गाभा:
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा !
१. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे....
२. ट्रंपची राजकीय शिकवणी....
३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ?
४. दुहेरी मतदान ?
५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ?
६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ?
७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?
प्रतिक्रिया
15 Oct 2016 - 10:47 am | किसन शिंदे
खिक्क !!
रच्याकने, तुम्हीही आम्रिकावारीची जाहीरात करताय कि काय असं वाटलं. =))
15 Oct 2016 - 10:59 am | माम्लेदारचा पन्खा
एक तर आम्ही स्वत:च स्वत:ला साहेब म्हणत नाही....परदेशवारीची झैरात त्याहून करत नाही...
देशाची मातीच आम्हाला प्रिय आहे.....(मधून मधून आम्ही खातोही ती !)
15 Oct 2016 - 11:51 am | संदीप डांगे
कडक प्रतिसाद! ;)
15 Oct 2016 - 12:06 pm | सतिश गावडे
सरळ सरळ सांगा ना ठाण्यात हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला लाल रंगाचे डबे मिळाले नाहीत.
15 Oct 2016 - 12:12 pm | किसन शिंदे
सध्या दिवाळीमुळे अनेक घरांचे रंगकाम काढल्याने स्टॉक संपला असेल. =))
9 Nov 2016 - 10:03 pm | माम्लेदारचा पन्खा
बहुमतानं निवडून आलेत ! साहेबांचा विजय असो !!
15 Oct 2016 - 11:07 am | नाखु
तूर्त इतकेच
15 Oct 2016 - 11:53 am | चिनार
श्या..तुम्ही आमच्या साहेबांना पुरते ओळखलेच नाही अजून..काही महत्वाचे अजेंडे खाली आहेत..
1. अमेरिकन धरणांचा मूत्रविसर्जनच्या संदर्भाने अभ्यास
2. ख्रिश्चन धर्मियांच्या पोटजातींविषयी अभ्यास आणि अन्यायग्रस्त पोटजातींसाठी आंदोलनाची रूपरेषा
3. अमेरिकन एक्सप्रेस सारख्या मोठ्या बँकाच्या 'शेतकरी कर्जवाटप आणि वसुली' या विषयावर एक चर्चासत्र
4. 'अमेरिकन बँक आणि सहकार चळवळ- काळाची गरज' या विषयावर व्याख्यान
5. 'जात - कधी लपवावी आणि कधी काढावी' - या कादंबरीचे प्रकाशन
6. चेहरा एक,मुखवटे अनेक - या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
7. नैसर्गीक आपत्तीकडे सुर्वणसंधी म्हणून कसे पाहावे याविषयावर अमेरिकन संसदेत भाषण
8. 'साहेब" या आगामी चरित्रपटासाठी वॉर्नर ब्रदर्ससोबत भागीदारीविषयी चर्चा.
15 Oct 2016 - 12:02 pm | विशुमित
खूप हिणकस आणि द्वेष भावनेने दिलेला प्रतिसाद...
15 Oct 2016 - 12:10 pm | चिनार
एक राहिलेच..
9. 'द्वेष -- करावा पण लपूनछपून' -- या विषयावर आधारित लघुकथांचे वाचन..
(या लघुकथा पुरोगामी महाराष्ट्रात साहेबांची सत्ता असताना आणि नसताना घडलेल्या असून..ह्यातले पात्र आणि घटना ह्या साहेबांचे निकटवर्तीय,कार्यकर्ते,संघटना ह्यांच्याशी थेट संबंधित असूनही सुसंकृत साहेबांचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही !)
15 Oct 2016 - 7:43 pm | सुखी
+1
15 Oct 2016 - 10:57 pm | सुखीमाणूस
+11111111
17 Oct 2016 - 5:35 pm | वटवट
अगागागागा.... फुटलो राव हसून... येऊ द्या अजून..
ते अजून एक राहिलंच कि...
"विस्तृत आणि मोठ्या भूभागाचा विकास" ह्या विषयावर सखोल अर्थपूर्ण चिंतन... (ट्रम्पपट्टा किंवा बुशपट्टा असं काहीतरी)
15 Oct 2016 - 11:18 am | पैसा
थोडक्यात आटपलंत ओ! अजून मस्त फुलवता येईल हा विषय.
15 Oct 2016 - 11:49 am | माम्लेदारचा पन्खा
सगळ्यांनी थोड्या थोड्या विटा लावा !
15 Oct 2016 - 11:59 am | मोदक
तरीपण काय या धाग्याचे 500 वगैरे होतील असे वाटत नाही
15 Oct 2016 - 11:58 am | विशुमित
मला या धाग्यावर दगड घालावासा वाटतोय. (सुसंस्कृतपणा आणि संयम या दोन गोष्टींनी हात बांधले आहेत)
अगदी निरर्थक, बिनबुडाचा, पूर्वग्रह, ऐकीव आणि कोत्या मनाने अत्मरंजन करणारं विडंबन वाटलं.
15 Oct 2016 - 12:03 pm | चौकटराजा
अशे निरथेक धागे अंमळ करमणुकीसाठी असतात.... तुम्ही शिरेस घेतलं तर मिपाकर इरेस पेटतील .
15 Oct 2016 - 12:03 pm | मोदक
धागाकर्त्याला दगड मारणार असला तर सांगा, पत्ता देतो.
सोबतीला आणखी चार हितचिंतकही तयार होतील, मूक मोर्चा काढणार असाल तरी सांगा.
15 Oct 2016 - 12:10 pm | विशुमित
आमची संस्कृती नाहीय ती दगड मारण्याची.
पण तरी पण पत्ता द्याच, भेटावं म्हणतोय त्यांना एकदा...
हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.
15 Oct 2016 - 12:24 pm | चिनार
ही संस्क्रुती आणि हा सुसंस्कृतपणा अंगी असल्यावर वेगळे दगड मारण्याची संस्कृती असावीच लागत नाही.
15 Oct 2016 - 12:50 pm | विशुमित
<<<<<<" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>>
मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही?
याचा पूर्वइतिहास हा आहे....
http://indianexpress.com/article/india/politics/maharashtra-bjp-sends-sh...
15 Oct 2016 - 12:53 pm | विशुमित
पत्ता द्या की...आज सुट्टीच आहे, भेटून येतो त्यांना हितचिंतकां बरोबर....!!
15 Oct 2016 - 1:03 pm | चिनार
तुम्हाला त्यात रूपक वाटत असेल तर तसे समजा..पण अंगाशी आल्यावर साहेबांना लगेचच हे रूपक फिरवावं
लागलं होतं..(अर्थात त्यांच्यासाठी हे नवीन नाहीच )
बाकी ते सर्जिकल स्ट्राईक बद्दलचं बोलणं पण रूपक म्हणावं का ?? नवीन साहित्यिक पर्वाचा उदय होतोय म्हणायचं महाराष्ट्रात..
15 Oct 2016 - 2:29 pm | बोका-ए-आझम
असले प्रतिसाद देण्याऐवजी सरळ भक्त आहोत असं म्हणा आणि सोडून द्या.
15 Oct 2016 - 3:00 pm | विशुमित
प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त आहे म्हणायचं की नाही हे ठरवणारे आपण मिपाचे मालक नाही आहात, हे मला खात्रीशीर माहिती आहे. नाहीतर मिपाचे जे कोणी मालक असतील त्यांनी हा धागा उडवून टाकावा. प्रतिसाद बंद होतील.
कोणी काही ही बेछूट आरोप करायचे, विडंबन करायचं, मनाला वाटेल ती भडास काढायची, वर म्हणायचं दगड घालण्यासाठी पत्ता देतो (जो त्यांनी अजून दिला नाही), आणि परत म्हणायचं प्रतिसाद देणं बंद करा ?
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
15 Oct 2016 - 3:12 pm | श्रीगुरुजी
या बाबतीत मात्र मी साहेबांना महाकौशल्याला दाद देतो.
15 Oct 2016 - 3:19 pm | विशुमित
दाद कशाला देता, मिठाची गुळणी घेऊन बसा. उत्तर नसलं की महाकौशल्य दिसतं. असो ..
15 Oct 2016 - 3:21 pm | श्रीगुरुजी
मिठाची गुळणी कशाला? साधं कौतुक पण करायचं नाही का? उद्या आम्ही गप्प बसलो तर लगेच म्हणाल की साहेबांच्या कौशल्याचा मत्सर वाटतोय, म्हणून साधं कौतुक सुद्धा करत नाही.
15 Oct 2016 - 3:23 pm | चिनार
मत्सर नाही...द्वेष !!
15 Oct 2016 - 3:15 pm | चिनार
ही गोष्ट तुमच्या माननीय साहेबांना आणि त्यांच्या चेल्यांना सुद्धा पटवून द्या..आणि जर त्यांनी ऐकले नाहीच तर बोलून झाल्यावर ,"मी असं बोललोच नाही !!" हा पळपुटेपणा तरी बंद करायला सांगा..
-- 'साहेब' या व्यक्तीचा आणि प्रवुत्तीचा एक विरोधक
15 Oct 2016 - 3:24 pm | विशुमित
तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर कोणी त्याच आम्हाला काय देणे घेणे. म्हणजे तुम्ही फक्त एकांगीच प्रतिक्रिया देणार हे सिद्ध करताय आणि दुसऱ्यांना चेले चपाटे म्हणताय??
आम्ही बाजू घेतली की चेले चपाटे आणि तुम्ही बाजू घेतली की भक्त ???
15 Oct 2016 - 3:32 pm | विशुमित
ते जानकर पळाले काल खंडेरायाची शपथ घेऊन...!!
15 Oct 2016 - 3:35 pm | श्रीगुरुजी
साहेबांच्या तुलनेत जानकर म्हणजे डेल स्टेनच्या तुलनेत ईशांत शर्मा.
15 Oct 2016 - 3:39 pm | विशुमित
इतर मिपावर द्वेष मुलुख प्रतिसाद देणाऱ्यांची तुलना न केलेली बरं, असंच सुचवायचं आहे ना तुम्हाला??
15 Oct 2016 - 3:41 pm | श्रीगुरुजी
मी लिहिलं ते एक रूपक आहे. रूपक समजून घ्या.
15 Oct 2016 - 3:44 pm | विशुमित
समजलो मी...!!
धन्यवाद...!!
15 Oct 2016 - 8:45 pm | अशोक पतिल
जानकरांचि सुसंस्क्रूत मुक्ताफळे एकुन संपुर्ण महाराष्ट्र धन्य झाला !
इथे मात्र अजुन लघवी पुराण च .
अरेरे कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा .
15 Oct 2016 - 3:44 pm | चिनार
मी तुम्हाला चेले -चपाटे म्हटलेलं नाही. अर्थात तुम्ही स्वतःला तसं काही समजत असाल तर माझा आक्षेप नाही. मी विरोधक आहे हे जाहीर करतोय. बाकी ते एकांगी, रूपक-बिपक वगैरे चालुद्या..
साहेबांचे आगामी काल्पनिक रूपक :
1. आम्ही सुद्धा अणू चाचण्या केल्या होत्या आमच्या वावरात. आम्हाला ते जाहीर करायची गरज नाही वाटली.
2. ह्या असल्या EBC सारख्या घोषणा आम्ही सुद्धा केल्या होत्या. आमच्या इतर निर्णयांप्रमाणे ह्या सुद्धा पूर्ण नाही केल्यात एवढंच..
15 Oct 2016 - 11:06 pm | सुखीमाणूस
फारच करमणूकप्रधान धागा
15 Oct 2016 - 3:22 pm | बोका-ए-आझम
जे इथे कोणी म्हटलेलंच नाही त्यावर comments करण्याचं तुमचं कौशल्य जबरदस्तच आहे.
सिद्ध झाले नाहीत हे ठीक आहे. कोणीही करु शकणार नाही असं तर साहेब पण म्हणत नाहीत.
15 Oct 2016 - 6:42 pm | माम्लेदारचा पन्खा
ते आमचेही श्रध्दास्थान आहे....खिशात नेहमी त्यांचा फोटो असतो..स्वत:साहेब सुध्दा त्यांच्याविषयीचे विनोद खेळकरपणे घेतात....
पण इथे तर "चाय से ज्यादा किटली गरम है" !
15 Oct 2016 - 3:32 pm | चिनार
भक्तीच एक उदाहरण,
सर्जिकल स्ट्राईक वरील साहेबांच्या वक्तव्यावर भरपूर जोक्स सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यावर आमच्या ओळखीतला एक साहेबांचा भक्त तावातावाने म्हणाला,
"साहेबांना बदनाम करण्याची फ्याशन आलीये आजकाल. साहेब काय चुकीचं बोलले? त्यांच्याकाळात सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या. मग झाल्या असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे ना !"
माझा प्रश्न ," साहेबांच्या या वक्तव्यावर तुझा विश्वास आहे का ?"
"मला खरंखोटं माहिती नाही आणि मला ते जाणूनसुद्धा घ्यायचे नाही"
18 Oct 2016 - 7:10 am | सुखीमाणूस
त्या काळातले सर्जिकल स्ट्राईक कसे प्रसिध्ध करणार होते?
मुस्लिम अनुनयाचे काय झाले असते मग? त्यान्च्या भावना दुखवल्या गेल्या असत्या ना?
15 Oct 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी
रूपकबिपक असलं काही नव्हतं. ती साहेबांनी जाणूनबुजून टाकलेली जातीयवादी काडी होती. साहेब अशा जातीयवादी काड्या नेहमीच टाकतात.
15 Oct 2016 - 3:22 pm | चिनार
नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं !! हे जातीयवाद वगैरे सगळे तुमच्या मनातले खेळ..
साहेबांचं मायमराठी साहित्यावरचं प्रेम ठाऊक आहे ना तुम्हाला...व्याकरण चालवतात तसे साहेब जात चालवतात (व्याकरणाच्या साहाय्याने)
15 Oct 2016 - 3:24 pm | श्रीगुरुजी
हहपुवा!
सहजच आठवलं. १९९० च्या निवडणुक प्रचारातलं साहेबांचं एक रूपक होतं - "पुण्यामुंबईच्या काही जणांना महाराष्ट्रात पेशवाई परत आणायची आहे".
10 Nov 2016 - 6:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी ब्रोबर. भांडारकर इन्सिट्युट ची तोडफोड बहुदा आपोआप झाली असावी.
रच्याकने
अगदी अगदी. पण एक करा ढाई किलो का हात सहन होणार्याचं हितचिंतकांना व्हॉट्सअॅप करा. परत त्यांना 'पोचवण्याचीही' व्यवस्थाही नक्की करा.
10 Nov 2016 - 3:12 pm | विशुमित
अगा बाबाव.!!
सनी देओल आला. आपण जाम घाबरलो.
15 Oct 2016 - 6:44 pm | माम्लेदारचा पन्खा
लवकरच व्हावी अशी इच्छा आहे !
15 Oct 2016 - 12:08 pm | मदनबाण
१. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे....
पुढच काय व्हइल त्याचा काय अंदाजा लावणं तस कठीण हाय बघा...गोर्या काळ्यांनी एकमेकांची टकुरी फोडली नाही म्हणजे झालं...
२. ट्रंपची राजकीय शिकवणी....
शिकवणी ! हॅहॅहॅ... ग्रॅब देम बाय टिंब टिंब.
३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ?
ट्र्प्म तर दुर्गेला आत टाकणार आहेत म्हणाले ना ? ओबामामामांचे काय ठावुक नाय बाँ...
बाकी ओबामामा हापिसात आले तेव्हा टोटल debt $10.6 trillion होते आता ते 19.7 trillion झाले आहे, ओबामा ही फिगर २० trillion करुनच बाहेर पडतील काय ?
४. दुहेरी मतदान ?
रशिया यासाठी जवाबदार असेल... समजलं ?
५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ?
जाणता राजांशी बोलणी झाली तरं हे सुद्धा सहज शक्य होईल असं म्हणतात म्हणे! ;)
६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ?
मला वाटलं ते जीएम कॉर्न आणि इथेनॉल असावं...
७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?
युनाटेड नेशन अमेरिका कंट्रोल करेल काय ? असा प्रश्न जालावर वाचन करताना पडला ! कारण युनाटेड नेशनच्या गाड्या म्हणे अमेरिकेत दिसल्या म्हणे ! यावर विचार करण्यासारखी बातमी वाचनात आली होती ती म्हणजे
US approves UN use of force to protect civilians in conflict
U.S. approves UN use of force to protect civilians in conflict
US approves UN use of force to protect civilians in conflict
Truck Strop
काही इडियो मनोरंजासाठी देतो :-
जाता जाता :-
ट्रंप यांचे नग्न पुतळे ऑगस्ट मध्ये अचानक जागोजागी प्रकट झाले होते... मग काय लोकांनी मोबाईल काढले आणि फोटो सेशन सुरु झाले ना ! ;) { बादवे हे कोणी केले असेल बरं ? }
(संपादित)
15 Oct 2016 - 12:42 pm | संदीप डांगे
पुतळा बघून सादरकर्त्याचे खालीलप्रमाणे स्टेटमेंट असावे असे वाटते,
" Trump have no balls and a small penis"
टिपिकल अमेरिकू आहे, ;)
15 Oct 2016 - 12:56 pm | मदनबाण
हो, ते तसेच आहे इन अमेरिकन स्टाईल... ;)
अगदी परफेक्ट न्यूज स्टाईल मध्ये :- 'Emperor Has No Balls'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buying
15 Oct 2016 - 3:28 pm | अभ्या..
बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो बाणा. :(
असो.
15 Oct 2016 - 8:36 pm | मदनबाण
बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो बाणा. :(
खरयं, पण अमेरिकन पब्लिकला काही वाटेना बघ !
बाकी माझ लक्ष कमनिय बांध्याच्या सुंदर पाखरांकडेच जास्त गेलं... ;)
*फोटो आक्षेपार्ह वाटतं असल्यास ते काढुन टाकण्यास हरकत इल्ले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buying
15 Oct 2016 - 5:07 pm | टवाळ कार्टा
आयला, तिथे डॉक्टरांच्या धाग्यात बाईचा पदर बाईच्या पदराच्या उपमेने केवढा गहजब (त्या उपमेंट काहीही वाईट नव्हते तरीही) आणि इथे कोणा पुरुषाचा दिगंबरवस्थेतला फोटो दिला तर त्याबद्दल एक चकार शब्द नाही
15 Oct 2016 - 6:10 pm | बोका-ए-आझम
असले फोटो मिपावरच का येतात? बाकी संस्थळांवर का नाही येत?;)
15 Oct 2016 - 11:49 pm | रातराणी
संपादकांनी कृपया इथे लक्ष द्यावे ही विनंती. फोटो प्लीज काढून टाका.
15 Oct 2016 - 2:34 pm | कंजूस
"मिपा पहिलं राहिलं नाही" कोणी म्हटलं बरं?
15 Oct 2016 - 3:15 pm | श्रीगुरुजी
निवडणुकीच्या आदल्या रात्री कसं सेटिंग करायचं, साड्या वगैरे वाटून मतं कशी फिरवायची इ. साठी साहेब ट्रंपची शिकवणी घेणार असतील.
15 Oct 2016 - 3:29 pm | अभ्या..
मापं, कशापायी मापं काढतायसा?
15 Oct 2016 - 3:30 pm | श्रीगुरुजी
एकंदरीत साहेब हे स्वतःच एक लिजंड झाले आहेत. भविष्यात "साहेबपुराण" या नावाने १९ वे पुराण लिहिले जाऊन त्यात साहेबलीलांचे वर्णन असेल हे निश्चित.
15 Oct 2016 - 3:36 pm | विशुमित
आणि गुरुजींचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल???
15 Oct 2016 - 3:36 pm | श्रीगुरुजी
तो कसा काय बुवा?
15 Oct 2016 - 3:43 pm | विशुमित
त्यातील स्कंदातील एका एका श्लोक वर आयुष्यभर प्रवचन करायला मिळेल. आणि तरी सुद्धा संपणार नाही पुढच्या पिढीला अनाहूत आणखी सोया होईल.
15 Oct 2016 - 3:45 pm | श्रीगुरुजी
बरोबर. पण त्यांच्या पुराणावर प्रवचन करण्याचा अधिकार फक्त त्यांच्या भक्तांनाच असणार. आम्हाला ती संधी मिळणार नाही.
15 Oct 2016 - 3:59 pm | विशुमित
हा हा हा .... खरंच की.
सर्वानी आम्हाला एकदम भक्तच करून टाकलत. पण तस नाही गुरुजी--
खंडेराया शपथ सांगतो मी त्यांचा भक्त नाही. पण त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे आणि त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.
15 Oct 2016 - 4:10 pm | अभ्या..
सहमत
15 Oct 2016 - 5:32 pm | बोका-ए-आझम
ही पण fashion आहे. बाकी चालू द्या.
एकच सत्य. भक्त भक्त!
15 Oct 2016 - 5:40 pm | कपिलमुनी
साहेबांच्या कार्याबद्दल एक शेप्रेट लेख( पुराव्यासहीत) लिहा आणि या टीकाकारांचे प्रतिसाद बंद करुन टाका !
( आणि कार्य सापडले नाही तर तसा सांगा ,वसंतदादापासून ते भुजबळ व्हाया ब्रिगेड मी सांगतो)
16 Oct 2016 - 12:38 pm | अनुप ढेरे
हपिसातल्या एकाला विचारतोय हेच अनेक महिने की सांग साहेबांचं नक्की योगदान. बर्याच दिवसांनी शरद सीड का काहीतरी म्हणाला.
17 Oct 2016 - 8:50 am | नाखु
काहीच नाही पुढचा सीडलेस म्हणून प्रकार पण आलाय टर्बुजाचा बाजारात...
15 Oct 2016 - 5:50 pm | चिनार
अहो त्यांनी कार्य केले नाही असा कोण म्हणतंय? त्याचेच तर परिणाम भोगतोय आम्ही..
15 Oct 2016 - 8:57 pm | प्रसाद_१९८२
पण त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे आणि त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.
--
खरय, भारतीय राजकारणातील साहेबांची गेल्या अनेक वर्षातील कार्य'गाथा' इतकी प्रचंड आहे की येणार्या कित्येक पिढ्यांनी, ती पार महासागरात बुडवायचा प्रयत्न केला तरी तुकोबांच्या 'गाथे' प्रमाणे ती महासागरांतूनही बाहेर येईल इतकी ती प्रभावशाली आहे. :-P
देशीय व आंतरदेशीय सार्वजनिक आयुष्यात इतकी मोठी-मोठी पदे भुषविणार्या, इतक्या महान व्यक्तिला या देशाचे 'पंतप्रधान' पद अजून देखिल मिळाले नाही ह्याचेच राहुन राहुन वाईट वाटते. असो. ;-)
पवार साहेबांच्या ७५व्या वाढदिवसा निमित्त मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित्त गौरव स्वत:च्या भाषणात केला आहे.
15 Oct 2016 - 6:11 pm | जयंत कुलकर्णी
मेहता पब्लिकेशनचे एक पुस्तक होते. लेखक होते पत्रकार दडणीस. यांनी साहेबांवर एक चांगले पुस्तक लिहिले होते. ते अर्थात नंतर गायब झाले. त्यातील काही प्रती ज्या काही ग्रंथालयात सापडल्या त्याची एक फोटोकॉपी माझ्याकडे आहे. पण आता ती सापडत नाही. कोणाकडे हे पुस्तक आहे का ?
15 Oct 2016 - 6:12 pm | जयंत कुलकर्णी
फडणीस *
15 Oct 2016 - 8:31 pm | चौकटराजा
साहेब पयल्या पासूनच सर्जिकल स्ट्राईक पेशालिश्ट आहेत का ..? त्यानी इटलीवर पण सर्जिकल हल्ला करण्यासाठी एक सैन्य उभारले ना..... ? काय झाले त्या सैन्याचे.... आसेतू हिमाचल पसरले का का ते सैन्य...? एक जरूर आहे हल्ला करायचा पण
युद्धशक्यता टाळण्यासाठी नामानिराळे राह्यचे पुरावा ठेवायचा नाही. ...यात ते लई तेल लावलेले पैलवान हायती.
15 Oct 2016 - 9:52 pm | सामान्यनागरिक
But his penis stronger that his tongue !
17 Oct 2016 - 3:29 pm | श्रीगुरुजी
साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल स्ट्राईक केले. त्यातले ४ यशस्वी झाले. ५ वा सुद्धा तांत्रिक अर्थाने अयशस्वी झाला नाही. परंतु त्याने ठरविलेल्या लक्ष्याऐवजी दुसर्याचा लक्ष्याचा भेद केला. साहेबांच्या सर्जिकल स्ट्राईकचा हा सारांश -
१) १९७८ - वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना साहेब मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यावेळी जनता पक्षाचे १०० आमदार असूनसुद्धा जनता पक्षाला बहुमत मिळविण्यात अपयश आले होते. साहेबांनी सर्वांनाच अंधारात ठेवून सर्जिकल स्ट्राईक करून वसंतदादांचे सरकार पाडले व स्वतःच्या ३८ आमदारांबरोबर जनता पक्षाचा पाठिंबा मिळवून मुख्यमंत्रीपद मिळविले.
२) १९८६ - साहेब १९७८ पासून काँग्रेसबाहेर होते. "मी एकवेळ अंगाला राख फासून संन्यास घेईन, परंतु कधीही काँग्रेसमध्ये परत जाणार नाही", "मी भगवी वस्त्रे घालून हिमालयात जाईन, परंतु कधीही काँग्रेसमध्ये परत जाणार नाही" अशा अनेक भीष्मप्रतिज्ञा साहेबांनी जाहिररित्या घेतल्या होत्या. १९८५ मध्ये साहेबांनी भाजप, जनता पक्ष व शेकाप बरोबर युती करून निवडणुक लढविली, परंतु बहुमत मिळाले नाही. १९८६ मध्ये साहेबांनी मतदारांवरच सर्जिकल स्ट्राईक केला. ज्या मतदारांनी काँग्रेसविरोधात साहेबांच्या पक्षाला मते दिली होती, तो संपूर्ण पक्षच साहेबांनी काँग्रेसमध्ये विलीन करून घरवापसी केली. यथावकाश साहेब १९८८ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
३) मे १९९९ - १९९८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून सीताराम केसरींना हटविण्यात इतरांप्रमाणे साहेबांचाही हात होता. सीताराम केसरी बायो ब्रेक साठी गेले असताना बाथरूमला बाहेरून कडी लावून घेऊन उपस्थित काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनी केसरींची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी व सोनिया मॅडमने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे असा प्रस्ताव एकमताने मंजूर केला व नंतर कार्यकारिणीचे सर्व सदस्य (साहेबांसहीत) सोनिया बाईंच्या घरी ठरावाची माहिती देण्यासाठी व त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपद तत्काळ स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी रवाना झाले. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यावर त्यांनी भारतीय संस्कृती कशी आत्मसात केली आहे, भारतीय संस्कृतीत एखादी सून ही माहेरच्या नावाने ओळखली जात नसून लग्न झाल्यावर तिची माहेरची ओळख पुसली जाते व ती पूर्ण सासरची होऊन जाते असे साहेब मुलाखतीत सांगायचे.
नंतर मे १९९९ मध्ये साहेबांनी सर्जिकल स्ट्राईक केला. "सोनिया गांधी जन्माने परकीय आहेत. या देशातील जनता त्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू नयेत." असे पत्र लिहून खळबळ माजवून दिली. त्यामुळे साहेबांना कॉंग्रेसमधून बाहेर पडावे लागले.
४) ऑक्टोबर १९९९ - या महिन्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला १२५ जागा मिळाल्या होत्या. इंदिरा कॉंग्रेसला ७५ व साहेबांच्या पक्षाला ५८ जागा मिळाल्या होत्या. साहेबांचा पक्ष व इंदिरा कॉंग्रेस एकमेकांविरूद्ध लढले होते. सोनियांचे परकीय मूळ हा मुद्दा प्रचारात होताच. निकाल लागल्यावर काही दिवसातच साहेबांनी ४ था सर्जिकल स्ट्राईक केला. १९८६ प्रमाणे हा स्ट्राईकसुद्धा जनतेविरूद्ध होता. ज्या इंदिरा कॉंग्रेसविरूद्ध सोनियांच्या परकीय मूळावरून साहेब लढले तो मुद्दाच साहेबांनी कचर्याच्या पेटीत फेकला व 'घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे" अशी आरती ओवाळत ते सोनिया गांधींना शरण गेले व इंदिरा काँग्रेसशी युती करून सरकार स्थापन केले.
५) ऑक्टोबर २०१४ - विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागल्यावर आपला पक्ष ४ थ्या स्थानावर घसरल्याचे साहेबांना दिसायला लागले. मतदारांनी आपल्याला व आपल्या पक्षाला पूर्णपणे लाथाडले आहे हे त्यांनी ओळखले. केंद्रातील सत्ता गेलीच होती. आता रा़ज्यातीलही सत्ता गेली व नवीन येणारे सरकार आपला भ्रष्टाचार खणून काढणार हे ओळखून साहेबांनी ५ वा सर्जिकल स्ट्राईक केला. पूर्ण निकाल यायच्या आतच साहेबांनी पत्रकार परीषद घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला. असे करण्याने आपल्या भ्रष्टाचारी सहकार्यांना वाचविता येईल व पुढेमागे राज्यात व केंद्रात सत्तेत घुसता येईल असे साहेबांचे आडाखे होते. परंतु भाजपने या स्ट्राईकची दिशा बदलून तो शिवसेनेच्या दिशेने पाठविला. निकाला आल्यानंतर हे स्पष्ट झाले होते की भाजपला बहुमतासाठी २२ जागा कमी पडत आहेत. प्रचारादरम्यान डरकाळी मारणार्या शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. आता बहुमतासाठी भाजप आपल्याकडे नाक घासत येईल, आपण आधी त्यांना लाथाडू आणि नंतर उपकार केल्याच्या थाटात पाठिंबा देऊन पाठिंब्याची किंमत म्हणून उपमुख्यमंत्रीपद, महत्त्वाची खाती इ. वसूल करू असे उधोजी मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु साहेबांच्या सर्जिकल स्ट्राईकने काही वेळ गडबडलेल्या भाजपने त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचे ठरविले. साहेबांच्या पाठिंब्यावर मौन बाळगून भाजपने सरकार स्थापन केल्यामुळे उधोजी तोंडघशी पडले. मनातले मांडे मनातच राहिले. सेना नेते मंत्रीपदासाठी नुसते आसुसलेले नसून ते त्यासाठी अत्यंत कासावीस झाले होते. त्यामुळे शेवटी उधोजींना भाजप देईल त्यावर समाधान मानून पाठिंबा द्यावा लागला.
म्हणजे साहेबांच्या सर्जिकल स्ट्राईकचा फटका शिवसेनेला बसला. सर्जिकल स्ट्राईक वाया गेला नाही, फक्त लक्ष्य चुकले.
17 Oct 2016 - 3:38 pm | चिनार
ह्या झाल्या सर्जिकल स्ट्राईक्स..साहेबांनी केलेल्या छोट्यामोठ्या कारवाया, गनिमी कावे वगैरे लिहायचे म्हटले महाभारताएवढा संदर्भग्रंथ होईल..
17 Oct 2016 - 4:07 pm | प्रसाद_१९८२
जबरदस्त प्रतिसाद, श्रीगुरुजी.
17 Oct 2016 - 4:13 pm | नाखु
कुठे फेडाल हे चावडीभक्तांच्या अतिशय "बाणेदार्,स्वाभिमानी नेत्याचे चरित्र हरणाचे पाप. साहेब काँन्ग्रेसमध्ये ये जा करतात पण अता राहुलबाबा आल्यापासून का करित नाहीत हा एक मुद्दा आहेच,
17 Oct 2016 - 5:28 pm | अभ्या..
गुर्जीकल स्ट्राइक
17 Oct 2016 - 5:47 pm | विशुमित
वंटास...!!
(अर्थ विचारू नका आमच्याकडे अस भारी काय झाला की वंटास म्हणायचं प्रघात आहे... अहो एक वंटास दादा पण आहे)
18 Oct 2016 - 11:25 am | वटवट
गुरुजी.... लै जोरात हाणलाय राव तुम्ही.....
ह्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये ते यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत ते खंजीर खुपसणं वगैरे येईल का ओ??
18 Oct 2016 - 2:18 pm | श्रीगुरुजी
यशवंतराव चव्हाणांच्या? असं कधी घडल्याचं ऐकिवात नाही. इंदिरा गांधींनी यशवंतराव चव्हाणांची प्रचंड मानहानी व अवहेलना करून त्यांचे पूर्ण खच्चीकरण केले होते. साहेब हे यशवंतरावांचे मानसपुत्र समजले जात. त्यांनी यशवंतरावांविरूद्ध काहीही केल्याचे ऐकिवात नाही. १९७८ मध्ये साहेबांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला चव्हाणांचा पाठिंबा होता. चव्हाणांचे खाजगी सचिव किसन वीर हे त्या सर्जिकल स्ट्राईकच्या योजनेच्या आखणीतील एक बिनीचे शिलेदार होते.
18 Oct 2016 - 4:07 pm | विशुमित
श्रीगुरुजी खरंच कवतुक वाटतं तुमचं...
अजून येऊ द्या...
पामराचा एक प्रश्न-
वर कोणी तरी म्हंटलं की साहेब सकल भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी बऱ्याच (मराठी)जनाची इच्छा होती/ राष्ट्रीय पातळीवर साहेब पंतप्रधान होण्याचे प्रमुख दावेदार होते, काय कारणं असतील त्या मागे? (का झाले नाहीत हे प्रतिसादामध्ये अपेक्षित नाही)
18 Oct 2016 - 11:53 pm | श्रीगुरुजी
१९९१ मध्ये मी अमेरिकेत होतो. त्या काळात आंतरजाल नसले तरी यूजनेट नावाचा प्रकार होता. त्या माध्यमातून भारतातील घडामोडी समजायच्या. १९९१ मधील राजीव गांधींची हत्या, लोकसभा निवडणुक, साहेबांनी पंतप्रधान पदासाठी केलेला प्रयत्न इ. त्या माध्यमातून समजायचे. खोटं कशाला सांगू, साहेब १९९१ मध्ये पंतप्रधान व्हावेत असं त्यावेळी मलाही मनातून खूप वाटत होतं. दुर्दैवाने (की सुदैवाने) तसं झालं नाही.
परंतु ते त्यावेळी का पंतप्रधान होऊ शकले नाहीत त्यामागे बरीच कारणे आहेत. १९७८ साली साहेबांनी दगाबाजी करून काँग्रेस सोडल्यावर १९८६ पर्यंत ते स्वतःच्या समाजवादी पक्षात होते. दरम्यानच्या काळात ते इंदिरा गांधींचे कट्टर विरोधक होते. १९८६ मध्ये केंद्रात काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होते व महाराष्ट्रासह जवळपास सर्व राज्यात (अपवाद तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रचा) काँग्रेसची सत्ता होती. साहेबांच्या पक्षात फक्त १ खासदार होता व महाराष्ट्रात ५६ आमदार होते. पुढील निवडणुकीस ३ वर्षे अवकाश होता. तरीसुद्धा राजीव गांधींनी साहेबांना पक्षात का घेतले हे एक गूढच आहे कारण साहेबांच्या पक्षाचा काँग्रेसला तसा फारसा उपयोग नव्हता. अर्थात साहेबांची १९७८ मधील दगाबाजी व नंतरच्या काळातील इंदिरा गांधी विरोध राजीव गांधी व सोनिया गांधी नक्कीच विसरले नसावेत. १९८६ ते १९८८ या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये असंतोष माजला होता. शंकरराव चव्हाण सहकार क्षेत्रातील लॉबी मोडून काढण्याचा प्रयत्न करीत होते. वसंतदादा पाटलांना राज्यपाल म्हणून राजस्थानात पाठविले होते तरीसुद्धा ते महाराष्ट्रात दौरा करून श़ंकरराव चव्हाणांविरूद्ध जाहीर टीका करून दंड थोपटीत होते. वसंतदादांनी १९८५ मध्ये राजीव गांधींविरूद्ध ताठर भूमिका घेऊन मुख्यमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने त्या दोघांचे संबंध बरे नव्हते. शंकररावांना राज्यापेक्षा केंद्रात जास्त रस होता. अशा परिस्थितीत राजीव गांधींनी शंकररावांच्या जागी साहेबांना मुख्यमंत्री म्हणून आणले.
नंतर मार्च १९९० मध्ये निवडणुक होऊन साहेबांनी भाजप-सेना युतीचे आव्हान मोडून काँग्रेसचे १४१ उमेदवार निवडून आणून सत्ता टिकविली. आता १९९५ पर्यंत काळजी नव्हती व साहेबांची गरज संपली नव्हती. साहेबांंविरूद्ध राजीव गांधींना तसा फारसा विश्वास कधीच वाटला नव्हता. परंतु महाराष्ट्रात साहेबांचे बर्यापैकी वजन असल्याने त्यांची उचलबांगडी अवघड होती. त्यामुळे जानेवारी १९९१ मध्ये राजीव गांधींच्या आशिर्वादाने साहेबांच्या मंत्रीमंडळातील ४ मंत्र्यांनी बंड करून साहेबांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करून राजीनामा दिला. त्यात विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश होता. बंडामुळे हादरलेल्या साहेबांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा इन्कार केला व आमदारांची साथ मिळवून आपली उचलबांगडी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. राजीव गांधींच्या आशिर्वादाने केलेले बंड फसले तरी साहेबांविरूद्ध राजीव गांधींच्या मनात जास्तच अढी निर्माण झाली कारण बंड थोपवून साहेबांनी केंद्रीय नेतृत्वावर मात केली होती.
नंतर मे १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या होऊन जून १९९१ मधील निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात तब्बल ३८ जागा मिळाल्या. काँग्रेसला देशात एकूण २२४ जागा होत्या. महाराष्ट्रातून सर्वाधिक ३८ खासदार होते. सोनिया गांधींनी राजकारणात येण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत साहेबांचे पारडे जड दिसत होते. निकालानंतर साहेबांसाठी कलमाडीने फिल्डींग लावायला सुरूवात केली. परंतु साहेबांची उघड महत्त्वाकांक्षाच त्यांच्या विरोधात गेली.
१९४७ पासून भारताला सातत्याने उत्तर भारतातील पंतप्रधान मिळाला होता. दक्षिणेकडे पंतप्रधान पद कधीच गेले नव्हते. १९९१ मध्ये दक्षिणेकडील खासदारांची संख्या बर्यापैकी मोठी असल्याने दक्षिणेच्या खासदारांनी आपला पंतप्रधान व्हावा यासाठी जोरदार खटपट सुरू केली. निवडणुक न लढविलेल्या नरसिंहरावांचे नाव पुढे आणले गेले. साहेब, नरसिंहराव व अर्जुनसिंग ही ३ नावे शेवटी स्पर्धेत राहिली. नवीन पंतप्रधानाची निवड एकमताने व्हावी असे नरसिंहराव म्हणत होते तर तर खासदारांचे गुप्त मतदान घेऊन नवीन पंतप्रधान निवडावा असे साहेब म्हणत होते. अर्जुन सिंगांनी मध्यप्रदेश, उ.प्र., बिहार इ. राज्यातील काही नेत्यांचा पाठिंबा मिळविला होता. दुर्दैवाने साहेबांना महाराष्ट्रातूनच पुरेसा पाठिंबा मिळविता आला नाही. श़ंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ, बाळासाहेब विखे पाटील, मुरली देवरा इ. नेत्यांनी साहेबांचा विरोध केला. साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्रातीलच सर्व खासदार नव्हते. याउलट नरसिंहरावांच्या पाठीमागे दक्षिणेतील जवळपास सर्व खासदार होते.
परंतु सर्वात निर्णायक ठरली ती सोनिया गांधींची भूमिका. राजीव गांधींना व त्यामुळे अर्थातच सोनिया गांधींना साहेबांविषयी कायमच अविश्वास वाटत राहिला. त्यामुळे सोनिया गांधींनी आपले वजन नरसिंहरावांच्या पारड्यात टाकले व साहेबांची संधी कायमची हुकली.
म्हणजे (१) महाराष्ट्रातील सर्व खासदार पाठिंबा न देणे, (२) नरसिंहरावांना दक्षिणेतील जवळपास सर्व खासदारांचा पाठिंबा मिळणे व (३) सोनिया गांधींचा अविश्वास, या ३ कारणांमुळे साहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत.
19 Oct 2016 - 11:06 am | नाखु
नेम्के इतके मुद्देसूद मला लिहिता आले नाही.
इथे विस्कळीत पण त्याच संदर्भाने
19 Oct 2016 - 11:36 am | विशुमित
छान प्रतिसाद..
बऱ्याच गोष्टीना तुम्ही ओझरता स्पर्श केला आहे (लेखन सीमा जणू शकतो).
पण पंतप्रधान होवावेत ही इच्छा का होती त्यावेळेस याला थोडा आणखी स्पर्श केला असता तर ज्ञानात भर पडली असती.
19 Oct 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी
आजचे साहेब व १९९१ चे साहेब यात जमीनअस्मानाचा फरक आहे. आजच्या साहेबांचा पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तिरस्कार केला जाणारा पक्ष आहे. पराकोटीचा भ्रष्टाचार, पराकोटीचा मराठा जातीयवाद, पराकोटीचा उन्मत्तपणा, पराकोटीची गुंडगिरी, पराकोटीची अकार्यक्षमता याच गोष्टी यांचा पक्षात दिसतात.
१९९१ मध्ये ते पंतप्रधान व्हावेत असे तीव्रपणे वाटत होते त्यामागे ते मराठी होते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. १९९१ मध्ये साहेबांची प्रतिमा आजच्या तुलनेत खूपच चांगली होती. भ्रष्टाचार, जातीयवादाचे आरोप फारसे नव्हते. साहेब गांधी घराण्याचे फारसे लांगूलचालन न करता स्वाभिमान दाखवित होते. त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व काँग्रेसी नेते गांधी घराण्याचे बटीक असल्यासारखे होते. अशा कारणांमुळे ते पंतप्रधान व्हावेत असे वाटत होते. अर्थात साहेबांची ती प्रतिमा आता अजिबात राहिलेली नाही. त्यांना आता केंद्रात किंवा राज्यात कोणतेही पद मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ते अजून बीसीसीआयला चिकटून बसलेले असले तरी तिथूनही हकालपट्टी अटळ आहे. मराठा जातीयवादाला खतपाणी घालून काड्या घालणे व स्वतःच्या पक्षातील भ्रष्टाचार्यांना संरक्षण देणे एवढेच ते आता करीत आहेत. त्यांच्यासारख्याने आता सन्मानाने राजकारणातून निवृत्त व्हावे असे वाटते.
19 Oct 2016 - 5:12 pm | विशुमित
प्रतिसाद पटला..
माझ्या मते-
साहेबांची प्रतिमा मलीन करण्यात काही खालील बाबी प्रामुख्याने दिसतात-
1) स्व. गोपीनाथ मुंडे आणि तत्सम भाजप आणि शिवसेना मधील लोकांनी बिनबुडाचे आरोप करून राळ उठवली.
2) दाऊदशी संबंध, एन्रॉन प्रकल्प, आणि इतर भ्रष्टाचाराचे आरोप करून जन माणसात त्यांचं बद्दल गैरसमज पसरवले.
3) महाराष्ट्रातील प्रस्थापित बडे मराठा धेंड साहेबाना कुणबी मराठा समजतात आणि त्यांचे नेतृत्व मान्य करत नव्हते /नाहीत. (मराठा क्रांती मोर्चा मध्ये या बड्या धेंडांना मागची लाईन दाखवली आहे, ज्यांनी फक्त गट तटाचे राजकारण करून मराठा समाजाच्या अस्मितेवर आपली पोळी शेकून घेतली आहे. त्यांची चिथावणीखोर भाषणे मोर्चाच्या डोक्यावरील बर्फ वितळून देत नाही. या ओळीचा लगेच अर्थ काढू नका की मोर्चा मागे साहेब आहेत)
4) मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील कोणालाच रुचले नाही.
5) राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्या पंच वार्षिक सरकारमध्ये राष्ट्रवादीने नक्कीच भरीव कामगिरी केली आहे. पण नंतरच्या काळामध्ये स्वार्थासाठी सामील झालेल्या इतर सुंड पुंडानी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त नुकसान केलं. त्यापैकी आता बरेच भाजप आणि शिवसेनेने गोमूत्र शिंपडून शुद्ध केले आहेत.
6) गुलाल तिकडे चांगभलं या न्यायाने राष्ट्रवादी मध्ये चालती होती तो पर्यंत, लोक राष्ट्रवादीला घाबरतात म्हणून जो उठेल तो घड्याळच स्टिकर आपल्या गाड्यांवरती लावू लागले आणि ब्रँड प्रस्थापित करावा तसं कुप्रचार वाढत गेला. (आज भाजप ची चलती आहे म्हणून बरेच जन कथित देश भक्त/गोरक्षक झाले आहेत)
7) नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्याच्या नादात पक्षातील अनेक गैरप्रकारांकडे झालेले दुर्लक्ष.
8) मीडिया ने त्यांची "सस्पेन्स मॅन" म्हणून बनवलेली प्रतिमा
9) सर्वात महत्वाचं म्हणजे साहेबानी गरज नसताना अति सहनशील आणि सुसंस्कृतपणाची केलेली भलामण.
आपण कितीही चिंतले तरी साहेब राजकारण आणि समाजकारणातून निवृत्त होतील अस तूर्तास तरी वाटत नाही.
(मुद्दे बऱ्याच अंशी विस्कळीत पद्धतीने मांडले आहेत)
19 Oct 2016 - 8:30 pm | अभिदेश
ज्या कारणासाठी काँग्रेस सोडून पक्ष स्थापन केला , त्याला 2 वर्षांतच हरताळ फासला. म्हणजे पुन्हा एकदा सत्तेसाठी भूमिका सोडून देणे हा मूळचा स्वभाव उफाळून आला.
19 Oct 2016 - 11:25 pm | श्रीगुरुजी
साहेबांची प्रतिमा मलीन होण्यास ते स्वतःच जबाबदार आहेत.
आरोप बिनबुडाचे नव्हते. उदाहरणार्थ १९९१-९३ या काळात साहेब संरक्षणमंत्री असताना ते भारतीय लष्कराच्या हवाईदलाच्या विमानाने वाराणशीहून पुण्यात आले. त्यात त्यांच्याबरोबर मुंबईचे महापौर रा. रा. सिंह व मुंबईतील कॉंग्रेसचे आमदार दुबे हे होते. या दोघांव्यतिरिक्त अजून दोघे जण त्या विमानात होते. १९९२ मध्ये दाऊदच्या प्रतिस्पर्धी टोळीतील एक जण जे जे रूग्णालयात पोलिसांच्या पहार्यात उपचार घेत होता. दाऊद इब्राहिमच्या गँगमधील शार्प शूटर असलेल्या ठाकूर बंधूंनी त्याच्यावर रूग्णालयात हल्ला करून एका पोलिसाला व त्या प्रतिस्पर्ध्याला ठार मारून ते तिथून फरारी झाले. तेच ठाकुर बंधू संरक्षण खात्याच्या विमानात पवारांबरोबर होते. हे प्रकरण गोपीनाथ मुंड्यांनी उघडकीला आणल्यावर आधी पवारांनी त्याचा इन्कार केला. नंतर सारवासारव करताना ते म्हणाले की एखाद्या विमानात किंवा रेल्वेत आपल्या पुढेमागे कोण आहे ते आपल्याला माहित नसते. त्याचप्रमाणे हे दोघे ठाकुर बंधू आहेत हे मला माहित नव्हते. सार्वजनिक वाहनात असे असू शकते. परंतु संरक्षण खात्याचे विमान हे सार्वजनिक वाहन नसते. असल्या विमानात २-३ जणच असतात व फक्त संरक्षण खात्याच्या परवानगीनेच कोणी तिथे बसू शकते. त्यामुळे हे दोघे मला माहित नव्हते हा त्यांचा दावा खोटा होता. त्यांनी नंतर ते प्रकरण रा. रा. सिंह व दुबे यांच्यावर ढकलून दिले. त्यावेळी केंद्रात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असल्याने ते प्रकरण दडपले गेले.
पप्पू कलानी व हितेंद्र ठाकूर या माफियांना १९९० मध्ये पवारांनीच तिकीट दिले होते. पवनराजे खून प्रकरणातील आपला मेव्हणा पद्मसिंह पाटील, आव्हाड, उदयन भोसले इ. ना पवारांनीच कायम पाठीशी घातले आहे. अतिरेकी इशरत जहाची भलामण स्वतः पवारांनीच मुंब्र्यात जाऊन केलेली आहे. ब्राह्मणद्वेष पसरविणार्या संभाजी ब्रिगेडला, आपल्याच पक्षातील आव्हाडला पवारांनी कधीच विरोध केलेला नाही. पुरूषोत्तम खेडेकरने ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत गलिच्छ लिखाण केल्यावर साहेबांनी आजतगायत त्यावर एक शब्द उच्चारलेला नाही. अजित पवार, भुजबळ, तटकरे, रमेश कदम इ. आपल्या पक्षातील भ्रष्टाचार्यांविरूद्ध ते मूग गिळून गप्प आहेत.
दाऊद टोळीतील गुन्हेगारांबरोबर एकाच विमानात असणे, आपल्या पक्षातील गुन्हेगार व भ्रष्टाचार्यांना संरक्षण देणे, मुस्लिम अतिरेक्यांचे लांगूलचालन इ. आरोप अजिबात बिनबुडाचे नाहीत.
वर उत्तर दिले आहे
साहेब मोर्चाचा उपयोग फूट पाडण्यासाठी करून घेत आहेत. मराठ्यांना कायदेशीर दृष्ट्या राखीव जागा देणे अशक्य आहे हे त्यांना माहित आहे. तरीसुद्धा "आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या, त्यात चर्चा कसली करायची, चर्चेत वेळ घालवू नका" इ. सल्ले देणे (न मागता) सुरू आहे.
१९७८ मध्ये घेतलेला नामांतराचा निर्णय राजकीय होता व त्याची १९९४ मधील अंमलबजावणी हा निर्णय सुद्धा राजकीयच होता.
भरीव कामगिरी? काहीतरीच काय.
ही प्रतिमा त्यांच्याबद्दल असलेल्या अनुभवातूनच बनलेली आहे. ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे करतात. ते कधी भाजपला शिव्या देतात, तर कधी भाजपशी चुंबाचुंबी करायचा प्रयत्न करतात. कधी काँग्रेसशी युती, कधी कॉंग्रेसला दगा, पक्षांतर्गत विरोधकांना पाडणे इ. मुळेच त्यांची प्रतिमा अत्यंत अविश्वासार्ह अशी बनलेली आहे.
कधी केली अशी भलामण? त्यांची अनेक वक्तव्ये असंस्कृतपणा दर्शवितात. उदाहरणार्थ, "आमच्या फाईल्सवर सही करताना पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा भरतो", "वाजपेयी हे दहा तोंडी रावण आहेत", "राजू शेट्टी आपल्या जातवाल्यांच्या कारखान्याविरूद्ध आंदोलन करीत नाहीत", "पुण्यामुंबईच्या काही तरूणांना महाराष्ट्रात पेशवाई आणायची आहे".
या मुद्द्यावर २००% सहमत
20 Oct 2016 - 2:16 pm | nanaba
फार भारी पोस्टस . मस्त विश्लेषण केलत!
20 Oct 2016 - 4:06 pm | बोका-ए-आझम
श्यामकिशोर गरिकापट्टी असं होतं. ठाकूर बंधूंपैकी जयेंद्र उर्फ भाई ठाकूर हा शार्पशूटर नव्हता. तो खंडणीखोर (extortionist) होता. दुसरा भाऊ हितेंद्र ठाकूर हा अामदार आहे - बहुजन विकास आघाडी या पक्षाचा.
20 Oct 2016 - 4:09 pm | बोका-ए-आझम
http://m.thehindu.com/news/national/dawood-gang-member-shyam-kishor-held...
गरिकापट्टीबरोबर असलेला दुसरा शार्पशूटर सुभाष ठाकूर हा ठाकूर बंधूंपैकी नव्हता.
21 Oct 2016 - 10:37 am | विशुमित
<<<<<त्यावेळी केंद्रात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असल्याने ते प्रकरण दडपले गेले.>>>>
-- म्हणजे स्व.मुंडेंनी कच खाल्ली. म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असली की प्रकरण दाबता येतात तर. सावध राहिला पाहिजे. तसे तडीपार मोठा गुंड तर केंद्रात बसले आहेत.
एक ही आरोप अजून पर्यंत सिद्ध करू नाही शकले, ही फक्त राळच उठवली होती.
दाऊद शी संबंध खडसे आणि आता आशिष शेलार यांचे पण उघड झाले आहेत.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/dawood-aide-is-member-of-bhara....हटमळ
<<<<इ. सल्ले देणे (न मागता) सुरू आहे.>>>>
-- बऱ्याच निर्णयांमध्ये भाजप सरकार मधील मंत्री पवार साहेबांचा सल्ला मागतात. जसे की साखर कारखाना, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, आरक्षणाचा मुद्दा, आणखी खूप लिस्ट आहे.
(माहिती साठी सांगतो जर वर्षी बीड आणि मराठवाड्यातील ऊस कामगारांचे प्रश्न मुंडे यांच्या सांगण्यावर, मुंडे आणि पवार साहेबानी पाठवलेले प्रतिनिधी केडगाव चौफुल्याला बसून सोडवत असत.)
<<<<ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे करतात>>>
-- त्यांना काय बोलायचे असते हे लोक फक्त शब्दशः अर्थ काढून मोकळे होतात.
<<<< तर कधी भाजपशी चुंबाचुंबी करायचा प्रयत्न करतात. कधी काँग्रेसशी युती, कधी कॉंग्रेसला दगा, पक्षांतर्गत विरोधकांना पाडणे>>>
--हे फक्त साहेबच करतात असे नाही. गोमूत्र शिंपडून रिटा बहुगुणा शुद्ध झाल्या काल रात्री.
<<<भरीव कामगिरी? काहीतरीच काय.>>>>
-- उगाच सलग 15 वर्षा सत्ता नाही दिली जनते ने आघाडीला. या सरकारच काम बघून पुढे किती वर्षं जनता निवडून देते ते दिसेलच.
<<<<< त्यांची अनेक वक्तव्ये असंस्कृतपणा दर्शवितात.>>>>
--पृथ्वीराज चव्हाण यांच्या अति चिकित्सक वृत्तीमुळे बरीच विकास कामे रखडली. (हे तुम्ही नाही मानलं तरी सर्व पक्षीय नेते हेच म्हणत होते) ते कोणाच्या इशाऱ्यावर करत होते हे सर्वश्रुत आहे. "लकवा " फक्त एवढे म्हणाले तर असंस्कृतपणा? परवाच एक जण हरामखोर म्हणाला, एक सम्राट तर सरळ सरळ एका समाजाच्या लिंगाबद्दल महिला वर्गा समक्ष जाहीर सभेत आय माय करायचा पण ते म्हणजे एक अजब रसायनच. अशी खूप उदाहरणे आहेत. संयम आणि सुसंस्कृतपणा आहे म्हणूनच मागे काही वर्षापूर्वी सरदार लोक मार खाण्यापासून वाचली. जानकर पण आता थोडक्यात वाचले आहेत.(हात जोडून आणि खंडेरायाची शपथ घेऊन माफी मागत होते)
21 Oct 2016 - 10:38 am | विशुमित
http://www.hindustantimes.com/mumbai-news/dawood-aide-is-member-of-bhara...
21 Oct 2016 - 2:57 pm | श्रीगुरुजी
मुंडेंनी कशी काय कच खाल्ली? १९९२ मध्ये महाराष्ट्रात व केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे हे प्रकरण दडपले गेले.
खडसेंच्या फोनवर म्हणे दाऊदच्या क्रमांकावरून फोन आला होता असे गुजरातमधील मूळचा जळगावचा असलेला हॅकर मनीष भंगाळेने आरोप केला होता. त्याने म्हणे पाकिस्तानच्या फोन खात्याची वेबसाईट हॅक करून ही माहिती काढली. हे प्रकरण तपासाठी एटीएसकडे सोपविल्यावर एटीएसने त्याला त्याच्यापाशी असलेले पुरावे घेऊन चौकशीसाठी बोलविले. पण तो फिरकलाच नाही. कोणतेही पुरावे पुढे न आणता फक्त पत्रकार परीषद घेऊन तो व आआपचे नेते आरोप करीत होते. आआपचे नेते आरोप करतात म्हणजेच ते आरोप बिनबुडाचे असतात व निव्वळ एखाद्याची बदनामी करण्यासाठीच आरोप केलेले असतात असेच आआपचा मागील ३-४ वर्षांचा इतिहास सांगतो. मनीष भंगाळे चौकशीसाठी पुरावे घेउन न फिरकल्याने काही दिवस वाट पाहून त्याला एटीएसने पुन्हा एकदा बोलाविले. तेव्हाही तो फिरकला नाही. शेवटी एटीएसने त्याला शेवटची निर्वाणीची नोटीस पाठविल्यावर त्याने जाहीर केले की त्याचा संगणक म्हणे कोणत्यातरी हॅकरने हॅक करून त्याने खडसेंविरूद्ध जमा केलेले सर्व पुरावे नष्ट केले आणि आता त्याच्याकडे पुरावे शिल्लक नाहीत.
असल्या मूर्खपणाच्या विधानांवर फक्त तान्हे बाळच विश्वास ठेवू शकेल. हा मनीष स्वतः हॅकर असताना त्याने आपल्या संगणकाला पुरेशी सुरक्षा ठेवली नसेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. तसेच आपण एका वजनदार मंत्र्यावर जे गंभीर आरोप करीत आहोत त्याचा एकही बॅकअप त्याने ठेवला नसेल यावरही विश्वास ठेवणे अशक्य आहे.
मुळातच त्याने आआपच्या सहकार्याने बिनबुडाचे आरोप केले होते आणि प्रकरण अंगाशी आल्यावर पुरावे नष्ट झाले असे सांगून काखा वर करून तो मोकळा झाला.
बादवे, आशिष शेलारचे आणि दाऊदचे संबंध कधी उघड झाले? नबाब मलिक सारख्या महामूर्खाचे बेताल बरळणे हा पुरावा मानत असाल तर धन्य आहे.
कोणते मंत्री साहेबांचा सल्ला मागतात? त्यांची नावे आहेत का? आपण खूप अनुभवी, वरीष्ठ असल्याने सर्वजण आपला सल्ला मागतात ही पुडी साहेबांनीच सोडून दिली आहे आणि "सकाळ" त्यात भर टाकत असते. ज्या माणसाच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत हे प्रश्न न सुटता उलट चिघळले त्याचा सल्ला कोण व का मागतील?
"मी एकवेळ अंगाला राख फासून संन्यास घेईन, पण कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही" (१९८० च्या दशकात),
"मी भगवी वस्त्रे परीधान करून हिमालयात जाईन, पण कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही" (१९८० च्या दशकात),
"राजीवजींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये परत आलो आहोत" (१९८६ मध्ये),
"ही माझी मुख्यमंत्रीपदाची शेवटची टर्म आहे व पुढील निवडणुकीपासून मी दिल्लीत जाणार आहे" (१९९४ मध्ये),
"छे छे, दिल्लीत जायचा माझा अजिबात विचार नाही. मी महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार आहे." (१९९५ मध्ये),
"सोनिया गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे", (१९९८ मध्ये),
"सोनिया गांधी भारताच्या सून आहेत. भारतीय संस्कृतीत जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा ती सासरचीच होते. सोनिया गांधी पूर्णार्थाने भारतीय आहेत." (१९९८ मध्ये),
"सोनिया गांधी जन्माने परकीय आहेत. त्यांना भारतातील परिस्थिती समजू शकणार नाही. त्यांनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करू नये." (१९९९ मध्ये)
"सोनिया गांधींच्या परकीयत्वाचा मुद्दा संपलेला आहे." (१९९९ मध्ये)
साहेबांच्या वरील वाक्यांचा माध्यमांनी व जनतेने शब्दशः अर्थ घेतला ही त्यांची चूक आहे, साहेबांची नाही.
साहेब आणि रीटा बहुगुणांची बरोबरी!
त्यात साहेबांचे व त्यांच्या पक्षाचे योगदान किती? त्यांचा पक्ष युतीतला एक दुय्यम भागीदार होता. जी मते मिळाली ती काँग्रेसमुळे मिळाली होती.
विकासकामे रखडली का साहेबांचा पक्षाला "हवी" असलेली नियमाविरूद्ध असलेली कामे रखडली?
"लकवा" हे एकमेव असंस्कृतपणाचे उदाहरण नाही. मागील एका प्रतिसादात मी अनेक उदाहरणे दिली आहेत.
20 Oct 2016 - 3:52 pm | बोका-ए-आझम
साहेबांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे यांना साहेबांच्या साठी का सत्तरीच्या निमित्ताने झालेल्या त्यांच्या मुलाखतीत एका शब्दात तुमच्या वडिलांचं वर्णन करा असं विचारलं असताना त्यांनी Unpredictable हा शब्द वापरला होता. जर साहेबांच्या कन्येचं हे मत आहे, तर बाकी लोकांनी काय म्हणावे?
21 Oct 2016 - 9:49 am | विशुमित
2 स्मायली...
23 Oct 2016 - 7:45 pm | दुर्गविहारी
विशुमित साहेब, लोकसभा निवड्णुकीवेळी नवी मुंबईत बोलताना "सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन येउन मुंबैत मतदान करायचे" या वाक्यासाठी काय सांगणार आहात? वर महाराष्टात विनोद उरला नाही हे यांचे दुसर्या दिवशीचे वकत्व्य. राष्ट्रवादीतल्या नेत्यांची नाव घेउन बघा. निव्वळ गुंडाची टोळी आहे. मी एक वेळ आप किंवा एम.आय.एम. सहन करीन पण राष्ट्रवादी म्हणले कि डोक्यात तिडीक जाते.
24 Oct 2016 - 11:00 am | विशुमित
<<<"सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन येउन मुंबैत मतदान करायचे">>>
-- विषय कधीच मिटलाय साहेब. दिलगिरी ही व्यक्त केली आहे.
http://indianexpress.com/article/india/politics/pawar-writes-to-ec-regre...
<<<<या वाक्यासाठी काय सांगणार आहात>>>>
-- मी काय तुम्हाला सांगणार आहे, सगळे जण आंतरजाला मुळे सर्वज्ञ आहेत.
<<<<निव्वळ गुंडाची टोळी आहे.>>>>
-- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच एका पक्षाला गुंडांची टोळी म्हंटला 2-3 दिवसा पूर्वी. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे. नगरचे कर्डीले कुठले संत महात्मा आहेत? मुंबईचे शेलार यांचे तर थेट डॉन शी संबंध आहेत म्हणे? लिस्ट खूप लंबी होऊ शकते.
गुंडांच्या टोळी ची जरा लिस्ट देता का? चर्चा करायला बरं पडेल.
<<<<<राष्ट्रवादी म्हणले कि डोक्यात तिडीक जाते.>>>>
-- मनामध्ये द्वेषच भरला असेल तर चर्चा करण्यात काय अर्थ.
24 Oct 2016 - 1:01 pm | श्रीगुरुजी
कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे आणि शेलार यांचे थेट डॉनशी संबंध आहेत असे कोण म्हणे?
18 Oct 2016 - 5:00 pm | वटवट
बरं... मग ते गुरूच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आणि शरद पवारांचा संबंध लावला जातो तो कसा??
18 Oct 2016 - 5:08 pm | खेडूत
ते वसंतदादांच्या संदर्भात म्हटले जाते. ते उपचारासाठी परदेशात असताना हे कारस्थान झाले होते.
18 Oct 2016 - 5:24 pm | वटवट
ओक्के
17 Oct 2016 - 4:56 pm | शब्दबम्बाळ
मिपा वर चांगलाच पवार फॅन क्लब दिसतोय! पार दिवस जात नाही कि लोकांचा आठवण काढल्याशिवाय! :D
असो, पण ते इतके भ्रष्ट आहेत कि आता मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे "धर्मसत्ताच" त्यांना वठणीवर आणेल कदाचित!
कायदा वगैरे सगळ्या अंधश्रद्धा कशाला हव्यात?! :P
17 Oct 2016 - 5:23 pm | विशुमित
मी पण तीच वाट बघतोय कधी एकदा धर्मसत्ता पवार साहेबाना वठणीवर आणते ती
18 Oct 2016 - 1:16 am | बॅटमॅन
बायदवे पवार ट्रम्पला भेटणार म्हणतात. म्हंजे आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार ट्रम्प निवडणूक हरणार की काय? =))
बाकी साहेबांच्या भक्तांची जळजळ उदाहरणार्थ रोचक वगैरे वाटली.
18 Oct 2016 - 3:30 am | साहना
कॅलिफोर्निया मध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्तिथी आहे पुतण्याला जरा पाठवून मुतायला लावावे ! लई उपकार होतील.
18 Oct 2016 - 2:14 pm | विशुमित
असले पाणी पिणार असाल तर गाळून प्या..
18 Oct 2016 - 6:58 am | सुखीमाणूस
मराठा मोर्चा काढायचा आहे ना ठिकठिकाणि
ही बातमी देणारा,स्वप्निल पुरुषोत्तम खेडेकर,म्हनजे कोणाचा कोण?
18 Oct 2016 - 6:59 am | सुखीमाणूस
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EBI79U
19 Oct 2016 - 1:37 pm | चौकटराजा
मराठी माणूस या नात्याने साहेब प्रधानमंत्री झाले असते तर मला आनंद वाटला असता. पण ते " स्थितीवादी " राजकारणी आहेत. त्यानी खूप मुलभूत बदल कधीच घडवून आणल्याचे मला तरी दिसलेले नाहीत. त्यानी श्रीकर परदेशी यांच्या सारख्या नोकरशहा कडून काहीतरी शिकायला हवे होते. पण राजकारणी नोकरशहाना बदलतात हेच राजकारण्याचा फक्त माहिती असते.
10 Nov 2016 - 12:00 am | श्रीगुरुजी
साहेब मागील महिन्यात अमेरिकेत जाऊन हिलरीला भेटले, तेव्हाच ट्रंपचा विजय नक्की झाला होता. माणसांचं सोडा, साहेब परमेश्वराला सुद्धा मॅनेज करू शकतात.
10 Nov 2016 - 6:28 am | साहना
ह्या परदेश वारीचा संबंध आणि १०००,५०० केल्या संबंध असावा असे वाटते
10 Nov 2016 - 4:06 pm | वरुण मोहिते
वर्ल्ड इकॉनॉमिक्स . काय करायचं काय नाही हे एका दिवसात ठरत नाही . आपल्याला कळतही नाही कित्येक गोष्टी . बाकी सगळे मुद्दे काढून फक्त साहेब कसे वाईट हे महाराष्ट्रात का चित्र रंगवलं जात कळत नाही . बाकीचे अखिल भारतातले लोक जे राजकारणात होते ते छान होते का ?? आणि साहेब वाईट तर मोदीजी का बोले सल्ला घेतो त्यांचा मी दर महिन्याला असं. असाच एक शंका .
10 Nov 2016 - 4:12 pm | वरुण मोहिते
दक्षिणेकडे किंवा उत्तर भारतात तर विचारूच नका . पण आपल्याकडे नेहमी चढाओढ असते बाळासाहेब कसे वाईट आणि मोठे साहेब कसे वाईट . कशाला ?? ती लोक त्यांच्याबद्दल काही वाईट पण बोलू शकत नाहीत . मी असं म्हणत नाहीये कि याना चांगला म्हणा असतील काही दोष पण जे चांगलं आहे ते कधीतरी वाचा लिहा लोकांनी . एकपण चांगलं काम याचा दिसू नये . सतत टीका ऐसा नाही होता