गेली जिन्दगी

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
29 Oct 2016 - 9:04 pm

p2

झामलझामल करण्यात गेली जिन्दगी
तर्रीपोहा खाण्यात गेली जिन्दगी

फिटयाली केली त्या फुटाळ्यावर कधी
बाकी बर्डी फिरण्यात गेली जिन्दगी

नाईटा मारत पास झालो तर सही
क्यूबिकलच्या सपन्यात गेली जिन्दगी

दिपवाळी आली वेगळ्या चिंतेसकट
अन् तिकटा बुक करण्यात गेली जिन्दगी

कोठे फासे लावून बसला पारधी?
एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी

- संकेत

-------------------------
शब्दार्थ:
झामलझामल करणे:- टिवल्याबावल्या करणे
फिटयाली:- उनाडक्या

प्रतिक्रिया

वेगळी भाषा असल्याने कविता आवडली.

पैसा's picture

31 Oct 2016 - 4:46 pm | पैसा

तुही जिंदगी तर अजून बाकी आहे बे! कांदेपोहे कधी खाल्लेस? =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा. आवडली कविता. अजून दोनचार कडवी भर घालता आली असती, असेही वाटले.
पुलेशु..

चित्रही छान.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

4 Nov 2016 - 4:30 pm | तुषार काळभोर

एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी
याचा अर्थ कोणत्या संदर्भात लावावा याचा विचार करतोय ;)

स्वामी संकेतानंद's picture

12 Nov 2016 - 7:46 am | स्वामी संकेतानंद

ज्यांना माझं आडनाव माहीत आहे आणि माझे रिलेशनशिप स्टेटस माहीत आहे, त्यांना विचार करावा लागणार नाही.;)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2016 - 5:00 pm | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जी की महान रचनांएँ..!
स्वामिज्जी द ग्रेट!

चित्र कुटून कहाडलं वो स्वामिज्जीईईईईईई... ? लै खंगरी हाय! ;)

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 5:22 pm | पाटीलभाऊ

एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी

खिक्क...

संदीप डांगे's picture

4 Nov 2016 - 7:26 pm | संदीप डांगे

कवितेतल्या कारुण्याची वेगळीच खोली आहे.. सहज भाषेत खंत, निराशा व्यक्त केलीय ती अस्वस्थ करते...

स्वामी, सुंदर कविता!

बाकी लोक्स, फुटाळा बोले तो नागपूर का तलाव!

सतिश गावडे's picture

4 Nov 2016 - 7:57 pm | सतिश गावडे

का कोण जाणे, ही निराशेची भावना तुझी स्वतःची वाटत आहे.

शब्दबम्बाळ's picture

4 Nov 2016 - 9:22 pm | शब्दबम्बाळ

हि शायरी आठवली यावरून...

किया बादलों मै सफर जिंदगीभर,
जमींपर बनाया न घर जिंदगीभर,

सभी जिंदगी के मजे लुटते हे,
न आया हमे ये हुनर जिंदगीभर...

शेवटचा शेर वेगळा पण भारी वाटतो एक्दम...

मुहोब्बत रही चार दिन जिंदगी में,
रहा चार दिन का असर जिंदगीभर...

संदीप डांगे's picture

4 Nov 2016 - 9:36 pm | संदीप डांगे

भई वाह!

नेहेमीप्रमाणे छान कविता. पोहोचली.

डॉ म्हणतात तशी अजून दोन कडवी आवडतील..

नूतन सावंत's picture

4 Nov 2016 - 10:54 pm | नूतन सावंत

छान कविता न चित्रसुध्दा.

मित्रहो's picture

11 Nov 2016 - 1:59 pm | मित्रहो

चित्र मस्त
शेवटले कडवे आवडले

स्वामी संकेतानंद's picture

12 Nov 2016 - 7:48 am | स्वामी संकेतानंद

धन्यवाद मंडळी.

चित्र खूप आवडले. चित्रकाराचे त्याबद्दल विशेष आभार! _/\_

पियुशा's picture

12 Nov 2016 - 3:52 pm | पियुशा

धन्स. चित्र कारणी कडून ;) कविता मस्तय :)

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2016 - 3:56 pm | चौथा कोनाडा

मस्त, झक्कास !

स्वामीजी पैर लागू इस बहतरीन रचना के लिए ।

विवेकपटाईत's picture

14 Dec 2016 - 7:18 pm | विवेकपटाईत

कविता आवडली, पण समजली नाही.

रातराणी's picture

14 Dec 2016 - 7:25 pm | रातराणी

मस्त!