ख्ररी गुडीशेव डाळीचे (बेसन)पिठ आणि गुळापासून बनवतात.
पण आजकालच्या भेसळीच्या दिवसांत त्यातही साखर (व / किंवा) मक्याचे पिठही मिसळतात.
अवांतरः कोणि (कोणी) मला सांगु(सांगू) शकेल का कि (की)'गुडिशेव ' (गुडीशेव )कशापासुन बनवतात? साखर कि(की)गुळ??
ताई, मला पाकक्रुती येत नाही. पण मी अनेक यात्रांमध्ये गुडीशेव खाल्ली आहे. मी ती भेसळ आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. भेसळीची गुडीशेव सध्या रू. १०/- पावशेर आहे आणि पिवर रू. १५ ला पाव आहे.
सटाण्याला (ता. बागलाण, जि. नाशिक) देव मामलेदार यशवंतराव चव्हाण महाराजांची मोठी यात्रा भरते. लहान असतांना तेथे खाल्लेली गुडीशेव अजुन आठवते. पुर्वी गुडीशेव आणि रेवडी हाच खाऊ असायचा. यात्रेत मोठ्या कुस्त्या लावण्याआधी आम्हा लहान मुलांच्या कुस्त्या खेळवीत. त्यात बक्षीस म्हणून गुडीशेवेचा पुडा देत. मजा येई.
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण की भोसेकर कि कुलकर्णी? यांचे एक वंशज माझे स्नेहि आहेत, आणि त्यांचे आडनाव भोसेकर आहे म्हणुन विचारले.. यांच गंगा घाटावर एक मंदीर आहे....
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण हे भोसेकर. इंग्रजांच्या काळात सटाणा प्रांती ते मामलेदार होते. दुष्काळात त्यांनी धान्याचे कोठार गरीबांसाठी खुले केले होते. नंतर सरकार ने चौकशी केल्यावर ते जसेच्या तसे भरलेले आढळले. ते सटाण्याचेच "उपासनी महाराज", साईबाबा, गजानन महाराज यांचे समकालीन होत. त्यांच्या गाठीभेटी होत असत हे उल्लेख येतात.
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण यांची समाधी नाशिक येथे गोदावरी घाटावर आहे. तेथे पण मंदिर आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध नाही.
जय हरी विठ्ठल !!
अवांतर : "जत्रा म्हणायचं आहे का? कारण जत्रा भरते.. आणि यात्रेला लोकं जातात."
देवाची भरते ती यात्रा आणि तमाशाची जत्रा (मौज्-मजा). आम्ही यात्रेला जायचो. (उदा. पंढरपूरची यात्रा आदी.)
-( सणकी )पाषाणभेद
प्रतिक्रिया
16 Feb 2009 - 5:20 pm | पाषाणभेद

जुन्या आठवणींना उजाळा देवू दिल्याबद्द्ल धन्यवाद.
-( ग्रामीण वातावरण प्रेमी सणकी )पाषाणभेद
16 Feb 2009 - 8:20 pm | प्राजु
यात्रा की जत्रा?
जत्रा म्हणायचं आहे का? कारण जत्रा भरते.. आणि यात्रेला लोकं जातात. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Feb 2009 - 7:12 am | त्रास
असे पदार्थ पुर्वी देवीच्या "यात्रेत" मिळायचे. (त्याला देवीची जत्रा असे कुणी म्हणत नसत).
16 Feb 2009 - 5:39 pm | मि माझी
धन्यवाद..
16 Feb 2009 - 8:38 pm | शैलेन्द्र
" देव मामलेदार यशवंतराव चव्हाण""
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण की भोसेकर कि कुलकर्णी? यांचे एक वंशज माझे स्नेहि आहेत, आणि त्यांचे आडनाव भोसेकर आहे म्हणुन विचारले.. यांच गंगा घाटावर एक मंदीर आहे....
17 Feb 2009 - 7:16 am | सुनील
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण ???
आपले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Feb 2009 - 7:06 am | त्रास
गुडीशेव यात्रेत बरयाचदा खाल्ली आहे. आता घरीच करुन खाल्ली तर बरे. बाहेर मिळणार्या शेवेत वाट्टेल ते रंग मिसले तर नाहे ना हे पहायला हवे.
17 Feb 2009 - 7:08 am | मराठी_माणूस
ह्या वरुन जत्रेत मिळणारा अजुन एक जुना पदार्थ आठवला, गुडदाणि
17 Feb 2009 - 12:03 pm | पाषाणभेद
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण हे भोसेकर. इंग्रजांच्या काळात सटाणा प्रांती ते मामलेदार होते. दुष्काळात त्यांनी धान्याचे कोठार गरीबांसाठी खुले केले होते. नंतर सरकार ने चौकशी केल्यावर ते जसेच्या तसे भरलेले आढळले. ते सटाण्याचेच "उपासनी महाराज", साईबाबा, गजानन महाराज यांचे समकालीन होत. त्यांच्या गाठीभेटी होत असत हे उल्लेख येतात.
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण यांची समाधी नाशिक येथे गोदावरी घाटावर आहे. तेथे पण मंदिर आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध नाही.
जय हरी विठ्ठल !!
अवांतर : "जत्रा म्हणायचं आहे का? कारण जत्रा भरते.. आणि यात्रेला लोकं जातात."
देवाची भरते ती यात्रा आणि तमाशाची जत्रा (मौज्-मजा). आम्ही यात्रेला जायचो. (उदा. पंढरपूरची यात्रा आदी.)
-( सणकी )पाषाणभेद
6 Feb 2017 - 9:21 pm | आदूबाळ
हे देवमामलेदार प्रकरण काय आहे?
6 Feb 2017 - 8:39 pm | Vishvnath Shelar
Ghoti mde kadhihi yaa & Radheshyam Farsaan Madhe Atishay changli Gudishev bhetel....
6 Feb 2017 - 9:10 pm | Ranapratap
ताई या मंचारला 12 महिने गुडी शेव मिळते. अन ती ही भेसळ मुक्त.