नमस्कार मंडळी,
आज मी बर्याच दिवसांनी आपल्या भेटीला येते आहे.. नवीन पाकॄ घेउन ..गोड मानुन घेणे.....तिखट पाकॄ असल्याने..तिखट मानुन घेणे असे म्हणता येइल का ? ;-)
मेथी ही पालेभाज्यांच्या परिवारातली अतिशय गुणी भाजी...जास्तित जास्त लोकांना आवडणारी....आणि तिचे प्रकार तरी किती असावेत...
मेथी मटर मलाई असो....डाळ मेथी असो...मेथीचे ठेपले असोत..किंवा..अगदी साधी..पीठ पेरलेली मेथी असो.....मस्तच लागते....
आज मी आणल्यात मेथी वड्या..सणासुदीला पानची डावी बाजु सजवायला आपण भजी,अळु वडी,सुरळी वडी ई.ई. बनवतो....या मेथी वड्या साईड डिश म्हणुन पण मस्त लागतात आणि नुसत्या खायला पण छानच लागतात....नक्की करुन पाहा...
साहित्यः
बारीक चिरलेली मेथी २ वाट्या, डाळीचे पीठ/थालीपीट भाजणी,तांदुळ पीठ,
लसुण (ऐच्छिक),२-३ हिरव्या मिरच्या,लाल तिखट,मीठ,भाजलेले तीळ (ऐच्छिक),तेल.
कॄती:
मेथी मद्धे मावेल ईतके डाळीचे पीठ (यात थोडे तांदुळ पीठ किंवा थालीपीटाची भाजाणी पण घालु शकतो...)घालणे,त्यात ठेचलेली लसुणमिरची,मीठ,थोडे तेल,तिखट,मीठ,तीळ घालणे.
लागेल तसे पाणी घालुन घट्ट गोळा मळणे.मेथीला पाणी सुटते..त्यामुळे अंदाज घेउन पाणी घालावे.मेथी च्या या गोळ्याचे कोथींबीर वडीला करतो तसे रोल करुन घेणे...एका पातेल्यात पाणी उकळणे..स्टील च्या चाळणीला तेलाचा हात लावुन त्यावर मेथी रोल ठेवणे... ही चाळणी पातेल्यावर ठेवुन रोल वाफवुन घेणे....अथवा कुकर मधे वाफवणे..
रोल नीट वाफवुन गार झाल्यावर त्याच्या पातळ वड्या कापणे...
तेलात खरपुस तळुन घेणे अथवा.. नॉन स्टिक तव्यावर थोड्या तेलात कुरकुरीत परतुन घेणे...
झटपट मेथी वड्या तय्यार आहेत
प्रतिक्रिया
15 Feb 2009 - 12:07 pm | अवलिया
वा!!
--अवलिया
15 Feb 2009 - 12:30 pm | विसोबा खेचर
मरणशय्येवर सुखाने विसावलो.. संपलो...!
तात्या.
15 Feb 2009 - 12:36 pm | मितालि
मेथी ऐवजी कोथिम्बीर घालुन बनवाल तर अजुन छान लागतात !!! :-)
15 Feb 2009 - 12:36 pm | मितालि
मेथी ऐवजी कोथिम्बीर घालुन बनवाल तर अजुन छान लागतात !!! :-)
15 Feb 2009 - 11:08 pm | प्रभाकर पेठकर
पण त्याला 'मेथी वड्या' म्हणता येणार नाही.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
15 Feb 2009 - 4:34 pm | सहज
सुंदर पाकृ. मेथीवड्यांचे फोटो पाहुन भुक अजुनच खवळली.
धन्यु!
15 Feb 2009 - 5:51 pm | रेवती
मस्त पाककृती!
करून बघीन. फोटू छानच!
अश्याच पद्धतीने कोथंबीरीच्या व कोबीच्या वड्याही करता येतात.
रेवती
15 Feb 2009 - 7:35 pm | चकली
छान पाकृ. आणि क्रमवार फोटोपण मस्त.
चकली
http://chakali.blogspot.com
15 Feb 2009 - 7:43 pm | यशोधरा
मस्त! मस्त!! मस्त!!!
सह्ही फोटो!
15 Feb 2009 - 9:51 pm | प्राजु
कोबी, कोथिंबीर, दूधी भोपळा (किसून पाणी काढून टाकावे लागते) यांच्या करते.
आता मेथीच्या करून बघेन.
मस्त फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Feb 2009 - 11:10 pm | प्रभाकर पेठकर
कोबी, कोथिंबीर, दूधी भोपळा (किसून पाणी काढून टाकावे लागते) यांच्या करते.
एकत्र की वेगवेगळ्या?
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
16 Feb 2009 - 12:15 am | प्राजु
एकत्र की वेगवेगळ्या?
नाही हो काका. एकत्र नव्हे, वेगवेगळ्याच. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Feb 2009 - 11:15 am | स्मिता श्रीपाद
तुम्हा सगळ्यांचे प्रतिक्रियांबद्दल आभार... :-)
मेथी ऐवजी कोथिम्बीर घालुन बनवाल तर अजुन छान लागतात !!!
मिताली, कोथिंबीर वड्या आपण नेहेमिच करतो ना...म्हणुन मेथी वापरुन केल्या.... :-)
पण त्याला 'मेथी वड्या' म्हणता येणार नाही.
हेच म्हणते :-)
प्राजु,
दुधी भोपळ्या च्या वड्या कधीच करुन पाहिल्या नाहीत मी
आता करुन पहीन...
-स्मिता श्रीपाद
16 Feb 2009 - 11:33 am | मितालि
अग माझी आई बनवते ना त्या कोथिम्बिर वड्या अश्याच सेम दिसतात... खुप छान बनवल्या आहेस तू ..
मेथी नाही ना आवड्त मला... :-) अशा बनवुन बघते जमते का मेथि खायला..
16 Feb 2009 - 12:03 pm | विवेक
आवद्ल्या तुम्चया मेथीवड्यांचे
16 Feb 2009 - 10:17 pm | फक्त_ मोक्श
वड्या आवड्त्या माझ्या! छान पाकृ. आणि फोटोपण मस्त! पालक वाप रुन पन मस्त लागतिल ना! माझी आई चणाडाळ भिज वुन वाटुन त्यात ओवा, तीळ, चिन्च गुळ घालुन खमंग वड्या करते, खरच! आठवण करुन दिल्या तिच्या वड्यांचि .! पाकृ ब द्द्ल धन्यवाद!
17 Feb 2009 - 12:01 am | हरकाम्या
अतिशय छान वाट्तात ( चित्रात बघुन ) एकदा करुन बघतो मग खरी प्रतिक्रिया देईन .