कास पठार - टोपली कारवी ने बहरले !!!

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
24 Sep 2016 - 3:09 pm

भटकंती दिनांक : 23/09/2016
कुठून आणि कसे : पुण्यावरून बाईक ने सकाळी 7 ला निघालो परत घरी संध्याकाळी 5 ला पोहोचलो.

कास पठार बद्दल सर्वानाच माहिती आहे. त्यात नवीन सांगण्यासारखे काही नाही. तुमच्या पैकी काही जण दोन ते तीन वेळा तरी जाऊन आले असतील. पण माझी हि पहिलेच वेळ होती. टी. वि वरील सारख्या त्याच त्याच बातम्या बघून (कास पठार बहरले, कास पठार फुलले) म्हटलं चला आपण एकदा तरी जाऊन यावं.

तिथे गेल्यावर काही गोष्टी खटकल्या त्या इथे नमूद करत आहे.
1) पार्किंग व्यवस्था चुकीच्या ठिकाणी आहे. पार्किंग हे प्रवेश करताना गेट जवळ पाहिजे होते. पण ह्यांचे पार्किंग पार पुढे कास पठार संपल्यावर उतारावर आहे. गाडी पार्क करून पुन्हा माघारी यावे लागते. चार चाकी वाल्यांचे ठीक आहे. फक्त ड्रायवर ला माघारी यावे लागते. निदान बाईक वाल्यांसाठी तरी गेटवर सोय करायला पाहिजे होती. फुकटची 2 ते 3 किमी पायपीट करावी लागली. त्यातच टाइम गेला.

2) कोणत्या फुलाला मराठीत काय नाव आहे किंवा इंग्लिश मध्ये काय म्हणतात. अश्या पाट्या कुठेच दिसल्या नाहीत. बहुतेक लोकं येणाऱ्या जाणाऱ्या दुसऱ्या लोकांना विचारत होती. गाईड घ्यावा त्तर तो पण शाळेतील मुलांना मार्गदर्शन करत होता. सर्वात जास्त बहर "टोपली कारवी" ला होता. त्यामुळे ते नाव सर्वानाच माहित पडले. पण बाकीच्या दुर्मिळ फुलांचे काय? ते लोकांना कोण सांगणार.

3) गेट वरतीच नकाशा लावलेला आहे. त्यात 3 ट्रेल दाखवले आहेत. जे आपणास पूर्ण करावयाचे असतात. पण हे त्यात नमूद नाही कि, कोणती फुले कोणत्या ट्रेल मध्ये बहरली आहेत. संपूर्ण 3 हि ट्रेल फिरायचे म्हणजे खूप टाइम लागतो. कारण ते कि.मी च्या अंतरामध्ये आहेत. जवळ जवळ नाहीत. पांढरी फुलांचा (गेंद फुल) बहर आम्हाला बघायचा होता. पण कोणत्या भागात आहेत हे माहिती नव्हते. तरी खूप शोधले सापडले नाही. तेथील दोन कर्मचाऱ्यांना पण विचारले तर त्यांनी वेगवेगली उत्तरे दिली.

४) कास पठारावरील दरामध्ये पण वाढ करण्यात आली आहे. इतर दिवशी प्रत्येकी 50 रुपये आणि शनिवार, रविवार 100 रुपये. पार्किंग साठी 10 रुपये. चार चाकी साठी माहित नाही शक्यतो 40 रुपये असावे.

तरी पण कास पठाराने आम्हाला निराश केले नाही. खूपच सुंदर फुले पाहावयास मिळाली. अजून एक गोष्ट कळाली कि, कास पठारावर याच महिन्यात फुले येत नाहीत. प्रत्येक फुलाचा उमलण्याच्या काळ वेग वेगळा असतो. गेंद नावाचे फुल ऑगस्ट पासूनच उमलण्यास सुरु झाले होते. आता इथून पुढे टोपली कारवी संपून कावळा नावाची फुलं उमलण्यास सुरुवात होईल. ती पिवळ्या रंगाची असतात. तसेच एप्रिल महिन्यात पण कोणत्या तरी प्रकारची फुले येतात. जास्त माहिती कळू शकली नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नकाशा ::


संपूर्ण कास पठार फिरायचे असेल तर तिन्ही ट्रेल फिरावे. त्यासाठी वेळ जास्त काढून यावा. फिरणे आणि निरीक्षणा साठी खूप वेळ लागतो.

Pleocaulus Ritchiei (टोपली कारवी) :

उलटी टाकलेली हिरवीगार टोपली म्हणजे टोपली कारवी. बांबुपासून बनवलेली हिरवीगार टोपली ज्याप्रमाणे उलटी टाकली की दिसते त्याप्रमाणे टोपली कारवी दिसते.
टोपली कारवी गुच्छात येणारी वनस्पती आहे. रानगव्याला टोपली कारवीची पानं खायला आवडतात. सध्या ही फुले पठारावर उमलू लागली आहेत. महत्वाचे म्हणजे 7 वर्ष्यानंतर हिला फुले येतात.

Smithia Hirsuta (कावळा)

Pogostemon Deccanensis (जांभळी मंजिरी)

Murdannia Lanuginosa


Murdannia Lanuginosa

गेंद फुल


गेंद फुल

Impatiens Lawii (तेरडा)


Impatiens Lawii (तेरडा)

इतर फुले :

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Sep 2016 - 3:57 pm | माम्लेदारचा पन्खा

फोटो फारच सुंदर आहेत....

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2016 - 7:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फुले, सुंदर फोटो !

फोटो छान आहेत. आवडले. कास म्हणजे नुसता लुटायचा धंदा आहे. त्यापेक्षा रायरेश्वर पठारावर जवळजवळ हीच सर्व फुले फुललेली पाहायला मिळतात. अर्थात रायरेश्वर पठाराचा विस्तार प्रचंड आहे. कासला काही दुर्मिळ कीटकभक्षी वनस्पती आहेत. यावर मागे 'दै. सकाळ' मध्ये एक लेख आला होता.

छान भटकंती.

लहान मुलीला (वय १०) च्या दृष्टीने विचारित आहे?

जवळ एखादे लेणे/पुरातन वैगैरे असल्यास(च) वल्ली यायला तयार होतील. तशी माहीती देणे (मिपा धाग दिला तर अगदी उत्तम)

धागाचित्रे आवडली

अभिजीत अवलिया's picture

24 Sep 2016 - 7:24 pm | अभिजीत अवलिया

फोटो छान आहेत.

पियुशा's picture

25 Sep 2016 - 2:39 pm | पियुशा

खुप सुन्दर :)

यशोधरा's picture

25 Sep 2016 - 3:03 pm | यशोधरा

छान फोटो!

मागच्या आठवड्यात टिव्हि९ मराठी आणि जय महाराष्ट्र या दोन चानेल्सवर कास पठार चांगले दाखवले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2016 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छायाचित्र सूंदर आली आहेत.

-दिलीप बिरुटे

पिशी अबोली's picture

25 Sep 2016 - 3:35 pm | पिशी अबोली

छान फोटो