तलकाडू आणि सोमनाथपूर: छायाचित्रे

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in मिपा कलादालन
1 Jul 2016 - 9:20 pm

गेल्या आठवड्यामध्ये तलकाडू आणि सोमनाथपूरला जाऊन आलो. गंग राजे आणि होयसळांची वास्तुशिल्पे खरोखर सुंदर आहेत.
विस्तृत माहिती वेगळ्या लेखामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेन. इथे फक्त काही छायाचित्रे चिकटवत आहे.

सोमनाथपूर : चेन्ना केशवा मंदिर
1.
somnathpur1

2.
somnathpur2

3.
somnathpur3

4.
somnathpur4

तलकाडू : कीर्ती नारायण मंदिर

5.
talakadu

6.
talakadu2

7.
talakadu3

प्रतिक्रिया

भोळा भाबडा's picture

1 Jul 2016 - 9:35 pm | भोळा भाबडा

जबरदस्त फटू काढलेत तुम्ही

शान्तिप्रिय's picture

1 Jul 2016 - 9:37 pm | शान्तिप्रिय

अतिशय सुंदर फोटो
मीहि २०११ साली तळकाडु ला गेलो होतो. सुंदर ठिकाण!
जरा सविस्तर लिहा सहलीबद्दल!

फोटोशॉपचा लखलखाट आहे. मंदिरातले बारकावे बघायला आवडलं असतं

रुस्तम's picture

1 Jul 2016 - 10:35 pm | रुस्तम

मला पण असंच वाटलं

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2016 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रे सुंदर आहेत. पण, जरा जास्तच प्रोसेसिंग केल्याने ती प्रकाशचित्रे न वाटता रंगवलेली चित्रे (पेंटिंग्ज) वाटत आहेत.

देवेन भोसले's picture

2 Jul 2016 - 8:38 am | देवेन भोसले

१ नंबर फोटो

प्रचेतस's picture

2 Jul 2016 - 8:49 am | प्रचेतस

पोस्टप्रोसेसिंगचा अतिरेक वाटला.

नाखु's picture

2 Jul 2016 - 9:18 am | नाखु

लांबुन जाऊन जवळून छायाचित्रे का घेतली नसावीत बरे? चार शंका वल्लींना विचारता तरी आल्या असत्या.

स्वगतः आपण कधी जाणार आहात तकलाडूला?

हौश्या नवश्या नाखु

मंदार कात्रे's picture

2 Jul 2016 - 9:24 am | मंदार कात्रे

खूप छान फोटो

आभार्स

कारण तलकाडू आणि सोमनाथपूरचे मंदिर ही मुळातच खूप सुंदर ठिकाणे आहेत.
आम्ही ४ वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा कीर्ती नारायण मंदिराचे काम सुरू होते, आता बर्‍यापैकी झालेले दिसते.
सुरेख दिसतेय मंदिर, फक्त ते भडक रंग वगैरे द्यायला नको होते.

चौकटराजा's picture

2 Jul 2016 - 6:53 pm | चौकटराजा

सोमनाथपूरचे देवालय जरा आड बाजूला असले तरी ते एक उत्तम देवालयाचा नमुना आहे. आपण काही फोटो असे म्हटले आहे. तरी आणखी फोटो टाकून एक धागा तयार करावा. मात्र फोटोएडीट मधे शार्पनेस फार वाढवू नका हो राव !

चौथा कोनाडा's picture

2 Jul 2016 - 9:27 pm | चौथा कोनाडा

सुंदर फोटो ! ठिकाणांची माहिती फोटो बरोबरच टाकली असती तर मजा आली असती !
( इतर मिपाकर म्हणतायत त्याप्रमाणेच म्हटतो, फोटोशॉप जास्तच वापरल्यामुळे पहिले तीनचार फोटो "अनैसर्गिक/कृत्रीम" वाटतायत)
सोमनाथपूरचे मंदिर खुपच सुंदर दिसत आहे. जायलाच पाहिजे एकदा !
अर्थात, धाग्यात म्हटल्या प्रमाणे वेगळ्या लेखाची वाट पहात आहेच !

आम्ही देखिल तलकाडूला तीन वर्षापुर्वी भेट दिली होती, त्याची आठवण झाली.
नीमोतै म्हणतात त्याप्रमाणे कीर्तीनारायण मंदिराच्या अवशेषांची जुळणी चालू होती.

आमच्या तलकाडू भेटीची झैरातः
तलकाडू : एक प्रवास

IMGABC1

अभिजीत अवलिया's picture

3 Jul 2016 - 8:01 pm | अभिजीत अवलिया

फोटो काढल्यानंतर शक्यतो पोस्ट प्रोसेसिंग अति प्रमाणात करू नये. बेसिक टच फक्त करावा. कारण खूप जास्त पोस्ट प्रोसेसिंग केल्याने फोटोची ओरिजिनॅलिटी पूर्णपणे संपून जाते. मग असा फोटो म्हणजे केवळ डेस्कटॉप वर लावायचे वॉलपेपर होतात. मनाला भिडत नाहीत. अर्थात हे फक्त माझे मत.

किसन शिंदे's picture

3 Jul 2016 - 10:45 pm | किसन शिंदे

फोटो आवडले ब्वाॅ

शब्दबम्बाळ's picture

14 Oct 2016 - 5:27 pm | शब्दबम्बाळ

सगळ्यांचे आभार!
धागा पाहायचे विसरूनच गेलो परत.. सविस्तर माहिती लिहायचं झालंच नाही अजून त्याबद्दल क्षमस्व!

पण हि सगळीच छायाचित्रे पोस्ट प्रोसेस केलेली होती, हे वर लिहायला पाहिजे असे वाटते आता! पुढच्या वेळी काळजी घेईन... आणि सूचनांचा नक्की विचार करेन.

तरीही काही लोकांचा छायाचित्र हे छायाचित्रानुसारच दिसले पाहिजे असा अट्टाहास समजत नाही! एखादे चित्र इतके छान वाटते कि आपण म्हणतो अगदी फोटो वाटतोय. मग एखाद्या फोटोला चित्रासारखे सारखे बनवले तर काय झाले?
टीका-टिप्पणी चे स्वागत आहेच, पण पोस्ट प्रोसेसिंग केलं म्हणजे जणू फोटो बाटला असे विचार वाटतात काही लोकांचे(फक्त याच धाग्यावर नाही)! त्याला काय करायचं?! :)