चीझी ग्रिल्ड पोटॅटो

आनंदी गोपाळ's picture
आनंदी गोपाळ in पाककृती
26 Jan 2017 - 8:23 pm

विनाकटकटीचा झटपट ब्रेकफास्ट.

साहित्य

मध्यम आकाराचा बटाटा : १ स्वच्छ धुवून सालासकट.
अर्धी चीज स्लाईस, किंवा तुमच्या आवडीचे चीज.
मिरपूड, मीठ, थोडे तेल.

क्रमवार कृती

बटाट्याला सुमारे अर्धा पाऊण सेमी जाडीचे काप द्यावेत. चकत्या वेगळ्या करायच्या नाहीत. एका बाजूला जोडलेल्या असू देत.
त्याला ब्रशने थोडे तेल लावून मायक्रोवेव्हमधे ३.३० मिनिटे हाय पॉवरवर ठेवावे.

त्यानंतर सुमारे ४-५ मिनिटांनी बटाट्याच्या चकत्यांदरम्यान थोडे चीज व मीठ मिरपूड भुरभुरावी व पुन्हा ३० सेकंद मावे करावे.

असेल त्या चटणी/सॉससोबत खायला घ्यावे:

असलीच तर उसळ वगैरेसुद्धा सोबत छान लागते.

अधिक टीपा:

स्मोकी फ्लेवर हवा असल्यास चीज भरण्याआधी बटाटा डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर एखादा मिनिट धरावा.
ओव्हनमधून बाहेर काढल्यानंतर ४-५ मिनिटे रेस्टींग टाईम देणे गरजेचे असते, अन्यथा पदार्थ कचवट राहतो.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

26 Jan 2017 - 8:30 pm | पिलीयन रायडर

अरे देवा..... का उघडला हा धागा.....

तुषार काळभोर's picture

26 Jan 2017 - 8:36 pm | तुषार काळभोर

एकदम युरोपियन ब्रेकफास्ट केल्यागत दिसतोय.

ब्यान करा हो ह्या व्यक्तीला मिपावरुन!

आदूबाळ's picture

26 Jan 2017 - 9:33 pm | आदूबाळ

या बात! जॅकेट पोटॅटोचा कापवाला भाऊ दिसतोय!

आनंदी गोपाळ's picture

26 Jan 2017 - 9:35 pm | आनंदी गोपाळ

अस्सल सिग्न्रेचर मिपा प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

मी सध्या डिस्कवरी ऑफ बटाटा स्टेजमधून जातोय.

बटाटा शक्यतो सालासकट खावा. त्यात सोल्यूबल फायबरचे प्रमाण भरपूर असते. बाकी न्यूट्रीयंट्सही बरेच आहेत. युरोप्/अमेरिकेत बटाटा जेवणातला स्टार्च म्हणून खातात. आपण स्टार्ची बटाट्याची भाजी करून ती स्टार्चि पोळीसोबत खातो, मग भातावरही तेच घेतो. हे जरा चुकीचे आहे. एकंदरितच भारतीय जेवणात कार्ब्स फारच जास्त असतात. कदाचित ते आपल्या जीन्स/ हवामानाला चांगले असेलही, पण सोबत आपल्याला हृदयरोग व डायबेटीसही जेनेटीकली आंदण मिळालेले आहेच. (मधुमेह ५ हजार वर्षांपूर्वी डिफाईन करणारे लोक आहोत आपण!)

तेव्हा लोकहो, तुम्हीही बटाटा विषयावर वाचन्/चर्वण करा, अन अनुभव सांगा.

मी कार्ब्सबद्दल विचारायलाच आले होते. दिवसाच्या सुरुवातीला ब्रेफा मध्ये कार्ब्स खाणं हे दिवसाच्या मध्यात (दुपारचं जेवण/ संध्याकाळचं स्नॅक) वा शेवटाला (रात्रीचं जेवण वगैरे) खाण्यापेक्षा कमी धोकादायक आहे का? आणि उकडलेला बटाटा हा तळलेल्या बटाट्यापेक्षा बरा का?

आनंदी गोपाळ's picture

26 Jan 2017 - 9:54 pm | आनंदी गोपाळ

प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स. क्षार. हे सगळे आवश्यकच आहेत.

एसेन्शिअल फॅटी-अ‍ॅसिड्सही हवेतच. तेलतूपही पूर्ण बंद करून चालत नाहीच. कार्ब्स इन्स्टन्ट एनर्जीसाठी. जितकी लवकर हवी तितके सिंपल कार्ब्ज. ग्लुकोज सगळ्यात फास्ट. सेल्युलोज कार्बोहायड्रेट असलं तरी आपल्याला पचतच नाही. एनर्जी साठी कार्ब्ज हवेत. ते नसतील तर नॉर्मली फॅट वापरले जाते, अन स्ट्रेस असेल, तर तुमचे स्नायू उर्फ प्रोटीन तोडून शरीर एनर्जी मिळवते.

एका जेवणात आदकोर फॅट्स, चतकोर प्रोटीन, दीड चतकोर कार्ब्ज, व उरलेले भाज्या/कोशिंबिरी. असा सिंपल हिशोब आहे.

याशिवाय दिवसातून २०-२५ मिनिटे मॉडरेट फिजिकल अ‍ॅक्टिविटी. (अठवड्याला १५० मिनिटे रेकमेंडेड डोस ऑफ व्यायाम आहे) प्लस अठवड्यातून २ दिवस रेझिस्टन्स एक्सरसाईज १५-२० मिनिट.

घरी तळलेला बटाटा चांगला. अन्यथा उकडून खावा. अधूनमधून सणावारी तळण केलेच पाहिजे ;)

कमर्शियल तळणात, फॅट वारंवार गरम करून त्यात जे केमिकल बदल होतात, ते धोकादायक असतात असे संशोधनांतून सिद्ध झालेले आहे. तस्मात रेडीमेड चिप्स इत्यादि वाईट. शिवाय त्यात अती मीठ असते. ते ब्लड प्रेशरसाठी वाईट.

विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद.

अधूनमधून सणावारी तळण केलेच पाहिजे ;)

हे शाब्बास! हे बेष्ट आहे!

हेच लिहिणार होते. ते वाक्य जाम आवडलंय आणि फॉलोही करण्यात येतं :)

एका जेवणात आदकोर फॅट्स, चतकोर प्रोटीन, दीड चतकोर कार्ब्ज, व उरलेले भाज्या/कोशिंबिरी. असा सिंपल हिशोब आहे.

भारीच!

त्रिवेणी's picture

28 Jan 2017 - 8:46 pm | त्रिवेणी

हे रोजच्या जेवणाचे उदाहरण देऊन सांगु शकाल का? म्हणजे भाजी, पोळी वैगरे.

त्रिवेणी's picture

28 Jan 2017 - 8:46 pm | त्रिवेणी

हे रोजच्या जेवणाचे उदाहरण देऊन सांगु शकाल का? म्हणजे भाजी, पोळी वैगरे.

त्रिवेणी's picture

28 Jan 2017 - 8:46 pm | त्रिवेणी

हे रोजच्या जेवणाचे उदाहरण देऊन सांगु शकाल का? म्हणजे भाजी, पोळी वैगरे.

त्रिवेणी's picture

28 Jan 2017 - 8:46 pm | त्रिवेणी

हे रोजच्या जेवणाचे उदाहरण देऊन सांगु शकाल का? म्हणजे भाजी, पोळी वैगरे.

फोटू एकदम रंगीबेरंगी व मस्त आलाय.

अनन्त अवधुत's picture

27 Jan 2017 - 3:25 am | अनन्त अवधुत

.

मदनबाण's picture

27 Jan 2017 - 5:23 am | मदनबाण

वाह्ह....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

फेदरवेट साहेब's picture

27 Jan 2017 - 1:53 pm | फेदरवेट साहेब

ब्लायमी! टुमी इंग्लंडचा आठवण करून दिला डॉक्टर!

(शायरच्या आठवणीत ऍक्सेन्टेड शायर झालेला) फेवेसा.

एस's picture

27 Jan 2017 - 6:51 pm | एस

अत्याचार!!!!

nanaba's picture

28 Jan 2017 - 12:51 pm | nanaba

Tried it.. everyone loved it! Thanks!
I would add butter next time..

पैसा's picture

28 Jan 2017 - 1:06 pm | पैसा

पाकृ आणि डॉक्टरांच्या अन्य प्रतिक्रिया सुद्धा अतिशय आवडल्या आहेत! गिल्ट जरा कमी होईल, यू नो! ;)

कमी वेळेत, तोंपासु पदार्थ! छान झालेले हे बटाटे.
धन्यवाद!

राही's picture

30 Jan 2017 - 11:49 am | राही

बटाटे वर कृतीत लिहिल्याप्रमाणे मावे केले. खूप वेळ लागला. बटाटा एवढा काही रवाळ खुसखुशीत झाला नाही. 'ग्रिल' ऑप्शन निवडायला हवे होते का?

आनंदी गोपाळ's picture

31 Jan 2017 - 10:03 pm | आनंदी गोपाळ

मायक्रोवेव्ह पॉवर किती होती? कोणता मायक्रोवेव्ह होता?
मी ग्रिल नव्हे. प्लेन मावे मोडात केले आहेत.

nanaba's picture

7 Feb 2017 - 12:15 am | nanaba

Jabara fan zalay hya padarthacha...