एयर फ्राईड इटली

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in पाककृती
23 Dec 2016 - 8:00 pm

प्रेरणा : केडीभाऊ, स्वादि आणि सास्व तैं व इतर

उपकरण : टफ्फल एयर फ्रायर

कृती :
१)
प्रथम नेहेमी प्रमाणे इटल्या कराव्यात. इटली पात्रातून काढून थोड्या गार झाल्यावर इटल्या अर्ध्या कापाव्यात. त्या अर्ध्या भागाचे पुन्हा दोन उभे भाग करावेत. अशा रीतीने एका इटलीचे चार उभे भाग होतील.
२)
१० इटल्यांचे ४० उभे काप एयर फ्रायर मध्ये टाकावेत. इटल्यांच्या तुकड्यांवर १ चमचा तेल टाकावे. ऑइल स्प्रे असेल तर अत्युत्तम.
३)
एयर फ्रायर १५ मिनिटांसाठी चालू करावा. १५ मिनिटांनंतर रागरंग बघून, खरं म्हणजे इटल्यांचा रंग बघून आणखी १० किंवा १५ मिनिटे फ्रायर चालू करावा. आता मात्र जवळपास थांबून बकध्यान किंवा इट्लीध्यान करावे. इटल्यांना अपेक्षित तांबूस सोनेरी रंग चढला कि एयर फ्रायर बंद करावे.
४)
फ्राईड इटल्या बाहेर काढून डिश मध्ये मांडाव्यात. टोमॅटो किंवा तत्सम डिपींग सॉस बरोबर असावा. मोबल्याच्या मदतीने १, २ फटू खेचावेत.
५)
फ्राईड इटल्यांचा गिल्ट-फ्री फन्ना उडवावा. छान क्रिस्पी होतात.
६)
यथावकाश मोबल्या वरचा फटू इथे शेर करावा.
एयर फ्राईड इटली

तळटीप :

माझ्या आधी केलेल्या सगळ्या इटल्या सर्व्हर ने खाल्ल्या मुळे नवीन इटल्या केल्या आहेत. त्या संपण्याआधी आस्वाद घ्यावा, हि विनंती.

प्रतिक्रिया

इटली नाय हो, इडली. बाकी फोटो मस्त दिसतो आहे.

मागील्वेळचाच प्रतिसाद देते कारण ते फार मनात आहे की फ्राईड इडलीबरोबर सांबार खाऊन पहायचे आहे.

लीना कनाटा's picture

4 Feb 2017 - 5:56 am | लीना कनाटा

रेवाक्का,

खास तुमच्या साठी फ्राईड इटल्या विथ सांबार

फ्राईड इटल्या विथ सांबार

फ्राईड इटल्या विथ सांबार

फोटू आवडले. आता इडल्या करताना मुद्दाम थोड्या जास्त उरवून फ्राईड इडल्या करणार व सांबारही जास्त करणार.
धन्यवाद फोटू आठवणीने दिल्याबद्दल.

परत एकदा मागचा प्रतिसाद.

यात सिसिली कुठली आणि नेपल्स कुठले ते सांगा. ते मधले सेंट पिटर्स बॅसिलिका आहे का? आणि यात इंग्लंड (अंड शी ऱ्हाइम् होतं म्हणून) घालून करता येईल का? ;-)

लीना कनाटा's picture

24 Dec 2016 - 10:48 pm | लीना कनाटा

येस्सार,

काय म्हंता कायबी कळ्ळना.

सेंट टफ्फल्स इटॅलिका समजून खावा कि.

अजया's picture

24 Dec 2016 - 10:38 am | अजया

=)))

संजय पाटिल's picture

24 Dec 2016 - 12:07 pm | संजय पाटिल

सॉस सोबत का खायच्या पण? इडल्या सांबार आणी चटनी सोबतच खाव्यात!!!

प्रियाजी's picture

24 Dec 2016 - 3:22 pm | प्रियाजी

लीना कनाटा, इटल्या फारच आवडल्या. नेहमीच्या इडल्या केल्यावर ह्या नक्की करणार. पण एअर फ्रायर नसल्याने फ्रायपॅन मध्ये प्रयोग केले जातील.

पियुशा's picture

26 Dec 2016 - 1:56 pm | पियुशा

वा वा भारी कलपाना आहे ही :)

लीना कनाटा's picture

27 Dec 2016 - 6:04 am | लीना कनाटा

पियुशा ताई,

या इटल्या काल्पनिक नाहीयेत. या खऱ्याखुऱ्या फ्राईड इटल्या आहेत. फस्त करायच्या आधीचा फटू पण आहे.

लीनामामी, अहो त्या म्हणत आहेत की इडल्या अशा एअर फ्रायरमध्ये फ्राय करायची कल्पना भारी आहे. तुमच्या इडल्या, आपलं ते इटल्या काल्पनिक आहेत असं त्यांचं म्हणणं नाहीये! ;-)

साहेब..'s picture

27 Dec 2016 - 8:52 am | साहेब..

मला इडली कोरडी खायला आवडते. कधीतरी करून पाहील हा प्रकार.

या इडल्या माइक्रोवेव ओवनमध्ये कश्या करायच्या?

लीना कनाटा's picture

1 Jan 2017 - 9:23 am | लीना कनाटा

एअर फ्राईड साबुवडे

उपकरण : टफ्फल एयर फ्रायर

कृती :

नेहेमी प्रमाणे साबुवडे करावेत. तेलात तळण्या ऐवजी हवेवर तळावेत. बाहेरून छान क्रिस्पी होतात आतून सॉफ्ट राहतात.
गिल्ट फ्री फन्ना उडवावा.

लीना कनाटा's picture

3 Jan 2017 - 2:03 am | लीना कनाटा

पील (सोलणे ), कट (कापणे), सोक (पाण्यात भिजवणे), ड्रेन (सुकवणे), फ्रीझ (थंड करणे) इत्यादीची झंझट नको, कच्चे कट पोटॅटो फ्रेंच फ्राईज विकत आणावेत. तेलात तळण्या ऐवजी फक्त एक चमचा तेल वापरून सोनेरी रंगाचे होईपर्यंत हवेवर तळावेत. बाहेरून छान क्रिस्पी होतात आतून सॉफ्ट राहतात.

मीठ, मिरपूड भुरभुरावी किंवा सॉस बरोबर गिल्ट फ्री फन्ना उडवावा.

एयर फ्राईज

लीनामामींनी नव्या पदार्थांचा दणका लावलाय. साबूदाण्याचे वडे व (फ्राय न केलेले) फ्राईज आवडले. फ्राईज विकत तरी कश्याला आणायचे? घरी कापलेले नाही का चालणार?

लीना कनाटा's picture

3 Jan 2017 - 7:20 am | लीना कनाटा

वर लिवलंय कि, सोकापाभिसुथं ची झंझट नगं म्हून इकत आणायची बटाट्याची काचरं.

आनि हि समदी क्रुती लिवायचा टंकाळा :)

पिलीयन रायडर's picture

3 Jan 2017 - 7:51 am | पिलीयन रायडर

लाईट बिल खुप येतं का हो हे वापरलं की?

लीना कनाटा's picture

3 Jan 2017 - 9:54 am | लीना कनाटा

एयर फ्रायर १,४०० वॉट चा आहे. वर दिलेल्या पाकृंना साधारणतः २० ते २५ मिनिटे लागतात. म्हणजे अर्धा (०.५) किलोवॉटआवर (kWh) वीज खर्च होते.

चौकटराजा's picture

12 Feb 2017 - 8:04 pm | चौकटराजा

इटलीचे त्रुस्कनी, लोम्बारर्डिनी व्हेनेझिया असे काही भाग आहेत म्हणे पण फ्राईड इटली असा काही भाग गुगलवर दिसत नाहीय !!!! )))))

लीना कनाटा's picture

12 Feb 2017 - 10:11 pm | लीना कनाटा

अहो चौराकाका,

हि सोनियांची इटली नाही हो.

हि उडप्या कडे मिळते ना ती इटली.

ती कापायची आणि सोनियाचा रंग येई पर्यंत तेलात किंवा हवेवर तळायची.

शोधायची असेल तर उडप्या कडे शोधा, गुगल वर नव्हे :)

फेदरवेट साहेब's picture

13 Feb 2017 - 9:16 am | फेदरवेट साहेब

एअर फ्रायर पाककृती फर्मास आहेत, बाकी सगळे ओढून ताणून 'मी कशी नवी आहे इथे' हे भासवायला केलेले प्रतिसाद वाटत आहेत. असो.

लीना कनाटा's picture

14 Feb 2017 - 9:04 am | लीना कनाटा

धन्स ओपी साहेब.

बाकी प्रतिसादावरून नवं जुनं कसं कळते म्हणे?