कसला व्हॅलंटाईन डे...?

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
14 Feb 2009 - 11:47 pm
गाभा: 

आहो...

इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही.

आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते.

जे लोकं प्रेमात आहेत (म्हणजे ज्यांचे प्रेमप्रकरण चालू आहे) त्यांना तर आजचा दिवस म्हणजे "सोनियाचा दिन"" असेच वागत असतात. (आणि गंमत म्हणजे बरोबर ९ महिन्यांनी बाल दिन (children's day)).

एवढ्याच उत्साहात आपण दसरा, संक्रात साजरा करतो का? हाच प्रश्न सात च्या आत घरात ह्या चित्रपटात विचारला होता. बाकी जाऊद्या हो. खरी व्हॅलंटाईन डे ची कहाणी अशी आहे...(एका इ-पत्रकाद्वारे मला कळली)..थोडक्यात सांगतो..

पुर्वी गुजरात मध्ये बायकांना त्यांचे नवरे चांगली वागणूक देत नसत. म्हणून एका त्रासलेल्या बायकोने आपल्या नवर्‍याला ह्या सुदिनी बेलन (लाटणे) घेऊन बदडले. हि गोष्ट बघता बघता सगळीकडे पसरली. सर्व गुज्जू बायकांना हा प्रकार खुपच आवडला आणि त्यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस ह्या प्रकारासाठी निश्चित केला. ह्या दिवसाला "बेलन टाईम डे" म्हणजेच नवर्‍याला लाटणे-प्रसाद देण्याचा काळ असे नामकरण करण्यात आले. अर्थात ह्या गोष्टीची त्यांच्या नवर्‍यांना कुणकूण लागली होती. बायकोने आपल्याला बेलनने लाटू नये म्हणून नवरोबांनी त्यांना खुष करण्यासाठी भेटवस्तू आणण्यास सुरूवात केली. आणि बघता बघता ह्या "बेलन टाईम डे" चा "व्हॅलंटाईन डे" होऊन गेला.

लगेच आपल्या लोकांनी त्या संत व्हॅलंटाईन चा संबंध येथे जोडून टाकला आणि लगेच काही राजकिय पक्षांना विरोध करायला निमित्त सापडले.

अजून एक कहाणी अशी आहे..जेव्हा प्रभू रामचंद्राने सीतामाईची अग्निपरीक्षा केली, त्यावेळी वरून (म्हणजे आकाशातून) बघण्यार्‍या पार्वतीमातेचा राग अनावर झाला. नवर्‍याने केलेल्या चुकीची शिक्षा बायकोने भोगली आणि वर नवरा तिलाच सांगतोय की अग्निपरीक्षा दे. त्या काळी स्त्रीया शस्त्र चालवण्यात पारंगत नसाव्यात. फक्त रथ आणि तोंड चालवण्यात त्यांना पी.एच. डी. मिळायची (आठवा कैकेयी ....) . म्हणून तेव्हा पार्वतीमातेने आपल्या नवर्‍याकडूनच एक प्रभावी शस्त्र वरदान म्हणून घेतले. तेच हे बेलन ..... चालवण्यास सोपे..वापरण्याआधी आकाशात बघून कोठलाही मंत्र म्हणायची जरूरी नाही... हलके..धनूष्यासारखे जड तर मुळीच नाही...म्हणूनच हे बेलन खुपच प्रसिद्ध झाले. भोळ्या शिवाकडून ज्या दिवशी वरदान मिळाले तोच हा सुदिन..

आता ह्यातली नक्की खरी कहाणी कोठली ते मला ठावूक नाही.. (चाल : ठावूक नाही मजकाही..ठावूक आहे का तुजकाही..). पण भारतीय खरा इतिहास आपल्यासमोर कधीच आला नसल्याने आणि आपल्या कायम पश्चिमात्त संस्क्रुतीच्या उद्दात्तिकरण करण्याच्या धोरणामुळे मला आता काही खास वाटत नाही. काही का निमित्त असेना..करूया व्हॅलंटाईन डे..

कदाचित मी हि खरी बेलन कहाणी इथे सांगायला नको होती..मि.पा.च्या जावयांचे मला शिव्याशाप येण्याची शकत्या आहे.

तेव्हा असण्यार्‍या आणि होण्यार्‍या नवरोबांनो..ह्या दिवसाचे महत्व लक्षात घ्या..आणि आपापल्या प्रियतमेला खुष ठेवा..

खादाडमाऊ

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

15 Feb 2009 - 3:51 am | विंजिनेर

म्हणून तेव्हा पार्वतीमातेने आपल्या नवर्‍याकडूनच एक प्रभावी शस्त्र वरदान म्हणून घेतले. तेच हे बेलन .....

हिंदीतल्या बेलनला संस्कृतमधे काय म्हणतात कोण जाणे पण मला एव्हढे दिवस वाटायचे की सौ.पार्वतीची सेकण्ड लँग्वेज नेपाळी नाहीतर चिनी असणार(उंच कैलासातल्या घरात शेर्पाशिवाय दुसरं कोण जाणार गडी म्हणून? :))पण ती(आणि श्री. शंकर) अधूनमधून हिंदीत बातचीत करायचे हे एकून अंमळ मजा वाटली.

प्राजु's picture

15 Feb 2009 - 4:01 am | प्राजु

ते एकदम मजेदार आहे.
संकल्पना मस्तच आहे "बेलन टाईम डे",
काय हरकत आहे ..! आपल्याला पटतील अशाच गोष्टी कराव्यात आणि मान्याव्यात. व्हॅलेंटाईन आमचा नाही पण बेलनटाइम आहे.. व्वा! मस्तच..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

15 Feb 2009 - 4:33 am | विकास

>>>इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही. आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते.

हे इतर अनेक "डे"ज संदर्भात पटते पण व्हॅलेंटाईन डेचे किमान अमेरिकेत तरी व्यवस्थित "मार्केटींग" केले आहे. आपण कोठे राहता कल्पना नाही पण अगदी येथे लोकांच्या अनुदानावर चालणार्‍या स्थानीक पब्लीक रेडीओवर तर आमच्याकडून anti valentine day(महागात) गुलाब पाठवा म्हणून सारखे सांगण्याचा ऊत येतो.

भारतात अतिरेक दोन्ही बाजूने होतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण परवा एक मजेदार संवाद अनुभवला. ऑफिसातील एका (गोर्‍या अमेरिकन) सहकारी स्त्रीस सहज जाता जाता वीकेंन्डला काय प्लॅन असे विचारले. तेंव्हा व्हॅलेंटाईन डे शनीवारी आहे हे डोक्यातपण नव्हते फक्त प्रेसिडंट डे मुळे लाँगविकेन्ड हा संदर्भ होता. तर तिच्या कडून उत्तर आले की आम्ही शुक्रवारी anti valentine day साजरा करणार आहोत. म्हणले का? तर सोपे उत्तर मिळाले की नको इतके मार्केटींग आणि हा जर "प्रेम दिवस" म्हणून साजरा करायचा तर इतर काय "हेट दिवस"का? लगेच वाटले की हीला बंगलोरला पाठवायला हवे ;)

योगी९००'s picture

15 Feb 2009 - 11:52 am | योगी९००

नको इतके मार्केटींग आणि हा जर "प्रेम दिवस" म्हणून साजरा करायचा तर इतर काय "हेट दिवस"का?
हे अगदी बरोबर..

खादाडमाऊ

ऍडीजोशी's picture

17 Feb 2009 - 8:24 pm | ऍडीजोशी (not verified)

पाठव पाठव :)

तिमा's picture

15 Feb 2009 - 10:56 am | तिमा

व्हॅलेंटाईन डे साजरा करणे हे बरोबर का चूक हा मुद्दा नाहीये. आपल्या देशांत लोकशाही आहे. त्यामुळे अशी कोणावर जबरदस्ती करणे चुकीचे आहे. या प्रकारांकडे दुर्लक्ष करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. बाकी बेलन डे चा कल्पनाविलास आवडला.
टीपः माझा एक मित्र याला "हलवेंटाइन डे" असे म्हणतो.

वर्षा म्हसकर-नायर's picture

15 Feb 2009 - 1:09 pm | वर्षा म्हसकर-नायर

मला कल्पना भारी आवडली, बेलनटाईम डे!!! शॉलीड बॉस !!!! ;)
आणि पार्वती देवींची कहाणी तर टू गुड :)

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 1:32 pm | विनायक प्रभू

'आपापल्या प्रियतमेला खुष ठेवा.'
ते कसे काय बॉ?
किती कठीण काम सांगत आहात.

योगी९००'s picture

15 Feb 2009 - 2:07 pm | योगी९००

वि.प्र.

आता ते मी तरी कसे सांगू..? मुड सांभाळणे ..तो ही कसा..? हा एक वेगळाच विषय होईल.
कदचित आपल्या अनुभवाचा फायदा होईल असे वाटते. आपण लिहाच असा एक लेख.

खादाडमाऊ

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 2:16 pm | विनायक प्रभू

कसला फत्र्याचा अनुभव. हीट अँड मिस धर्तीवर असते. कधी सेंचुरी कधी झीरो.

आपलाभाउ's picture

15 Feb 2009 - 2:33 pm | आपलाभाउ

प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त दिवस कोन्ताहि असो..................प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त

योगी९००'s picture

15 Feb 2009 - 2:38 pm | योगी९००

इतक्या वेळा हि गोष्ट लिहीली की " प्रेम असतं ऐवजी प्रेम अस्त पावलं"
खादाडमाऊ

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 2:58 pm | विसोबा खेचर

बेलनटाईम डे मस्त! :)

chipatakhdumdum's picture

15 Feb 2009 - 4:08 pm | chipatakhdumdum

लागोपाठ तीन वर्ष एकाच पोरीबरोबर वाळणताइ दिवस साजरा करणार्या पोराला आणि पोराबरोबर साजर्या करणार्या पोरीला शोधुन दाखवा.....वाटेल ते हरतो..