पुस्तक हवी आहेत ?

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
5 Feb 2009 - 3:48 pm
गाभा: 

मला काहि व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके हवि आहेत जरा मदत कराल का????
१ प्रताप्रराव गुजर
२ नेताजी पालकर
३ बहीर्जी नाईक
४ थोरला बाजीराव पेशवा
५ मस्तानी

जर कोणा मिपाकरांस या महान व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके माहित असल्यास जरा मला मदत करा
अजुन काहि असल्यास ईथे महिति द्या

प्रतिक्रिया

अनंत छंदी's picture

5 Feb 2009 - 3:57 pm | अनंत छंदी

मस्तानीच्या जीवनावर काही मूलभूत संशोधन करणारे चित्रकार (मला वाटतं) गोडसे यांनी लिहिलेल्या "समन्दे तलाश "या पुस्तकात चांगला माहितीपूर्ण लेख आहे. नांवावर जाऊ नका पुस्तक मराठीत आहे. याच गोडशांनी मस्तानी पाबळ येथील कबर शोधून काढली होती असे म्हटले जाते.

लिखाळ's picture

6 Feb 2009 - 3:28 am | लिखाळ

द.ग.गोडसे यांनी 'मस्तानी' नावाचे मस्तानीचे चरित्र लिहिले आहे. तसेच अनंत छंदी म्हणतात त्या 'समन्दे तलाश' या पुस्तकातशिवाजी महारांच्या एका पत्राची समिक्षा आहे. त्यांनी मस्तानी या विषयावर केलेली तीन भाषणे 'दफ्तनी ' या पुस्तकात छापली आहेत. दोन्ही पुस्तके वाचनीय. दोन्ही पुस्तके पॉप्युलर प्रकाशनाची आहेत.

प्रतापी बाजीराव हे बाजीरावाचे चरित्र पाहिले आहे. वाचले नाही.
-- लिखाळ.

धमाल मुलगा's picture

5 Feb 2009 - 5:39 pm | धमाल मुलगा

एक आणखी हवं आहे: शहाजीराजे भोसले. ह्यांचं चरित्र/जिवनावरील कादंबरी कोणी सुचवू शकेल काय?

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

सखाराम_गटणे™'s picture

5 Feb 2009 - 5:43 pm | सखाराम_गटणे™

४ थोरला बाजीराव पेशवा - राउ

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Feb 2009 - 9:00 am | घाशीराम कोतवाल १.२

बास फक्त ३च पुस्तके सुचवु शकलात आपण आभारी आहे
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.