नोटा बंदी व परिणाम

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
17 Nov 2016 - 7:34 pm
गाभा: 

नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत.

ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल.

मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.

एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे.

इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

प्रतिक्रिया

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Nov 2016 - 8:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

जाऊ द्या हो! ते दोन 'लक्ष' मूळ मुद्द्यावरून 'लक्ष' उडवण्यासाठी होते हे तुम्ही 'लक्ष' वेळा सांगितले तरी त्यांच्या 'लक्षा'त नाही यायचे! त्यामुळे नवीन मुद्द्यांच्या प्रतीक्षेत राहण्याशिवाय पर्याय नाही.

ट्रेड मार्क's picture

18 Nov 2016 - 9:41 pm | ट्रेड मार्क

जर का ते डिलिव्हरीचे पैसे असतील तर मग पावती असायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे जकातनाक्यावर पावती दाखवायला लागते. जरी तिथे पण रोख पैसे (लाच) देऊन काम होत असेल असे म्हणले तरी १००% होईलच अशी खात्री कोणीच देऊ शकणार नाही. अजून एक तोटा म्हणजे विमा वगैरे काढता येणार नाही. २ लाख ते २० लाख एवढ्या मोठ्या किमतीचा माल विम्याशिवाय नेणे फारच जोखमीचे आहे. त्यामुळे पावती असायला पाहिजे आणि जर असेल तर ही रोख रक्कम काळा पैसा नसावा, म्हणजेच तो बँक खात्यात भरण्यात अडचण यायचं काही कारण नाही.

राहता राहिला प्रश्न ड्रायव्हरच्या रोजच्या खर्चाचा. यात

खाणे पिणे - नेहमीचा मार्ग असेल तर ढाबेवाले ओळखीचे असतात, त्यामुळे उधारी नेहमीच चालत असेल. जरी नसेल तरी ड्रायवर आणि क्लीनर कडे फक्त आणि फक्त ५००/१००० च्याच नोटा असतील हे गृहीत धरणे म्हणजे फारच झालं. विविध ठिकाणी वाटण्यासाठी (लाच म्हणून) बरेच सुट्टे पैसे ठेवतात.

डिझेल - पेट्रोल पंपावर ५००/१००० च्या नोटा स्वीकारल्या जाव्यात असे निर्देश आहेत

टोल - बंद आहेत

अजून काय असेल ते सांगा, आपण त्यांचे कष्ट निवारणाचा प्रयत्न करू.

संदीप डांगे's picture

19 Nov 2016 - 2:29 am | संदीप डांगे

ओ संपत भाऊ, कशाला तुम्ही वाद घालताय कोण जाणे? आपण रुपाली पाटील (नाव बदलले आहे) ने अबोर्शन करण्याचं नक्की काय कारण ह्यावर वाद घालूया... ;)

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 6:41 pm | मराठी कथालेखक

जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.

काही उपाय (आधी योजलेले , काही आता करत आहे)
मी बहूधा ATM मधून पैसे काढताना ५००० असे न काढता २०००,२०००,१००० असे काढत असे कारण ICICI च्या ATM मधून बहूधा (५०० पेक्षा मोठी) रक्कम काढताना १०० च्या पाच नोटा यायच्या , बाकी ५०० च्या. त्यामुळे १०० च्या नोटांचा बर्‍यापैकी साठा माझ्याकडे असायचा. त्यामुळे अगदी ९ तारखेलाही परिस्थिती हातघाईवर आली नव्हती.
नंतर काही रकमेच्या नोटा बदलल्याने सुस्थितीत होतो.
पत्नीने तिच्या एका मैत्रीणीस ५०० रुपये उधार दिले. मला दुसरे वेळेस नोटा बदलणे शक्य नसल्याने ऑफिसमधील एका सहकार्‍यास सांगितले. तिला स्वतला नोटा बदलवायच्या नव्हत्या त्यामुळे तिने माझ्या नोटा बदलून दिल्यात. या संकटाच्या समयी एकमेकांना मदत मागण्यास संकोच करु नये, तसेच शक्य असल्यास कुणाला आवर्जुन मदत करावी.
आता काही भाजीवाल्यांनी paytm द्वारे पैसे स्वीकारण्यास सुरु केले आहे.
मी आज ऑफिसबाहेरील टपरीवर (जिथे चहा, वडापाव ई करिता २०-३० रुपये खर्च होतात) paytm द्वारे पैसे स्वीकारण्यास सुचवले आहे. बघू सोमवारपर्यंत काही करतो का ते.
बाकी थोडी काटकसर चालू आहे, निदान जिथे रोखीनेच पैसे द्यायचे आहेत तिथे खर्च आवरते घेतले आहेत.

सप्तरंगी's picture

18 Nov 2016 - 8:00 pm | सप्तरंगी

असे ट्रकचालकाकडे असलेले २०किंवा कितीही लाख कसे बदलायचे किंवा deposit करायचे यावर उपाय सुचवणे म्हणजे आपल्या ज्ञानाचे क्षितिज नको त्या ठिकाणी विस्ताराणे नसेल का, म्हणजेच एका अर्थाने काळा पैसा खपवायला मदत करणे !
"लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही" हे चांगले आहे, आता तरी अडकतील असे लोक.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 8:11 pm | संदीप डांगे

संपादक मंडळ,

भारतात आतापर्यंत सफेद कारभार करणाऱ्या कोणालाही कसलाही त्रासदायक अनुभव आल्याची एकही घटना घडलेली नाही, तसं काही होण्याची 0 टक्के शक्यता असल्याने धाग्याचा मूळ उद्देश व उपयुक्तता शिल्लक राहत नाही. त्यामुळे धागा अप्रकाशित करावा ही विनंती!

धन्यवाद!

मोदक's picture

18 Nov 2016 - 8:21 pm | मोदक

असहमत.

"दिशाभूल करणारी विधाने केल्यानंतर आणि असंबद्ध उदाहरणे दिल्यानंतर आंतर्जालावर नक्की कसा प्रतिवाद होतो" याचे उदाहरण म्हणून हा धागा अप्रकाशित करू नये अशी नम्र विनंती.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 8:47 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११

गामा पैलवान's picture

18 Nov 2016 - 11:33 pm | गामा पैलवान

मोदक,

तुमच्या युक्तीवादशी तटस्थ आहे, मात्र धागा अप्रकाशित करू नये या मताशी सहमत.

ट्रक म्हणजे आपण बालवाडीत ऐकलेल्या पहिल्यावहिल्या सामिष विनोदात वापरलेले रूपक धरून धागा (स्वत:च्या जबाबदारीवर) पुनरपि वाचावा.

आ.न.,
-गा.पै.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Nov 2016 - 8:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणाकडे एक कोटी रुपये आहेत काय १०० १०० च्या नोटांमधे? एक ट्रक घ्यावा म्हणतो. ५ फेर्‍यांमधे मुद्दल आणि ६ व्या फेरीत व्याज फेडिन म्हणतो.

पार्टनरशिपसाठी व्यनि करावा.

रच्याकने शाळेत कॉलेजात जाउन गणित गचकलं असल्याने साधं गणित घालतो ऑ.

एका ट्रकात २० टण तूरडाळ मावते. तूरडाळिची ख्रेदी कींमत ६० रुप्ये किलो आहे. सर्कारी गोदामातूण णीघुण डेस्टिणेषण पर्यंतचं अंतर १००० किलोमीटर आहे. प्रतिकिलोमिटर ट्रकास चालवायला ३३ रुपडे खर्च येतो. पुर्ण फेरीमधे टोलवाटोलव क्रुन १०००० रुपडे खर्च येतो. ट्रकड्रायव्हरास मालक २०,००,००० रुपये हातखर्चास देतो. डाळ उतरवायचा खर्चं प्रतिटनास ३५० रुपये येतो. तर २० टण डाळ एकरकमी घेणार्‍या ब्रेक इव्हन कॉष्टीत डाळ इकायची असल्यास किती रुपयास पडेल? वीष्वासु ट्रक डायवर मालकास किती रुपये परत करेल?

-----

१० टक्के कमिशण दिल्यास ट्रक विश्वासाने पोचवले जातील ह्याची णम्र णोंद घ्यावी.

-----

औषधी गोळ्यांच्या ट्रकास २% सूट.

सचु कुळकर्णी's picture

18 Nov 2016 - 9:16 pm | सचु कुळकर्णी

झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत.
सब के सब कमाल के न्यूज चँनल है भाई

संदीप निर्णयाच्या विरोधात आहे असे कुठेच नाहि आढळले त्याने धागा काढायचा उद्देश सुध्दा स्पष्ट केला होता.

ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा

पण ट्रक गाळात फसला अन चर्चा तीथेच थांबली. आता जितका दाब अँक्सिलरेटर वर पडेल चाक आणखीनच फसत जाईन ना बाप्पा.

जँक अन टॉमि च्या शोधात
होबासराव

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Nov 2016 - 9:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी सहमत. अगदी फर्स्ट हँड अनुभव घेउन लिहिल्याने लेख अगदी छान जमलाय. वास्तविक पहाता एवढ्या किरकोळ रकमा नेण्यास ट्रकड्रायव्हर तयार व्हावेत म्हणजे ते दिल दर्या वगैरे वगैरे आलचं. :)!!! बाकीचे आमच्यासारखे अतिसामान्य बुद्धिमंद लोकं कधी घराबाहेर नं पडल्याने म्हणा किंवा स्ट्रीट स्मार्ट नसल्याने त्यांना हे व्यवहार कसले कळायला. असेचं फॅक्ट्सनी भरलेले, अनुभवगोळीने समृद्ध लेख वाचायला आम्ही मिपावर येत असतो. :)!!!

(आईशप्पथ उपरोध नसलेली प्रतिक्रिया)

कवितानागेश's picture

19 Nov 2016 - 12:52 am | कवितानागेश

मला वाटते आत्ता पर्यंत तो ट्रक वाला सगळ्या नोटा गंगेच्या दोन्ही बँक्स वर सोडून आणि ट्रक देखील गंगेत सोडून पायी हिमालयात निघून गेला असावा!

ही उपमा मनमोहन सिंगांना उद्देशून आहे का? =))

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2016 - 9:19 am | टवाळ कार्टा

हि काडी आहे का?

आशु जोग's picture

19 Nov 2016 - 10:55 am | आशु जोग

विषय महत्त्वाचा आहे, लोक अकारण फाटे फोडून विषयांतर करत आहेत.

डिझेल, दुरुस्ती, टायर बदलणे, रोजचे खाणे पिणे लक्षात घेतले तर देशाची दोन टोके गाठणार्‍या ड्रायवरला प्रचंड पैशाची गरज असते हे नक्की. एवढी रक्कम रोखीऐवजी अनेकजण एटीएम कार्डही वापरत असतील.

अर्थात
अशावेळी या लोकांची गैरसोय झाली असेल पण निरनिराळ्या ठिकाणी ओळखीपाळखी असतात. तिथे मदत मिळू शकते.

संदीप डांगे's picture

19 Nov 2016 - 11:19 am | संदीप डांगे

सनी लियोन प्रकरणाची आठवण झाली की नाही लोकहो??

=)) =))

कठिण समय येता कोण कामास येते ;)

कठिण समय येता कोण कामास येते ;)

खटपट्या's picture

20 Nov 2016 - 7:19 am | खटपट्या

चांगली चर्चा. फक्त चर्चा ट्रकची होती की नोटाबंदीची ते सांगा.

सतिश गावडे's picture

20 Nov 2016 - 8:57 am | सतिश गावडे

वीस लाख रुपये घेऊन निघालेला ट्रक परिघाच्या बाहेर गेला का?

उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल.

या प्रतिसादामधील.. पुढील भागाच्या अनुषंगाने एक प्रश्न.

उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे

या धाग्यावरील काल्पनिक उदाहरणामधील "ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे" मागितलेला प्रतिसाद मला मिळाला नाही किंवा कळाला नसेल.

असा प्रतिसाद कृपया कोणी शोधून द्याला का..?

टवाळ कार्टा's picture

22 Nov 2016 - 5:52 pm | टवाळ कार्टा

तो टरक डायवर ईस लाक घीउन पलाला

एक नाव राहिलं बहुतेक!

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2021 - 6:55 pm | श्रीगुरुजी

तार्किक चूक. ट्रक्सची किंमत २० लाख आहे. चालकांच्या खिशात २० लाख नव्हते.

अमर विश्वास's picture

5 Jun 2021 - 7:57 pm | अमर विश्वास

खिशातल्या वीस लाखाचे हे ट्रक घेतले असतील

सुबोध खरे's picture

5 Jun 2021 - 8:07 pm | सुबोध खरे

हैला

चार वर्षांनी धागा परत वाचून हसून हसून पुरे वाट झाली आहे.

चलन फुगवट्याप्रमाणे आता ट्रकवाल्याकडे ३० लाख रुपये असायला हरकत नाही.

डांगे अण्णा ऐकताय ना?

डाम्बिस बोका's picture

15 Jun 2021 - 9:51 pm | डाम्बिस बोका

आज काही वर्षांनी नोटबंदी चे त्यावेळी सांगितलेले फायदे वाचून आपली कशी फसवणूक आणी हसवणूक झाली ते कळते.
त्यावेळी मी नोटबंदी चा प्रचंड समर्थक होतो. देशाच्या कल्याणासाठी आपण काहीतरी करत आहोत असे वाटायचे.
ह्याचा एक वैयक्तिक फायदा मात्र झाला. आता अशा चमकोगिरी योजनांवर चटकन विश्वास ठेवत नाही.
चीन मधून udhoyg भारतात येणार, ५ Trillion ची इकॉनॉमी , डिजिटल इंडिया, Atymanirbhay bharat ह्यात ९०% marketing आणी केवळ ५-१०% possibility गृहीत धरतो. अर्थात सगळ्या गोष्टी यशस्वी व्हावीत असे मनापासून वाटते.

स्वधर्म's picture

15 Jun 2021 - 11:15 pm | स्वधर्म

काळा पैसा आणि काळे व्यवहार यात काही फरक पडला असे जाणवत तर नाही. मी पण तुमच्याप्रमाणेच आनंदलो होतो, पण २००० आणि ५०० च्या नोटा काढणार असल्याचा निर्णय जाहीर झाल्यावर ताबडतोब जमीनीवर आलो. खरा तसा उद्देशच नव्हता हे लक्षात आले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2021 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>आज काही वर्षांनी नोटबंदी चे त्यावेळी सांगितलेले फायदे वाचून आपली कशी फसवणूक आणी हसवणूक झाली ते कळते.

सहमत....!

-दिलीप बिरुटे

ते फक्त हिंदुत्व चे कातडे घेतलेले होते.हिंदुत्वाची गरज म्हणून bjp sarkar चे ते आंधळे,मूर्ख पणाचे समर्थन होते.
हे सरकार हिंदू च काय कोणाचेच भले करणारे नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे.
Notbandi नी देशाचा काहीच फायदा झाला नाही.
मात्र प्रचंड नुकसान झाले.

मुक्त विहारि's picture

16 Jun 2021 - 11:37 am | मुक्त विहारि

हे सरकार हिंदू च काय कोणाचेच भले करणारे नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे....

हे नक्की का?

--------

महाराष्ट्र राज्यातील काही घटना वाचल्या असतीलच ....

1. साधू हत्याकांड

2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली

3. वीज बिल आणि नुकसान भरपाई बद्दल दिलेली पोकळ आश्र्वासने

4. काही विचारले की, बाप काढायचा

असा एकही महिना जात नाही की, ह्या राज्य सरकारने केलेली, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, ताटात येत नाही...

-------

हेमंत सुरेश वाघे's picture

19 May 2023 - 8:28 pm | हेमंत सुरेश वाघे

परत नवीन नोट बंदी झाली आहे !
आता नव्याने नवीन रडणे!

पण मला चिंता आहे ट्रक वाल्यांची
आता तर महागाई पण वाढली आहे

तर काय करणार ते तीस लाखांचे ?
कसे मॅनेज करणार !

थांबा हो.. अजून टूलकिट तयार झाले नसणार.

पोस्टमन BBC कडून टूलकिट घेऊन येईल.. मगच सामुदायिक रडारड सुरू होईल.

मला मागच्या आठवड्यात रेल्वेत भेटलेला एक जण सांगत होता की दोन हजारांची नोट बंद होतेय. जाहीर होईलच लवकर.

२०१६ पासून लोकं हे बोलत आहेत की २००० च्या नोटा बंद होणार आहेत.

ATM मधून फार क्वचित २००० च्या नोटा मिळत असत. बाजारातले सर्क्युलेशन पण रोडावले होते.

त्यामुळे हे कधी ना कधी होणारच होते.