साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत ! सुट्टी तशीही approve झाली होती तेव्हा आयटी संधी सोडायला मी तयार नव्हतो मग काय ४ चाकी काढली आणि सायकलस्वारांना follow केलं. Cycle ऐवजी SLR घेऊन थोडीफार फोटूगिरी केली त्याचीच ही काही क्षणचित्रे.
१.पावस: श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसर
२.तिथेच पाण्याच्या बाजूला टिपलेला खंड्या
३.जुवे-जैतापूर खाडी आणि परिसर
४.जैतापूर खाडी मधले मच्छिमार
५.ह्या पुलावर अणू ऊर्जा नको रे बाबा अशी स्लोगन्स लिहिली होती :)
६.जैतापूर - मिठगवणे रस्ता
७.जल वहातुक
८.केरळ का कोकण असा प्रश्न पडतो !
९.विजयदुर्ग: वाघोटने नदी
१०.विजयदुर्ग: ते पांढरे ठिपके म्हणजे Migratory Gulls आहेत
११.आमचे धडाडीचे कार्यकर्ते
१२.
१३.वाघोटने नदी
१४.अजून २०० किमी चा पल्ला गाठायचा होता
१५.सध्या कोकणात हिरवा आणि पिवळा दोनच रंग दिसतील
१६.सागर आणि रोहित (अंगात जाड पुलओव्हर, डोक्यावर हूड आणि वर हेल्मेट घालून भर दुपारी कोकणात सायकल चालवणारा हा पहिलाच असावा)
17.देवगड कडे कूच
18.कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा
19.नक्की पाहावं अस कुणकेश्वर मंदिर
20. कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा
21. देवगड कडून येताना दिसलेला कुणकेश्वर मंदिराचा देखावा
22. तारकर्ली कडे जाताना: मीठबाव नदी
23. तारकर्ली किनारा – Early Morning
24. तारकर्ली किनारा
25. तारकर्ली किनारा - मासेमारी
प्रतिक्रिया
14 Dec 2016 - 4:21 pm | केडी
.....सुंदर आलेत फोटो! अजूनही स्वप्नवत वाटत आहे, दिल तो कही कोंकण-गोवा में हि भूल आए हम!
14 Dec 2016 - 4:24 pm | एस
भारी.
14 Dec 2016 - 4:29 pm | इरसाल कार्टं
कोकण आहेच प्रेमात पाडण्यासारखं.
14 Dec 2016 - 4:31 pm | बंट्या
फोटो दिसत नाहीत
14 Dec 2016 - 4:36 pm | पाटीलभाऊ
मस्त फोटो..
14 Dec 2016 - 5:04 pm | मोदक
भारी..!!!!
भरपाई केली जाईल..! ;)
14 Dec 2016 - 6:57 pm | सूड
सुंदर प्रचित्रे.
14 Dec 2016 - 7:42 pm | जव्हेरगंज
मस्त आहे!!!
14 Dec 2016 - 10:12 pm | मनिमौ
वा
14 Dec 2016 - 10:17 pm | निशाचर
मस्त फोटो!
14 Dec 2016 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो दिसत नाहीत.
14 Dec 2016 - 10:33 pm | चित्रगुप्त
वा सुंदर.
14 Dec 2016 - 11:40 pm | बाबा योगिराज
वल्लाह फोटू आहेत. एकदम ईणोची आठवण झाली.
बाबा योगीराज
23 Dec 2016 - 9:32 pm | जुइ
सुदंर छायाचित्रे!
24 Dec 2016 - 12:03 am | रेवती
ग्रेटच ग्रेट! कोकणात आणखी कसले प्रकल्प येण्याची कल्पना करवत नाही.
फोटूंमुळे जाऊन आल्यासारखे वाटले.
24 Dec 2016 - 3:04 pm | Parag Purandare
वा, फारच मस्त प्रकाशचित्रे.
24 Dec 2016 - 3:06 pm | पद्मावति
वाह! मस्तच.
29 Dec 2016 - 5:34 am | खटपट्या
गावी जाउन आल्यासारखे वाटले
2 Jan 2017 - 2:59 pm | आबा पाटील
जबराट फोटू ...