गोव्यांतील वेताळ मंदिरे

साहना's picture
साहना in काथ्याकूट
23 Sep 2016 - 5:37 am
गाभा: 

हिंदू धर्मात अनेक प्रसिद्ध प्रथा आणि सण आहेत. पण काही सण आणि परंपरा काही विशेष भागापुरत्याच असल्याने किंवा विशिष्ट जात, समुदाय इत्यादी मध्येच मर्यादित असल्याने इतर लोकांना जास्त माहिती नसते. अश्या प्रकारच्या काही प्रथा परंपरा आपल्याला ठाऊक असतील तर धाग्यावर जरुर लिहा.

गोव्यांतील वेताळ मंदिरे

राजन पर्रीकर ह्यांनी जबरदस्त छायाचित्रे काढली आहेत जरूर पहा. राजन पर्रिकरनी हि छायाचित्रे इतर ठिकाणी टाकण्यास मनाई केल्याने मी चित्र इथे टाकले नाही फक्त लिंक दिली आहे.

http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2016/01/19-16584-post/Vetal-...

इतर :
http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2013/01/Vetal-Loliem-Babu-Go...

वेताळ ह्या देवतेची मंदिरे गोव्यांत जागो जागी पाहायला मिळतात. पैगीण गावातील वेताळ मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. वेताळाची मूर्ती म्हणजे अक्राळ विक्राळ दैत्यासारखी असते. बहुतेक वेळा पूर्ण नग्न असते आणि इंग्रजीतील शब्दप्रयोग वापरायचा असेल तर वेल-हँग असते. लांबट आणि खाली असलेला पुरुषी अवयव म्हणजे "अधोरेतस" दर्शवण्यासाठी आहे असे जाणकार सांगतात. शिव हा ऊर्ध्वरेतस असतो. कधी मंदिर असते तर कधी अशीच जंगलात एकटी मूर्ती असते. बरगड्या नेहमीच बाहेर दिसतात आणि पोट अगदी आंत. कमरेचा बंध फार मोठा असतो आणि त्याला एक छोटी घंटा असते. गळ्यांत नागाची रुद्रमाला (मुंडकी) आणि बाजूना नागाचे केयूर आणि अंगद हि आभूषणे असतात. हिंदू धर्मातील इतर मूर्तीप्रमाणेच काही गोष्टींवर मुर्तीकाराने विशेष लक्ष दिले आहे असे वाटते. उदाहरणार्थ कानाच्या पाळी वजनाने जवळ जवळ तुटल्या आहेत असे वाटते. काही ठिकाणी बरगड्यांच्या खाली विंचू असतो. डोक्यावर कधी कधी सर्प असतात. वेताळ बरोबर असलेल्या सर्पांना वत्स असा शब्द आहे. [१]

लोळिये गांवातील (वर दाखवलेली नग्न मूर्ती) गोव्यांतील सर्वांत मोठी मूर्ती असून उंची सुमारे २ मीटर आहे. गोव्यांतील इतर सर्व मूर्ती समभंग असल्या तरी हि एकमेव मूर्थी त्रिभंग स्थितींत आहे. हाय एकाच मूर्तीला प्रभावळ सुद्धा आहे.

बहुतेक वेळा वेताळाची पूजा अर्चा ह्यांत ब्राह्मण शिवाय आदिवासी किंवा इतर जातींचा जास्त सहभाग असतो. बहुतेक ठिकाणी ग्रामदेवता पंचायतन सिस्टम मध्ये वेताळ देवालयाना सुद्धा स्थान मिळाले आहे आणि काही ठिकाणी चित्पावन ब्रह्मन् पूजा अर्चा करतात पण अनेक प्रकारच्या पूजा, प्रथा साठी "घाडी" ह्या ब्राह्मणेतर माणसाची आवश्यकता मात्र नेहमीच असते. घाडी चा इंग्रजी शब्द असेल shaman. घाडीचे इतर जवळचे शब्द आहेत गुरव, जल्मी,रावळ इत्यादी.

घाडीमध्ये कधी कधी अवसर इत्यादी येतो आणि जनावरांचा बळी देण्याचे काम सुद्धा त्याच्यावर असते.

ज्या प्रमाणे इतर देवतांना पाकळी लावून प्रसाद घेतला जातो त्याच प्रकारे इथे सुद्धा अर्चक प्रसाद लावू शकतो. लोकांच्या मनातील वेताळ देवाविषयी भय-पूर्वक आदर स्पष्ट दिसतो. नवस वगैरे करताना विशेष काळजी बाळगली जाते कारण नवस फेडता आला नाही तर वेताळ माफ करत नाहीत अशी लोकांत श्रद्धा आहे. त्याशिवाय ज्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने ह्या देवाला विशेष मान दिला पाहिजे तो नाही दिला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण विध्वंस वेताळ करतो असे म्हणतात. सांगायचं मुद्दा असा कि इतर मंदिरांत ज्या प्रमाणे लोक आनंदात जाऊन येतात त्याप्रमाणे इथे जात नाहीत, इथे थोडे भय मनात घेऊनच जावे लागते.

पैगीण गावांतील वेताळ मंदिराची फार छान कथा आहे. मंदिर अत्यंत पुरातन असून वैदिक पद्धतीने आचरण करणाऱ्या लोकांपेक्षाही हे मंदिर जुने आहे. गोव्यांतील बहुतेक भागांत वेळीप, कुणबी, गावडे, धनगर इत्यादी लोकांचे वास्तव्य होते. ब्राह्मण किंवा इतर आधुनिक हिंदू लोक हळू हळू आले. नवीन लोक बहुतेक करून नदी च्या जवळपास राहायचे तर मूळ निवासी बहुतेक जंगलांत आंत. निसर्गपूजा, प्राणिपूजा सर्वांसाठीच होती.

तर म्हणे वेताळ हा प्रचंड दैत्य एका एका गावांचा विध्वंस करीत जात होता. हळू हळू बातमी पसरून ह्या भागातील लोकांचा जो बुधवंत होता त्याच्या कडे पोचली. वर उल्लेख केलेले लोक छोटया छोट्या गावांत राहत असत आणि त्यांचा गावप्रमुख म्हणजे बुधवंत (बुद्धिमान). तर ह्या वेताळाला आधीच गाठून त्याच्याशी काही तरी तडजोड करावी हा विचार है बुधवंताने केला. त्याप्रमाणे वेताळाला त्याने वाटेत गाठले. वेताळाने त्याच्या समोर काही अटी ठेवल्या.

१. मला गर्भ खायला पाहिजे
बुधवंतने हि भयानक अट तात्काळ मान्य केली.
२. मला दोन पायाच्या जनावराचा बळी पाहिजे.
बुधवंत ने दोनच का ? मी दहा पायाच्या जनावराचा बळी देतो असे सांगितले . वेताळ ने असला प्राणी पाहिलेला नसल्याने त्याने ते मान्य केले.
इत्यादी इत्यादी

प्रत्यक्षांत बुधवंत ने त्याला गर्भ म्हणून केळ गर्भ, खेकडा इत्यादी गोष्टी दिल्या.

ह्या वेताळा चा उत्सव ३ वर्षांनी येतो. दुसऱ्या वर्षाला वेताळाची सेना पंचक्रोशींत फिरून सर्व देवळांना आमंत्रण देते. हे आमंत्रण कुठल्यातरी अगम्य भाषेंत एका कपड्यावर लिहिले आहे शब्दांचे अर्थ सुद्धा लोकांना ठाऊक नाहीत. पण चाल मात्र परंपरागत आठवणीत आहे आणि त्यावरून हि वेताळाची स्तुती असून वेताळाची सेना क्ती पराक्रमाची आहे असे लिहिले असावे असे वाटते. See video : https://www.youtube.com/watch?v=Gb28RjsY6Ww

वेताळ देव इतर सर्व देवाना पुढील वर्षी आपल्या उत्सवाला यावे असे आमंत्रण देतो.

पुढच्या वर्षी गड्यांची जत्रा होते. दोन महा प्रचंड खांब्यावर एक प्रचंड चक्र बसवलेले असते. जमिनी पासून किमान २५-३० फूट उंचीवर रहाट गाड्या प्रमाणे हे चक्र वाटते. गडे हे ठराविक परिवारातील लोकच बानू शकतात. ह्यांना २४ तास मौन व्रत घ्यावे लागते. जत्रेच्या दिवशी ह्यांना भरपूर मान सन्मान. नंतर ह्यांचा पाठीची चामडी ओढून त्यांत गरा म्हणजे एक हुक (मासे पकडण्यासाठी वापरतात तसा ) खुपसला जातो. वेदनेने ब्र निघू नये म्हणून तोंडांत सुपारी धरायला दिलेली असते.

नंतर ह्यांना त्या खांब्यावर चढवले जाते आणि चक्राला बांधले जाते. नंतर काही लोक चक्र फिरवतात आणि तोंडाने मोठमोठ्याने आवाज काढतात. पूर्वीच्या काळी हे चक्र नंतर वरून खाली कोसळत असत आणि कुणी मेला तर त्याला नरबळी समजत असत. (असे म्हणतात).

ह्या शिवाय जत्रेंत काही लोकांना अवसर सुद्धा येतो. रेड्याचा बळी देण्यासाठी अनेक रेडे आणले जातात आणि अवसराने प्रश्न करतंच एखादा रेडा पुढे येतो आणि त्याला बळीसाठी निवडले जाते.

जत्रेंत सर्व जातीच्या लोकांना एकत्र काम करावे लागते आणि भेद भाव असत नाही. प्रत्येक जातीला काही ना काही विशेष कर्तव्य असते. गांवात महार वगैरे नसले तरी कुठून तरी त्यांना बोलावले जाते आणि बळीचा रेडा मारण्यासाठी दिला जातो त्या शिवाय ते मागतील तितके तांदूळ, मसाले, वस्त्रे इत्यादी दिले जातात.

काळाच्या प्रवाहांत तग धरून राहिलेली हि एक सुंदर परंपरा आम्हाला आमच्या पूर्वजांशी जोडते.

[१] http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2011/11/vetal.pdf

प्रतिक्रिया

सदर लेख लिहिण्यासाठी श्री अक्षर देसाई ह्यांनी मदत केली, श्री राजन पर्रीकर ह्यांच्या मुळे चित्रे आणि वेताळ देवावरील पुस्तकाचा उतारा मिळाला. ह्या शिवाय श्री सांदिपनी कामत ह्यांनी वेताळ देवाच्या प्रथे संबंधित रोचक माहिती दिली.

फेदरवेट साहेब's picture

23 Sep 2016 - 7:37 am | फेदरवेट साहेब

ते लेख वगैरे उत्तम अन अभ्यासू असल्याची एक फर्मास पावती आमच्याकडून घ्याच, फक्त ह्या लेखात आता "काथ्याकूट" काय करायचा ते जरा बयाजवार सांगा ही नम्र विनंती करतो आपणांस. का फक्त कायम वसवस करायची सवय वगैरे आहे म्हणून कायम सगळे धागे काथ्याकूट सदरातच टाकता तुम्ही??

> का फक्त कायम वसवस करायची सवय वगैरे आहे म्हणून कायम सगळे धागे काथ्याकूट सदरातच टाकता तुम्ही??

कुठल्याही विषयावर कुठल्याही वर्गवारीत लेख टाकला तरी आपल्यासारखे लोक काही तरी विषय काढून वैयक्तिक आक्रमणे करतातच त्यामुळे लेख काथ्याकूट सदरांतच टाकते. नाहीतर मग उगाच कुणी तरी सभ्य माणसाने "अशी चर्चा काथ्याकूट मध्ये करा" अशी ताकीद तुम्हा आम्हाला द्यायला नको.

हे वेताळ नसून मूळचे असितांग भैरव आहेत.
पोटात विंचू असलेल्या मूर्ती ह्याही वेताळाच्या/ भैरवाच्या नसून त्याच्या शक्तीच्या- चामुंडेच्या असतात.

साहना's picture

23 Sep 2016 - 10:28 am | साहना

अतिसंग भैरव विषयी जास्त माहिती कुठे भेटेल ?

कुठेच मिळनार नाही कारण अतिसंग भैरव नावाचं रूप अस्तित्वात नाही. आहे ते असितांग.

अतिसंग भैरव नावाचं रूप अस्तित्वात नाही. आहे ते असितांग.

=))

कदंब-शिलाहारांच्या काळात ह्या मोठ्या प्रमाणावर उभारल्या गेल्या. कालांतराने ह्यांचे मूळचे भैरव स्वरुप विस्मरणात जाऊन वेताळ हे नाव चिकटले.

यशोधरा's picture

23 Sep 2016 - 8:50 am | यशोधरा

माहिती आवडली, धन्यवाद.
पर्रीकर ह्यांनी काढलेले फोटोही आवडले.

प्रीत-मोहर's picture

23 Sep 2016 - 9:41 am | प्रीत-मोहर

हा माझ्या लोलये गावातला वेताळ आहे.

ह्या वेताळा चा उत्सव ३ वर्षांनी येतो. दुसऱ्या वर्षाला वेताळाची सेना पंचक्रोशींत फिरून सर्व देवळांना आमंत्रण देते.

ह्याला टका म्हणतात. यंदा टका ऑलरेडी सुरु झालेला आहे. आता पुढल्या वर्षी जत्रा.

प्रीत-मोहर's picture

23 Sep 2016 - 9:48 am | प्रीत-मोहर

टका आणि जत्रा पैंगिण च्या वेताळाची असते. ते देउळ खूप जुनं आहे, एकेक खांब म्हणजे लाकडी कोरीवकामाचा एक अप्रतिम नमुना आहे.
आता हे खांब जुने झाल्याने मोडकळीला येउ लागले आहेत. यातल्याच एका खांबावर प्रसाद पाकळी घेतात.

पैंगिणला जायचे आहे गं एकदा. फोंड्यापासून किती दूर आहे?

प्रीत-मोहर's picture

23 Sep 2016 - 9:59 am | प्रीत-मोहर

अंदाजे ६५-७० किमी असेल गं.

हो शोधलं, दीडेक तास लागतो. हे बघा पैंगिणीचं स्पेलिंग - Poinguinim

पाळोळे हा समुद्र किनारा जवळ आहे आणि तिथे भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत. तिथे राहा. वेताळ मंदिरा बरोबर बाजूचे अत्यंत जुने नवदुर्गा मंदिर पहा, ऐतिहासिक परशुराम मंदिर सुद्धा पहा. वेताळ मंदिरा पासून जवळच गाल्जीबाग हा सुंदर आणि निवांत समुद्र किनारा आहे.

पिशी अबोली's picture

24 Sep 2016 - 3:39 pm | पिशी अबोली

हैला.. यशोताईला हाटेलात ठेवायला गोंयकारांची आतिथ्यशीलता संपली का? ती राहील आमच्या घरात.

बाकी लेखातली माहिती चांगली आहे, पण थोडासा कोरडा झाला असं वाटलं. जरा यासंदर्भातील गोमंतकीय श्रद्धा आणि मानसिकता याबद्दल लिहिलं असतं तर अजून रोचक झाला असता असं आपलं वैयक्तिक मत. तुम्ही गोव्याच्या असं लिहिल्याचं अंधुक स्मरतंय. या अशा जत्रांच्या बाबतीत गोंयकारांना एक ओढ असते खास. पण हे माझं वैयक्तिक मत आहे अर्थात.

प्रीत-मोहर's picture

24 Sep 2016 - 3:42 pm | प्रीत-मोहर

+१२२
यशो वीकेंडला आलीस तर माझ्याच घरी ये. आपल्या "गजाली" वरल्या केदारच घर पण जवळच आहे.

प्रीत-मोहर's picture

24 Sep 2016 - 3:45 pm | प्रीत-मोहर

आणि गावातल भगवतीच पठार , केशवदेव ,दामोदर देवाची मंदिर अशी तुला आवडतील तशी ठिकाणं पण बघ

हो तर, मी, तू, पैताई आणि पिशी कट्टा करू, कुचू कुचू गजाली करू, फजाव नि पाव खाऊ =))

पैसा's picture

24 Sep 2016 - 5:28 pm | पैसा

साहना यांनी फोन नंबर दिला तर त्याना पण बोलावू!

प्रीत-मोहर's picture

24 Sep 2016 - 5:37 pm | प्रीत-मोहर

डन ग यशो. पैताई चालेल. हवा, पिशी आणि यशो जमवाच आता. मी, पैसाक्का वगैरे इकडेच असतो.

प्रचेतस's picture

24 Sep 2016 - 5:32 pm | प्रचेतस

फजाव म्हणजे काय?

चवळी सारखं पण आकाराने जरासं मोठं अस कडधान्य. अलसाणं पण म्हणतात वाटत त्याला, नक्की माहीत नाही.

प्रीत-मोहर's picture

24 Sep 2016 - 5:38 pm | प्रीत-मोहर

मी विचारच करत होते की फजाव ला कसं describe करु.

पैसा's picture

24 Sep 2016 - 5:38 pm | पैसा

अळसाणें/हाळसाणे

प्रचेतस's picture

24 Sep 2016 - 6:23 pm | प्रचेतस

कडव्या वालासारखं (बिरडं) का?

अभ्या..'s picture

24 Sep 2016 - 6:24 pm | अभ्या..

अळसुंदे रे.

प्रचेतस's picture

24 Sep 2016 - 6:26 pm | प्रचेतस

हे ही नाव ऐकलं नव्हतं

पैसा's picture

24 Sep 2016 - 6:35 pm | पैसा

1

अळसुंदे म्हणजे पांढरी चवळी. हे हाळसाणे त्याहून मोठे असतात.

प्रचेतस's picture

24 Sep 2016 - 6:52 pm | प्रचेतस

पाहिले नाहित इथे कधीच.

बाकी ह्या वरुन काळे वाल आठवले. तेदेखील खूप चवदार असतात. त्यांना इथे काळे पोलिस असेदेखील म्हणतात. :)

हे सगळे बंदुकगॉळ्या आयटेम बुवांचे लाडके आहेत.
ढिश्क्याव.....

कोकणातली खासियत. देशावर सहसा सापडत/ मिळत नाहीत. कोकणात गेल्यावर भरपूर घेऊन यायचे हे मस्ट.

पैसा's picture

24 Sep 2016 - 6:59 pm | पैसा

गोवा, कारवार इथे मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मिळत असावेत.

लाल मोठ्या चवळीसारखे एक कडधान्य असते. पण खूप चवदार.

यशोधरा's picture

24 Sep 2016 - 5:04 pm | यशोधरा

पण थोडासा कोरडा झाला असं वाटलं. जरा यासंदर्भातील गोपण थोडासा कोरडा झाला असं वाटलं. जरा यासंदर्भातील गोमंतकीय श्रद्धा आणि मानसिकता याबद्दल लिहिलं असतं तर अजून रोचक झाला असता असं आपलं वैयक्तिक मत. तुम्ही गोव्याच्या असं लिहिल्याचं अंधुक स्मरतंय. या अशा जत्रांच्या बाबतीत गोंयकारांना एक ओढ असते खास. पण हे माझं वैयक्तिक मत आहे अर्थात.मंतकीय श्रद्धा आणि मानसिकता याबद्दल लिहिलं असतं तर अजून रोचक झाला असता असं आपलं वैयक्तिक मत. या अशा जत्रांच्या बाबतीत गोंयकारांना एक ओढ असते खास.

नेमकं.

लोलीये गावांतील मंडळी सुद्धा मिपा वर आहे ? वाव. पुढच्या भेटीला नक्कीच तुमच्या कडे येऊ.

प्रीत-मोहर's picture

27 Sep 2016 - 8:24 am | प्रीत-मोहर

तुमी खंयच्या गावांत तर?

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2016 - 10:07 am | प्राची अश्विनी

महिती आवडली. कोकणात देखिल वेताळाचं खुप प्रस्थ आहे. वेताळाच्या देवळात मोठ्ठ्या चामडी वहाणा असतात.

आरवलीचा वेतोबा प्रसिद्ध आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Sep 2016 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु

वल्लीभाऊची आठवण आलीच होती लेख वाचून, बॉस तुमच्या व्यासंगाला आमचा दंडवत _/\_ .

अनुप ढेरे's picture

23 Sep 2016 - 10:57 am | अनुप ढेरे

पर्रिकर यांचा फोटो ब्लॉग खूप भारी आहे. अनेक महिन्यांपासून फॉलो करतो आहे. गोव्याबद्दल प्रेमाने लिहितात. त्यांनी टाकलेले गोव्याचे फोटू बघून इतक्या वेळेला जाऊन देखील गोवा पाहिलाच नाही असं वाटतं.

अवांतरः त्यांच्या वेबसाईटवर भारतीय शास्त्रिय संगीताचा खजिना उपलब्ध आहे. उत्सुकांनी आवर्जून वाचावा/ऐकावा असा!

साहना's picture

23 Sep 2016 - 11:29 am | साहना

राजन पर्रीकर शास्त्रीय संगीताचे प्रकांड पंडित आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्या विषयावरील त्यांचे ज्ञान अक्षरशः अफाट आहे.

छान माहिती.आरवलीचा वेतोबा आठवलाच.

किसन शिंदे's picture

23 Sep 2016 - 4:53 pm | किसन शिंदे

अर्रर्र!! आता काही महिन्यांपूर्वीच तिथे जवळपास जाऊन आलो. या जागेबद्दल माहिती नव्हते नाहीतर नक्की भेट द्यायला आवडले असते. असितांग भैरवाची मूर्ती फार भयानक दिसतेय.

शलभ's picture

23 Sep 2016 - 6:39 pm | शलभ

छान माहीती.

सुचेता's picture

23 Sep 2016 - 6:47 pm | सुचेता

गावात ही वेतोबा आहे. आम्ही मागे गेलो तेव्हा आम्हाला सम्जले ,

नंतर ह्यांना त्या खांब्यावर चढवले जाते आणि चक्राला बांधले जाते. नंतर काही लोक चक्र फिरवतात आणि तोंडाने मोठमोठ्याने आवाज काढतात. पूर्वीच्या काळी हे चक्र नंतर वरून खाली कोसळत असत आणि कुणी मेला तर त्याला नरबळी समजत असत. (असे म्हणतात).

काळाच्या प्रवाहांत तग धरून राहिलेली हि एक सुंदर परंपरा आम्हाला आमच्या पूर्वजांशी जोडते.

सुंदर परंपरा ?????

प्रीत-मोहर's picture

24 Sep 2016 - 3:35 pm | प्रीत-मोहर

https://kevinstandagephotography.wordpress.com/2015/04/06/loliem-vetal-goa/

ही लिंक ही बघाच. ज्या ठिकाणी हा लोलयेचा बेताल आहे ते आमच्या पुरोहितांच घर आणि आवार

प्रीत-मोहर's picture

24 Sep 2016 - 3:36 pm | प्रीत-मोहर

बेताळ

अभ्या..'s picture

24 Sep 2016 - 3:51 pm | अभ्या..

देखणा आहे वेताळ. अप्रतिम.
त्याचे अस्थिपंजरत्व दाखवण्यासाठी वापरलेली ग्राफीकल सिम्प्लीफिकेशनची अ‍ॅनॉटॉमी जब्बरदस्त. अशी शिल्पे साधारण कोणत्या काळातली असावीत? वल्ल्याव सांगेलच म्हणा.

नववे/दहावे शतकापासून साधारण.

प्रसाद_१९८२'s picture

24 Sep 2016 - 5:07 pm | प्रसाद_१९८२

छान आहेत सर्व फोटो, फोटोतील वेताळ देखील देखणा आहे,
मात्र इतकी वर्षे उन्हातान्हात राहुन-राहुन हाडाची काडे झालीत बिचार्‍याची. :)

गावात काही लोकांकडून 'पार्टी' मिळवण्यासाठी नवस फेडणे,बळी,तोडगे याची भीती ठेवली असेल का? हा घ्या काथ्याकूटला विषय.

गोवा अनुभवलाच पाहिजे!

मी जातेय गोवा.. गावी :)... शिरोडा इथे वेतोबाचे मंदिर आहे त्याचा संबंध पण वेताळांसोबत येतो ना