मिसळपाववर सतत चांगले लेखन येत असते. एखादा लेख पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो अश्यावेळी त्यालेखाची वाचणखूण आपण साठवून ठेवू शकतो आणि नंतर हव्या तेवढ्यावेळ तो लेख वाचू शकतो. आणि आपल्या सर्व वाचणखूणा एका जागेवर सूचीबध्द केलेल्या सापडतात. त्यामुळे वाचकांसाठी ही एक उत्तम सोय आहे.
वाचनखूण साठवण्यासाठी आपल्याला हव्या त्या लेखावर/साहित्यावर जावे आणि लेखाच्या शेवटी खाली वाचनखून साठवा असा दूवा दिसेल. त्यावर टिचकी मारल्यास तो लेख तुमच्या वाचणखूणांच्या यादीत समाविष्ट झालेला असेल. असे झाल्याची सूचना त्याच जागेवर दिसेल.
एखादी वाचणखूण काढायची असेल तर त्याच पानावर जाऊन वाचणखूण काढा या दूव्यावर टिचकी मारा.
ह्या सर्व वाचनखूणा पुन्हा बघायच्या असतील तर उजव्या समासात वाचणखूणा नावाचे पान आहे त्यावर गेलात की सर्व वाचणखूणा एकत्र दिसतील. ह्या वाचनखूणा तुम्ही इतरांना सुध्दा दाखवू शकता.
(टीप : ही सुविधा लवकर सदस्यांना दिल्या जाईल. ही सोय सध्या चाचणी अवस्थेत आहे.)
प्रतिक्रिया
22 Feb 2011 - 6:07 pm | पाषाणभेद
ते बरेच झाले, पण आमच्या जुन्या वाचनखुणा परत मिळतील का?
23 Feb 2011 - 10:02 am | प्राजु
हेच.. जुन्या वाचनखुणा मिळतील का परत?
23 Feb 2011 - 11:04 am | डावखुरा
+१
22 Feb 2011 - 6:23 pm | श्रावण मोडक
नंदन खुष हुवा!!!
23 Feb 2011 - 11:09 am | अवलिया
टार्या खुश हुवा!!!
23 Feb 2011 - 11:57 am | नरेशकुमार
बाब्या भी खुस हुआ.
23 Feb 2011 - 4:40 pm | टारझन
सोडा षुष्क हवा ..
22 Feb 2011 - 7:06 pm | मराठे
मला लेखाच्या खाली 'वाचनखूण साठवा' हा पर्याय दिसत नाही. लेखाच्या खाली फक्त क्ष वाचने आणि मुद्रणसुलभ आवृत्ती हे दोनच पर्याय दिसतात. त्याचप्रमाणे उजव्या समासात 'वाचनखूणा' हा पर्यायही दिसत नाही. हे बर्याच दिवसांपासून होतंय पण मला वाटलं होतं की काही तांत्रिक बदल होत असावेत.
23 Feb 2011 - 12:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काहीही चुकत नाहीये.
(टीप : ही सुविधा लवकर सदस्यांना दिल्या जाईल. ही सोय सध्या चाचणी अवस्थेत आहे.)
23 Feb 2011 - 10:11 pm | मराठे
थांकू
20 Sep 2013 - 10:58 am | प्रमोद देर्देकर
2 Nov 2016 - 8:34 pm | कैवल्यसिंह
दिवाळी अंकातल्या वाचन-खुणा कश्या साठवाव्यात? दिवाळी अंकातल्या वाचन-खुणा साठवता येत नाहीत का??
26 Jan 2017 - 10:06 am | अदि
पण वाचन-खुणा दिसत नाही आहेत. दुसरीकडे कुठे बघू शकते का?
2 Feb 2017 - 8:02 pm | Nitin Palkar
साठवलेल्या वाचनखुणा दिसत नाहीत.
22 Feb 2017 - 11:21 pm | जिज्ञासु आनन्द
साठवलेल्या वाचनखुणा दिसत नाहीत.
24 Mar 2017 - 4:09 pm | मस्त रवि
साठ्वललेल्या वाचनखुणा दिसत नाहीयेत, क्रुपया मदत करावी.
22 Feb 2023 - 1:53 pm | Trump
नमस्कार श्री मिपाचालक्/-मालक,
प्रतिक्रिया वाचनखुण म्हणुन साठावायची सोय होऊ शकते का?
बरेचदा एखाद्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायची इच्छा असते आणि प्रतिक्रिया बघतल्यानंतर लगेच उत्तर देणे शक्य नसते.
आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा ती प्रतिक्रिया सापडत नाही.
22 Feb 2023 - 11:27 pm | चित्रगुप्त
@ ट्रंपः प्रतिसाद साठवण्यासाठी मी आत्ताच हे करून बघितले :
हवा तो प्रतिसाद उघडून त्याचे उर्ल URL (गूगल ड्राईव्हवर यासाठी 'मिसळपाव प्रतिसाद लेखनासाठी' असे एक नवे दोचुमेन्त बनवून त्यात-) चोप्य पस्ते करून ठेवले.
सध्या जोवर मिपावर ही सोय नाही तोपर्यंत हे करता येईल. बरे झाले तुम्ही विचारणा केलीत. अन्य मिपाकरांना सुद्धा याची गरज पडत असावी.
23 Feb 2023 - 6:53 am | कंजूस
वाचनखुणा साठवा'ची सोय पूर्वी होती ती मध्यंतरी संस्थळातून गायब झाली.
मी गूगल ड्राइव्हवर साठवत नाही, एका offline नोटapp मध्ये फोल्डर करून यूआरएल आणि कशाबद्दल ते( दोन चार ओळी कॉपी पेस्ट) नोंदवून ठेवतो.
ती खूण नंतर सापडत नाही . . .
दुसऱ्या एका ब्राऊझरमध्ये ती टाकल्यास 'login to reply' दिसेल तेव्हा लॉगिन केल्यावर तो पूर्ण लेख उघडेल परंतू त्याच प्रतिसादावर उघडणार नाही. परंतू प्रथम मिपावर लॉगिन करून नंतर ब्राऊझरमध्ये लिंक टाकल्यास बरोबर त्याच अपेक्षित प्रतिसादावर साईट उघडते.