नोटा बंदी व परिणाम

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
17 Nov 2016 - 7:34 pm
गाभा: 

नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत.

ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल.

मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.

एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे.

इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

प्रतिक्रिया

मोदक's picture

17 Nov 2016 - 7:55 pm | मोदक

उत्तम धागा.

धर्मराजमुटके's picture

17 Nov 2016 - 8:15 pm | धर्मराजमुटके

फर्स्ट हँड अनुभव !
ठाण्यात अशाच एका ट्रकवाल्याकडून एका कायदा रक्षकाने च्यापाणी मागीतला. ट्रकवालयाने ५०० ची नोट काढून देताच तोडपाणीचे पैसे वळते करुन घेऊन उरलेली रक्कम पैसे परत केली. रोज १०-१०, २०-२० रुपये जमा केल्याची मेहनत फळाला आली.

काल माझी बाईक नो पार्कींगमधून उचलून नेली. पोलिसांनी चक्क ५०० ची नोट स्वीकारुन उरलेले २०० रुपये कोणतीही खळखळ न करता परत दिले. वाहतूक पोलिस अधिकृतरित्या ५०० /१००० ची नोट स्वीकारु शकतात काय याची कल्पना नाही.

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2016 - 9:27 pm | प्रसाद गोडबोले

हो पुण्यातही आर टी ओ ने अक्षरश: हप्ता वसुली प्रमाणे गाड्या उचलायला सुरुवात केली आहे . शिवाय काहीही फालतू कारणे दाखवून पैसा उकळत आहेत, परवा आमच्या मित्राला इन्शुरन्स ची ओरिजिनल कॉपी सोबत का बाळगली नाही म्हणून 200 चा बांबू लावला , त्याने घरी जाऊन ओरिजिनल कॉपी आणून दाखवली तरीही ! म्हणाले गाडी उचलावी लागली म्हणून दंड!
( कायदेशीर दृष्ट्या ओरिजिनल सोबत बाळगणे गरजेचे नसते, पोलिसाने कागदपत्रे जमा करायला 15 दिवसांची मुदत देणे अपेक्सित असते )

असो .

संदीप डांगे's picture

17 Nov 2016 - 9:36 pm | संदीप डांगे

वसुली रोडावली त्यामुळे आता भरपाई करावीच लागेल!

१० तारखेचा अनुभव वेगळा होता. ५०० ची नोट घ्यावी लागते म्हणून पोलीस पावतीच फाडत नव्हते. गाड्या उचलणार्‍या लोकांना पण सुट्टी दीली होती. आता पोलीस ५००/१००० च्या नोटा घेउन बँकेत भरत असतील कारण त्यांना लाइन लावावी लागत नसेल.

रच्याकने - टोल घ्यायला सुरवात केली का ?

रच्याकने - टोल घ्यायला सुरवात केली का ?

अजून नाही म्हणे.

अभिजित - १'s picture

22 Nov 2016 - 8:27 pm | अभिजित - १

हि टोलमाफी वगैरे नसून, टोल पुढे ढकलण्यात येणार आहे. म्हणजे जर का ३१ dec , २०१९ ला टोल कॉन्ट्रॅक्ट संपणार असेल आणि १५ दिवसाची माफी सरकारने दिली असेल तर. १५ Jan , २०२० पर्यंत टोल स्वीकारायला परवानगी.

सतिश गावडे's picture

17 Nov 2016 - 9:45 pm | सतिश गावडे

संदीपचा मुद्दा योग्य वाटतो. प्रतिसादातील दोन उदाहरणे शहरातील आहेत. त्यांची तुलना "लाईन"च्या ट्रकबरोबर होऊ शकत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2016 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम कल्पनेवरचा धागा.

प्रतिसादकांनी समस्येबरोबर तिच्या निराकरणासाठी काही शक्य उपाय सुचवले तर धाग्याची उपयुक्तता वाढेल. हे उपाय त्या समस्येत अडकलेल्या आपल्या माहितीतल्या लोकांना सांगू शकू व जमल्यास त्या माहितीच्या आधारे त्यांची मदतही करू शकू.

संदीप डांगे's picture

17 Nov 2016 - 10:19 pm | संदीप डांगे

धन्यवाद! अगदी हाच विचार आहे यामागे!

गावडे सर, बरोबर ओळखलंत!

धर्मराजमुटके's picture

17 Nov 2016 - 10:39 pm | धर्मराजमुटके

या धाग्यावर अवांतर आहे पण मला टोईंग व्हॅनची पावती बघून नेहमी प्रचंड प्रमाणात चीड येते. एक टोईंग व्हॅन एका वेळेस कमीतकमी १० दुचाकी उचलत असेल आणि दिवसाकाठी कमीतकमी २० फेर्‍या मारत असेल. महिन्याचे अगदी २५ दिवस व्हॅन चालत असेल तरी मासिक उत्पन्न ५ लाखाच्या आसपास असावे. मग असे असतांना हे लोक पावतीवर सर्व्हिस टॅक्स नंबर असलेली पावती का देत नाहीत ?
किंवा जर वार्षिक उत्पन्न १० लाखाच्या आसपास असेल तर टॅक्स नंबर घेणे बंधनकारक नाही पण मग तसी सुचना सर्व्हिस बिलावर छापणे आवश्यक असते ना ?
कि ही सरकारच्या संगनमताने चाललेली चोरी आहे काय ? किंवा माझी समजूत चुकीची आहे ?

खटपट्या's picture

18 Nov 2016 - 12:41 pm | खटपट्या

टोव्हींग व्हॅन ही भाड्याने वाहतुक पोलीसांना दीलेली असते. दंडाची पावती पोलीसदादा देतो ती सरकारची असते. गाड्या कीतीही उचला टोव्हींग मालकाला ठरलेलेच पैसे मिळतात. बर्‍याच वेळेला या व्हॅन मोठ्या पोलीस अधीकार्‍यांच्या असतात.

बाब्बो..संदीप भौ नी तर नाव घेऊन मुशकील करून टाकली आमचीवाली. एकंदरीत ज्ञानाचं म्हणाल तर आमचं कसं झालाय ना संदीप भौ...ते म्हणतात ना एक ना धड भाराभर चिंध्या...!
असो.

तुम्ही दिलेल्या परिस्थितेचे जमेल तसे विश्लेषण करतो...सांभाळून घेजा..
असं समजा की आपले गुरुभादूरसिंग ८ नोव्हेंबर ला संध्याकाळी मुंबईहून २ लाखाची रोकड घेऊन निघाले. रात्री झालेल्या घोषणेची त्यांना एका पेट्रोल पंपावर थांबेपर्यंत काहीही कल्पना नाही. त्याविषयी कळताच गुरुबहादूरसिंगांनी हादरायचे काहीच कारण नाही(तसेही ट्रक ड्रायव्हर मानसिक दृष्ट्र्या कणखर असतातच. अर्थात त्यांना तुमचे हे मानसिक वगैरे शब्द माहिती नसतात!). काहीही झाले तरी त्यांच्या जवळची रोकड ही अवैध ठरत नाही. कारण त्यांच्याजवळ मालाचे बिल आणि एल आर कॉपी आहे (एल आर म्हणजे कोणता माल कुठून कुठे जातो आहे ह्याचे ट्रान्सपोर्टर ने केलेले बिल). रस्त्यात पोलिसांनी पकडले आणि पाचशे -हजाराच्या नोटा कुठे घेऊन चालला असे विचारले तरी ह्या कागदपत्रांमुळे ही अवैध वाहतूक नाही हे सिद्ध होते. दोन लाख रोकड ही रस्त्यातील खर्चासाठी केलेली तरतूद आहे हे पोलिसांना पटवून देता येते.

राहिला प्रश्न गुरुबहादूर सिंग ह्यांच्या खर्चाचा...तर साधारणपणे ट्रक ड्रायव्हर लोकांचे खाण्यापिण्याचे धाबे ठरलेले असतात. आणि तिथे उधारी वगैरे अतिशय सामान्य गोष्ट आहे. गुरुबहादूर सिंग यांना मूळ समस्या आहे ती पेट्रोल आणि रोड टॅक्स किंवा एंट्री टॅक्स ची. आणि हा प्रश्न सद्ध्या कितीतरी गुरुबहादूरसिंगांना भेडसावत आहे. काही पेट्रोल पापं वाले पाचशे -हजारांची नोट स्वीकारतात. पण एंट्री टॅक्स दिला नाही तर पुढे जाताच येत नाही. अश्या वेळी ट्रक रस्त्याच्या कडेला लावून तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे ह्याशिवाय काहीही पर्याय नाही. नोटबंदीमुळे देशातले कितीतरी व्यवहार बंद आहेत त्यात आणखी एका गुरुबहादूरसिंगांची भर...बाकी काहीही नाही...

आणि मला विचारलं तर नोटबंदी असो वा नसो, ट्रान्सपोर्ट हा अतिशय बेभरवश्याचा धंदा आहे. असल्या कितीतरी समस्या गुरुबहादूरसिंगांसमोर येत असतात. अश्या वेळी शक्य तो मार्ग काढून ते पुढे जातात. माल पोहोचवायला उशीर होतोय, आता काय होणार असे प्रश्न वैयक्तिक पातळीवर गुरुबहादूरसिंगांना पडत नाही. सोबत असलेला माल सुखरूप (आणि जमलंच तर वेळेवर) त्याच्या मुक्कामावर पोहोचवायचा आहे एवढेच त्यांना माहिती असते. आणि हे काम गुरुबहादूरसिंग इमाने -इतबारे करतात.

अवांतर - गुरुबहादूरसिंग त्यांच्या मालकाचे सोडून इतर कोणाचेही काहीही ऐकत नसतो. उदा. माल अर्जंट आहे. मुंबईहून कोलकात्याला चार दिवसात पोहोचला पाहिजे असं मुंबईच्या कंपनीने ठणकावून सांगितले तरी गुरुबहादूरसिंग आपल्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक जे सांगेल तेच करेल. म्हणजे मुंबईहून नागपूरपर्यंत पोहोचल्यावर मालकाने फोन करून जर कन्याकुमारीला जायला सांगितले तर आपले गुरुबहादूरसिंग कुठलाही विचार न करता तेच करतील !!

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 9:38 am | संदीप डांगे

आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 डिसेंम्बर पर्यन्त प्रत्येक एका व्यक्तीला एकदाच फक्त 2000 रुपये मिळणार आहेत. तसे पत्रक शाखेत लावले आहे.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 12:04 pm | सुबोध खरे

विशेष सूचना -- हे नोटा बदली करून मिळणारे पैसे आहेत स्वतःच्या खात्यातून काढायचे पैसे नव्हेत.
माहिती पूर्ण द्यावी हि विनंती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Nov 2016 - 12:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तपशिल बरेचं मिसलेले आहेत.

रोज २००० रुपये बदलुन मिळतील.

बाकी रोजचे पैसे काढायची लिमीट अजुनतरी बदललेली नाही. असे तपशिल नेमके विसरल्याने सरकारला गोळ्या द्यायची संधी डॉ.डांगेसरांना मिळते, तस्मात अधिकृत बातम्यांवरचं विश्वास ठेवा.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 1:46 pm | संदीप डांगे

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=44

फक्त एकदाच संधी ■ ५00 आणि१000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळसुरू असली तरी नाशिक जिल्ह्याच्या अग्रणी बॅँक असलेल्या बॅँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३0 डिसेंबरपर्यंत एका व्यक्तीला एकदाच ४५00 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. शुक्रवारपासून तर दोन हजार रुपयेच मिळणार असून, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बॅँक ऑफ महाराष्ट्रने या निर्णयाची प्रत टिळकपथ येथील शाखेमध्ये लावण्यात आली आहे.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 1:50 pm | सुबोध खरे

आपण कितीही पैसे बँकेत भरु शकता आणि एकावेळेस 1०००० काढता येतात. मग हे नोटा बदलीबद्दल रडारड कशाला?
चावटपणाचा बाजार आहे.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 1:53 pm | संदीप डांगे

ब्वॉर्र!!

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 2:03 pm | सुबोध खरे

LOL

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 2:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त नोटा बदलीतच काळ्याचा पांढरा पैसा होतो ना ? मग चेकने कितीका मिळेनात, काय उपयोग ? नाईलाजाने बोंब मारणे भाग आहे =))

सुखीमाणूस's picture

18 Nov 2016 - 3:02 pm | सुखीमाणूस

मेरा भारत महान

हतोळकरांचा प्रसाद's picture

18 Nov 2016 - 3:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

अगदी हेच म्हणतो मी!

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 3:22 pm | मराठी कथालेखक

तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी नोटा बदली करण्याचा प्रयत्न कार्यालयीन वेळेत करत होतो. माझे खाते icici बँकेत पण icici ची शाखा माझ्या कार्यालयाच्या जवळपास नाही. मग अशा वेळी जवळ असलेल्या इंदसइंड्च्या शाखेत नोता बदलाव्यात असा विचार केला. मागील आठवड्यात एकदा थोड्या नोता बदलल्या. पण या आठवड्यात पुन्हा बदलता आल्या नाही. त्यामुळे गैरसोय झाली.. यात मला काळ्याचे पांढरे करायचे होते वगैरे असे काही नाही...त्यामुळे पुर्ण कालावधित (म्हणजे ३० डिसेंबर पर्यंत) फक्त एकदाच पैसे बदलता येतील हा नियम त्रासदायक वाटतो आहे.

पण मला वाटते यात पुन्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल करतील.
आणि मुख्य म्हणजे १ डिसेंबरपर्यंत हा सगळा गोंधळ आटोपलेला असेल अशी आशा करुयात कारण महिन्याच्या एक ते दहा तारखांपर्यंत रोखीने खूप व्यहवार होत असतात. बर्‍याच ठिकाणी पगार देखील रोखीने होतात. तोवर पाचशेची नवी नोट बर्‍यापैकी उपलब्ध झालेली असेल अशी अपेक्षा आहे.

नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 डिसेंम्बर पर्यन्त प्रत्येक एका व्यक्तीला एकदाच फक्त 2000 रुपये मिळणार आहेत

खात्यातून फक्त २००० रूपये काढता येणार आहेत की २००० रूपये एकदाच बदलून मिळणार आहेत..?

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 12:27 pm | संदीप डांगे

'बदलून' मिळणारे आहेत!

मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात का..?

साहेब..'s picture

18 Nov 2016 - 12:31 pm | साहेब..

+1

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 1:47 pm | संदीप डांगे

हो, विसरलो पण जाणून बुजून नाही!

मोदक's picture

18 Nov 2016 - 2:36 pm | मोदक

=))

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 3:17 pm | सुबोध खरे

याला वैद्यकीय भाषेत Selective amnesia( निवडक विस्मरण) म्हणतात

सस्नेह's picture

18 Nov 2016 - 4:05 pm | सस्नेह

=))

अर्धवटराव's picture

19 Nov 2016 - 3:41 am | अर्धवटराव

.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 12:02 pm | सुबोध खरे

आपल्या तूटपूंज्या अनुभवातून आलेली अर्धीच माहिती.
सर्व गुरु बहादूर सिंग रस्त्यात बर्याच लोकांची वाहतूक करीत असतात त्याचे भाडे एस टीच्या भाड्यापेक्षा थोडे कमी असते. यामुळे गुरु बहादूर सिंगच्या जवळ सुटे पैसे भरपूर असतात. कोणत्याही हायवे वर उभे राहून "हात दाखवा आणि ट्रक थांबवा"
माझ्या एका मित्राचे १८ ट्रक आहेत, त्याच्या जवळ बसून एकदा जेवताना बऱ्याच गप्पा मारल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. सर्वच गुरु बहादूर सिंग सारख्या लोकांचे पगार २००६ साली ३८००-४००० होते. कारण लोईस आणि आरटी ओ वाल्याना चिरीमिरी देऊन( यात ट्रकचा "पास" ओकॅट्रॉय चुकवल्याचे पैसे हे सर्व मालकानी भरायचे असत) त्यांचे अशा वाहतुकीतून १०-१२,०००/- उत्पन्न होत असे त्यामुळे झाडून साऱ्या ट्रक ड्रॉयव्हरचे पगार कमीच असत.
अजून एक उदाहरण --माझा मित्र पुण्याच्या रहेजा कंपनीत संचालक पदावर आहे. तेंव्हा १९९५ मध्ये तो वरिष्ठ अभियंता म्हणून होता. त्यांच्या कोंढवा साईट वर वाळू घेऊन आलेल्या एका ट्रकवाल्याशी( नाव संपत) बोलत असताना त्याने विचारले कि तुला पगार किती. त्यावर संपत म्हणाला १८०० रुपये. माझा मित्र म्हणाला तुझे भागते कसे त्यावर तो हसला आणि म्हणाला साहेब तुम्ही माझ्या बरोबर चला.
एक दिवस माझा मित्र त्याच्या बरोबर ट्रक मधून दौंडला गेला(तेथे त्याचे काका राहतात). वाटेत भैरोबा नाल्याला त्याच्या ट्रक मध्ये ४० माणसे चढली. त्यांना त्याने दौंडच्या नाक्याला उतरवले. दौंडला त्याने ट्रक मालकाच्या घराशेजारी उभा केला. दहा वीस पावले चालून आपली मारुती गाडी घेतली त्यात माझ्या मित्राला बसवले आणि त्याच्या काकांच्या घरी पोहोचवले. जाताना म्हणाला साहेब मी रोज या ४० माणसांना सकाळी दौंडवर ट्रक मध्ये वाळू वर बसऊन पुण्याला नेतो प्रत्येकी १० रुपये. तेंव्हा एस टी चे तिकीट १७. ५० रुपये होते. दौंड नाक्यावर ५० रुपये आणि पुणे नाक्या वर ५० रुपये देतो. येताना परत तीच माणसे. ट्रक येताना रिकामा असतो.लोक वर्तमानपत्रावर बसतात/ झोपतात रोज माझी कमाई रुपये ६००/- फक्त. आयकर नाही
माझा मित्र म्हणाला हा पठ्या महिन्याला १८-२०,०००/- कमावतो तू डॉक्टर होऊन आणि मी इंजिनियर होऊन काय क्रांती केली?
तेंव्हा डांगे अण्णा
दिसतं तसं नसतं.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 12:26 pm | संदीप डांगे

तेंव्हा डांगे अण्णा
दिसतं तसं नसतं.

^^^ हे कशासाठी?

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 12:52 pm | सुबोध खरे

काळा चष्मा काढा असे लिहिण्या ऐवजी लिहिलं होतं
तुम्ही समजून घेतलं नाही म्हणून असं फोडून सांगायला लागतंय.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 1:49 pm | संदीप डांगे

मी काळा चष्मा लावल्याचे उगाच...
का बरे 'आ बैल मुझे मार' करत आहात?

मोदक's picture

18 Nov 2016 - 2:04 pm | मोदक

म्हण चुकली का? =))

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 2:05 pm | संदीप डांगे

लवकरच कळेल, :) ;)

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 2:19 pm | सुबोध खरे

चार दिवसांनी ?

मोदक's picture

18 Nov 2016 - 1:16 pm | मोदक

@ संदिप डांगे

तुम्ही "रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी" वर दिलेले कांही प्रतिसाद येथे एकत्र करत आहे. यावर तुम्ही लेख लिहून माझ्यासारख्या सामान्य जनतेचे अज्ञान दूर करावे ही नम्र विनंती.

************************************************************

संदीप डांगे - Fri, 11/11/2016 - 15:03

जसजसे पुढे जात आहोत, तसतसे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत.

बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक?

******

मोदक - Fri, 11/11/2016 - 19:02

>>>>बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक?

तुमच्या मते, सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक आत्ता बँकेच्या लाईनीमध्ये का उभे आहेत..?

>>>>सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत.

हे कशावरून ठरवलेत..?

******

संदीप डांगे - Fri, 11/11/2016 - 21:16

(प्रतिसादाचा कांही भाग डॉक्टर खरेंच्या प्रतिसादाला उत्तर दिलेला आहे.)

बाकी उर्वरित प्रतिसादासाठी स्टे ट्युन्ड!

************************************************************

संदीप डांगे - Fri, 11/11/2016 - 15:29

हा प्रकार म्हणजे कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस असा झालेला आहे, चार दिवसात व्यवहार ठप्प राहून किती नुकसान झालंय व हे नुकसान काळ्या पैशाच्या प्रमाणात किती आहे याची आकडेवारी येईल तेव्हा बोलता येईल. सविस्तर प्रतिसाद किंवा लेख चारपाच दिवसांनी लिहितो, बघूया!

************************************************************

संदीप डांगे - Sat, 12/11/2016 - 08:32

काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे प्रश्न वाचून "ब्रेड नै मिळत तर केक का खात नै तुम्ही लोक?" हा सुप्रसिद्ध प्रश्न आठवला!

******

मोदक - Sat, 12/11/2016 - 08:40

ही अशी वाक्ये हवेत आरोप करायला चांगली असतात, पण यामुळे साध्य काहीच होत नाही.

त्यापेक्षा तुम्हाला विचारलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही?

******

संदीप डांगे - Sat, 12/11/2016 - 09:35

देतो कि, चार दिवस थांबा तर...

************************************************************

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 2:17 pm | सुबोध खरे

चार दिवस होतील १२/११/२०२० ला १६+४=२०

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Nov 2016 - 8:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही अंदाज अपना अपना नामक सुप्परडुप्परहिट पिच्चर पाहिलाय का हो डॉक?

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 1:25 pm | मृत्युन्जय

उत्तम धागा. आपला परीघ किती छोटा आहे हे धागा वाचुन कळाले.

एखादा ट्रक ड्रायव्हर २० लाख रुपये घेउन निघु शकतो हे तर माझ्यासाठी कल्पनेतही शक्य नाही. म्हणजे मुळात ट्रक ड्रायव्हर कडे इतके पैसे असतात किंवा मालक त्यांच्यावर इतक्या पैशाचा विश्वास ठेवतो हेच अनाकलनीय आहे. माझ्या ओळखीचे काही ट्रक ड्रायव्हर आहेत ते सांगायचे की महाराष्ट्रातुन केरळ पर्यंत जाण्यासाठी मालका कडून ८ ते १० हजार मिळायचे. कधीकधी त्याहुन कमी आणी तेवढ्या पैशांसाठीही रस्त्यात दरोडेखोर हातपात तोडायला किंवा जीवे मारायला कमी करायचे नाहित.

इथे तर २० लाख घेऊन जाणारे ट्रक ड्रायव्हर्स आहेत असेही दिसते. त्यामुळे पैसा किती मातीमोल झालाय याची जाणीव झाली. शिवाय एक ट्रकभर माल देशाच्या एका कोपर्‍यातुन दुसरीकडे घेउन जाण्यासाठी २० लाख रुपये खर्च येतो हे वाचुन तर डोळेच फिरायची पाळी आली ( खर्चासाठी नको असतील तर कोणी कशाला इतका पैसा जवळ बाळगेल ना ? ).

शिवाय एका ट्रकामार्फत मालाची ने आण करण्यासाठी २० लाख खर्च येत असेल तर असे १० ट्रक बाळगणार्‍या माणसाला किती वर्किंग कॅपिटल लागत असेल? हे सगळेच गणित माझ्या आकलनशक्तीपलीकडचे आहे.

शिवाय एक ट्रक भरुन माल वाहतुक करण्यासाट्ठी २० लाख लागत असतील तर त्या वस्तुची किंमत किती प्रचंड वाढत असेल याचेही नीटसे आकलन होत नाही आहे.

आपल्याला अर्थशास्त्र थोडेफार कळते हा भ्रमाचा भोपळा आज फुटला आणि एक ट्रक ड्रायव्हर २० लाखाची कॅश बाळगतो केवळ सामानाच्या वाहतुकीसाठी हे बघता २० लाख म्हटल्यावर माझे डोळे जे विस्फारतात त्यामुळे आपला वकूब किती मर्यादित आहे याची देखील जाणीव झाली.

परवा ऑफिसमध्ये आम्हांला घेऊन जाताना कॅब ड्रायव्हर उवाच " काय सांगू आठवडा झालाय, माझ्या बॅंकेतून साडे़आठ नऊ लाखाची कॅश आणली होती, घरी सांगत होतो, लवकर जाऊन दागिने आणा, अप्ण घरच्या लोकांनी जायला उशीर केला आणि ९ ला ही बातमी. आता माझी सगळी कॅश फुकट झाली. "

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 2:08 pm | मृत्युन्जय

जर पैसे बँक अकाउंट मधुन काढुन आणले असतील तर ते परत बँक अकाउंट मध्ये जमा करता येतीलच की.

होय, तेच सांगितले त्याला पण त्याला तेच करायचे नाहीये.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 2:16 pm | मृत्युन्जय

म्हणजेच तो काळा पैसा होता. ज्याच्याकडे काळा पैसाच ९ लाख असेल तो किती धनवान असेल बरे?

यशोधरा's picture

18 Nov 2016 - 2:19 pm | यशोधरा

तूच सांग!

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 2:22 pm | मृत्युन्जय

माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे सर सांगु शकतील. त्यांच्या माहितीतल्या ज्या ट्रक ड्रायव्ह्वरला २० लाख घेउन फिरायची सवय असेल त्याच्याशी तुलना करुन काही माहिती देता येइल. अर्थात तो ट्रक ड्रायव्हर २० लाखाचा व्हाइट मनी घेउन फिरतो असे दिसते आहे (काळा असेल तर त्याची गैरसोय होते आहे अशी तक्रार करता येणार नाही) त्यामुळे तुलना होउ शकेल की नाही ते माहिती नाही. माझे तर डोकेच चालेनासे झाले आहे २० लाखाची गोष्ट ऐकल्यापासुन. त्यामुळे मी काय सांगणार?

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 2:33 pm | संदीप डांगे

LoL

कॅब ड्रायव्हरने मालकीची जागा विकली, ते पैसे बँकेत भरले जागेचे पैसे आलेत असे दाखवून, आता त्याला फ्लॅट घ्यायचाय, 20 लाखाचा, बिल्डर 10 लाख व्हाइट आणि बाकीचे रोख ब्लॅक मागतोय, त्याच्यासाठी आणलेत पैसे काढून!

बिल्डर जुन्या नोटा घेतो कि नाही हे अजून कळले नाही!

20 लाखाची गोष्ट... lol!

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Jun 2020 - 4:21 pm | चेतन सुभाष गुगळे

माझ्या बंधूंनी २०१० साली फ्लॅट विकत घेतला रु.३२ लाखात - पूर्ण चेक पेमेंट - फूल व्हाईट - नो ब्लॅक मनी.

त्याच बिल्डरच्या सासर्‍याकडून मी दुकान विकत घेतले २०१४ साली रु.३० लाखात - पुन्हा एकदा पूर्ण चेक पेमेंट - फूल व्हाईट - नो ब्लॅक मनी.

तुमच्या उदाहरणातील खरेदीदार २० लाखाच्या फ्लॅटकरिता निम्मे म्हणजे १० लाख रुपये ब्लॅकमध्ये का देतोय? तेही २०१६ मध्ये?

आम्ही तर दागिन्यांसाठी साडेआठ - नऊ लाख क्याश काढली हे ऐकूनच गार पडलो.

मार्मिक गोडसे's picture

18 Nov 2016 - 2:23 pm | मार्मिक गोडसे

म्हणजेच तो काळा पैसा होता.

एकदा जरी पैसा बँक सिस्टिमम्ध्ये गेला की त्या खातेदारावर इन्कम सोर्स दाखवण्याची जबाबदारी येते.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 2:33 pm | मृत्युन्जय

आणि इन्कम सोर्स असेल तर त्याला प्रॉब्लेम नाही येणार. त्या माणसाला पैसा परत बँकेत जमा करायचा नाही यातच सगळे आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 2:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

काढलेल्या पैशांची आता त्याच्या बँकेत नोंद झाली आहेच. कधी चौकशी झालीच तर ते पैसे कोठून आले व त्याचे करविवरण कुठे आहे हे प्रश्न पुढे येतीलच.

मार्मिक गोडसे's picture

18 Nov 2016 - 2:49 pm | मार्मिक गोडसे

त्या माणसाला पैसा परत बँकेत जमा करायचा नाही यातच सगळे आले.

तेच म्हणायचंय मला. आता त्या माणसाने ते पैसे पुन्हा बँकेत टाकले काय किंवा न टाकले काय त्याला इन्कम सोर्स दाखवावाच लागेल.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 1:46 pm | सुबोध खरे

LoL

नया है वह's picture

18 Nov 2016 - 2:18 pm | नया है वह

LoL

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 2:20 pm | संदीप डांगे

नोटाबंदीचे परिणाम

#DeMonetisation Compiled !

1.माओवाद्यांना दणका
2.काश्मीरमधील दगडफेक बंद
3. काश्मीरमधील शाळा जाळणे बंद
4.भ्रष्टाचारींनी नोटा जाळल्या
5.तूर दाळीचे भाव कोसळून ८० रु .
6. किराणा दुकान ,भाजीपाला फळ विक्रेते ,पानवाला ,चहावाला यांनी डेबिट कार्ड स्वॅपिंग मशिन बसवले
7.मनपा ,नगरपालिका ,ग्रामपालिका यांची विक्रमी करवसूली
8.वीज वितरण कंपनीची जुनी बाकी वसूल
9.औषध दुकानांत जोरदार विक्री
10. मेट्रो रेल मध्ये smart cards विक्रीत वाढ
11.अनेक व्यावसायिकांचे ४ वर्षांची जुने येणे वसूल ,वरून नवीन ऑर्डर मिळाल्या .
12.mobile wallets पेमेंटचा वापर वाढला
13. बॅंकांच्या तिजोरीत ७ लाख कोटींची वाढ .कर्जावरील व डिपॉझीटवरील व्याजदर कमी होणार .उद्योगाला कमी व्याजात भांडवल मिळणार .
14. बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाचे चेक किंवा ऑनलाईन पेमेंट .सगळा पैसा अगोदर बॅंकेत येणार .
15. प्रॉपर्टीतील काळ्या पैशाला ब्रेक यापुढे प्रॉपर्टी खरेदीसाठी के वाय सी आवश्यक .
16. प्रॉपर्टींच्या किमतीत 25% घट
17.लोकशाही आणखी भक्कम झाली . सर्व जाती धर्माचे लोक ,गरीब व करोडपती एकाच रांगेत उभे राहिले .भेद नष्ट
18.नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले .
19.उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीत काळा पैसा वापरू पाहणाऱ्या राजकीय पक्षांना दणका
20 जे एन यु मधील गायब झालेला नजीब आणि वन रॅंक वन पेन्शन चर्चा बंद
21. Rs.2000 च्या नोटेमुळे सरकारच्या प्रिंटींग खर्चात बचत
22.जाळलेल्या किंवा यापुढे चलनात न राहणाऱ्या नोटांमुळे सरकारची वित्तिय तूट कमी होणार .
21. ड्रग माफिया उध्वस्त
22.इन्कम टॅक्सच्या धाडींमुळे काळा पैसा नियंत्रणात
23.पोलिसांच्या नाकाबंदीमुळे काळा पैशाची वाहतूक बंद
27. खरं जीवन जगायला सुरुवात फालतू क्रिकेट मॅच व बॉलिवूड सिनेमे बंद . Facing real life !!!
28. हवाला धंदा मंदीत
29. बेटिंग ,सट्टा यांचे हाल
30. लोकांची मते मिळतील की नाही याची पर्वा न करता पंतप्रधान देशहितासाठी कडक निर्णय घेउ शकतो याची देशाला प्रथमच जाणीव झाली. देश बदलायचा असेल तर काही आवश्यक बदल घडवलेच पाहिजेत असा विचार देशात प्रबळ झाला
31.नेता निस्वार्थी असू शकतो हे देशवासीयांना जाणवले .
32.दीर्घकाळात देश पुढे जाणार या विश्वासातून देश रांगेत उभा राहिला . अल्प काळ वेदना दीर्घ काळ फायदा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली .
33.भारताचे अनुकरण करा ही मागणी पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात झाली विश्वगुरुकडे भारताची वाटचाल
34. जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेउ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते हा संदेश जगात गेला .
35. कुठेही दगडफेक ,आग ,बस रेल्वे जाळपोळ न होता हा बदल स्वीकारला गेला आता रांगाही कमी झाल्या जनजीवन पूर्वपदावर येतेय .नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2016 - 2:24 pm | प्रसाद गोडबोले

इतकं सगळं गुडी गुडी वाचुन डोळे पाणावलेच राव !

#जप्_हो_श्याम

शाम भागवत's picture

25 Jun 2020 - 4:31 pm | शाम भागवत

ओ, मला कशाला मधे खेचताय?
मी जप करतोच आहे की!!!!!!!
मी जप करत नाहीये असे तुम्हाला का वाटतंय???
;)
:)))

मोदक's picture

18 Nov 2016 - 2:32 pm | मोदक

धन्यवाद, यावर सविस्तर प्रतिसाद लिहितो, उत्तरे असतील अशी अपेक्षा आहे.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 2:36 pm | संदीप डांगे

मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक!

'निरक्षीरविवेक' दिसतो का बघू... ;)

मोदक's picture

18 Nov 2016 - 2:53 pm | मोदक

ओके.

पहिली गोष्ट - मोदीसमर्थकांना विचारलेला प्रश्न मूळ प्रतिसादात कुठेही दिसला नाही. तुम्ही दिलेला प्रतिसाद म्हणजे "नोटाबंदीचे अमुक अमुक परिणाम" झालेले आहेत. या थाटाचा आहे.

यावर मी "धन्यवाद, यावर सविस्तर प्रतिसाद लिहितो, उत्तरे असतील अशी अपेक्षा आहे." असे लिहिल्यानंतर "मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक!" असे सपशेल घूमजाव करत आहात.

दुसरी गोष्ट - मूळ प्रतिसादातील गोष्टी सरकारतर्फे जाहीर झालेल्या कोणत्याही पत्रकात वाचावयास मिळालेल्या नाहीत. तसेच, हे दावे मिसळपाव वर कोणी केले आहेत का..? प्रतिसाद बघायला आवडेल.
कुठेतरी कोणीतरी लिहिलेल्या गोष्टी आणून (आणि तुमची येथील एकंदर वाटचाल बघून, या बहुदा तुम्हीच पिकवलेल्या कंड्या असाव्यात याचीही शक्यता नाकारता येणार नाही..!) त्यावरून येथील सदस्यांचा "निरक्षीरविवेक" तपासणे हे लॉजिक गंडल्याचे लक्षण आहे. येथे कोणी असे काही लिहिले असल्यास त्या सदस्याकडून उत्तराची अपेक्षा करणे अयोग्य नाही मात्र, आपणच काहीतरी पिकवून / उचलून आणायचे आणि "द्या आता यावर उत्तर" हा दावा कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवावे.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 3:35 pm | संदीप डांगे

सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही!

बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी!

फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते,

उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;)

मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत!

सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही!

आणखी वेगळी कारणे शोधा हो. तुमच्या पहिल्या आणि दुसर्‍या प्रतिसादात तब्बल १६ मिनीटांचा फरक आहे. अर्थात तुम्ही २४ तास लॉग-इन असणे अपेक्षित नाहीये पण तुमचा माझ्या प्रतिसादानंतर पडला हा दावा पोकळ आहे इतकेच.

बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी!

कुठल्या समर्थकांचे..? ते त्या समर्थकांना जिकडे दावे केलेत तिकडे विचारा आणि इथल्या समर्थकांनी दावे केले असले तर इथे विचारा.
जर सरकारने असे दावे केले असले तर त्याचे पुरावे आणा.

फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते,

निरर्थक प्रश्न.

("तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का..?" छाप टुकार जोक आठवला या प्रश्नावरून - हे वैयक्तीक घेवू नये, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हो / नाही मध्ये मिळत नाही इतके दाखवण्यासाठी दिलेले खूप जुने उदाहरण आहे.)

उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;)

मीही एक समर्थक आहे आणि मी असा कधीही दावा केला नाहीये की वरील मुद्दे सत्य आहेत. तसेच वरील सर्व मुद्द्यांचा आवाका इतका मोठा आहे की एकाच व्यक्तीने हे सगळे अभ्यासून इतक्या लवकर निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे.
..किंवा जसे तुम्ही योजनेविरूद्ध उतावळेपणाने आणि दिशाभूल करणारे धागे / प्रतिसाद लिहीत आहात तसे मी करत नाही इतके पुरेसे आहे.

मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत!

माझ्या निरीक्षणांना "तुमचे बेसलेस प्रतिसाद" हा भक्कम पाया आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2016 - 2:59 pm | श्रीगुरुजी

मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक!

'निरक्षीरविवेक' दिसतो का बघू... ;)

अशी एकतर्फी विचारपूस नको. हेच प्रश्न मोदीविरोधकांना सुद्धा विचारा आणि बघा त्यांचा नीरक्षीरविवेक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदीसमर्थक आणि विरोधक, दोघांनाही हाच प्रश्न विचारलात तरच प्रश्नही "निरक्षीरविवेकी" होईल, नाही का ?

असे न केल्यामुळे, तुम्ही भावनेच्या भरात घसरू लागला आहात का असे विचारले तर चूक होईल का ?! :)

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 3:41 pm | संदीप डांगे

विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त, हरिश्चंद्री समर्थकांच्या मोहोर उठण्याची गरज आहे वरील फायद्यांवर, म्हणजे सामान्य जनता रामराज्याच्या स्वप्नात दंग होण्यास मोकळी!

भावनेच्या भरात घसरण्याचा प्रसंग कसा असतो हे तुम्ही इथे पाहिलेत म्हणून विचारत आहात काय?

http://www.misalpav.com/comment/900742#comment-900742

विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त

सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध हा निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 4:20 pm | संदीप डांगे

सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध

^^^ हे कोण कसे ठरवणार?

काही काळापूर्वी नोटबंदीच्या विरोधात भाजपची अधिकृत मते आजच्या विरोधकांच्या मतांसारखीच होती!

भाजपाची अधिकृत मते आणि त्यावेळी नक्की कशाने विरोध झाला यावर सवडीने एक लेख लिहा, तेथे बोलूया.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 5:12 pm | संदीप डांगे

खाली इंग्रजीत मीनाक्षी लेखी यांच्या प्रेस काँफेरेन्स चा काही भाग इंग्रजीत टाकलाय! मुद्देसूद व सुयोग्य आहे का ते वाचून सांगा! पूर्ण भाषण उडवून टाकलं जायच्या आत युट्युब वर पाहून घ्या

पूर्ण भाषणाची लिंक आहे का..?

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी

नोटाबंदीचे परिणाम

अजून काही परीणाम -

३६) केजरीवाल, उद्धव, ममता इ. गरीबांच्या होणार्‍या हालांमुळे कळवळले.
३७) देशातील नागरिकांची चूल बंद झाली, देश उद्ध्वस्त झाला, लोक हक्काचे पैसे असून उपाशी मरायला लागले.
३८) मोदी सरकार गरीब विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
३९) रतन टाटा, अण्णा हजारे, कैलाश सत्यार्थी, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती इ. बड्या धेंडांना नोटा रद्द करण्याचा निर्णय आधीच समजला होता. त्यामुळे हा निर्णय येण्याआधीच त्यांनी आपापल्या ५००/१००० च्या नोटा बदलून घेतल्या.
४०) जनता रडत असताना मोदी खो खो हसत आहेत.
४१) रद्द केलेल्या नोटांमधून १० लाख कोटी रूपये जमा होणार आहेत. मोदी त्यातील ८ लाख रूपये उद्योगपतींच्या (अडाणी आणि अंबानी) घशात घालून त्यांची कर्जे माफ करणार आहेत.
४२) या निर्णयामुळे अडाणी आणि अंबानी एका रात्रीत धनाढ्य झाले.

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2016 - 3:55 pm | श्रीगुरुजी

ओके.

प्रश्न प्रामाणिकपणे विचारले आहेत, उपरोधाने नाहीत या गृहितकावर उत्तरे देतो

1.माओवाद्यांना दणका

काही प्रमाणात बसला आहे असे बातम्यांवरून दिसते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खंडणीचे पैसे होते व ते ५००/१००० च्या नोटांमध्ये होते आणि आता ते बदलून घेणे अवघड झाले आहे असे बातम्यात सांगण्यात येते.

2.काश्मीरमधील दगडफेक बंद

दगडफेक थांबलेली दिसत आहे.

3. काश्मीरमधील शाळा जाळणे बंद

शाळा जाळणे बंद झालेले दिसत आहे. शालांत परीक्षेला ९९% उपस्थिती होती असा वृत्तांत आहे.

4.भ्रष्टाचारींनी नोटा जाळल्या

काही जणांनी जाळल्या असे दाखविले. परंतु ही संख्या अत्यल्प असावी.

5.तूर दाळीचे भाव कोसळून ८० रु .

कल्पना नाही.

6. किराणा दुकान ,भाजीपाला फळ विक्रेते ,पानवाला ,चहावाला यांनी डेबिट कार्ड स्वॅपिंग मशिन बसवले

काही जणांनी बसविले आहे.

7.मनपा ,नगरपालिका ,ग्रामपालिका यांची विक्रमी करवसूली

मोठ्या प्रमाणात करवसुली झाली आहे.

8.वीज वितरण कंपनीची जुनी बाकी वसूल

नक्की आकडा माहित नाही. परंतु काही प्रमाणात थकबाकी वसूल झाल्याचे सांगितले जाते.

9.औषध दुकानांत जोरदार विक्री

होय.

10. मेट्रो रेल मध्ये smart cards विक्रीत वाढ

कल्पना नाही.

11.अनेक व्यावसायिकांचे ४ वर्षांची जुने येणे वसूल ,वरून नवीन ऑर्डर मिळाल्या .

कल्पना नाही.

12.mobile wallets पेमेंटचा वापर वाढला

होय

13. बॅंकांच्या तिजोरीत ७ लाख कोटींची वाढ .कर्जावरील व डिपॉझीटवरील व्याजदर कमी होणार .उद्योगाला कमी व्याजात भांडवल मिळणार .

ही प्रकिया सुरू झाली आहे.

14. बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाचे चेक किंवा ऑनलाईन पेमेंट .सगळा पैसा अगोदर बॅंकेत येणार .

किती प्रमाणात कल्पना नाही. परंतु आजच वाचले की कांद्याचे पेमेंट चेक्सने देण्यात येणार आहे.

15. प्रॉपर्टीतील काळ्या पैशाला ब्रेक यापुढे प्रॉपर्टी खरेदीसाठी के वाय सी आवश्यक .

१००% ब्रेक लागणे अशक्य आहे. केवायसी पूर्वीपासूनच सक्तीचे होते. त्यामुळे या क्षेत्रावर फारसा परीणाम झाल्याचे दिसत नाही.

16. प्रॉपर्टींच्या किमतीत 25% घट

कल्पना नाही.

17.लोकशाही आणखी भक्कम झाली . सर्व जाती धर्माचे लोक ,गरीब व करोडपती एकाच रांगेत उभे राहिले .भेद नष्ट

उपरोधिक विधान

18.नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले .

सध्या तरी मोडलेले दिसते.

19.उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीत काळा पैसा वापरू पाहणाऱ्या राजकीय पक्षांना दणका

सध्या तरी दणका बसलेला दिसतो. परंतु राजकीय पक्ष यातूनही मार्ग काढणार व मतदारांचे नुकसान होऊन देणार नाहीत.

20 जे एन यु मधील गायब झालेला नजीब आणि वन रॅंक वन पेन्शन चर्चा बंद

जेएनयु मधील नजीब ची चर्चा फक्त निधर्मांधच करीत होते. ९९.९९% जनता यात सहभागी नव्हती. परंतु उर्वरीत मुठभरांची सुद्धा चर्चा बंद झाली आहे. ओ आर ओ पी चर्चा ८ नोव्हेंबर पर्यंत बंद होत आलीच होती. आता मात्र ती पूर्ण बंद झाली आहे.

21. Rs.2000 च्या नोटेमुळे सरकारच्या प्रिंटींग खर्चात बचत

कल्पना नाही.

22.जाळलेल्या किंवा यापुढे चलनात न राहणाऱ्या नोटांमुळे सरकारची वित्तिय तूट कमी होणार .

शक्यता आहे.

21. ड्रग माफिया उध्वस्त

ड्रग माफियांवर या निर्णयामुळे फारसा परीणाम झाला नसावा. झाला असल्यास तो तात्पुरता असणार.

22.इन्कम टॅक्सच्या धाडींमुळे काळा पैसा नियंत्रणात

काही प्रमाणात

23.पोलिसांच्या नाकाबंदीमुळे काळा पैशाची वाहतूक बंद

काही प्रमाणात

27. खरं जीवन जगायला सुरुवात फालतू क्रिकेट मॅच व बॉलिवूड सिनेमे बंद . Facing real life !!!

उपरोधिक वाक्य

28. हवाला धंदा मंदीत

तात्पुरता परीणाम

29. बेटिंग ,सट्टा यांचे हाल

तात्पुरता परीणाम

30. लोकांची मते मिळतील की नाही याची पर्वा न करता पंतप्रधान देशहितासाठी कडक निर्णय घेउ शकतो याची देशाला प्रथमच जाणीव झाली. देश बदलायचा असेल तर काही आवश्यक बदल घडवलेच पाहिजेत असा विचार देशात प्रबळ झाला

उपरोध असला तरी नक्कीच तसे झाले आहे.

31.नेता निस्वार्थी असू शकतो हे देशवासीयांना जाणवले .

उपरोध असला तरी नक्कीच तसे झाले आहे.

32.दीर्घकाळात देश पुढे जाणार या विश्वासातून देश रांगेत उभा राहिला . अल्प काळ वेदना दीर्घ काळ फायदा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली.

भावनेचे माहित नाही, परंतु या निर्णयाला बहुतेकांचा पाठिंबा आहे.

33.भारताचे अनुकरण करा ही मागणी पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात झाली विश्वगुरुकडे भारताची वाटचाल

उपरोधिक वाक्य. मात्र पाकिस्तानमध्ये अशी मागणी झालेली आहे.

34. जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेउ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते हा संदेश जगात गेला.

उपरोधिक वाक्य

35. कुठेही दगडफेक ,आग ,बस रेल्वे जाळपोळ न होता हा बदल स्वीकारला गेला आता रांगाही कमी झाल्या जनजीवन पूर्वपदावर येतेय .नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .

उपरोधिक वाक्य.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 4:09 pm | संदीप डांगे

हेच हवे होते! धन्यवाद! काही उपरोधिक वाक्य सोडली तर इतर परिणामावर चर्चा होऊ शकते!

रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं.

प्रसाद_१९८२'s picture

18 Nov 2016 - 3:01 pm | प्रसाद_१९८२

रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं.

---

Rolling on the Floor Laughing

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 2:48 pm | टवाळ कार्टा

खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख कॅश घेउन फिरत असते तर सगळ्यात जास्त मुडदे त्यांचेच पडले असते...भारतात ट्रकमधून २० लाख कॅश घेउन मालवाहतूक करता येते....ते सुध्धा कोणतेही पिस्तुल...गेलाबाजार गावठी कट्टा सोबत न घेता हे वाचून डोळे पाणावले =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

२० लाख X भारतातील वाहतूकीसाठी रोज वापरल्या जाण्यार्‍या ट्रक्सची संख्या
= ट्रकने रोज चलनवलन होणारे रु(डोळे फिरणारी संख्या)

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 3:05 pm | टवाळ कार्टा

या हिशोबाने भारतात "टरक"वाल्यांना लग्नाच्या बाजारात सगळ्यात जास्त डिमांड असायला हवी...त्या ऐवजी तेच भलत्या बाजारात जाताना दिसतात म्हणे =))

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 3:09 pm | संदीप डांगे

प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो हे आपले कल्पनारंजन आवडले!

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 3:17 pm | टवाळ कार्टा

कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.

प्रत्येक ट्रक नसला तरी बर्याच केसेस म्हणजे १० पैकी किती ट्रक अपेक्षित आहेत ते जाणून घ्यायला आवडेल

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 3:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते माझे कल्पनारंजन नाही, तुमचा "विपर्यास" आहे ! "वाहतूकीसाठी रोज वापरल्या जाण्यार्‍या" चा सरळ साध्या शब्दांचा सद्य चर्चेतला अर्थ इतका तिरका केला जाईल असे वाटत नव्हते !!! असो.

तेव्हा, अजून बाळबोध शब्दांत तेच समीकरण देतो, त्याचा हिशेब करा, उत्तर तेच येईल :) ...

२० लाख प्रतिट्रक X भारतातील वाहतूकीसाठी एका दिवसात वापरल्या जाण्यार्‍या ट्रक्सची अव्हरेज संख्या
= ट्रकने रोज चलनवलन होणारे रु(डोळे फिरणारी संख्या)

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2016 - 2:57 pm | श्रीगुरुजी

नारायण मूर्तींच्या गाडीचा चालक लक्षाधीश असू शकतो तर कारपेक्षा मोठी गाडी (म्हणजे ट्रक) चालविणारा २० लक्ष रूपये खिशात ठेवून का हिंडणार नाही?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 3:03 pm | टवाळ कार्टा

नारायणमुर्तींच्या चालकाला पगार कॅशमध्ये मिळतो??? त्याचे आयकर विवरणपत्र नसण्याची शक्यता किती? तो भारतभर लाखभर रुपये कॅशमध्ये जवळ बाळगून फिरतो?

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी

उपरोध लक्षात आलेला दिसत नाही. असो.

मूर्तींच्या चालकाला आयकर रिटर्न्स भरण्याइतका पगार मिळत नव्हता. त्याला दिल्या गेलेल्या समभागांची किंमत अनेक लक्ष होती. त्याअर्थाने तो लक्षाधीश होता.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 3:18 pm | टवाळ कार्टा

आर्र्र्र्र्र्र्र्र्र...असं होतं का ते...आय माय स्वारी बर्का

वरुण मोहिते's picture

18 Nov 2016 - 2:54 pm | वरुण मोहिते

२० लाख घेऊन जाणारा ट्रक हा एकटा नसतो जो ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या भारत भर ओळखी असतात . त्यामुळे काही फरक पडत नाही . कुठल्याही परिस्थितीत ते पुढे जाऊ शकतात. छोटे आहेत त्यांचं मानलं जरी प्रॉब्लेम झाला आहे तरी दुसऱ्या दिवशी पोस्ट ऑफिस आणि मनी कुरियर द्वारे पैसे पोचत आहेत . त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडलाय सध्यातरी .
बेकायदेशीर रित्या मुंबई मध्ये पैसे कमवणाऱ्या मुली आणि त्यांचे मालक यांनी एकतर बाहेर ट्रान्स्फर केले मालकांनी.जे मालक आहेत त्यांनी . आणि बहुतेक काम मुली या युपी बिहार च्या नेपाळ सीमा जवळ तिकडे केले .पुढचं पुढे .बिल्डर आणि व्यावसायिकांची कहाणी अजून वेगळी आहे .

प्रसाद_१९८२'s picture

18 Nov 2016 - 3:12 pm | प्रसाद_१९८२

या वरच्या बातमीत जे वीस लाख रुपये पोलिसांनी पकडलेत ते, तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे त्या ट्रक ड्रायव्हरच्या प्रवास खर्चासाठी असल्याचे तरी या वरिल बातमीवरुन दिसत नाही.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 3:38 pm | मृत्युन्जय

तुमच्या धाग्यातला आशय आणी या दोन्ही बातम्या यांमध्ये परस्पर संबंध नाही हे नमूद करु इच्छितो. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे मालवाहतुकीसाठी लागतच नव्हते हे दोन्ही बातम्यांमधुन स्स्पष्ट होते आहे. अश्या अजुन बातम्या शोधायच्या झाल्या तर कोटींनी पैसे पकडल्याच्या देखील अनेको बातम्या मिळतील.

एका बातमीप्रमाणे:

१. काळा पैसाच जप्त झाला आहे. तो पैसा अवैध मार्गांनी निवडणुकीत वापरला जाणार होता.
२. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालकाने पळुन जायचा प्रयत्न केला
३. या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्ट्मेंट कडे तक्रार देखील केली गेली आहे.

दुसर्‍या बातमीप्रमाणे:

१. २० लाखाची रोकड देउन व्यवहार केला जात होता.
२. सगळ्या नोटा १००० च्या होत्या आणि व्यवहार १००० च्या नोटा रद्द्द झाल्यानंतर केला जात होता. त्यामुळे मुळात हा काळ्या पैशातला व्यवहार होता.
३. २०००० पेक्शा जास्त व्यवहार रोखीने करणे हे बेकायदा आहे. हा नियम अनेक वर्षे अस्तित्वात आहे. तस्मात २० लाखाचा रोखीने व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर आहे. मुळात काळा पैसा हा असाच बेकायदा व्यवहारातुन तयार होतो.

वरील दोन्ही प्रकरणांमध्ये पैसा सदर चालकाला मालवाहतुकीसाठी आणि वैध कारणांसाठी लागत नव्हता.

तुमच्या धाग्याचा आशय "सामान्य, सुजाण, सजग" नागरिकांना (चालकांना) होणार्‍या त्रासाबद्दल असल्याने वरील दोन्ही लिंका अतिशय निरुपयोगी आहेत असे सांगु इच्छितो. अर्थात माझा परीघ छोटा असल्याकारणाने आपल्या कडुन यावर अजुन विस्तृत विवेचन मिळाल्यास आनंद होइल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 3:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

http://coastaldigest.com/index.php/news/63149-rs-26-lakh-unaccounted-cas...

१. हे २० लाख ट्रकच्या खर्चाचे नव्हते तर दुध उत्पादकांना दुधाची किंमत नकद देण्यासाठी नेले होते असा ट्रकमालकाचा दावा आहे.

२. ट्रक स्थानिक स्तरावर एका डेअरीतून दुसर्‍या डेअरीत दुधाची वाहतूक करतो आहे, म्हणजे ट्रकच्या खर्चाकरिता रु२० लाख काय रु२०,००० हजार सुद्धा गरजेचे नसणार.

======

https://www.google.co.in/amp/m.timesofindia.com/city/hyderabad/Rs-20L-in...

१. यातील ट्रकमधे सापडलेले रु२० लाख तेथे कसे आणि का आले हे मला माहित नाहीत असे ड्रायव्हरने सांगितले आहे. बातमीप्रमाणे त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच हे, एक एक लाखांच्या बंडलांत काळजीपूर्वक ठेवलेले पैसे (These 20 packets were neatly wrapped and kept in a carry bag in the tool box) ट्रकच्या खर्चाकरिता नक्कीच नसावेत.

२. उरलेले रु६.२ पैसे एका खाजगी कारमध्ये सापडले, म्हणजे त्यांचा सद्य चर्चेशी काहीही संबंध नाही.

डांगेसाहेब, तुमचे प्रतिसाद वाचण्याजोगे असतात व बर्‍याचदा (कोणतीही बाजू घेऊन का होईना, पण) विचारपूर्वक लिहिलेले असतात असा समज आहे, म्हणून मी ते वाचतो. हा प्रतिसाद त्या प्रतिमेत अजिबात बसणारा नाही.

या वेळेस तुम्ही मुद्दा सिद्ध करण्याच्या ओघात वाहवून जाऊन पूर्णपणे असंबधित व चुकीची उदाहरणे दिली आहेत असे खेदाने नमूद करत आहे.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 4:17 pm | संदीप डांगे

बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार?

अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो!

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 4:29 pm | सुबोध खरे

बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे
मेगाबायटी प्रतिसाद न देता डांगेअण्णांचे पांढरे निशाण?
अतर्क्य आणि आश्चर्य कारक

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 4:36 pm | संदीप डांगे

There is no point wasting time in pointless, fruitless word-war!

I prefer worthiness in attack as well as defence!

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 4:46 pm | सुबोध खरे

पण बातमी तुम्हीच दिलीत ना?
मग?

बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे

मग अशी माहिती येथे देण्याचे कारण..?

पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार?

अच्छा, हे सगळे तुम्हीच ठरवलेत का..? एकच सल्ला देतो. "मुद्देसूद आणि विषयाशी संबंधित उत्तरे द्या"
स्वतः दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यानंतर असे व्हिक्टीम कार्ड वापरणे ही जुनी पद्धत झाली. असो.

अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो!

अशा गोष्टींसाठीच मोदीसरकारने हे पाऊल उचलले आहे. :)

(सगळे व्यवहार ऑनलाईन आले तर अनेकांच्या दोन नंबरच्या कमाईवर आणि पोटावर पाय येणार आहे हे ही उघड आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2016 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

"बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे" असे कबूल करून तरीही ती आपल्याबाजूचा पुरावा दिल्याने लेखकाची विश्वासार्हता कमी होते, हे सार्वकालीक सत्य सांगायला हवेच असे नाही.

अश्या वस्तूस्थितीत, ती चर्चा किंवा बातमी, नरेंद्र मोदी / राहूल गांधी / ओबामा / ट्रंप / आईनस्टाईन किंवा आणखी कोणाच्या संबंधात आहे याने काहीssssssही फरक पडत नाही, असे माझे ठाम मत आहे.

कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.

हे एका लेखात लिखाणाच्या भरात लिहिलेले पण प्रामाणिक वाक्य, परत परत लिहावे लागेल असे वाटले नव्हते. पण, जग आहे तसे स्विकारून पुढे जावे लागते, हे पुरेसे माहित असल्याने, असो.

विश्वासार्हता हा अनावश्यक तपशील नव्हे तर कोणत्याही चर्चेचा जीव असतो. विश्वासार्हता नसलेली चर्चा म्हणजे केवळ वितंडवाद किंवा राजकारणी चलाखी बनते. या दोन्हीतही मला रस नसल्याने व खुद्द धाग्याकर्त्याने विश्वासार्हता हा अनावश्यक तपशील असतो व त्याच्याकडे दुर्लक्ष करावे असा निर्देश केल्याने या धाग्याला माझा रामराम !

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 3:13 pm | सुबोध खरे

तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
हे आपलेच वाक्य आहेना?
मग वेगळा संदर्भ देऊन शाब्दिक कोलांट्या मारु नका.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 3:13 pm | सुबोध खरे

तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
हे आपलेच वाक्य आहेना?
मग वेगळा संदर्भ देऊन शाब्दिक कोलांट्या मारु नका.

प्रसाद_१९८२'s picture

18 Nov 2016 - 3:18 pm | प्रसाद_१९८२

तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.

==

सुबोध खरे सर,
तो त्यांचा फर्स्ट हँड अनुभव आहे. :))

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 3:27 pm | सुबोध खरे

कोणता?
शाब्दिक कोलांट्याचा?-))-))

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 3:51 pm | संदीप डांगे

शाब्दिक कोलांट्या....? =)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

18 Nov 2016 - 4:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

उदाहरण काही झेपले नाही (माझा परीघ थोडा वेगळा आहे). ट्रक ड्राइवर, २ लाख, २० लाख, व्यवहार ठप्प सगळंच अगम्य आहे! दुसऱ्या उदाहरणांची प्रतीक्षा!

उमेश माधवराव मसलेकर's picture

18 Nov 2016 - 4:01 pm | उमेश माधवराव मसलेकर

मला समाजात नाही की, हे सर्व लोक निरर्थक रडारड का करत आहेत? रोग असाध्य झाल्यावर कधी न कधी तरी शल्यकर्म करावे लागेलच ना ? का त्याचाही मुहूर्त काढायचा ? शल्यकर्म केल्यानंतर काही दिवस तरी त्या टाक्यांमुळे त्रास तर होणारच ना ? आणि पथ्यही पाळावे लागेल शिवाय २-४ वेळा तरी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी लागेल व औषधपाणी वेळेवर करावे लागेल.पण शेवटी जीव तर वाचला ना !!! हेही नसे थोडके !!!

प्रसाद_१९८२'s picture

18 Nov 2016 - 4:14 pm | प्रसाद_१९८२

पण काय आहे कि,
वर्तमान सरकार वर रोजच्यारोज टिका केल्याशिवाय, देशातील काहि चश्मेबहाद्दूर लोकांना सकाळी प्रेशरच येत नसावे. :))

मारवा's picture

18 Nov 2016 - 4:30 pm | मारवा

?

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 4:31 pm | सुबोध खरे

चश्मेबहाद्दूर लोक
हहपुवा

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 4:32 pm | संदीप डांगे

सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: पैचान कोन??

“The present government is not in a position to measure the correct quantum of black money because those who have the black money will actually convert into new currency notes. Now the sufferers are the aam aurats(women) and aadmis(men). Those who are illiterates, who have no access to the banking facilities. And they will be ones, who will affected by such diversionary measures. People who have no bank accounts, their life savings will be targetted.”

“They will fall victim to middlemen who will scare them that the notes are worthless and charge them hefty fees to convert them. They will also be ripped off by shopkeepers.”

“This policy of Mr. ₹₹₹₹₹₹ is only meant for the blue blood and not for the sweating, red-blooded, toiling millions. It is not going to affect those who have numbered accounts in Swiss accounts, but will hit those who do not have any bank account even in India,” she had said.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 4:49 pm | सुबोध खरे

दिदी
मालद्यातून पैसे येणे बंदझाले ना?

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 5:09 pm | संदीप डांगे

मीनाक्षी लेखीना मालद्यातून पैसे येतात?

माहितगार's picture

18 Nov 2016 - 5:12 pm | माहितगार

नै हो ममतांचे नाही हे वाक्य बिजेपीच्या 'मिनाक्षी लेखी' यांचे संसदीय भाषणाचा निवडक चाळणी लावलेला भाग आहे. ६५ टक्के लोकांकडे बँक अकाऊंट नाही अशी त्यांची तक्रार त्या भाषणात होती त्यानंतर मोदी सरकार आले आणि मोदींनी बहुतांशांना रिकामी का होईनात बँक अकाऊंट उघडून दिली

अर्धवटराव's picture

19 Nov 2016 - 4:08 am | अर्धवटराव

तुम्ही असले प्रतिसाद नोटा बदलीच्या दुष्परिणांचा दाखला म्हणुन द्यायला लागला आहात ?

उमेश माधवराव मसलेकर's picture

18 Nov 2016 - 4:34 pm | उमेश माधवराव मसलेकर

आणि त्या चष्मेबद्दुर लोकांमध्ये शिरोमणि आहेत चुकून दिल्ली सारख्या चिमुकल्या व अर्ध-राज्याची सत्ता मिळालेला अरविंद केजरीवाल !!! ह्या माणसाची नोटबंदीच्या पहिल्या दिवशी प्रतिक्रिया होती "मौन" आणि लगेच हा माणूस विरोधाच्या पवित्र्यात गेला.कॉंग्रेसची आधी प्रतिक्रिया होती की कॉंग्रेस पक्ष काळ्या पैशयाच्या विरोधात ह्या निर्णयाच्या बाजूने आहे आणि नंतर त्यांनीही कोलांट-उडी मारली.आणि हा संधिसाधू अरविंद काल काय म्हणाला की "आझाद भारत का ये सबसे बडा घोटाला है" तरी बरे आहे की आतापर्यन्त मोदी सरकारवर एकही घोटाळ्याचा गंभीर आरोप झालेला नाही.आणि हा म्हणतोय की "घोटाला ". ह्याला तर ह्याच्या मुलाच्या जन्मातही घोटाळच झालेला दिसणार.पंचतंत्राच्या गोष्टीत "धूर्त कोल्हा " हे पात्र दाखवलेले आहे,माझ्या मते भारतीय राजकारणातील धूर्त कोल्हा " अरविंद केजरीवाल " आहे.बिचारे अण्णा हजारे !!! त्यांचा ह्या धूर्त कोल्हयाने शिडीसारखा वापर केला आणि नंतर त्यांना फेकून दिले !!!

जी मांडणी करत आहेत ती ट़क उदाहरण चुकले म्हणुन आता बरे झाले एरवी विरोध करणे अवघड होते डांगेंच्या ट्रकलाच आता धरून ठेवण्यात फायदा आहे ( मी पुर्णपणे मोदी निर्णयाच्या बाजुने आहे )

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 5:08 pm | संदीप डांगे

=)) =))

तरी गा पै यांनी आधीच worn केलं होतं!!

मारवा's picture

18 Nov 2016 - 4:53 pm | मारवा

म्हणणे असे आहे डांगे यांच्या मांडणीचा ट्रकशुन्य प्रतीवाद शक्य नाही का ?

मी एकाही ठिकाणी ट्रकबद्दल प्रश्न उपस्थित केला नाहीये.

तो मुद्दा इतका तकलादू आहे की कोणीही (खराखुरा) फर्स्टहँड अनुभव असलेली व्यक्ती समजेल की तो दावा किती चुकीचा आहे..!

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 5:07 pm | संदीप डांगे

तो माझा दावाच आहे असं कुठं म्हटलंय? उदाहरण आहे, आता ते ज्यादा विश्लेषण करण्यात पॉईंट नाही, कारण मूळ विषय ट्रकवल्याचा 20 लाख खर्च हा नव्हताच! ;)

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 5:28 pm | टवाळ कार्टा

मग ट्रकवाल्याला आणलाच कशाला?

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 5:55 pm | संदीप डांगे

हा प्रश्न तुम्हाला पडलाय म्हणजेच उत्तर देऊन उपयोग नाही असे मला समजते! मेगाबायटीचा त्रासही होतो ना?

मारवा's picture

18 Nov 2016 - 5:26 pm | मारवा

आपण ट्रकची टायरची हवाच अनेक प्रतीसादी खिळे मारून कधीचीच काढलेली आहे आता हा ट्रक माहीतीचा महामार्ग अडवुन ट्रॉफीक जाम करत आहे विनंती एकच आहे मुळ मांडणी वर मंथन व्हावे कँसेट अडकलीय

मारवा's picture

18 Nov 2016 - 5:26 pm | मारवा

आपण ट्रकची टायरची हवाच अनेक प्रतीसादी खिळे मारून कधीचीच काढलेली आहे आता हा ट्रक माहीतीचा महामार्ग अडवुन ट्रॉफीक जाम करत आहे विनंती एकच आहे मुळ मांडणी वर मंथन व्हावे कँसेट अडकलीय

धागाकर्त्याने दिलेल्या प्रतिसादांनुसार, त्यांना मूळ मांडणी आणि त्यावर सुयोग्य विचारमंथन यावर भर द्यायचा आहे की विशिष्ट अजेंडा राबवायचा आहे आणि विद्यमान सरकारच्या नावे फक्त खडे फोडायचे आहेत हे नक्की करूदेत.. मग आपण आहोतच चर्चा करायला..! :)

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 6:24 pm | संदीप डांगे

मोदकराव, ट्रक आणि 20 लाखांचा अत्यन्त गैरलागू मुद्दा लावून धरणारे अजेंडा ठरवून मोकळं झालेत! आता फक्त शिमगा करायचा धाग्यवर... :))

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 6:18 pm | संदीप डांगे

नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा रजिस्टर नंबर, ड्राईव्हरचे लायसन, पियूसी, इन्शुरन्स, जकात पावत्या यांच्या पंतप्रधान कार्यालयातून अटेस्टड कॉपीज मागितल्या नाहीत.

या पुढे कोणीही काहीही नुसतं उदाहरण दिले की त्याचा पूर्ण खरा तपशील मिळाल्याशिवाय चर्चा करायचीच नाही हि आता खूणगाठ!

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 6:19 pm | संदीप डांगे

नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा रजिस्टर नंबर, ड्राईव्हरचे लायसन, पियूसी, इन्शुरन्स, जकात पावत्या यांच्या पंतप्रधान कार्यालयातून अटेस्टड कॉपीज मागितल्या नाहीत.

या पुढे कोणीही काहीही नुसतं उदाहरण दिले की त्याचा पूर्ण खरा तपशील मिळाल्याशिवाय चर्चा करायचीच नाही हि आता खूणगाठ!

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 6:29 pm | मृत्युन्जय

ट्रक काढुन मुद्दा मांडता आला तर विचार करण्यात येइल. अन्यथा ट्रकची हवा गेल्यामुळे मागे मोटारी येउन ट्रॅफिक जाम झाल्याबद्दल मागुन येणार्‍या मोटारीला दोष देण्यात अर्थ नाही, खासकरुन ट्रकची हवा काढणारे खिळे ट्रकचालकानेच पसरवले असतील तर.

नोटाबंदी निर्णयामुळे सरकारी तिजोरीत किती पैसा जमा झाला? किती लोकांच्या मागे आयकरवल्यांची चौकशी सुरू झाली? याचा डिट्टेल तपशील सरकारने येत्या दोन महिन्यानंतर देणे योग्य ठरेल.

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 6:21 pm | मराठी कथालेखक

नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच.
फक्त अंमलबजावणी योग्य रितीने होणे अपेक्षित होते. दोन-तीन दिवसात जर पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध होवून लोक पूढे आपल्या कामाला लागू शकले असते तर ओरड करण्याचं काहीच कारण नव्हतं. ATM पुढे तास न तास उभा राहणारा माणूस काही काळ्याचे पांढरे करत नाहीये इतकं नक्की. पण अशा प्रकारे तास न तास ATM पूढे उभं रहायला लागणं, कोणत्या ATM ला पैसे मिळतील हे सतत शोधत रहावं लागणं (तेही ९ दिवसानंतर) हे अंमलबजावणीचं साफ अपयश आहे.
मोदीविरोधक वा मोदीभक्त असण्याचा प्रश्नच नाही. देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर loss off productivity चा विचार करायला हवा.

माझा परीघ लहान आहे.. पण २० एक वर्षांपूर्वी एक ट्रकवाला ओळखीचा होता. त्याच्याकडे व्यापारी मालाच्या बदल्यात दुसऱ्या गावातील व्यापाऱ्याला देण्यासाठी कॅश द्यायचे हे ठाऊक होते. आणि त्याच्याकडे गावठी पिस्तुलही होते. सध्याची परिस्थिती ठाऊक नाही.

संदीप डांगे's picture

18 Nov 2016 - 6:33 pm | संदीप डांगे

संपत भाऊ! तुम्ही खोटं बोलताय, त्या ड्राईव्हरचे नाव नंबर लायसन लागेल, त्या शिवाय तुमचा अनुभव विश्वासार्ह नाही! ;)

-आदेशावरून! :))

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 6:22 pm | मराठी कथालेखक

नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच.
फक्त अंमलबजावणी योग्य रितीने होणे अपेक्षित होते. दोन-तीन दिवसात जर पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध होवून लोक पूढे आपल्या कामाला लागू शकले असते तर ओरड करण्याचं काहीच कारण नव्हतं. ATM पुढे तास न तास उभा राहणारा माणूस काही काळ्याचे पांढरे करत नाहीये इतकं नक्की. पण अशा प्रकारे तास न तास ATM पूढे उभं रहायला लागणं, कोणत्या ATM ला पैसे मिळतील हे सतत शोधत रहावं लागणं (तेही ९ दिवसानंतर) हे अंमलबजावणीचं साफ अपयश आहे.
मोदीविरोधक वा मोदीभक्त असण्याचा प्रश्नच नाही. देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर loss off productivity चा विचार करायला हवा.

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 6:29 pm | मराठी कथालेखक

विरोध शस्त्रक्रियेला नसून 'अर्धवट तयारीनीशी' केलेल्या शस्त्रक्रियेला आहे.

इथे रुग्णाला फाडून ठेवलंय पण पुढची काही साधन-सामुग्री अजून यायचीच आहे असं झालंय

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 6:35 pm | मृत्युन्जय

पैसे अकाउंट मधुन काढुन घेता येत आहेत की नाही? माझ्या घरच्यांनी आज स्वतःच्या अकाऊंट मधुन पैसे काढले. १५ - २० मिनिटात काम झाले. मग नक्की काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडचा पैसा पांढरा असेल तर स्वतःच्या अकाउंट मध्ये भरा आणि पैसे काढा. "नोटा "बदलुनच" घ्यायचा अट्टाहास का?

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 6:51 pm | मराठी कथालेखक

माझा पैसा पांढराच आहे
नोटा डिपॉजिट करायला ब्रॅच मध्ये जावे लागेल पण ज्या बँकेत माझे अकाउंट आहे त्याची ब्रँच जवळपास नाही.
ATM मध्ये पैसे मिळत नाहीयेत.
समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याच्या प्रयत्नांना 'अट्टहास' म्हणणे म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. प्रत्येकाने दुसर्‍याबद्दल संवेदनशील असावे असा माझा 'अट्टहास' नाही. असो.

मृत्युन्जय's picture

19 Nov 2016 - 11:09 am | मृत्युन्जय

तुमचा पैसा पांढरा , काळा, हिरवा अथवा गुलाबी असल्याबद्दल मी काहिच टिप्पणी केलेली नाही आहे.

तुम्ही सरसकटपणे "देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर" असा प्रतिसाद देत आहात. साधारणपणे सगळ्यांच्याच बँका अथवा त्यांच्या शाखा घरा अथवा ऑफिसच्या कामाज्वळ असतात. लांबवर कुठेतरी अकाउंट उघडुन तेच लोक साधारणपणे वापरत बसत नाहित. आपल्यासारख्या काही लोकांचा अपवाद नक्की असेल. अश्या लोकांनी बँक अकाउंट बदलुन घेणे सोयिस्कर असते. अर्थात आता या घाईगर्दीत ते शक्य नसावे. आधीच केले गेले असते तर कदाचित उपयोग झाला असता. आपल्याला बर्‍याच बँकांच्या लायनीमध्ये उभे रहायला लागत असेल तर त्याचा अर्थ आजुबाजुला बर्‍याच बँका आहेत. असे असताना आपण आपले अकाउंत आडवळणाच्या बँकेत का उघडले हे उलगडत नाही. अर्थात त्यामागे आपले काही वैयक्तिक कारण असेल. पण इतके सगळे फिल्टर लावुन झाल्यावर अडलेले लोक फारच कमी आहेत. इतर सर्वांनी लायनीत उभे राहुन सर्वांचेच कष्ट वाढवण्याचे कारण नाही.

बादवे तुम्ही हे एक सरसक्ट विधान केले होते. तुम्हाला स्वतःला असा काही अमुकतमुक त्रास होतो आहे असे सांङितले नव्हते आणि त्या अनुषंगाने मी माझे विधान केले नव्हते. त्यामुळे मला असंवेदनशील वगैरे म्हणण्याची मौज वाटली. उगा छोट्या चोट्ञा गोष्टींना असंवेदनशील म्हणायची फ्याशन आली आहे आजकाल. ग्रो अप. अर्थात प्रत्येकाकडे असा समजुतदारपणा असलाच पाहिजे असा माझा अट्टाहास्स नाही. असो.

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 6:52 pm | मराठी कथालेखक

माझा पैसा पांढराच आहे
नोटा डिपॉजिट करायला ब्रॅच मध्ये जावे लागेल पण ज्या बँकेत माझे अकाउंट आहे त्याची ब्रँच जवळपास नाही.
ATM मध्ये पैसे मिळत नाहीयेत.
समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याच्या प्रयत्नांना 'अट्टहास' म्हणणे म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. प्रत्येकाने दुसर्‍याबद्दल संवेदनशील असावे असा माझा 'अट्टहास' नाही. असो.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 6:23 pm | सुबोध खरे

मारवा साहेब
हा वितंडवाद आहे हे मान्य करून पुढे जाऊ.
मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. असे लिहून डांगे साहेब ट्रक बद्दलचा प्रसंग लिहितात.
शेवटी इतर प्रसंगांचे स्वागत आहे! असे लिहिले आहे.
म्हणजे धाग्यात मूळ हा प्रसंगच आहे
आणि तो प्रसंग म्हणजे १०० टक्के थापा आहेत. असे असताना चर्चा कशावर होणार.
माझ्या मित्राची जी कहाणी मी लिहिलि आहे त्याचे आता २० ट्रक आहेत. तो स्पष्ट म्हणाला ट्रक ड्रॉयव्हर जवळ आम्ही जास्तीत जास्त १०,००० रुपये देतो कारण अत्यंत विश्वासार्ह ड्रायव्हर नसेल तर सर्व ड्रायव्हर कुठेतरी घाटात पाटा तुटला, इंजिन सीझ झाले अशा तर्हेच्या खोट्या तक्रारी सांगून मालकाकडून पैसे काढतात. धंद्याच्या सुरुवातीला त्याला त्याच्या ट्रक ड्रॉयव्हरने खंडाळा घाटात ऍक्सल मोडला ८०००/- रुपये खर्च येईल असे म्हणाला. हा त्याला म्हणाला आहे तिथेच थांब मी येतोय. आणि गाडी घेऊन जाणार होता तेंव्हा थोड्या वेळाने त्याचा फोन आला कि साहेब ते दुसऱ्या मेकॅनिक ला दाखवले त्याने ६०० रुपयात रिपेयर केले. मित्र म्हणाला कि ड्रायव्हर लोक शेंडी लावण्यात पटाईत असतात. कुठेही अफाट खर्च येतो सांगितले( १०,००० पेक्षा जास्त) तर तिथे मला विमानाने जाणे परवडेल. एकदा त्यांना हे कळून चुकले कि साहेब सहज सहजी गंडणार नाहीत यानंतर असे प्रकार कमी झाले. सगळ्या ट्रक ड्रायव्हरचे "वरकड" उत्पन्नच पगारापेक्षा कितीतरी जास्त असते त्यामुळे त्यांना स्वामिनिष्ठा(loyalty) हा प्रकार जरा कमीच असतो. कारण एकाची नोकरीसोडली तर दुसरीकडे नोकरी मिळतेच. तिथेही पगार हे वरचे उत्पन्न धरूनच असतो. बाकी त्यांचे इतर उत्पन्न वेश्यागमन दारू गांजा पिणे इ सुरस चमत्कारिक कथा अनेक आहेत.
मूळ हे २ लक्ष रुपये हेच थोतांड आहे तर २० लाख रुपये कुठून येणार. २० लाख रुपयात त्या ड्रायव्हर ला पळून जाऊन नवीन ट्रक घेऊन धंदा सुरु करता येईल
ज्या मूळ पायावर डांगे अण्णांनी हा धागा काढला आहे तोच ढिसाळ आहे तेंव्हा त्यावर चर्चा काय करणार. यामुळे यापुढे मी काही लिहीत नाही.
इति लेखनसीमा.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2016 - 6:32 pm | मृत्युन्जय

ज्याचा त्याचा परीघ असतो. डांगे अणांचा परीघ मोठा आहे. त्यांचा अनुभव दाडगा आहे. त्यान्च्या ओळखीतले ट्रक ड्रायव्हर २० - २० लाख घेउन इकडुन तिकडे जातात. याच्या एक दशांश पैसे सुद्धा आम्ही एका देशातुन दुसरीकडे जातो तेव्हा बाळगु शकत नाही. त्यान्च्या माहितीतल्या ड्रायव्हर्स ना जकात भरण्यासाठी आणि इतर खर्चासाठी २० - २० लाख रुपये लागतात ते बघता त्यांचा परीघ किती मोठा आहे याची तुम्हाला कल्पना यायला हवी होती. केवळ हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही आहे ही. त्या ऐवजी आपण आपला परीघ वाढवुयात. तुम्ही काळे चष्मे लाबुन प्रत्येक गोष्टीकडे बघणार असाल तर मात्र निरुपाय आहे. बाकी अजुन काय बोलणार मी? ज्याचा त्याचा परीघ, वर्तुळ, त्रिज्या वगैरे तुम्ही समजौन घ्यालच अशी आशा आहे. याऊप्पर डांगे सर खोटे बोलत आहेत हेच पालुपद तुम्हाला लावायचे असेल तर चर्चा होणार कशी?

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 6:52 pm | सुबोध खरे

मृत्युंजय साहेब
काही नाही तरी २३ वर्षे लष्करात काढली आहेत त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलीच्या वेळेस सामान ट्रकनेच पाठवायला लागते. केवळ निवृत्त होऊन १० वर्षे झाली आहेत म्हणून काही बोललो नव्हतो. मुंबईहुन विशाखापटणम येथे १९९८ साली माझे आणि एका मित्राचे सामान एका ट्रक मध्ये भरून पाठवले तेंव्हा त्याचा खर्च रुपये ७०००/- आला( प्रत्येकी ३५००/-) मी मुंबईत सामान चढवले आणि विशाखापटणमला मित्राने उतरवले आणि तोच ट्रक शेवटपर्यंत ४ दिवसात गेला. तेंव्हा एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सामान न्यायला इतकाच खर्च आला त्यावेळेस ट्रक ड्रायव्हरला काय २ लाख रुपये दिले असतील. उगाच उंदराला ऐरावत म्हणणे फार होते.

डॉक्टर साहेब, मला वाटते तुम्ही दिले आहेत ते उदाहरण आणि डांगे साहेब देत आहेत ते उदाहरण ह्यात फरक आहे. डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते. हि पद्धत थोडीफार तरी भारतात होती / आहे /असे वाटते. आता ट्रक ड्रायवरला इतकी रक्कम कोण देईल असे म्हणणे असेल तर त्यात फारसे तथ्य नाही.. भारतात विश्वासावर अनेक गोष्टी चालतात.

डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते.

हे ही मान्य.

मग ड्रायव्हरला काय चिंता..? रक्कम देणारा आणि घेणारा गोंधळ घालूदेत. त्याला फक्त ट्रक चालवायचा आहे आणि रकमेची डिलीव्हरी द्यायची आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 7:47 pm | टवाळ कार्टा

स्वकष्टाने कमावलेले २० लाख जर कोणाला द्यायचे असतील तर चेकने देता येतील...कॅश द्यायची काय गरज?

मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम असण्याची शक्यता कशी असेल ह्याबद्दल बोलत होतो.. डॉक्टर साहेबांचा त्यालाच आक्षेप होता असे मला वाटतंय.

एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
यात डिलिव्हरीची रक्कम असल्याचा पुसटसा सुद्धा उल्लेख नाही. आणि
वीस लाख ? स्वतःच्या ड्रायव्हर कडे इतकी रक्कम कुणी ठेवेल?
बढिया है
जाऊ द्या हो साहेब.
कशाला वाद घालताय?