जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न
ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं
आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं
मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं
भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा
मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!
प्रतिक्रिया
21 Oct 2016 - 3:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
काहीच्या काहीच...
21 Oct 2016 - 3:33 pm | Bhagyashri sati...
काय काहीच्या काही???
21 Oct 2016 - 5:16 pm | चांदणे संदीप
मिकाभाऊशी सहमत... =)) =))
काही ओळी गाळल्यात का ओ तै??
Sandy
21 Oct 2016 - 5:17 pm | चांदणे संदीप
मिकाभाऊशी सहमत... =)) =))
काही ओळी गाळल्यात का ओ तै??
Sandy
21 Oct 2016 - 5:54 pm | सस्नेह
दोन काव्य-महारथींनी दखल घेतल्यावर आम्हाला वेगळे काही प्रतिसादवायचे कामच नाही.. :)
21 Oct 2016 - 5:56 pm | जव्हेरगंज
सारा आणि दिशा...
हे कसलं यमक म्हणायचं!?
=))
21 Oct 2016 - 6:47 pm | चांदणे संदीप
मिकाभाऊशी सहमत... =)) =))
काही ओळी गाळल्यात का ओ तै??
Sandy
21 Oct 2016 - 11:10 pm | एस
सात प्रतिसाद मिळालेत म्हणून धागा उघडून पाहिला. वाचल्याची पोच.
21 Oct 2016 - 11:14 pm | चाणक्य
माझं पण असच झालं.
2 Nov 2016 - 8:42 am | संदीप डांगे
सँडी भाऊसाठी गाळलेल्या ओळी सकट
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न
पण वाटेवर वाट बघायचं एक ढापणं
ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं
माजलेल्या तणातून उभारतात जशी कणसं
आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं
श्रीखंडाच्या वाटीला जिभेने स्वच्छ चाटून झालं
मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं
रिचार्ज कितीचा मारतोस, मी फक्त तेच पाहिलं
भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा
पोटातल्या डोंबऱ्याला, पिझ्झाबर्गर नको, आज भेळ चारा
मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!
त्या वादळात तरी येतील का अत्याबाईला मिशा..!
2 Nov 2016 - 9:26 am | सतिश गावडे
कहर आहे.
2 Nov 2016 - 9:34 am | नाखु
अता अस्तर शिवल्यावर बघा ड्रेस कसा फिट्ट बसला.
डांगे अण्णा ह्ये टेलरकाम आवडले,अजून काही आर्डरी घेउ का?
सर्वांना दिवाळीच्या (आतिषबाजीच्या) शुभेच्छा
हिवाळी हवा
दिवाळी दिवा
फराळी नाखु (यमके गुरुजींचा शिष्य)
2 Nov 2016 - 10:20 am | चांदणे संदीप
=)) =))
डांगेअण्णा कहर आहे! ___/\___
मिपावच्या निवडक काव्यकळ्या-फुले वेचून "झेंडूची फुले भाग २" काढायला हरकत नाही! ;)
Sandy
2 Nov 2016 - 11:41 am | एस
डबल आई गं! =))
7 Nov 2016 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा
@त्या वादळात तरी येतील का अत्याबाईला मिशा..! >>> =)) वारलो. =))
8 Nov 2016 - 12:43 am | आदूबाळ
ठार झालो!
गोष्ट तशी छोटीमध्ये डांगेण्णांच्या मंजुळ आवाजात ही रचना आलीच पाहिजे.
8 Nov 2016 - 8:09 am | स्रुजा
ख्या ख्या ख्या ...
8 Nov 2016 - 11:05 am | पी. के.
सलाम तुम्हाला.
8 Nov 2016 - 11:56 am | साहेब..
हे वास्तवाच्या जास्त जवळ जाणारं वाटलं.
2 Nov 2016 - 9:35 am | सतिश गावडे
मी एक सुचवू का?
१. तुम्ही MS Paint हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकून घ्या.
२. एखादे छान तरुणाचे/तरुणीचे/प्रेमी युगुलाचे चित्र नेटवरुन डाऊनलोड करा.
३. ते चित्र MS Paint मध्ये ओपन करा
४. आता मिपावर लॉगिन करा
५. कोणताही धागा उघडून प्रतिसादाच्या बॉक्समध्ये तुमच्या अशा सुंदर कविता टाईप करा. मात्र प्रकाशित करु नका.
६. ही कविता कॉपी करा.
७. पुन्हा एकदा MS Paint ची चित्राची विंडो ओपन करा.
८. आता तिथे "टेक्स्ट" हे टुल वापरुन तुमची कॉपी केलेली कविता त्या चित्रावर पेस्ट करा.
९. "ट्रान्स्परंट" हे टुल वापरुन तुमची कविता ट्रान्स्परंत करा.
१०. चित्रातील हे बदल सेव्ह करा.
११. तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉगिन करा
१२. तुमचे हे कवितावाले चित्र फेसबुकवर टाका
१३. आणि मग बघा किती छान छान प्रतिसाद आणि लाईक्स येतात ते
मी "बाल"कवी असताना हेच करत असे. फक्त त्यावेळी ओरकुट होते. फेसबुकचा जन्म व्हायचा होता.
7 Nov 2016 - 11:51 pm | किसन शिंदे
=)) लोल
8 Nov 2016 - 8:10 am | स्रुजा
त्या १२ वीत आहेत हो.. महत्त्वाचं वर्ष आहे.. कुठे अभ्यास सोडुन मिपा शिवाय आता चेपुवर पण टिपी करायला सांगताय ;)
8 Nov 2016 - 4:00 pm | शब्दबम्बाळ
१२ वीत?!!!!!!!!!
बापरे! जीवनाची वाट, आयुष्याची संध्याकाळ वगैरे सुचत तरी कस राव!
मान गए, आपकी कविता के यमक और मिपापे डालनेकी धमक... दोनो को!
8 Nov 2016 - 6:52 pm | स्रुजा
लोल.. बघा तरी !
7 Nov 2016 - 1:23 pm | मराठी कथालेखक
चांगलं लिहिलं आहेस
फक्त अजून स्पष्ट व्हायला हवंय.
माझ्या मते : आयुष्यात अनेक लोक भेटतात, त्यातले काही मनात काही काळ घर करतात कधी दूर जातात. पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं मनातलं स्थान मात्र दूर जावूनही तेच रहातं अस काहीसं या ओळीतून तुला म्हणायचयं
कवियित्री प्रपंचात अडकलेली आहे. पण तरी 'त्याच्या' आठवणीने भरुन येते कधी आणि सगळा प्रपंच उधळून द्यावा आणि त्याच्याकडे जावं असं काहीसं वाटून सैरभैर झालेल्या मनाला नवी दिशा हवी आहे.
यमक जुळला नसला तरी अर्थ आणि भावना पोहोचत आहे.
फक्त अजून नेमकेपणाने व्यक्त हो.
8 Nov 2016 - 7:10 pm | सिरुसेरि
वादळ माणसाळंतय .