गाभा:
नमस्कार
माझी एक (मिपावर नसलेली) मैत्रीण लवकरच अटलांटा (अमेरिका) येथे जवळपास वर्षभरासाठी जाणार आहे. तिथे कोणी मिपाकर असल्यास त्यांच्याकडून तिथे रहाण्यासाठी घर कसे शोधावे, कोणत्या भागात राहणे चांगले याबाबत माहिती हवी आहे. जमल्यास राहणे + खाणे याचा अंदाजे खर्च किती येऊ शकतो याचीही माहिती दिल्यास उत्तम. आजपर्यंतचा माझा अनुभव मिपाकरांकडून नेहमी उत्तम माहिती मिळते असा आहे त्यामुळेच हा धागा काढत आहे, माझ्या मैत्रिणीने देश सोडल्यावर काही काळाने हा धागा मीच उडवायला सांगेन.
प्रतिक्रिया
18 Oct 2016 - 8:01 pm | ट्रेड मार्क
थोडी अजून माहिती दिलीत तर बरं होईल. ऑफिस अटलांटामध्ये नक्की कुठे आहे? एकट्या येणार आहेत का कुटुंब आहे बरोबर? मुलं आहेत का आणि असल्यास त्यांची वयं किती ई.
मी अटलांटा मध्ये राहत नाही पण सर्वसाधारण कसं आणि काय करायचं ते सांगू शकतो.
जर का एकट्या येणार असतील तर सध्या अटलांटा मध्ये राहणारे जे कलिग्स असतील त्यांच्या मध्ये कोणी अपार्टमेंट शेअर करणार असेल तर बघावे. सुरुवातीला ऑफिसच्या जवळ घर बघावे किंवा घर ते ऑफिस पब्लिक ट्रान्सपोर्ट सहज उपलब्ध असेल अशी जागा बघावी. बाकी मिपावर अटलांटामध्ये राहणारे कोणी असतील तर कुठल्या भागात घर चांगलं मिळेल हे सांगू शकतील.
अटलांटामध्ये भरपूर भारतीय आणि मराठी मंडळी आहेत. भारतीय वाणसामान मिळण्याची दुकाने आहेत आणि तिथे मसाल्यांपासून सर्व गोष्टी मिळतात. अटलांटामध्ये महाराष्ट्र मंडळ सुद्धा आहे www.mmatlanta.org
खर्चाचं म्हणाल तर एक व्यक्ती जर अपार्टमेंट शेअर करून राहिली तर साधारणपणे ९००-११०० डॉलर खर्च येईल. यात घरभाडे, वीज/ पाणी/ फोन/ इंटरनेट याची बिलं, येण्याजाण्याचा खर्च तसेच खाण्यापिण्याचा खर्च अंतर्भूत आहेत. जर फॅमिली असेल तर १ बेडरूमची अपार्टमेंट साधारणतः ९०० ते १२०० डॉलरमध्ये (लोकेशनवर अवलंबून) मिळते. वर इतर सर्व खर्च साधारणपणे १००० - ११०० मिळवा.
अजून काही माहिती पाहिजे असल्यास विचारा.
18 Oct 2016 - 8:10 pm | टवाळ कार्टा
बॅचलर आहे आणि तिचे ऑफिस कुठे आहे हे मला माहित नाहीये
18 Oct 2016 - 9:07 pm | ट्रेड मार्क
कंपनीतर्फे येत आहे म्हणजे पहिले काही आठवडे कंपनी गेस्ट हाऊस किंवा हॉटेल मध्ये सोय होते. या काळात ऑफिसमध्ये कोणी अपार्टमेंट शेअर करण्यासाठी आहे का हे प्रथम शोधावे. क्रेगलिस्ट वर पण अपार्टमेंट शेअरिंगसाठी बऱ्याच जाहिराती असतात. परंतु भारतीय रूममेट बघावे. तसेच सुलेखा पण उपयुक्त आहे.
या साईट वर सेफ एरिया कुठले आहेत ते कळेल.
दुसरं म्हणजे महाराष्ट्र मंडळातील कोणाला ई-मेल टाकून किंवा फोन करून माहिती विचारता येईल. त्यांच्या वेबसाईटवर (Contact us) मध्ये ई-मेल पत्ते दिलेले आहेत. हे लोक बरीच मदत करतात. त्यांचा जनसंपर्क चांगला असल्याने कुठे सोय होईल ते सांगू शकतात.
18 Oct 2016 - 8:03 pm | मी-सौरभ
फक्त तुझा धागा वर रहावा म्हणून हा प्रतिसाद. बाकी त्या जागेबद्दल काहीही कल्पना नाही.
18 Oct 2016 - 8:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट राज्य आहे, म्हणजे तिथे खळफट्याक आवडणारी लई लोकं आहेत वगैरे ऐकून आहोत (चुभूदेघे)
जाणकारांनी प्रकाश टाकावा ही नम्र विनंती.
18 Oct 2016 - 9:28 pm | ट्रेड मार्क
रेसिस्ट तर सगळीकडेच असतात. खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये म्हणजे कॅरोलिना'स, जॉर्जिया ई राज्यात थोडं वाटू शकतं, म्हणजे ऑफिस मध्ये तुम्ही काय सांगताय त्याकडे फारसं लक्ष देणार नाहीत किंवा कोणीतरी काड्या करणारे असतात. परंतु उघड उघड काही त्रास नाही. अटलांटामध्ये खूप भारतीय आहेत त्यामुळे तिथले स्थानिक लोक एलियन बघितल्यासारखे आपल्याकडे बघणार नाहीत. बाकी नेब्रास्का वगैरे मध्ये गेलात तर मात्र असा अनुभव येऊ शकतो. कायद्याप्रमाणे इथे सर्व समान आहेत. त्यामुळे सरळसरळ कोणी रेसिस्ट वागू शकणार नाही. किरकोळ अनुभव म्हणजे सबवेमध्ये ऑर्डर देताना एखादा/ एखादी तुम्ही काय बोलताय ते कळत नाही असं मुद्दाम नाटक करेल. पण कोणी तुम्हाला केवळ भारतीय आहात म्हणून मारहाण/ शिवीगाळ वगैरे करणार नाही.
प्रत्येक शहरात असे पॉकेट्स आहेत की जे सुरक्षित नाहीत. अश्या भागात जाणे टाळावे. उदा. न्यू जर्सी मध्ये न्यूअर्क (Newark) एलिझाबेथ एरिया. मला एकदा चुकून तिथे उतरावं लागलं होतं तर जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून गेलो. १५ मिनीटांच्या काळात १०-१५ वेळा पोलिसांच्या गाड्यांचे सायरन आणि घोळक्याने आपल्याकडे बघत शेरे मारत जाणारे का* लोक्स. पण सगळीकडे असं नसतं.
18 Oct 2016 - 10:42 pm | खटपट्या
न्यूजर्सीतील गुंडगीरीसाठी बदनाम असणार्या एरीयात राहीलोय. ते लोक लूटालूट करतात पण रेसीजम म्हणून नाही. काही दीवसांनी त्यातील दोघे तर माझे मित्र झाले होते. अगदी जीव मुठीत घेउन चालण्यासारखे काही नाही.
सॅन फ्रान्सीस्कोमधे चार गोर्या मुलांच्या टोळक्याने मी आणि माझा भारतीय मित्र चालत असताना नको तेवढे चिडवले. पण जेव्हा आम्ही थांबून त्यांच्या दीशेने चालू लागताच ते पळून गेले.
थोडक्यात गुंडगीरी सगळीकडे आहे. भारतातही आहेच.
पण मुलींनी असे भाग टाळावेत हे बरोबर...
18 Oct 2016 - 11:52 pm | ट्रेड मार्क
पण गुंडगिरीचे उदाहरण म्हणून दिले आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात... पण सर्वसाधारणपणे असे भाग टाळावेत. मुलींनी तर नक्कीच.
एखाद्या देशात/ शहरात नवीन आल्यावर अनावधानाने एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि नको त्या आठवणी मिळतात, म्हणून सावधगिरीचा इशारा.
19 Oct 2016 - 12:01 am | श्रीगुरुजी
मी अटलांटाच्या रोझवेल नावाच्या उपनगरात जवळपास ३ वर्षे वास्तव्य केले होते. रेसीझमचा कधीही त्रास झाला नव्हता. रेसीझमचा फटका कोलोरॅडो स्प्रिंग्ज मध्ये बसला होता. अमेरिकेतील इतर भागात रेसीझम तसा क्वचितच दिसतो.
19 Oct 2016 - 7:11 am | जॅक डनियल्स
टेनसी मध्ये कॉलेज ला प्रवेश मिळाला तेंव्हा सगळे न्यूयोर्क चे मित्र मला रेसिस्त राज्यात जाऊ नको म्हणून बजावत होते. तरी पण मी आलो. माझी युनिव्हर्सिटी बायबल बेल्ट च्या मध्यभागी (कुकविले) आहे. आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये फक्त ~३५ भारतीय आणि त्यातील २-३ मराठी मुले-मुली. २०१२ पर्यत dry county होती (फक्त बियर मिळायची ) - दारू आणायला १५ मैल जावे लागायचे.
एवढे सगळे असताना मी ७ वर्ष खूप मजा केली. कंट्री बार मध्ये प्रत्येक विकेंड ला जेडी -कोक आणि पूल टेबल असे अनेक वर्ष समीकरण होते. पण कधीच कोणाचा त्रास नाही झाला.केमिकल इंगीनेरिंग करत असल्यामुळे सगळे technicians हिलीबिली कंट्री होते, त्यांनी एवढी मदत केली म्हणून शिक्षण पूर्ण झाले. भारतीयांना तिकडे पण खूप रिस्पेक्ट आहे. कधी तरी (१-२ वेळा ) अनुभव आले पण ते रेसिझम पेक्षा व्यक्तिगत जास्त होते.
मी तर सांगीन की जुने अमेरिकन कल्चर अनुभायचे असेल तर सदर्न स्टेट मध्ये राहायला पाहिजे.
खळफट्याक च्या बाबतीत बिलकुल मत चांगले नाही पण काही झाले तरी डेमोक्रॅटिक कडे जायचे नाही यामुळे त्याला मते देतात - असे मला एका कंट्री माणसाने सांगितले होते.
19 Oct 2016 - 2:00 am | वीणा३
घरी करून खायची तयारी असेल तर बरेच पैसे वाचतात पण कष्ट लागतात .
कोठेही जाताना घरातून बेसिक मसाले (हळद / हिंग / जिरं / मोहरी / एखादा घरातला मसाला ) छोट्या डब्यात (चमचा सकट) घेऊन जावीत. बरेचदा इथे छोट्या प्रमाणात गोष्टी मिळत नाहीत आणि एकट्या माणसाला जास्त लागत नाही, पैसे वाचवण्याच्या दृष्टीने बरं पडत.
कमीत कमी कष्टात कुठले अन्नपदार्थ बनवता येतील त्याची माहिती घ्या . बहुतेक वेळा बाहेरच जेवण होईल तरीही कधीतरी कंटाळा येतो. अंडी, केळी, फळं, ब्रेड, दूध - रोज खायला सांगा, => चांगला आहार + पैसे वाचतात + कष्ट कमी.
जाताना बरोबर पराठे / चिवडा लाडू घेऊन जा, सुरवातीला इथलं अन्न आवडत नाही, घरची चव असलेलं अन्न बरं पडत.
इंडियन दुकानात बऱ्याच इन्स्टंट गोष्टी (२-५$) मिळतात, preservatives असतात त्यात, पण एक स्वस्त पर्याय.
बाहेरचं खाताना जिथे जाणार असाल तिथे आधी बघा कि काही ऑनलाईन कूपन आहेत का. कधी कधी रेस्टोरंटस एका entree वर काही पैसे ऑफ / एकावर एक फ्री अशी कूपन देतात. कुठल्याही खरेदी आधी www.groupon.com चेक करा. साधारणपणे एका माणसाचे २ वेळा बाहेर खायचे १०-२०$ च्या दरम्याने होतात.
काही इतर सूचना:
१. जाताना Tide / शाम्पू / moisturizer / तेल / टूथपेस्ट / कंडिशनर / फेसवॉश इ. चे सॅशेस / छोट्या बाटल्या घेऊन जावेत
२. इन्शुरन्स अत्यावश्यक (बहुतेक हि काळजी कंपनी घेईल, पण बघून घ्या )
३. साधारण हवा कशी आहे त्याप्रमाणे थंडी चे कपडे बरोबर घेऊन जावेत
४. स्वतःची छत्री आणि लॅपटॉप ची बॅग (शक्यतो पाठीवरची) न्यावी. मला क्लायंट ने लॅपटॉप दिला पण बॅग नाय दिली, भर थंडीत बस मधून प्लास्टिक च्या पिशवीतून लॅपटॉप घेऊन फिरत होते. माझा सहकारी नेमका सुट्टी वर गेला होता, तो येई पर्यंत हा घोळ चालूच होता.
५. आसपास डॉलर स्टोअर शोधा, बऱ्याच गोष्टी स्वस्त (१-२$) पर्यंत मिळतात. मात्र, स्वस्त असल्या तरी, खायच्या गोष्टी तिथून घेऊ नका.
६. बाहेर फिरायला जाताना सफरचंद / बिस्कीट / काकड्या / चीझ सँडविच इ गोष्टी बरोबर ठेवा. पहिल्यांदीच येणाऱ्या लोकांना इथल्या बऱ्याच पदार्थांच्या चवी आवडत नाहीत. त्यामुळे हे बरोबर ठेवलं कि नवीन पदार्थ try करता येतात नाही आवडले तर उपाशी राहायला लागत नाही.
७. ऑफिस मध्ये हाताने खाणं टाळा, बऱ्याच सहकार्यांना किळस वाटते. आपल्या पद्धतीचा अभिमान वगैरे ठीके पण ज्या लोकांबरोबर वर्ष काढायचं आहे त्यांचं आपल्याबद्दल "अस्वच्छ" असं मत शक्यतो होऊ देऊ नये
19 Oct 2016 - 2:02 am | वीणा३
बेसिक सगळी औषध बरोबर न्यायला सांगा, सर्दी, खोकला, ताप आणि खास करून पॉट-बिघडणे.
19 Oct 2016 - 6:45 am | जॅक डनियल्स
माझे शिक्षण झाल्यावर आम्ही टेनेसी वरून दुलुथ (अटलांटापासून ३० मैल उत्तर पूर्व ) ला २ महिन्यापूर्वी नोकरीनिमित्त आलो. तसे त्यामुळे मी पण इकडे नवीनच आहे पण इकडे यायच्या आधी रिसर्च करून आलो.
अटलांटा गावात नोकरी असेल तरी सगळे लोक साधरण पणे आजूबाजूच्या गावात राहतात. कारण गावात भाडे खूप आहे. साधारण पणे भारतीय - Marietta,alpharetta, duluth, lawrenceville या भागात राहतात. Marietta,alpharetta या गावात सगळ्यात जास्त असतील. ही सगळी गावे जवळ जवळ आहेत. त्यामुळे नोकरी जिकडे असेल तिकडे घर घेणे कधी पण सोयीचे कारण म्हणजे इकडचा बेक्कार ट्राफिक - टेनेसी मध्ये ३५ miles/hr ला लोक ३४ miles/hr ने चालवतात तर इकडे ५५ miles/hr ने चालवतात. त्यामुळे ट्राफिक जाम खूप कॉमन आहे.
कल्चर खूप कॉस्मो आहे, माझ्या गावात तर जास्त आशियाई आणि सोउथ अमेरिकन लाटिन जनता आहे. त्यामुळे खाण्यचे आणि शॉपिंग चे (इंडिअन स्टोर खूप आहेत) खूप जास्त पर्याय कमी किमतीत उपलब्ध आहेत. टेनेसी च्या मानाने स्वस्त आहे. माझ्या गावात चांगल्या सोसायटी (सेफ नेबरहूड) मध्ये २ bhk ११०० पासून मिळून जाते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हवामान - उन्हाळा अगदी पुण्यासारखा आहे, हुमिड नाही पण कोरडा ...थंडी अजून अनुभवली नाही पण बर्फ पडत नाही आणि पडला तर सुट्टी मिळते.
मला कधी पण व्यनी करा .
1 Dec 2016 - 1:36 pm | टवाळ कार्टा
संपादक मंडळाला विनंती आहे की आता हा धागा उडवावा...योग्य ती माहिती मिळाली...मदतीबद्दल सर्वांचे आभार
1 Dec 2016 - 1:42 pm | मोदक
धागा र्हावदे हो मालक.. आणखी कुणाला तरी उपयोगी पडेल.