बाहेर करायच्या उठाठेवी

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in पाककृती
5 Dec 2016 - 6:21 pm

नमस्कार मिपाकर्स आणि पाककृतीतले मान्यवर लेखक/लेखिका! __/\__

घरात किचनमध्ये करायच्या लुडबुडी सोडून जेव्हा बाहेर कॅम्पिंग वगैरे ठिकाणी जेवण बनवायची वेळ येते तेव्हा खूपच लिमिटेड पर्याय उपलब्ध असतात किंवा मांसाहारी पदार्थ सोडल्यास पर्याय सामान्य असतात असे माझे मत आहे. तेव्हा बाहेर करता येण्यासारख्या खास चविष्ट पाककृती (दोन्ही शाकाहारी/मांसाहारी) जर इथे प्रतिसादातून देता आल्या तर मी तुमचे उपकार आजन्म विसरणार नाही, नव्हे, बाहेर स्वयंपाक करून खाताना एक घास तुमच्या नावे बाजूला काढून ठेवेन.

लक्षात घ्या, बाहेर करायच्या उठाठेवी म्हटलं की त्या पाककृती कमीत कमी साधन आणि साहित्य वापरून करता येण्याजोग्या असाव्यात!

इथे मी गेल्या दोन शनिवारी आमच्या सोसायटीच्या बाहेर मोकळ्या जागेत मी केलेल्या उठाठेवी थोडक्यात लिहीत आहे.

तर दि. २६/११/२०१६ रोजी केलेली ही सक्सेसफुल्ल आणि चवदार उठाठेव नंबर १!

भाजलेले मासे!

साहित्य :
१) ३-१/२ कि. मासे (आम्ही बांगडा आणलेला) (२० लोकांसाठी)
२) १ पाकीट एव्हरेस्ट लाल तिखट
३) मीठ चवीनुसार
४) मासे मावतील इतक्या नारळांच्या(शहाळ) करवंट्या (इथे ९ लागलेल्या)
५) आगीसाठी लाकडे व इतर लागणारे साहित्य (अंदाजे १० कि.)

कृती:

१)मासे स्वच्छ करून त्यात मीठ मिसळलेले लाल तिखट आत कोंबावे व माशांना बाहेरून चिरा पडून त्यातही कोंबावे.
२) ते सर्व मासे करवंट्यात कोंबावे.
३) त्या सर्व करवंट्या साधारण अर्धा ते पाऊण तास आगीत सोडून द्याव्यात.
४) नंतर ते सर्व मासे खूप आटापिटा करून करवंट्यातून काढून खाऊन फस्त करावेत!
५) झालं की! :)

मंडळी तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, मासे हाताळण्याचा शून्य अनुभव असताना मासे भाजण्याची जबाबदारी आमच्या सोसायटीच्या मंडळींनी माझ्यावर सोपवली होती. अर्थात, याआधी माझ्या हातचं खाऊन माहीत असल्यामुळेच! आणि ती मी यशस्वीपणे पार पाडली याचा मला अभिमान आहे! :)

या पाककृतीचे काही फोटोज! (अतिसामान्य फोटोज गोड मानून घ्यावेत ही नम्र विनंती)

1

2

3

************************************************************************************

दि. ३/१२/२०१६ रोजी केलेली ही सक्सेसफुल्ल आणि खरपूस उठाठेव नंबर 2!

बटाट्याची हंडी(हे खेड/राजगुरूनगर भागातील प्रचलित नाव आहे या पदार्थासाठी)


साहित्य :

१) १५ कि. ताजे/नवे (कंपल्सरी) बटाटे (२५-३० लोकांसाठी)
२) १-१/२ पाकीट एव्हरेस्ट लाल तिखट
३) मीठ चवीनुसार
४) दोन मोठ्या आकाराचे माठ
५) आगीसाठी लाकडे व इतर लागणारे साहित्य (अंदाजे १५ कि. व २० गोवऱ्या)

कृती:

१)बटाटे स्वच्छ करून त्यात रस्त्यात पेरू विकणारे विक्रेते जसे मीठ व मसाला भारतात तसा मसाला मीठ मिसळून भुरभुरावा.
२) ते सर्व बटाटे माठात भरून माठाच्या तोंडाशी हरबऱ्याची डहाळी लावावी जेणेकरून बटाटे माठ उलटा केल्यावर सांडणार नाहीत.
३) माठ १/४ जाईल इतका खडडा करून त्यात माठ उलटा करून ठेवावा.
४) बाजूने गोवऱ्या व लाकडे रचून आग लावावी व एक तासाने अथवा माठ लालेलाल झाला की लाकडे-गोवऱ्या बाजूला करून माठ बाजूला काढावा.
५) झालं की! आता लागा खरपूस भाजलेले बटाटे खायला!

या पाककृतीचे काही फोटोज! (अतिसामान्य फोटोज गोड मानून घ्यावेत ही नम्र विनंती)

5

6

7

8

आशा आहे मिपाकरांकडूनही या अशा चवदार/खरपूस उठाठेवींमध्ये भर पडेल!

वाट पाहत आहे!

- संदीप चांदणे

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

5 Dec 2016 - 6:52 pm | जव्हेरगंज

_/"\_

शेकोटी करुन त्यात शेणी लावलेली अंडी टाकून द्यावीत. उकडल्यावर कवचले काढून चटणी मीठ टाकून खावीत. अद्भुत लागतात.

खेकडे असतील तर शेकोटीवर भाजून घ्यावेत. कवचले फोडून आतला गर चटणी मीठ टाकून खावा.

हे सगळं रात्री केल्यास मज्जा येते!

चांदणे संदीप's picture

5 Dec 2016 - 8:24 pm | चांदणे संदीप

__/"\__

धन्यवाद जव्हेरभौ!

आपले कार्यक्रम रात्रीचेच अस्तात! ;)

Sandy

एस's picture

5 Dec 2016 - 7:03 pm | एस

तोंपासु!

ओ... काय हे..? नारळातले मासे वगैरे पोस्ट करून अंत बघताय का आमचा..?

पिलीयन रायडर's picture

5 Dec 2016 - 7:38 pm | पिलीयन रायडर

नाही तर काय??????? अरे जीव जाईल अशाने कुणाचा तरी.. शहाळ्यातल्या पाकॄ टाकायला बंदी हवी मिपावर.

वरुण मोहिते's picture

5 Dec 2016 - 7:44 pm | वरुण मोहिते

काय आठवण काढलीत . अंडी बटाटे चिकन टाका एकतर नाहीतर वालाच्या शेंगा चिकन वर भांबुर्ड्याचा पाला .मडक्यात जबरदस्त टेस्ट . शहाळ्यात बांगडा जरूर करून पाहण्यात येईल एकदा धन्यवाद .

चांदणे संदीप's picture

5 Dec 2016 - 8:26 pm | चांदणे संदीप

धन्यवाद मोहितेसाहेब,

अजून थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगा की राव!

Sandy

सुधांशुनूलकर's picture

5 Dec 2016 - 8:16 pm | सुधांशुनूलकर

आम्ही शेकोटीमध्ये अशाच प्रकारे मसाला लावून पनीरही भाजलं होतं. मस्त लागतं.

शहाळ्यात बांगडा - तोंपासु....

चांदणे संदीप's picture

5 Dec 2016 - 8:28 pm | चांदणे संदीप

धन्यवाद नूलकरकाका!

पनीरचाही बळी देण्यात येईल पुढच्या वेळी!!;)

Sandy

कपिलमुनी's picture

5 Dec 2016 - 8:17 pm | कपिलमुनी

पोपटीची आठवण झाली . सध्या सीझन सुद्धा आहे

चांदणे संदीप's picture

5 Dec 2016 - 8:23 pm | चांदणे संदीप

ये पोपटी क्या है?

vcdatrange's picture

5 Dec 2016 - 9:21 pm | vcdatrange

ह्याला पोपटी म्हणतात.
हि रायगड जिल्ह्यात बनवली जाते.
वालाच्या शेंगा तयार झाल्या की त्या मडक्यात भरतात. मध्ये मध्ये थोडं मीठ टाकतात. मडका साधारण 90% भरून झाला की बाकीची जागा भाम्बुर्डी(भामरुड) च्या पल्याने भरतात.
वीट किंवा दगडाचे सारखे तीन तुकडे मांडून त्यावर हा मडका उपडा ठेवतात. मडक्याच्या सभोवतालीने काटक्या, लाकडाची ढालपी लावतात. नंतर त्यावर पेंढा टाकतात आणि तो पेटवतात. साधारण 5-10 मिनिटे पेंढा टाकल्यावार तो तसाच ठेवतात. नंतर पंधराएक मिनिटांनी वास येऊ लागल्यावर, वरची राख बाजूला करून तो काढतात आणि नंतर त्यातला भामरुडचा पाला काढतात. आणि मग कार्यक्रम सुरू करतात.
मडक्यामध्ये कांदा-बटाटा(मीठ मसाला) घालू शकता, तसेच वार-तिथी बघून अंडी, कोंबडी टाकु शकता.
ज्याने हे चाखलं आहे, त्याच्या तोंडालाही कृती वाचून आत्ताच पाणी आलं असेल.

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2016 - 9:34 pm | आनंदी गोपाळ

भांबुर्ड्याच्या पाल्याचा ऑथेंटिक फोटू कुणी टाकू शकेल काय? भांबुर्ड्याला "ऑर" ऑप्शन काही आहे काय?

रुस्तम's picture

5 Dec 2016 - 10:35 pm | रुस्तम

Abc

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2016 - 10:46 pm | आनंदी गोपाळ

आमच्या खानदेशात अस्लं काय दिसंना. ऑर म्हणून हरभर्‍याचा पाला किंवा केळी/अळूची पानं कोंबून पहातो. गेला बाजार अ‍ल्मुनियम फॉईल कुठेच जात नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2016 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

वालांच्या पोपटीसाठी भांबुर्डीला पर्याय नाही ! :)

भांबुर्डीचा काहीसा ओव्यासारखा तिखटपणा आणि वेगळा वास पोपटीच्या चवीची मजा खुलवतो.

रुस्तम's picture

6 Dec 2016 - 11:14 am | रुस्तम

सहमत

वेगळा वास पोपटीच्या चवीची मजा खुलवतो.
अजया's picture

6 Dec 2016 - 2:15 pm | अजया

पोपटीला भांबुर्डीचा पाला हवाच.रायगड जिल्ह्यातला तो पण!

चांदणे संदीप's picture

6 Dec 2016 - 3:08 pm | चांदणे संदीप

रायगड जिल्ह्यातला तो पण!

ओ तै, लैच्च!!

कपिलमुनी's picture

5 Dec 2016 - 9:38 pm | कपिलमुनी

अंडी, कोंबडी , मसाले टाकून इतर बरेच अ‍ॅडिशन करता येतात

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2016 - 12:13 am | डॉ सुहास म्हात्रे

पोपटीच्या दाण्यांबरोबर खायला ताजे ओले कोवळे खोबरे (शहाळ्याची मलई नाही, तयार खोबरे) असले तर एकदम झ्याक !

चांदणे संदीप's picture

6 Dec 2016 - 12:15 pm | चांदणे संदीप

vcdatrange पोपटीसाठी धन्यवाद!!

हा प्रकार करून बघणेत येईल!!

Sandy

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2016 - 9:46 pm | आनंदी गोपाळ

चांदणे दादा,

माफ करा.

पाकृ मस्त आहे. शहाळ्यांत मलईसकट मासे भाजायची आयडिया आवडली.

असले आगीशी खेळ आऊटडोअर प्रकार करायला व मित्रांना खिलवायला. मलाही अत्यंत मजा येते.

(लेखकाच्या विनंतीवरून संपादित)

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Dec 2016 - 11:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचे असे खुल्यावरचे खाद्यप्रयोग अन खाद्यपदार्थ इथे सांगण्यासारखे नाहीत, उगाच पट्टीच्या खवैय्ये लोकांचा हिरमोड होऊन तोंड कडू व्हायचे. तस्मात आम्ही वाचनमात्र बरंका सँडी भाऊ :)

चांदणे संदीप's picture

5 Dec 2016 - 11:30 pm | चांदणे संदीप

गॉटला!

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2016 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे जीवघेणे पदार्थ मिपाकट्टा करून खिलवण्याऐवजी त्यांची केवळ जीवघेणे फोटोसह पाकृ दिल्याबद्दल बल्लवाचार्यांचा टीव्र णीधेढ आहे ! :) ;)

चांदणे संदीप's picture

6 Dec 2016 - 1:51 pm | चांदणे संदीप

यू आर मोस्ट वेलकम!!
:)

Sandy

खटपट्या's picture

5 Dec 2016 - 11:48 pm | खटपट्या

अरेरे,
यासाठी आता एक निवासी कट्टा करावा लागणार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Dec 2016 - 11:41 am | ज्ञानोबाचे पैजार

भारीच.....
हे म्हणजे घरच्या घरी बारबेक्यु नेशन

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

6 Dec 2016 - 12:20 pm | चांदणे संदीप

आऊटडोअर रेसिपीजच्या प्रतीक्षेत!

Sandy

हॉटेलात जाऊन खाणे ही सर्वात बेष्ट आउट डोअर रेसिपी आहे ;)

चांदणे संदीप's picture

6 Dec 2016 - 3:07 pm | चांदणे संदीप

मग मी बाहेर हॉटेलच टाकतो आता, कसे!
;)

Sandy

इरसाल कार्टं's picture

6 Dec 2016 - 1:48 pm | इरसाल कार्टं

तोंपासु, एवढ्यात जेवून आलो अन पुन्हा भूक लागली...

गामा पैलवान's picture

7 Dec 2016 - 3:18 am | गामा पैलवान

अवांतर:

डॉक्टर सुहास म्हात्रे,

भांबुर्डीचा काहीसा ओव्यासारखा तिखटपणा आणि वेगळा वास पोपटीच्या चवीची मजा खुलवतो.

भांबुर्डी औषधी असते. ओव्यामुळे की काय?

इथे इंग्लंडमध्ये तिची पानं खातात.

आ.न.,
-गा.पै.

रुस्तम's picture

7 Dec 2016 - 12:23 pm | रुस्तम

लहानपणी खेळताना लागलं किंवा खरचटलं कि याचा पाला चोळून लावायचो.

राही's picture

7 Dec 2016 - 2:47 pm | राही

भांबुर्ड्याचा पाला आणि पोपटी याविषयीचा मायबोलीवरचा हा ऑल् टाइम हिट धागा :
http://www.maayboli.com/node/21397?page=6
लेखिका अर्थातच नेहमीच्या यशस्वी जागू

राही's picture

7 Dec 2016 - 2:58 pm | राही

फुफाटी म्हणजे छोटीशी शेकोटी जिच्यात जळजळीत राख असते. या राखेत छोटे कंद, रताळी, करांदे यासारख्या वस्तू भाजायला ठेवतात. यावरून पोपटी हा शब्द आला असावा असे लेखक शंकर सखाराम यांनी एके ठिकाणी लिहिले होते.

चांदणे संदीप's picture

7 Dec 2016 - 3:37 pm | चांदणे संदीप

माहितीबद्दल धन्यवाद राहीतै!:)

Sandy