हराभरा कबाब

इशा१२३'s picture
इशा१२३ in लेखमाला
29 Oct 2016 - 12:26 am

नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

काय, फराळ केलात? आता चार-आठ दिवस रोज फराळाचं खाऊन कंटाळलात की मग जोडीला काहितरी खमंग करून खा. त्यासाठीच देतेय हराभरा कबाब पाककृती.
k
साहित्य : पालक : १ मध्यम जुडी
बटाटे : २
मटार : १ वाटी
भाजलेलं बेसन : २ चमचे
मीठ : चवीनुसार
गरम मसाला : एक छोटा चमचा
आलं-लसूण पेस्ट : १ चमचा
पुदिना : मुठभर
कोथिंबीर : छोटी वाटी
हिरव्या मिरच्या : ३-४
चाट मसाला : १ चमचा
काजू : सजावटीसाठी

sahity

कृती : पालक पानं स्वच्छ निवडून, धुऊन घ्या. उकळत्या पाण्यात ५-७ मिनिटं उकळून बाजूला काढा. आता यातील जास्तीत जास्त पाणी काढून टाका. हवं तर कढईत थोडं परतून कोरडं करून घ्या.

कढईत चमचाभर तेल तापवा. त्यात गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मिरची, पुदिना, कोथिंबिर टाका. जरा परतून घ्या.

त्यात पालक, मटार घालून जरा कोरडं होईपर्यंत परता. गार होऊ द्या. मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्या. त्या मिश्रणात बटाटा कुस्करून घाला. भाजलेलं बेसन गरजेपमाणे घाला.
.

आता या मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या. त्यावर एक एक काजू पाकळी लावा आणि तव्यावर थोड्या तेलावर भाजून घ्या.
kk
कबाब तयार आहेत! पुदिना चटणी, टॉमेटो केचपबरोबर खा.
.

प्रतिक्रिया

रेवती's picture

29 Oct 2016 - 1:33 am | रेवती

मस्त! एकदम चटपटीत.

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:17 am | सविता००१

अप्रतिमच.

कालच कबाबची आठवण आली होती आणि आज पाककृती हजर. क्या बात है..

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:30 pm | कविता१९७८

मस्त पाककृती , सुंदर प्रेझेंटेशन

पियुशा's picture

29 Oct 2016 - 3:49 pm | पियुशा

एकच नंबर !!!

विशाखा राऊत's picture

30 Oct 2016 - 8:33 pm | विशाखा राऊत

मस्त रेसेपी

केडी's picture

30 Oct 2016 - 9:30 pm | केडी

एकदम मस्त....

स्रुजा's picture

30 Oct 2016 - 10:08 pm | स्रुजा

वा वा, घरात सगळं आहे, करुन अ बघते.

स्वाती दिनेश's picture

30 Oct 2016 - 11:43 pm | स्वाती दिनेश

कबाब मस्त दिसत आहेत.
ए फ्रा मध्ये छान होतात हराभरा कबाब.
स्वाती

केडी's picture

1 Nov 2016 - 2:07 pm | केडी

पाकृ वाचल्या वाचल्या हाच विचार मनात आला.

पद्मावति's picture

31 Oct 2016 - 2:18 am | पद्मावति

वाह! मस्तच.

एस's picture

31 Oct 2016 - 9:44 am | एस

सुपर्ब!

अजया's picture

31 Oct 2016 - 3:56 pm | अजया

तोंपासु!

अजया's picture

31 Oct 2016 - 3:56 pm | अजया

तोंपासु!

रुपी's picture

1 Nov 2016 - 3:38 am | रुपी

मस्त!

पाटीलकी's picture

1 Nov 2016 - 8:27 am | पाटीलकी

तोंपासु!...

हाहा's picture

1 Nov 2016 - 2:42 pm | हाहा

तोंपासु पाककृती

जुइ's picture

2 Nov 2016 - 12:21 am | जुइ

ही पाकृ हवीच होती. आता करुन बघनार.

पूर्वाविवेक's picture

2 Nov 2016 - 3:54 pm | पूर्वाविवेक

हा माझा आवडीचा पदार्थ आहे. कधीही खाऊ शकते. तू अगदी सचित्र छान उलगडलं आहेस.

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:15 pm | पैसा

यमी! एकदम चटपटीत दिसत आहेत!

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 10:42 am | नूतन सावंत

फोटो आणि कृती आवडली.पटकन उचलून घ्यावा असे वाटत होते.

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 10:59 am | सस्नेह

तपशीलवर पाकृ ! फराळ खाऊन झाल्यावर चांगला बदल.
बटाट्याऐवजी पनीर आणि बेसनऐवजी ब्रेड क्रम्स घालून करून बघते. (बटाटा आवडत नाही )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2016 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसले भारी दिसत आहेत. मस्त प्रेझेंटेशन. गुड़.
पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

5 Nov 2016 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा

आवाडलं हो आवाडलं. जंक्शान जम्लय येकदम.

पिलीयन रायडर's picture

6 Nov 2016 - 7:38 am | पिलीयन रायडर

वा वा वा! आवडले एकदम! फराळ खाऊन कंटाळा आलाय. हे अगदी करण्यासारखे (आणि मला जमण्यासारखे) आहेत!

आनंदी गोपाळ's picture

6 Nov 2016 - 8:47 pm | आनंदी गोपाळ

हराभरा कबाबमधे हरभरे का नसतात? ;)

मग त्याला हरभरे कबाब म्हणावे लागल असत.हा हराभरा कबाब.
बाकी ताजा हिरवागार हरभरा मस्त लागेल यात.

Maharani's picture

10 Nov 2016 - 7:11 pm | Maharani

Jabarach