पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
29 Sep 2016 - 3:16 pm
गाभा: 

वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत.

आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.

एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-...)

ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said.

“… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army.

Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-s...

_________________________________________________________________________

असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता.

आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते.

परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत.

आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे.

आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 3:40 pm | टवाळ कार्टा

असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही.

????

नाखु's picture

29 Sep 2016 - 3:58 pm | नाखु

त्यांनी हल्ले करू नयेत असे म्हटले नाही तर त्याचा गाजावाजा कम बोभाटा करू नये पाहिजे तर बी सी सी आय धोरणासारखे चार पाच महिन्यानंतर कुठेतरी सांगावे..

अत्ताच नाही सांगीतले तर बघा नमो पण ममो सारखे आहेत असे म्हणणार.

सांगीतले तर हा वांधा ..

गुरुजी यात माध्यमांची आणि विचारवंताची प्रगल्भता हा मुद्दा असला पाहिजे.लोकांची स्मरणशक्ती जास्ती तीव्र नसते. पण विचारवंत आणि दांडकेवाले (वाहिनीलोलुप) यांना टी आर पी साठी भणंग+वाचाळ (अगदी काटजू पासून राणे पर्यंत हवे असतात) ते बरळणार आणि तारे तोडणार आणि लोकांना बसल्या जागी करमणूक करणार.

आप्ल्या मिपावरच किती मिपाकरांनी गेल्या १० वर्षात वर्तमानपत्रातील चांगल्या लेखा वर किंवा लेखमालेवर चर्चा केली आहे?. मते मांडली आहेत ? शिफारस केली आहे पण एखाद्या उठवळ/सवंग विषयावर पाने न पाने खर्ची पडली आहेत.

सगळेच फक्त वाईट घडत आहे असे समजणे जसे निराशा/वैफल्यग्रस्तेचे लक्षण आहे तसे सगळे फक्त चांगले चालत/घडत आहे असे समजणे हे ही आंधळेपणाचे लक्षण सत्य हे कायम या दोन्हींच्या मध्ये (कुठेतरी) असते आणि ते दुस्र्या बाजूकडे जास्त असावे अशी आपली वागणूक असावी.

ल.तों.मो.घा.बद्दल क्षमा.

मिपा नितवाचक नाखु

महासंग्राम's picture

29 Sep 2016 - 3:46 pm | महासंग्राम

आखिर केहना क्या चाहते हो गुरुजी

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Sep 2016 - 3:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

पाकीस्तान सुधरेल अशी अपेक्षा नाहीच. ह्या हल्याचा मुख्य उद्देश भारताचा संयम संपलाय अन भारत आता सीमा ओलांडुन दहशतवाद्यांना मारेल हा संदेश जगाला देणं हा असेल असं मला वाटतंय. आतापोतुर असं काही आपण करत नव्हतो.

मास्टरमाईन्ड's picture

29 Sep 2016 - 4:00 pm | मास्टरमाईन्ड

पाकीस्तान सुधरेल अशी अपेक्षा नाहीच. ह्या हल्याचा मुख्य उद्देश भारताचा संयम संपलाय अन भारत आता सीमा ओलांडुन दहशतवाद्यांना मारेल हा संदेश जगाला देणं हा असेल असं मला वाटतंय

+१११११११

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Sep 2016 - 4:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

कितपत हल्ले केले तर पाकिस्तान प्रत्युत्तर देणार नाही, ह्याची चाचपणी करणे अन कितपत हल्ला झाला तर त्याच पर्यावसान फुलस्केल वॉरमध्ये होईल ह्याचा अभ्यास करणे हे उद्देशही असु शकतात.

मास्टरमाईन्ड's picture

29 Sep 2016 - 4:15 pm | मास्टरमाईन्ड

"आमच्याकडे पण शस्त्रं आहेत आणि ती आम्ही वेळ आल्यावर वापरूही शकतो" असा संदेश पाकिस्तान, त्यांचे पाळीव अतिरेकी आणि इतर सर्व जगाला देण्याचा पण हेतू असू शकतो.
कदाचित अजूनही काही वेगळं कारण असू शकेल.

बाकी टुकार दर्जाच्या भिकार चॅनल्स वर होणार्या तथाकथित लोकांना घेऊन होणार्या चर्चा, polls इ. ची काळजी सरकार चालवणारे करत असतील असं वाटत नाही. (आणी पूर्वीही करत नव्हते).

प्रसाद_१९८२'s picture

2 Oct 2016 - 3:37 pm | प्रसाद_१९८२

+१००

मी काय म्हणतो... कशाला ते युद्ध करायचे ? अर्थव्यवस्थेला फटका बसेल, बॉलिवुडला फटका बसेल, मेणबत्ती मोर्चे काढता येणार नाही,व्यापर-व्यवसाय करणार्‍यांचे नुकसान होईल इं इं इं...
आपल्या घरचे कोणी ठार झाले नाही ना ? मग बस्स झाले... आपण बरे आणि आपली अत्यंत स्वार्थी कातडी बरी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Sep 2016 - 4:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

लगेच आता लोक्स मार्केट कसं आपटलं अन रुप्या कसा रसातळाला गेला ३६ पैसयानी ह्याबाबत गळे काढायला सुरुवात करतील!

कलंत्री's picture

29 Sep 2016 - 4:13 pm | कलंत्री

गुरुजी यांनी फारच चांगली सूचना केली आहे.

बोभाटा करु नका. शांतपणे कारवाई करा.

नेत्यांच्या प्रतिमेपेक्षाही काही महत्वाचे असतेच.

पितृपक्षातल्या चतुर्दशीलाच सीमोल्लंघन करुन पराक्रम जगाला दाखवणारे आमचे भारतीय सैन्य; आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असणारे मोदी सरकार !
समस्त भारतीय जनतेचा तुम्हाला पाठींबा आहे !
भारत माता की जय ! वंदे मातरम्

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Sep 2016 - 4:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मला असं वाटत कि, बाहेर जाऊन हल्ले वगैरे करण्यापेक्षा (म्हणजे आता जे आर्मी ने केले त्याच्या विरोधात मी नाही, हे व्हायलाच हवे होते आणि जे केले ते योग्यच केले याच मताचा मी आहे. हि काळाची गरज आणि योग्य सुरवात आहे.) , आपले घर आणि घराचे कुंपण जास्त सुरक्षित करावं. अमेरिकेवर ९/११ नंतर कुठला हल्ला झाला? कारण त्यांनी त्यांच्या बॉर्डर सील केल्या आणि अतंर्गत सुरक्षा आधिक कडक केली. तसचं भारतालाही करणे शक्य आहे कि नाही?
त्याच बरोबरीने भारतीय लष्कराने broken earth policy (मराठी शब्द??) लागू करावी. या पॉलीसी अंतर्गत, पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, त्यात कला, क्रिडा, व्यापार, परराष्ट्रीय, लष्करी, नैसर्गिक संसाधने इ. इ. सर्व आले.
जणू काही पाकिस्तान नावाचा देशच या जगाच्या नकाशावर नाही. असे समजून चालावे. पाकिस्तान किंवा इतर कोणिही ज्या ज्या मार्गांनी म्हणून घुसखोरी करु शकतात ते सर्व मार्ग सील करुन तिथे सुरक्षा अत्यंत कडक आणि निर्दयी असावी. तिथे कुठलाही आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवण्यात येऊ नये.
असे झाले तर घुसखोरी, आतंकवाद वगैरे काही त्रास राहणारच नाही किंवा किमान त्याची तीव्रता अत्यंत मोठ्याप्रमाणात कमी करता येईल.
अर्थात हे सगळ करण प्रॅक्टिकली फार म्हणजे फारच अवघड आहे. आणि भारतासारख्या राष्ट्राला तर नक्कीच अवघड आहे. पण युध्द टाळण्याचा आणि तरीही पाकिस्तानला नामोहरम करण्याचा हा एक प्रभावी उपाय ठरु शकतो.
मला फार अक्कल नाही या विषयात पण एक सामान्य नागरीक म्हणून मला असं वाटतयं.

मास्टरमाईन्ड's picture

29 Sep 2016 - 4:59 pm | मास्टरमाईन्ड

मग मानवी हक्कांचं काय?

पाकिस्तान किंवा इतर कोणिही ज्या ज्या मार्गांनी म्हणून घुसखोरी करु शकतात ते सर्व मार्ग सील करुन तिथे सुरक्षा अत्यंत कडक आणि निर्दयी असावी. तिथे कुठलाही आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवण्यात येऊ नये.

छे छे छे.... मानवी हक्कांची पायमल्ली होईल असं कसं करायचं ब्वॉ??

दिगोचि's picture

30 Sep 2016 - 10:27 am | दिगोचि

फक्त एक शन्का आहे ती अशी आपली बॉर्डर सील करणे शक्य आहे का? अजून नागरीकामधे देशाविषयी फार भक्ती दिसत नाही असती तर आपण जे वाहतुकीचे किम्वा इतर नियम सतत मोडले नसते. देशात लाखो नागरीक असे आहेत की त्याना पाकिस्तानविषयी भारतापेक्शा जास्त प्रेम आहे. यात अनेक नेते पण आहेत. यानी इतकी वर्षे लष्कराला अत्याधुनिक शस्त्रे घेउ दिली नाहीत. अजुन सैन्याकडे जुनाट बन्दुकाच आहेत. ङेल्या आठवड्यतल्या बातमीप्रमाणे त्यानी आत्ता नव्या आधुनिक बन्दुका कुठे मिळतील हे शोधायला सुरवात केली आहे म्हणजे दोन-तीन वर्षे सहज जातील व अनेक जनरलसाहेब त्यातील कोत्यवधी पैसे खातीलच. अशी आपली परिस्थिती आहे. शेवटी मी कोणत्याही पक्शाचा भक्त किम्वा वैरी नाही हे नमुद करू इच्चितो.

अभ्या..'s picture

29 Sep 2016 - 4:52 pm | अभ्या..

शब्बास रे वाघांनो,

गपचीप करा, सांगून करा,

पब्लिकला झाला तर नॅशनल इंटरनॅशनल त्रास भोगू दे काही काळ पण...

हाणा तिज्ययला. हाणा असेच भोसडीच्याना.

संजय पाटिल's picture

30 Sep 2016 - 10:38 am | संजय पाटिल

हेच म्हंटलो होतो..

सचु कुळकर्णी's picture

29 Sep 2016 - 5:05 pm | सचु कुळकर्णी

सहमत रे अभ्या

प्रसाद_१९८२'s picture

29 Sep 2016 - 5:21 pm | प्रसाद_१९८२

भारतीय सैन्याचे व भाजपा सरकारचे हार्दिक अभिनंदन.

अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही.

याच्याशी सहमत नाही.
उलट ह्या कारवाईचे व्हिडीओ शुटींग भारतीय सैन्याने केलेय, असे वाचले. ते व्हिडीओ शुटींग सरकारने सर्व प्रसारमाध्यमांत व्हायरल करुन टाकायला हवे. दरवेळी अश्या कारवाई नंतर पाकिस्तान असे काही झालेच नाही वगैरे रडगाणे सुरु करतो ते व्हायचे देखिल बंद होईल.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 6:50 pm | संदीप डांगे

श्रीगुरुजींशी सहमत.

पण त्याच वेळी अतिशय हुशारीने पाकव्याप्त जमीनीवर, नियंत्रण रेषेच्या जवळ हल्ले करुन जगात व भारतीयांत योग्य संदेश पोचवल्याबद्दल सरकार व सेनेचे खूप खूप आभार. मनोबल उंचावण्याबद्दल काही दिवस आधी बोललो होतो. ती अपेक्षा पूर्ण झाली.

अशा दोन चार सर्जिकल ऑपरेशन्सनी भारतासाठी देशातले किंवा जागतिक वातावरण बिघडावे असे काही घडण्याची शक्यता नाही. गालावर चापट मारल्यावर माणूस मरत नाही पण त्याला योग्य ती समज मिळते. अशा ऑपरेशन्स मधून योग्य तो धडा त्या त्या पार्टीला मिळाला असावा अशी अपेक्षा आहे. अशी ऑपरेशन्स सरकारच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय लष्कराला करायची कायमची परवानगी असावी असे माझे मत आहे. त्याबद्दल जाहिर वाच्यता केली नाही तरी चालेल. कदाचित असे घडतही असेल.

अवांतरः कदाचित कळण्यास किंवा समजून घेण्यास आत्ता कठिण जाईल पण माझा दुसरा मुद्दा असा होता की एखाद्या घटनेला मिळणारी न्यूजवॅल्यू सदर घटनेबद्दल जी प्रतिमा निर्माण करते त्याने फार परिणाम होतो. उरी किंवा पठाणकोटचे हल्ले देशपातळीवर मोठ्या प्रमाणात गाजवले गेले त्यामुळे त्याबद्दलचे शल्य, दु:ख, बोच फार मोठी होती. अशाच प्रकारचे हल्ले जेव्हा नक्षलवादप्रभावित भागांमधे होतात व अनेक पोलिस, निमलषकरी दलाचे सैनिक शहिद होतात तेव्हा ती बातमी परिणाम देईल अशी पसरवली जात नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांमधे होणार्‍या जीवितहानीचे शल्य, बोच सामान्य जनमानसात नाही असे जाणवते. दुसरे असेही की शत्रूराष्ट्राने केलेल्या हल्ल्यात हानी झाली तर आत्मसन्मानास ठेच लागत असावी. माझे यावर असे मत होते की जरी आपले सैनिक शहिद होत असतील तरी त्या बातम्या जनसामान्यांचे मनोबल खच्ची होणार नाही ह्या पद्धतीने प्रसारित कराव्यात. अन्यथा जिन्गोइजम उफाळून येतो व भावनाविवश जनतेच्या दबावाखाली सरकारला धोकादायक किंवा अविचारी कृती करायची गरज पडू शकते. हा परिच्छेद आत्ताच्या सरजिकल ऑपरेशनबद्दल नाही हे समजून घ्यावे. उरी हल्ल्याच्या वेळेस हे विचार आले होते, तेव्हा लिहू शकलो नाही म्हणून आता लिहिले.

दुसरे अवांतर असे की मानव अधिकारांबद्दल अनेक प्रतिसाद दिसत आहेत, म्हणजे मानवीहक्कसमर्थकांची खिल्ली उडवली जात आहे. माझ्यामते मानवाधिकाराबद्दल काहीही लिहिण्याआधी ती संकल्पना समजून घेणे आपल्यासाठीच आवश्यक आहे. मानवाधिकार ही संकल्पना स्टेट-स्पॉन्सर्ड-अ‍ॅक्शनच्या (पोलिस, सैन्य, सरकारी अधिकारी) सामान्य नागरिकांवर होणार्‍या परिणामाबद्दल आहे. दहशतवादी किंवा इतर समाजकंटक ह्यांच्या कृतीचे परिणाम व त्याबद्दलची मीमांसा मानवाधिकाराच्या कक्षेत येत नाही. कटू असले तरी हे सत्य व सर्वमान्य आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. 'सरकार'तर्फे कोणत्याही नागरिकावर तो अगदी खूनी, बलात्कारी, दहशतवादी, माथेफिरु असला तरी अन्याय होऊ नये अशी ती संकल्पना आहे, त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल सरकार नव्हे तर 'तटस्थ' अशी न्यायपालिका न्याय करण्यास नेमलेली आहे. सरकारी बळाचा सामान्य नागरिकांवर कोणी गैरवापर करु नये असा त्यामागे विचार आहे. (प्रत्यक्षात असे होते असे म्हणवत नाही हा भाग वेगळा)

चौकटराजा's picture

29 Sep 2016 - 7:21 pm | चौकटराजा

सुरूवातीच्या हल्याची बातमी जगाला देणे ही राजकीय अपरिहार्यता होती. सबब बातमी जाहीरपणे देणे बरोबर. पुन्हा वारंवार आता दहशती तळांवर हल्ली करण्याची आमची मानसिकता तयार झाली आहे हा संदेश पाकिस्तानला गेला आहे व पाकचे दोन बाप अमेरिका व चीन यानाही. पुन्हा असे ऑपशेशन झाल्यास त्याचा पुसटसा उल्लेख ही कुठे केला जाणार नाही याची मला खात्री वाटते. लोकांमध्ये उन्माद किंवा क्षोभ निर्माण न होण्याची काळजी लष्कर व सरकार घेईलच.

यशोधरा's picture

29 Sep 2016 - 7:30 pm | यशोधरा

सुरूवातीच्या हल्याची बातमी जगाला देणे ही राजकीय अपरिहार्यता होती. सबब बातमी जाहीरपणे देणे बरोबर. पुन्हा वारंवार आता दहशती तळांवर हल्ली करण्याची आमची मानसिकता तयार झाली आहे हा संदेश पाकिस्तानला गेला आहे व पाकचे दोन बाप अमेरिका व चीन यानाही. पुन्हा असे ऑपशेशन झाल्यास त्याचा पुसटसा उल्लेख ही कुठे केला जाणार नाही याची मला खात्री वाटते.

सहमत.

झेन's picture

29 Sep 2016 - 7:36 pm | झेन

वाहिन्यांचा उथळपणा थांबवला पाहिजे. एका वाहिनीवर प्रतिनिधी विचारत होता कि अश्या वेळी व्यूहरचना कशी असते, कुठली हत्यारे वापरतात असे अनेक संवेदनशील प्रश्न.

बाकी गेम मस्तच म्हणजे पाकिस्तान असे ऑपरेशन झाले हे मान्य करू शकत नाही कारण अतिरेक्यांचे कँप चालवल्याची जाहीर कबुली आणि कांगावा पण करू शकत नाही.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 7:43 pm | संदीप डांगे

वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना अगदी सत्य आणि व्यवस्थित उत्तरे दिली गेली पाहिजेत, म्हणजे बॉर्डर चित्रपटांत वापरली गेलेली शस्त्रे व त्यांची माहिती, सुनिल शेट्टीने वापर्लेली एमएमजी, त्याची तुटलेली स्प्रिण्ग व तीच्या वेटोळ्यांची संख्या, सनी देओलने केलेली व्यूहरचना, अक्शय खन्ना ने वाप्रलेले वायरलेस फोनयंत्र, ज्याकीस्र्हाफ ने आकाशात फिरवलेली "रातकोउडनहीसकताफेम" विमाने इत्यादी. त्यांना तीच अपेक्षा असते ना?

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 7:47 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या...अगदी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी हवी असेल तर एलियन टेक्नॉलॉजी आहेच ;)

प्रसाद_१९८२'s picture

29 Sep 2016 - 7:55 pm | प्रसाद_१९८२

ROFL

तेजस आठवले's picture

29 Sep 2016 - 7:57 pm | तेजस आठवले

+1 खुसखुशीत प्रतिसाद. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2016 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

वाचण्याच्या ओघात "सनी देओलने केलेली व्यूहरचना" हे "सनी लिओनने केलेली व्यूहरचना" असे वाचले... शप्पत ! ;)

चाणक्य's picture

29 Sep 2016 - 9:55 pm | चाणक्य

'मनी वसे ते प्रतिसादात दिसे' म्हणतात ते काही खोटं नाही.

नाखु's picture

30 Sep 2016 - 8:37 am | नाखु

काकांनी उल्लेखलेल्ली व्यक्ती जर व्यूह रचना करणार असेल तर "अश्य्या" हल्यांचीच पाकीस्तानकडूनच मागणी होईल असे वाटते.(आणि हल्यात त्या व्य्क्तीने नेतृत्व केले तर्च आम्ही हल्ला स्वीकारू अशी अट असू शकते.

ख खो हल्लेखोर्,शंकेखोर आणि सनी व जाणे

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 8:32 pm | सुबोध खरे

वाहिन्यांचा उथळपणा थांबवला पाहिजे. एका वाहिनीवर प्रतिनिधी विचारत होता कि अश्या वेळी व्यूहरचना कशी असते, कुठली हत्यारे वापरतात असे अनेक संवेदनशील प्रश्न.
बहुतांश वाहिन्या आणि त्यांचे पत्रकार यांच्या अगाध ज्ञानाबद्दल जितके कमी बोलावे तितके चांगले.
बाकी व्यूहरचना कशी करतात आणि हत्यारे कोणती वापरतात इतके बाळबोध प्रश्न आपण पत्रकारितेत खोल आणि गाढे ज्ञानी आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि त्याला जी उत्तरे देतात ती माझ्यासारखा डॉक्टर (न लढणारा सैनिक) सुद्धा देऊ शकेल अशी असतात. त्याचा कोणताही गवगवा होणार नाही अशीच उत्तरे लष्करी नेतुत्व देत असते. त्यामुळे तो विषय संवेदनशील अजिबात नाही हि खात्री बाळगा.

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 8:21 pm | सुबोध खरे

सीमा पार करून कार्यवाही करण्याची लष्कराची आणि लष्करी नेतृत्वाची नेहमीच तयारी होती.
अशी मानसिक तयारी राजकारण्यांनी दाखविणे आवश्यक होते. ती दाखविल्याबद्दल श्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार यांचे मी एक निवृत्त सैनिक म्हणून अभिनंदन करतो.
"सज्जनपणा" हा बर्याच वेळेस "भेकडपणा) समजला जातो decency is taken as spinelessness.
आतापर्यंत पाकिस्तानी लष्करी आणि मुलकी नेतृत्वाची अशी समजूत होती कि भारतीय नेते कडक आणि भयंकर कडक खलिते देण्यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत. या त्यांच्या गोड गैरसमजाला जोरदार धक्का बसला आहे आणि अशा परिस्थितीत काय प्रत्युत्तर द्यावे हे त्यांना कळत नाहीये . लष्करी आणि मुलकी नेतुत्व बावचळलेल्या अवस्थेत आहे. नवाझ शरीफ याना लष्कर सत्ता हातात घेऊन आपल्याला पदच्युत करेल काय याची भीती वाटत आहे. तर जनरल राहील शरीफ यांचा कार्यकाळ समाप्त होत आला आहे त्यांना अपयश घेऊन निवृत्त व्हायचे कि सत्ता हातात घेऊन अवलक्षण करायचे हि शृंगापत्ती पडली आहे. बाकी सरताज अझीझसारख्या लोकांना भुंकायलाच ठेवले आहे ते भुंकत राहतील.
श्री मोदी यांनी अनपेक्षित कार्यवाही करून पाकिस्तानची "आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना" अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली आहे. त्यातून आम्ही फक्त दहशतवाद्यांविरुद्ध कार्यवाही केली आहे आणि आमचे पाकिस्तान लष्कराशी भांडण नाही सांगून त्यांची गोची पण करून ठेवली आहे.

प्रसाद_१९८२'s picture

29 Sep 2016 - 8:27 pm | प्रसाद_१९८२

त्यातून आम्ही फक्त दहशतवाद्यांविरुद्ध कार्यवाही केली आहे आणि आमचे पाकिस्तान लष्कराशी भांडण नाही सांगून त्यांची गोची पण करून ठेवली आहे.

छान प्रतिसाद.

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2016 - 8:32 pm | श्रीगुरुजी

सीमेच्या दुसर्‍या बाजूकडील मते -

Should we rethink Kashmir?

Kashmir: why talk to India?

हा विचार त्यांना करावा लागतोय यातच सर्व आलं

अर्धवटराव's picture

29 Sep 2016 - 8:58 pm | अर्धवटराव

तसच आशीया, युरोप, अमेरीका आदि खंडातल्या महासत्ता व त्यांचे चेलेचपपाटे या सर्वांचं अभिनंदन.
भारत आणि पाकिस्तानला ऑल द बेस्ट.

भारताकरता खरी रणभूमी कारखाने, विद्यापीठं, प्रयोगशाळा, संसद... अगदी मंदीरं, मशीदी इ. सर्व ठिकाणं असणार आहे. त्याची वेळीच जाणीव व्हावी, अगदी तीव्रतेने व्हावी अशी इच्छा.

बाकि गोपालजी कि इच्छा. आखीर सब भूमी उन्हिकी है.
_/\_

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 9:03 pm | संदीप डांगे

धन्यवाद!!

फ्रेंच आणि ब्रिटिश माध्यमांत या घटनेचं कव्हरेज असलं तरी अमेरिकेत (निदान या घटकेला तरी) एक तर काहीच नोंद नाही किंवा पाकिस्तानी व्हर्जन सादर केलं जातंय:

फ्रान्स 24

बीबीसी

अमेरिकेतः

सी एन एन पाकिस्तानी व्हर्जन दिसतंय (पण यांचंच भारतीय भावंडं आय बी एन मात्र भारतीय व्हर्जन मांडतांना दिसतंय.)

ए बी सी

बहुगुणी's picture

29 Sep 2016 - 9:09 pm | बहुगुणी

ए बी सी

सी बी एस

फॉक्स वाहिनीला (अपेक्षेप्रमाणेच!) भारतात/ पाकिस्तानात काय घडतंय याच्याशी काहीही घेणं देणं नाही!

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2016 - 9:06 pm | श्रीगुरुजी

काल इराणने सुद्धा बलुचिस्तान सीमेवरून किरकोळ गोळीबार केल्याच्या बातम्या आहेत.

http://indiatoday.intoday.in/story/pakistan-iran-fires-mortars-balochist...

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Sep 2016 - 10:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्हाला मोरटार किरकोळ वाटतात :O

__________________/\_____________________

सनी देओलच्या जागी तुम्ही मेजर कुलदीपसिंह चांदपुरींचा रोल करायला हवा होतात!

तीन मोर्टार शेल्स म्हणजे किरकोळच आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Sep 2016 - 8:40 am | अनिरुद्ध.वैद्य

सुतली बोंब फोडले असते तर जास्त आवाज झाला असता!

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2016 - 1:58 pm | श्रीगुरुजी

मॉर्टर किरकोळ नाहीत हो. इराणने फक्त ३ मॉर्टर सोडले व त्यातून काहीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही, म्हणून किरकोळ म्हटले.

आजानुकर्ण's picture

29 Sep 2016 - 9:57 pm | आजानुकर्ण

भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

+१ झाले ते बरे झाले!. हाणा साल्यांना.

John McClain's picture

29 Sep 2016 - 9:59 pm | John McClain

सैन्य, सरकार, गुप्तचर संस्था आणि पडद्या मागचे/पुढचे सगळे कलाकार यांचे करकचून अभिनंदन!

Uncle Sam ने आपल्याला या कार्यवाही बद्दल discuss केलं असू शकते का? किंवा त्यांना काही कल्पना असून आपल्याला इंडिरेक्ट aid केलं असू शकत का?
कारण susan rice यांनी अजित दोवल ना कॉल केलेला...
काही दिवसांपूर्वी डिप्लोमॅट। Kerry ची पण भारत भेट होती...
दोघांनी पाक च्या terrorist activities बद्दल रोखठोक मतप्रदर्शन केला होत...

या वर चीन ची काय reaction आली नाही....
चीन ची मोठी गुंतवणूक असल्यामुळे त्यांची फेदरली असेल...
त्यांच्या media मध्ये किंवा त्यांची ऑफिसिल reaction?

अशा अनेक बकर्‍यांचा ताफा चिनच्या दिमतीला उभा केलाय पाकने. चीनी अश्वमेध यज्ञात बळी द्यायचे आहेत ना...

अमितदादा's picture

29 Sep 2016 - 10:16 pm | अमितदादा

भारतीय सरकार आणि लष्कर यांचं अभिनंदन. पण अश्या घटना ह्या पूर्वीही झाल्या आहेत हे नमूद करू इच्छितो. मात्र ह्या वेळी हल्ल्याची तीव्रता जास्त आणि खंबीर राजकीय इछ्याशक्ती दिसून येते. भारतीय लष्कराने एक मेसेज च दिला आहे Nothing goes unpunished.

पत्रकार परिषद घेऊन स्वतः ही बातमी सांगणे हे आर्मी आणि सरकार या दोघांचाही खंबीरपणा आणि ताकद दाखवते. कोणताही बलवान देश अशी कारवाई केल्यास असेच सांगेल.
आता आपण हा पर्याय वापरू हा एक अत्यंत आक्रमक संदेश यातून पाकिस्तानला गेलेला आहे, जे फार महत्त्वाचे आहे.

घडामोडींवर नीट लक्ष दिल्यास, अमेरिका आणि रशिया यांसकट आणखीही काही देशांना असा पर्याय वापरण्याची कल्पना बर्‍याच आधी दिलेली वाटते. अर्थात् त्या पातळीच्या बातम्या आपल्याला समजू शकत नाहीत हा भाग निराळा.

यापुढे पाकिस्तान काय करतो व कसा वागतो यांवर बरेच काही अवलंबून आहे.
- सध्या त्यांची परिस्थिती अशी आहे कि असा हल्ला झाल्याचेही मान्य करता येत नाही. कारण त्यामुळे होणारी नाचक्की आणि देशांतर्गत उद्भवू शकणारी भिती हे पेलण्याची ताकद त्यांची नाही.
- दुसरे असे मान्य केले तर भारतावर हल्ला करणे त्यांना जवळपास भाग पडेल. पण सध्या आंतरराष्ट्रीय जनमत त्यांच्या बाजूने नाही. त्यात असे केल्यास भारताला आक्रमणाला आयते निमंत्रण दिल्यासारखे होईल आणि ते पाकिस्तानला [आणि चीनला] अजिबात परवडणारे नाही.
- शरीफ यांच्यावर अंतर्गत दबाव वाढीला लागला आहे. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी ते काय करतात यावर कडक लक्ष ठेवण्याचे काम सरकार करतच असेल. पाकिस्तानी लष्कराची भूमिका बरेच काही सांगून जाईल.
.
.
.
.
.
सध्या इतकेच. काही दिवसांनी आणखीही काही तर्क करता येतील.

ज्या गोष्टीला भारतीय सेना कायमच जागृकतेने तयार होती त्याला प्रथमच सरकारी पाठींबा देऊन मोदी सरकारने नक्कीच पाकीस्तानला कडवट संदेश दिला आहे आणि भारतीयांना त्यांच्या नैराश्यातून काही अंशी आणि आत्तापुरते का होईना, पण बाहेर काढले आहे. त्याबद्दल सैन्य आणि सरकार दोघांचे अभिनंदन...

अर्थात असे समजू नका सगळे अकलेचे कांदे (अर्थात स्वत:ला बुद्धीवादी समजणारे) असेच समजत असतील. त्यांच्या दृष्टीने मोदी सरकार नक्कीच खोटे सांगत असणार, विशेष करून पाकीस्तानने असे काही झालेच नाही असे म्हणलेले असल्याने त्यात सरकारी कॉन्स्पिरसी थिअरीज यांच्याकडून सांगितल्या जाणारच... अर्थात असे कॉन्स्पिरसी थिअरीज आधी तयार कुठल्या संदर्भात झाल्या होत्या ते पाहू म्हणजे हे अकलेचे कांदे कुठल्या कळपातल्या जनुकांचे बनलेले आहेत ते समजेलः

  1. पृथी गोल नसून सपाटच आहे हे अगदी गेल्या दशकात देखील समजणारे ख्रिस्ती भावीक होते.
  2. अमेरीका चंद्रावर गेलीच नाही, उगाच खोटे चित्रिकरण (कदाचीत हॉलिवूड स्टूडीओज) मधे केले असेल असे म्हणणारे कुठल्याही धर्माचे नाही तर असेच सामाजीक पांथिक आहेत.
  3. ९/११ चा हल्ला हा अमेरीकेनेच केला असे समजणारे मध्यपुर्वेत आणि त्यांचे अमेरीकेतले नातेवाईक समजतात.
  4. बिन लादेन मेलेलाच नाही कारण त्याचे शव कोणी पाहीले आहे? असे देखील म्हणणारे आहेत.

(आणि हो, ओबामा अमेरीकेत जन्माला आला नाही म्हणणारे देखील असल्याच जनुकांचे घडलेले आहेत! )
आता याच शेपटाचे पुढचे टोक म्हणजे भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेच नाहीत!

खरेच दयनीय अवस्था ह्या कांद्यांची! भलताच वांदा झाला आहे, ह्या कांद्यांचा. धड निषेध करू शकत नाहीत की इन्टॉलरन्स म्हणू शकत नाहीत. यातून उद्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून हल्ला झाला तर परत "मोदी सरकारने असे करायला नको होते" असे म्हणत, कसा मोदींच्या राज्यात हल्ला झाला असला विकृत आनंद उपभोगायला तयार राहतील ते वेगळेच!

असो.

ट्रेड मार्क's picture

30 Sep 2016 - 12:19 am | ट्रेड मार्क

कॉन्स्पिरसी थिअरीच करायची झाली तर एक भारी थिअरी आहे.

गेली २ वर्षे पाकला सगळीकडून घेरण्याची तयारी चालू होती. या कालावधीत पाकने त्यांच्या कारवाया काही थांबवल्या नाहीत. इकडे तयारी पूर्ण झाली पण मग पुढचा दहशतवादी हल्ला होण्याची वाट बघायची का आपण आपल्या सोयीच्या वेळेला म्हणजे UN ची परिषद, SAARC परिषद आहे याचा संधी म्हणून वापर करायचा.

पूर्वतयारी - शेजारी देश व जगातील बलवान देश यांच्याबरोबर संबंध वाढवणे. काही बलवान राष्ट्रप्रमुखांबरोबर जिव्हाळयाचे संबंध तयार करणे. बलुच लोकांना पाठिंबा दाखवणे. यामुळे बलुचिस्तान, सिंध ई प्रदेशात खळबळ माजली. एकीकडे पाकची मारली गेली तर तिकडे चीनला चिंता लागून राहिली कारण CPEC चा मोठा भाग बलुचिस्तानातून जातो. बांगलादेश, अफगाणिस्तान यासारख्या पाकच्या अतिरेकी कारवायांना त्रासलेल्या देशांशी मैत्री केल्यामुळे देशांकडून भारताला वाढता पाठिंबा मिळू लागला.

कॉन्स्पिरसी - उरीचा हल्ला भारतानेच प्लॅन केला. त्यासाठी भारतीय सैन्याच्या ताब्यात असलेल्या २०-२२ पाकिस्तानी लोकांना उरीच्या सैनिकी तळावर कैद करून ठेवण्यात आले व योग्य वेळ येताच त्यांना मारून टाकले. नक्की चेहरे कळू नयेत म्हणून नंतर त्यांना जाळण्यात आले. आणि मग भारतानेच बोंबाबोंब केली की अतिरेक्यांच्या हल्ल्यात सैनिक मारले गेले. यात आपले नुकसान काय झाले तर फक्त एक लष्करी छावणीचा भाग जळाला.

उरी हल्ल्यानंतर - नेहमीप्रमाणे अतिरेकी हल्ला असल्याने पाकने स्वीकारण्याचा न स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. लागलीच आपण ठरल्याप्रमाणे कडी निंदा केलीच पण मोदींनी आम्ही प्रत्युत्तर देऊ म्हणून जाहीर केलं. मग सिंधू करार, MFN दर्जा या बाबतीत चर्चा चालू केली. भारतातले वाचाळ व बुद्धिवादी लोक्स अगदी निष्कर्ष काढून मोकळे झाले की नमो आणि ममो मध्ये काहीच फरक नाही. तोपर्यंत सैन्याच्या तत्कालीन तयारीला सहज वेळ मिळाला.

फायदा - तिकडे पाक गाफील राहिले की नेहमीप्रमाणे भारत अप्रत्यक्ष कारवाई करणार. आणि भारतीय त्यांना पाहिजे तसा व पाहिजे तिथे बदला घेतला.

ही फक्त कॉन्स्पिरसी थिअरी आहे. यात हुतात्मा झालेल्या सैनिकांचा, भारत देशाचा व सरकारचा कुठलाही अपमान करण्याचा हेतू नाही.

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 10:33 pm | सुबोध खरे

प्रत्यक्ष मारले गेलेले दहशतवादी हे कितीतरी जास्त आहेत.
सध्या इतकेच.

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 10:38 pm | खटपट्या

ब्राव्हो !!!

विकास's picture

29 Sep 2016 - 10:36 pm | विकास

सावरकरांच्या काव्यपंक्ती आज प्रत्यक्षात आणल्या आहेत...

"साप विखारी देशजननीचा ये घेऊ चावा अवचित गाठूनी, ठकवूनी, भुलवूनी कसाही ठेचावा"

माझ्या मनात ह्या हल्ल्याने धडकी भरली आहे. आता जागोजागी भाऊ, अण्णा, दादा इत्यादी मंडळींच्या अभिनंदपर फेल्क्स बॅनर ची घाण सर्वत्र पसरणार आहे. सैनिकापेंक्षा ह्याच खलपुरुषांनी पाकिस्तानवर हल्ला केला कि काय असे वाटणार आहे.

भारतीय सेना अश्या प्रकारचे हल्ले नेहमीच करते. बोभाटा ह्यावेळी करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर ने पॅराट्रूपर्स टाकणे हे कदाचित नवीन असेल.

ह्यावेळी १७ सैनिक मारले गेले त्याचा सर्वत्र बोभाटा झाला. म्हणून सार्वजनिक रित्या पाकिस्तानला संदेश पाठवणे आवश्यक होते. हल्ला कितीही सौम्य/प्रखर असला तरी मोदी सरकाने (ज्याला PR कसे करावी ह्याची फार चांगली माहिती आहे) ज्या प्रकारे मेसिजिंग केले आहे ते अतिउत्तम आहे.

ह्यामुळे दोन गोष्टी झाल्या आहेत.

१. पाकिस्तानने हल्ला झालाच नाही अशी भूमिका घेतली आहे. आपण एकदा दुसऱ्याचा कानफटात लावली आणि त्याने असे काही झालेच नाही अशी भूमिका घेतली तर दुसऱ्या वेळी आणखीन एक वाजवणे सोपे जाते. पाकिस्तान कडे विशेष पर्याय नाहीत हेच ह्यांतून स्पष्ट झाले आहे.

२. पाकिस्तानने बदला वगैरे घ्यायचा प्रयत्न केला आंतराष्ट्रीय स्तरावरून आमच्यावर जो प्रेशर होता तोच प्रेशर पाकिस्तान वर पडेल. पूर्वी प्रमाणे नॉन-स्टेट अक्टर्स वगैरे अशी भूमिका इथे पाकिस्तानला शक्य नाही. आणि भारताकडे सामोरासमोरून युद्ध करायचे नाही हि जी भूमिका घेतली आहे ती मागे घेणे म्हणजे पाकिसन साठी सेटबेक आहे.

है दोन्ही पैकी शेवटी कुठल्या भूमिकेवर पाकिस्तानी सेना भर देईल हे पाहणे आवश्यक आहे.

ताजा कलम :

स्टोक मार्केट पडले आहे. काही शेर्स उचला.

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2016 - 11:40 pm | ट्रेड मार्क

आत्तापर्यंत आपण फक्त retaliate करत होतो. स्वतःहून LOC च्या पलीकडे जाऊन हल्ला करून परत येणे याप्रकारची (पाकविरुद्ध) कारवाई युद्ध सोडले तर पहिलीच असावी. जर का अतिरेकी येथे येऊन हल्ला करतात याचा बोभाटा होतो तर आपण केलेल्या कारवाईचा बोभाटा का करू नये?

सुबोध खरे's picture

30 Sep 2016 - 9:51 am | सुबोध खरे

भारतीय सेना अश्या प्रकारचे हल्ले नेहमीच करते.
हे आपल्याला कुणी सांगितले?
hot pursuit --दहशतवाद्याचा पाठलाग करीत सीमा पार जाऊन त्याला कंठस्नान घालणे वेगळे (यात तुमचे सैनिक "चुकून" सीमेच्या पलीकडे गेले असे म्हणता येते.
आणि
surgical strike -- म्हणजे सीमा पार करून पूर्वनियोजित ठिकाणी "ठरवून" एकाच वेळेस सात ठिकाणी हल्ले करणे (येथे शत्रूशी युद्ध करण्याच्या हेतूनेच जाता) या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
तेंव्हा अशा गोष्टी आपण करीतच होतो आणि आता मोदी साहेबानी काही वेगळे केलेच नाही, फक्त बोलबच्चन गिरी केली असे म्हणणे साफ चूक आहे.

अमितदादा's picture

30 Sep 2016 - 10:18 am | अमितदादा

भारतीय सेना अश्या प्रकारचे हल्ले नेहमीच करते. यातील नेहमीच या शब्द चुकीचा आहे, मात्र अश्या घटना ह्याआदी घडलेल्या आहेत. हे पहा माजी लष्करप्रमुख बिक्रम सिंग NDTV बर बोलताना काय म्हणाले ते
Former Army chief General Bikram Singh has told NDTV that India crossed the Line of Control many times in the past but it has never been made public and never at this scale . He complimented the political leadership for sending out a strong message at this time with this move

आता हि बातमी वाचा यात डेटेल मध्ये लिहिलंय कि भारताने ह्याआदी revenge कसे घेतले ते. आर्मी च एकाच धोरण राहील आहे Nothing goes unpunished.

बातमी

अर्थात ह्यावेळचा हल्ला मोठा आणि नियोजनबद होता, मोठी राजकीय इच्छाशक्ती यातून दिसून येते.

अशोक पतिल's picture

29 Sep 2016 - 11:25 pm | अशोक पतिल

श्री गुरुजि नीं अत्यंत प्रगल्भतेने हा लेख लिहलाय, व जसे लेखात लिहलेय तसेच चर्चा टी वी वहीन्यांवर दिसु लागल्याय. तरीही भारतिय सेना व मोदी सरकार ने विचार्पुर्वक हा निर्णय घेतला असेलच , व असेच पुर्वीही १-२ वेळेस अशी कार्रवाही सेनेने केलेली आहे, असे माजी सेनाधिकार्यानीं न्युज च्यनेल वर सागिंतले. पण जनतेचा रोष कमी व्हावा म्हणुन हे जाहिर केले असावे. पण यात पाकिस्तान ची चागंलीच तारांबळ उडालेय, त्याला हल्ला झालाय हे कबुल पण करता येत नाही व नाराजी पण लपवता येत नाही.

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2016 - 11:35 pm | ट्रेड मार्क

भारतीय सैन्याचे व सरकारचे अभिनंदन.

यापूर्वीच्या सरकारांनी आणि मोदींनी पण आत्तापर्यंत सामोपचाराचे धोरण घेतले होते. भेद फक्त इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी वापरला. दंड म्हणून आत्ताची कारवाई एकदम भारी आहे. मोदींनी आत्ता पाकिस्तानची सगळ्या बाजूनी गोची करून ठेवली आहे. एकीकडे बलुचिस्तान, सिंधू प्रदेश वेगळे व्हायला बघत आहेत तर SAARC रद्द झाल्यामुळे जगात नाचक्की झाली. वरून हा हल्ला असा करून ठेवला की पाकड्यांना धड ओरडता पण येणार नाही. बहुतेक गेली २ वर्षे हे करायची तयारी चालू असावी आणि मग उरीचा हल्ला हे एक आयतं कोलीत मिळालं. एवढी मैत्री दाखवणं, गळ्यात गळे घालणं हा शत्रूला गाफील ठेवण्याचा भाग असू शकतो. मोदींचे सततचे परदेश दौरे हे निव्वळ स्थलदर्शन आणि चैन यासाठी नव्हते हे पण बाकी देशांच्या प्रतिक्रियेतून समजून येतंय.

फक्त अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई असून पाक सैन्याचा यात काही संबंध नाही असे सांगितल्यामुळे आता पाक नैतिकदृष्ट्या फारसं काही करू शकेल असं वाटत नाही. परंतु याबरोबरच छुपे हल्ले वाढू शकतील, पाक पुरस्कृत भारतात राहणाऱ्या लोकांकडून अवॉर्ड वापसी सारखे अजून काही कार्यक्रम केले जाऊ शकतील. अर्थात सरकारने याचा आधीच विचार व तयारी केली असेलच.

अभिजीत अवलिया's picture

29 Sep 2016 - 11:53 pm | अभिजीत अवलिया

हे पाऊल उचलून एक चांगला संदेश पाकिस्तानला दिला गेला आहे ह्या बद्दल दुमत नाही.

ह्या अगोदर पण अशा प्रकारची कारवाई केली गेली असेल असे वाटते. फक्त ती आपल्यापर्यंत पोचली नसेल.

विकास's picture

30 Sep 2016 - 12:27 am | विकास

भाईचारा करत बसण्याऐवजी भाईला चारले गेले, ते बरेच झाले! ;)

इल्यूमिनाटस's picture

30 Sep 2016 - 8:40 am | इल्यूमिनाटस

चोरांच्या भडव्यांच्या उलट्या बोंबा
डॉन(DAWN) म्हणतंय की पाकिस्तानने भारताचा एक सैनिक पकडला आणि बरेच मारले!
कधी सुधारणार पाकडे

पैसा's picture

30 Sep 2016 - 10:08 am | पैसा

यापुढेही अशाच कारवाया सुरू ठेवाव्यात. बातम्या नाही आल्या तरी चालेल.

बादवे, आमच्या टॅक्सच्या पैशांवर सैन्य पोसते म्हणणारे कोण होते ते?

नाखु's picture

30 Sep 2016 - 11:15 am | नाखु

बरखा दत्तला भेटून यांना भेटायला गेले आहेत.

ज्ञानामृत घेऊन आले की परत यांच्याबरोबर काश्मीरचा दौरा करणार आहेत.

तोपर्यंत वाट पहाणे आपल्य हाती आहे.

जय हिंद

नाखु

गामा पैलवान's picture

30 Sep 2016 - 12:04 pm | गामा पैलवान

आता लक्ष्य एकंच, ते म्हणजे वराहनगर. रावळपिंडी म्हणजे शंकराचं देऊळ. सोबत विष्णूच्या तिसऱ्या अवताराचं मंदिर बांधलेलं शोभून दिसावं, नाहीका? याला म्हणतात सर्वधर्मसमभाव.

-गा.पै.

तिमा's picture

30 Sep 2016 - 1:20 pm | तिमा

कृपया त्या ५६ इंची छातीचा उल्लेख थांबवा. त्यामुळे मोदी विरोधक आणि भक्त, दोघेही चेकाळतात.

आनन्दिता's picture

30 Sep 2016 - 1:40 pm | आनन्दिता

+१

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2016 - 2:06 pm | श्रीगुरुजी

खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक भारतीय असावा याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. भारतात राहून पाकिस्तानवर प्रेम करणारे व सर्व दोष भारताचाच आहे असे मानणारे सुझन अरंधती रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, महेश भट्ट यांच्यासारखे असंख्य निधर्मांध (निधर्मी मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत) भारतात आहेत.

Modi has become a prisoner of his own image - A war hysteria has gripped India. It has never happened that those who want peace have been so muted.

गामा पैलवान's picture

30 Sep 2016 - 2:14 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

सुझन अरुंधती रॉयवरून हे प्रचि आठवलं :

http://2.bp.blogspot.com/-omRJk8zeC8s/URqLixCWDmI/AAAAAAAACuA/AjqIAEUR4O4/s1600/arundhati-yaseen.jpg

अर्थात, तुम्ही उल्लेखलेल्या लेखाची संगती चटकन लागते हेवेसांन.

आ.न.,
-गा.पै.

पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे. भारतात राहून बडबड करायला खूप सोपे. नाहीतर परवा जाळून मारले गेले त्या किंवा डोकी कापून नेली त्या जवानांच्या घरी जाऊन हे पांडित्य सांगू देत. सरळ शत्रू परवडले.

गॅरी ट्रुमन's picture

6 Oct 2016 - 11:03 am | गॅरी ट्रुमन

पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे. भारतात राहून बडबड करायला खूप सोपे. नाहीतर परवा जाळून मारले गेले त्या किंवा डोकी कापून नेली त्या जवानांच्या घरी जाऊन हे पांडित्य सांगू देत. सरळ शत्रू परवडले.

छ्या!! पैसाताई तुम्ही पण पाकिस्तानी पर्यटनविभागाच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर विभागात सामील झालात की!!

ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

(पाकिस्तानी पर्यटनविभागाच्या प्रमोशन विभागात शाळेपासून कामाला असणारा) ट्रुमन

विकास's picture

30 Sep 2016 - 4:55 pm | विकास

पाकीस्तान आणि पाक माध्यमे कमीअधिक प्रमाणात असा सर्जिकल स्ट्राईक झाला हे मान्य करत आहेत. पण अजूनही कोणिही त्यात सामान्य नागरीक अथवा (२ सोडल्यास) सैनिकांनाच मारले आहे असे म्हणलेले नाही... मग ते मारले ते कुणाला आणि ते कुणाच्या भुमिवर काय करत होते?

सुबोध खरे's picture

30 Sep 2016 - 6:53 pm | सुबोध खरे

What happened in Uri, where 19 Indian soldiers were killed in an alleged militant attack, is condemnable.
हे वाक्य पहा
खिळे मारलेल्या जोड्याने यांचे थोबाड फोडले पाहिजे.
व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घ्यावा?
या १९ हुतात्मा सैनिकांना कोणी मारले कि त्यांनी पण आत्महत्या केल्या? "तथाकथित दहशतवादी हल्ल्यात" म्हणे

http://timesofindia.indiatimes.com/india/4000-soldiers-killed-since-1999... ही बातमी खरी असेल तर २०१२ पर्यंतच १३ वर्षात कारगिलमधले साडेपाचशे आणि त्यानंतर सुमारे ४००० सैनिक आपण गमावले. हजारावर सैनिकानी आत्महत्या केल्या. तर ३ वर्षात २५००० वर सैनिकानी मुदतपूर्व निवृत्ती घेतली.

नंतरच्या चार वर्षातली आकडेवारी मला कुठे बघायला मिळाली नाही. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध न लढता आपले एवढे सैनिक फुकट मरत आहेत. किंवा त्यांना असह्य ताण होतो आहे. या सगळ्याचा हिशेब कोणी कोणाला विचारायचा? तथाकथित मानवतावाद्यांना?? जवळपास दरवर्षी एक कारगिल युद्धाइतकी किंमत आपण युद्ध न करताच मोजतो आहोत. प्रत्येक मरणार्‍या सैनिकाबरोबर देशाचे, सैन्याचे पैशात नुकसान तर होतेच. पण एक एक घर उध्वस्त होत जाते. विचार करणेही असह्य होत आहे. :(

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2016 - 3:24 pm | श्रीगुरुजी

What happened in Uri, where 19 Indian soldiers were killed in an alleged militant attack, is condemnable.
हे वाक्य पहा
खिळे मारलेल्या जोड्याने यांचे थोबाड फोडले पाहिजे.
व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घ्यावा?
या १९ हुतात्मा सैनिकांना कोणी मारले कि त्यांनी पण आत्महत्या केल्या? "तथाकथित दहशतवादी हल्ल्यात" म्हणे

मी पूर्वीच लिहिलेले पुन्हा एकदा सांगतो. पाकिस्तान भारताविरूद्ध ४ वेगवेगळ्या मार्गाने लढत आहे.

१) पाकिस्तानी नेतृत्व - आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने भारतविरोधी प्रचार, चीनशी जवळीक साधून भारताला शह देणे, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, काश्मिरमध्ये सार्वमताची मागणी करणे, अतिरेक्यांना पाकिस्तानात आश्रय देऊन त्यांना सर्व तर्‍हेचा पाठिंबा देण इ. मार्गाने पाकिस्तानी नेतृत्वाच्या भारतविरोधी कारवाया सुरू असतात.

२) पाकिस्तानी लष्कर - भारतावर छुपे हल्ले चढविणे, अतिरेक्यांना सर्व तर्‍हेची प्रत्यक्ष मदत (प्रशिक्षण, शस्त्रे इ.), सीमेवर कायम अशांतता ठेवणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया करीत असते.

३) अतिरेकी संघटना - भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणे व आपल्या संघटनेच्या अतिरक्यांकडून दहशतवादी हल्ले करणे या मार्गाने या संघटना भारतात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात.

४) भारतातील निधर्मांध (तथाकथित निधर्मी, तथाकथित पुरोगामी आणि तथाकथित विचारवंत) - ही मंडळी सातत्याने पाकिस्तानला भेट देऊन पाकिस्तानचे गोडवे गाण्यात मग्न असतात. भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चासत्र आयोजित करणे, भारत-पाकिस्तानमधील संबंधांसाठी दोन्ही देशातील राजकारणीच जबाबदार आहेत व दोन्ही देशातील जनतेला मात्र एकमेकांविषयी खूप प्रेम आहे असा सातत्याने प्रचार करणे, पाकिस्तानातील अतिरेकी संघटना व भारतातील संघ परिवार यांना एकाच मापाने मोजून यांच्यामुळेच दोन्ही देशात अशांतता आहे असा खोटा प्रचार करणे, पीपल-टू-पीपल काँटॅक्ट/कलाकारांची देवाणघेवाण इ. मुळेच दोन्ही देशातील प्रश्न सुटतील असे ठासून सांगणे, काश्मिरींना अधिक स्वायत्तता द्या/तेथील लष्कर काढून दोन्ही देशांच्या सीमा मोकळ्या करा अशा अव्यवहार्य मागण्या करणे, काश्मिरींवरील कथित मानवी हक्क उल्लंघनाबद्दल बोंब मारत फिरणे, भारतीय सैनिक काश्मिरींवर अत्याचार करीत आहेत असा आरडाओरडा करणे, पाकिस्तानी व भारतीय वृत्तपत्रात मोठमोठे लेख लिहून सर्व दोष भारताच्याच माथ्यावर मारणे, अतिरेक्यांबद्दल सहानुभूती व सैनिकांबद्दल तिरस्कार दाखविणे . . . . अशा अनेक मार्गांनी पाकिस्तानला जे आवडेल ते करण्यात मग्न असतात. या मंडळींना पाकिस्तानकडून मोबदला मिळत असावा असा माझा अंदाज आहे. त्याचबरोबरीने अशी भूमिका घेतली तर लगेच विचारवंत, निधर्मी, पुरोगामी असल्याचे प्रमाणपत्र मिंंळून उच्चभ्रूंच्या वर्तुळात प्रवेश मिळतो हा अजून एक जबरदस्त फायदा. चुकुन भारताच्या बाजूने किंवा हिंदूंच्या बाजूने बोलले तर संकुचित विचारांचे, प्रतिगामी, जातीयवादी इ. शिक्के बसण्याची भीति.

यातील सर्वात धोकादायक आहेत ते हे भारतातील निधर्मांध. खाल्ल्या घरचे वासे मोजणारी ही जमात सर्वात आधी नष्ट व्हायला हवी. या यादीतील पहिले ३ जण हे भारताचे उघडउघड शत्रू आहेत आणि ते सीमेपार आहेत. मात्र निधर्मांध ही जमात भारतातच राहून कृतघ्नपणे भारताशी दगाबाजी करीत आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2016 - 2:24 pm | श्रीगुरुजी

हे चित्र पण आठवलं.

Nawaz Sharif with his three daughters. The middle one is eldest and most patriotic....
- Gini Khan

आज देशात सामान्य लोकांमध्ये आणि लष्करात { विशेषतः रिटायर्ड आर्मी प्रोफेशनल्स मध्ये } प्रचंड आक्रोष आहे, कारण आपल्या देशात एक निर्बुद्ध घर भेदी जमात तयार झाली आहे,अशा लोकांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे कारण ते मो़काट सुटले आहेत ! यात जेएनयु पासुन चु केजु येतात, ज्यांना बरळण्या शिवाय काही येत नाही !
काश्मिरात पॅलेट गन वापरल्या बद्धल बराच गारादोळ करण्यात आला, का ? लष्करातील जवानांना तुम्ही दगड मारणार / हिंदुस्थान कि बरबादी तक लढेंगे चे नारे देणार / पाकिस्तान आणि आयएस चे झेंडे लावणार त्या बदल्यात यांना गुलाबाची फुले ध्यायची काय ? मला शक्य झाले असते तर आर्मीवर दगड फेक करणार्‍या प्रत्येकाला पकडुन बोफोर्स तोफेला लावुन उडवुन दिले असते ! पॅलेट गन वापरल्या हे लष्कराने / पोलिसांनी आणि सरकारनी त्यांना मोठी मुभाच दिली आहे असे म्हणीन मी. आंधळे झाले/ लुळे पांगळे झाले ते यांना सहन होत नाही ? कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना अत्यंत यातनामय मॄत्यु देण्यात आला / सौनिकांची मुंडकी कापुन ती भेट म्हणुन नेउन त्यावर इनाम जाहिर केले गेले आणि घेतले गेले तेव्हा या सो कॉल्ड लेफ्टिट्स आणि बुद्धीजीवी मंडळींची वाचा बसली होती काय ?
अतिरेक्यांन बरोबरच या मंडळीचे सुद्धा चांगले सर्जिकल ऑपरेशन झाले पाहिजे... इतकी मजबुत मारली पाहिजे कि देश विरोधी घोषणाच काय पण पुढच्या जन्मी या देशात पैदा व्हायचीच भिती यांच्या मनात बसली पाहिजे !

जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Top Jewish body writes to PM Narendra Modi on Uri attack

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Oct 2016 - 10:08 am | अनिरुद्ध.वैद्य

प्रचंड सहमत!

सद्या कायप्पावर शरीफ कन्येचा एक फोटो फीरतोय. ती कैच्या कै सुंदर आहे या दोघींपेक्षा. पाकीस्तानातल्या सुंदर्‍यांना बघून "पाकीस्तानात वुमन एम्पॉवरमेंट लवकर होउ देरे महाराजा" असे बोलावेसे वाटतेय.

व्हॉट्स अ‍ॅप ढकल साभार.

***ब्रेकिंग न्यूज***

(दै. वर्हाडी वार्ता)
वार्तांकन- xxxxx

"पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले संभाषण लीक"...

टुर्रुक टुर्रुक...टुर्रुक टुर्रुक...

ओबामा- (सकाय सकाय कोन व्हय त का चीन, मी मिशेल हाव म्हनुन ईतले वर्ष संसार टिकून हाय, थे भांडे राहू द्या आधी फोन घ्या कोन मसन्या व्हय त...)
गुपचाप बस न व माय, अअअ ह्यालो!! कोन बोलत हाय?? बराक ओबामा बोलून रायलो...

शरीफ- ह्यालो ह्यालो ह्यालो भाऊ भाऊ भाऊ मी नवाज शरीफ नवाज शरीफ बोलून रायलो इस्लामाबादवरून...भाऊ ह्यालो आवाज येते काय??
(माय बहीन निरे बॉम्ब फोडू फोडू निकाल टावर उडवून देल्ले आता Xट रेंज भेटत नाई)

ओबामा- कोनचा शरीफ?? कोन बोलते??

शरीफ- भाऊ मी नवाज शरीफ बोलतो ना बावा, इतल्या लवकर भुलले काय मले, नीरा मोदी मोदीच करता तुमी...

ओबामा- हं बोल नव्या का म्हनत... का काम हाय??

शरीफ- भाऊ थो मोदी पायना बावा, आमच्या घरात घुसून त्यायच्या लोकायने आमाले बम कुनारल ना...मले अथी सब्बन श्या द्यून रायले...आता शिंदुच पानी बी देत नाई म्हन्ते मंग आता आमी काय GNGT करावं...??

ओबामा- GNGT म्हंजे??

शरीफ- xx गोटा हो...पानीच नाही राहीन त धुवाची कायन आता??

ओबामा- मंग कायले त्याच्या वाटी जाता तुमी?? बहीन मा खाजवाले नखं नाई तुमाले अन त्यायले लपून छपून लिचुंडे घेता...मंग थो मोदी व्हय...त्यानं देल्ली रयपटीत त आता काऊन टेम्बलत??

शरीफ- पन आज परेंत अस झालं नाई न बा, "हम इस हमले की कठोर शब्दो में निंदा करते है" यवढच म्हनत जाय म्याडमचा मानुस... ह्या मोदी त सायचा नीरा अंगावरच यून रायला...चिबीन!!

ओबामा- अबे म्याटा थो जमाना गेला आता पार्टी हायकमांडवाला...तवा सब जमून जाय...आता ह्या पुरा रंगबाज हाय, मलेच त आयकत नाही मंग तू कोन टिप्पूनजी लागून गेला...

शरीफ- पन तुमी काईच बोलले नाई भाऊ त्यायन अंदर घुसून ४० मानस मारले आमचे...

ओबामा- अबे मी काय बोलू?? थ्या सुषमान UNO च्या मीटिंगमध तुम्हाले नंग करू करू झोडपल न...आता निक्काल देश मोदीच्या बाजून हाये...अन का बे सायच्या तुले का गरज होती उरीत तूर पेराची, आता तनकट निंगाल त मी काय करू?? घेन्न खायन अजून चायनिस शेवड्या, मंचुरी अन मोमो...घे अजून चायनाले उरावर...

शरीफ- पन भाऊ आपला दोस्ताना लय जुना हाय...मी हात जोडतो बावा, ह्या मोदी आयकतच नाही ना...

ओबामा- चाsssल नखरे नक्करु जास्त, शिक्कुन रायला का?? मी आता काहीस करू शकत नाही...आमच्या इथय सगडे म्याट झाले मोदीपाई, त्यानं सिनेटमध झुईझप भाषन देलल्यापासून माह्या आचार्यान बीफ, पोर्क सार सोडून देल्ल... निरे दाल तडके खाऊ घालते न माही मुयव्याध उमयली... बायकोय दुपारची कुरड्या-पापड लाटाले लावते...
(हो आलोच हा जान, एक मिनिट)

शरीफ- भाऊ अस नका बोलू न बा, तुमीच अशे बोलले त आमचं कस हुईन, थो मोदी नीरा घुररावून पायते, माह इकडं बीपी वाहाडल...

ओबामा- अबे जाऊन पाय पकड त्याचे, आता युपीये सरकार नाई मोदी सरकार हाय, आता जास्तीचे लाडाकपन ज्यमत नाई भाऊ, टाईम हाय सुधरुन जाय...
(डार्लिंग आलो ना बस कनिक भिजवली हाय, रपरप पोया टाकतो, झुनका भाजतो न लेकरायले ज्यू घालतो, डोन्ट वरी स्वीटहार्ट, लव्ह यु ममम्मुऊऊ)
अबे ठेव फोन सायच्या इकडं माई सर्जिकल स्ट्राईक हुन रायली अन डबल मले फोन कराचा नाई...

शरीफ- पन भाऊ...भाऊ...बराकभाऊ...मी का म्हंतो...

टुsssक...टुsssक...टुsssक...
इस रूट की सभी लाईने व्यस्त है...कृपया थोडी देर बाद ट्राय करे...

(दिलचस्प न्यूज एवं ताजी खबरो के जानकारी के लिये पढते रहीये दै. वर्हाडी वार्ता)

विद्यार्थी's picture

30 Sep 2016 - 10:21 pm | विद्यार्थी

लै भारी!!!

पैसा's picture

30 Sep 2016 - 10:45 pm | पैसा

=))

रेवती's picture

30 Sep 2016 - 11:21 pm | रेवती

हा हा हा.

यशोधरा's picture

1 Oct 2016 - 9:50 am | यशोधरा

=))

नाखु's picture

1 Oct 2016 - 10:11 am | नाखु

सच्चु भारी रे

बांवरे's picture

2 Oct 2016 - 12:53 am | बांवरे

:):) :) =))

तेजस आठवले's picture

30 Sep 2016 - 11:22 pm | तेजस आठवले

लोकमान्य लोकशक्ती असलेल्या दैनिकातील खालील लेख वाचनात आला. सध्या लोकसत्ता वाचणे खूप कमी केले आहे पण भारताच्या कारवाईमुळे अतिशय आनंद झाला आणि मन प्रसन्न झाले होते, म्हणून वृत्तपत्रे चाळत होतो, तेव्हा हे विचारपुष्प हाती लागले.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/amit-shah-congratulates-pm-modi...

‘रॅम्बो‘ कारवाईचे अर्थ आणि परिणाम

‘ब्रँड मोदी’ची पडझड रोखण्यात सफल.

स्वतःची इमेज राखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला असा तर अर्थ ह्यातून काढला जाईल. ह्या वृत्तपत्राचा मोदी विरोध इतका टोकाला पोचला आहे की भारताच्या ह्या कारवाईचा फायदा मोदींनी स्वतःची प्रतिमा उजळवण्याकरता केला असा बेधडक बुद्धिभेद इथे करून टाकला आहे.मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही ह्या गोष्टीचा इथे खुबीने वापर करून घेतला आहे. पाकिस्तान ने आपल्याला इतका त्रास दिला आहे की कोणताही पंतप्रधान असता तरी भारतीय जनतेने हीच प्रतिक्रिया व्यक्त केली असती.इंदिरा गांधींची प्रतिमा बांगलादेश युद्धानंतर कायमची बदलली हे वास्तव आहे. त्यांनी त्या वेळी दाखवलेली धडाडी आणि शौर्य कौतुकास्पदच होते आणि आहे.

देशांतर्गंत अनेक प्रश्नांवरून लक्ष वळविण्यात आणि विरोधकांच्या हातातून अनेक मुद्दे हिसकाविण्यात यश.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीत फायदा करून घेण्याचे मनसुबे. त्यामुळे ५६ इंचाचे गोडवे उत्तर प्रदेशात पुन्हा गायले गेले नाही तर नवलच.

म्हणजे देशांमधले अंतर्गत प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी भारताने हल्ला केले तर! किंवा उत्तर प्रदेश निवडणूक जवळ येत आहेत म्हणून मोदी आणि अमित शहा यांनी हा बनाव रचला ? काय नक्की म्हणायचे तरी काय आहे या लेखकाला? देशात काय अंतर्गत प्रश्न आहेत की ज्यामुळे मोदी सरकार उलटवले जाऊ शकते ? किती ही काही झाले तरी जोपर्यंत 2019 साठी एक सशक्त पर्याय पंतप्रधानपदासाठी उभा राहत नाही तो पर्यंत मला नाही वाटत मोदी सरकार जाऊन दुसरे सरकार येईल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
माझ्या मते तरी हा लेख नेहमीसारखा नथीतून तीर मारण्यासाठी आहे. लाडके संपादक अमेरिकेत निवडणूक कव्हर करायला गेले आहेत, ते तिकडून मोदी विरोधाची परंपरा चालू ठेवणार ही अपेक्षा होतीच, ह्या लेखामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात
(आ) काही किलोमीटर आतवर घुसून
(इ) त्याला पत्ता न लागू देता
(ई) त्याचा पत्ता काटून
(उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि
(ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण...
(अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा
(आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :)

*******************************************

"आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो !

कारण...

अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत.

"हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले.

इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;)

त्याबरोबरच...

आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...
भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)

विकास's picture

1 Oct 2016 - 6:22 pm | विकास

तुम्ही काय बी म्हना!

आम्ही आपलं झोपेचे सोंग घेऊनच राहणार... ;)

गामा पैलवान's picture

1 Oct 2016 - 10:34 pm | गामा पैलवान

लोकहो,

बघा मी म्हणंत होतो ना की आता लक्ष्य वराहनगर हेच असायला पाहिजे. नेमका असाच विचार मजदक दिलशाद बलुच नामक एका बलुची बांधवांच्या नेत्याने व्यक्त केला आहे.

आ.न.,
-गा.पै.

टीप : ज्यांना सनातन प्रभात या वृत्तपत्राचं वावडं आहे त्यांच्यासाठी :- http://www.pudhari.com/news/desh/86207.html

मदनबाण's picture

2 Oct 2016 - 9:43 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore too

पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर द्यायला हव होत.

मोदक's picture

2 Oct 2016 - 12:34 pm | मोदक

__/\__

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Oct 2016 - 10:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

__/\__

गॅरी ट्रुमन's picture

6 Oct 2016 - 10:41 am | गॅरी ट्रुमन

चळवळीच्या नेत्यावरून चळवळीतील अनुयायी, समर्थक आणि कार्यकर्ते यांची पारख करता येते. असल्या चळवळीतील/आंदोलनातील जवळपास सगळेच लोक माझ्यासारख्या अनेकांच्या डोक्याला शॉट कित्येक वर्षांपासून लावत आलेले आहेत.ज्यांना ही गोष्ट अनुभवायला लागली नव्हती त्यांनाही हे आता लक्षात येईल. पाटकरबाईंनी हे वक्तव्य उघडपणे केले हे एक चांगले झाले. असल्या फडतूस माणसांची जी काही विश्वासार्हता शिल्लक होती ती पण धुळीस मिळाली आहे आणि भविष्यात असल्यांच्या बडबडीला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2016 - 12:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

आता पलिकडे जाऊन दहशतवाद्यांना अन पाकी फौजेला दे माय धरणी ठाय करुन सोडणा-या भारतीय स्पेशल फोर्सेस बद्दल एक अतिशय जबरदस्त विडीयो, ही माणसे काय कोटीचं प्रशिक्षण घेतात हे पाहुन छाती दडपुन जाते १४ तासात १०० किमी रनिंग वगैरे भयानक प्रकार असतात ह्या प्रशिक्षणात. जरुर आनंद घ्या (?) ह्या विडीयोचा.

विकास's picture

2 Oct 2016 - 6:27 pm | विकास

धन्यवाद! सगळा बघितला नाही, पण जबरा आहे हे जे काही पाहीले त्यावरून समजले!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2016 - 10:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

पुर्ण पहावात ही आग्रहाची विनंती!

गामा पैलवान's picture

3 Oct 2016 - 12:22 am | गामा पैलवान

सोन्याबापु,

काय भयंकर प्रशिक्षण आहे ह्यांचं. हे शेवटी जिवंत कसे राहतात! असं वाटतं की कुठल्याश्या फालतू दहशतवाद्यांना पाणी पाजणं काहीच नाही, पण या प्रशिक्षणात यशस्वी होणं म्हणजे अनेकअग्निदिव्ये पार करणं आहे. शेवटची १०० किमीची म्यारेथॉन म्हणजे भेजा कवटीतनं गळून तोंडात उतरण्याची खात्री.

आ.न.,
-गा.पै.

प्रीत-मोहर's picture

3 Oct 2016 - 10:17 pm | प्रीत-मोहर

कारतुस सर, अरुणिमा मॅम आणि आता हा विडियो कधीच हार मानु देणार नाही मला.

धन्यवाद बापुसाहेब

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Oct 2016 - 10:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

बघावा लागेल. सध्या बूकमार्क करुन ठेवतोय.
धन्यवाद देवा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Oct 2016 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे

या दिव्यातून तावूनसुलाखून बाहेर पडणार्‍या कमांडोंना कडक सॅल्युट !!!

खटपट्या's picture

4 Oct 2016 - 3:39 am | खटपट्या

बाबौ, काय लोक हैत. एक माणूस १०० च्या बरोबरीचा झालाय. या लोकांचे ट्रेनींग फुकट नाही गेले पाहीजे. जबरदस्त लोक हैत.

अर्धवटराव's picture

4 Oct 2016 - 6:09 am | अर्धवटराव

भोवळ आली हे सगळं बघुन :)

हे ट्रेनींग तर काहि महिने चालेल. पण हि कमावलेली शारीरीक क्षमता त्यानंतर किती महिने टिकेल? कि वरचेवर परत ट्रेनींग घ्यायला लागतं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Oct 2016 - 7:20 am | कैलासवासी सोन्याबापु

ट्रेनिंग संपले कि लगेच काउंटर इंसर्जन्सी ऑप्स मध्ये काम सुरु होते काश्मीरात नाही तर नॉर्थ ईस्ट मध्ये, तिकडे ट्रेनिंग कायमच फ्रेश राहते, नाहीतर काही काही वर्षांनी आठवड्याचा किंवा महिन्याचा रिफ्रेशर कोर्स वगैरे असतातच कायम सुरु.

विशुमित's picture

4 Oct 2016 - 11:05 am | विशुमित

त्रैमासिक बी पी इ टी(Battle Physical Efficiency Test) पास झाल्या शिवाय सुट्टीला जात येत नाही सैनिकांना...!! त्यामुळे "Sharpen the Saw " हे सतत चालतच असतं.

अर्धवटराव's picture

5 Oct 2016 - 12:02 am | अर्धवटराव

आणि त्यांना मॉनिटरी कंपन्सेशन किती मिळतं ??

माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे पॅराट्रूपरला ६०००/- रुपये महिना (पगाराच्या व्यतिरिक्त) भत्ता मिळतो आणि स्पेशल फोर्स चा भत्ता ९०००/- रुपये महिना मिळतो. त्यातुन हे लोक बहुतांश वेळा फिल्ड म्हणजे सीमावर्ती किंवा कठीण ठिकाणी कार्यरत असतात तेथे मिळणारा फिल्ड अलाउन्स ५०००/- महिना असे जास्तीत जास्त रुपये २०,०००/- महिना पगारा व्यतिरिक्त मिळतात.
त्यांच्या खतरनाक कामासाठी मिळणारी ही आर्थिक भरपाई अत्यंत तुटपुंजी असते.
माझा एक वर्गमित्र आर्मीत सर्जन असून त्याने एम एस नंतर टाटा मेमोरियल मधून कर्करोगाच्या शल्यक्रियेचे प्रगत असे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याच्या शल्यक्रियेच्या एवढ्या प्रगत प्रशिक्षणामुळे त्याने जरबाहेर व्यवसाय केला तर त्याला एक शल्यक्रियेचे जितके पैसे मिळतात तेवढे पैसे त्याला एक महिन्याला (स्वतःच्या) जीवावर उदार होऊन लढण्यासाठी सरकारकडून मानधन म्हणून मिळतात. हा लष्कराचा पॅराट्रूपर असून त्याने स्पेशल फोर्सचे प्रशिक्षण घेतलेले आहे. यानंतर त्याने नौदलाच्या IMSF कमांडोबरोबर नाविक कमांडोचेही प्रशिक्षण घेतलेले आहे.
त्याला हे ( भावनेच्या भरात न जाता कोरड्या वस्तुस्थितीबद्दल) स्पष्ट विचारले असताना तो म्हणाला कमांडो कधीच पैशाकडे पाहून येथे येत नाहीत. एक तर आयुष्यात देशासाठी काहीतरी वेगळे करण्याची आग "आतून" असल्याशिवाय माणूस कमांडो बनू शकत नाही. अर्ध आयुष्य जंगलात आणि बर्फाळलेल्या प्रदेशात घालवायची नाही तर कुणाला हौस असते?
मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. अरिहंत किंवा अरिदमन या अणुपाणबुड्यांवर लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात किंवा इसरो तील शास्त्रज्ञ सरकार कोणताही अधिक पैसे देणार नसताना तहान भूक बाजूला ठेवून काम का करतात? हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2016 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.
+१,००,०००

स्वयंकेंद्रित लोकांचे जग "मी, माझा पैसा, माझे हितसंबंध व माझी सोय" या पलिकडे जात नाही. लोकशाहीत अश्या लोकांना यापेक्षा जास्त विचार करण्याची सक्ती अथवा गरज असू शकत नाही... किंबहुना लोकशाहीच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन व्यक्ती/विचार/उच्चार-स्वातंत्र्याच्या नावाखाली कांगावा करून लोकशाहीवर बेमुर्वत टीका करायचीही परवानगी त्यांना लोकशाहीत असते.

लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे.

मदनबाण's picture

5 Oct 2016 - 1:34 pm | मदनबाण

लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे.
यामुळेच काही लोकांना वाटेल ते बरळण्याचे धाडस करता येते आणि स्वातंत्र्य देखील मिळते !
वरती मी एका प्रतिसादात एका कंमांडो ट्रेनरचा व्हिडियो दिला आहे, त्यांची माहिती त्यांच्याच संकेत स्थळावर वाचली होती त्याचा दुवा इथे देतो :-
http://www.shifuji.in/about-grandmaster-shifuji.php
बाकी देशात मोकाट सुटलेल्या निर्बुद्ध वाचाळ मंडळींचा सगळ्यात जास्त राग या कंमांडो ट्रेनरला सुद्धा येतो. यांचा तू-नळीवर प्रचंड शिवराळ आणि खुन्नसने भरलेला व्हिडियो ऑलरेडी व्हायरल आहे. मला सुद्धा पहिल्यांदा ती क्लिप झेपली नव्हती,पण
आर्मीच्या कारवाईवर अविश्वास दाखवणारी आणि पर्यायाने जवानांचे मानसिक खच्चीकरण करणारी वक्तव्ये पाहिल्यावर कंमाडो ट्रेनरच्या शिवराळपणाचे खरे कारण परत एकदा नव्याने समजुन आले आणि वाचाळ मंडळींसाठी अशीच भाषा योग्य आहे हे देखील पटले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record

विकास's picture

5 Oct 2016 - 9:35 pm | विकास

मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. अरिहंत किंवा अरिदमन या अणुपाणबुड्यांवर लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात किंवा इसरो तील शास्त्रज्ञ सरकार कोणताही अधिक पैसे देणार नसताना तहान भूक बाजूला ठेवून काम का करतात? हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.

१००% सहमत! (डोळ्यांवरचे झापड बाजूला करणार्‍या) माहीतीबद्दल धन्यवाद!

अवांतर आहे या धाग्यावर पण :

लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात

माझ्यामते हे देशप्रेम संसर्गजन्य आहे (चांगल्या अर्थाने).
तुमचा प्रतिसाद वाचून मला माझ्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. आमच्या कंपनीचा एक हार्डवेअर इंजिनिअर लग्नानिमित्त सुट्टीवर जाणार असल्याने मला विशाखापट्टणच्या नौदलाच्या डॉकयार्डवर एक महिना काम करण्याची संधी मिळाली होती.

नौदलाची साईट असल्यामुळे मला अगोदरच कंपनीतल्या लोकांनी घाबरवून सोडले होते. तिथली शिस्त, कडक अधिकारी आणि चुकीला माफी नाही या ब्रीदामुळे मी तेथे काम करु शकेल की नाही याबद्द्ल मला शंकाच होती. मात्र मी नुकताच कंपनीत रुजु झाल्यामुळे नाही म्हणण्याचा पर्याय माझ्याकडे नव्हता.

पहिल्या दिवशीच साईटवर पोहोचताच मला बघून तिथला साहेब अगोदरच्या इंजिनिअर वर ओरडला. माझ्याकडे बघून मी इथे काम करु शकणार नाही अशी शंका त्याला आली. मात्र दोन तीन दिवसातच मी त्यांच्या अविश्वासाचे रुपांतर माझ्यावरील विश्वासात करुन घेतले. नंतर ऑफीसमधील अधिकार्‍यांची इतकी मर्जी बसली की एक महिन्यानंतर जुना इंजिनिअर आला तरी मला दोन-तीन दिवस जास्त थांबवून घेतले.

काम करत असताना कधी कधी संगणकाची रॅम, सिपीयु, कॅबीनेटचे स्क्रु इ. कधी कधी खिशात राहत ते संध्याकाळी घरी जाताना व्यवस्थित काढून ठेवावे लागत. कधी चुकून विसरलो तर चोरीचा कलंक लागायची शक्यता. सरकारी ठिकाणी चोरीचा आळ आला की मग लंबी छुट्टी. त्यामुळे फारच काळजी घ्यावी लागायची. ऑफीसात वेळेनंतर थांबायला बंदी होती. क्लासीफाईड एरीयाकडे फिरकायची बंदी होती.

तर त्या वातावरणात मला देखील शिस्तपालनाची सवय लागली. नौदलाचे शुभ्र गणवेशातील अधिकार्‍यांकडे पाहून एकदम ग्रेट वाटायचे. आपण असे बनू शकलो नाही याची खंत देखील कधी कधी वाटायची.

दिवसभर काम आणि सुट्टीच्या दिवशी विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी जुन्या पाणबुडीचे संग्रहाल्य बनविले आहे तिला भेट देणे हा माझा महिनाभराचा कार्यक्रम होता.

त्या एक महिन्याने मला आयुष्यभर पुरणार्‍या चांगल्या आठवणी दिल्या. देशाची सेवा करणार्‍यांची पैसे घेऊन का होईना पण सेवा करायचा मला संधी मिळाली याबद्द्ल मी एल अँड टी चा कायम आभारी आहे.

देशाची सेवा करणार्‍यांची पैसे घेऊन का होईना पण सेवा करायचा मला संधी मिळाली.
मुटके साहेब
आपला देश इतका गरीब नाही. कोणीही विनावेतन काम करावे अशीही गरज नाही.
नागरिकांनी आपल्या श्रमाचा उत्तम मोबदला घेऊन आपले काम व्यवस्थित केले "तरच" ती एक उत्तम देशसेवा होईल.
केवळ लष्करात गेले म्हणजेच देशसेवा असे मुळीसुद्धा नाही.

अर्धवटराव's picture

5 Oct 2016 - 11:38 pm | अर्धवटराव

और कुछ कहनेकि जरुरत नहि अब.

हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.

मला स्वतःला देखील हे कधि कळेल असं वाटत नाहि :( म्हणुनच फक्त _/\_

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Oct 2016 - 1:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

बाकी

मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही.

ही जमात खुप वाढायला लागलीय आज काल. आमच्या हापिसातपण असलं काही बरळणारी डोकी दिसलीत.

बांवरे's picture

4 Oct 2016 - 10:32 am | बांवरे

अबबबब !!!

स्पार्टाकस's picture

6 Oct 2016 - 12:12 am | स्पार्टाकस

बापू,

ह्या व्हिडीओबद्दल शतशः आभार!
सैनिकांच्या शारिरीक क्षमतेला सलाम!

बाई,
भारताने अहिंसक मार्गानेच उत्तर दिलेय. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकीस्तान प्रायोजित अतिरेक्यांचे बौद्धीक घ्यावे ह्या उदात्त हेतुने एका ध्यान शिबिराचे आयोजन केले होते. वेळ मुद्दाम रात्र ते पहाटेच्या दरम्यानची निवडली होती. कारण ह्या वेळेत जगातील सर्व कोलाहल थांबलेला असतो. ध्यानधारणा, वैचारिक मंथनास हाच कालावधी योग्य असतो. भारतीय अधिकार्‍यांनी पाकीस्तानात जाऊन हे शिबिर घ्यायचे ठरविले होते कारण शांततेला कोणताही धर्म नसतो. तसेच हे विश्वची आपुले घर अशी धारणा असणार्‍यांनी मानवनिर्मित सीमा लक्षात घ्यायचे काय कारण ?

ठरलेल्या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय ध्यानविद्येच्या शिल्पकारांनी पवित्र देशात जाऊन मार्ग भटकलेल्या जीवांना धर्मोपदेश केला. तुमचा मार्ग कसा चुकीचा आहे हे समजावून सांगताच पतीत झालेल्या देवाच्या लेकरांच्या लक्षात त्यांच्या चुका आल्या आणि त्यानी आपण केलेल्या पापांचे प्रायशित्त म्हणून देहत्याग करायचे ठरविले.

आत्मा हा अजर अमर आहे, त्याला शस्त्र मारु शकत नाही, अग्नी जाळु शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. ह्या वचनास जागून त्यांनी फक्त आपली नश्वर शरीरे त्यागली आणि 'अखेरचा हा तुला दंडवत", "आता कैसे येणे जाणे", "आम्ही जातो आपल्या गावा, अमुचा रामराम घ्यावा" असे अभंग म्हणत ते पददलित निजधामास निघून गेले.

तेव्हा पाटकर मॅडम, विथ ड्यु रिस्पेक्ट फॉर ऑल युवर वर्क, आम्ही आपणांस विनंती करतो की माध्यमांतून आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने अहिंसेचे पालन करुया. अहिंसो परमो धर्म.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2016 - 1:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

"आता कैसे येणे जाणे"

महाप्रचंड लोल वारल्या गेलो आहे =))

प्रीत-मोहर's picture

2 Oct 2016 - 2:59 pm | प्रीत-मोहर

हा हा हा +११

चौकटराजा's picture

2 Oct 2016 - 1:32 pm | चौकटराजा

आपला एकही सैनिक न मारता निष्पापाना मारणार्या धर्मांधाना उधवस्त करणे ही अहिंसाच आहे. जय गांधी जयंति !

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2016 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमी पाकिस्तानी बाजू समजावून घेणार्‍या पीसनिक्सनी आताही "सर्जिकल स्ट्राईक्स झालेच नाहीत" हे पाकिस्तानचे म्हणणे खरे मानून भारतिय सरकारला उगाचच दोष देऊ नये...

...नाहीतर "पाकिस्तान खोटे बोलत आहे" असे म्हटल्याचे पाप त्यांच्या माथी लागेल. बघा बुवा ! ;) =))

lakhu risbud's picture

2 Oct 2016 - 3:42 pm | lakhu risbud

आजच्या गांधीजयंतीचा मिपा वरील "प्रतिसाद ऑफ द डे" असा पुरस्कार या प्रतिसादाला देण्यात यावा.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2016 - 7:48 am | टवाळ कार्टा

मिपा इतिहासातला एक अजरामर प्रतिसाद आहे हा, जियो

सही रे सई's picture

6 Oct 2016 - 8:45 pm | सही रे सई

हजार दंडवत घ्या राजे या प्रतिसादासाठी.

संदीप डांगे's picture

2 Oct 2016 - 4:03 pm | संदीप डांगे

कोण पाटकर बाई?

दिगोचि's picture

4 Oct 2016 - 4:15 pm | दिगोचि

मेधा पाटकर.

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Oct 2016 - 10:59 pm | अनिरुद्ध.वैद्य

आपण जरी सिंधु करार मोडला नाही तरी ब्रह्मपुत्रेच पाणी चीन वळवणारच. ड्रॅगनची भुक जबरदस्त आहे अन ब्रह्मपुत्रा नदीचं खोर जलविद्युतनिर्मीतीसाठी प्रचंड अनुकुल आहे.

पाकिस्तानचा अँगलतर असणारच. पुर्व पश्चीम आपण मस्त अडकलोय.

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2016 - 2:49 pm | श्रीगुरुजी

तिसरे महायुद्ध चीन विरूद्ध इतर सर्व असे होईल असे वाटते व ते भारताच्या भूमीवर व भारतीय उपखंडात होईल. चीनची भूक जबरदस्त आहे. चीन अत्यंत विस्तारवादी व साम्राज्यवादी आहे. तैवान हा आपलाच भाग आहे हा चीनचा दावा आहे. भारतातील अरूणाचल प्रदेशावरही चीन हक्क सांगत आहे. चीनचे तिबेट यापूर्वीच गिळंकृत केलेला आहे. चीन इतर देशांच्या तुलनेत अत्यंत बलाढ्य आहे. अमेरिका सुद्धा चीनला दडपून वागत असावी. पाकिस्तानने मूर्खपणा करून काश्मिरचा आपल्या ताब्यात घेतलेला काही भूभाग परस्पर चीनला देऊन टाकलेला आहे. भविष्यात चीन संपुर्ण पाकिस्तान गिळंकृत करू शकेल.

दक्षिण चीन समुद्रावर चीनने आधीच हक्क सांगितला असून तिथे एक कृत्रिम बेट बांधले आहे. त्यामुळे जपान, तैवान, फिलिपिन्स इ. देश अस्वस्थ आहेत. चीनच्या तुलनेत हे देश अत्यंत दुर्बळ असल्याने ते निषेध नोंदविण्यापलिकडे फार काही करू शकत नाहीत. व्हिएटनाम व चीनचे संबंध बरे नाहीत. १९७८ मध्ये दोन्ही देशात युद्ध झाले होते व त्यावेळी शूर व्हिएटनामी सैनिकांनी प्राणपणाने चीनला प्रतिकार केला होता. भारताला अधूनमधून थपडा मारून चीन भारताला कायम नर्व्हस ठेवत असतो. भविष्यात चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला चीनबरोबर युद्धात उतरावेच लागेल. त्यासाठी अमेरिकेला भारत, जपान, फिलिपिन्स, तैवान, व्हिएटनाम इ. देशांची मदत घ्यावी लागेल. चीन अत्यंत तुल्यबळ असल्याने या युद्धात सर्वांचेच जबर नुकसान होईल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Oct 2016 - 7:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो!

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2016 - 8:15 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

3 Oct 2016 - 8:15 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

3 Oct 2016 - 8:15 pm | श्रीगुरुजी

काय सांगताय! मग चहा द्या बुवा.
::)

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Oct 2016 - 5:34 pm | अनिरुद्ध.वैद्य

..???

पाकिस्तान चीनचे पुढचे भक्ष्य आहे हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. भारत आणि चीन संबंधांची यापुढील काळात कसोटी लागणार आहे असे दिसते.

सचु कुळकर्णी's picture

4 Oct 2016 - 12:29 am | सचु कुळकर्णी

सांगीतल्या जाणारा आकडा ३८ ते ४० .
वास्तवात तीथे आपल्या Para SF ने जे मारलय ना घरात घुसुन...कल्पने पलीकडचा आकडा आहे बॉस..ब्रेव्हो ब्रेव्हो.

श्रीगुरुजी's picture

4 Oct 2016 - 2:48 pm | श्रीगुरुजी

काँग्रेसच्या वाचाळ संजय निरूपमने सर्जिकल स्ट्राईक झालाच नसून केंद्र सरकार राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवित असल्याचे सांगितले आहे. केजरीवाल व निरूपम या दोघांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या इतर सर्व नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल शंका उपस्थित न करता सैन्याचे व केंद्राचे अभिनंदन केले आहे. एकंदरीत ही काँग्रेसची दुहेरी स्ट्रॅटेजी दिसते. एकीकडे सैन्याचे अभिनंदन करायचे, केंद्राला पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे निरूपमसारख्या वाचाळांकडून सर्जिकल स्ट्राईल झालाच नव्हता असे पसरवून केंद्र सरकार व सैन्याबद्दल शंका उपस्थित करून केंद्राला त्याचा राजकीय लाभ न मिळता सरकारबद्दल संशय निर्माण करायचा.

सर्जिकल स्ट्राईकची माहिती सर्वात प्रथम सरकारने न देता सैन्याधिकारींनी दिली होती. केंद्र सरकारच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा जिंगोइझम व युफोरिया न दाखविता संयमित प्रतिक्रिया दिली आहे. मागील सरकारला देखील हिणविण्याचे टाळले आहे. म्हणजे राजकीय लाभ उठविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने फारसे काही केलेले नाही. निरूपमच्या म्हणण्यानुसार सैन्य खोटे बोलत आहे. परंतु आपले २ सैनिक मारले गेले व ९ जखमी झाले असे पाकिस्तानने अधिकृतरित्या मान्य केले आहे. म्हणजे ५० अतिरेकी मारल्याचा भारताचा दावा कदाचित अवास्तव मानला तरी काही स्वरूपाचा हल्ला झाला असणार हे नक्की. पाकिस्तान फक्त २ सैनिक मारले गेल्याचे कबूल करतो त्याअर्थी २ पेक्षा बरेच जास्त सैनिक मारले गेले असावेत. म्हणजे कोणत्या तरी स्वरूपाचा हल्ला भारताने केला व त्यात २ ते ५० च्या दरम्यान पाकडे सैनिक/अतिरेकी मारले गेले हे पण नक्की.

असो. पुढील सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी सैन्याने निरूपम व केजरीवालांना प्रत्यक्ष साक्षीदार या नात्याने बरोबर न्यावे. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतातील काही जणांच्या बुडाला आग लागली आहे हे मात्र नक्की.

चौकटराजा's picture

4 Oct 2016 - 5:29 pm | चौकटराजा

भारतीय सैन्याने कधीही राजकारणात लुडबूड केल्याचे पुरावे केजरीवाल व संजय निरूपम यांचे कडे असतील तर ते त्यानी द्यावे नाहीतर....... देशद्द्रोही असल्याचा खटला या दोघांवर भरता येइइल काय याचा पाठपुरावा सर्व निवृत्त सरन्यायाधीशानी करावा॑.

मदनबाण's picture

4 Oct 2016 - 5:38 pm | मदनबाण

केजरीवाल व संजय निरूपम
या दोघांनाही सर्जिकल ऑपरेशन बद्धल फार शंका आणि उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे. लष्कराने गुपचुप १- १ कंमांडो एका रात्री यांच्या घरी पाठवुन ध्यावा { १च बास यांना } दुसर्‍या दिवशी हे स्वतःहुन पाकिस्तानला सांगतील... अरे गलती से भी बॉर्डर क्रॉस करके इधर किसिको मत भेजना !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

lakhu risbud's picture

6 Oct 2016 - 12:15 pm | lakhu risbud

Aam Admi Party lead by Arvind Kejwariwal & Indian National Congress lead by R.R.Gandhi are working very hard to give NDA lead by BJP a 400+ mandate in 2019 Loksabha elections.

सगळ्या तथाकथित शांतीप्रीय आणि [लघु/दीर्घ]शंकावाद्यांना हे एक मस्त उत्तर आहे -

http://zeenews.india.com/news/india/major-gaurav-arya-writes-open-letter...

हे वाचून व्हॉट्सअ‍ॅप वरचा एक मॅसेज आठवतो -
"कधी कधी केवळ सांगून काही फरक पडत नाही.. कानफट्टात सुद्धा द्यावीच लागते."

रॉजरमूर's picture

5 Oct 2016 - 2:40 am | रॉजरमूर

काल एका कार्यक्रमात ओम पुरी ने जे अकलेचे तारे तोडले आहेत ते अतिशय संताप आणणारे होते .
काही चिल्लर पाकिस्तानी रुपड्यांकरता हा आपल्या सैन्याला शिव्या घालत आहे .
कारण का तर हा एका पाकी चित्रपटात काम करत आहे .
हे असले लोकं जर भारतात असतील तर भारताला शत्रूची गरजच काय ?

https://youtu.be/03M__i9Tbqo?t=1s ही त्या कार्यक्रमाची लिंक

स्वप्निल रेडकर's picture

6 Oct 2016 - 11:12 am | स्वप्निल रेडकर

मला समजत नाहीय कि आता काँग्रेसचे प्रतिनिधी सांगताहेत कि त्यांच्या कारकिर्दीत पण असे सर्जिकल स्ट्राईक्स झाले ते पण जास्त इंटेंसिटी चे झाले होते.तेव्हा तर त्यांनी कसलेही प्रूफस दिले नाहीत आणि आता तोंड वर करून पुरावे कसले मागताहेत ?
म्हणजे आता पहिल्यांदा त्यांच्याकडून पुरावे मागितले पाहिजेत मग आम्ही देऊ असं भाजप गव्हर्नमेंट ने सांगायला हरकत नाही. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2016 - 1:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे पाकिस्तानने दिलेले पुरावे...

१. पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍यावर केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघड केलेले सर्जिकल स्ट्राईक्सचे तपशील...

Pakistan army caught by surprise, lost 5 men: PoK cop reveals in sting operation

२. पाकिस्तानी "डॉन" वर्तमानपत्राने जाहीर केलेले पकिस्तान शासन आणि सैन्यदलातले बदललेले नाते व त्यांच्या संयुक्त सभांमधिल चर्चेचे तपशिल...

In extraordinary development, Pak's Nawaz Sharif govt orders Army to act against terrorists, Dawn reports

सर्वच बातमी माहितीने भरलेली आहे. पण, त्यातले खालचे वाक्य आंतरराष्ट्रिय राजकारणच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे...

In addition, Chaudhry said that Chinese authorities have conveyed their willingness to keep putting on technical hold a UN ban on Jaish-e-Mohammad leader Masood Azhar, but they have questioned the logic of doing so repeatedly.

मदनबाण's picture

6 Oct 2016 - 3:20 pm | मदनबाण

इतके दिवस फिलिपाईन्स अमेरिकेची आय माय काढत होता आणि चीन आणि रशियाकडुन शस्त्रे घेउ असे आता म्हणु लागला आहे. यात आता पाकड्यांची भर पडली !

संदर्भ :- 'Pakistan would move towards China, Russia as US is declining power'

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2016 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे पण "पोश्चरिंग" आहे !

पाकिस्तानमधले लुंटरसुंटर कर्नल्सही वाघाच्या आवेशात अणूबॉंबच्या धमक्या देत होते, आता त्यातला अणूबॉंबमधला अ सुद्धा अस्पष्ट झाला आहे ;)

आताही सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर दोन्ही शरिफांनी अंकल सॅमची बाही पकडली होती. चीन अमेरिकेपेक्षा मोठा "पाऊंड ऑफ फ्लेश" वसूल केल्याशिवाय मदत करणार नाही हे न ओळखण्याइतके पाकिस्तानी शासक व जनरल्स खुळे नाहीत. याशिवाय, पाकिस्तानी शासक व जनरल्सच्या करोडो डॉलर्सच्या गुंतवणूका अमेरिकेत आहेत... त्या "फ्रिझ करू अशी अफवा" उडाली तरी त्यांना दे माय धरणी ठाय होईल ! :)

नुकताच पाकिस्तानबरोबर सराव (तो ही भारताच्या अमेरिकेकडे झुकावाविरुद्ध पोश्चरिंग होता) केला असला तरी सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात रशियाचे निवेदन भारताच्या बाजूने झुकणारे आहे.