सचिननामा-५: बोलर सचिन

फारएन्ड's picture
फारएन्ड in क्रिडा जगत
3 Jan 2017 - 8:48 am

"He is the one man you would expect to pick a wrong 'un"
इयान चॅपेल ची चपखल कॉमेण्ट - सचिन ने शेन वॉर्नला गुगली वर फसवल्यावर. सचिनचा एक जबरदस्त बोलिंग परफॉर्मन्स, २००१ च्या त्या कलकत्ता कसोटीतील. या सिरीज मधेही तो पहिल्या टेस्ट मधे मुंबईला आणि तिसर्‍या टेस्ट मधे चेन्नईला जबरदस्त खेळला होता. फक्त कलकत्याला बॅटिंग मधे अपयशी ठरला. ती उणीव त्याने चौथ्या डावात बोलिंग मधे भरून काढली. ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट्स बाकी असताना गिलख्रिस्ट, सेट झालेला हेडन आणि शेन वॉर्न तिघांना उडवून त्याने भारताला विजयाच्या दारात नेउन ठेवले. त्यातली शेन वॉर्न ची विकेट सर्वात धमाल आहे - कारण त्याने खुद्द शेन वॉर्न ला गुगली वर काढला आणि त्याला तो अजिबात समजला नाही. आधी गिल्ख्रिस्ट व हेडनला त्याने ऑफ स्पिन वर काढले होते, त्यामुळे त्याच्या स्पिन ची दिशा तीच असेल अशा अपेक्षेने वॉर्न खेळला, पण प्रत्यक्षात बॉल आत आला आणि तो एलबीडब्ल्यू झाला.

पण मला सर्वात आवडणारी त्याची विकेट म्हणजे २००४ च्या मुलतान कसोटी तिसर्‍या दिवशी शेवटच्या बॉल वर काढलेली मोईन खान ची. याच्याच आदल्या दिवशी बरेच नाट्य झाले होते. सचिन १९४ वर नाबाद असताना त्या दिवशी थोड्या ओव्हर्स टाकता याव्यात म्हणून द्रविड ने डाव घोषित केला. त्या संध्याकाळी टीम मॅनेजमेण्ट मधे बरेच काही घडले. जॉन राईट, गांगुली सकट अनेकांना वाटत होते की यातून टीम मधे दुफळी होणार. मात्र द्रविड ने सचिनशी याबाबत बोलण्याचा योग्य निर्णय घेतला व हा वाद मिटला. तरीही त्याचे पडसाद मॅच मधे उमटतात की काय अशी भीती होती. या तिसर्‍या दिवशी भारताच्या ६७५/५ ला उत्तर देताना पहिल्या डावात पाक ३४६/५ वर होते आणि मोईन खान व अब्दुल रझ्झाक खेळत होते. ते तसेच दिवसअखेर नाबाद राहिले असते तर पाक ने फॉलो ऑन कदाचित दुसर्‍या दिवशी टाळला असता. पण हा त्या दिवसाचा शेवटचा बॉल इतका भन्नाट गुगली होता की आधीच नर्व्हस असलेल्या मोईन खानला तो अजिबात झेपला नाही. त्याच्या पायांमधून तो स्टंप्स वर गेला.

इथेच सामना पुन्हा भारताच्या दिशेने फिरला. मग दुसर्‍या दिवशी इरफान पठाण व सचिन यांनी ४ ओव्हर्स मधे आणखी तीन विकेट्स उडवल्या. आणि पाकला ४०७ वर रोखले. याचा फायदा असा झाला, की भारताच्या बोलर्स ना आधीच्या रात्री विश्रांती मिळाल्यावर सकाळी खूप ओव्हर्स बोलिंग करावी लागली नाही, व द्रविड ला फॉलो ऑन देणे शक्य झाले, आणि दुसर्‍या डावात मग पाक ला लौकर उडवून भारताने मॅच जिंकली. इथे मोईन खान ला उडवल्यावर सचिन चे सेलेब्रेशन बघितले तर आदल्या रात्रीच्या वादाचे कोठेही चिन्ह दिसत नाही.

काही फॅन्सना हे लक्षात असेल की सचिनच्या वन डे मधल्या असंख्य मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड्सपैकी पहिले हे त्याच्या अष्टपैलू कामगिरीकरता होते - श्रीलंकेविरूद्ध पुण्यातील एका गेम मधे लंकेच्या टॉप ऑर्डर विकेट्स पैकी चार मधे त्याचा काही ना काही हात होता. दोन्ही ओपनर च्या विकेट्स त्याचे स्वतःच काढल्या आणि दोन कॅचेस ही घेतले. नंतर चेस करताना ४१ बॉल्स मधे ५३ मारून मॅच सहज जिंकून दिली.

आणखी एक दुर्लक्षित परफॉर्मन्स म्हणजे वेस्ट इंडिज विरूद्ध शारजा ला एका गेम मधे त्या ४ टॉप ऑर्डर विकेट्स काढून विंडीज ला १४५ मधे गुंडाळले.

असे वाचले आहे की सचिन आधी फास्ट बोलर होण्याकरता मद्रासच्या एमआरएफ फाउण्डेशन मधे गेला होता. पण डेनिस लिली ने त्याला परावृत्त केले. नंतर त्याने स्पिन वर कधी लक्ष द्यायला सुरूवात केली माहीत नाही. त्याच्या बोलिंग ची खासियत म्हणजे जेव्हा त्याचा टप्प्यावर कंट्रोल असे तेव्हा तो संघातील इतर स्पिनर्स इतकाच आणि कधीकधी त्यांच्यापेक्षाही जास्त स्पिन करत असे. त्यात ऑफस्पिन व लेग स्पिन दोन्ही करू शकत असल्याने बॅट्समनला त्याची बोलिंग अशा वेळेस अजिबात कळत नसे. पण स्पिन इतकीच त्याची खासियत म्हणजे बॅट्समनला पुढे खेचून बॉल त्याच्यापासून दूरवरून 'फायर' करणे व विकेटकीपर कडून स्टम्पिंग करून घेणे. इथे खाली ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोची च्या सामन्यात त्याने दोन असे उडवले आहेतच पण एकदा शाहिद आफ्रिदी पुढे येउन खेळू लागल्यावर धोनीच्या मदतीने त्यालाही परफेक्ट उचलला होता, ते इथे बघता येइल.

१९९८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे जवळजवळ सर्व गेम्स सचिनची बॅटिंग जबरदस्त झाली होती. त्यातील वन डे सिरीज मधल्या एका गेम मधे तो लौकर आउट झाला. भारताने ३०९ मारल्यावर ऑस्ट्रेलिया चेस मधे २००/३ वर होती आणि अजून २० ओव्हर्स बाकी होत्या. स्टीव्ह वॉ आणि मायकेल बेव्हन हे ऑस्ट्रेलियाचे चेस चे मास्टर्स क्रीज वर होते. लीहमन, मूडी आणि डेमियन मार्टिन अजून खेळायचे होते. तेव्हाच्या हिशेबानुसार मॅच ऑस्ट्रेलियाच्या खिशात होती.

भारताकडे पाचवा रेग्युलर बोलर नसल्याने अझर ने हृषिकेश कानिटकर व सचिन दोघांमधे त्या ओव्हर वापरायचे ठरवले असावे. या मॅच मधे सचिन ने ऑफ स्पिन आणि लेग स्पिन ने मिश्रण इतके अफलातून वापरले की वॉ, बेव्हन, मूडी, आणि लीहमन कोणालाही त्याची बोलिंग झेपली नाही. कारण तो नक्की कोणता स्पिन वापरणार आहे तेच सांगता येत नव्हते. स्टीव वॉ ला त्याने लेग स्पिन वर काढला, तर लीहमन ला गुगली वर. बेव्हन ला टीपिकल 'स्पिनर चे स्टम्पिंग' टॅक्टिक वापरून - बॅट्समन पुढे येतोय दिसल्यावर लेग साइड ने जोरात मागून बॉल विकेटकीपर कडे. ३२ रन्स मधे ५ विकेट्स उडवून ऑस्ट्रेलियाच्या चेस मधे एक्स्पर्ट असलेल्या मधल्या फळीला पूर्ण चकवले त्याने. याही मॅच मधे मॅन ऑफ द मॅच सचिनच.

मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याहीपेक्षा भारी कामगिरी त्याने त्याच वर्षी पुन्हा केली. ऑक्टोबर १९९८ मधे ढाक्याला पहिली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी "नॉक आउट" स्पर्धा भरली. भारताची पहिलीच मॅच ऑस्ट्रेलियाशी होती. त्यावर्षी भन्नाट फॉर्म मधे असलेल्या सचिन ने आधी बॅटिंग करताना भारताला ८/२ वरून १४१ रन्स करून ३००+ वर नेले. पुन्हा चेस मधे तशीच सिच्युएशन होती. ऑसीज १९४/४ ३४ ओव्हर्स मधे. स्टीव वॉ आणि बेव्हन क्रीज वर. पुन्हा सचिनचा स्पिन चालला आणि स्टीव्ह वॉ, बेव्हन आणि डेमियन मार्टीन ला आउट करून त्याने ३८ रन्स मधे ४ विकेट्स काढल्या.

या मॅच च्या विस्डेन रिपोर्ट मधला उल्लेखः "Tendulkar excelled even himself with a stunning all-round performance....(Aussie batsmen) played too many rash shots, especially against Tendulkar, who bowled a mixture of off-breaks and leg-breaks and ended the match as he had started it: in complete control.

१९९३ च्या हीरो कप टूर्नामेण्टच्या फायनल ला लारा फॉर्मात येत असतानाच त्याची दांडी सचिननेच उडवली होती. सचिन व लारा यांची तुलना कायम होते, पण एका गोष्टीत लारा सचिन ला मॅच करू शकत नाही - सचिन ने त्याला २-३ वेळा आउट केला आहे.

पण त्याच्या बोलिंगचीच काय पण करीयरची सुद्धा चर्चा ज्या परफॉर्मन्स शिवाय पूर्ण होउ शकत नाही, तो म्हणजे त्याच हीरो कप च्या सेमीफायनल मधला द. आफ्रिकेविरूद्धचा. एक ओव्हर मधे तीन रन्स आणि नो विकेट्स. पण हा सर्वांना माहीत आहे, कारण साउथ आफ्रिकेला शेवटच्या ओव्हर मधे विजयाकरता सहा रन्स हवे असताना टाकलेली ओव्हर आहे ती. हा परफॉर्मन्स स्कोअरकार्ड वर उठून दिसत नाही. १-०-३-०. पण सर्व फॅन्स ना सचिन ची बोलिंग म्हंटले की हीच मॅच आठवेल.

प्रतिक्रिया

स्पार्टाकस's picture

3 Jan 2017 - 10:14 am | स्पार्टाकस

सचिनला पार्टटाईमर म्हणून खेळणं ही बॅट्समन्सची सर्वात मोठी चूक होती. अनेकदा त्यामुळे त्याने बॅट्समनचा अक्षरशः मामा केलेला दिसून येईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोचिनच्या मैदानावर ५ विकेट्स घेणार्‍या सचिनने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्धही त्याच मैदानात पुन्हा ५ विकेट्स घेतल्या होत्या. मात्रं यावेळी मॅन ऑफ द मॅच ठरला सेंच्युरी ठोकणारा सेहवाग!
सचिनचा खास बकरा म्हणजे रनआऊट होणं (आणि आपल्या पार्टनरला करणं) हा जन्मसिद्धं हक्कं असलेला इंझमाम उल हक!
टेस्ट आणि वनडे मध्ये मिळून सचिनने त्याला जितके वेळा आऊट केला त्यापेक्षा जास्तं कोणत्याही बॉलरने केलेला नसावा.
सचिनने एका सिरीजमध्ये दोनवेळा स्टीव्ह वॉला एक्झॅक्टली सेम बॉलवर दोनवेळा गंडवलेलाही आठवतो आहे.

तुषार काळभोर's picture

3 Jan 2017 - 11:11 am | तुषार काळभोर

लेख वाचत वाचत खाली येताना, तेच शोधत होतो, की 'त्या' सेमीफायनलचा' अजून उल्लेख कसा नाही आला!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2017 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त!

पद्मावति's picture

4 Jan 2017 - 1:09 am | पद्मावति

मस्त.

अप्पा जोगळेकर's picture

5 Jan 2017 - 12:56 pm | अप्पा जोगळेकर

फार छान लिहित आहात. सगळे भाग वाचत आहे. असे लारा बद्दल पण लिहावे ही विनंती.

मोहन's picture

5 Jan 2017 - 1:47 pm | मोहन

सचिननामा अप्रतीम!

आता असाच लेख धोनीवर पण येऊ द्या फारएन्ड !

रंगासेठ's picture

5 Jan 2017 - 3:14 pm | रंगासेठ

कोचीन वन-डे मधे ऑस्ट्रेलियाला लीलया गुंडाळलेले तेंडल्याने! अहाहा महराजा काय मॅच झाली होती ती. :-)

पाटीलभाऊ's picture

5 Jan 2017 - 6:21 pm | पाटीलभाऊ

सर्वच भाग जबरदस्त

अभिदेश's picture

7 Jan 2017 - 1:56 am | अभिदेश

१९९१ -९२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात भारत , ऑस्ट्रेलिया , विंडीज तिरंगी मालिकेत पहिल्याच सामन्यात टाकलेली सचिनने एकमेव ओव्हर. पर्थच्या विकेटवर भारताची १२५ मधेच दाणादाण उडालेली , पण विंडीज सुद्धा ४० ओव्हरमध्ये ९ बाद १२० . आपल्या सगळ्या प्रमुख गोलंदाजाच्या प्रत्येकी १० ओव्हर्स संपलेल्या. अझरने अश्यावेळेस सचिनकडे चेंडू सोपवला. पहिल्या ५ चेंडूंमध्ये ५ धावा काढून विंडीजने सामना बरोबरीत आणला पण शेवटच्या चेंडूवर सचिनने अप्रतिम आऊट स्विंग टाकून आणि तेवढाच अप्रतिम अझरने झेल घेऊन सामना बरोबरीत (टाय) संपवला.

चावटमेला's picture

7 Jan 2017 - 2:08 am | चावटमेला

२००३ च्या अ‍ॅडलेड कसोटीत त्याने डॅमियन मार्टिन आणि स्टीव वॉ ला असेच अप्रतिम लेग ब्रेक्स टाकले होते आणि द्रविड ने सुध्दा तितकेच अप्रतिम झेल घेतले..

खाबुडकांदा's picture

24 Sep 2017 - 6:05 pm | खाबुडकांदा

बास आता सचिन पुराण
इतरही खेळ असतात. नाहीतर या विभागाचे नाव सचिन विभाग असे ठेवा.

श्रीगुरुजी's picture

24 Sep 2017 - 7:05 pm | श्रीगुरुजी

सचिनपुराणाची कथा स्वतःच ९-१० महिन्यांनंतर वर काढता, वाचता आणि नंतर सांगता की बास झालं हे पुराण! सचिनपुराण नको असेल कशाला जुना धागा वर ओढला? सचिनपुराण आवडत नसेल तर ते वाचण्याची सक्ती नाही. सचिन वर कोणी लिहू नये असं वाटत असेल तर त्यावर बंदी आणण्यासाठी संपादकांशी संपर्क साधा.

श्रीगुरुजी's picture

24 Sep 2017 - 7:10 pm | श्रीगुरुजी

सुंदर लेख!

सचिन मैदानात नाही हे अजूनही सहन करणं अवघड जातंय.

We miss you Sachin!!!!!!!!

खाबुडकांदा's picture

24 Sep 2017 - 8:46 pm | खाबुडकांदा

सचिन आवडणे वा न आवडण्याचा प्रश्न नाहीये. त्याविषयी वेगळा वाद घालता येइल. पण जुना धागा चर्चेत आणण्याचे कारण म्हणजे मिपा चा एक अख्खा विभाग सचिन च्या नावेच दिसतोय. क्रीडा म्हणजे फक्त क्रिकेट का ? किंवा सचिन का ? या परिस्थितीवरची प्रतिक्रिया आहे माझी.
सचिन वा लेखकावर आक्षेप नाहीये.

श्रीगुरुजी's picture

24 Sep 2017 - 9:13 pm | श्रीगुरुजी

मग इतर खेळांवर/खेळाडूंवर स्वतः लिहा. तसं केलं तर सचिनमाहात्म्य आपोआपच कमी होईल. इतरांनी सचिनवर लिहिलं तर तुम्हाला का त्रास होतोय?

We miss you SACHIN!

खाबुडकांदा's picture

25 Sep 2017 - 8:13 am | खाबुडकांदा

गुरुजी, आपण व्यक्तीगत हल्ला का करत आहात ?
मी मला काय वाटले ते लिहीले. मीच स्वत: लिहिले पाहिजे का ? मी एक खेळाडुच आहे (आणि खिलाडु ही आहे). मी नक्कीच लिहु शकतो . पण तुम्हाला राग का येतोय हे समजत नाहीये.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2017 - 3:33 pm | श्रीगुरुजी

यात व्यक्तिगत काहीही नाही. सचिनवरील लेख पाहून तुम्हाला उबग आलेला आहे. इतरांनी सचिनवर लिहिणे थांबवून इतर खेळाडूंवर/खेळांवर लिहावे असे तुम्हाला वाटते. इतरांना असले काही सुचविण्याऐवजी तुम्ही स्वतःच इतर खेळांवर/खेळाडूंवर लिहावे असे मी सुचविले.

WE MISS YOU SACHIN!

फारएन्ड's picture

25 Sep 2017 - 3:38 pm | फारएन्ड

गुरूजी धन्यवाद. मिस यू सचिन बद्दल टोटल सहमत. खाबुडकांदा - तुम्ही लिहा इतर खेळांवर/खेळाडूंवर, आम्ही वाचू. नंतर कोणी इतर खेळांवर लिहीलेले नाही म्हणून ते लेख तसेच अजून आहेत. जे ऑलरेडी लिहीलेले आहे ८-१० महिन्यांपूर्वी त्याला आता बास म्हणून काही उपयोग नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2017 - 3:53 pm | श्रीगुरुजी

इतर खेळांवर/खेळाडूंवर सुद्धा अनेक लेख आहेत. शोधले तर सापडतील. प्रो-कबड्डीवर मागील महिन्यातच लेख आला होता. गतवर्षी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांवर लेख होता. विश्वनाथ आनंद सहभागी असलेल्या विश्वविजेता बुद्धिबळ स्पर्धेवर लेख होता. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेवर लेख होता. सचिन २०१३ ला निवृत्त झाल्यानंतर झालेल्या अनेक स्पर्धांवर व मालिकांवर लेख आहेत. फारएण्ड यांनी इतर अनेक खेळाडूंवर व सामन्यांवर अनेक लेख लिहिले आहेत. मी ब्रँडन् मॅकलम् निवृत्त झाल्यानंतर त्याच्यावर लेख लिहिला होता. फक्त सचिनचे लेख वर दिसले म्हणून नाराज होण्यापेक्षा एकतर स्वतः इतर खेळांवर लिहावे किंवा इतर खेळांवर लिहिलेल्या मागील लेखांचा शोध घ्यावा.

खाबुडकांदा's picture

25 Sep 2017 - 5:51 pm | खाबुडकांदा

जुने लेख असतील. मात्र सध्या तरी नवे लेखन या भागात क्रिडा विभाग कसा दिसतोय? तर फक्त सचिन.
मी याआधीच स्पष्ट लिहीले आहे कि सचिन वा लेखकावर आक्षेप नाहीये म्हणुन. तरीही मला 'त्रास' 'उबग' येतोय असे का म्हणता ?
असो. मी येथे थांबतो. मला जे जाणवते ते सर्वानाच जाणवावे असे काही नाही. सचिनला मी अजिबात मिस करत नाही. तरी पण थांबतो.

अभिदेश's picture

25 Sep 2017 - 8:46 pm | अभिदेश

आवरा स्वतःला

क्रीडाविभागात मुख्य पानावर सध्या जे लेख दिसत आहेत ते जुने आहेत. हा थोडा तांत्रिक दोष आहे. त्यानंतरही बरेच लेख लिहिले गेलेत. परंतु कलादालन आणि क्रीडाविभागात तेच तेच जुने लेख दिसत राहतात.

खाबुडकांदा's picture

26 Sep 2017 - 9:41 pm | खाबुडकांदा

धन्यवाद एस जी !

सिरुसेरि's picture

25 Sep 2017 - 8:19 pm | सिरुसेरि

मस्त लेख . सचीन तो सचीन .