कालच कन्हैय्या कुमारला चौकशी कमिटीने क्लीन चिट दिल्याची बातमी झळकली इंडियन एक्सप्रेस मध्ये आणि तमाम डाव्यांना तो निर्दोष असल्याचा साक्षात्कार झाला.. आणि त्यांनी आनंदाने छाती पिटायला सुरुवात केली. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल हाती येत नाही, तोपर्यंत त्यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही कारण चौकशी अजून पूर्ण झालेली नाहीये. चौकशीत अजून काही धागेदोरे सापडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणारा काळ ह्या सगळ्याची उत्तरे देईलच.... पण ह्या संदर्भात जेंव्हा कन्हैय्याच्या प्रकरणानंतर वर्षभरात पुन्हा ज्यापद्धतीने रामजास कॉलेजमधले प्रकरण घडले आणि पुन्हा ज्यापद्धतीने मीडियामध्ये (सर्व प्रकारच्या) जो काही हल्लाबोल सुरु झाला आणि पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुता ह्या गंज पडू पाहणाऱ्या मुद्दयांनी डोके वर काढले आहे.... त्यामध्ये काही मुद्दे मुद्दामून दुर्लक्षिले जात आहेत. त्याकडे प्रकाश टाकायचा मी माझ्याप्रकारे प्रयत्न करत आहे...
गेल्या वर्षी गोव्यामध्ये आयोजित इंडिया आयडीयाज कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना "बुद्धा इन ट्राफिक जाम"चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ह्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं, ते म्हणाले कि, 'एकदा एक माणूस चर्चमध्ये जातो आणि तिथल्या प्रिस्टला हातातली वाईन दाखवत विचारतो कि "हे येशूचे रक्त आहे का?" प्रिस्ट म्हणतो, "होय हे येशूचे रक्त आहे." मग तो माणूस पुन्हा विचारतो कि, "तुमचे हे उत्तर बुद्धिनिष्ठ आहे कि वस्तुस्थितीनिष्ठ?". प्रिस्ट म्हणतो कि, "वस्तुस्थितीनिष्ठ"... ते उत्तर ऐकून तो बाहेर येतो. बाहेर काही मुली, स्त्रिया असतात. त्यापैकी एकीने एक बाहुली हातात पकडलेली असते आणि बाकीच्यांना म्हणत असते कि, "बघा माझी मुलगी, बघा माझी मुलगी". तो गोंधळून जातो आणि तिला विचारतो, "तू जे काही म्हणत आहेस ते बुद्धिनिष्ठ आहे कि वस्तुस्थितीनिष्ठ?". ती त्याला म्हणते, "वस्तुस्थितीनिष्ठ". तो कपाळावर हात मारू घेतो आणि निघून जातो. एव्हढीच गोष्ट होती ती. आता त्या वाईनच्या आणि बाहुलीच्या जागी "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुता" ठेवूया. आपल्याला आत्ताच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येईल.
सध्या जो काही वाद निर्माण केला जातोय तो पूर्ण वाद हा जुन्या आणि नव्या विचारसरणीतलं भांडण आहे. आत्तापर्यंतच्या "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहिष्णुता" ह्या संदर्भातल्या संकल्पना ह्या ठराविक लोकांच्याभोवतीच फिरत होत्या. त्यांची स्थाने सुरक्षित होती. आणि ते जे काही म्हणतील त्यांच्याविरोधात कोणीच काही बोलत नव्हतं. त्यामुळे वरच्या त्या मूर्ख प्रिस्ट आणि त्या मूर्ख महिलेसारखं त्यांच आस्तित्व झालं होतं. त्या वाईनला ते रक्त नाही ती वाईन आहे आणि त्या बाहुलीला ते मूल नाही ती बाहुली आहे असं कोणीसुद्धा म्हणत नव्हतं. त्यामुळे वर्षानुवर्षे त्या वाईनमध्ये नसलेल्या येशूचं रक्त आम्ही आहे असं समजत होतो आणि त्या बाहुलीमध्ये नसलेल्या मुलामध्ये आम्हाला मूल दिसत होतं. जेव्हापासून लोकं त्या वाईनला येशूचं रक्त नं म्हणता वाईन म्हणू लागले आणि त्या बाहुलीला मूल नं म्हणता बाहुली म्हणू लागले. तेंव्हापासून जे कोणी ह्या जुन्या धारणेचे मालक आणि धारक होते त्यांचे स्थान डळमळीत होऊ लागले. त्यांना आणि त्यांच्या धारणांना कोणी आव्हान जोपर्यंत देत नव्हतं तोपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. जेंव्हा त्यांना विरोध सुरु झाला तेंव्हापासून त्यांची ओरड सुरु झाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीची, जी अत्यंत तद्दन टाकाऊ आहे. आणि त्यामुळेच त्यांचा मोदीविरोध.
ह्या देशात स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनच डाव्या विचारसरणीच्या तावडीत इथली प्रसारमाध्यमे आहेत. आणि अगदी पद्धतशीरपणे त्यांना जे काही हवंय त्यापद्धतीने त्यांनी त्यांची धोरणे ठरवली आहेत. आणि आता त्यांना समाजवाद्यांची साथ मिळत आहे. ही कम्युनिस्ट मंडळी अगदी साधनशुचितेचा आव आणत आहेत त्यांच्या इतिहासावर एक नजर टाकू...
भारतात जेंव्हा सर्व जण ब्रिटिशांविरोधात उभे होते, रान पेटवत होते तेंव्हा काही कॉम्रेड लोकं ब्रिटिशांना पाठिंबा देण्यात मश्गुल होती. कारण संताप देणारं आहे. जर्मनीने रशियाविरोधात आघाडी उघडली होती आणि इंग्लंड जर्मनीविरोधात लढाईला उतरलं. रशिया कम्युनिस्ट. तेंव्हा कम्युनिस्ट विचारधारेला वाचवायला हवं म्हणून त्यांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला. म्हणजे स्वतःची विचारधारा वाचवायला ते देशसुद्धा पणाला लावायला मागेपुढे पाहात नाहीत. सध्याच्या कम्युनिस्टांकडे पाहिलं तर त्यांच्या विचारधारेमध्ये काहीच फरक पडलेला दिसत नाही. आज हे त्यांच्या विरोधात होऊ घातलेल्या हिंसेच्या विरोधात असे काही बोलतात कि ह्यांचा इतिहास अगदी अहिंसक आहे. हिटलरपेक्षाही भयानक हिंसा ह्यांच्या स्टॅलिनने केलीये. त्यांच्यच स्टॅलिनने १९३९, मध्ये, पोलंडवर अन्याय करणारा, हिटलर सोबत अनाक्रमणाचा करार केला होता. ज्याची परिणती दुसर्या विश्वयुद्धात झाली. चीनमधल्या माओ-त्से-तुंग ने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली केलेल्या कत्तली पाहिल्या तर अमानुषतासुद्धा कोपर्यात जाऊन ढसाढसा रडेल. वाचकांना जर इच्छा असेल तर चीनमधल्या तीआनमेन चौकातल्या घटनेबद्दल आंतरजालावर हुडकावं. रात्रभर झोप येणार नाही. आता रशियामध्ये बदल होत आहे. पण कधीकाळी ह्या रशिया आणि चीन मधल्या कम्युनिस्टांनि इतरधर्मियांवर प्रचंड अत्याचार केलेत, भारतातसुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही.
आज हिंदुत्ववादी लोकांविरोधात रान उठवणारी मीडिया काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल शांत का बसली? कम्युनिस्ट राज्यांमध्ये दिवसाढवळ्या होणाऱ्या हिंदूंच्या कत्तलीवर ते काहीच का बोलत नाहीत? एका रोहित वेमुलाने आत्महत्या केली तर एव्हढी बोंबलणारी मीडिया इतर आत्महत्येवर का शांत बसतिये? आतातर असं सिद्ध होतंय कि तो दलित नव्हताच. एक दादरी प्रकरण काय घडलं, ते असं दाखवलं गेलं कि प्रत्येक गावागावात तश्या घटना घटना घडत आहेत. तीच मीडिया कैरानाच्या घटनेवर हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन का आहे? एखाद्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराच्या बातमीने त्यांच्या वर्तमानपत्राचा मथळा जातो आणि एखादा सैनिक जर शहिद झाला तर त्याला "killed" म्हणून बातमी दिली जाते कुठल्यातरी कोपर्यात. ह्या सर्वांच्या विरोधात कधीच अवॉर्डवापसी होत नाही? आज जे चॅनेल्स "असहिष्णुता आणि अभिव्यक्ती" स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत त्यांनी त्यांचे आधीचे व्हिडिओज बघावेत. एखाददुसऱ्या चला तिसर्या ठिकाणी जर काही घडलं तर सगळ्या देशात ते घडतंय हे असलं चित्र का बरं वाढवून दाखवलं जातंय? दिलं जात नाहीये? सगळ्या चॅनेल्सवर दिवसरात्र त्यांचा तमाशा चालू असतोच ना?
इतके दिवस एका मोठ्या समाजाचा आवाज इतके दिवस दाबला गेला तो आवाज आज बाहेर पडत आहे. विशेषकरून मोदी सत्तेत आले आणि ह्या सर्व प्रसारमाध्यमांच्या स्वैराचाराला वेसण घातली गेली. आणि इतके दिवस इतरांचा आवाज दाबणार्या प्रसारमाध्यमांना हे काही सहन होत नाही म्हणून त्यांनी हे "असहिष्णुतेचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" पिल्लू सोडले आहे. समस्त प्रसारमाध्यमांचा अर्णब-विरोध सुद्धा ह्याच मुळे."आत्तापर्यंत आम्हीच सारं काही ठरवायचो, आता तुम्ही कोण?" हाच विचार ह्यासगळ्यामागे आहे. परवा कन्हैय्या होता आणि आजकाल तो उमर आणि ती गुरमेहेर आहे ह्यांचा तात्पुरता चेहरा... उद्या अजून वेगळा असेल....
ह्या देशात सर्व प्रकारचे नमस्कार चांगले आहेत पण हा जो काही लाल सलाम घातला जातो. "We don't believe in the revolution by Ballet but by Bullet" हे जर ह्यांचे तत्वज्ञान असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. ह्यांना चर्चेची भाषा समजत नाही... चर्चा माणसांमध्ये होते. माणूस आणि पिसाळलेल्या जनावरामध्ये कधीच संवाद होऊ शकत नाही. आणि जर कोणी चर्चा करायला गेलं तर तर ती चर्चा त्यामाणसावरंच बेतू शकते. भारतातले डावे हे सध्या पिसाळलेले आहेत. कदाचित ही भाषा असभ्य वाटत असेल पण तेच सत्य आहे. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही, पण ती हिंसा कोणाविरुद्ध आणि का केली जातीये हे जर विचारात घेतलं तर नक्कीच त्या हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकतं... कारण ह्या देशात जर "भारत से आझादी" म्हणणार्या उमर खलिदचे समर्थन होऊ शकते तर हो... अश्यांना बुकलणार्या अभाविपचेपण समर्थन होऊच शकते...
ज्या दिल्ली उच्च न्यायालयाने कन्हैय्याला दिलं त्या जस्टीस प्रतीभा राणी ह्यांनी ती ऑर्डर देताना खालील मत नोंदवलंय...
The thoughts reflected in the slogans raised by some of the students of JNU who organized and participated in that programme cannot be claimed to be protected as fundamental right to freedom of speech and expression. I consider this as a kind of infection from which such students are suffering which needs to be controlled/cured before it becomes an epidemic.
Whenever some infection is spread in a limb, effort is made to cure the same by giving antibiotics orally and if that does not work, by following second line of treatment. Sometimes it may require surgical intervention also. However, if the infection results in infecting the limb to the extent that it becomes gangrene, amputation is the only treatment.
(जेएनयू च्या विद्यार्थ्यांनी, ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात भागपण घेतला होता, दिलेल्या घोषणांतून जो काही विचार प्रकट होतो तो नक्कीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संरक्षित केला जाऊ शकत नाही. मला असं वाटतं, कि ह्या अश्या विचारांच्या संसर्गाचे रूपांतर साथीच्या रोगात होण्याच्या आधीच ह्यावर उपाय केला गेला पाहिजे.
जेंव्हा असा काही संसर्ग कोण्या अवयवात होतो, तेंव्हा आधी काही औषधे देऊन तो बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. नाहीतर, ऑपरेशन केलं जातं. आणि तरीही काही फरक पडला नाही तर तो अवयव कापून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक उरत नाही...)
थोडक्यात आपले तुकाराम महाराज म्हणतात अगदी तसंच,
भले त्यांसी देऊ, गांडीची लंगोटी
नाठाळांचे माथी, हाणू काठी....
संदर्भ:
१. सर्व समकालीन वर्तमानपत्रे
२. https://www.youtube.com/watch?v=5qMffeG-rv8
३. kanhaiyya kumar v. State of NCT of Delhi (MANU/DE/0498/2016)
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
2 Mar 2017 - 5:55 pm | कंजूस
लोकशाहीतल्या अधिकारात मत नोंदवलं तर गुन्हा होत नाही.
2 Mar 2017 - 10:42 pm | माहितगार
सर्वच पथभ्रष्टता अथवा अधःपात कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. कायद्याच्या कक्षेत न येताही काही अधःपात समाज आणि देशाच्या जडण घडणीसाठी स्पृहणीय असतीलच असेही नसावे.
3 Mar 2017 - 10:36 am | वटवट
आपल्या राज्यघटनेचा अभ्यास वाढवा... एव्हढेच सांगेन
2 Mar 2017 - 8:03 pm | गॅरी ट्रुमन
लेख प्रचंड आवडला आहे. मोठ्या प्रमाणावरील हिंसाचार, विरोधकांची मुस्कटदाबी (गुलाग वगैरे) आणि पिळवणूक ही डाव्या राजवटींची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. आणि ही विचारसरणी मुळातल्या मानवी स्वभावाविरूध्द असल्यामुळे ती कधीच कुठेच यशस्वी होऊच शकत नाही.जोपर्यंत लष्करी किंवा अन्य स्वरूपाचा बडगा राज्यकर्त्यांच्या हातात असतो तोपर्यंत डावी राजवट निदान टिकते तरी. पण कधीनाकधी हा सगळा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो.
कन्हैय्या खरोखरच तसे काही बरळला होता का? जे काही पुरावे आहेत त्या आधारे ते कोर्टात सिध्द करता येईल का? मला माहित नाही. कदाचित उद्या कोर्टात तो सबळ पुराव्याअभावी सुटेलही. पण प्रश्न एका कन्हैय्याचा नाहीच. फेसबुकपासून एन.डी.टी.व्ही, जनेयु इथे बसलेल्या विचारवंतांनी "भारताचे तुकडेतुकडे व्हावे" असे बोलण्यात गैर काय हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे ज्या देशात राहातो त्याच देशाचे तुकडेतुकडे व्हावेत ही इच्छा ठेवण्यात यांना काहीही गैर वाटत नाही. प्रश्न एका कन्हैय्याचा नाहीच. प्रश्न या सगळ्या विचारवंतांचा आहे. आणि प्रत्यक्ष कन्हैय्या निर्दोष सुटला तरी या दीडशहाण्या विचारवंतांचे काय?
2 Mar 2017 - 9:29 pm | ट्रेड मार्क
एवढ्या स्पष्टपणे विचार मांडलेत त्यामुळे तुम्हाला प्रतिगामी, XXX धर्मविरोधी, समाजात फूट पाडणारे ईई विशेषणे मिळतील त्यामुळे त्याची मानसिक तयारी ठेवा.
पण जे चाललंय ते खरंच धोकादायक आहे. कालच आमच्या एका कायप्पा ग्रुपवर मुंबईत राहणारा एक कॉलेजातला मुलगा म्हणाला मी गुरमेहेरला सपोर्ट करतो. त्याला म्हणलं या प्रकरणात नक्की काय झालंय हे तुला माहित आहे का? त्यावर म्हणे ती एका शहिदांची मुलगी आहे आणि अभाविपला विरोध केला म्हणून तिला बलात्काराच्या धमक्या येत आहेत. पुढे चर्चा/ वाद झाले त्याचा सारांश -
मी: तुला भारत तेरे तुकडे होंगे, भारत मुर्दाबाद, हमे चाहिये (भारतसे) आझादी अश्या घोषणांबद्दल तुला काय वाटतं?
तो: नुसत्या घोषणा तर देतात त्याने काय होतं?
मी: तुला हे देशविरोधी विचार वाटत नाहीत का?
तो: ते नुसता विचार तर करत आहेत त्याने काय होतंय?
मी: एका विचारापासूनच तर सगळं चालू होतं. तुला या प्रकारचं freedom of expression असावं असं वाटतं का?
तो: हो
मी: मग गुरमेहेर किंवा खालेद यांना विरोध करणाऱ्यांना पण FoE असायला पाहिजे ना?
तो: राष्ट्रगीत चालू असताना आपण काय करायला पाहिजे?
मी: विषय बदलू नकोस... पण तरी सांगतो राष्ट्रगीत चालू असेल तर कोर्टाने जे सांगितलंय त्याप्रमाणे करावं. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.
तो: कोणी बोललं म्हणून काही देशाचे तुकडे होणार नाहीत. उगाच राईचा पर्वत करू नकोस. नुसत्या विचाराने काय होतंय, मी पण काल विचार केला कॉलेजमध्ये उडत उडत जाऊ, पण शक्य आहे का?
मी: बेसिक विचारच चुकीचा आहे आणि लॉजिक गंडलंय.
तो: तू मला असं कसं म्हणू शकतोस? तू कोण मला असं बोलणारा?
(वर सांगितलेली घटना खरी आहे.)
हे विचार ऐकून मी थक्क झालोय. माझ्या जवळच्या, ते ही मुंबईत राहणाऱ्या किशोरवयीन मुलाचे असे विचार असू शकतात? असं म्हणतात की एखादा देश रक्तपात न करता जिंकायचा असेल तर त्या देशातल्या शैक्षणिक संस्था ताब्यात घ्या, पुस्तकं बदलून टाका. हा लॉन्ग टर्म प्लॅन आहे पण यशाची खात्री आहे.
3 Mar 2017 - 10:39 am | वटवट
मूर्खपणा आहे सगळा.... घरात दोन चार झुरळं असली कि आपण त्यांना बाहेर टाकून देतो. पण जर जास्त झुरळं झाली तर पेस्ट कंट्रोलनं मारून टाकतो....
3 Mar 2017 - 11:24 am | आकाश कंदील
ट्रुमन साहेब तुम्ही म्हणता ते एकदम वस्तुस्थितीतला धरून आहे. पण मला वाटते तुम्ही त्या मुलाला विचारायला पाहिजे होते तुझी आई XXX प्रकारचा धंदा करते असा बरेच जण "विचार" करत आहेत त्यावर तुला काय म्हणायचे आहे. मला मान्य आहे हा प्रश्न अजिबात सभ्यतेला धरून नाही आणि महत्वाचे म्हणजे या मध्ये आई ला आणणे योग्य नाही पण त्या मुलाला हे पण समजले पाहिजे कि जेव्हा तुम्ही भारतमाते बद्दल बोलताना असे शब्द प्रयोग करतात तेव्हा त्या सर्व लोकांना असेच दुःख होते जे भारतमातेला आई सामान मानतात
3 Mar 2017 - 9:32 pm | ट्रेड मार्क
त्यामुळे मी एवढा डायरेक्ट प्रश्न विचारला नाही. पण शारीरिक हानी न करता वैचारिक/ मानसिक हानीचे उदाहरण म्हणून मी विचारलं -
तू एका मुली बरोबर चालला आहेस आणि जर एक मुलगा तिच्यासमोर अश्लील बोलत असेल/ हावभाव करत असेल तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? त्या मुलाचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तू दुर्लक्ष करू शकशील का?
तर त्याने हा सिलॅबसच्या बाहेरचा प्रश्न आहे म्हणून उत्तर द्यायचं नाकारलं.
2 Mar 2017 - 9:43 pm | सचिन७३८
ख्मेर रूज या राजवटीतले जनतेवर केलेले अन्याय पाहायला हवेत या डाव्या विचारसरणीच्या म्हणवणाऱ्या लोकांना पाठींबा देणाऱ्यांनी.
2 Mar 2017 - 9:44 pm | सचिन७३८
*वाचायला हवेत असं म्हणायचं होतं मला.
2 Mar 2017 - 10:03 pm | गॅरी ट्रुमन
याविषयी मिपावर पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा या नावाने अभिजित अवलियांनी लेख लिहिला होता. खरोखरच भयानक प्रकार होता तो. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वर्षात देशाची २०-२५% लोकसंख्या ठार मारणे हा प्रकार केवळ कम्युनिस्टांनाच जमू शकेल.
अर्थात कितीही काहीही झाले तरी डाव्या विचारसरणीला पाठिंबा देणारे लोक या सगळ्या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. हिटलरही अत्यंत सालस आणि सज्जन वाटायला लागेल असले प्रकार डाव्यांनी केले आहेत.पण पोथीनिष्ठतेची झापडे लावली की अशा गोष्टी दिसेनाशा होतात.
त्याच चर्चेत मी म्हटले होते: मी कम्युनिस्टांना जितका विरोध करतो तितका विरोध करणारा अन्य कोणी सदस्य मिपावर तरी नाही आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. . पण आता मला माझे मत बदलायला हवे :)
2 Mar 2017 - 10:18 pm | गामा पैलवान
कंजूस,
माझ्या मते भारताच्या एकात्मतेस हानीकारक विधाने करणे हा गुन्हा आहे. घटना अभिव्यक्तीस्वातंत्र्य देते, पण ते भारताची एकात्मता अखंडित ठेवायच्या अटीवरच.
आ.न.,
-गा.पै.
3 Mar 2017 - 12:35 am | गुलाम
टिळकांच्या केसरीपासून आजच्या झी न्यूज, टाइम्सनाऊ पर्यंत सगळे डाव्या विचारसरणीचे आहेत का?
याचपद्धतीचा आक्षेप संघाबद्दल घेतला जातो. दोन्हीही (आक्षेप) तितकेच बेसलेस.
मलातरी कैरानाची बातमी मीडिया मधूनच कळली. तुम्हाला कुठुन दुसरीकडून कळली का? आणि त्यावेळी भरपूर गदारोळ देखील झाला होता. आता तिथं खरंच हिंदू-मुस्लीम इश्यु होता की लॉ & ऑर्डरचा तो मुद्दा वेगळा. पण मिडिया गप्प बसली हे साफ खोटं.
असो. चिरफाडच करायची म्हणलं तर बरीच करता येईल. मुळात लेखकाला डावे, समाजवादी, कम्युनिस्ट, लिबरल, नक्षलवादी यांच्यामध्ये फरक करता येत नाही असं दिसतंय. किंवा मुद्दामच सगळ्यांना एकाच तागडीत तोलून एकाचे दोष सगळ्यांना चिटकवण्याचा प्रयत्न असावा.
एकूणच 'पिसाळलेली जनावरं' आणि 'बुकलून काढायला पाहिजे' सारखी भाषा असलेला धागा आणि त्यावर 'लेख आवडला'च्या प्रतिक्रिया बघून चर्चा करता येइल असं वाटत नाही. मिपा पुर्वीसारखं राहिलं नाही हेच खरं.
3 Mar 2017 - 9:09 am | माहितगार
'तावडीत असणे' या वाकप्रचाराच्या दोन अर्थछटा असू शकतात का ? आणि एक अर्थछटा 'प्रभाव असणे' अशा अर्थाने येऊ शकेल का ? आणि बर्याच भांडवलदारी वृत्तपत्रांनीसुद्धा डाव्या विचारसरणीचा संपादकवर्ग, राजकीय साटेलोट्यांमुळे अथवा खप वाढवण्याच्या दृष्टीने वापरुन घेतला आहे किंवा कसे हा वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा असे वाटते. अर्थात माणूस कुत्र्याला चावला की बातमी बनवणे हा वृत्तमाध्यमांच्या व्यावसायिक गणिताचाही प्रभाव असतो, त्यात प्रत्येकवेळी डावे उजवे असतेच असे नाही.
गांधी प्रणित आंदोलन हे स्वातंत्र्यपुर्व चळ्वळीची मुख्यधारा म्हणून आपण पहाता का ? तसे असेल तर गांधीपेक्षा वेगळा घरोबा करुन वेगळी दिशा पकडणारी मंडळी कोण कोण होती ? एकाच्या दुसरीकडे पहाण्याने दुसर्याच्या दुसरीकडे पहाण्याचे समर्थन होते असे आपण म्हणू इच्छिता की संदर्भ हवे आहेत ?
लेखातील भाषा संताप व्यक्त करणारी असेल पण कोणत्याही राष्ट्राचे अस्तित्व आणि राज्यसंस्थेस सत्ताचालवण्यास मिळणारे सामर्थ्य संबंधीत विशीष्ट प्रभावशाली समाजगटां/घटकांवर अवलंबीत असते का ? आणि सत्तेत कोण आहे पाहून काही विरोधक राजकारणात कितीही खालची पातळी गाठतील की प्रभावशाली घटकांच्या राष्ट्रभक्तीला धक्का पोहोचावा आणि प्रभावशाली घटकात अस्वस्थता पसरु नये, नाराजी निर्माण होऊ नये अशी अपेक्षा कितपत रास्त राहते.
3 Mar 2017 - 11:55 am | गुलाम
कोणताही अर्थ घेतला तरी मी नावं दिलेली माध्यमे डाव्यांच्या तावडीत होती असं म्हणता येणार नाही.
मी असं कधी म्हणलं आणि मुख्यधारा होती का नव्हती यामुळे कम्युनिस्ट/संघ यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला की नाही या प्रश्नाच्या उत्तरात काय फरक पडतो? सुभाषचंद्र बोस हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते आणि ते गांधी प्रणित आंदोलनातील प्रमुख नेते (काही काळ) होते. तर काही कम्युनिस्ट स्वातंत्र्यचळवळीच्या मुख्य धारेतील प्रभावशाली नेते होते असे म्हणावे काय, किंवा कसे? (जमलं का?)
3 Mar 2017 - 9:51 am | गॅरी ट्रुमन
माझ्या माहितीप्रमाणे बोगस आणि गंडलेल्या डाव्या विचारांना (लाल रंगाच्या फिक्यागडद सर्व छटांना) मिपावर व्यापक समर्थन कधीच नव्हते. असे समर्थन देणारे अनेक सदस्य तिकडे जास्त सक्रीय झाल्यापासून जेवढे समर्थन होते ते पण कमी झाले.
असो.
3 Mar 2017 - 10:44 am | गुलाम
माझ्या म्हणण्याचा काय रोख होता हे तुम्हाला कळलं नसेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तरीपण सांगतो. कोणत्या विचारसरणीचा प्रभाव असावा यावर आक्षेप नाहिये तर विचार मांडताना काय पध्दतीची भाषा वापरली जाते यावर आक्षेप आहे.
3 Mar 2017 - 10:47 am | वटवट
टिळकांच्या केसरीपासून आजच्या झी न्यूज, टाइम्सनाऊ पर्यंत सगळे डाव्या विचारसरणीचे आहेत का?>>> अशी किती वर्तमानपत्रे आहेत? आणि डाव्या विचारसरणीची किती वर्तमानपत्रे आहेत??? (अर्णब जेंव्हा टाइम्सनाऊ मध्ये होता तेंव्हाची गोष्ट सोडली तर सध्याची स्थिती मला माहित नाही.)
याचपद्धतीचा आक्षेप संघाबद्दल घेतला जातो. दोन्हीही (आक्षेप) तितकेच बेसलेस.>>>> संघाचा अभ्यास करा आधी मग बोलू सविस्तर... संघाचे स्वातंत्र्यात योगदान हा डाव्यांचा अत्यंत आवडता विषय आहे.. आपण त्यावेळेसध्या परिस्थितीचा अभ्यास करा (डाव्यांना अभ्यासाचं वावडं आहे हे माहित आहे तरी मी सांगतो)
पण मिडिया गप्प बसली हे साफ खोटं>>> आपण अतिशय महान आहात. आपल्या अभ्यासाला तोड नाही.
मुळात लेखकाला डावे, समाजवादी, कम्युनिस्ट, लिबरल, नक्षलवादी यांच्यामध्ये फरक करता येत नाही असं दिसतंय.>>>> मी चुकीची दुरुस्ती करतो... मला "डावे, समाजवादी, कम्युनिस्ट, लिबरल, नक्षलवादी" ह्यामध्य फरक करायचाच नाहीये... सगळे एकाच माळेचे मणी आहेत... सर्वांना एकजात झोडपले पाहिजे....
3 Mar 2017 - 11:52 am | आकाश कंदील
गुलाम साहेब पहा काही लोक कसे सिलेक्टिव्ह असतात ते म्हणजे मूळ लेखात लिहिलेल्या खालील मुद्यांना स्पर्श पण करत नाहीत
१. हिटलरपेक्षाही भयानक हिंसा ह्यांच्या स्टॅलिनने केलीये. त्याच स्टॅलिनने १९३९, मध्ये, पोलंडवर अन्याय करणारा, हिटलर सोबत अनाक्रमणाचा करार केला होता
२. चीनमधल्या माओ-त्से-तुंग ने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली केलेल्या कत्तली पाहिल्या तर अमानुषतासुद्धा कोपर्यात जाऊन ढसाढसा रडेल.
३. चीनमधल्या तीआनमेन चौकातल्या घटनेबद्दल अळीमिळी गुपचूप
४. हिंदुत्ववादी लोकांविरोधात रान उठवणारी मीडिया काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल शांत का बसली?
५. कम्युनिस्ट राज्यांमध्ये दिवसाढवळ्या होणाऱ्या हिंदूंच्या कत्तलीवर ते काहीच का बोलत नाहीत? ( मालदा मध्ये काय झाले ते एक झी न्यूज सोडल्यास सर्व चिडीचूप )
६. "We don't believe in the revolution by Ballet but by Bullet" हे जर त्यांचे तत्वज्ञान योग्य कि अयोग्य. आणि अयोग्य असेल तर माओवाद निपटायला या डाव्यांनी किती मदत केली
"आणि या विचाराचे/तत्वज्ञानाचे लोक आज अभिव्यक्तीस्वात्रंत्याच्या आणि लोकशाहीच्या च्या मोठ्या गप्पा मारतात हे वाचून/ ऐकून खूप करमणूक मात्र होते "
या सारखे कितीतरी प्रश्न माझ्या सारख्या अल्पमतीला पडतात पण सपक आणि मुद्याचे सोडून चर्चा भरकवणारी उत्तरे मिळतात
असो तूर्तास इतके पुरे बरीच काम वाट पाहत आहेत
3 Mar 2017 - 11:09 pm | गुलाम
काही हुकुमशहा कम्युनिस्ट राजवटींनी केलेल्या अत्याचारासाठी तुम्ही एकजात सगळ्या डाव्या लोकांना जबाबदार धरताय. त्याच न्यायाने उद्या डॉ. दाभोळकरांच्या हत्येसाठी सनातन प्रभात दोषी असल्याचं सिध्द झालं तर तुम्ही त्यासाठी भाजपला दोषी धरणार का? किंवा अजुन ताणायचं ठरवलं तर, हिटलरने केलेल्या हत्याकांडामागे टोकाचा उजवा राष्ट्रवादी विचार होता मग ज्युंच्या ह्त्येसाठी तुम्ही भारतातल्या सगळ्या उजव्या राष्ट्र्वादी लोकांना जाब विचारणार का? कारण जर सगळे डावे सारखेच यावर तुमचा विश्वास असेल तर सगळे उजवे सारखे यावर पण विश्वास ठेवायला हवा.
अवांतर - खरंतर आदर्श परिस्थितीमध्ये या explanation ची गरज नसावी. पण आपल्याकडे अजुनपण काय लिहिलंय यापेक्षा कुणी लिहिलंय याला महत्व आहे म्हणून सांगतो. माझ्या मते कम्युनिझम एक राजकीय व्यवस्था म्हणून धोकादायक आहे कारण त्यात अंगभूत (implicit) हुकूमशाहीचा धोका असतो आणि ती सर्व प्रकारच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करते. चीन/रशिया/कंबोडिया मध्ये जे झालं ते घृणास्पद होतं आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करतं. भारतात जर कोणी त्याप्रकारची शासनव्यवस्था आणायचा प्रयत्न करणार असेल तर माझा त्याला कायम तीव्र विरोध असेल.
4 Mar 2017 - 3:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असं कुठेतरी वाचल्याचं आठवतय. मेगाबा...असो.
4 Mar 2017 - 5:35 pm | गॅरी ट्रुमन
कम्युनिझममध्ये हुकुमशाहीचा अंगभूत धोका का असतो याचे कारणही सांगून टाका की. त्याचे कारण आहे की ही व्यवस्था मुळातच गंडलेली आहे. मानवी स्वभावाच्या पूर्ण विरूध्द आहे ही व्यवस्था. याचा अर्थ सरळ आहे. स्वखुषीने कोणत्याही समाजात कम्युनिझमची अंमलबजावणी होणे शक्य नाही. त्यामुळे ही व्यवस्था टिकवायची असेल तर लष्करी बळाच्या आधारावर दडपशाही करावीच लागते. अन्यथा ती राजवट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते.
असे असूनही इतक्या लोकांना ही बोगस व्यवस्था कशी काय अपीलींग वाटते हेच समजत नाही. त्यातूनही जगात दोन-चार देश सोडले तर सगळ्या जगाने नाकारलेली व्यवस्था आहे ही. तरीही आपल्याकडचे मोठे मोठे विचारवंत ती चोंबाळून बसतात याचेच आश्चर्य वाटते.
3 Mar 2017 - 11:07 am | फेदरवेट साहेब
आता नावच 'वटवट' आहे म्हणल्यावर अजून काय बोला, वरती ट्रुमन म्हणाले तो प्रतिसाद त्यातल्या त्यात आवडला कारण त्यांची भाषा. दुसरे एक म्हणजे, सध्याच्या सरकारला प्रश्न विचारले की सगळ्यांना सरसकट डावे वगैरे लेबल चिकटवायची वृत्ती काळजीत पाडते, सरकारला काही प्रश्न विचारला म्हणून मी कम्युनिस्ट होत नाही होत, हा साधासा मुद्दा आहे.
*जेएनयू घोषणा किंवा रामजस मधील खुळेपणाचा मी निषेध करतो, अन सरकार ने सर्व उपलब्ध पर्याय वापरून ह्या अस्तिनीतल्या निखाऱ्यांना गार करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. फक्त मी अभाविपच्या 'बुकलून काढणे' पर्यायाचा निषेधच करतो त्याला कारणे दोन
१. ते कायदेशीर नाही, घटनादत्त तर मुळीच नाही
२. असले काही करून एकार्थाने अभाविप ह्या हलकट मंडळीला हिरो स्टेटस अचिव करायला मदतच करेल म्हणून
असो.
3 Mar 2017 - 11:47 am | श्वेता व्यास
लेख अतिशय पटला. विवेक अग्निहोत्री यांनी दिलेलं उदाहरण अतिशय चपखल!
3 Mar 2017 - 12:21 pm | विशुमित
धाग्याच्या शीर्षकात तुकाराम महाराजांचा अभंग चपखल वापरला आहे. आता कोणताच डावा-उजवा -उभा-आडवा आक्षेप उरणार नाही.
लगे राहो..!!
5 Mar 2017 - 6:54 pm | मुक्त विहारि
बादवे,,,,
प्रतिसाद मी लेहिलेला नाही...माझ्या कळफलकाने लिहिलेला आहे....असे म्हणावेसे वाटते ....
पण ...प्रतिसाद मीच लिहिलेला आहे....
5 Mar 2017 - 8:29 pm | माहितगार
=))
(या थट्टा वाक्यांचाच एक लेख होईल विकिप्रकल्पांसाठी. कोणी गोळा करुन देतय का ? गंभिरपणे देत असाल तर संदर्भ दुवेही जोडावेत.)
14 Mar 2017 - 8:24 pm | ravpil
Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.