गाभा:
संतसूर्य तुकाराम' कादंबरीत महाराजांची बदनामी?
साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद यादव यांच्या ‘ संतसूर्य तुकाराम ’ या नव्या कादंबरीतील मजकूरामुळे वारक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कादंबरीत यादव यांनी महाराजांबद्दल 'ते विलासी वृत्तीचे, बाहेरख्याली होते' असे म्हटले असल्याचा आरोप देहुच्या संत तुकाराम महाराज देवस्थानाचे विश्वस्त आणि महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी केला आहे
ईथे हि बातमी पहा
वरुन त्यानी हे अजुन काही संताप आणणारे वक्तव्य केले आहे
ही घ्या 'संतसूर्य तुकाराम'मधील 'वादग्रस्त' पाने जशी च्या तशी
सौजन्य म टा
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 5:55 pm | सुनील
ही पहा ती वादग्रस्त लिखाण असलेली पाने -
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4079916.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4079925.cms
मी संपूर्ण कादंबरी वाचलेली नाही. परंतु, हे एवढेच लिखाण हे वादाचे कारण असेल तर, ह्या लिखाणात फारसे काही वावगे अथवा बदनामीकारक आहे, असे वाटत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Feb 2009 - 5:59 pm | बिपिन कार्यकर्ते
उगाच भलते वाद उकरून काढू नका. मला तरी त्या मजकूरात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही.
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 6:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुनील आणि बिपिनशी सहमत.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
5 Feb 2009 - 6:09 pm | चकली
नवीन वाद तयार करायचा प्रयत्न आहे.
चकली
http://chakali.blogspot.com
5 Feb 2009 - 6:09 pm | लिखाळ
सुनील, बिपिन, अदितीशी सहमत
-- लिखाळ.
5 Feb 2009 - 7:01 pm | नीलकांत
मी ती पाने वाचली मला त्यात काहीच आक्षेपार्ह वाटले नाही.
नीलकांत
5 Feb 2009 - 6:36 pm | खालिद
वाट्टेल तिथून काहीही खुसपट उकरायचे, पोस्टर फाडायचे, मूर्तीची विटंबना करायची, दोन समूहात भांडणे लावायची, आपली पोळी भाजुन घ्यायची आणि मग गंमत बघत बसायचे हा सद्ध्या आपल्या देशात धंदाच झाला आहे.
5 Feb 2009 - 7:58 pm | चतुरंग
तरुण वयातल्या वाईट सवयी सोडून भक्तिमार्गाकडे होणारी वाटचाल ही वाईट कशी असू शकेल?
काहीतरी आचरटपणा करुन मोठ्या व्यक्तींबद्दल उगीचच वाद उपस्थित करायचे हा एक ट्रेंड हल्ली दिसतो त्यातलाच प्रकार आहे.
आनंद यादव हे संमेलनाध्यक्ष झाल्याने ज्या कोणाच्या पोटात दुखत असेल त्यांना हातशी धरुन हे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे हे स्पष्ट दिसते. ह्या प्रकाराचा मी निषेध करतो!
चतुरंग
6 Feb 2009 - 12:07 am | पिवळा डांबिस
रंगाशी सहमत!!
ह्या प्रकाराचा मी निषेध करतो!
मीही!
6 Feb 2009 - 1:07 pm | कवटी
रंगा , पिडांशी सहमत.
कवटी
6 Feb 2009 - 1:20 pm | सखाराम_गटणे™
+३
5 Feb 2009 - 10:18 pm | trendi.pravin
वरील सर्वजणा॑शी मी सहमत आहे.मलासुध्धा यात काहिच आक्षेपार्ह वाटले नाही....ऊगीच वाद तयार करायचा प्रयत्न आहे.
5 Feb 2009 - 10:41 pm | प्राजु
उगाच वाद घालण्यासाठी नविन कारण शोधले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Feb 2009 - 12:03 am | सुक्या
वादग्रस्त (?) . ही दोन्ही पानी वाचल्यावर मला त्यात वाद्ग्रस्त असे काहीच दिसले नाही. उगीचच सवंग प्रसिध्दीसाठी हे सारे चालु आहे. ह्यात दोन पानात यादव यांनी महाराजांबद्दल 'ते विलासी वृत्तीचे, बाहेरख्याली होते' असे म्हटल्याचे जराही वाटत नाही. राहीली गांजा ओढायची गोष्ट. मी आजही नाशिकला गंगेवर गांजा ओढणारे साधुबुवा आणी त्यांना भक्तीभावाने नमन करणारे भक्त दाखवुन देइल.
आवांतर : लेखकाने धाग्याचे शिर्षक संपादित करावे असे मला वाटते.
(वारकरी) सुक्या (बोंबील)
6 Feb 2009 - 5:05 am | घाटावरचे भट
याला काही अर्थ नाही. आणि जर असल्या दोन वाक्यांमुळे जर लोकांच्या तथाकथित श्रद्धांना धक्का पोहोचत असेल (मग ते लोक तुकाराम महाराजांचे वंशज का असेनात), तर त्यांच्या श्रद्धांनाही काही अर्थ नाही. तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यभरात जी अवहेलना आणि त्रास भोगले, हे त्याच्या कणमात्रदेखील नाही, पण या मूर्खांचा कांगावा तर पहा. हे शुद्ध राजकारण आहे.
6 Feb 2009 - 5:16 am | धनंजय
हे अशुद्ध राजकारण आहे.
6 Feb 2009 - 5:18 am | घाटावरचे भट
:) टंकनदोष सुधारल्याबद्दल धन्यवाद. हे अशुद्धच राजकारण आहे, जे पाहून आता बेशुद्ध पडायची वेळ आली आहे.
6 Feb 2009 - 6:06 am | सहज
मटा लेखातील दुव्यात मला तरी काही बदनामीकारक वाटले नाही.
त्यामुळे ह्या लेखाच्या मुळ शीर्षकात बदल करणार्यांना धन्यवाद.
6 Feb 2009 - 12:28 pm | गोमट्या
तुकाराम महाराज कसे घडत गेले असतील ह्यासंबंधीची माहिती त्या पानांवर आहे असे दिसते.
पण समजुन घ्यायची मानसिकता हवी..
महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे देहूकर ह्यांना कोणीतरी घोळात घेवुन आनंद यादवांच्या विरुध्द हे कुभांड रचण्याचा प्रयत्न चालु केलेला दिसत आहे..
गोमट्या
6 Feb 2009 - 1:56 pm | भडकमकर मास्तर
हे सगळे राजकारण आहे हे खरेच...
सध्या कशाचा इश्यू होईल सांगता येत नाही... त्यामुळेच मूळ पाने वाचल्यावर काही वाक्ये टाळली असती तर बरे झाले असते, असे मला वाटले ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
8 Feb 2009 - 2:18 pm | महेंद्र
त्या आनंदच्या पुस्तकाला फुकटची प्रसिध्दी मिळवुन देण्याचा हा एक पध्दत्शिर डाव आहे.
पुस्तक भिकार असणार ते....
एखादा लेखक लाडका असला की मग झालं, तो जे काही लिहिल त्याची तारिफच करायची पध्दत आहे आपल्यात.आमच्या कडे एक म्हण आहे विदर्भात,
"लाडका लेक मंदिरी हागे
ढूंगण धुवायला शंकर मागे"
8 Feb 2009 - 10:32 pm | नितिन थत्ते
चामट्याला मराठी येतं का?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
8 Feb 2009 - 10:38 pm | सोज्वळ
इतकं काही वादग्रस्त नाही ... आनंद यादवांनी म्हटल्याप्रमाणे 'कादंबरी वाचायची अन अर्थ लावून घेण्याची एक पद्धत असते' ...
- सोज्वळ
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
मी पायी रूतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो |
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ||
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
10 Feb 2009 - 10:12 pm | १.५ शहाणा
यात काहिच आक्षेपार्ह वाटले नाही