पुणे भटकंती..............दि.21.01.2017

मॅक's picture
मॅक in भटकंती
26 Feb 2017 - 3:36 pm

खर तर ही भटकंती करून बरेच दिवस झाले पण वेळ मिळत नसल्यामुळे लिहायला जमल नाही.
ऑफीस मधूले आमचे एक साहेब आहेत त्यांचे नाव आहे श्री.मोरे, खर पाहीले तर ते साहेबांच्यापेक्षा मित्रच जास्त वाटतात, एकदम मनमिळावू , शांत व्यक्तिमहत्व त्यांनी त्यांच्या स्व:खर्चाने आम्हाला सर्व कर्मचारी वर्गाला ही भटकंती घडवली. त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार!!!!!!
खर पाहीलं तर मी या भटकंतीमध्ये सहभागी होणे, अपेक्षित नव्हते कारण मी सध्या मोरे साहेबांच्या विभागामध्ये काम करत नाही, माझा विभाग वेगळा आहे. परंतू मी पुर्वी त्या विभागात काम करत होतो, त्यामुळे मला सर्वांनी खूप आग्रह केल्यामुळे मी पण गेलो.
तर आमचा प्लॅन असा होता, प्रथम सोमाटणे येथील प्रतिशिर्डी- त्यांनतर तेथील एक गणपतीची मुर्ती जी डोंगरावर उभारण्यात आली आहे. त्यानंतर त्या मुर्तीच्या जवळच सोमाटणे टोल नाक्याजवळ एक जैन मंदीर आहे. - तेथून पुढे कार्ला लेणी अर्थात एकवीरा देवीचे दर्शन- लोणावळा- खंडाळामार्गे पुन्हा मुंबई.
सकाळी 7:30ला सुरवात झाली ती चेंबूर पासून एक-एक मेंबर घेत-घेत गाडी पनवेलला 8:30 ला पोहचली, गाडीत बसणारी सर्वात शेवटची व्यक्ती म्हणजे मीच होतो. मोरे साहेबानी गाडीतच नाष्टा-पाण्याची सर्व व्यवस्था केली होती. मी गाडीत बसल्यावर प्रथम एक्सप्रेसवेच्या टोलनाक्यानंतर आम्ही नाष्टा करून घेतला.........(आधी पोटोबा........)
त्यांनंतर सरळ पुढे प्रतिशिर्डी.......
मुंबई-बेंगलोर हायवेवर पुण्याजवळ शिरगाव येथे हे ठिकाण असून शिर्डीच्या साई मंदीराची अप्रतिम प्रतिकृती येथे तयार करण्यात आलेली आहे. या मंदीराची स्थापना 11 June 2003 रोजी श्री.प्रकाश केशवराव देबोले यांनी फक्त नऊ महीन्यामध्ये श्री साई बाबांच्या आर्शिवादामुळे पुर्ण करण्यात आले असे मानले जाते. येथील अन्नछत्र अगदी शिर्डीच्या अन्नछत्रासारखेच आहे. मंदीराच्या परिसरात एक सुंदर बाग आहे. आणि अनेक प्रकारची झाडे,वनस्पती आहेत. अतिशय रम्य असा परिसर तयार करण्यात आला असून आपण प्रत्यक्षात शिर्डीमध्ये असल्याचा भास होतो.

प्रचि ०१. मंदीराचे प्रवेशद्वार.......

प्रचि ०२.

प्रचि ०३.


 2.आमची संपूर्ण टिम.........

प्रचि ०४.

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

त्यानंतर पुढचे ठिकाण होते सोमाटणे तेथील गणेश मंदीर....... खार तर हे मंदीर नाही आहे..... ही एका टेकडीवर बांधण्यात आलेली प्रचंड आशा आकाराची गणपतीची मुर्तिच आहे. थोड्या (म्हणजे-180) पाय-या चढून गेल्यावर या मुर्तीच्या पायाजवळ पोहचता येते.
ही मुर्ती ब-याच लांब वरून आपण पाहू शकतो. मुंबई-पुणे प्रवासात कोणत्याही मार्गाने प्रवास करत आसाल तर या मुर्तीचे दर्शन होतेच... मला खारे माहीत नाही पण घेतलेल्या माहीतीवरून हीला बिर्ला गणेश मुर्ती म्हणून ओळखले जाते. ही मुर्ती 54 फुट उंचीची आहे. तिला देण्यात आलेला कॉपर कलर हा अतिशय छान असून त्यामुळे ती अतिशय सुंदर व सुबक अशी वाटते. या मुर्तीची कल्पना बिर्ला कुटूंबाची असून ही मुर्ती राजस्थान येथील श्री.मथूराम वर्मा व श्री. नरेशकुमार वर्मा या पिता-पुत्राने तयार केली आहे. या मुर्तीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर चिन्मया मिशनचे, आध्यात्मिक गुरू स्वामी तेजोमायानंदजी यांच्या हस्ते 2009 या मुर्तीचे लोकार्पण करण्यात आले.

प्रचि ०९..

       

प्रचि १०..

प्रचि ११..

प्रचि १२..

           या मुर्तीजवळ गेल्या नंतर तेथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम असे दृश्य पहावयास मिळते एकदा तिथे पोहचला कि तेथून पाय निघत नाही पण आम्हाला
तो काढता घ्यावा लागला ........)
प्रचि १३...


 

    

        

गणेश मुर्तीकडे जाण्यासाठी पाय-या चढताना एका झाडाला हे फळ कि फुल माहीत माहीत हे लटकताना दिसले आम्ही पहील्यांदाच पाहीले होते त्यामुळे जरा उत्सुक्तेने बघत होतेा ते पाहूण रस्त्याने जाणा-या कॉलेजच्या दोन मुलानी माहीती दिली त्याला टन्नू बोलतात शाळेत एकमेकांना मारण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे नंतर जरा वेळ निरिक्षण केल्यानंतर समजले कि हे गुलमोहराच्या झाडाचे फळ आहे आशाच प्रारचे कदंबाला सुध्दा फुल फळ येते

प्रचि १४..

         

    

पुढचे ठिकाण होते सोमाटणे टोल नाक्याला लागूनच असलेले एक जैन मंदीर..... या बद्दल काही जास्त माहीती मिळाली नाही. पण मंदीर पाहण्यासारखे आहे. संपूर्ण संगमरवरामध्ये बांधाण्यात आलेले आहे.... येथील शांतता मनाला अगदी सुखवते.............

प्रचि १५......१६..



इथून निघालो ते सरळ कार्ला लेणी .. अर्थात एकवीरा देवीचे दर्शनाला .... डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो पण तिथे खालीच समजले की, गाडी वरती जाणार नाही.... त्यामुळे आत्ता पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.... आता महीलामंडळ कसे जाणार हा प्रश्न होता पण सगळे एकदम-पटापट डोंगरावर चढले.... वाट तशी सोपी आहे...वाटेवर झाडांची संख्या भरपूर असल्यामुळे उन लागत नाही त्यामुळे चढायला जास्त त्रास होत नाही. प्रथम देवीचे दर्शन ......

प्रचि १७..

         
    

प्रचि १८.. देवीच्या मंदीरामध्ये एका दारावर लाकडावर करण्यात आलेले अप्रतिम नक्षीकाम

           

मग कार्ला लेण्याचा परिसर या बद्दल काही सांगण्यासारखे नाही ..कारण हा फोटो पाहीला की मराठी शाळेतले इतिहासाचे पुस्तक आठवते लेणी अतिशय सुंदर असून फक्त एकच प्रश्न सतत सतावतो कि हे कसे तयार करण्यात आले आसेल..........

प्रचि १९..

    

प्रचि २०..

प्रचि २१..

प्रचि.२२..

प्रचि..२३..

प्रचि..२४..

प्रचि..२५..

प्रचि..२६..

प्रचि..२७..

प्रचि..२८..

प्रचि..२९..

प्रचि..३०..

प्रचि..३१..

प्रचि..३२..

प्रचि..३३..

प्रचि..३४..

प्रचि..३५..

प्रचि..३६..

प्रचि..३७..

प्रचि..३८..

प्रचि..३९..

प्रचि..४०..

प्रचि..४१..

        

प्रतिक्रिया

चष्मेबद्दूर's picture

26 Feb 2017 - 5:51 pm | चष्मेबद्दूर

चित्र क्रमांक ३० , ३२ मधील पायर्या कुठे जातात? त्याचा फोटो नाही का?

प्रचेतस's picture

27 Feb 2017 - 11:04 am | प्रचेतस

तिथल्या तीमजली विहाराच्या दुसर्‍या मजल्यावर. (प्रचि. ३१ पहा).

तिथल्या उजवीकडील एका शयनकक्षाच्या चैत्यकमानीच्या वरील बाजूस एक शिलालेख आहे.

कपिलमुनी's picture

27 Feb 2017 - 1:31 pm | कपिलमुनी

ही मावळ भटकंती आहे.

सत्याचे प्रयोग's picture

28 Feb 2017 - 8:25 pm | सत्याचे प्रयोग

एक सुधारणा सांगू इच्छितो मंदीराची स्थापना श्री.प्रकाश केशवराव देबोले हे नसून ' देवळे ' असे आहे. तसेच हे मंदिर मुंबई -बेंगलोर हायवेवर नसून मुंबई - पुणे हायवेपासून २ किमी वर आहे. मुंबई -बेंगलोर हायवे सोमाटणे फाट्याच्या पुढे पुण्याच्या दिशेने ३ किमी चालू होतो. बाकी फोटो छान आलेत .

सविता००१'s picture

4 Mar 2017 - 8:31 am | सविता००१

झकास आहेत