गाभा:
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत.
चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ?
आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही.
---------------
श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक
प्रतिक्रिया
18 Sep 2016 - 1:05 pm | संजय पाटिल
सीमा ओलांडायची वेळ आली आहे.
18 Sep 2016 - 3:42 pm | भिंगरी
सीमा वाढवायची वेळ आली आहे.
18 Sep 2016 - 3:42 pm | भिंगरी
सीमा वाढवायची वेळ आली आहे.
18 Sep 2016 - 2:03 pm | rahul ghate
झालेला हल्ला अतिशय दुर्दैवी असून , हे प्रकार वाढत आहेत .
असे किती जवान शाहिद करायचे व कडी निंदा करून गप्प बसायचा ह्याचा आता सरकार ने विचार करावा .
राहुल
18 Sep 2016 - 3:19 pm | तेजस आठवले
अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना.
ही घटना दुर्दैवी आहे हे खरेच आहे. पण मला असे वाटते की अशा घटनांवरचे धागे काढू नयेत(हे माझे वैयक्तिक मत आहे). होतं काय की एक तर ह्या धाग्यांवर आपण श्रद्धांजली वाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. मुख्य मुद्दा म्हणजे काही डूआयडींना गरळ ओकायला हाच धागा मिळेल आणि इतक्या संवेदनशील विषयावर अतिशय दुर्दैवी आणि संताप येणाऱ्या प्रतिक्रिया येतील.
शेळी जाते जीवानिशी अन खाणारा म्हणतो वातड अशी एक म्हण आहे. आपल्या सर्वांसाठी जे लोक आयुष्य पणाला लावून आपले रक्षण करतात त्यांच्या प्रति आदरांजली आणि जिव्हाळा राहिला दूरच पण कुठल्याही संवेदनशील माणसाला संताप येईल अश्या प्रतिक्रिया इथे येऊ शकतात. काही धाग्यांवर असे झालेले आपण बघतोच.
बऱ्याच संवेदनशील विषयांवर मिपा वर ह्यापूर्वी मेगाबायटी चर्चा झालेल्या आहेत.साधक बाधक विचार, परस्परविरोधी, अगदी टोकाचे वाटणारे विचार मांडले गेले आहेत.त्यामुळे काही मजकुराचे संपादन आणि काही आयडींवर बंदी असेही झाले आहे. पण माझ्या मते हे सगळे एका अदृश्य मर्यादेत चालत होते. सध्या मात्र काही डुआयडीनी ठरवून कहर केला आहे. काहीच्या काही प्रतिक्रिया द्याव्यात आणि लोकांनी चिडून जाऊन त्यांना उत्तर द्यावे ह्यासाठी ते आपल्याला भाग पडत आहेत.
असो. फारच अवांतर झाले. पण ह्या दुर्दैवी घटनेला आपल्या मिपा कडून गालबोट लागू नये म्हणून हे लिहावे असे वाटले.मिपाचे सदस्य नसलेले पण मिपा वाचणारे असे हजारो, कदाचित लाखो लोक असतील. त्यांना डुआयडी आणि इतर गोष्टी माहित नसणार, पण ह्या डुआयडींच्या आणि त्याला उत्तर म्हणून आलेल्या प्रतिक्रिया वाचून एकूणच मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
18 Sep 2016 - 3:53 pm | प्रसाद_१९८२
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली ! :(
18 Sep 2016 - 4:12 pm | डँबिस००७
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
18 Sep 2016 - 7:55 pm | नितिन थत्ते
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध.
सरकार या बाबतीत योग्य असेल तो निर्णय घेईलच. जो योग्य त्या माहितीवर आणि सर्व प्रो आणि कॉन यांच्यावर आधारित असेल.
18 Sep 2016 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
18 Sep 2016 - 8:13 pm | साहना
तीव्र शब्दांत निषेध ! मृतांना श्रद्धांजली.
18 Sep 2016 - 8:25 pm | महामाया
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
18 Sep 2016 - 8:29 pm | प्रसाद_१९८२
इथे श्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला फक्त सज्जड दम देऊन थांबायला नको असे वाटते, निवडणूक प्रचारा दरम्यान 'एक सर के बदले हम दुष्मन के दस सर लेके आयेंगे' हे श्री नरेंद्र मोदी यांनी बोललेले वाक्य आता खरे करुन दाखवायची वेळ आली आहे.
या आधी देशात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यावर कडी से कडी निंदा तर कॉंग्रेस सरकार देखिल करत होती, मात्र अशी निंदा न करता काहीतरी ठोस कारवाई करुन आपण कॉंग्रेस पेक्षा वेगळे आहोत हे तमाम भारतीय जनतेला दाखवून द्यायची चांगली संधी त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी सोडू नये असे वाटते.
18 Sep 2016 - 9:27 pm | अजया
:(
18 Sep 2016 - 9:30 pm | मनिमौ
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या विचार सोडुन हातात शस्त्र धारण करायची वेळ आली आहे
सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
19 Sep 2016 - 7:40 am | रमेश आठवले
बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे? दासबोध.कॉम यांनी सुरु केलेल्या धाग्यावर मी लिहिलेला प्रतिसाद इथंही उद्धृत करणे गरजेचे वाटत आहे. ---
सध्या भारत पाकिस्तान मध्ये एकतर्फी व्यापार करार आहे. म्हणजे आपण Most Favored Nation या तहा प्रमाणे पाकिस्तान ला तेथून येणाऱ्या मालावर जकात सवलती देतो .पण जगात बाकी देश एकमेकांना तीच सवलत देण्याचे बंधन पाळतात तसे पाकिस्तान करत नाही.पाकिस्तान ही सवलत भारतातून पाठवल्या जाणाऱ्या मालावर देत नाही. सबंध इतके बिघडल्या नन्तर तरी हे पाकिस्तान धार्जिणे एकतर्फी धोरण बंद करायला हवे.
भारताने पाकिस्तानला MFN सवलत १९९६ साली दिली .पाकिस्तानने अजून तरी तसे केलेले नाही.महात्मा गांधी यांनी शत्रूने एका गालात थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा असे म्हटले होते. ते धोरण आजही पुढे चालवले जात आहे असे वाटते .
19 Sep 2016 - 7:57 am | साहना
आपले नाक कापून पाकिस्तानला अवलक्षण करून काय फायदा ? पाकिस्तान ने भारताला MFN दर्जा नाही दिला ह्यांत पाकिस्तानचेच जास्त नुकसान आहे.
पाकिस्तानी आर्मीला चीन आणि अमेरिका कडून भरपूर पैसे मिळतात. त्यांना विशेष फरक पडत नाही.
19 Sep 2016 - 9:56 am | रमेश आठवले
कसे काय ?
पाकिस्तान भारतातून आयात होणाऱ्या मालावर जकात शुल्क आकारतो . पण आपण पाकिस्तान मधून आयात होणाऱ्या मालावर जकातीच्या सवलती देतो. त्या सवलती आपण बंद करण्याने भारताचे नाक कसे कापले जाईल हे जरा समजावून सांगा.
http://www.thehindu.com/news/international/south-asia/pakistan-in-no-moo...
20 Sep 2016 - 1:26 am | साहना
इकोन १०१: Import duties hurt importing population
भारतीय जनतेला पाकिस्तान माल स्वस्तांत मिळतो आहे आहे पण पाकिस्तानी जनतेला भारतीय माल महागात पडतो ह्यांत आमचा फायदा आणि पाकिस्तानी जनतेचे नुकसान आहे.
20 Sep 2016 - 1:59 am | रमेश आठवले
समजले नाही
पाकिस्तान भारताकडून १५० च्या आसपास वस्तु आयात करतो आणि त्या पाकिस्तानच्या नागरिकांना मुद्दाम जास्त किमतीने विकतो असे आपणाला म्हणायचे आहे काय ? बहुतेक देशात हा दर्जा एकमेकांना दिला जातो
19 Sep 2016 - 9:06 am | नावातकायआहे
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=IB7GNx
19 Sep 2016 - 9:40 am | सुबोध खरे
आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते तसे आम्ही प्रति हल्ला शत्रूला पाहिजे तसा नव्हे तर आम्हाला पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तसा करण्याचा पर्याय खुला ठेवतो. आणि ते त्यांनी करून दाखविले. . सवंग लोकप्रियतेच्या मागे जाण्याऐवजी थंड डोक्याने सर्व गणिते करून प्रतिहल्ला केला जाईल. श्री नरेंद्र मोदी यांच्या कडून अशी अपेक्षा आहे.
जनतेला हिंदी चित्रपटासारखे "अगर तुमने अपनी मां का दूध पिया है तो सामने आओ" सारखे खटकेबाज संवाद पसंत असतात. त्याला बळी न पडल्यास "तुमचे मोदी' काय करत आहेत. डॉ मनमोहनपेक्षा वेगळे काय केले म्हणून येथेही प्रतिसाद येतीलच.
असो
19 Sep 2016 - 10:19 am | फेदरवेट साहेब
बाकी सगळे बरोबर आहे, फक्त असल्या बातमीवर राजकीय धुळवड मोदी मनमोहन वगैरे आणायचे पाप करून काय साधले तुम्ही? जर 'अपनी माँ का दूध" वगैरे फिल्मी संवाद आहेत तर "एका मुंडक्याच्या बदली 10 मुंडकी" हा फिल्मी संवाद नसेल का? त्या संदर्भात जर मोदींना प्रश्न विचारले गेले किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले तर तुम्हाला खुपण्याचे काहीही कारण नाही
19 Sep 2016 - 11:51 am | सुबोध खरे
इतिहास पाहून घ्या
19 Sep 2016 - 1:21 pm | फेदरवेट साहेब
मी पण पूर्ण पाहतोय हो, तुम्ही पण पूर्ण पहा, सिलेक्टिव्ह नको, चालतंय काय??
19 Sep 2016 - 11:49 am | बोका-ए-आझम
आणि सर्वंकष युद्ध आर्थिक दृष्ट्या दोघांनाही परवडणारं नाही. जी काही कृती होईल ती ही गणितं डोळ्यांसमोर ठेवून होईल. पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.
19 Sep 2016 - 12:07 pm | विशुमित
म्हणजे फक्त उत्तर प्रदेश मधील निवडणुकीवर डोळा ठेवूनच निर्णय होईल ??
जग जिंकायला निघालेल्या अलेक्सझांडर सारखा शेवट मोदींचा होईल यात शंका वाटत नाही.
19 Sep 2016 - 2:55 pm | बोका-ए-आझम
रच्याकने ' फक्त ' उत्तर प्रदेशातील निवडणुकींवर डोळा ठेवून निर्णय होईल असं कुठे म्हटलंय ते दाखवा. स्वतःला वाटेल तो अर्थ काढायला तुम्ही स्वतंत्र आहात पण दुसरेही तसंच म्हणताहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करु नका.
19 Sep 2016 - 3:05 pm | विशुमित
तुम्हीच म्हणताय,
"पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत"
म्हणजे निवडणूक नसती तर नेहमी सारखीच गुळमुळीत प्रतिक्रिया दिली असती, असाच अर्थ लागतो ना.
29 Sep 2016 - 3:06 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
19 Sep 2016 - 12:53 pm | गॅरी ट्रुमन
देजा वू? २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतरही दोन महिन्यात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत्या आणि त्यावेळी केंद्रात वाजपेयींचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात भाजपचे राजनाथ सिंगांचे.तेव्हा सीमेवर अगदी "आयबॉल टू आयबॉल" परिस्थितीत सैन्य नेलेही होते.पण त्यातून पुढे युध्द वगैरे काहीच झाले नाही. मे २००२ कालच्या उरी हल्ल्याप्रमाणे जम्मूजवळ कालूचक येथे सैनिक छावणीवर हल्ला झाला होता. त्यानंतर वाजपेयी कुपवाडाला गेले होते आणि "मेरा यहा आना अपने आप मै एक प्रतिक है. इसे हमारा पडोसी समजे ना समजे दुनियावाले समजे ना समजे हम विजय का एक नया अध्याय लिखेंगे" असेही बोलले होते.पण पुढे काहीच झाले नाही.
अर्थातच धसमुसळेपणाने वाजपेयींनी हल्ला केला नाही हे चांगलेच झाले.आजही परिस्थिती फार वेगळी आहे असे अजिबात् नाही. आणि आताही मोदी काही वेगळा निर्णय घेतील असे वाटतही नाही.
सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.याविषयी माझ्यासारख्याने काही बोलणे म्हणजे "उंदीर मारायच्या विभागात नोकरीला असून...." यापेक्षा काही वेगळे नाही. तरीही एक गोष्ट नक्कीच लिहितो की जो काही निर्णय होईल त्यात उत्तर प्रदेशातील निवडणुका हा घटक नसावा/नसेल.
19 Sep 2016 - 1:02 pm | विशुमित
<<<<<<<<<<सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.>>>>>>>>>>
फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का?
ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे?
असे व्यक्ती प्रेम किती दिवस बाळगणार आहोत आपण?
19 Sep 2016 - 3:05 pm | गंम्बा
डोवाल नक्कीच थोर असणार, पण लष्करी छावणी वर हातबाँम्ब टाकता येतील इतक्या जवळ अतिरेकी येत असतील म्हणजे अश्या छावण्यांच्या सुरक्षीतते साठी पेट्रोलिंग वगैरे नसते का?
बाप्पु कींवा डॉक्टर खरे सांगु शकतील पण विचित्र वाटले इतके नक्की. भारतीय सैन्य खुप अंडरस्टाफ्फ्ड आहे किंवा प्रचंड स्ट्रेचड आहे असा ही अर्थ निघतो.
19 Sep 2016 - 8:31 pm | सुबोध खरे
लष्करात एक म्हण नेहमी सांगितली जाते.
"जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैन्याला कोणतीही तटबंदी अभेद्य नसते."
जेंव्हा एक दहशतवादी तटबंदी भेदून आत शिरतो तेंव्हा त्याच्या अगोदरचे शंभर दहशतवादी मारले गेलेले असतात/ किंवा त्यांची घुसखोरी नाकाम झालेली असते. हि वस्तुस्थिती जगाच्या समोर मांडण्याची गरज नसते.
दुर्दैवाने दहशतवादयांचे धर्मयोद्धा म्हणून मानसिक ध्रुवीकरण झालेले आहे आणि ते अशा मरणाला भीत नाहीत तेंव्हा "निर्भय" माणूस हा जास्त धोकादायक असतो.
उडी हे गाव एखाद्या सुळक्यासारखे पाकिस्तानच्या सरहद्दीच्या घुसलेले आहे त्यामुळे तेथील लष्करी तळ हा तीन बाजूनी पाकिस्तानी भूमीने घेरलेला आहे. एका बाजूला तर ते अंतर केवळ ६ किमी इतके कमी आहे. पूर्णपणे सशस्त्र असे दहशतवादी जेंव्हा आत घुसतात तेंव्हा पाकिस्तानी सैन्याचा जोरदार गोळीबार चालू होतो. आपले सैनिक त्यांना प्रत्युत्तर देतात. या धुमश्चक्रीत काही लोक आत घुसतात आणि काही मारले जातात. मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंगावर पेलेटने पाकिस्तानी भडीमार करतात आणि हि प्रेते तुमच्या हद्दीत "लष्कराने कृत्रिम चकमकीत मारलेले नागरिक" म्हणून उभे केले जातात याला अर्थात काश्मीर मधील फुटीरांची फूस असतेच.
जगाची पाहण्याची दृष्टी अशीच आहे कि हा एक दहशतवादी तरी आत घुसलाच कसा? काश्मीर मध्ये दर शंभर मीटर वर एक सैनिक उभा आहे तर हे दहशतवादी घुसतातच कसे? ( पाकिस्तान बरोबर आपली सीमा २९०० किमी आहे. तेही नुसती गस्त घालण्यासाठी ८ तासाला एक आणि एक सुटी साठी असे ४ सैनिक प्रत्येक १०० मीटर साठी उभे केले तर १लाख १६ हजार सैनिक "फक्त" गस्त घालण्यासाठी उभे ठेवावे लागतील हा विचार केलेलाच नाही)
आम्ही कर भरतो त्यावरच लष्कराचे पोट भरते मग असा हलगर्जी पणा कसा होतो. अशा तर्हेचे प्रश्न मिपावरच विचारले गेले आहेत. यातील बरेच प्रश्न हे शुद्ध अज्ञानापोटी विचारले गेले आहेत आणि काही आकसापोटी. म्हणून त्यांच्याशी वितंडवाद घालण्याचा मी प्रयत्न केला नाही कि करतही नाही.
इथे मूळ मुद्दा दहशतवादी हा नसून त्याला मिळणारी पाकिस्तानी लष्कराची छुपी मदत हा मुद्दा आहे. ती मदत नसती तर १००० पैकी एखादा दहशतवादी आत घुसला असता.
सिमी किंवा आय एस आय एस सारख्या संघटनांचे "निद्रिस्त सेल" भारतातील शहरातही आहेत. तेंव्हा केवळ तटबंदी नव्हे तर सगळा देश सुरक्षित करणे आवश्यक आहे.
पण आपली जनता फुकट मिळणार्या वीज आणि पाण्यासाठी मत देते किंवा जातीच्या नावावर मत देते किंवा याकूब मेमन सारख्या देशद्रोहाच्या गुन्हेगाराला हुतात्मा म्हणते. स्वतःचे पाच पैसे वाचावेत किंवा स्वतःच्या आरामात कोणताही फरक होऊ नये म्हणून काहीही करायला तयार असते.आपली जनता १००० रुपये दिले तर दाऊद इब्राहिम ला मते द्यायला तयार होईल हे मला खेदाने म्हणावेसे वाटते.
छप्पन लप्पन करून कर चुकवण्याला "हुशारी" मानते अशा जनतेने हे समजून घेणे आवश्यक आहे कि युद्ध हे शस्त्राने किंवा लष्करी सामर्थ्याने जिंकता येत नाही तर त्या लष्कराच्या मागे उभ्या असलेल्या जनतेच्या अतुलनीय धैर्याने जिंकता येते.
मी माझे कर्तव्य करतो आहे का? शेजारचा माणूस एकही तरी संशयास्पद गोष्टी करतो आहे ते पोलिसांना कळवायच्या ऐवजी कोण त्या लफड्यात पडणार म्हणत असाल तर लष्कराला हे दहशतवादी आत घुसलेच कसे हे विचारण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलेला आहे हे समजून घ्या.
दोन वेळेस ध्वजाला सलाम केला आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जय हिंद म्हणले कि आपली देशभक्ती जाहीर झाली असे चालणार नाही.
असो
बाकी चालू द्या
20 Sep 2016 - 2:53 am | सही रे सई
किती संयमीत शब्दात एकेकाला हाणलत हो तुम्ही.
अश्या अभ्यासपुर्ण तरीही प्रत्येकाची जागा दाखवून देणार्या तुमच्या या लिखाणाची पंखा झाले आहे.
मुजरा घ्यावा महाराजा.
20 Sep 2016 - 10:02 am | गंम्बा
डॉक्टर साहेब, तुमचा प्रतिसाद मला उद्देशुन असला तर पूर्णपणे हुकला आहे.
मीच लिहीले होते की असे हल्ले होऊ शकतात ह्याचा एक अर्थ असा निघतो की भारतीय सैन्य अंडरस्टाफ्फ् आहे. आणि जे आहे ते सुद्धा स्ट्रेच्ड आहे म्हणजे त्यांच्या कपॅसिटी पेक्षा जास्त जबाबदारी निभावायला लागते आहे. त्या बद्दल तुमचे मत विचारले तर तुम्ही मला देशभक्ती आणि नैतिकता शिकवायला लागलात.
सैन्याचा पगार सरकारी नागरी नोकरापेक्षा कमीतकमी दीडपट असावा असे माझे मत आहे.
तुम्ही म्हणता तसे लाखो सैनिक गस्त घालायला लागत असतील तर तसे ते असायला पाहिजेत. त्याचा खर्च बाकीच्या नागरीकांनी केलाच पाहिजे.
त्याही पुढे जाउन असे म्हणीन की , भारतीय सैन्याला जर दिल्लीतले सरकार पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा आणि मनुष्यबळ देत नसेल तर सैन्यानी काश्मीर मधे काम करणे बंद करावे. काश्मीर कशाला सर्वत्र.
20 Sep 2016 - 11:08 am | सुबोध खरे
तो तुम्हाला नव्हताच
29 Sep 2016 - 5:05 pm | भटक्य आणि उनाड
एक नम्बर हाणलात तुम्ही सर....
19 Sep 2016 - 1:24 pm | फेदरवेट साहेब
ममो पंप्र होते तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता म्हणता? का "एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" म्हणले गेले तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता?
19 Sep 2016 - 2:00 pm | प्रसाद_१९८२
"एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू"
हा प्रधान सेवकांचा चुनावी 'जुमला' होता जसे १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतील तसाच हा एक, त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. आणि निवडणुकीत दरम्यान दिलेल्या प्रत्येक घोषणा खर्या(च) असतात व त्या राजकारण्याकडून पूर्ण केल्याच जातील हि अपेक्षा ठेवली तर या देशातून गरिबी तर १९७१ सालीच हटायला हवी होती.
19 Sep 2016 - 2:20 pm | कलंत्री
वो दुध मांगेंगे खीर देंगे,
काश्मिर मांगेंगे तो चीर देंगे.
अशा घोषनानी नकळतच सर्वांचे डोके भडकावले जातात.
पंतप्रधान, सेन्याधिकारी आणि सबळ पक्ष असताना सर्वसामान्य लोकांनी सीमा पार करा, फडशा पाडा असे विचार करणे गैर आहे.
29 Sep 2016 - 2:24 pm | सुबोध खरे
आजच्या हल्ल्याबद्दल काय म्हणायचे आहे
29 Sep 2016 - 2:55 pm | टवाळ कार्टा
डॉक्टरांचा सर्जीकल स्ट्राईक सुरु झाला ;)
29 Sep 2016 - 3:08 pm | अनिरुद्ध.वैद्य
हल्ला झाला तर आपलं कसं अन कायं काय नुस्कान होइल अन युद्धखोरीविरोधी प्रवचन वगैरे करण्यात बिजी आहेत.
19 Sep 2016 - 1:54 pm | कलंत्री
भारत आणि पुरस्कृत हल्ले यात देशाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मागे पडतात.
चिथावणीखोर विचाराने काहीच साध्य होत नाही.
भारत आणि पाकिस्तान यात चांगले संबंध निर्माण व्हायला हवेत.
19 Sep 2016 - 1:58 pm | संदीप डांगे
जवानांना श्रद्धांजली!
नेहमी हेच लिहीत राहण्याची वेळ येते याबद्दल अतीव संताप आणि चीड आहे, त्यापेक्षा जास्त व्यक्तिगत तऱ्हेने मला काहीच करता येत नाही याचीही खंत आहे,
राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
धन्यवाद!
19 Sep 2016 - 2:19 pm | गॅरी ट्रुमन
राजकीय चिखलफेकीसाठी वेगळा धागा असावा याला सहमती आहे.
पण संभाव्य टिकेच्या भितीने मोदी समर्थक व्यथित झाले असतील तर त्याला फाट्यावर मारायला हवे.कुठेतरी लॅप्स असल्याशिवाय अशी घटना घडायची नाही आणि चूक असेल तर टिकाही जरूर व्हावी.हा हल्ला आपल्या सैनिकांवर म्हणजे आपल्या देशावर झालेला आहे.तेव्हा या हल्ल्याविषयी खुलासा मागायचा अधिकार प्रत्येक भारतीयाचा आहे--मग तो/ती मोदी समर्थक असो की नसो.अर्थात यालाही अपवाद आहेतच.ज्यांनी ज्यांनी "भारत देशाचे तुकडे तुकडे व्हावेत--इन्शाल्ला" असल्या अश्लाघ्य प्रकाराचे समर्थन केले होते किंवा त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गोंडस रूप दिले होते त्यांना भारताचे सैनिक मारले गेले याचा आनंदच होईल. तेव्हा असल्या लोकांनी कुठलेही खुलासे मागितले तर ते ढोंग असेल. असे लोक सोडून इतर सर्वांना सरकारकडे खुलासा (नव्हे जाब) मागायचा अधिकार आहे याविषयी शंका नसावी.
19 Sep 2016 - 2:41 pm | संदीप डांगे
सहमत
19 Sep 2016 - 2:58 pm | बोका-ए-आझम
कुठे दिसले तुम्हाला हे व्यथित समर्थक? मिपावर?
19 Sep 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी
इतरांचं माहित नाही, निदान मी तरी टीकेच्या भितीने व्यथित झालेलो नसून माझ्या देशातील २० सैनिकांच्या मॄत्युने व माझ्या देशाच्या हतबलतेने व्यथित झालो आहे. कोणालाही चाहूल लागून न देता सीमा पार करून मोजकेच हल्लेखोर येतात व आपल्या संख्येच्या पाचपट सैनिकांना मारतात व माझा देश अशा सतत होणार्या हल्ल्यांविरूद्ध काहीही करू शकत नाही या निराशेतून व संतापातून मी व्यथित झालो आहे.
19 Sep 2016 - 3:07 pm | विशुमित
+111111 सहमत...!!
19 Sep 2016 - 3:28 pm | बोका-ए-आझम
या सैनिकांच्या शहीद होण्याबद्दल दु:ख होणं स्वाभाविक आहे पण देश हतबल झालाय असं समजणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अशा एका हल्ल्याने डगमगणारा देश अशी ओळख आपल्या देशाची नाहीये आणि होऊही नये. गुप्तचर यंत्रणा असे अनेक हल्ले परतवून लावत असतात,सैनिकही अशा अनेक हल्ल्यांना तोंड देत असतात. एक फिदायीन हल्ला यशस्वी होणं हे सिस्टिमचं अपयश मानणं मला पटत नाही. आपण त्या परिस्थितीला कधीही तोंड दिलेलं नसल्यामुळे कुणाचं चुकलं आणि काय हे आपण ठरवू शकत नाही कारण कशा परिस्थितीत लोक आपलं काम करत आहेत हे आपल्याला माहित नाही. शहीदांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होणं ही एक गोष्ट झाली, पण त्यामुळे व्यथित होणं म्हणजे एकप्रकारे शत्रूचा हेतू साध्य व्हायला मदत करणंच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
19 Sep 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी
कोठेतरी, काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकत आहे. हा हल्ला सरकारचं व सैन्याचं नक्कीच अपयश आहे. उरी सीमेपासून २० किमी आत आहे असं वाचनात येतंय. सीमेपासून इतक्या आत सशस्त्र हल्लेखोर निर्धास्त येऊ शकतात व फक्त ४ जण २० सैनिकांना मारू शकतात ही अत्यंत व्यथित करणारी गोष्ट आहे. सैन्य बेसावध होते, गुत्पचर यंत्रणा बेसावध होत्या व दिल्लीतील राज्यकर्तेसुद्धा बेसावध होते हे कटु सत्य मान्य करायला हवे.
पाकिस्तानच्या बाबतीत आजवर अवलंबलेली सर्व धोरणे संपूर्ण अपयशी ठरली आहेत. मैत्रीचा हात, शांततेची चर्चा, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, सीमेवरील मेणबत्त्या, पाकिस्तानी कलाकारांना देशात पायघड्या, पाकिस्तानला ट्रेन व बसने जोडणे, मोदींची सरप्राईझ व्हिसिट, वाजपेयींचा बसने प्रवास, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, २००२ व २००३ मध्ये भारताने पाकिस्तानवर घातलेले निर्बंध, एकमेकांना आंबे व साड्यांची भेट, पाकिस्तानच्या तथाकथित बुद्धिजिवी विचारवंताबरोबरचा तथाकथित भारतीय बुद्धिजिवी विचारवंतांचा संवाद, भारताचे तथाकथित कठोर इशारे . . . काहीही केले तरी पाकिस्तानचे हल्ले थांबत नाहीत व त्यामुळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी थांबत नाही.
पा़किस्तान हा भारताचा शत्रू असून भारत नष्ट करणे हेच या देशाचे ध्येय आहे हे अजूनही भारत मान्य करायला तयार नाही. भारताने झोपेचे सोंग घेतले आहे व ते अत्यंत घातक आहे.
ही सर्व परिस्थिती अत्यंत निराशाजनक व अत्यंत संतापजनक आहे.
कालच्या हल्ल्यानंतर लगेच, "भारताने घाईघाईत कारवाईचा निर्णय घेऊ नये, युद्ध झाले तर ते दोन्ही देशांना परवडणार नाही, पाकिस्तान अण्वस्त्रे वापरू शकतो, हल्ला झाला तरी शांतता चर्चा सुरू रहायलाच हवी" अशा प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीच आहे. आजवर जे जे केले ते व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे आता जुनेच मार्ग पुन्हा एकदा नव्याने चोखाळून काहीही साध्य होणार नाही.
सद्यपरिस्थितीत लष्करी कारवाई हा एकमेव उपाय शिल्लक आहे असं दिसतंय. हा उपाय कसा करायचा हे लष्करालाच ठरवावे लागेल. हा उपाय कितीही कटु व महागडा वाटत असला तरी हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी दुसरा कोणताही उपाय शिल्लक नाही. भारत आजपर्यंत हा उपाय टाळत आलेला आहे. परंतु हा अंतिम उपाय वापरायचा नसेल तर जैसे थे परिस्थिती सुरू राहील. पाकिस्तानी दहशतवादी, हल्लेखोर हल्ले करतच राहतील, आपण निषेध करतच राहू, चर्चा वगैरे मार्गाने प्रश्न सुटतील या भ्रमातच राहू.
19 Sep 2016 - 3:18 pm | मराठी कथालेखक
लोकसत्ता मधील २२ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला हा लेख दखल घेण्याजोगा आहे
19 Sep 2016 - 4:07 pm | यशोधरा
आता 18. एका जवानाचा उपचारांदम्यान मृत्यू... :(
19 Sep 2016 - 7:23 pm | _मनश्री_
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
19 Sep 2016 - 7:30 pm | शाम भागवत
आपल्या Deep Asset ची काही पंप्रच्या कारकिर्दीत (मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रतापसिंग व गुजराल) पुरती वाट लावून टाकली होती. मला वाटते की त्या बाबत खूप काही प्रगती साधली गेली असावी व आता लवकरच त्याचा उपयोग सुरू होईल.
19 Sep 2016 - 9:08 pm | श्रीगुरुजी
पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ वेगवेगळ्या स्तरावर काम करीत आहे.
१) पाकिस्तानी लष्कर - सातत्याने सीमेवर गोळीबार, भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांवर हल्ले, दहशतवादी संघटनांना व आत्मघातकी हल्लेखोरांना शस्त्रे, प्रशिक्षण व इतर सर्व प्रकारची मदत देणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया सुरू ठेवते.
२) लष्करे तोयबा, जैशे महंमद सारख्या दहशतवादी संघटना - या संघटना धार्मिक ब्रेनवॉशिंग करून दहशतवादी तयार करतात, प्रशिक्षण देतात, आत्मघातकी हल्ल्याचे नियोजन करून प्रत्यक्ष हल्ले घडवून आणतात, भारतात दहशतवादी घुसवून बॉम्फस्फोट, गोळीबार इ. मार्गाने दहशत निर्माण करतात.
३) पाकिस्तानी राज्यकर्ते - भारताबरोबर चर्चेचे नाटक करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरूद्ध मोहीम चालविणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शस्त्रे विकत घेऊन ती भारताविरूद्ध वापरणे, अण्वस्त्रे कार्यक्रम, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, भारतविरोधी कारवाया करणार्या भारतीय व पाकिस्तानी दहशतवाद्यांना राजकीय, आर्थिक इ. सर्व प्रकारचा पाठिंबा देणे इ. मार्गाने पाकिस्तानी राज्यकर्ते भारतविरोधी मोहीम सुरू ठेवतात.
४) तथाकथित पाकिस्तानी बुद्धिवंत, कलाकार - यांचे काम म्हणजे भारतातील पाकिस्तानविरोधाची धार बोथट करणे. हे करण्यासाठी स्वतः वारंवार भारताला भेटी देऊन आम्ही ट्रॅक २ डिप्लोमसी करीत आहोत, शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत असा आव आणणे; भारत-पाकिस्तान प्रश्न हा राजकारण्यांनी निर्माण केला असून सामान्य जनतेला यात रस नाही, सामान्य जनतेला मैत्री हवी आहे असा भ्रम पसरविणे; पाकिस्तानप्रेमी तथाकथित भारतीय बुद्दिजिवींना पाकिस्तानात बोलावून त्यांचा पाहुणचार करणे जेणेकरून ते भारतात परत गेल्यावर पाकिस्तानविषयी चांगले बोलतील, पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटात काम करणे व गाणी म्हणणे, गुलाम अली सारख्यांनी सातत्याने भारतात मैफिली आयोजित करून पाकिस्तान विरोधाची धार बोथट करणे इ. मार्गाने हे भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. दुर्दैवाने भारतीय जनता, भारतीय माध्यमे आणि तथाकथित भारतीय विचारवंत यांचा पवित्रा ओळखू शकलेले नाहीत. १८५७ चा उठाव, १८७१ मधील वासुदेत बळवंत फडके यांचा सशस्त्र लढा इ. हिंसक लढ्यामुळे पोळलेल्या ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. हिंसक प्रतिकार करण्याऐवजी निषेधाचा ठराव, लोकशाही मार्गाने मागण्या करणे इ. भुरळ पाडणार्या गोष्टींची चटक त्यांनी भारतीयांना लावली. अगदी तसेच पाकिस्तान करीत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्याचा विचार सुरू होते, भारतातील तथाकथित विचारवंत लष्करी कारवाईला विरोध करून चर्चेच्या माध्यमाने प्रश्न सोडवावा, युद्ध परवडणारे नाही, काश्मिरला स्वायत्तता द्यावी, दोन्ही देशातील जनतेचा संपर्क वाढल्यास प्रश्न सुटेल इ. मागण्या पुढे करून कारवाईच्या विरोधात वातावरण निर्माण करतात.
दुर्दैवाने भारत या सर्व स्तरांवर फसलेला आहे. भारत कधी पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी चर्चा करू पाहतो, तर कधी पाकिस्तानवर निर्बंध घालू पाहतो, तर कधी दहशतवाद्यांविरूद्ध कडक पावले उचलू पाहतो. यातील कोणत्याही धोरणात सातत्य नाही. सद्यपरिस्थितीत युद्ध हा एकमेव पर्याय शिल्लक आहे.
सर्वसामान्य नागरिक पाकिस्तानविरूद्ध थोडेफार करू शकतो. पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे, गुलाम अली व इतर पाकिस्तानी गायकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, त्यांच्या गाण्यांच्या सीडीज, डीव्हिडीज विकत न घेणे, परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकाने व पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये न जाणे इ. मार्गाने आपण निदान थोडेतरी पाकिस्तानविरूद्ध करू शकतो.
19 Sep 2016 - 9:25 pm | आजानुकर्ण
अगदी लोलियत प्रतिसाद.
:) #मिसिंगलोळणारीस्मायली
हहपोदु. गेलाबाजार पाकिस्तानचे सर्वात मोठे मदतगार जे की अमेरिका आणि चीन यांच्या विरोधात अमेरिकन रेष्टारंटे आणि चायनीज ठेल्यावर खाणेही बंद करण्याचा प्रस्ताव मी मांडतो.
(गंभीर विषयावरील वरचा हास्यास्पद प्रतिसाद वाचल्याने राहवले नाही याबद्दल क्षमस्व.)
19 Sep 2016 - 10:56 pm | श्रीगुरुजी
मला मात्र हा प्रतिसाद वाचून प्रतिसादकर्त्याची कीव आली.
20 Sep 2016 - 10:06 am | अनुप ढेरे
चायनीज खाण्यावर बंदी घातलीच पाहिजे!
(गुलाम अली फ्यान)
अनुप
21 Sep 2016 - 7:18 am | साहना
चिनी गळ्याचा शर्ट/कोट घालणे मोदींनी आणि पर्रीकरांनी राष्ट्रहित लक्षांत घेऊन तात्काळ बंद करावे असाही कडक इशारा आम्ही मोदींना देत आहोत.
21 Sep 2016 - 7:20 am | साहना
> ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.
पण आज काल प्रयत्नांत संघाने काँग्रेसला चारी मुंड्या चिट केले आहे.
आमचे सजेशन :
वेदिक विद्यापीठ काढून आपली जुनी ब्रम्हास्त्र, पराजन्यस्त्र इत्यादी पुन्हा शोधून काढावीत.
21 Sep 2016 - 10:27 pm | अशोक पतिल
अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन !
तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल .
परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.
21 Sep 2016 - 10:28 pm | अशोक पतिल
@ श्री गुरुजी
अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन !
तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल .
परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.
19 Sep 2016 - 11:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
विशाल व्यास:
सैनिक म्हणजे नाटकातला
समरधुरंधर आम्हा दिसतो
लीलेने भवपाश तोडूनी
जो गनिमांच्या फळीत घुसतो
पीळ मिशीला भरून म्हणतो – या या सारे
माय कुणाची व्याली – वगैरे
उडवुनी चटणी शत शत्रूंची
( पिटाकडे पाहून जरासा
गाली हसतो )
आणि रेल्वेमध्ये जेधवा
विटकी खाकी पेहरणारे
तुटक्या द्रोणातील वड्यांचे दही पिणारे
दोहे अथवा अभंग ओवी गुणगुणणारे
असे शिपाई सहज भेटती
देत जांभया त्रस्त स्वराने
आम्हा म्हणती –
भली नोकरी कारकुनाची
पगार घ्यावा मेजावरती
दिवस रजेचे किती तयाला
नाही गणती
या फौजेचा कठीण पेशा
शिस्तीचे वरवंटे माथा सदैव फिरती
मुलामाणसांपासून लागे दूर जावया
आणिक हे म्हणताना डोळे
किंचित भिजती
वीररूप हे असले पाहून
पांढरपेशा श्रद्धा आमुच्या
( थिएटरातील बनावटीच्या )
विचलीत होती
व्यथित होऊनी परस्परांना आम्ही पुसतो
काय शिपाई असेच असती !
होय शिपाई असेच असती,
परंतू आम्हा उपजत नाही
ते हे -
नाटकातल्या त्या शूराला
नसते तेथे मरावयाचे
असते केवळ टाळीसाठी
विरात्वाने स्फुरावयाचे
पायदिवे विझल्यावर आणिक
घरी जाउनी दुलईमध्ये
शिरावयाचे !
रेलवेतला सैनिक पण हा –
करांत त्याच्या दहीवड्याचा द्रोण असु द्या
स्वरात त्याच्या तक्रारीचा भाव दिसु द्या
मुलेमाणसे म्हणता त्याचे नेत्र भिजुद्या
जेव्हा आपुली (टिनोपालची)
मुलकी दुनिया सोडूनी जातो
रणगाडे, तोफा, तंबुंच्या जगात अपुली
जागा घेतो
गळुनी पडती सर्व जांभया
तक्रारीचा स्वरही विरतो
दुरस्थातील आप्तजनाचा
आठव तेथे विद्ध न करतो
मळकट कवचे (रेलवेतली) फुटून पडती
आणि सनातन पुरुषार्थाचा
सोलीव गाभा युद्धतळावर उभा राहतो.
तोच रेलवेतला शिपाई
अग्नीचे घन लोळ भोवती बरसत असता
अविचल दृष्टी समोर बांधून
गोळे भरतो,
खंदकातल्या भाईसाठी
घास आपुला दूर सारतो,
शरीर पिंजून गेले तरीही
हात उभारून अशरण वरती
या भूमीवर कोसळणारे
गगनाचे छत
रोखुनी धरतो
- कुसुमाग्रज
20 Sep 2016 - 1:28 am | साहना
"झाले बहू होतील बहू" हे वाचन पाकिस्तानी हल्ल्यानं लागू पडते तसेच आमच्या नाकर्त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा लागू पडते.
20 Sep 2016 - 1:54 am | एरन्दोल्कर
पाकिस्तान हा अतीशय तुकार देश आहे.
ते आप्ले शेजरि आहेत हे आप्ले दुर्भाग्य आहे.
20 Sep 2016 - 3:30 am | च्यायला
काय सन्गता?
20 Sep 2016 - 3:30 am | अर्धवटराव
शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली. इतर कोणि इतर आठवण करो वा न करो, जेंव्हा केंव्हा युद्धभूमीवर आपले सैन्य शत्रुशी भिडेल तेंव्हा प्रत्येक जवान अशाच वीरमरण पत्करलेल्या आपल्या बांधवांची आठवण काढुन चवताळुन हात चालवेल.
एरवी काडिची किंमत देण्याचा लायकीचा नसलेला आपला शेजारी देश अशा प्रसंगी भारताला आपल्या पातळीवर आणुन उभा करतो व त्याची दखल घ्यायला भाग पाडतो... इतकी कि आपले आपले सर्व व्यवहार, चिंता, प्रॉब्लेम्स बाजुला सरतात व या शेजार्याचा खात्मा करायचा एकमेव उद्देश भारतीयांच्या दिवास्वप्नात चमकुन जातो.
असो. सरकार व इतर संबंधीत यंत्रणा काय योग्य ते करेलच. असे जीव जाणं मानाला चटका लाऊन जातं मात्रं.
20 Sep 2016 - 9:26 am | आनन्दिता
प्रचंड दु:ख देणारी बातमी. जीव अगदी तळमळून गेला. अशा अजुन किती विरांना आपल्या अमुल्य प्राणांची आहुती द्यावी लागणार आहे काय माहीत! :'(
20 Sep 2016 - 3:53 pm | मदनबाण
शहिदांना आदरांजली !
आपल्या देशाच्या आत येउन आपल्याच देशाच्या जवांना ठार मारण्याचे भ्याड कॄत्य पाकिस्तान त्याच्या प्रॉक्सीवॉरच्या माध्यमातुन करु शकला आहे ! या प्रॉक्सीवॉरला आपण अजुनही उत्तर देउ शकलो नाही ही दुर्भाग्यपुर्ण गोष्ट आहे !
डोंन्ट टॉक, जस्ट रिटालिएट...
या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा.
यावर अधिक इथे :-
Mending Pakistan’s behaviour
Securing the Indus treaty
रशियाकडुन शस्त्रे घ्या आणि ती बलुचिस्तान मध्ये पसरवा...हा उपाय पण चांगला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast
20 Sep 2016 - 5:05 pm | मदनबाण
I wish to ask the Prime Minister, are you not weak? If indeed you are a strong government, the country needs proof of that.
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2009
माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण मनपोहन सिंग व्हर्जन २ आहात काय ?
आता जर मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला नाही तर भाजपाचे "बुरे दिन" मात्र नक्कीच सुरु होतील !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast
21 Sep 2016 - 12:07 am | श्रीगुरुजी
पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच हा एक नवीन हल्ला होता. पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच यावेळीही लष्कर काही प्रमाणात गाफील होते असं वाटतंय. पूर्वीच्या अनेक हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांचं प्रमाण हल्लेखोरांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होतं. आणि ज्याप्रमाणे पूर्वीच्या असंख्य हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारला फारसं काहीच करता आलं नव्हतं, तसंच यावेळीही मोदी, पर्रीकर काहीही करू शकणार नाहीत हे नक्की (कडक इशारे, निषेध इ. नेहमीप्रमाणे होईलच).
जर नेहमी देण्यात येणारे कडक इशारे, निषेधाचे ठराव, पुतळे/झेंडे जाळणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या वल्गना इ. व्यतिरिक्त काही भरीव कृती झाली तरच मोदींचं वेगळेपण दिसून येईल आणि निदान याबाबतीत तरी असे होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.
21 Sep 2016 - 12:55 am | अमितदादा
पूर्ण सहमत. Indus Water Treaty हा भारताच्या हातात असणारे हुकमी पत्ता आहे पण राज्यकर्ते किती निर्भीड आहेत त्यावर अवलंबून आहे . आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव हटविण्यासाठी हे गुपचूप व्हायला हवं .
20 Sep 2016 - 11:40 pm | John McClain
परिस्थिती भरपूर complex वाटतेय...
हा एक ब्लॉग वाचण्यात आला.
चांगलं वाटतंय(खरं खोट खात्री नाही... पण practical वाटतंय)
खालचे काही comments पण चांगले आहेत...
एकाच म्हणणं आहे कि चीन ने पैसे देऊन भीती पसरवणे चालू केले आहे ☺
http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factorie...
21 Sep 2016 - 10:11 am | पैसा
अजून किती? का सगळे जग शांततामय धर्माच्या वाटेवर जाईपर्यंत हे चालूच रहाणार?
आता सकाळी परवेझ मुशर्रफची मुलाखत बघताना टीव्हीवर चप्पल फेकून मारावीशी वाटत होती.
21 Sep 2016 - 11:40 am | गॅरी ट्रुमन
सगळे जग शांततेच्या धर्माच्या वाटेवर गेले तरीही हे प्रकार संपायचे नाहीत.कारण सतत इतर कोणाचा द्वेष करणारे लोक शत्रू संपले की आपापासतातच द्वेष करायला लागतात-- पाकड्यांनी बांगलादेशात जे केले तेच ते आज बलुचिस्तानात करत आहेत. तरीही शांतताप्रिय लोकांचा भळभळती हृदये असलेल्या सर्वांनाच कळवळा आहेच. तेव्हा कधीनाकधी हे होणारच आहे आणि त्या वाटेवर जगाला लवकरात लवकर घेऊन जाण्यात मदत करायला मानवतावादाचा कळवळा आलेले युरोपिअन्स बसले आहेतच. मेर्केलबाईंनी कोणाला घरात घेतले आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे समोर दिसतच आहे.आजही अती मानवतावादी ओबामा दुप्पट शरणार्थी घ्यायची भाषा करतच आहेत.
21 Sep 2016 - 11:51 am | स्वाती दिनेश
आता संयमाची हद्द झाली आहे.
स्वाती
21 Sep 2016 - 11:33 am | गॅरी ट्रुमन
एकंदरीत पाकड्यांबरोबर डिल करताना आपण विनाकारण सॉफ्ट कॉर्नर दाखवत आलो होतोच आणि काही प्रमाणात त्यांचे नशीबही चांगले होते.
१९७७ मध्ये झियांनी सत्ता काबीज केल्यानंतर झिया आणि पाकिस्तानही जगाच्या दृष्टीने pariah झाले होते.अशावेळी जनता सरकार झियांच्या प्रेमात पडल्याप्रमाणे वागू लागले. फेब्रुवारी १९७८ मध्ये परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते आणि "यापुढे भारत पाकिस्तानला हरवेल केवळ हॉकीच्या मैदानात" असे काहीसे बोलले होते.पुढे भारत-पाकिस्तान हॉकीचे सामनेही झाले.महिन्याभरातच भारत सरकारच्या निमंत्रणावरून झियांचे मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रेटर आमीर मोहम्मद भारत दौर्यावर आले होते. झियांशी फोनवर बोलताना मोरारजी देसाईंनी भोळसटपणे रॉच्या पाकिस्तानातील कारवायांसंबंधी माहिती दिली होती आणि त्यानंतर झियांनी ताबडतोब त्यावर कारवाई केली असेही म्हटले जाते. म्हणजे जगाच्या दृष्टीने झिया pariah ठरलेले असताना आपण मात्र त्यांना एका अर्थी लेजिटिमसी देत होतो. पुढे १९७९ मध्ये रशिया अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तान आणि झिया "दहशतवादविरोधी" लढाईत अगदीच महत्वाची प्यादी ठरली. झियांचा pariah पणा त्यांच्या नशिबाने आपोआप नाहिसा झाला.
१९९९ मध्ये मुशर्रफांनी सत्ता काबीज केल्यानंतरही मुशर्रफ आणि पाकिस्तान जगाच्या दृष्टीने pariah ठरले होते. २००० साली अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन पाकिस्तानला ४-५ तासांसाठी गेले होते.त्यावेळी मुशर्रफ यांच्याशी जाहिरपणे हस्तांदोलन करणेही बिल क्लिंटन यांनी टाळायचा प्रयत्न केला होता.अशावेळी आपणच पुढाकार घेऊन मुशर्रफना आग्रा परिषदेसाठी बोलावले.त्यापूर्वी मुशर्रफ पाकिस्तानात सत्ताधारी असले तरी त्यांचे पद "अध्यक्ष" असे नव्हते तर "चीफ एक्झेक्युटिव्ह" असे होते आणि नामधारी अध्यक्ष म्हणून रफिक महंमद तरार होते. अशावेळी प्रोटोकॉलचा प्रश्न येऊ नये म्हणून मुशर्रफनी तरारला हटवून स्वतः अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. एका अर्थी सगळे जग मुशर्रफला टाळत असताना मुशर्रफला लिजिटिमसी आपण मिळवून देण्यात वाटा उचलला. पुढे ९/११ झाले आणि परत एकदा पाकिस्तान आणि मुशर्रफ पाश्चिमात्य सरकारांच्या गळ्यातले ताईत बनले.
आताही जग पाकिस्तानला टाळत आहे अशा बातम्या येत आहेत.अशावेळी फालतूचे मानवतावादाचे भरते येऊन जी चूक जनता आणि वाजपेयी सरकारने केली होती ती परत मोदी सरकार करणार नाही ही अपेक्षा. आणि हो-- अफगाणिस्तानमध्ये रशिया घुसणे किंवा ९/११ सारखी आणखी एखादी घटना घडून परत पाकिस्तान फ्रंटलाईन स्टेट बनणार नाही अशीही इच्छा.
21 Sep 2016 - 1:00 pm | पैसा
मोस्ट फेवर्ड नेशनचा घोळ वाचून हाताची बोटे काय अख्खा हात तोंडात घातला आहे. पाकिस्तान जर बदल्यात काही सवलती देत नसेल तर पाकिस्तानातून माल आयात करणे आणि सवलती अशी दुहेरी मदत कशाला चालू आहे? त्या पैशांवर पोसलेले अतिरेकी आपल्याकडे येऊन वाट्टेल तो गोंधळ घालतात. म्हणजे हा दहशतवाद पोसायला अंतिमतः आपलाही हातभार लागतोच आहे. प्रत्यक्ष लढाई करण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांची आर्थिक नाकेबंदी का करायचा प्रयत्न होत नाही?
21 Sep 2016 - 2:16 pm | संदीप डांगे
हे आर्थिक नाकबंदीबद्दल मी मागेही बरेचदा बोललो आहे पण कुणी उत्तर दिलं नाही अजून पर्यन्त, काय मजबुरी आहे नक्की?
21 Sep 2016 - 2:22 pm | अनुप ढेरे
आयात करण्यात आयात करणार्यांचा फायदा असतो.
21 Sep 2016 - 2:26 pm | पैसा
त्यांची तेवढी निर्यात होते आणि त्याना पैसे मिळतात. ते एका फटक्यात बंद होईल ना. सडू दे त्यांचा माल तिकडे. ते नको असेल तर तिथल्या लोकानी त्यांच्या सरकारला शिव्या द्याव्यात.
22 Sep 2016 - 2:59 pm | अनुप ढेरे
पाकला त्रास द्यायला आपण का त्रास करून घ्यायचा?
हे वाचा.
http://www.livemint.com/Opinion/AJyJYJD4vnAvyCysxxphTN/Mending-Pakistans...
हा उपाय छान वाटतो आहे.
21 Sep 2016 - 11:41 pm | नितिन थत्ते
वर उल्लेखलेली दोन्ही सरकारं........
21 Sep 2016 - 1:11 pm | मदनबाण
हा हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयाच्या संकुलाजवळ असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये लपून संपूर्ण परिसराची नीट टेहळणी केली होती. एनआयएच्या सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यादरम्यान मुख्यालयातील स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये लागलेल्या आगीमुळे सर्वाधिक जवानांचा मृत्यू झाला. मुख्यालयाच्या परिसरात दोन इमारती आहेत. हल्ल्याच्यावेळी आग लागल्यानंतर कोणालाही पळून जाता येऊ नये यासाठी दहशतवाद्यांनी बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. यावरून दहशतवाद्यांना याठिकाणची सखोल माहिती असल्याचे सिद्ध होत आहे.
थोडक्यात आपल्या तरुण कोवळ्या जवानांना या अतिरेक्यांनी जाळुन मारले ! :(
हे जवान कुठल्या लढाईत मारले गेले नाहीत किंवा गोळ्या झाडतानाही ते शहिद झाले नाहीत.दहशदवादी खानावळीत आत पर्यंत पोहचले होते ! यावरुन आपण काय बोध घेतला पाहिजे ?
संदर्भ :- Uri attack probe : दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांना स्वयंपाकघरात कोंडले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism
21 Sep 2016 - 2:29 pm | संदीप डांगे
ह्याचाच तीव्र संताप आहे बाणराव, प्रतिकाराची संधी ना मिळता संपून जाणे कसे असते ते शब्दात नाही वर्णू शकत,
काही लोक युद्धच्या विरुद्ध आहेत पण यारो, मरणारे सैनिक आपल्याच रक्ताचे नातेवाईक आहेत. भावनेच्या भरात काही करू नये, गप्प बसावे हे चीड आणणारे आहे, ह्या तमाम जगात फक्त आपल्याच देशाला सारासार विचार करण्याची काय गरज पडते नेहमी नेहमी हेच माझ्या आकलनाच्या बाहेर आहे, प्रतिकार करायचा नसेल तर ती शस्त्रसज्ज सेना, आयुधे, यंत्रे का काचेच्या कपाटात सजवून ठेवायला आहे काय? असेच हकनाक मरत राहण्यापेक्षा त्यांनाहि घरी पाठवा, आपण सगळे आपल्या मुलंबाळं सोबत घेऊन मरून जाऊ, ते जे काही अणुबॉम्ब मिसाईल बनवले आहेत ते आपल्याच देशावर टाकून संपवून टाका हा शेळपट देश, काही गरज नाही अशा अवस्थेत जगायची,
21 Sep 2016 - 2:08 pm | मदनबाण
या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा.
यावर अधिक इथे :-
Mending Pakistan’s behaviour
Securing the Indus treaty
काल या संबंधात टिपण्णी केली होती आणि ब्रह्मा चेलानी यांच्या लेखाचे दुवे दिले आहेत, याच आशया वरचा लेख आत्ताच दिसला तो खाली देत आहे.
‘उरी’नंतर उरलेली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism
21 Sep 2016 - 2:27 pm | पैसा
करून टाका त्यांचे पाणी बंद.
21 Sep 2016 - 2:17 pm | जेसीना
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे.
तिथे रशिया, फ्रान्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ने आपल्याला पाठिंबा देऊन , आपण जे पाऊल उचलू त्यात ते सहकार्य असल्याचा दर्शवलंय.
हळू हळू पुन्हा एकदा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारखे दोन गट पडण्यास सुरवात झाली आहे.
भारताने अजून पर्यंत कधीच कोणत्याच देशात आपले सैन्य घुसवले नाही हा अजून पर्यंतचा इतिहास आहे, उरी ची घटना अशा वेळी घडली आहे कि पठाणकोट ची जखम ताजी असतानाच परत पाकिस्तान ने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भारताला खूप विचार करून पुढची पावला उचलायची आहेत.
आपले एक चुकीचा पाऊल उचलायची पाकिस्तान खूप वर्षांपासून वाट बघतो आहे, एक चुकीचा पाऊल उचलण्याच्या लगेच दोन किंवा तीन देशांमध्ये सरळ सरळ युद्ध भडकू शकते. आणि हे युद्ध कदाचित सरळ सरळ अणुयुद्ध असू शकते. कदाचित तिसऱ्या महायुद्धाची नांदीच सुरु होऊ शकते.
खूप कठीण काळ चालू आहे, अमेरिका खूपच भयानक अशा आर्थिक स्थितीतून जात आहे, रशिया आणि चीन दोघांना पण सुपर पॉवर बनण्याची घाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत भारत नक्की कोणता पाऊल उचलतोय तिथे मला वाटते सगळ्या जगाचे आणि आपल्या सगळ्या भारतीयांचे लक्ष लागलेले आहे.
मला वाटते हा प्रश्न फक्त आणि फक्त पाकिस्तानची आर्थिक कोंडी , आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची सर्व बाजूने कोंडी करून त्यांना एकाकी पडूनच सुटू शकतो असा वाटते.
कदाचित मोदी आणि त्यांचे सहकारी येणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या सभे पर्यंत वाट बघतील त्यात पाकिस्तान ची सर्व बाजूने कोंडी करता येईल असा प्रयत्न करतील आणि नंतरच योग्य तो निर्णय घेतील. म्हणून कदाचित अजून पर्यंत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीयेत (फक्त बैठकांशिवाय).
मी तरी सध्या फक्त काहीतरी चांगल्या निर्णयाची वाट बघते आहे, बस माझ्या भारत मातेला आणि तिच्या रक्षण कर्त्यांना अजून इजा पोहोचू नये ह्यासाठी प्रार्थना करतेय.
तरी सुद्धा खूप खूप दुःखद मानाने माझ्या शहीद झालेल्या भारत रत्नांना भावपूर्ण श्रद्धांजली.
भारत माता कि जय ....... जय हिंद
21 Sep 2016 - 3:01 pm | श्रीगुरुजी
प्रत्येक वेळी असा हल्ला झाला की लगेच भारताने युद्ध सुरू करावे, सीमा ओलांडून दुश्मनांचा खात्मा करावा अशी भाषा सुरू होते. त्याबरोबर लगेच अशीही भाषा सुरू होते की युद्धाची तयारी करायला अजून काही महिने लागतील, आताच युद्ध सुरू केले तर ते आत्मघातकी ठरेल. त्यामुळे बराच काळ काहीच न करता निघून जातो. तोपर्यंत आधीच्या हल्ल्याच्या स्मृती क्षीण होतात आणि मग पुन्हा एक नवीन हल्ला होऊन पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती येते. अगदी अल्प सूचनेवरून युद्ध सुरू करता येईल अशी स्थिती भारताला आणता येईल का?
22 Sep 2016 - 7:20 am | अनन्त अवधुत
मुख्य प्रसार माध्यमात अजून दिसली नाही पाक व्याप्त काश्मिरात हल्ला
21 Sep 2016 - 2:28 pm | मदनबाण
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे.
पाकिस्तानने आपल्याला घाबरले पाहिजे कि आपण पाकिस्तानला ? लष्कराने पाकव्याप्त काश्मिर सरळ काबीज करावे कारण तो आपलाच भाग आहे, मग आपण कशाला मागे-पुढे पहायचे ? पाकिस्ताने कंबरडे चांगले मोडले की चीन सुद्धा १० वेळा विचार करेल ! घी जब सीधी उंगली से ना निकले, तो उंगली तेढी करनी पडती है |
पाकिस्तान अतिरेकी पाठवत राहणार आपल्या सैनिकांची मुंडकी छाटणार, त्यांना जाळुन मारणार तरी आपण गप्पच बसायचे ? का ?आत्ता पर्यंत फक्त रशिया आणि फ्रान्स आपल्या बाजुने बोलताना आणि प्रत्यक्ष कॄती करताना लगेच दिसले. चीन काय करेल किंवा दुसरा क्ष देश आपल्या मदत करेल असे विचार कशासाठी ? देश आपला आहे, काश्मिर आपले आहे, पाक व्याप्त काशिमर सुद्धा आपलेच आहे असं असताना सरळ सैन्याला मोकळीक ध्या.
युद्ध आपल्यावर लादले जात असेल तर त्याला आपण तोंड दिलेच पाहिजे, इतके मिसाइल्स आपण टेस्ट करतो त्या काय फक्त नावासाठीच आहेत काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism
21 Sep 2016 - 11:39 pm | नितिन थत्ते
>>जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे ....
ही गुंतवणूक मे २०१४ नंतर झाली आहे का?
22 Sep 2016 - 12:08 am | अर्धवटराव
तो धोंडा भारताच्या पायाला बांधुन भारताला जखडुन ठेवावं, शक्य असल्यास बुडवावं हे ड्रॅगनचं तत्व. अंकल सॅम भारत-चीन संबंधी हेच स्वप्न बघत असणार. भारताने आता पाकिस्तानवरुन लक्ष्य पूर्णपणे काढुन सगळा जोर ड्रॅगन विरुद्ध लावावा. आपली फायनल लढाई, बँकेत आणि झालच तर रणांगणावर, ड्रॅगनशीच होणार आहे. मालकाचा हात पिळला तर तो आपोआप आपलं कुत्रं आवरेल.
22 Sep 2016 - 7:44 am | पिलीयन रायडर
मला इथली चर्चा वाचुन अजुन वाईट वाटायला लागलंय. १८ जण तर गेलेच, पण अजुनही आपण इतके ढिम्म कसे??? ... युद्ध करा असेही म्हणवत नाही पण काही तरी कराच राव आता.. खुपच झालंय... :(
22 Sep 2016 - 7:56 am | चौकटराजा
आजची बातमी वर्मानपत्रात अशी आहे की पर्रीकराना आपल्या सैन्यात काही गफलत झाली असावी अशी शंका आली आहे. आपण हुतात्मा मेणबत्ती यांच्या नादाला लागून वास्तवाचे भान ठेवत नाही. संतापापेक्षा शरमेची भावना अधिक आली पाहिजे. एक एक ने दस दस मारे हे काव्यात लिहिणे ठीक असते. पण तसे होते का ? गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या. मुठभर दहशतवादी एका सैन्याला भारी पडतात वर्षानुवर्षे हे कसे काय..... ? सैनिक हो तुमच्यासाठी .. ही भावना आपली आहेच पण
सामरिक हालचालीत आपण काही कमी पडत तर नाही ना याचा गंभीर विचार झाला पाहिजे.
कृपया - सैनिकांचे मनोधैर्य खचविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे असे तारे कृपया कोणी तोडू नयेत ही नम्र विनंति.
22 Sep 2016 - 2:27 pm | पाटीलभाऊ
हा एक लेख वाचनात आला होता.
अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
http://kiranasis.blogspot.co.za/2016/09/if-india-has-to-hit-terror-facto...
22 Sep 2016 - 3:26 pm | टवाळ कार्टा
येस्स...हाच लेख शोधत होतो...यात जे लिहिले आहे ते वाचून इथे कोणी म्हणणार नाही की चला युद्ध करायला...याच बरोबर हे पण बघा
22 Sep 2016 - 3:26 pm | टवाळ कार्टा
http://timesofindia.indiatimes.com/world/china/Our-friendship-with-Pakis...
22 Sep 2016 - 4:32 pm | John McClain
मी 2 दिवसां पूर्वी दिला होते ना हेच आर्टिकल वर ☺...
असो, चांगलं लिहिलंय त्याने,पण कोणीतरी त्याची authenticity कन्फर्म करायला हवी...
बलुचिस्तान चे photos आणि चीन ची इन्व्हेस्टमेंट..
रशिया बद्दल काही विशेष टिप्पणी नाही आहे. तो पण मोठा प्लेअर आहे
22 Sep 2016 - 6:53 pm | मार्मिक गोडसे
भारत-पाक युद्ध झाले तर चीन अमेरिकेला त्यांच्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रियकरणाची धमकी देऊ शकतो?
22 Sep 2016 - 3:45 pm | गॅरी ट्रुमन
सर्व चर्चेला आणखी एक अॅन्करींग पॉईंट देत आहे. हा लेख मी मनोगतवर ११ जुलै २००६ चे मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट झाल्यानंतर लिहिला होता.त्यावेळी मनोगतवर बरीच चर्चाही झाली होती (आपल्यासारखे लोक चर्चा सोडून इतर काय करू शकणार आहेत म्हणा :( ). त्यावेळी मी असे मत मांडले होते की पाकिस्तानशी युध्द हा पर्याय असू शकत नाही. त्यानंतर पुढे १० वर्षे उलटली आहेत.तरीही परिस्थिती फार बदललेली आहे असे वाटत नाही. तेव्हाचा लेख इथे जसाच्या तसा चिकटवत आहे.
आजच वर्तमानपत्रात वाचले की मुंबईत अँटॉप हिल मध्ये एका पाकिस्तानी अतिरेक्याला पोलिसांनी चकमकीत ठार मारले. शक्यता आहे की तो अतिरेकी गणेशोत्सवादरम्यान मुंबईत घातपात घडविण्यासाठी आला होता आणि तसे जर का असेल तर तो मेला याचे आपल्या देशातील ढोंगी मानवतावादाची झूल पांघरलेले लोक आणि त्यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष साथिदार यांना सोडून इतर कोणालाच दुःख वाटू नये. पाकिस्तानकडून भारताला असलेल्या धोक्याचे कटू सत्य मुंबई रेल्वे बाँबस्फोटापासून अधिक तीव्रतेने अधोरेखित झाले आहे.त्याचाच हा एक भाग आहे.
या पार्श्वभूमीवर भारतापुढील पर्याय काय असे राहून राहून वाटते.
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी अशी मागणी केली की भारताने पाकिस्तानवर हल्ला करून एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. इतरही अनेकांचे तेच म्हणणे आहे.पण पाकिस्तानवर हल्ला करून प्रश्न सुटणार आहे का?
पाकिस्तान हा एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे.प्रस्तावित युध्दात पाकिस्तानने जर दिल्ली,मुंबई किंवा इतर कुठेही अणुबाँब टाकला तर आपले लाखो नागरीक मृत्युमुखी पडतील.त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही अणुबाँब पाकिस्तानवर टाकू आणि पाकिस्तानमधील कराची,लाहोर सारख्या महत्वाच्या शहरांचे नामोनिशाण मिटवू. पण आपले नुकसान झालेले असेल ते फारच भयानक असेल.अणुयुध्दात कोणीही जिंकणार नाही.आपल्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजतील.कदाचित एका अणुबाँब हल्ल्यामुळे झालेले नुकसान भरून काढायला आपल्याला अनेक दशके लागतील.आणि युध्द सुरू झाले तर पाकिस्तान अणुबाँब हल्ला करणार ही गोष्ट तर निश्चित आहे.तेव्हा ती किंमत चुकवणे योग्य आहे का?कारण कोणत्याही युध्दात शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करण्याबरोबरच आपले नुकसान कमितकमी होईल याची काळजी धुरंधर सेनानी घेत असतात.
क्षणभर असे समजून चालू की भारत-पाकिस्तान युध्द हे अणुयुध्द होणार नाही तर ते पारंपारीक शस्त्रांनीच लढले जाईल.२००४ मध्ये अमेरीकेने पाकिस्तानला 'Major non-NATO ally' हा दर्जा दिला आहे.तेव्हा अमेरीका पाकिस्तानला मदत करणार हे उघड आहे.त्याचप्रमाणे चीननेही पाकिस्तानला आजपर्य़ंत भरपूर मदत केली आहे.चीनला महासत्ता बनायचे होते आणि चीनी राज्यकर्त्यांना माहित होते की भारत आपल्याला त्या मार्गात प्रतिस्पर्धी बनायची क्षमता बाळगून असलेला देश आहे.म्हणून चीनने जाणिवपूर्वक पाकिस्तानला बलिष्ठ केले कारण बलिष्ठ पाकिस्तान भारताला कायमच्या कटकटी निर्माण करेल आणि भारताची शक्ती त्याला उत्तर देण्यात खर्ची पडेल, याची चीनला खात्री होती.आणि झालेही तसेच.तेव्हा प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्दात चीन पाकिस्तानला मदत करणार नाही याची खात्री देता येत नाही. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया सारखे श्रीमंत मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीला धावतील ते वेगळेच.भारताने बांगलादेशाला जगातील जवळपास २/३ पेक्षा जास्त देशांचे वैर पत्करून स्वतंत्र केले.इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यातही महत्वाची भूमिका बजावली. पण आजपर्यंत किती वेळा काश्मिर प्रश्नावर त्या दोन देशांनी भारताचे समर्थन केले? शून्य.आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी इस्लामच्या नावावर सर्व मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनासाठी येतील किंवा उघडउघड पाकिस्तानचे समर्थन जरी केले नाही तरी तेलाने समृध्द मुस्लिम देश भारताला तेलपुरवठा बंद करून कोंडित पकडतील याचीच शक्यता जास्त.
आता क्षणभर असे समजुया की प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे पूर्णपणे इतर शक्तींच्या हस्तक्षेपाविना लढले जाईल.डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यावर एन.डी.टी.व्ही. वर एक चर्चा झाली होती.त्यात दिलेली माहिती खरी असेल तर भारत आणि पाकिस्तान यामधला 'Strategic superiority ratio' सुमारे १.३ ते १.४ आहे. याचा अर्थ भारताची लष्करी ताकद पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपेक्षा १.३ ते १.४ पटीने अधिक आहे.ही ताकद पाकिस्तानविरूध्दचे युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी आहे का?वाटत नाही.ती कमितकमी २.५ ते ३ पटींनी अधिक असती तर कदाचित युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी झाली असती.त्यातून भारताचे सैन्य केवळ पाकिस्तान सीमेवर नाही तर चीनबरोबरच्या सीमेवरदेखील आहे.तेव्हा आपल्याला सर्व सैन्यक्षमता पाकिस्तानविरूध्द एकवटता येणार नाही.त्यातून पाकिस्तानच्या सैन्याला युध्दात जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा सारख्या अतिरेकी संघटनांकडून जी मदत होईल ती वेगळीच.त्या मदतीचा अंतर्भाव 'Strategic superiority ratio' मध्ये केला असेल असे वाटत नाही.तेव्हा शक्यता आहे की पाकिस्तानविरूध्दचे युध्द आपल्याला वाटते तितके सोपे जाणार नाही.
आता आपण क्षणभर तिसरी कल्पना करू की आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू!तरीही पुढे काय हा प्रश्न राहतोच.इतिहासाचा धडा आहे की परकिय देशातील (अथवा आपल्याच देशातील एखाद्या भागातील) जनतेला त्यांच्या इच्छेविरूध्द केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावर दावणीला धरता येत नाही.युध्द जिंकल्यावर काही काळ तरी आपल्या सैन्याला पाकिस्तानमध्ये राहावे लागेलच.आणि पाकिस्तानातील लोक ते कदापि मान्य करणार नाहीत हे तर उघडच आहे.
लक्षात घ्या की दुसऱ्या महायुध्दात अजोड धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर रशियन सैन्याने पराभवाच्या खाईतून वर येत जर्मन सैन्यावर विजय मिळवला. रशियन सैन्याचे धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती याविषयी कोणालाही शंका नाही. तरीही त्याच रशियन सैन्याचे अफगाणिस्तानात काय झाले?कारण अफगाण जनतेला रशियन सैन्याचे त्यांच्या देशातील अस्तित्व मान्य नव्हते.१९९१ मध्ये विघटन झाल्यावरही रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या ५ पट मोठा आहे.तर चेचेन्या हा भारतातील दिल्ली शहराइतका क्षेत्रफळाने आहे.चेचेन्याची लोकसंख्या सुमारे ८ लाख म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कमी आहे.तरी रशियन सैन्याला एवढया लहानशा प्रदेशातूनही माघार घ्यावीच लागली ना?कारण चेचेन लोकांना रशियाबरोबर राहायचे नव्हते.जगातील सर्वात शक्तीशाली अशा अमेरीकन सैन्याची इराकमध्ये कशी ससेहोलपट होत आहे ते तर अगदी स्पष्ट आहे.कारण इराकी जनतेला अमेरीकन सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य नाही.आपल्या सैन्याचीही तीच गत पाकिस्तानात होणार याविषयी अजिबात शंका नाही कारण पाकिस्तानी जनतेला आपल्या सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य होणार नाही.
आणि आपले सैन्य माघारी आल्यावर तरी काय?सध्याच्या जागतिक परिस्थितीत प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे एक महिन्याहून जास्त काळ चालणे शक्य नाही.पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १५ कोटी आहे. दुसरे महायुध्द ६ वर्षे चालूनही त्यात सुमारे ६ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.तेव्हा एका महिन्याच्या युध्दात आपण पाकिस्तानातील सर्व १५ कोटी लोकांना नक्कीच ठार मारू शकत नाही.अर्थात पाकिस्तानातले सर्व लोक काही दहशतवादी विचारसरणीचे नक्कीच नाहीत. पण युध्द झाले तर पूर्वी शांतताप्रिय असलेल्या पाकिस्तानी लोकांना आपल्या गोटात सामील करणे जिहादी विचारसरणीचे लोकांना अधिक सोपे जाईल. आपले सैन्य माघारी येताच कटकटी मोठया प्रमाणावर वाढतील.एका महिन्याच्या युध्दामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नायनाट होईल असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.आणि त्यातून पाकिस्तान आपला शेजारीच आहे.अमेरीकन सैन्य इराकमधून परत गेल्यावर अमेरीकन लोकांना इराकमधील दहशतवाद्यांचा अंतरामुळे त्रास होणार नाही. आपली परिस्थिती तशी नक्कीच नाही.
आणि या सर्व कल्पनाविलासामागे किती गृहितके आहेत हे लक्षात घ्या.पहिले म्हणजे युध्द अणुयुध्द न होता पारंपारीक युध्द होईल.दुसरे म्हणजे अमेरीका,चीन आणि मुस्लिम देश त्या युध्दात हस्तक्षेप करणार नाहीत आणि तिसरे म्हणजे आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू.या सर्व गोष्टी होऊनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बिमोड करणे आपल्याला शक्य होणार नाही हे उघडच आहे.
तेव्हा मला तरी वाटते की पाकिस्तानविरूध्द आपल्याला एकच गोष्ट करता येईल.आणि ती म्हणजे जशास तसे आणि दुसरे म्हणजे भारतात दहशतवाद्यांचे पाठिराखे आहेत त्यांना दयामाया न दाखवता यमसदनी धाडणे.त्यात शस्त्रास्त्रे पोचवणारे, कटाची आखणी आणि अंमलबजावणी करणारे यासारखे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेले लोक यांचा प्रामुख्याने समावेश होईल.
आपले काय मत आहे?
22 Sep 2016 - 8:07 pm | बबन ताम्बे
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ? त्याचाच गैरफायदा पाकडे घेताहेत असे नाही का वाटत? मुंबई बॉम्बस्फोट, दाउदला आश्रय, संसदेवरचा हल्ला, २६/११ चा मुम्बैवरचा हल्ला, लोकलमधले बॉम्बस्फोट , उघडउघड काश्मीरींना चिथावले, काही भारतीय सैनिकांना विद्रुप करून मारले, पठाणकोट हल्ला आणि आता उरी हल्ला. कीती घटना ? पाकडयांचे धारीष्टय आपलया अशा पडखाऊ धोरणांमुळे वाढलेय असे नाही का दिसत ? (हे होइल, ते होइल, आंतरराष्ट्रिय दबाव, मग नको असे करायला वगैरे ...) . कीती दिवस हे छुपे युद्ध आहे म्हणून आपण हात चोळत बसणार ?
मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती. त्यातूनही भारत बाहेर आला. त्यानंतर बाबरी मस्जीद पडल्यानंतरचे दंगे वगैरेनीही प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर दोन वेळा मध्यावधी निवडणूका झाल्या. त्याचा प्रचंड आर्थिक भार भारताने सोसला. तरीही भारत त्यातुन तावून सुलाखून बाहेर पडला. आज आर्थिक महासत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत.
मग शिकवला पाकिस्तानला धडा आणि झाले आपले आर्थिक नुकसान - आपण परत एकदा आपली आर्थिक परिस्थीती सुधरवायला सक्षम आहोत असे मला वाटते.
23 Sep 2016 - 10:17 am | गॅरी ट्रुमन
जर अणुयुध्द झाले तर भारताचे होणारे नुकसान आणि १९९१ साली भारताची असलेली परिस्थिती यात जमिन-अस्मानाचा नाही तर पाताळ-स्वर्गाचा फरक असेल.
मला वाटते की आपण पाकिस्तानला इतके बलिष्ठ होऊ दिले तिथेच चूक झाली आणि यापुढे कुठलीही पावले अतिशय जपून आणि काळजीपूर्वकच उचलावी लागणार आहेत. इस्राएलने इराकच्या अणुभट्ट्या जाऊन उडविल्या तसे करणे आपल्याला शक्य नव्हते आणि त्यामुळे आपण ते केले नाही.मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही.
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या "मॅटर्स ऑफ डिस्क्रिशन" या आत्मचरित्रात उल्लेख आहे की जे.एन.दिक्षित भारताचे पाकिस्तानातील हायकमिशनर असताना रॉबर्ट ओकली हे अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत होते.दिक्षित आणि ओकली यांच्या बोलण्यातून युध्द झाल्यास पाकिस्तान अणुबॉम्ब हा "लास्ट रिजॉर्ट" म्हणून नाही तर "फर्स्ट वेपन" म्हणून वापरेल असा उल्लेख होता. ही गोष्ट जवळपास २६-२८ वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर पाकड्यांनी नक्कीच अजून प्रगती केली आहे.
जर का युध्द झाले तर आपणच पाकड्यांवर पहिल्यांदा दोन-तीन किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकावेत. पाकडे पहिल्यांदा आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण त्यांच्यावर हल्ला करणार याची वाट न बघता पाकड्यांचे कंबरडे आधीच मोडावे आणि त्यांना उठायची संधीच देऊ नये.पाकिस्तान शेजारीच असल्यामुळे किरणोत्सर्जनाचा आपल्याला त्रास होईलच. पण प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा सेकंडरी नुकसान झालेले कधीही परवडले. अर्थात तसे काही करायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया जी काही होईल त्याला तोंड द्यायच्या स्थितीत आपण सध्या नाही-- आपली ताकद तेवढी नाही हे अगदी समोरच दिसत आहे.तेव्हा सद्य परिस्थितीत आपण फार काही करू शकू असे वाटत नाही.
आणि तसेही कन्हैय्या कुमार सारख्या हरामखोराचे समर्थन करणारे लोक इथे अगदी मिपावरही आहेत.कन्हैय्या कुमार तर सोडूनच द्या या असल्या अस्तनीतल्या निखार्यांनाही आपण काही करू शकत नाही.समजा भारताने पाकड्यांचे पाणी बंद केले (असे केल्यास त्याचे नक्की काय परिणाम होतील याविषयी मला स्वतःला काहीही माहिती नाही तेव्हा याविषयी मतप्रदर्शन करत नाही) तर आपल्याच इथल्या अनेकांना मानवतावादाचे भरते येईल आणि "पाकिस्तानातल्या निरपराध लोकांचे पाणी तोडणे अयोग्य आहे" वगैरे कोल्हेकुई इथलेच बुबुडाविपुमाधवि सुरू करतील. अशांविरूध्दही आपण काहीही करत नाही. तेव्हा युध्द झाल्यास वाटेल त्या त्यागाला तयार आहोत वगैरे भारतीय जनतेने बोलणे ही नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे.त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. खरोखरच त्याग करायची वेळ आली तर बोलणारे बहुसंख्य लोक गलपाटतील.
23 Sep 2016 - 10:57 am | बबन ताम्बे
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला. आणि आता भारतासाठी अण्वस्त्रधारी पाक हा पाचर रुतल्यासारखा झाला आहे.
23 Sep 2016 - 11:50 am | गॅरी ट्रुमन
नाही १९९८ मध्ये आपण अणुचाचण्या पहिल्यांदा केल्या म्हणून पाकड्यांनी पण केल्या असे म्हणता येईल.पाकड्यांचे अणुबॉम्ब बनवायचे प्लॅन १९७१ मध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच चालू झाले. १९८७ पर्यंत त्यांच्याकडे अणुबॉम्ब बनवायची क्षमता आलीही होती असे वाचल्याचे आठवते. काळेकाकांनी मिपावरच याविषयी एक लेखमाला लिहिली होती. तसेही भारताच्या अणुचाचण्या ११ आणि १३ मे १९९८ रोजी झाल्यानंतर १५ दिवसातच पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. याचा अर्थ त्यांची तयारी आधीच पूर्ण झाली होती.
तेव्हा जर आपल्याकडे काही करण्यासारखे होते तर तो कालावधी १९८७ पूर्वीचा होता.त्यातून वाजपेयींनी "नो फर्स्ट युज" चे आश्वासन देऊन आपण अणुबॉम्ब पहिल्यांदा वापरू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.पाकड्यांनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही.जर आपण पहिल्यांदा वापरणार नसू तर त्या गुळाच्या गणपतींचा उपयोग काय? कारण समजा शत्रूने आपल्यावर पहिला हल्ला केला तर त्याला तोंड देऊन उठायची ताकद राहिली तरच आपण त्याला प्रत्युत्तर देणार ना.ती असेल का हा प्रश्न आहे.
23 Sep 2016 - 12:37 pm | बबन ताम्बे
स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला आमची इमेज जपायची आहे..... भारत एक जबाबदार राष्ट्र आहे म्हणून. मग काय, आम्ही पहीला अणुबॉम्ब कसा टाकणार. अणुबॉम्ब जाऊ द्या, आम्ही पहील्यांदा आक्रमण देखील करणार नाही. जग काय म्हणेल. आमची माणसे मेली तरी चालतील. पाकडयांनी भारतीयांचा हाच गाढवपणा पुरेपूर ओळखला आहे. ते काही इमेज जपायच्या भानगडीत पडत नाहीत. वर परत अमेरीकेकडून दहशतवाद विरोधी साथीदार असल्याचे सोंग आणून अब्जावधी डॉलरची मदत ओढून आणतात.
निवडणूक प्रचारातील वक्तव्ये सोडून देवू या. पण इमेज अशी केली होती की "तीव्र निषेध, आमचा संयम म्हणजे दुबळेपणा समजू नये" या ठरावीक भारतीय प्रतिक्रीयांपलीकडे जाऊन काही तरी ठोस करतील. पण तसे काही दिसत नाही. कालच पेपर मधे वाचले की सरकारने आता पाकीस्तानला असा इशारा दिला आहे की परत असा हल्ला करा, मग बघू आम्ही तुमच्याकडे.
:-(
22 Sep 2016 - 10:10 pm | धर्मराजमुटके
इथे अनेकांना अपेक्षित असलेला निर्णय बहुतेक भारत सरकार लवकरच घेईल असे वाटतेय. भारत पाकीस्तानदरम्यान झालेला सिंधू नदीच्या पाण्याचा वापराचा करार बहुतेक भारताकडून मोडीत निघण्याची चिन्हे आहेत.
ही बातमी
23 Sep 2016 - 11:42 am | मार्मिक गोडसे
भारताने सिन्धु करार मोडल्यास चीनबरोबर ब्रम्हपुत्रा करार केला आहे त्यावर परिणाम होणार नाही का?
सिन्धु नदीवरची एक झडप बंद केली व केला पाण्याच प्रवाह बंद इतके सोपे आहे का? त्यासाठी पुर्वनियोजन लागते, जसे प्रवाहात धरण बांधणे, कालवे काढणे. ही सगळी तयारी एका दिवसात करणार का? करार केल्यामुळे असे करता येत नाही.
23 Sep 2016 - 12:26 pm | सुबोध खरे
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ झे डाँग यांच्या म्हणण्या प्रमाणे अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे.
भारताने अणुबॉम्बचा प्रथम वापर करणार नाही असे स्वतःच जाहीरकेले आहे याचा अर्थ काहीच नाही पाकिस्तान आमच्यावर अणुहल्ला करणार हि आमच्याकडे पक्की माहिती होती म्हणून आम्ही त्यांच्या अणुभट्ट्या आणि अणुआस्थापनांवर हल्ला चढवला असे सांगून तुम्ही पाकिस्तानवर अणुहल्ला केलात तर जग तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. तुमच्या कडे असणारी शास्त्रे आणि अस्त्रे पाकिस्तानचे कंबरडे पहिल्या झट्क्यातच मोडू शकतील अशी स्थिती आहे आणि तसे झाले नाही तरीही दुसऱ्या हल्ल्यात( प्रथम पाकिस्तानने हल्ला केला तरी) तुमची बरीच अणु शस्त्रे सुरक्षित राहून तुम्ही केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तान नष्ट होईल इतकी शस्त्रास्त्रे आपल्याकडे आहेत. आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवलेली आणि दक्षिण भारतातून डागू शकणाऱ्या अग्नी ५ आणि अग्नी ६ क्षेपणास्त्रांमुळे तुमचा सज्जड असा दुसऱ्या हल्ल्याचा पर्याय नेहमीच खुला राहतो.
फरक एवढाच आहे कि पाकिस्तान हे फ़िदायिन राष्ट्र आहे आणि ते स्वतः समूळ नष्ट झालो तरी चालेल पण भारताची मोठ्या प्रमाणावर हानी करू अशा केवळ सूडाच्या राजकारणाने पेटलेले आहे.
पण उद्या जर सर्वकष युद्ध झाले तर आपण पहिला अणुबॉम्ब टाकणारच नाही असे नाही. रशियाशी अनाक्रमणाचा करार करूनही हिटलरने त्यावर हल्ला चढवला होताच. इथे तर भारताने कुणाशीच करार केलेला नाही तर स्वतःच स्वतःवर संयम ठेवला आहे.
राहिली गोष्ट सिंधू नदीच्या पाण्याची. ते पाणी आपल्याकडे आपण वळवायला सुरुवात केली आहेच. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच.
मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल.
शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे.
एका काश्मीरी पत्रकाराच्या नजरेतून वस्तुस्थिती वाचून पहा.
http://thediplomat.com/2016/06/kashmir-a-water-war-in-the-making/
https://en.wikipedia.org/wiki/Kishanganga_Hydroelectric_Plant
23 Sep 2016 - 1:13 pm | संदीप डांगे
तीव्र सहमत!
23 Sep 2016 - 5:23 pm | मार्मिक गोडसे
तो पर्यत नाही ना करार मोडता येणार. करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही, पाकिस्तानप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात कालव्यांचे जाळे विणलेले नाही. उद्या जरी आपण करार मोडायचा ठरवले तर ह्या अतिरिक्त पाण्याने पंजाबात पूर येईल व निसर्गाचीही हानी होईल.
हेच चीनही ब्रम्हपुत्रेच्या बाबतीत करू शकतो.
23 Sep 2016 - 10:32 pm | अमितदादा
भारत ह्या पाण्याचा वापर कृषी, विद्युतनिर्मिती तसेच पाणी साठवण्यासाठी एका मर्यादेमध्ये करू शकतो. खालील दुव्यात तज्ञांची मते वाचा
दुवा
23 Sep 2016 - 10:29 pm | अमितदादा
हे खर नाही, भारत पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करू शकतो पण सर्व पाणी अडवणे निव्वळ अश्यक्य आहे. असा कोणता दुवा असेल तर वाचाय आवडेल.
हि बातमी पहा, यात तज्ञांनी लिहिलंय कि भारत पाकिस्तान च पूर्ण पाणी आडवू शकत नाही कारण आपल्या काही शहरे पुरमय होतील. उरलेल्या प्रतिसादाशी सहमत.
23 Sep 2016 - 1:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते.
दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच.
फक्त पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या धूर्त चालीने त्याच्या अणूस्फोटाचे खापर भारतावर फोडले. त्यातही सर्वात दु:खद गोष्ट अशी की पाकिस्तानच्या अश्या धूर्त खेळींना 'सिंप्लिस्टिक विचारसरणीचे" अनेक भारतीय कळत नकळत बळी पडतात, पडणे जास्त सोईचे समजतात.
मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या या कारवाया केवळ चीन नव्हे तर अमेरिका व युरोपिय देशांच्या उघड/गुप्त मदतीने व अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रिय कायदे धुडकावून झालेल्या आहेत. पाकिस्तानने त्याला मिळालेले तंत्रज्ञान चोरीच्या मार्गाने उत्तर कोरिया, इराण आणि लिबियाला विकले हे पण गुपित नाही. मुख्य या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानला काही शिक्षा झालेली नाही.
पाकिस्तानचा आणि विषेशतः त्याच्या सैन्य सत्ताधार्यांचा (केवळ ज्यांचेच म्हणणे महत्वाचे आहे, तेथिल मुलकी सरकार नेहमीच दिखाव्यासाठी मधून मधून पुढे केलेली कठपुतळी होऊन राहिलेले आहे) पूर्वेतहास पाहता, त्यांना भारताशी सलोख्याचे किंवा समानतेचे संबध नको आहेत तर त्यांचे एकमेव ध्येय भारताला कमकुवत करून आपल्या कह्यात ठेवायचे आहे. ते सरळ सरळ युद्धाने जमत नाही हे तश्या युद्धांत पराभव चाखून पाकिस्तान शिकला आहे. पण त्याचा मूळ उद्द्येश बदललेला नाही. फक्त तो उद्येश साधण्यासाठी (अ) अतिरेकी कारवाया करून "ब्लिडिंग बाय अ थाऊंजड कट्स" करणे; (आ) अणूयुद्धाच्या धमकीने ब्लॅकमेल करणे; (इ) शांततेच्या आणि मानवतेच्या नावाखाली अंतर्गत फूट पाडणारी व भारत "सॉफ्ट स्टेट" बनवण्यासाठी मानसिकता निर्माण करणारी "विचारवंत/डोव्हज" ची फळी निर्माण करणे, इत्यादी कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे उपाय चालू आहेत.
हे सर्व अजिबात गुपित नाही. अनेक पाकिस्तानी रिटायर्ड जनरल्स यांच्या लेखनात आणि मुलाखतींत हे अनेकदा व्यक्त झाले आहे. अनेक राजकिय विश्लेषकांनीही या अर्थाचे भाष्य केले आहे. त्यामुळे आपण अणूस्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही केला नसता असा विचार करणे फार नाईव्ह होईल. किंबहुना पाकिस्तानने अगोदर स्फोट केला असता तर भारतावर स्फोट करू नये यासाठी प्रचंड दडपण आले असते आणि भारताची अजूनच पंचाईत झाली असती.
भारत हा सामरिक दृष्ट्या सबळ पण राजकिय विचारशक्ती नसलेला देश आहे असा आजपर्यंतचा जागतिक समज आहे. पाकिस्तानबरोबर तीन युद्धे जिंकूनही पाकिस्तानला सतत वरचढ होऊ देण्याच्या सत्य वस्तूस्थितीवर हा समज आधारलेला आहे. आता त्यात बदल घडत आहे असे दिसते आहे... तो घडावा असे वाटते.
शेवटी पाकिस्तान, "वाघ म्हटले तर खातो, वाघोबा म्हटले तरी खातो" या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे.
राहता राहिला अणूयुद्धाचा बागुलबुवा... तो बागुलबुवाच (ब्लफ) आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ जनरल्स सैनिक कमी आणि बिझिनेसमन जास्त आहेत. पाकिस्तानी मिलिटरीच्या मालकीचे अनेक "नॉन-मिलिटरी" गोष्टी तयार करणारे कारखाने/व्यवसाय आहेत. तसेच डोंगराळ प्रदेशात चालणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याची भारत (पंजाबची आठवण करा) व पाश्च्यात्य देशांत विक्री हा सैन्यातल्या अधिकार्यांचा मोठा व्यवसाय आहे. माणूस एकदा व्यापारी होऊन सधन झाला की त्याची युद्ध करण्याची इच्छा (रिस्कटॉलरन्स) कमी होते आणि कपटाने दुसर्यांना झुंझवून आपण मलिदा खात राहणे हे जास्त सोईचे होते. हे पण फार मोठे गुपित नाही. बहुतेक सर्व पाकिस्तानी जनरल्सच्या अमेरिका व ब्रिटनमध्ये मोठमोठ्या गुंतवणूका आहेत, त्यांची मुलेबाळे तेथे स्थायिक झालेली आहेत. अश्या जनरल्सना अणूयुद्धाचाच नव्हे तर मोठ्या पारंपारिक (कन्व्हेनशनल) युद्धाचाही धोका नको असणारच. मात्र जोपर्यंत भारत आणि जग अणूयुद्धाच्या धमक्यांना घाबरून पाकिस्तानी जनरल्सना हवे तसे वागू देत आहे, तोपर्यंत त्या चालीची मजा लुटणे त्यांनी चालू ठेवावी, हे केवळ तार्कीक सत्य आहे !
मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल.
त्याऐवजी, (अ) प्रथम जागतिक राजकिय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडणे (ज्यामुळे चीनलाही त्याला पाठिंबा देणे कठीण व्हावे); (आ) त्याचबरोबर भारतीय डोव्हची अनेक दशके चाललेली दुकाने ताब्यात आणणे; (इ) आर्मी-नेव्ही-एअर फोर्स यांनी एकत्रितपणे कारवाईची योजना आखणे; आणि (ई) फार वेळ न घालवता पण योग्य संधी पाहून असा हल्ला करणे की रोग मुळापासून नष्ट व्हावा. कारण, सद्याचे जागतिक वारे पाहता, सद्या चालून आलेली संधी वारंवार येत नाही.
केवळ येणारा काळच सत्यात असे काही उतरेल की नाही हे सांगू शकेल... पण सद्या वाहणारे वारे असे होईल असे संकेत देत आहेत.
23 Sep 2016 - 10:42 pm | अमितदादा
उत्तम.
26 Sep 2016 - 12:56 pm | बबन ताम्बे
तुमच्या मताशी सहमत. अणूबॉम्ब काही आठवडयात्/महीन्यांत तयार होत नाही .आपण देखील ७४ साली पोखरणपासून सुरवात केली. मला एव्ह्ढेच म्हणायचे होते की १९९९८ नंतर घडलेल्या घटना पहाता पाकीस्तानचे धारीष्टय खूपच वाढले आहे. भारताला जेरीस आणायचे आणि भारताने प्रत्त्युत्तर द्यायची भाषा केली की अणुबॉम्ब टाकायची धमकी दयायची की अमेरिकेसकट सगळे भारताला सबुरीचा सल्ला देतात हे त्यांनी ओळखले आहे.
23 Sep 2016 - 4:10 pm | धर्मराजमुटके
भारत फ्रान्समधील बहुप्रतिक्षित राफेल करार अखेर मार्गी लागला आहे. शुक्रवारी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीत राफेल करारावर स्वाक्षरी केली आहे. राफेल करारानुसार पुढील पाच वर्षात भारताला फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमान मिळणार असून या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
जोक ऑफ द डे ! आता ही विमाने दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फक्त संचलनात उडवायची ना ?
एक हतबल नागरिक
24 Sep 2016 - 12:35 am | सुबोध खरे
मुटके साहेब
तुम्ही बंगल्यात डॉबरमन कुत्रा का ठेवता? त्याने एकही चोर पकडला नाही तर त्याचा उपयोग झाला नाही असे म्हणाल काय ?
लष्करी सामग्रीचे असेच असते. ती वापरावी लागू नये अशीच इच्छा असते. त्याचे प्रतिबंधक मूल्य हे महत्त्वाचे असते. 15 अॉगस्ट 26 जानेवारी ला काही जनतेसाठी उडवत नाहीत. ते शत्रूला तुमची सामरिक तयारी दाखविणे आणि गर्भित धमकी देणे हा हेतू असतो.
24 Sep 2016 - 10:48 am | धर्मराजमुटके
वर बातमीत म्हटल्याप्रमाणे ह्या खरेदीमुळे चीन आणि पाकिस्तान वर वचक बसेल असे म्हटले आहे पण अजुनतरी वचक बसताना दिसत नाहिये.
तुमचं म्हणणं सगळं खरयं साहेब, पण अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे मनात हतबलता निर्माण होते व त्याचे रुपांतर चिडीत होते आणि मग असा उपहास बाहेर पडतो. खरे तर राग ना लष्करावर आहे ना सरकारवर ( ना यापुर्वीच्या सरकारांवर होता).
कधी कधी वाटते की सरकारचे हात आंतरराष्ट्रीय नियमांमुळे बांधलेले आहेत, लष्कराचे हात सरकारने बांधले आहेत. म्हणजे तुर्तास चरफडण्याव्यतीरीक्त उघडपणे काहीच करता येऊ शकत नाही. मग शिवसेना आणि मनसे ला नावे ठेवण्यात काय हशील आहे ? कमीत कमी त्यांना जे करणे शक्य आहे ते म्हणजे पाकीस्तानी कलाकारांना लक्ष्य करणे जे ते नेहमीच करतात. इझी टार्गेट तर इझी टार्गेट. जर हार्ड टार्गेट अचीव्ह नाही होत तर इझी ही सही.
असो. प्रतिसाद फारच विस्कळीत आहे पण तो मनातील विमनस्कपणामुळे आहे असे समजुन माफ करा.
अवांतर : माझ्याकडे बंगला नाही, डॉबरमन कुत्राही नाही. :)
टीप : तुमचा मुद्दा कळलेला आहे पण या मनस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी केलेला क्षीण विनोद समजुन प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा.
24 Sep 2016 - 11:38 am | सुबोध खरे
विस्तृत प्रतिसाद सावकाशीने देतो.
23 Sep 2016 - 10:24 pm | मदनबाण
मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल.
हवा तेव्हढा वेळ घ्या... पण या पिसाळलेल्या कुत्र्याला कायमचा ठार करा ! आता संयम ठेवणे कठीण झाले आहे.
अजुन किती स्त्रिया विधवा होतील ? अजुन किती मुलं आपले वडिल गमावतील ? अजुन किती आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना गमवावे ?
बस्स झाले आता, सहन करण्यापलिकडे झाले आहे... आपल्या देशाचे रक्त पिणारा हा देश जगाच्या नकाशावरुनच नष्ट व्हावा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If death strikes, before I prove my blood, I swear I'll kill death.” – Gorkha Capt. Manoj Kumar Pandey PVC 1/11 Rifles
23 Sep 2016 - 10:59 pm | धर्मराजमुटके
च्यामारी, युद्ध करायचे तर भारताचेच नुकसान होणार, जागतिक स्तरावर नालस्ती होणार, इतर देश भारताशी संबंध तोडणार,
सिंधू नदीचा करार तोडायचे तरी भारतातच पुर येणार, शहरे बुडणार , चीन नाराज होणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर पाकीस्तान अजुनच आक्रमक हल्ले करणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर चीन भारताला मिळणारे सतलज आणि ब्रह्मपुत्रा चे पाणी तोडू शकतो.
काय चाललेय हे ? एकही शक्यता भारताच्या आवाक्यातली नाहीये ? म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय आयुष्यभर पर्याय नाही तर ??
23 Sep 2016 - 11:33 pm | अमितदादा
अस नहिये. भारत सुधा बर्याच प्रमाणात गुप्त कारवाया पाकिस्तान मध्ये करत असतो. बलुचिस्तान आणि कराची मधील असंतोषास भारतास जबाबदार मानल जात. RAW आणि NDS यांची युती आहे असे बोलल जात, अफगानिस्तान मध्ये भारताची १ embassy आणि ४ consulate आहेत, हे कशासाठी असावेत याचा अंदाज आपण बाळगू शकता. मध्यंतरी UPA सरकारच्या काळात भारतीय सैनिकाच मुंडक कापून विटंबना करण्यात आलेली त्याची मोठी चर्चा झालेली, परंतु नंतर भारतीय लष्कराने त्याचा बदला घेतला होता ज्याची चर्चा झाली नवती. (त्यावेळचे लष्कर प्रमुख बिक्रम सिंघ याचं statement गूगल करावे). तसेच काश्मीर मध्ये खूप वर्षापूर्वी शिखांच हत्याकांड केल होत त्याचाही भारताने बदला घेतला होता (याची लिंक आता सापडत नाही). अश्या अनेक घटनांचे बदले घेतले गेलेत तरीही पाकिस्तानची शेपटी वाकडी आहे. तसेच पाकिस्तानच्या ISI ने नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात मोठ network उभारलं होत ते भारतान मोढून काडलं. (नेपाल राजकारणी आणि ISI agent मिर्झा बेग बद्दल वाचा).
भारताने पाकिस्तान ला अंतराष्ट्रीय पातळीवर बर्यापैकी isolate केल आहे, याचा direct नसला तरी indirect भरपूर परिणाम होतो. काश्मीर प्रश्नावरून भारत मध्यंतरी backfoot गेलेला मात्र आता पाकिस्तान कोंडीत सापडलेला दिसतो. सिंधू नदीचे पाणी पिकांच्या season कमी जास्त करून भारत पाकिस्तान च्या अर्थव्यवस्थेच मोठ नुकसान करू शकतो.
एवड करून सुद्धा पाकिस्तान ला अक्कल येत नाही कारण आपल कितीही नुकसान झाल तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे अशी त्यांची strategy आहे\ आपली तशी धोरणे नाहीत कारण आपल्याला आपले उज्ज्वल भविष्य महत्वाचे आहे. आणि काश्मीर हि भारताची दुखरी नस असल्याने भारतास खूप काही direct करता येत नाही. असो भविष्यात परस्थिती बदलेल, येणारी तसेच सध्याचे सरकार योग्य धोरण राबवतील अशी आशा करू कारण भारतीय आता अश्या हल्याना कंटाळलेत हे सरकार ला कळले आहे.
24 Sep 2016 - 12:16 am | अमितदादा
वरील प्रतिक्रियेस support करणारे काही दुवे
१. Both active and effective: A short history of Indian Special Ops हि बातमी मस्त आहे. कप्तान सौरभ कालिया यांच्या मृत्यूचा सुधा बदला घेतला होता.
२.Army takes revenge, kills top Pakistani ultra on LoC
३. Dawood's Man In Nepal हि बातमी जुनी आहे नंतर तो मारला गेला.
29 Sep 2016 - 2:17 pm | सुबोध खरे
आजच्या हल्ल्याबद्दल काय म्हणायचे आहे.
23 Sep 2016 - 11:53 pm | थॉर माणूस
यात सगळ्यात जास्त वात आणलाय न्यूज चॅनल्सनी. उन्मादी वातावरण तयार करायची सुपारी घेतल्यासारखे वागतायत हे लोक. गेल्या 3-4 दिवसातल्या काही बातम्या तर खोट्या आहेत की काय अशी शंका येण्यासारख्या होत्या.
24 Sep 2016 - 12:21 am | संदीप डांगे
न्यूज चॅनल पाहू नका, सुखी राहाल! अन्यथा आपल्याच घरावर आता दुसऱ्या मिनिटाला बॉम्ब पडणार असे वाटत राहील;)
24 Sep 2016 - 1:01 am | थॉर माणूस
अगदी खरं आहे... ते times now वगैरे पाहिल्यावर तर आत्ता पंतप्रधान इस्लामाबाद वर तिरंगा फडकवणार किंवा पाकिस्तान आपल्यावरच अणूबाॅब टाकणार असं वाटतं. :)
24 Sep 2016 - 2:46 pm | विशुमित
अगदी अगदी..
24 Sep 2016 - 8:16 pm | सचु कुळकर्णी
aadatan tum ne kar diye waade
aadatan ham ne aitbaar kiyaa
बुंद से गयी वो हौद से नहि आती....जोशपूर्ण भाषण निवडणुकीपर्यंत ठीक असतात. एक सामान्य भारतीय नागरीक म्हणुन मला पहिले बदला हवाय..बकर करने के लीये ३ साल और है.
24 Sep 2016 - 8:23 pm | सचु कुळकर्णी
जोशपूर्ण भाषणाबरोबर जर क्रुती नसेल तर मग ममोंच मौन बर होत :(
24 Sep 2016 - 11:24 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Two men from PoK working for JeM arrested in Uri: Army
27 Sep 2016 - 11:48 am | मदनबाण
IAF airbases along western front on high alert, hold major air defence exercise
From Srinagar to Bikaner – Indian Air Force flexes its muscles along the western front
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
29 Sep 2016 - 12:55 pm | गॅरी ट्रुमन
काही वेळापूर्वी आपल्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाईदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक्स' केले आहेत असे जाहिर केले आहे.http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-...
या हरामखोर पाकड्यांविरूध्द अशी कडक कारवाई करून ते शेवटपर्यंत निभावायची तयारी आपण दाखवलीच पाहिजे. मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे त्यामागे ही तयारी नक्कीच असेल असा विश्वास मोदी आणि अजित डोवालविषयी नक्कीच आहे.
29 Sep 2016 - 1:48 pm | मदनबाण
आपल्या सैन्य दलाचे आणि सरकारचे अभिनंदन !
पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी !
भारत माता की जय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
29 Sep 2016 - 3:20 pm | मोदक
+१
29 Sep 2016 - 4:29 pm | नाखु
अर्थात पण ही गेम सुमडीतच करावी असे माझे मत आहे.
29 Sep 2016 - 3:15 pm | अनिरुद्ध.वैद्य
सैन्यदलाचे अन सरकारचे हार्दीक अभिनंदन.
अगदी अगदी.
29 Sep 2016 - 2:11 pm | ज्योत्स्ना
हे होणारच होते, पाकिस्थानच्या सततच्या खोडसाळपणाला हे उत्तर मिळणारच होते.आपल्या सैन्य दल व सरकारचे अभिनंदन !
14 Oct 2016 - 10:47 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Boycotting our goods will damage ties, China’s state media warns India