कारल्याची कोशिंबीर
साहित्य :-
२ ते ३ कारली
१ मध्यम कांदा - बारीक चिरून
१ मोठा चमचा दाण्याचे कूट
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
२ चमचे लिंबाचा रस
२ मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
२ चमचे तेल
फोडणीचे साहित्य - मोहरी, जिरे, हिंग, हळद
कृती:-
कोशिंबीर करायच्या आधी २ ते २.५ तास कारली उभी मधे चिरून घ्यावी. आतील बिया काढून काचर्या करून घ्याव्यात. ह्या काचर्यांना मीठ लावून ठेऊन द्यावे.
२ ते २.५ तासांनी ह्या मीठ लावलेल्या काचर्या पिळून त्यातील मिठाचे पाणी काढून टाकावे. म्हणजे कारल्याचा कडूपणा कमी होईल.
एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात कारल्याच्या काचर्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्याव्यात.
कढई गॅस वरून काढून घ्यावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, दाण्याचे कूट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. गरज वाटल्यास चवीनुसार मीठ घालावे. (कारल्याच्या काचर्यांना आधी मीठ लावलेले असल्याने चव बघून मीठ घालावे.)
आता त्यावर लिंबाचा रस घालावा. सर्व मिश्रण एकजीव करून कोशिंबीर वाढावी.
कारल्याचा थोडासा कडूपणा, लिंबाची आंबट चव, मिरच्यांचा तिखटपणा आणि खमंग फोडणी यांच्या एकत्रित चवीमुळे ही कोशिंबीर फारच चविष्ट लागते. :)
--शाल्मली.
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 3:54 pm | मदनबाण
कारल्याची भाजी खाल्ली आहे पण कारल्याची कोशिंबीर पहिल्यांदाच पाहिली !!!
(कडू-गोड)
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
3 Feb 2009 - 3:54 pm | शेखर
सुंदर पाकॄ...
3 Feb 2009 - 4:16 pm | मानसी मनोजजोशी
अरे व्वा
उद्याच करुन बघते
3 Feb 2009 - 7:20 pm | मनस्वी
मला हा प्रकार आवडला.
करून बघणार!
छान पाकृ शाल्मली!
:)
4 Feb 2009 - 11:55 am | मनस्वी
खराट्या,
:-| तुझे 'ब्ब्बॉक' आणि आवडले???? व्यॅक्क्क्क्क!!!!
आणि त्याला जर प्रतिसाद द्यायचा असता तर तुझ्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला असता खराट्या.
तुला कारले आवडत नाही हे समजले एकदा, त्यामुळे जितके ब्ब्बॉक-ब्ब्बॉक करायचे आहे, ते तुझ्या खरडवहीत कर.
माझ्या प्रतिसादाचा आणि तुझ्या ब्ब्बॉकचा काहीही संबंध नाही.
हे हे हे
3 Feb 2009 - 8:23 pm | शितल
शाल्मली ताई,
कारल्याची कोशंबिर अजुन कधी केली नाही पण तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने नक्की करून पाहिन.
अशाच छान छान पाककृती आम्हाला सांगत जा.. :)
3 Feb 2009 - 8:46 pm | धनंजय
कारले ही माझी आवडती भाजी.
कारल्याची कडवट चव औरच (मला आवडणारी अशी). मी स्वतःसाठी कारली शिजवतो, तेव्हा पाणी काढून टाकत नाही.
ही कोशिंबीर जरूर करून बघीन.
3 Feb 2009 - 8:55 pm | शाल्मली
बापरे!! म्हणजे अगदी ओरीजिनल चवीतच की..
--शाल्मली.
3 Feb 2009 - 9:04 pm | प्राजु
कारल्याचि भाजी आवडत नाही .. पण तळलेले कारले आवडते. आता अशाप्रकारे कोशिंबीर करून बघावी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Feb 2009 - 9:38 pm | वल्लरी
ही कोशिंबीर खुप पौष्टीक वाटते आहे....
मला कारल्याची भाजी आवडते..आता अश्या प्रकारे कोशिंबीर ही करुन बघेन... :)
---वल्लरी
3 Feb 2009 - 9:41 pm | चकली
कारले आवडत नाही, त्यामूळे कधी केले जात नाही...पण ही करून बघेन एकदा.
>>
"त्यात कारल्याच्या काचर्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्याव्यात.
कढई गॅस वरून काढून घ्यावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, दाण्याचे कूट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात."
हे चांगल वाटतंय.. पाकृ बद्द्ल धन्यवाद!
चकली
आजची रेसिपी - कैरीचे इंस्टंट गोड लोणचे
3 Feb 2009 - 9:49 pm | वाहीदा
मला आईने केलेले कारल्याची भाजी खुप आवडायची ! आई गेल्यानंतर कारल्याची भाजी खाल्लीच नाही. तु परत एकदा तिच्या भाजीची आठवण करुन दिलीस ... धन्यवाद !!
एक विचारु ?? ही कोशिंबीर किती दिवस टिकेल ग फ्रिज मध्ये ?? मी करुन बघेन जरुर ....
फोडणीतच मिरची चा ठसका टाकला तर ?? sorry मी भाज्यांचे नेहमी नवीन Innovations करत असते !
कारल्याचे / लोणचे येते का ग तुला ?? असेल तर receipe जरुर प्रकाशीत करावी :-)
~ वाहीदा
4 Feb 2009 - 5:08 pm | शाल्मली
फोडणीतच मिरची घालू नये कारण त्या फोडणीत कारली भरपूर वेळ परतायची आहेत. म्हणून मिरच्यांचे तुकडे नंतरच घालावेत.
कारल्याचे लोणचे अजून करून पाहिले नाहीये. पण विकतचे खाल्ले आहे. ते आवडले होते. :)
--शाल्मली.
5 Feb 2009 - 11:34 pm | वाहीदा
तुम इस खेल की पुरानी माहीर खिलाडी हो , तुम्हारे Suggestions सर आंखोंपर !
बाकी कार्ल्याशी जरा जपुनच खेळायला पाहीजे नाहीतर सगळं व्यर्थ ! :-)
~ वाहीदा
9 Feb 2009 - 4:53 pm | दशानन
तुम इस खेल की पुरानी माहीर खिलाडी हो , तुम्हारे Suggestions सर आंखोंपर !
सहमत. हेच. म्हणतो आहे !
**
अरे कोणीतरी मला शिरकुर्माची रेसेपी द्या रे !
आजकाल खुप इच्छा होत आहे ;)
मनातील इच्छा अधुरी राहू नये ह्यासाठी.. कोणी मला स्पेशल निमत्रण देऊन खाउ घातले तर त्यांचा मी ३ जन्माचा ऋणी राहीन... (३चं बरं का.. बाकीची चार जन्म आम्ही इतरांचे ऋण मुक्त होण्यासाठी वापरणार आहोत)
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
3 Feb 2009 - 9:52 pm | विसोबा खेचर
कार्ल आम्हाला आवडत नाही, त्यामुळे आम्ही या पाककृतीस आमची नापसंती नोंदवत आहोत. विशेषत: पाककृतीकर्तीने आम्हाला बटाटेवडे प्रॉमिस करून कार्ल्याच्या कोशिंबिरीची पाकृ येथे देऊन आमचा घात केलेला आहे..
निषेध...
तात्या.
3 Feb 2009 - 10:14 pm | वाहीदा
विशेषत: पाककृतीकर्तीने आम्हाला बटाटेवडे प्रॉमिस करून कार्ल्याच्या कोशिंबिरीची पाकृ येथे देऊन आमचा घात केलेला आहे..
:-)
बटाटे घालुन कार्ल्याची कोशींबीरीची receipe पाठव तात्यांसाठी खास :-)
4 Feb 2009 - 11:20 am | नितिन थत्ते
कार्ले आवडत नाही
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
3 Feb 2009 - 11:43 pm | रेवती
अरेच्च्या, तू तर कोशिंबीर साम्राज्ञी दिसतेस!
कारलं फारसं खाल्लं जात नाही आमच्याकडे.
नेहमी वाटतं की आपण आता ही भाजी करायला सुरूवात करू आणि भाजी काही होत नाही.
आता मात्र निमित्तच मिळालं आहे मला. कारली आणीन पुढच्या अठवड्यात व करून सांगीन कशी झाली होती कोशिंबीर.
फोटू नेहमीप्रमाणेच भारी!
रेवती
3 Feb 2009 - 11:58 pm | मुक्ता
शाल्मली ताई,
कारल्याची कोशंबिर कधी केली नाही पण तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने नक्की करून पाहिन.
4 Feb 2009 - 9:13 am | सहज
माझी आवडती भाजी. कार्ल्यांचे मसाला वेफर्स सही लागतात. तात्या चखणा म्हणुन ते वेफर्स खाउन बघा. आवडतील.
कोशिंबीर करुन पाहीली पाहीजे.
4 Feb 2009 - 9:14 am | सुचेल तसं
मसाला वेफर्स??? अरे वा!!! कुठे मिळतात ते?
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
4 Feb 2009 - 9:15 am | प्राजु
अमेरिकेत माहिती नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Feb 2009 - 9:16 am | सुचेल तसं
ओके. धन्यवाद. खाऊन बघतो...
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
4 Feb 2009 - 9:15 am | सुचेल तसं
मसाला वेफर्स??? अरे वा!!! कुठे मिळतात ते?
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
4 Feb 2009 - 12:56 pm | सुनील मोहन
कारले मुळीच आवडत नसे.
पण बादशाहीत जेवायला जायला लागल्यापासून
वामनरावांनी "अहो खा कार्लं ! रक्त शुद्ध होतं त्यानं" असा दम देऊन पानात
वाढलेल्या भाजीमुळे खरंच आवडायला लागलं कार्लं.
4 Feb 2009 - 3:36 pm | पुष्कर
कडू कारल्याच्या कुरकुरीत काचर्यांची कोशिंबीर कोकणात करतात का?
- कु. पुष्कर
4 Feb 2009 - 4:04 pm | शंकरराव
मला कारले आवडते.फार दिवस झाले कारल्याची कोशिंबीर खाउन
पाककृती फोटो अप्रतिम ...
4 Feb 2009 - 4:53 pm | पुष्कर
तुमच्या कारल्याच्या कोशिंबिरीचा उल्लेख मला माझ्या कोल्हे-कुई मध्ये करण्यावाचून राहवलं नाही. त्याबद्दल क्षमस्व.
बाकी मला कारल्याची पातळ भाजी सर्वात जास्त आवडते. कोशिंबीर पहायला हवी करून.
4 Feb 2009 - 5:22 pm | अनंत छंदी
कडू कारलं
तुपात तळलं
साखरेत घोळलं
तरी कडू ते कडूच
पण तरीही आपल्याला बुवा ते आवडतं
"मानवी स्वभावातील कडवटपणापेक्षा कारल्याचा कडवटपणा निश्चित कमी असतो असे म्हणतात"
5 Feb 2009 - 6:23 am | चित्रा
कार्ले शक्यतोवर घेणे टाळते (म्हणजे कधीच घेत नाही :)
पण ही कोशिंबीर करून पहावीशी वाटते आहे.
5 Feb 2009 - 10:04 am | बाळु
वा छान आहे
9 Feb 2009 - 3:40 pm | शाल्मली
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
:)
--शाल्मली.
9 Feb 2009 - 6:40 pm | नरेश_
माफ करा शाल्मलीताई , पण कार्ल्याऐवजी कंटोली (की कंटोळी ? ) घेतली तर. . . ???
10 Feb 2009 - 1:58 pm | विवेक
व मस्त दिएश अहे