संपादकीय

इडली डोसा's picture
इडली डोसा in लेखमाला
8 Mar 2017 - 6:48 am

मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची

अंकाची संकल्पना मांडली, तेव्हा हे गीत डोक्यात सतत रुंजी घालत होतं. एकंदरीत आरक्षण, आजची सामाजिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी मिळवतानाच्या अडचणी या सगळ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा वाचायला मिळत होत्या. त्या वेळी डोक्यात आलं की या सगळ्या बाबी जर आपण ठरवलं तर किती गौण आहेत! आपल्यासारखेच सर्वसामान्य आयुष्य जगणारे आपल्या आजूबाजूचे लोक काहीतरी वेगळं करतात. सामान्य आणि असामान्य यांच्यामध्ये हाच एक फरक नाही का? सामान्य फक्त विचार करत राहतो आणि असामान्य तो विचार सर्व संकटं पार करत कृतीत उतरवतो. अशा जगावेगळ्या व्यक्तींची वाचकांना ओळख करून द्यायची, हा अंकाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर स्त्री-पुरुष अशा सीमांपलीकडे जाऊन, सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी व्यक्तिमत्त्वं आपल्या भेटीला येत आहेत. या निमित्ताने त्यांचं कार्य आणि कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचावं, वाचकांकडून मिळालेल्या कौतुकाने आणि प्रोत्साहनाने त्यांची जिद्द आणखी वाढीस लागावी, हाही हेतू यामागे आहेच.

'दीपस्तंभ' म्हणाव्या अशा या व्यक्तींमध्ये समाजाने उपेक्षिलेल्या स्त्रियांची मायेने काळजी घेणारं डॉक्टर दांपत्य आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी जाऊन पिचलेल्या समाजातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेविका आहेत. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या दंतवैद्य आहेत, तर सहकारातून आर्थिक विकास घडवणाऱ्या स्वयंसिद्धादेखील आहेत. अगदी हटके आणि धाडसी निर्णय घेऊन बॉडी बिल्डिंगमध्ये करियर करणारी ते स्वतः यशस्वी उद्योजिका असताना समर्थपणे मुलीला होम स्कूलिंग करणारी अशा बहुआयामी व्यक्तींना आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या कलागुणांना फुलवून त्याचा स्वत:बरोबरच दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांबद्दल यात तुम्ही वाचाल. हौशी फूड ब्लॉगर, एकपात्री प्रयोगातून लोकजागृती करणाऱ्या ताई, जुन्या मूर्तींच्या संवर्धनातून त्यांचं गतवैभव परत आणणारी, रंजक लेखिका आणि कविताकार ही सारी जणू रत्नंच. या भारदस्त व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेताना, आजच्या बदलत्या विश्वातल्या उपलब्ध संधी समोर येणार आहेत, आपल्या छुप्या कलागुणांपासून आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत, तर काळानुरूप बदललेल्या किंवा नव्या रूपात आलेल्या गोष्टींबद्दलही वाचायला मिळणार आहे. हा अभिनव खजिना उघडताना काही जिव्हाळ्याच्या कथा सोबतीला आहेत. आपलं भावविश्व मांडणारे ललित लेख आहेत. मनोरंजनासाठी खुसखुशीत, हलकीफुलकी चित्रंही आहेत.

तेज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते,
शब्दशः हीच ओळख असलेल्या अशा या व्यक्तिमत्त्वांच्या अनेकविध पैलूंचं दर्शन घडवण्यास अंकाचं माध्यम मिळालं. मनातल्या संकल्पना मांडण्यापासून ते शब्दस्वरूप देईपर्यंतचा हा प्रवास म्हणजे एक मोठी जबाबदारीच होती. विषय मांडणीपासून ते प्रकाशनापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर अनाहितांनी हा अंक यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आहे. घर-संसार, नोकरी, मुलंबाळं ही सगळी व्यवधानं सांभाळत दर्जेदार असे लेख अनाहितांनी दिले आहेत. शिवाय मिसळपाववरच्या जाणत्या आणि अनुभवी हितचिंतक मिपाकरांचीही अनाहितांना साथ लाभली आहे.

अंकासाठी नीलकांत यांनी मिपावर संकलनासाठी दालन खुलं केलं, त्यामुळे बर्‍याच गोष्टी सहज घडून आल्या. सुरुवातीपासून अंक प्रकाशित होईपर्यंत त्यांची सगळी मदत अतिशय अतिशय महत्त्वाची आहे. नूलकरकाकांनी सगळ्या लेखांचं मुद्रितशोधन करून दिलंच, शिवाय लेख आणखी उठावदार होण्यासाठी काही लेखांमध्ये बदलसुद्धा सुचवले. किलमाऊस्की यांच्या आई श्रीमती हर्षदा राणे यांनी सुरुवातीच्या काही प्राथमिक लेखनाचं शुद्धलेखन तपासलं. सगळ्या अनहितांनी वेळोवेळी अंकाच्या वाटचालीबद्दल चौकशी करून आणि मदतीचा हात पुढे करून आमचा हुरूप वाढवला. सायली भगली या मूनशाईनच्या मैत्रिणीने अंकात तिची काही चित्रं वापरायची परवानगी दिली. श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या 'उंच माझा झोका' या कवितेतील ओळी वापरण्यासाठी अनुमोदन तर दिलंच आणि कवितेचं अभिवाचन करा असंही सुचवलं. कंजूसकाकांनी अभिवाचनाच्या संकलनासाठी तांत्रिक मदत केली. या सगळ्यांचे आभार मानून आम्हाला त्यांना परकं करायचं नाही, पण त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आम्ही कृतज्ञ नक्कीच आहोत.

असा हा अंक वाचकांच्या हाती सुपुर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जे स्वप्न तीन महिन्यांपूर्वी बघितलं, ते सगळ्यांच्या सहकार्याने आज पूर्णत्वास आलं, याचं समाधान आहे. अंक अमच्यासाठी प्रेरणादायी आहेच, वाचकही अंकातून प्रेरणा घेऊन आपल्या ध्येयाच्या, स्वप्नांच्या वाटेवर पुढे मार्गक्रमण करण्यास प्रेरित होवोत आणि प्रत्येकाला मनोमन वाटो..... येई कवेत आकाश, झुले उंच माझा झोका!

- इडली डोसा, मूनशाईन
*************************

(अंकातील हेडर-फूटरसाठीची चित्रे आंतरजालावरून साभार. एकत्रीकरण श्रेय - मूनशाईन)

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

अंकाचा विषय मस्तच. महिला दिनाला साजेसा. संपादकीय आवडलं

उंच झोका घेणारी अनाहिता खुपच छान. प्रस्तावना ही सुंदर. अंकासाठी मेहनत घेणार्या सर्वांचे खुप खुप कौतुक.
आता लवकर लवकर सगळे लेख येऊ द्या.
निलकांत यांचे विशेष आभार.

सविता००१'s picture

8 Mar 2017 - 2:11 pm | सविता००१

आता अंक येउद्या पटकन. खूप वाट पहात आहे.
नीलकांत- खूप खूप आभार.

अंक अतिशय देखणा असेल यात शंकाच नाही. लवकर येउदेत लेख आता....

पूर्वाविवेक's picture

8 Mar 2017 - 3:05 pm | पूर्वाविवेक

झोका घेणारी अनाहिता फार गोड, संपादकीय मुद्देसूद आणि उत्कंठावर्धक एकूणच सगळी संकल्प छान.
अंकाची खूप वाट पहात आहे

पूर्वाविवेक's picture

8 Mar 2017 - 3:07 pm | पूर्वाविवेक

*संकल्प-संकल्पना
धीर धरवत नाहीये त्याचा हा परिणाम :-))

सर्वप्रथम संबंधित प्रत्येकाचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन.
प्रस्तावना जबर झालीय, अंकाबद्दलची उत्सुकता दुणावणारी. त्यामुळे आता एक एक करून लेख वाचतो.

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 3:16 pm | पद्मावति

फार सुंदर संपादकीय.
इडो, मूनशाईन आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन, आभार आणि कौतुक.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2017 - 3:19 pm | प्रीत-मोहर

खूप सुंदर संपादकीय . सायली आणि मूनशाईन त्या गोड अनाहिताच्या चित्रासाठी खूप जास्त आभार.
आणि टीम उरलेला अंक वाचायला घेतेय. प्रतिक्रिया देतेय सावकाश :)

उल्का's picture

8 Mar 2017 - 3:25 pm | उल्का

सुरेख अंकासारखंच सुंदर संपादकीय!
अंकाच्या जडणघडणीशी संबंधित सर्वांचेच अभिनंदन!

फार सुंदर संपादकीय आहे. आता अंक वाचतो.

कंजूस's picture

8 Mar 2017 - 4:00 pm | कंजूस

सुंदर!

सुंदर संपादकीय.. सगळा अंक नेहमीप्रमाणे वाचनीय असेल याची खात्री आहे..

इडली डोसा, मूनशाईन आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन, आभार आणि कौतुक.

मोनू's picture

8 Mar 2017 - 4:15 pm | मोनू

मुखपृष्ठ, अंकाची मांडणी, संपादकीय....सगळेच अतिशय उत्तम झालेय. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, आभार . इतका सुंदर अंक देऊन सिद्ध केलेत मुलीनो.. ऊंच माझा झोका.

लौ यु इडो, मुनशाइन, संपादिका टिम आणि सर्व सहभागी आणि सोबत असणाऱ्या अनाहितांनो _/\_

सुंदर संपादकीय , न जबरी अंक :)

सपे-पुणे-३०'s picture

8 Mar 2017 - 5:50 pm | सपे-पुणे-३०

देखणा अंक आणि त्याला साजेसं संपादकीय !
अंकाबद्दल खूप उत्सुकता होतीच, त्यातून मूनशाईनची नवनवीन, फ्रेश बॅनर्स उत्साह द्विगुणित करत असत. संपादक आणि सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येतेय. महिला दिनाची अतिशय सुंदर आणि अनोखी भेट मिळाली.

पलाश's picture

8 Mar 2017 - 6:57 pm | पलाश

संपादकीय फारच आवडलं. चित्रेपण सुंदर आहेत. विषयात बरीच विविधता आहे. अंक अावडला.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2017 - 7:18 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर संपादकीय

प्रियाजी's picture

8 Mar 2017 - 8:06 pm | प्रियाजी

आत्ताच अंक उघडला आहे. संपादकीयच इतके सुरेख म्हणजे पुढचा अंक झकास असणार याची खात्रीच. सर्व संबधितांचे मनापासून अभिनंदन. झोक्यावरील मुलगी फारच आवडली.

फारच छान..आता अंक वाचते.

सर्व चमूचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रस्तावना अत्यंत सुंदर झालीये.
लवकरच अंक वाचायला घेईन.

किलमाऊस्की's picture

9 Mar 2017 - 12:54 am | किलमाऊस्की

संपादकीय आवडलं. मनापासून लिहिलंय. इडली डोसा आणि अंकासाठी झटणार्‍या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!

रेवती's picture

9 Mar 2017 - 12:56 am | रेवती

प्रस्तावना आवडली.
अंक आकर्षक दिसतोय.
आता वाचन करून प्रतिसाद देईन.

जुइ's picture

9 Mar 2017 - 12:58 am | जुइ

या अंकासाठी कष्ट करणार्‍या सार्‍यांचे मनापासून कौतुक! अंक सवडिने वाचीन.

जुइ's picture

9 Mar 2017 - 1:00 am | जुइ

झोका खेळणारी मुलगी प्रचंड आवडली आहे!!

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2017 - 3:17 am | सानिकास्वप्निल

उत्कृष्ट संपादकीय!

इडो, मूनशाईन तुमचे खूप कौतुक. अतिशय देखणी मांडणी, नेटकेपणा व नविन कल्पना. याआधी अशी सजावट कुठेच पाहिली नाही, मूनशाईन तू एक उत्तम काम केले आहेस. तुझ्यासारखी गुणी कलाकार / सदस्या लाभली आम्हाला यातचं सगळे आले.

इडो - तुझी अंकाबद्दलची रूपरेषा, मांडणी सगळे कौतुकास्पद. अनेक छान विषय सुचवून वैविध्यपूर्ण, प्रेरणादयी अंक सादर केलायेस.

तुम्हा दोघींनी संयमाने, सकारत्मकतेने हा प्रवास सुरू ठेवला, अनाहिता प्रशासनावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल अनेक आभार ___/\__

अंक आता वाचायला घेते आणि सविस्तर प्रतिसाद देते :)

रुपी's picture

9 Mar 2017 - 11:29 am | रुपी

खूप सुरेख संपादकीय!

चित्रातली कल्पना खूपच आवडली. सर्व लेखांबद्दल खूप उत्सुकता आहे.

सुचेता's picture

9 Mar 2017 - 3:41 pm | सुचेता

संपादकीय आवडलं

दर्जेदार वाचनीय असा अंक आहे .सर्वांचे अभिनंदन ..

सस्नेह's picture

9 Mar 2017 - 4:29 pm | सस्नेह

अंकही छापील दिवाळी अंकांपेक्षा सुद्धा सरस झाला आहे.

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 6:53 pm | संदीप डांगे

चारच लेख वाचलेत अनाहिता विशेषांकाचे, पण नतमस्तक बायांनो!
एवढी दमदार मालिका अखिल मराठी जालीय जगतात झाली नसेल!
अभिनंदन! कडक सलाम!

सुरेख ,नेमकं संपादकीय .
अंकाची मांडणी , लेख सगळंच अप्रतिम
इडो, मुनशाइन, संपादिका टिम, आणि ज्यांनी लेख दिले आहेत त्या अनाहिता सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आम्ही फार ग्रँड काहीतरी करतोय अशा अभिनिवेशाचा लवलेश नसलेलं संपादकीय खूप आवडलं.
सामान्यातले असामान्य ते सोदाहरण दाखवून दिलंत.
अंकासाठी झटणाऱ्या संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन, आभार आणि नमस्कार !!!

पैसा's picture

10 Mar 2017 - 8:35 am | पैसा

अतिशय सुरेख नेटके संपादकीय. माझ्यातर्फेही सर्व सहभागी मंडळींना आणि वाचकांना मनापासून धन्यवाद!

कवितानागेश's picture

10 Mar 2017 - 3:59 pm | कवितानागेश

इडलिडोसा आणि मूनशाईन यांचे कौतुक करावं तितके कमीच आहे.
अंकाचा विषय, कल्पना, आवाका मांडणी आणि अतिशय कल्पकतेनी तो समोर आणणे या सगळ्याचे श्रेय या दोघीनाच आहे. त्यांनी दोघीनी वेळोवेळी पाठपुरावा करून लेखनाचे काम पूर्ण करून घेतले आहे. कविता अभिवाचनाचे काम देखील इडलिडोसाने चिकाटीने पूर्ण केले आहे.
या दोघींमुळे पुढच्या अनाहिता अंक करणाऱ्या मुलींसाठी एक पॉझिटिव्ह चॅलेंज उभे राहिलेले आहे!

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2017 - 5:20 pm | स्वाती दिनेश

संपादकीय फार छान.. अंकाची संकल्पना तर उत्तम आहेच. एकेक लेख वाचते आता..
अंकासाठी कष्ट घेणार्‍या सर्व टीमचे खूप कौतुक आणि अभिनंदन..
स्वाती

अनन्न्या's picture

10 Mar 2017 - 6:47 pm | अनन्न्या

सर्व टीमचे खास कौतुक!! यावेळी प्रत्यक्ष भाग नाही घेऊ शकले, पण दाद द्यायला नक्की वेळ आहेच. हळूहळू वाचतेय.

चित्रा लेले's picture

10 Mar 2017 - 10:31 pm | चित्रा लेले

सम्पादकिय आवद्दल..तुमचे प्रयत्न उत्तम ..त्यचे फल आन्कहि उत्तम

आरोही's picture

11 Mar 2017 - 6:07 pm | आरोही

सुंदर अंक अन संपादकीय .khup abhar sagalya team che.

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 11:59 pm | जव्हेरगंज

उत्तम लेखमाला!!!

सादरीकरण विशेष आवडले!

संपादकीय आवडलं!! लेख वाचतेय एकेक करून..

शामसुता's picture

16 Mar 2017 - 12:20 pm | शामसुता

खुप सुंंदर, अगदी मनापासुन लिहलयस इडो. अंंक फार दर्जेदार,वाचनीय झालाय.

मधुरा देशपांडे's picture

18 Mar 2017 - 11:24 am | मधुरा देशपांडे

उत्तम अंकाचे तेवढेच उत्तम संपादकीय...फार आवडले...
इडो आणि मुनशाईन, दोघींनी मिळून केलेली मेहनत अंकात दिसते आहे, अनेक प्रेरक मुलाखती, लेख आणि तेवढेच सुंदर सादरीकरण...अनेक कामात व्यस्त असल्याने प्रतिसाद बराच उशीरा देतेय, जमेल तसे बरेच लेख वाचले, अजून वाचते आहे...सहभागी सर्वच अनाहिता आणि अंकात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आणि तुम्हा दोघींचे विशेष अभिनंदन!!

प्रश्नलंका's picture

19 Mar 2017 - 3:56 am | प्रश्नलंका

सुंदर मुखपुष्ठ, नेटके संपादकीय, अंकाचा विषय पण छान आहे. इडो, मूनशाईन वेल डन!! तसेच अंकासाठी काम करणाऱ्या सर्व टीम चे कौतुक आणि अभिनंदन!!