उपकरण : एअर फ्रायर
कृती :
फलाफलचे रेडीमिक्स विकत आणावे. वेष्टणावर दिलेल्या प्रमाणात रेडीमिक्स मध्ये पाणी घालून मळावे. त्याचे छोटे गोळे करून टिक्की सारखा आकार द्यावा. खरंतर फलाफल साधारणतः गोल छोट्या चेंडू सारखे असतात परंतु एअर फ्रायरच्या सोइ साठी टिक्कीचा आकार दिला.
फलाफल तेलात न तळता हवेवर तळावेत ( कि हवावेत? ). या फलाफल टिक्क्या एअर फ्रायर मध्ये ठेवून ऑलिव्ह ऑइलचा ईस्प्रे मारावा आणि २० मिनिटे एका बाजूने तर १५ ते १८ मिनिटे दुसऱ्या बाजूने तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत टाळावेत. फलाफलला तळायला ( कि हवायला ? ) जास्त वेळ लागतो असा अणभव आहे.
फलाफल आतून सॉफ्ट परंतु बाहेरून अतिशय क्रिस्पी होतात.
या बरोबर त्झाटझीकी, त्झातझिकी, त्झाट्झकी, झाझीकी, सासिकी, छाचिकी, चाचीक्की - enough of it - Tzatziki सॉस असेल तर उत्तमच (आम्ही याला "झकाझकी" सॉस म्हणतो).
झकाझकी सॉस नसेल तर हमूस, हामूस, हुम्मुस, हमस, हमास, हंमास, हम्मस, हंम्मस, who-moss, hum-moose, hum-oose, homos, hamas, hoommos, hummoos, home'-os , hum-mos - enough of it again - Hummus डीप देखील चालेल (याला डीप म्हणावे, सॉस म्हणावे कि सरळ चटणी म्हणावे ??) .
मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि फलाफल टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा.
यथावकाश फटू येथे शेअर करावेत.
प्रतिक्रिया
14 Jan 2017 - 10:17 pm | रेवती
ही पाकृही आवडली.
15 Jan 2017 - 2:25 am | कैवल्यसिंह
मस्तय पाककृती.. पण या सोबत ते पिटा/पीटा का पिता (वडील नव्हे)/पीता आसेच त्या ब्रेडचे नाव आहे तो ब्रेड नाही का? त्या ब्रेडमधे घालून खातात न फलाफल?.... मी तर आसेच ऐकले आहे ब्वा...
15 Jan 2017 - 6:35 am | फेदरवेट साहेब
ए रेडिमिक्स मंदी काय मजा नाय चाईल्ड, आपुन अश्या रेसिपीला फाऊल समजतो. ओरिजिनल दे नी काय तर.
15 Jan 2017 - 1:31 pm | मदनबाण
वरच्या डिकरा सारखेच शेम टु शेम बोलतो ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
15 Jan 2017 - 4:41 pm | संजय क्षीरसागर
आपुन अश्या रेसिपीला फाऊल समजतो.
झकास!
17 Jan 2017 - 8:46 am | लीना कनाटा
ओपी डीक्रा,
आजकाल इन्स्टंट चा जमाना हाय नी, पोरे लोकांस्नी समदे इन्स्टंट लागतें. आन तसं बी आपुन न्यू हाय ना मिपा मंदी. शिशु शाळंचा धागा वाचला कि नाय? शिक्शान चालू हाय नि मिपा शाळं मंदी, तवा धीरे धीरे समझलच ट्रिक्स ऑफ द मिपा ट्रेड. बाकी पिंक टाकला ह्ये ब्येस क्येला, मिष्टेक तर ध्याना मंदी आली नी. आन ते दुजा बे डिक्राने तमे मंजुरी दि ना के, ते लोकांस्नी बी धन्स.
बोल्लेतो, निंदकाचे ट्रोल असावे धाग्याला ह्ये ब्येस हाय.
24 Jan 2017 - 6:33 pm | फेदरवेट साहेब
हे बरंय. मी नवी मी नवी करत दुसऱ्याला ट्रोल म्हणणे. शिशुशाळा काय आहे ते काही मी वाचलेले नाही अन तुमचे एकंदरीत ऍटीट्युड पाहून वाचायची इच्छा ही उरलेली नाही. तुमचा इन्स्टंटचा सोस तुम्हाला(च) लखलाभ.
15 Jan 2017 - 8:38 pm | सामान्य वाचक
200 ग्राम कबुली चणे रात्री भिजत घालावेत, सकाळी निथळून पाणी न घालता वाटावेत
वाटताना त्यात 1 मोठा कांदा, 6 7 लसूण पाकळ्या, घालावे
नंतर त्यात मीठ, थोडे तिखट, हवी असल्यास कोथिंबीर चिरून घालावी
बायण्डिंग साठी थोडे बेसन (गरज असेल तर)घालावे
आणि एअर फ्रायर मध्ये टिक्क्या करून तळाव्यात
झाझिकी : 1 काकडी किसून, त्यात 3 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालाव्यात आणि घट्ट दही आणि मीठ घालून मिक्स करावे
17 Jan 2017 - 8:51 am | लीना कनाटा
सावा काका,
आभार्स बर्र्का फलाफल आणि झाझिकी ची फ्रॉम स्क्रॅच पाकृ दिल्याबद्दल.
17 Jan 2017 - 1:10 pm | सामान्य वाचक
तुमच्या पाककृतीत ढवळाढवळ केल्याबद्दल
तरीपण अभार्स बद्दल आभार
29 Jan 2017 - 6:22 pm | फ्रेनी
छान आहे रेसिपी
29 Jan 2017 - 7:08 pm | संदीप डांगे
हो! सामान्य वाचक यांनी दिलेली रेसिपी छानच आहे. करण्यासारखं काहीतरी आहे त्यामुळे नक्कीच करुन बघणेत येईल.
29 Jan 2017 - 11:04 pm | रुपी
छान दिसत आहेत फलाफल.
बाकी मिपाच्या मास्टर्शेफ्सच्या फलाफल, झाझिकीच्या पाकृ हे घ्या..
झाझिकी
फलाफल शवर्मा
फलाफल सँडविच