लाखो करोडो प्रजातींमध्ये नखभर उंचीची, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क स ली ही शारीरिक कुवत नसलेली एक जमात जेव्हा आपलं नगण्य अस्तित्व घेऊन आली, तेव्हा खरं म्हणजे इतर प्राणी तुच्छतेने हसले असतील. अनेक कीटकांपैकी एक.. आत्ता आहे उद्या नसेल असा जेमतेम छटाकभर देह कुणाच्या खिजगणतीतही नसेल. पण कुणालाही न लाभलेलं एक वरदान या प्रजातीला लाभलं होतं - कुतूहल!!
अनेक दिग्गज या विश्वात आले, तसे एका कुठल्यातरी प्रलयाला बळी पडून विलयालाही गेले. पण ही जमात आल्यापासून या ना त्या रूपात आपलं अस्तित्व केवळ कुतूहलापायी टिकवून आहे. कुतूहलाचं कोलीत हातात मिळालेल्या या प्राण्याला नस्त्या उचापती फार!! इथे या भूतलावर उगवल्यापासून आपण काय दिवे लावले, कसे टिकून राहिलो, इतर प्राणी कसे गेले बाराच्या भावात ते आपण अगदी रंगवून रंगवून सांगायला लागलो. आपल्याला समजलेल्या सगळ्या चाराण्याच्या गोष्टींना बाराण्याचा मसाला लावून ते दुसर्याला रंगवून रंगवून सांगण्यातली मज्जाच काही वेगळी!
आधी धड बोलता येत नव्हतं, लिहिणं तर फारच दूर. तेव्हाही आमच्या पूर्वजांनी गुहांमध्ये चित्रं काढू काढू गोष्टीवेल्हाळपणा केलाय. कधीतरी मग स्वतःला साक्षर(!) करून घेतलं आणि मग काय सांगू नि काय नको असं झालं. तिकडे ते इलियड-ओडेसी, इकडे रामायण-महाभारत, झालंच तर तो इराकमधला गिल्गमेश..
तर या 'गोष्ट सांगा-गोष्ट ऐका-गोष्ट लिहा-गोष्ट वाचा' मोहिमेअंतर्गत आपलं छाsssन चालू होतं अगदी! पण स्वतःला साक्षर करण्याच्या नादात, लिपी नावाची एक गुंतागुंत अस्तित्वात आली होती. गोष्ट वाचायची असेल तर आधी ही भानगड समजणं भाग होतं. चित्रांचं मात्र तसं नव्हतं. अडाण्यांनासुद्धा ती कळत होती. त्यातली गोष्ट समजत होती. लागलीच आपण चित्रांचा भाव वाढवुन घेतला. एका चित्रातून हजार शब्दांची गोष्ट उलगडू लागली.
पण थोडक्यात समाधान झालं तर आपल्याला हत्ती, माकड, गाढव वगैरे नाव नसतं का पडलं? आपलं नाव माणूस.. म्हणजे कशातही समाधान नको मानूस ;) ही आपली लाडकी गोष्ट नुसती दिसायला नाही तर बोलायला - हलायला हवी, असं आपल्याला फार वाटू लागलं. आपण जे जे काय वेडेचाळे करतो आणि जे काही करायची आपली बापजन्मात ताकद नाही, त्या करामतीही तिने कराव्यात असं आपल्या मनाने घेतलं. मग काय विचारता??!!
ती माणसाच्या अस्तित्वाइतकी टिचभर छोटीशी गोष्ट त्याच्या कल्पनेपेक्षा मोठी झाली.
तिच्यासाठी उभा राहिला रंगमंच!!
कलाकार आले.. वाजंत्री आली.. रंगरंगोटीला चित्रकार आले.. लखलख चंदेरी प्रकाशात गोष्ट उजळून गेली आणि "सांगायची गोष्ट" खास "अनुभवायची" बाब झाली.
कधी कठपुतळी कधी दशावतार,क धी नृत्यनाटिका, कधी संगीत नाटकं....तिच्या अविष्काराला कलाप्रकाराचं बंधन राहिलं नाही. एकीकडे कुतुहलाच्या पोटी तंत्रज्ञान नावाचं अत्रंगी कार्टं जन्माला आलं होतं. त्याने या गोष्टीला छोट्याशा बॉक्स मधुन जगभर पोहोचवलं. माणसाच्या मागचे व्याप वाढले, गोष्ट पण तशी आता शहाणी सुरती झाली - काळाबरोबर ७२ इंची पडद्यावर ती उतरली होतीच, आता ती वेळेची गणितं ओळखुन "शॉर्ट फिल्म्स" मध्ये पण चटकन डोकावुन जायला लागली..
तिच्या या प्रवासात तिच्याबरोबर पटकथा, रंगभूषा, वेषभूषा, पात्रं, कॅमेरा, लाईट्स, नेपथ्य, संगीत असे अनेक खंदे शिलेदार उभे राहिले. या शिलेदारांनी गोष्टीला 'लार्जर दॅन लाइफ' बनवलं. मूळ कथेला विलक्षण उंचीवर नेऊन ठेवलं.
.GeneratedText {
font-family:'Comic Sans MS';font-size:1em;font-weight:bold;letter-spacing:0em;line-height:1.3em;text-align:center;color:#330099;background-color:#FFFFFF;padding:0.75em;
}
याच मानाच्या शिलेदारांची गोष्ट आपल्याला सांगायची आहे!
दशकपूर्ती निमित्त होणार्या उपक्रमांचा शुभारंभ करताना दृकश्राव्य माध्यमातून कशीही, कुठेही, केव्हाही सादर झालेली गोष्ट आणि तिचं रूप बदलणारे पैलू ह्या विषयावर आपण एक लेखमाला + करणार आहोत.
तर या शुभारंभाच्या उपक्रमाचं नाव .. "गोष्ट तशी छोटी..!"
आणि आपल्या या गोष्टीच्या आविष्काराकरिता मिसळपाव सादर करत आहे
.GeneratedMarquee {
font-family:'Comic Sans MS';
font-size:3em;
font-weight:bold;
line-height:1.3em;
color:#660000;
background-color:#FFFFFF;
padding:0.2em;
}
"मिपा यु ट्युब चॅनल"
तुम्हाला आवडलेली गोष्ट, तिची वेगवेगळी रूपं, तिला चढलेला संगीताचा साज, कॅमेर्याच्या नजरेतून दिसणारा तिचा नवाच पैलू, प्रकाशयोजनेने उजळून टाकलेली तिची न उलगडलेली बाजू, तिच्यातलं मनात अजूनही घर करून राहिलेलं पात्र...
विषय अगदी अमर्याद आहेत!!
बुनियाद, हमलोग यासारख्या मालिका असोत किंवा भक्ती बर्वेंनी साकारलेली 'ती फुलराणी' असो, बी.आर चोप्रांचं महाभारत असो वा आजचं गेम ऑफ थ्रोन्स, पुरुषोत्तममध्ये सादर होणारं नाटक असो वा ब्रॉडवेवर होणारा एखादा शो, 'जाणता राजा'चा भव्य सेट असो वा रस्त्यावर सादर होणारं पथनाट्य, कोकणात भेटणारे दशावतार असोत वा आंतरजालावरचं खास प्रदर्शित होणारी वेब सिरीज.. आपल्याला कोणताही विषय वर्ज्य नाही!
पडद्यावर आणि पडद्यामागे गोष्टीला नवं रूप देणार्या क्षेत्रांबद्दल, त्यात काम करणार्या मनस्वी लोकांबद्दल किंवा निर्मिती संस्थांबद्दल देखील तुम्ही लिहू शकता.
ह्या उपक्रमासाठी वरील कोणत्याही विषयावर तुम्ही तुमचा लेख चित्रफितीच्या (व्हिडिओ आर्टिकलच्या) स्वरूपातही आम्हाला देऊ शकता. तुमचा लेख, त्याला साजेशा फोटोंची पार्श्वभूमी देऊन, अभिवाचनाच्या स्वरूपात तुम्ही रेकॉर्ड करु शकता. किंवा तुमच्या विषयाबद्दल एखादी लहानशी फिल्मही बनवू शकता. हे चॅनल सध्या प्रायोगिक तत्त्वावर असल्याने, आम्ही तुम्हाला त्यासाठी सर्व तांत्रिक मदतही करू. त्यासाठी तुम्ही विशेषांक आयडीसोबतच, स्रुजा आणि पिलीयन रायडर ह्यांच्याशीही संपर्क साधू शकता.
नववर्षानिमित्त येणार्या ह्या उपक्रमासाठी आपण लेख अथवा चित्रफिती पाठवायच्या आहेत १० डिसेंबरपर्यंत.
लेख 'विशेषांक' ह्या आयडीला पाठवायचे आहेत. तुमच्या लेखांचे विषय नोंदवण्यासाठी इथे क्लिक करा.
निघालात कुठे? अजून तर कहानीमे ट्विस्ट बाकी है मेरे दोस्त!
दशकपूर्तीचा उपक्रम आणि नुसती लेखमाला? असं कसं होईल हो ! लेखमालेनंतरचा तो + धमाल भाग घेऊन लवकरच परत येऊ!
तोवर आपल्या धमाकेदार दिवाळी अंकाचा आस्वाद घ्या..आणि हो , आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करा, आपापल्या लेखांवर विचार सुरु करा.. स्टे ट्यूनड!
आपलं चॅनलः
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 12:23 am | पद्मावति
वाह!!!! क्या बात है!!!
29 Oct 2016 - 1:24 am | रेवती
धमाल आहे. भारी उपक्रम!
29 Oct 2016 - 8:14 am | यशोधरा
झक्कास!
29 Oct 2016 - 8:31 am | प्रचेतस
सादरीकरण उत्कृष्ट झालंय.
29 Oct 2016 - 8:47 am | इशा१२३
नावीन्यपूर्ण सादरिकरण _/\_
एकदम भारी!!
29 Oct 2016 - 1:17 pm | सस्नेह
आमीपण येणार या मिपा जत्रेला !
स्रुजा-पिरा, बक अप !!
29 Oct 2016 - 1:19 pm | नूतन सावंत
क्या बात है!गोष्ट तशी छोटी असली तरी लय भारी झाली आहे.
30 Oct 2016 - 3:15 am | विशाखा राऊत
बिंगो.. काय मस्त उपक्रम आणि त्यापेक्षा बहारदार ओळख. एकदम आवडेश.
एकाहुन एक सरस गोष्टी वाचायला आणि ऐकायला बघायला मिळणार नक्की
मिपासाठी मानाचा तुरा नक्कीच होणार :)
30 Oct 2016 - 7:54 am | प्रीत-मोहर
भारी!! यात सहभागी व्हायचा पुरेपूर प्रयत्न करेन
1 Nov 2016 - 10:30 am | श्रीरंग_जोशी
मिपाकरांच्या कल्पकतेला वाव देणारा एक नाविन्यपूर्ण उपक्रम.
या उपक्रमाच्या पहिल्या पावलासाठी स्रुजा व पिलियन रायडर यांचे अभिनंदन.
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!
1 Nov 2016 - 10:41 am | मोदक
भारी उपक्रम.
याचे एक मस्त टीजर / फोटो कायमस्वरूपी ठसठशीत दिसेल असे उजवीकडे (दखलच्या खाली) विराजमान करा.
1 Nov 2016 - 9:41 pm | पिलीयन रायडर
तुमच्या सुचवणीप्रमाणे एक लोगो लगोलग टाकला आहे! सबस्क्राईब करा!
1 Nov 2016 - 9:41 pm | पिलीयन रायडर
तुमच्या सुचवणीप्रमाणे एक लोगो लगोलग टाकला आहे! सबस्क्राईब करा!
1 Nov 2016 - 4:51 pm | विजुभाऊ
मस्त आयडिया.
1 Nov 2016 - 11:12 pm | एस
क्या बात है! भरभरून कौतुक!
2 Nov 2016 - 12:46 am | रुपी
छान.. नाविन्यपूर्ण उपक्रम!
2 Nov 2016 - 12:55 pm | अनन्न्या
खूपच छान उपक्रम.
3 Nov 2016 - 10:16 am | अन्नू
अरे!! खुप छान छान गोष्टी झाल्यात कि मिपावर :)
3 Nov 2016 - 10:07 pm | विकास
एकदम उत्तम प्रकल्प!
पिक्चरचा बाकी असलेला भाग बघण्यास उत्सुक!
4 Nov 2016 - 10:32 am | पूर्वाविवेक
खूप छान स्क्रिप्ट ! सृजाचा आवाज पण छान लागलाय.
4 Nov 2016 - 10:03 pm | स्वाती दिनेश
रोचक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम. वेगळी संकल्पना! आवडले आहे.
स्वाती
5 Nov 2016 - 4:02 pm | पियुशा
किति भारी , मज्जा येणारे आता खुप :)
5 Nov 2016 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम नाविन्यपूर्ण उपक्रम !!!
5 Nov 2016 - 11:59 pm | प्रीत-मोहर
सृज सुपर्ब audio n video.
7 Nov 2016 - 5:04 am | स्रुजा
नमस्कार मंडळी,
आपल्या चॅनल ला आतापर्यंत एका आठवड्यात ६५ सब्स्क्राईबर्स आले आहेत, हा खुप उत्साहवर्धक भाग आहे. यु ट्युब आता पुढचे २ महिने आपल्या या उपक्रमाच्या दिमतीला असणार आहे. ज्या ज्या प्रकारे युट्युब वापरुन आपल्याला फुल२ धमाल करता येणार आहे त्या त्या प्रकारचा एक एक नमुना तुमच्यासमोर येणार आहे , म्हणजे सोदाहरण कल्पना मिळतील, यु ट्युब च्या तांत्रिक समस्यांचा ( असल्याच तर) अंदाज येईल आणि तुमच्या सहभागाने आम्हाला ही नवीन कल्पना मिळतील. तेंव्हा आपल्या चॅनल ला भेट देत राहा, आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच हजर राहु.
व्हिडीओचं, धाग्याचं कौतुक केल्याबद्दल आणि आवर्जुन इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या डोक्यावर बसुन , ऑडिओ आणायचं श्रेय पण खरं तर पिराचंच आहे आणि व्हिडीओ आज दिसतोय तसा तुमच्या समोर आणायचं श्रेय ही तिचंच ! डोक्याला मेजर शॉट होता हा व्हिडीओ बनवणं , अक्षरश: काही सेकंदांत इमेजेस बदलत होत्या , त्यांची अलाईनमेंट कशी केली तिचं तिला माहिती ! त्यात मी प्रत्येक रेकॉर्डींग वेगळ्या शब्दात करायचा चंग बांधला होता. दर रेकॉर्डींग ला ही शिव्यांची लाखोली वाहत अलाईनमेंट बदलत होती. समोर असते तर दोन चार फटके खाल्ले असते मी :प कुठल्याही क्षणी मागच्या दाराने पळुन जाण्याची तयारी मी ठेवली होती जेंव्हा तिने मला "रेकॉर्डिंग आणायचंच हं" असं सांगितलं ( त्यांच्यात विचारत नाहीत ;) होतं. तिला ही कल्पना मनापासून पटली होती आणि त्यासाठी सॉफ्टवेअर शोधण्यापासून ते इमेजेस बनवण्या / हुडकण्यापर्यंत सगळी मेहनत घ्यायची तिची तयारी होती, नव्हे ते ती करुन च पुढचं बोलत होती. असा " पार्टनर इन क्राईम" अस्ला की आपोआप वेळ नाही, ऑफिसचं काम वगैरे लंगडी कारणं मागे पडतात, माझी पण पडली आणि रात्री ३ वाजेपर्यंत जागुन एकदाचा व्हिडीओ आम्ही बनवला.
आता मिशन उपक्रम ...
आम्हाला लगोलग काही प्रवेशिका आल्या आहेत, त्यांचे विषय खुपच खतरनाक आहेत हे फार महत्त्वाचं...पण, तरी विषयाबाबत काही प्रश्न असतील तर आपण आता त्याची चर्चा करुयात.
आम्ही लवकरच उपक्रमाचा तो उरलेला धमाल भाग घेऊन हजर होऊ आणि तत्पुर्वी, व्हिडिओ बनवण्यासाठी उपलब्ध असलेले टुल्स ( अर्थात चकट फु) आणि साधारण पद्धत यांचे तपशील घेऊन येऊ.
ऑडिओ रेकॉर्डिंग साठी आम्ही विंडोज आणि आय फोन मध्ये असलेले रेकॉर्डर्स वापरले. इथे आपण त्याची ही चर्चा करु शकतो.
आणि हो.. देऊ का त्या उरलेलया भागाची एक हिंट??? देतेच.... कंपु बनवायला घ्या ... खुप उपयोग होणार आहे त्याचा ;)
7 Nov 2016 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पीरा, स्रुजा, मस्त सुरु आहे. लगे रहो. वेल डन....!
-दिलीप बिरुटे
7 Nov 2016 - 7:29 pm | स्रुजा
धन्यवाद :)
7 Nov 2016 - 7:37 pm | पिलीयन रायडर
धन्यवाद!
मिसळपाव ह्या संस्थळाच्या शुभारंभाचा धागा - शाहीर ते शाहीर! हा तुमचाच होता. म्हणुनच ह्या धाग्याला आपल्या व्हिडिओमध्येही मानाचे स्थान दिलेले आहे!
तेव्हा आता दशकपुर्ती शुभारंभासाठीसुद्धा तुमचा लेख हवाच आहे!
8 Nov 2016 - 9:39 am | प्रीत-मोहर
सहमत!!
कुडोज पिरा आणि सृज.
गो गर्ल्स !!!
7 Nov 2016 - 9:53 am | यशोधरा
स्रुजा, ह्याचा आता एक वेगळा धागा बनवा बरं.
7 Nov 2016 - 7:26 pm | स्रुजा
येस्स, धमाल पार्ट २ चा वेगळा धागा काढायचाच आहे. पण इथे तांत्रिक बाजू आणि विषयांची चर्चा होऊन जाऊ दे .
7 Nov 2016 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भाग घेणार. विषयाचं अॅडवान्स बुकिंग करन ठेवतोय.
8 Nov 2016 - 9:48 am | आतिवास
मला तांत्रिक बाबी जरा (खरं तर ब-याच) कमी कळतात त्यामुळे हे प्रकरण नेमकं समजलेलं नाही अजून.
पण कुतूहल नक्की आहे.
वाट पाहते.
8 Nov 2016 - 10:28 am | नाखु
रांगेतला प्रवासी मिपाकर
8 Nov 2016 - 5:33 pm | पिलीयन रायडर
काहीच अवघड नाहीये!
उपक्रमाचा विषय असा आहे की :- दृकश्राव्य माध्यमात सादर होणारी कथा (टिव्ही, नाटक, सिनेमा, कथकलीसारख्या पारंपारिक कलांपासुन ते अगदी इंटरनेटवरच्या वेबसिरिज) आणि ह्या सादरीकरणात कथेला फुलवण्यासाठी मदत करणारे रंगभुषा, वेशभुषा, नेपथ्य, लाईट्स-कॅमेरा इ. अनेक घटक.
तर थोडक्यात पडद्यावरची आणि पडद्यामागची... दोन्ही गोष्टींवर लिहायचे आहे.
मिसळपाव युट्युब चॅनल खास ह्या उपक्रमासाठी सुरु केले आहे. (अर्थात ते उपक्रम झाला की सगळ्यांना सर्व विषयांसाठी खुले होईलच.)
तर ह्या उपक्रमात निव्वळ लेखच नाहीत तर व्हिडिओ आर्टिकल्ससुद्धा देता येतील. म्हणजे तुम्ही जर वरती दिलेला व्हिडिओ पाहिलात, तर तशाच पद्धतीने तुम्ही तुमचा विषय चित्रफीतीतुन मांडु शकता. किंवा मुलाखती घेऊ शकता, किंवा कलाकाराच्या मनोगताचा व्हिडिओ असु शकतो. किंवा एखाद्या निर्मिती संस्थेबद्दलची माहिती एका लहानशा डॉक्युमेंटरी सारखी देऊ शकता. शॉर्ट फिल्म्स बनवु शकता.
थोडक्यात काय तर अजुन एका नव्या प्रकारे अभिव्यक्ती!
हे व्हिडिओ कसे बनवता येतात ह्याची माहिती आम्ही लवकरच टाकतो. अगदीच चकटफु आणि सोप्पा प्रकार आहे. वरचाच व्हिडिओ आम्ही एक फुकट सॉफ्टवेअर आणि मोबाईल रेकॉर्डर घेऊन बनवला आहे. (अर्थात परफेक्शनिस्ट स्रुजाराजेंनी तब्बल "५०" वेळा रेकॉर्डींग केलंय. अगदी शांतता हवी म्हणुन ऑफिसच्या बाथरुममध्ये सुद्धा!!) रेकॉर्डींगमध्ये काही बाहेरचे आवाज आले किंवा लहानशी चुक झाली, तर ते दुरुस्त करायलाही एक चकटफु सॉफ्टवेअर आहे. त्याबद्दलही लिहूच.
तुमच्या हातात एक इंटरनेटशी जोडलेला स्मार्टफोन आहे ना?! मग यु आर रेडी!
8 Nov 2016 - 3:29 pm | संदीप डांगे
गोष्ट तशी छोटी म्हटलं तरी ती डोंगराएवढी असते. एक सिनेमा बनण्यामागे लै खटपटी, पांढर्यावर काळ्या अक्षरांमधे लिहिलेल्या कथेचं मूर्तीमंत रुप साकार होतांना पाहणं हाही एक खल्लास अनुभव.
लेखकांना आपल्या कथा पडद्यावर साकार होतांना नक्की काय वाटतं ह्याबद्दल अधिक वाचायला आवडेल.
8 Nov 2016 - 4:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अरे कसला भारी प्रकार आहे हा.. लैच..
लागलोय कामाला.. आताच नाही सांगत.. पण अब कुछ तुफानी करते है... :)
8 Nov 2016 - 5:36 pm | पिलीयन रायडर
लोकहो!! उत्साहासाठी धन्यवाद!!!!
फक्त विषयांचे रिपिटेशन होऊ नये म्हणुन फॉर्म मध्ये नोंद कराल का?
तुमचा विषय इथे नोंदवा.
14 Nov 2016 - 10:45 pm | पैसा
पटापट लिहायला लागा!
1 Dec 2016 - 10:48 pm | एस
दोन्ही व्हिडिओ पाहिले आज. भारी आहेत.
7 Dec 2016 - 10:34 pm | पिलीयन रायडर
तुम्हाला आवडलेली गोष्ट, तिची वेगवेगळी रूपं, तिला चढलेला संगीताचा साज, कॅमेर्याच्या नजरेतून दिसणारा तिचा नवाच पैलू, प्रकाशयोजनेने उजळून टाकलेली तिची न उलगडलेली बाजू, तिच्यातलं मनात अजूनही घर करून राहिलेलं पात्र...
विषय अगदी अमर्याद आहेत!!
बुनियाद, हमलोग यासारख्या मालिका असोत किंवा भक्ती बर्वेंनी साकारलेली 'ती फुलराणी' असो, बी.आर चोप्रांचं महाभारत असो वा आजचं गेम ऑफ थ्रोन्स, पुरुषोत्तममध्ये सादर होणारं नाटक असो वा ब्रॉडवेवर होणारा एखादा शो, 'जाणता राजा'चा भव्य सेट असो वा रस्त्यावर सादर होणारं पथनाट्य, कोकणात भेटणारे दशावतार असोत वा आंतरजालावरचं खास प्रदर्शित होणारी वेब सिरीज.. आपल्याला कोणताही विषय वर्ज्य नाही!
लिहायचय पण विषय सुचत नाही असं असेल तर आम्हला व्यनि करा.
आणि हो.. प्रथेप्रमाणे डेडलाईन १५ पर्यंत पुढे नेत आहोत!!