मागच्या वीकांताला कोकणांत चार दिवस मुक्काम ठोकण्याचा योग आला. ५ / ६ मित्र आणि जवळच असलेल्या एका बंदरावर मिळणारे मुबलक मासे... असा निवांत बेत होता.
तर आपण बघुया तवा फ्राय बांगड्यांची आंम्हाला जमलेली पाककृती.
कांही डिस्क्लेमर्स
१) पुढील पाककृती चिंतामणी आणि प्रशांत मालक आणि मी अशी टीमने मिळून केली आहे.
२) बांगडे आणि उपलब्ध असणारे मसाले इतक्याच भांडवलावर पुढील पाककृती बनवल्या गेली आहे.
३) सगळे फोटो मोबाईलवर काढले आहेत त्यामुळे जे काही बरे वाईट आहे ते गोड मानून घ्या - तसेही सगळे फोटो प्रशांतमालकांनी काढले आहेत त्यामुळे टीका करणार असलात तर आयडी सांभाळून असा. ;)
बर्र.. तर नमनाला घडाभर तेल घालून पाकृ सादर करीत आहोत.
बांगडा - तवा फ्राय..!!!!!
साहित्य :
१) भरपूर बांगडे
२) आले लसूण पेस्ट
३) मालवणी फिश मसाला
४) चाट मसाला
५) मीठ
६) तिखट
७) लिंबू
८) तेल
रवा वगैरे कांहीही मिळाले नाही, तसेच मसाले-तिखट वगैरेचे प्रमाण विचारू नये, आम्हालाही कळाले नाही.
सर्वप्रथम बांगडे घेताना स्वच्छ करून घ्या. कोळीण मावशी बांगडे देताना डोके आणि शेपटी उडवून देईल तसेच पोटातील घाण काढून टाकेल. घरी आणल्यावर बांगड्याच्या पोटातील राहिलेली सर्व घाण व काळा दिसणारा भाग काढून टाका व बांगडे स्वच्छ धुवून घ्या.
वरील सर्व मसाला आणि चमचाभर तेल धुतलेल्या बांगड्यांना लावा.
मसाला सगळ्या बांगड्यांना नीट लावून थोडा वेळ मुरवत ठेवा (किमान ३० मिनीटे)
आंम्ही जरा जास्तीच बांगडे आणले होते त्यामुळे दुसरा लॉट असाच मुरवत ठेवून सरळ फ्रीझरमध्ये ठेवला.
मित्रमंडळींना इनो घ्यायला लावायचे असल्यास असाही एखादा फोटो काढू शकता.
तवा गरम करा, त्यावर प्रमाणानुसार तेल घाला आणि हे बांगडे एका बाजून ५-७ मिनीटे आणि दुसर्या बाजूने ५-७ मिनीटे शॅलो फ्राय करून घ्या.
मिपावर धागा टाकायचा आहे म्हणून उपलब्ध साधनांनी अशी थोडी सजावटही करण्याचा प्रयत्न केला.
(समाप्त.)
प्रतिक्रिया
4 Jan 2017 - 2:25 pm | वामन देशमुख
येक लंबर !!
4 Jan 2017 - 2:35 pm | सौंदाळा
जबरदस्त
4 Jan 2017 - 2:53 pm | कपिलमुनी
तुझा नक्की रोल सांग =))
4 Jan 2017 - 3:17 pm | मोदक
अरे चार-पांच वेळा असे बांगडे करून खाल्ले. त्यामुळे सगळे रोल सगळ्यांनी निभावले.
4 Jan 2017 - 3:25 pm | हतोळकरांचा प्रसाद
मोदकशेठ, अन्याव आहे हा! हाफिसात येऊन काम करावं म्हणलं तर हे असे तोंडाला पाणी आणणारे फोटो! ह्या राव कायच्या काही!
4 Jan 2017 - 4:14 pm | अद्द्या
त्या दिवशी कोकणात येऊ शकलो नाही त्याची अशी शिक्षा ?
दगा दगा
4 Jan 2017 - 4:53 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
बांगडा आपला जीव की प्राण.फोटू एकदम तोंपासु.पुलेशु.
4 Jan 2017 - 6:50 pm | दिपक.कुवेत
संमं.....प्लीज हा धागा त्वरीत उडवण्यात यावा......ताजी मासळी फ्राय करुन खायची मजा काही औरच असते.
5 Jan 2017 - 11:05 am | पियुशा
कहर !!!
5 Jan 2017 - 12:25 pm | अमर विश्वास
जबरदस्त ... तोंडाला पाणी सुटले ... कोकणात जायला हवे
5 Jan 2017 - 12:32 pm | पैसा
फोटो छान! पण चाट मसाला घालून बांगड्यांची काशी का केलीत? मला एक फोन केला असतास तर रव्याऐवजी काय वापरा ते फुकटात सांगितले असते ना! =))
5 Jan 2017 - 5:44 pm | गवि
अगदी सहमत.
5 Jan 2017 - 6:38 pm | मोदक
चांगले झाले होते की. चाट मसाला घातल्याने एक मस्त खमंग चव आली होती. ;)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(हे फक्त लिहायला. खरी चव मालवणी मसाल्याने आणि मूळ माश्याने आली होती)
5 Jan 2017 - 7:12 pm | गवि
पुढच्या वेळी बेडेकर लोणचे मसाला (थोडा) लावा. याद करोगे.
5 Jan 2017 - 7:26 pm | मोदक
:=)) :=)) :=))
5 Jan 2017 - 1:37 pm | देशपांडेमामा
सही दिसतोय ! तों.पा.सु.
देश
5 Jan 2017 - 7:40 pm | सुबोध खरे
गोव्याला असताना आमची मद्रासी मोलकरीण बांगडे विशिष्ट तर्हेने तिरके कपात असे त्यामुळे तळल्यावर खाताना काटे तोंडात येत नसत. असे नंतर कधीच कुठे खाल्ले नाहीत. बाकी बांगडा फ्राय म्हणजे तोंपासू
24 Feb 2017 - 7:24 pm | atulamigo
जम्ले परत नक्कि बघा
5 Jan 2017 - 8:37 pm | गवि
यावरुन आठवलं.
कमीतकमी काटे असलेल्या माशांची यादी कोणी दिल्यास उपकृत राहीन.
24 Feb 2017 - 9:54 pm | पैसा
पापलेट, सुरमई, लेपे, तिसर्या वगैरे शिंपले, कोलंबी,
27 Feb 2017 - 12:35 pm | गवि
धन्स.
पापलेट सुरमईच नेहमी खातो. रावस , हलवाही.
कोळंबीने तोंड आणि जीभ कापल्याप्रमाणे अॅलर्जी होते म्हणून आवडत असूनही बंद केली.
थोडे वेगळे, अस्सल खवय्यांचे आवडते पण बिनकाट्यांचे मासेही जाणून घ्यायचेत.
7 Jan 2017 - 12:19 pm | वरुण मोहिते
खऱ्या खवय्यांना पापलेट नाही आवडत हो जास्त .
24 Feb 2017 - 7:23 pm | atulamigo
ंमस्त आहे