आणि मस्त आहेत.
14 Mar 2017 - 3:45 pm | अकिलिज
माझ्याकडे पण फार जूना एल् पी प्लेयर आहे. तो नूसता हाताने फिरवला तरी गाणे ऐकू येते.
एक सुई काळ्या खाचेत घासून संगीत ऐकवते म्हणजे तंत्र नक्की काय आहे ? कुणाला माहिती आहे कां ?
15 Mar 2017 - 8:23 pm | सुबोध खरे
मी VU चाच ५५ इंचाचा फुल एच डी टी व्ही फ्लिपकार्ट वरून आत्ताच दोन महिन्यापूर्वी घेतला ४१ ९९०/- ला. चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल
माझ्या कडे ४२ इंचाचा फिलिप्स चा टीव्ही आहे. दोघांच्या दर्जात काहीच फरक जाणवलेला नाही.
SNOB VALUE ची आणि नावाची किंमत असते. हवी तर अजून दोन वर्षाची वॉरंटी विकत घेता येईल.
एक आगाऊ सूचना -- बजेट मध्ये बसेल असा सर्वात मोठा आकाराचा टी व्ही विकत घ्या. आकाराची तुलना बाकी गोष्टींशी(स्मार्ट टीव्ही इ) होत नाही.
15 Mar 2017 - 8:41 pm | संजय क्षीरसागर
आताच हा टिवी शोरुमला बघून आलो. मला फार आवडला. पिक्चर मॅट फिनिश आणि क्लिअर आहे. सोनीचा त्याच्या शेजारीच लावला होता. त्याची पिक्चर क्वालिटी सेम सेटींग्जला फार ब्राईट होती. पत्नी सोनीच्या टिवीला भाळली (किंमत ४५.०००!) पण सेल्समन भला माणूस होता. तो म्हणाला, इतकं ब्राईट पिक्चर तुम्हाला फार वेळ पाहावणार नाही !
तुमच्या या प्रतिसादामुळे
चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल
निर्णय पक्का केला आहे !मी टिवी पाहात नाही. तो आईच्या बेडरुममधे असतो. त्या रुम साइजला ४०" एकदम स्युटेबल आहे. पुनश्च धन्यवाद !
16 Mar 2017 - 10:52 am | चौकटराजा
सोनी वाल्यांचे सर्व टीव्ही शोरूम मधे दाखविताना रेकॉर्डेड कन्टेन्ट्स दाखवितात . सोनीची खरी पारख करताना ट्रन्समिटेड सिग्नलस कसे दिसतात ते पाहूनच तुलना करणे योग्य. सोनीवाले ते कधीच दाखवीत नाहीत. घरी आल्यावर खरे चित्र कसे दिसते हे कळते.
16 Mar 2017 - 10:58 am | किसन शिंदे
सोनी ब्रॅवियाचा अनुभव घेऊन पाहीलाय. अतिशय बेभरवशाचे एलईडी असतात.
16 Mar 2017 - 11:24 am | संदीप डांगे
सोनी ब्राविया बद्दल सहमत... अतिशय बेभरवशाचे टीवी.. तीन वर्षे चालले तर पैसे वसूल... सर्व सदस्यांना कळकळीची सुचवणी. बाकी काहीघ्या... सोनी बिल्कूल घेऊ नका..
सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला होता... साधारण तिसर्या वर्षाच्या सुरुवातीला वरच्या भागात आडवा पॅच अंधुकसा यायला लागला... नंतर दोनेक वर्षात जरा जास्त वाढला.. जालावर चेक केले तेव्हा ही समस्या खूप खुप लोकांना आहे असे कळलं, कैकांना तर एक वर्ष झाल्याझाल्या भलेथोरले पॅचेस आल्याचे दिसले. स्क्रीन बदल्ण्याची किंमत २२हजार रुपये. (टीवी ६५हजार) स्क्रीन बदल्ण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा तो मी ओएलक्स वरुन २१ हजाराला विकून टाकला.
त्यापेक्षा उन्नीस-बीस क्वालिटी असलेले शामसंग-एल्जी वगैरे घ्यावेत.. दणकट आणी वर्षानुवर्षे बिनदिक्कत चालतात. खरेसाहेबांना अनुमोदन. बजेटमध्ये मोठ्यातलामोठा स्र्कीन घ्यावा. पण बैठकीचे व टीवीचे अंतर किमान १० फूट हवे.
८ फूट असेल तर ३२इन्चीपर्यंत ठिक
१० फूट असेल तर ४० इन्ची ठिक
१२-१५ फूट असेल तर ५५ वगैरे ठिक
16 Mar 2017 - 11:33 am | किसन शिंदे
माझ्या स्वत:च्या ओळखीत चार पाच जणांकडे ही समस्या अनुभवली. माझा स्वत:चा एलईडी चार वर्षे उत्तम टिकला, पण त्याची स्क्रीन गेल्यावर मात्र ती बदलण्याच्या भानगडीत न पडता एलजीचा नवीन एलईडी घेतला.
16 Mar 2017 - 12:15 pm | सुबोध खरे
वरील गुणोत्तर आता टीव्ही चे रेझोल्यूशन वाढल्यामुळे बदलले आहे.
To determine the maximum size TV screen you would divide the length of your viewing distance by 1.5.
म्हणजेच जर तुम्ही ८ फुटावर(९६ इंच) बसत असलात तर ६४ इंची आणि १० फुटावर(१२० इंच) बसत असलात तर ८० इंचाचा टीव्ही घ्यावा
http://blog.coldwellbanker.com/3-simple-tips-for-choosing-the-right-size...
माझ्या बेडरूम मध्ये बेडची लांबी ६ फूट अधिक ३ फुटावर भिंत असे ९ फूट होत होते त्यासाठी ७२ इंचाचा टीव्ही चालला असता. पण तेवढा माझ्या बजेट मध्ये नव्हता म्हणून परवडणारा ५५ इंचाचा घेतला.
शिवाय जितका मोठा टीव्ही असेल तितके त्याचे रेझोल्यूशन चांगले हवे म्हणजेच ४० इंचापेक्षा जास्त असेल तर फुल्ल एच डी टीव्हीच घ्यावा full HD, offers 1920 by 1080 pixels. ४० इंचापेक्षा कमी असेल तर एच डी चालू शकेल. (a 720p HDTV gives you 1024 by 768 pixels,)
खरं तर आता एच दि किंवा एच डी रेडी टीव्ही घेऊच नये कारण ते येत्या एक ते दोन वर्षात नक्कीच कालबाह्य होणार आहेत आत्ताच जवळ जवळ ५० एच डी चॅनल उपलब्ध आहेत
16 Mar 2017 - 12:42 pm | संजय क्षीरसागर
या ४०" व्यू टिवीचं Screen Resolution:1920 x 1080 आहे !
16 Mar 2017 - 12:44 pm | संजय क्षीरसागर
या ४०" व्यू टिवीचं Screen Resolution:1920 x 1080 आहे ! शिवाय हे २०१७ चं मॉडेल आहे, त्यात तीन वर्षाची वॉरंटी किंमतीतच इन्क्लूडेड आहे.
16 Mar 2017 - 12:58 pm | सुबोध खरे
झकास
तीन वर्षे डोक्याला त्रास नाही.
17 Mar 2017 - 8:09 am | प्रचेतस
फुल एचडी एलजीचा एलसीडी टीव्ही गे ७/८ वर्ष घरी वापरतोय. एकदाही प्रॉब्लेम नाही, अत्युच्च दर्जाचे चित्र आहे. सोबत ब्लू रे प्लेयर असल्याने फुल एचडी सिनेमे बघताना अधिकच बहार येते.
16 Mar 2017 - 5:31 pm | अप्पा जोगळेकर
सम्सुन्ग-एल्जी पेक्षा पॅनासॉनिक अधिक दणकट आणि स्वस्त आहे. शिवाय दर्जाही उत्तम.
मायक्रोमॅक्स चे टीव्ही आणखीन स्वस्त आहेत. पण दर्जाबद्दल माहीती नाही.
16 Mar 2017 - 3:55 pm | रेवती
माझ्याकडील सोनी ब्राविया अनेक वर्षे चालू आहे. उलट नातेवाईकांकडील सॅमसंग दोन वर्षात बिघडला.
16 Mar 2017 - 1:07 pm | अभ्या..
ओ प्लीज ना. अशा ईंचाच्या अन लाखालाखाच्या गोष्टी करु नकात ना. कॉम्प्लेक्स येतो आम्हा गरीबांना. :(
16 Mar 2017 - 1:56 pm | संदीप डांगे
हो ना! मला तर वाटायले अजून चार-पाच वर्षे फिरकू नये मिपावर... :-) =))
16 Mar 2017 - 1:56 pm | सतिश गावडे
तसं असेल तर तुम्ही चार पाच हजारात मिळणारा प्रोजेकटर घ्या. लाखाचा प्रश्नच नाही आणि इंचही जास्त.
मग आयुष्यात बहार तर येईलच, पण त्याबरोबर दृकश्राव्य अनुभवाचा महोत्सवही होईल.
16 Mar 2017 - 2:03 pm | अनुप ढेरे
हा हा हा =))
16 Mar 2017 - 4:37 pm | किसन शिंदे
चार पाच हजारात प्रोजेक्टरही मिळत नाही. कमीत कमी २५-३० हजारात एपसोन किंव इन-फोकसचे चांगले प्रोजेक्टर मिळू शकतात ज्यांची ल्युमिन्स क्वॉलिटी चांगली असते.
16 Mar 2017 - 4:46 pm | अभ्या..
एखादा फ्लेक्स नायतर वॉलपेपर लावावा,
म्हशीचे नायतर हरणाचे चित्र लावणारे मी. ;)
16 Mar 2017 - 4:55 pm | सतिश गावडे
>>चार पाच हजारात प्रोजेक्टरही मिळत नाही.
तुमचा सध्याचा पत्ता द्या आणि माझ्या अकौंटला पाच हजार पाठवा. पाच हजाराचा प्रोजेकटर घरपोच मिळेल ;)
16 Mar 2017 - 7:20 pm | सुबोध खरे
सात आठ हजारात वापरलेला किंवा कारखान्यातील सेकंड्स चा टीव्ही सात आठ हजारात मिळेल. आणि एक वर्षात त्यांचा परत विकला तर ७०% पैसेही परत मिळतील
https://www.gozefo.com/mumbai/category/TV?filter&filter.sortBy=price_low
हाकानाका
17 Mar 2017 - 10:38 am | लॉरी टांगटूंगकर
गॅस (म्हणजे: gadget acquisition syndrome ) असलेले समसुखी लोक्स बघून आनंद झाला.
आठवड्यापुर्वी आंघोळ करतांना गाणी ऐकण्यासाठी सोनी एक्स बी२ हा निलदंती स्पिकर घेतला. एक्स बी ३ लाऊड वाटलेला. बोस साउंडलिंकचा बास कमी वाटलेला. जेबीएलशी वैयक्तिक वाकडं आहे, मागं एकदा सर्विसच्या बाबतीत लै कडकड करावी लागलेली.
कॅणॉनच्या १०-१८ आणि १०-२२ कडे डोळा ठेवून आहे. कोणी यांपैकी कोणती/ कोणतीही रूंद कोन असलेली वापरली असल्यास अनुभव्/कंपेरिझन/प्यारलल लेन्स सुचवल्यास मंडळ आभारी राहील.
17 Mar 2017 - 12:02 pm | मोदक
आपल्या खिशातल्या फोनवर गाणी कां ऐकत नाही..? एक जागा बनवायची जेथे शॉवरचे पाणी पोचणार नाही - बस्स..
मी पांच / सहा वर्षांपूर्वी अशा प्रकारचे स्पीकर शोधले होते.. पण नंतर लक्षात आले की फोननेही काम चालेल..! (मी मुख्यत: भाषणे / कथाकथने MP3 मध्ये साठवतो व ऐकतो आणि गाणी ऐकलीच तर आहे त्या फोनवर काम चालून जाते.)
विचित्र वाटली तरी ही सवय खूप कॉमन आहे, सचिन तेंडुलकरही शाळेत असताना वायर अणि स्पीकरवाला वॉकमन बाथरूम मध्ये नेऊन अशी गाणी ऐकायचा. :D
17 Mar 2017 - 12:20 pm | संजय क्षीरसागर
बिनखर्चाची आणि अफाट आनंदाची गोष्टे !
17 Mar 2017 - 12:39 pm | मोदक
मला संगीतक्षेत्राचा गळा नसला तरी थोडाफार कान आहे आणि माझा कान माझ्याच गळ्याला गप्प बसायला भाग पाडतो. :-D
17 Mar 2017 - 1:13 pm | संजय क्षीरसागर
पण आपला आवाज (कसाही असला तरी) एकमेव आहे हे समजून स्वतःचं गाणं ऐकायला लागलं की गळा कानावर मात करुन जातो !
17 Mar 2017 - 5:25 pm | हेमंत८२
तिथे गाणे म्हणून सुद्धा काही थोर गायक झाले आहेत..
17 Mar 2017 - 5:41 pm | गवि
सर्वांनी धाग्यावर खूप माहिती दिली.
थँक्स.
आता १२० कॉमेंट्स झाल्याने कोणीतरी कृपया पुढचा भाग नवीन धागारुपात काढावा.
30 Mar 2017 - 5:51 pm | मोदक
हा धागा वाचनमात्र करा आता.