सारेगमप महा विजेता - कार्तिकी गायकवाड

Primary tabs

महेंद्र's picture
महेंद्र in काथ्याकूट
9 Feb 2009 - 7:38 am
गाभा: 

कालच रात्री सारेगमप चा शेवटला एपिसोड पाहिला. शेवटी निकाल एकदम अनपेक्षीत लागला. ह्या कार्यक्रामामधे काय काय घडले ते इथे साग्र संगित लिहिले आहे.. जरुर वाचा आणि आपल्या कॉमेंट्स पोस्ट करा.

मी संपुर्ण कार्यक्रामावर काहितरी खरडलंय.. वाचा आणि कॉमेंट्स द्या..

असॉ, हे काही जरी असलं तरी कार्तिकी च्या विजयाचे महत्व कमी होत नाही. अभिनंदन....
इथे वाचा:- http://kayvatelte.wordpress.com

प्रतिक्रिया

अप्पासाहेब's picture

9 Feb 2009 - 7:52 am | अप्पासाहेब

प्रथमेश किंवा आर्या ह्या दोघांपैकीच एक जण ह्या साठी लायक होते. प्रथमेश व आर्या ख-या अर्थाने व्हर्साटायल गायक आहेत. कार्तिकी चे गाणे चांगले वाट्ले तरी तीच्या आवाजाला मर्यादा आहेत, काही ठराविक पध्द्द्तीचीच गाणी ती उत्तम गाऊ शकते.

अमोल केळकर's picture

9 Feb 2009 - 8:08 am | अमोल केळकर

पाच ही जणांसाठी ही संगीत क्षेत्रातील एक नवीन सुरवात आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मुलांनी हा निर्णय आनंदाने स्विकारला आहे.
या मागचा प्रांतिक वाद, राजकारण , एस एम एस मधील अर्थकारण हे या मुलांपर्यंत पोचले नसतील अशी अशा. तसेच अंतीम विजेती घोषीत केल्यानंतर ही मुलांच्यातील वातावरण पुर्वीसारखेच आढळले . कार्तिकीबद्दल असुया दिसली नाही. यातच सर्व जण जिंकले
एकंदर कार्यक्रम आवडला
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

महेंद्र's picture

9 Feb 2009 - 10:56 am | महेंद्र

मला असं वाटतं की झी चे हे आधीपासुनच ठरले होते की कोणाला विजयी घॉषित करायचे ते. कालच्या कार्यक्रमात किती एस एम एस आणि किती सिलेब्रिटी जजेस चे मार्क्स आहेत हे डिक्लिअर करण्यात आले नाही. ते जर त्यांनी सांगितलं असतं तर मग सगळंच खरं खोटं बाहेर पडलं असतं.
तरिही, कार्यक्रम खुपच सुंदर झाला.
मला आर्या बद्दल खात्री होती....
परंतु , ह्या निकालावरच कोणाचे भवितव्य अवलंबुन नाही. आयुष्यातला हा एक लहानसा टप्पा आहे त्या मुलांच्या.त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

9 Feb 2009 - 4:02 pm | विसोबा खेचर

मला असं वाटतं की झी चे हे आधीपासुनच ठरले होते की कोणाला विजयी घॉषित करायचे ते. कालच्या कार्यक्रमात किती एस एम एस आणि किती सिलेब्रिटी जजेस चे मार्क्स आहेत हे डिक्लिअर करण्यात आले नाही. ते जर त्यांनी सांगितलं असतं तर मग सगळंच खरं खोटं बाहेर पडलं असतं.

सहमत आहे..

तात्या.

नितिन थत्ते's picture

9 Feb 2009 - 11:16 am | नितिन थत्ते

मी उत्तर भारतात असल्याने सर्व भाग पाहता आले नाहीत. जे पाहिले त्या प्रत्येक भागात कार्तिकीचा एक वेगळा ठसा जाणवला.
विशेषतः 'उघड्या पुन्हा जहाल्या' ही गझल आणि घागर घेऊन ही गौळण तर उच्चच.
काहीशी अपरिचित किंवा नेहमी न म्हटली जाणारी गाणी सादर करून ती लोकांना आवडवणे ही किमया तिला साधली होती.

बाकी चार जण्ही चांगलेच गातात. सर्वांना पुढील प्रवासासाठी सदिच्छा.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

महेंद्र's picture

9 Feb 2009 - 2:10 pm | महेंद्र

सांप्रदायिक गाणी तिने पुर्ण ताकतिने सादर केलीत. ह्याचा दुसरा फायदा म्हणजे , ही गाणी पुर्वी कोणि प्रतिथयश गायकाने गायलेली नसल्यामुळे त्या गाण्याला कम्पॅरिझन साठी स्केल नव्हती- जी इतर गाण्यांना होती.

पण वरच्या गोष्टीमुळे तिच्या विजयाचे महत्व कमी मात्र होत नाही.
प्रतिकुल परिस्थिती मधला तिचा विजय हा निश्चितच उल्लेखनिय आहे.

आनंद घारे's picture

9 Feb 2009 - 5:07 pm | आनंद घारे

कार्तिकी खूपच गुणी मुलगी आहे आणि तिने कांही गाणी अप्रतिम गायिली यात शंका नाही. तिच्या वयाच्या मानाने तर ते निव्वळ अविश्वसनीय होते. पण स्पर्धेत एकदा वयोगट ठरल्यानंतर त्यात लहान मोठे असे करता येत नाही. त्यामुळे मुग्धा कितीही गोड आणि हवीहवीशी वाटली तरी तिने ही स्पर्धा जिंकावी असे मात्र कधीच मनात आले नाही. या स्पर्धेच्या निकालाबद्दल मला दोन गोष्टींचा उल्लेख करावा असे वाटते.
१. प्रत्येक भागानंतर त्या भागामधले सर्वोत्कृष्ट गाणे कोणाचे झाले ते मान्यवर तज्ञ पाहुणे परीक्षक ठरवून त्याला बक्षीस देत असत. ते पटकावण्यात माझ्या कल्पनेप्रमाणे प्रथमेश आणि आर्या हे दोघेही कार्तिकीच्या बरेच पुढे होते.
२. सुरुवातीला ठरवलेले नियम दोन वेळा बदलण्यात आले, एकदा कॉलबॅक करून आणि दुसर्‍या वेळी पांचही स्पर्धकांना अंतिम फेरीमध्ये दाखल करून घेऊन. हे दोन्ही निर्णय इतर प्रेक्षकांप्रमाणे मलासुद्धा मनापासून आवडलेलेच होते, कारण त्यामुळे जास्त स्पर्धकांची गाणी ऐकण्याची संधी मिळाली. पण खरे तर त्यानंतर झालेल्या भागांमध्ये कार्तिकीने पूर्वीपेक्षा अधिक चांगली व उठावदार अशी गाणी म्हंटली. त्या दोन्ही बदलांचा फायदा कार्तिकीला मिळाला .
त्यामुळे हा योगायोग होता की हे ठरवून केले गेले अशी शंका यायला वाव आहे. "कार्तिकीदेवींचा विजय असो! " अशी घोषणा विनोदाने केली असावी असे शेवटच्या क्षणापर्यंत वाटले होते, पण तेसुद्धा हेतुपुरस्सर होते की काय?

कार्तिकीने विजयानंतर केलेले विनयशील वर्तनसुद्धा कौतुकास्पद आहे. तिचे हार्दिक अभिनंदन आणि तिला भविष्यकाळात भरभरून यश मिळावे अशा शुभेच्छा.

सारेगमच्या पूर्वीच्या मालिकांच्या वेळी अशा प्रकारच्या स्पर्धांनाच कित्येक मिपाकरांनी विरोध दर्शवला होता, पण लिटल चँप्सनी त्यांची मनेसुद्धा जिंकलेली दिसतात!

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

पुष्कराज's picture

10 Feb 2009 - 6:50 am | पुष्कराज

आवाज पाचही जणांचे चांगले आहेत. पण निकालावरुन हे स्पष्ट झाल की रियालिटी शो
मध्ये रियालिटी नाही