खरवसाची वडी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
30 Nov 2016 - 12:46 pm

kharvas
साहित्यः
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
kharvas
कृती:
पहिल्या दिवसाचा चीक नुसताच शिट्टी न लावता १५ मिनिटे कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला की भांड्यातून काढून किसावा. मी अर्धा चीक मिक्सरला फिरवून घेतला. जेवढा चीक असेल तेवढी साखर, चीक आणि दूध कढईत एकत्र करावे.
kharvas
मध्यम आचेवर मिश्रण ढवळत रहावे. एकजीव झाले की वेलची पावडर आणि केशर मिसळावे.
kharvas
ताटाला तूप लावावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटात थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. हवे असल्यास बदामाचे काप सजावटीसाठी लावावे.
kharvas
गोडीला कमी हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी घ्यावे.
पूर्वी मुंबईकर मंडळींना लगेच चिकाचे दूध पाठवता येत नाही, म्हणून अशा वड्या करून खरवस पोहोचवला जायचा.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

30 Nov 2016 - 12:52 pm | त्रिवेणी

बरीच कठीण य बै रेसिपी.इथे मुळात चिक दिसायची मारामार वड्या कधी करणार.
बाकी फोटू नेहमीप्रमाणे मस्त.परत एक रत्नागिरी ट्रिप करतेच आता.

विचित्रा's picture

30 Nov 2016 - 2:30 pm | विचित्रा

चीक नसला तरी दुधात मिल्क पावडर मिसळून करता येतो खरवस.

अनन्न्या's picture

30 Nov 2016 - 6:21 pm | अनन्न्या

टिकाऊ वडी आहे चिकाची!

मंजूताई's picture

30 Nov 2016 - 12:58 pm | मंजूताई

आम्हीपण अगदी शेम टु शेम अश्शीच करतो :) खूप दिवस टिकतात. बाकी वड्या भारी दिसताहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2016 - 1:13 pm | अत्रुप्त आत्मा

जबराट!

आमच्याकडे पण अशाच करतात . कमी गोड करायच्या म्हणून साखर कमी घातली तर वड्या खुटखुटीत कशा होतील असं वाटतंय.
परवा नुसता खरवस करताना गुळ कमी पडला तर वड्या वेगळ्या लागत होत्या.

पिं चिं मध्ये खरवसाचे दुध कोठे मिळेल ?

पण वडीला थोडी कमी साखर चालते.

पाटीलभाऊ's picture

30 Nov 2016 - 2:05 pm | पाटीलभाऊ

मस्त दिसतायत वड्या

दिपक.कुवेत's picture

30 Nov 2016 - 2:12 pm | दिपक.कुवेत

तोंपासू दिसत आहेत वड्या. पण अजून कधी खायचा योग आला नाहिये सो चवीबाबत अजाण आहे.

अनन्न्या's picture

30 Nov 2016 - 6:20 pm | अनन्न्या

तुम्हाला तर नक्कीच आवडेल, थोडे पनीरसारखे लागते.

पद्मावति's picture

30 Nov 2016 - 2:37 pm | पद्मावति

मस्तच.

वरुन तिसर्‍या चित्रातला किस पाकात आहे की तळताय?

अनन्न्या's picture

30 Nov 2016 - 6:18 pm | अनन्न्या

तळालेला नाही

पियुशा's picture

30 Nov 2016 - 3:03 pm | पियुशा

सही दिसताहेत :)

तोंपासु.चिक कुठून मिळवायचा आम्ही :(
या टिकाऊ वड्या आहेत ना?मग अनन्न्या घेऊन ये ना मुंबईला ;)

अनन्न्या's picture

1 Dec 2016 - 9:01 am | अनन्न्या

पाठवते

कातिल दिसतायत वड्या.. माझी आईदेखील अश्याच करते..

सही रे सई's picture

30 Nov 2016 - 10:29 pm | सही रे सई

तोंपासु.चिक कुठून मिळवायचा आम्ही :( -> अगदी माझ्या मनातल बोललीस
अमेरिकेत मिळतो का ते प्लीज कोणीतरी सांगा.

चायनाग्रास बनवून बघा. अगदी खरवस नाही, पण बर्‍यापैकी त्याच्या जवळ जाणारा पदार्थ आहे.

बाकी, वड्या मस्त दिसत आहेत, पण चीक मिळालाच तर खरवसच खाणे जास्त आवडते.

चतुरंग's picture

30 Nov 2016 - 11:14 pm | चतुरंग

खरवस आणि या वड्या खाऊन युगं लोटलीत असं वाटतंय....
अतिशय आवडता पदार्थ. पुण्यात असताना कधीतरी जनसेवात जाऊन खरवस खायचो.
(नेमका जेवायच्या वेळी धागा समोर आला पण उघडला नाही त्याचं आत्ता बरं वाटतंय! :) )

जेंव्हा सहजगत्या चीक मिळायचा व सर्व प्रकार घरी व्हायचे तेंव्हा आवडायचे नाहीत पण आता चीक मिळत नाहीये म्हटल्यावर हवीहवीशी वाटणारी पाकृ. फोटू चांगला आलाय.

तुषार काळभोर's picture

1 Dec 2016 - 5:17 pm | तुषार काळभोर

खरवस आमच्याकडे महिन्यातून २-३ वेळा तरी नक्की होतो.
वड्यांविषयी पहिल्यांदाच माहिती होतंय. पुढल्यावेळी चीक आल्यावर ट्राय करायला लावतो.

सस्नेह's picture

1 Dec 2016 - 5:20 pm | सस्नेह

मस्त दिसताहेत वड्या !
बराच खटाटोप आहे.

अनन्न्या's picture

1 Dec 2016 - 5:39 pm | अनन्न्या

तयारीसह तासभर लागतो. शिजलेला चीक गार होण्यासाठी थांबावे लागते म्हणून!

पैसा's picture

1 Dec 2016 - 5:26 pm | पैसा

छान प्रकार!

मदनबाण's picture

1 Dec 2016 - 7:06 pm | मदनबाण

मस्त प्रकार ! अजुन तरी हा पदार्थ चाखायची संधी मिळालेली नाहीये.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geet

भुमन्यु's picture

2 Dec 2016 - 3:04 pm | भुमन्यु

१. मिक्सर मधुन चिक काढुन घेतल्यास वडी एकजीव होते. (पण मला किसलेल्या चिकाचीच वडी आवड्ते घरी सगळ्यांना दुसर्‍या पद्धतीने केलेली आवडते)
२. खरवसाबरोबर खोवलेलं नारळ घालुन पण वडी छान लागते.

खोबरं घातलं की जास्त टिकत नाहीत म्हणून नाही घातलं.

सन्तोश नारकर's picture

23 Jan 2017 - 7:55 pm | सन्तोश नारकर

मस्तच १ न॑बर

मनिमौ's picture

23 Jan 2017 - 10:24 pm | मनिमौ

पण खरवस आवडत नाही सो माझा पास

ग्रेट रेसिपी. जेंव्हा चीक मिळायचा तेंव्हा का नाही या वड्या केल्या असा प्रश्न पडलाय. एकांकडे अशी वडी खाल्ली होती. फार्फार आवडता पदार्थ आहे.
तू काढलेले फोटू आवडले.