मुला॑ना इ॑ग्रजी माध्यममाच्या शाळेत घालावे का?

दीपा॑जली's picture
दीपा॑जली in काथ्याकूट
28 Jan 2008 - 12:29 pm
गाभा: 

आजकाल जवळ जवळ सगळ्याच पालका॑ना असे वाटते की आपल्या पाल्याने english medium school ला जावे.
त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये.
समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत.
आपणास याबद्दल काय वाटते?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Jan 2008 - 12:46 pm | विसोबा खेचर

त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये.

सहमत आहे...हल्लीच्या बर्‍याच आईवडिलांना असेच वाटत असावे!

समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.

हम्म! नो कॉमेन्टस...

त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत.

सहमत आहे....

तात्या.

नितिन थत्ते's picture

24 Mar 2009 - 1:54 pm | नितिन थत्ते

हे तात्यांच्या प्रतिसादाला उत्तर नाही पण वर दिसावे म्हणून इथे लिहिले आहे

खाली जे प्रतिसाद आले आहेत त्यातल्या दोन गोष्टी खटकल्या.
१. हा विषय आपल्याच राज्यात राहणार्‍या लोकांनाच लागू आहे. पण प्रतिसादात अनिवासी / निवासी वाद उगीच आला आहे.
२. त्याचप्रमाणे संस्कृती टिकवणे हा अनावश्यक विषय आला आहे. म्हणजे इंग्रजी शाळेत जाण्याने संस्कृती बुडते की नाही असा उगाच प्रश्न निर्माण करून त्यावर चर्चा झाली आहे. त्यात संस्कार टिकवून ठेवणार्‍या इंग्रजी शाळांची भलामण केली आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठी_माणूस's picture

24 Mar 2009 - 2:15 pm | मराठी_माणूस

१.मुळात चर्चेचा प्रस्ताव हा ईथल्या (महाराष्ट्रातल्या) शाळेच्या माध्यमा संबंधात आहे , त्यामुळे भारता बाहेर काय आहे , काय केले जाते हे अप्रस्तुत. त्या साठी वेगळा धागा उघडला जाउ शकतो. इथे वाद घालणे हे व्यर्थ आहे.

झकासराव's picture

28 Jan 2008 - 5:44 pm | झकासराव

माझ्या मनातील अगदी खरखुर आहे की माझ्या मुलाने मराठी शाळेतच शिकाव.
इंग्रजी बोलणे किंवा त्यातुन संभाषण साधणे हे कधीही शिकु शकतो माणुस त्याच्या नंतरच्या आयुष्यात.
पण सध्याच्या काळात एक अडचण आहे ती म्हणजे नोकरीची.
जग हे एक खेडं बनल आहे. आणि तुम्हाला कधी उत्तम संधी येइल आणि तुम्ही कधी हा देश किंवा राज्य सोडुन जाल
ह्याचीखात्री नाही. (तशीच नोकर्‍यांची देखिल खात्री नाही हो)
अशावेळी मराठी माध्यमाच्या मुलांना त्रास होउ शकतो. उदा. महाराष्ट्रात राहणार्‍या एखाद्याला जर दिल्लीत नोकरी मिळाली तर तिथे मराठी माध्यमाची शाळा नसणार. हाच त्रास अजुन मोठा होइल जर अशी व्यक्ती जर बाहेरच्या देशात गेली तर.
आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलेल तिकडे कितपत स्वीकारले जाइल???? त्यात मुलाच्या शैक्षणिक वर्षाच नुकसान होउ शकतं
असा अनुभव कोणाला आहे का???? ह्यावर उपाय काय आहे???
राहिली गोष्ट मराठी माध्यमातल्या उत्तम शाळांची.
तर अशा शाळा आहेत भले त्या कमी असतील पण आहेत.
मी स्वतः ह्या शाळेत शिकलो ती मराठी माध्यमातली शाळा होती. आमची शाळा फार नावाजलेली नव्हतीच (म्हणजे विद्यार्थी बोर्डात येणे वै)
पण त्या शाळेत देखिल चांगल शिक्षणच मिळाल की. :)
उलट माझा अनुभव असा आहे की इन्ग्रजी माध्यमातली बरीचशी मुल दहावीपर्यंतच जे जे नको करायला ते करुन बसलेली असतात.
(उदा सिगारेट, दारु )

धमाल मुलगा's picture

28 Jan 2008 - 6:24 pm | धमाल मुलगा

मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकलो, शाळाही चा॑गली होती, पण...ते ई॑ग्रजी अन् १० वी न॑तरच्या अभ्यासाच॑ ई॑ग्लिश ह्यात ई॑ग्रजी अन् ई॑ग्लिश इतकाच फरक असतो, हे ११वी सरल्यावर जाणवल॑ (तिर्थरुपा॑ना! अस्मादिका॑स हा दिव्य साक्षात्कार ११वीच्या पहिल्या दिवशीच पहिल्या तासात घडला होता.).

वरच्या प्रतिसादा॑शी पूर्ण सहमत. पण, एकच गोष्ट...जे॑व्हा ही ई॑ग्लिश माध्यमाची पोर॑ आपल्या आईबापाला एखादा अस्सल म्हराठमोळ्या गोष्टी॑स॑दर्भात प्रश्न करतात, तेव्हा त्या॑ना उत्तर ई॑ग्लिशमध्येच द्याव॑ लागत॑ नाहीतर काही झेपत नाही बिचार्‍या॑ना. मराठीत सा॑गितल॑ तर पाssर फापलतात पोर॑ !

त्या॑नी हार्डी बॉईज चे सगळे भाग वाचलेले असतात, पण फास्टर फेणे कोण ते मात्र माहित नसत॑. जरा मोठे झाले की सिडने शेल्डन अन् रॉबर्ट लुडलुम फाड्फाड तो॑डावर फेकतात, पण बाबासाहेब पुर॑दरे राजाशिवछत्रपतिमध्ये काय लिहितात ते "really too tough to understand bro".

कदाचित मीही माझ्या मुला॑ना ई॑ग्लिश माध्यमातून शिकायला लावेन, पण ह्या गोष्टी॑ची कशी काळजी घेईन ते मात्र अजुनतरी समजलेल॑ नाही.

-(सध्यातरी ह्या प्रश्नापासून दूर..) धमाल.

यशोदेचा घनश्याम's picture

28 Jan 2008 - 6:38 pm | यशोदेचा घनश्याम

गणित, विज्ञान किंवा तत्सम विषय असे आहेत कि, त्यांतील संकल्पना, आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींशी सांगड घालून जास्त चांगल्या शिकता येतात. त्यामुळे लहानपणीपासूनच या विषयांचा अभ्यास प्रगल्भतेने करता येउन, त्यांची भिती दूर होणेच नव्हे तर, या विषयांत काहि असामान्य करण्याची ताकद प्राप्त होउ शकते. पण आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टीं - संभाषणे हि मात्रुभाषेत होत असल्याने शिक्षण मात्रुभाषेतच घेणे योग्य, असे मला वाटते.
कारण कोणताहि विषय शिकताना, परिक्षेत गुण मिळवण्यासाठी नव्हे तर त्या विषयाशी संबंधित, मेंदूचा भाग, पायरी - पायरीने प्रगत करायचा हा मूळ हेतू असला पाहिजे. उदा. गणित शिकताना - तार्किक / संख्याशास्त्रिय प्रगति ( मेंदूचा डावा भाग - statistical brain) .
मात्रुभाषेतून शिक्षण घेताना हे जास्त सहजपणे साध्य करता येउ शकते. नाहितर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था व्हायची.
इंग्रजीतून सराईतपणे बोलणे इ. साध्य करण्याचे योग्य मार्गदर्शन मिळवून, तो एक विषयही चांगला करता येउ शकतो.

अवलिया's picture

23 Mar 2009 - 9:08 am | अवलिया

कालाय तस्मै नमः ।

नाना

धोंडोपंत's picture

28 Jan 2008 - 7:26 pm | धोंडोपंत

आम्हाला इंग्रजी माध्यमाची भीति नाही. पण लोक इंग्रजी माध्यम आणि कॉनव्हेंट यातील फरक न समजता मुलांना त्या शाळेत घालतात याची भीति आहे.

इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात.

आमची दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात पण शाळेतील संस्कार हे आपलेच आहेत.

या उलट कॉनव्हेंट शाळा मुलांना आपली संस्कृती विसरायला लावून त्यांचे परिवर्तन त्यांच्या अनुकूलतेनुसार करतात. यावर आमचा आक्षेप आहे.

आपला,
(सावध) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवसुमार's picture

29 Jan 2008 - 8:39 pm | केशवसुमार

आम्हाला इंग्रजी माध्यमाची भीति नाही......या उलट कॉनव्हेंट शाळा मुलांना आपली संस्कृती विसरायला लावून त्यांचे परिवर्तन त्यांच्या अनुकूलतेनुसार करतात. यावर आमचा आक्षेप ......१००% सहमत..
(मराठी माध्यमात शिकलेला ) केशवसुमार

ऋषिकेश's picture

28 Jan 2008 - 7:41 pm | ऋषिकेश

याच प्रश्नावर उत्तर म्हणून सेमी इंग्रजी माध्यमे शाळांशाळांत आहेत. जेव्हा मी एस. एस. सी झालो ती माझी आमच्या शाळेची पहिली सेमी इंग्लीश बॅच होती. पण आता बर्‍याच शाळांत हि पद्धत आहे. (८वी तेदहावी) सेमी इंग्लिश म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजीतून तर इतिहास, भूगोल आदि विषय मराठीतून शिकलो. मला तरी याचा वैयक्तीक रित्या खूप फायदा झाला. त्यात माझा १०० मार्कांचं संस्कृत असल्याने एकावेळी तीन भाषा शिकल्या जायच्या.

(सेमी इंग्लिश मर्‍हाटी) ऋषिकेश

प्राजु's picture

28 Jan 2008 - 8:04 pm | प्राजु

धोंडोपंतांनी जे लिहिले आहे ते अगदी खरे आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कॉन्हेंट यामध्ये खूप फरक आहे.

इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात.

अगदी खरं..

प्राजु

संजय अभ्यंकर's picture

28 Jan 2008 - 8:26 pm | संजय अभ्यंकर

मी नेहमी मातृभाषेच्या शिक्षणाचा पुरस्कार करतो.
माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत घालायची आमच्या पत्नीची फार इच्छा होती. तीला मी एकच प्रश्न विचारला: तुला बे चा पाढा इंग्रजीतून येतो का? तिने नकारार्थी मान हलवली, मी म्हटले, मलाही येत नाही, मग त्या बालका वर अत्याचार कशाला?

मुलाला मराठी शाळेत घातले. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक उत्तम मराठी शाळा आहेत. ज्यांच्या नोकर्‍या बदलीच्या आहेत, ते सोडले तर इतरांनी मराठी शाळे बद्दल चिंता करण्याचे कारण नाही.

मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल अकारण भिती बाळगण्याचे कारण नाही. उत्तम इंग्रजी येण्यासाठी, भरपूर अवांतर वाचन (इंग्रजी व मातृभाषेतून) आवश्यक आहे. इंग्रजी शाळांतुन शिकलेली मुले, इ. ११वी पासुन पुढे भेटु लागली, तेव्हा हे जाणवले. केवळ आमच्यापेक्षा चांगले इं. ते बोलत असत, परंतु, सामान्या ज्ञानात, आम्ही त्यांच्यापेक्षा कांकणभर पुढेच होतो. इं. भाषा बोलण्यातही आम्ही त्यांनां लवकरच गाठले.

मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल जगातल्या शिक्षणतज्ञांचे काही निष्कर्ष पुढील प्रमाणे:

१. जगातले काही देश इतर देशांपेक्षा जास्त प्रगत का करु शकले?
कारण ह्या देशांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतुन दिले. पारंपरीक उदा.: अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रांस, इटाली, स्पेन इ.
आधुनिक उदा.: जापान, चीन, कोरिया, तैवान, ब्राझिल इ.

२. मुल जन्माला आल्यापासुन शाळेत जायला लगे पर्यंत, त्याच्या कानावर सतत पडणारी भाषा ही त्याची मातृभाषा होय.
शाळेत जायला लागे पर्यंत ह्या मातृभाषेचा त्याच शब्दसंग्रह शेकडा ते हजार शब्दांपर्यंत असतो. जी भाषा तो बोलु व समजु शकतो, ती भाषा जर त्याच्या शिक्षणाचीही भाषा असेल, तर शाळेत त्याला केवळ त्या बोलीभाषेची लिखित अक्षरांशी सांगड घालावी लागते. आणी मातृभाषेत शिकणारे मुल भराभर शिकते, कारण, जितके वय लहान तितका आकलनाचा वेग ज्यास्त.

इंग्रजी भाषामात्र मुलास ध्वनी आणि लिखित, दोन्हि स्वरुपात शिकावी लागते. जे त्याच्या मेंदूचे काम वाढवते.

वरिल मुद्दांवर अनेकांनी माझ्याशी अनेकवेळा वाद घातले आहेत. प्रत्येकाची आपली विचारसरणी आहे आणी तीचा मी आदर करतो.

संजय अभ्यंकर

चतुरंग's picture

28 Jan 2008 - 8:54 pm | चतुरंग

इयत्ता पाचवी पर्यंत माध्यम हे ज्या त्या मातृभाषेतीलच असावे ह्या मताचा मी आहे.
मी स्वतः मराठीतूनच शिकलो. इंग्लिश पाचवीत पहिल्यांदा आलं. मला कुठेही न्यूनगंड जाणवलेला नाही.
उलट एकप्रकारचा वेगळा आत्मविश्वास असतो जेव्हा आपल्या भाषेशी आपली जवळीक असते. (आणि हा फक्त माझा एकट्याचा अनुभव नाहिये.
आमच्या १०वी च्या वर्गाचं सम्मेलन मागच्या वर्षी भरलं होतं तेव्हा ह्यावर छोटी बातचीत झाली. जवळजवळ सर्वांचे (वर्गातल्या ४०-५० जणांचे)
असेच मत होते. कित्येक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय उच्च कामगिरी करत आहेत.)

मूल वयाच्या ६ वर्षांपर्यंत बराच काळ घरात असते. त्याच्या कानावर जी भाषा येते तीच ते आत्मसात करते. ते त्याच भाषेतून बोलायला शिकते. त्याच्या आजूबाजूचे सगळे व्यवहार त्याच भाषेत होत असतात. आपण संपर्क साधू शकतो, बोलू शकतो आणि आपलं बोलणं समजून त्याला प्रतिसाद मिळतो ही एक प्रक्रिया आहे आणि तीच त्या बालकाचा आत्मविश्वास वाढवत असते. एकदा मातृभाषेशी अनुसंधान आले की बाकी कोणताही विषय अवघड नाही. अगदी शास्त्र व गणिताचा मार्ग सुध्दा भाषेतूनच जातो. मूलभूत संकल्पना नीट समजण्यासाठी मातृभाषेचाच आधार चांगला.
एकाएकी शाळेत इंग्लिश सुरु झाले तर मुलं गोंधळून जातात आणि शिकण्यावर बंधने येतात.
(आणि धोंडोपंत म्हणतात तसे संस्कारही आपले नसले तर मग विचारायलाच नको!)

मी अमेरिकेत आहे त्यामुळे माझ्या मुलाला इंग्लिश मधून शिकावे लागते पण त्याची कमतरता मी मराठीतूनच बोलून भरुन काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे तो मराठी उत्तम समजू व बोलू शकतो. करंगळी, टाच, खिळा, थालीपीठ, मोदक म्हणजे नक्की काय हे त्याला कळतात. परवाचा, त्यानंतर असे शब्द तो योग्य जागी व्यवस्थित वापरतो. आजी आजोबांशी फोनवर मराठीतून बोलतो. त्याला शाळेत स्पॅनिशदेखील शिकवतात आणि त्याने ती ही भाषा व्यवस्थित आत्मसात करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक नवीन मराठी शब्दाचा अर्थ तो विचारतोच आणि मी देखील न कंटाळता तो सांगायचा प्रयत्न करतो. (माझी बायकोदेखील हे सर्व करत असते.) हे उदाहरण मोठेपणा सांगण्यासाठी दिलेले नसून स्वानुभवाचे असल्याने दिले आहे.

ह्या विषयावर जगभरात बरेच संशोधन झाले आहे. युनेस्कोच्या संकेतस्थळावरील एक दुवा इथे देत आहे.
http://portal.unesco.org/education/en/ev.php-URL_ID=38921&URL_DO=DO_TOPI...

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. अशोक रा. केळकर हे ह्या विषयातले अधिकारी आहेत. जिज्ञासूंनी त्यांचे ह्या विषयावरील लिखाण वाचावे.

चतुरंग

अघळ पघळ's picture

29 Jan 2008 - 9:30 am | अघळ पघळ

आपला मुलगा आजी आजोबांशी मराठीत बोलतो ह्याचे आईवडीलांना कौतुक वाटते. उद्या तो आपल्या आई वडीलांशी 'बोलतो' ह्याचे देखिल त्यांना कौतुक वाटेल.
अवांतर : 'परवाचा' म्हणजे काय हे मला देखिल कळले नाही ते आपल्या लहानग्याला समजते हे पाहून तुमचे कौतुक वाटले.

चतुरंग's picture

29 Jan 2008 - 8:07 pm | चतुरंग

आपण कुठे राहता कल्पना नाही (म्हणजे भारतात की बाहेर) पण बहुदा भारतात असावे.
कारण त्या शिवाय परदेशात राहूनही आपली भाषा टिकवण्याची मराठी माणसाची धडपड आपल्याला समजणे अशक्य आहे.
ज्या मुलांच्या कानावर, ती घरातून बाहेर पडल्यावर दिवसाचे १० ते १२ तास फक्त इंग्लिश येते, त्यांच्या मनात मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण करून ते टिकवून ठेवणे ह्याला काय कष्ट पडतात ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!
उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!!
(कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!)

'परवाचा' = म्हणजे काल, आज, उद्या, परवा यातला.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

29 Jan 2008 - 11:22 pm | विसोबा खेचर

उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!!

क्या बात है.. वाक्य फार आवडले!

(कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!)

हम्म! खरं आहे...!

तात्या.

प्राजु's picture

29 Jan 2008 - 8:28 pm | प्राजु

बोलणे सोपे असते. उचलली जीभ आणी लावली....
चतुरंग यांचे मत अगदी योग्य आहे. परदेशात राहून मातृभाषा टिकवणे किती कठीण असते त्यासाठी काय काय करावे लागते हे आपल्यासारख्या लोकांना नाहि कळणार. आणि आपण मराठी असूनही आणि (जर) महराष्ट्रात राहत असूनही आपल्याला परवाचा म्हणजे काय हे माहिती नसेल तर आपल्या तथाकथित सामान्य ज्ञानाचे कौतुक वाटते, अघळपघळराव.
माझा मुलगा शाळेत जातो. ४ वर्षाचा आहे. उत्तम इंग्रजी आणि मराठी बोलतो. त्याला श्लोक येतात. मारूतीस्तोत्र येतं. गणपतीस्तोस्त्र येतं. मराठी त्याला बाहेर शाळेत कोणी नाही शिकवणार. आणि मी कितीही नाही म्हंटलं तरी तो बाहेर इंग्लिशच बोलणार हे नक्की आहे आणि ते ही न शिकवता, याची पूर्ण जाणिव आहे मला.
यु-ट्यूब वर फाऊंटन च्या खूप मराठीतून गोष्टी आहेत. पंचतंत्रातल्या, इसापनितीतल्या. तो मन लावून ऐकतो, पाहतो. कित्तीतरी बालगीते आहेत तिथे मराठीतून, ती ही त्याला आवडतात. बिरबल बादशहाची गोष्ट तो अगदी नीट सांगतो आणि ती हि मराठीतून. आणि त्याला ही आवड आम्ही निर्माण केली आहे हे मला इथे अभिमानाने सांगावेसे वाटते.
भारतात गेल्यावर सगळी मराठी बोलत असताना त्याला फक्त ऐकण्याचे काम नाही करावे लागणार, तो ही त्याच्या वयाच्या मुलांमध्ये समजून मराठीतून संवाद साधू शकेल याची खात्री आहे मला.

- प्राजु.

प्राजुताई. जिद्दीने काम करणारे लोक आपल्याबरोबर आहेत हे बघून हुरुप वाढला.
यू-ट्यूब वरील माहितीबद्द्ल धन्यवाद. आता मी त्या गोष्टी माझ्या मुलाला दाखवीन.

चतुरंग

अघळ पघळ's picture

30 Jan 2008 - 8:22 am | अघळ पघळ

आपल्या मातृभाषेला जगवण्यासाठी परदेशात राहून अनुक्रमे चतुरंग,प्राजु, आणि स्वाती राजेश करत असलेले प्रयत्न बघून थक्क झालो. आमच्या कचेरितला बरीच वर्षे तिकडे असणारा एक सहकारी मला सांगत होता त्यांचा ६ वर्षाचा तर म्हणे हॉटेलात जेवायला गेल्यावर आईबाबा ऑर्डर करायला लागले तर वेटरला 'नो बीफ हं!!' अस ठणकावून सांगतो! तेव्हाही मी असाच भारावून गेलो होतो. अहो आपली संस्कृती आपली भाषा हे टीकवण्याची केवढी मोठी जवाबदारी अनिवासी भारतीयांवर आहे. त्यांना सॉफ्ट टारगेट करण्याच्या टारगटपणा करणार्‍यांचा मी देखिल निषेध करतो.

अवांतर: काल, परवा, उद्या असे शब्द माहित आहेत हो पण एकदम विनासंदर्भ 'परवाचा' असा शब्द ऐकल्यावर तो समजायला आमच्या सामान्य आकलनशक्तिला जरा जडंच गेला. जसे आंबा पेरू चिक्कू हे शब्द लगेच कळतात पण उद्या कुणी 'पेरुचा' म्हणजे काय विचारल तर माझा गोंधळ उडतो हो. आता जरा यू ट्यूब लावून बसतो.. ह्या नव्या पिढीने आम्हाला पारंच गारद केले आहे हो!

चतुरंग's picture

30 Jan 2008 - 5:36 pm | चतुरंग

अघळपघळराव, कूपमंडूक वृत्ती असेल ना तर मग चर्चा करण्यात काही अर्थ नसतो.
इथे विषय चालला आहे मुलांचे शिक्षणाचे माध्यम, आणि तुमचं आपलं भलतच!

अहो तुम्हाला जर अनिवासियां बद्द्ल एवढीच मळमळ असेल ना तर त्याबद्द्ल एखादी वेगळी वैचारिक चर्चा का नाही करत?
उगीच इकडे तिकडे ओकार्‍या करत हिंडू नका!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 6:33 pm | विसोबा खेचर

चतुरंगरावांशी सहमत आहे...

आपला,
(निरिक्षक) तात्या.

अघळ पघळ's picture

30 Jan 2008 - 10:03 pm | अघळ पघळ

निरिक्षक तात्या,
इथले मॉडरेटर तुम्हीच ना? तो चतुरंग वैयक्तिक पातळीवर घसरुन आमच्या लेखनाला ओकार्‍या वगैरे म्हणत आहे. त्यावर तुम्ही मॉडरेटर म्हणून सहमती देखिल दाखवली आहे. तेव्हा आम्ही पण थोडे वैयक्तिक पातळीवर उतरलो आहोत. तरी फक्त आमचे प्रतिसाद उडवून आमच्यावर अन्याय करणार नाहीत ही अपेक्षा!
-(सुस्पष्ट) अघळ पघळ

अघळ पघळ's picture

30 Jan 2008 - 10:00 pm | अघळ पघळ

अरे माझ्या चतुरंग्या,
जिथे तिथे अनिवासी भारतीयांच्या नावाने टाळ तू कुटतोस. इथं पण अनिवासी भारतीयांच्या नावाने हगायला तू सुरू केलेस आणि वर तुला माझे लेखन ओकर्‍या वाटते होय? अमेरिकेत आहेस ना? एखाद्या चांगल्या मनोविकार तज्ञाला दाखवून घे स्वत:ला. हवंतर पैसे मी पाठवतो इथनं!
(कुपमंडूक) अघळ पघळ

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 10:57 pm | विसोबा खेचर

अघळपघळ आणि चतुरंग या दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक शेरेबाजी केली आहे. दोघांचेही प्रतिसाद ठेवत आहे.

परंतु आता पुरे! :)

या पुढील वैयक्तिक शेरे असलेले दोघांचेही लेखन उडवून लावले जाईल तेव्हा कृपया लिहायचे कष्ट घेऊ नयेत. या पुढे दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक शेरेबाजीकरण्याकरता पोष्टकार्डाचा किंवा एकमेकांच्या खरडवह्यांचा यथेच्छ वापर करावा ही नम्र विनंती...

तात्या.

कौटील्य's picture

30 Jan 2008 - 6:44 pm | कौटील्य

आपले अभिनंदन

माझ्या काही अनिवासी मित्रांनी सुचविले म्हणुन मी एक वेबसाइट चालु केली http://www.pujaarcha.com/
यात तुम्हाला काही उपयुक्त मिळाले तर बघा समजा काही तुम्हाला लागेल व ते उपलब्ध नसेल होत तर कळवा आम्ही ते साइटवर देण्याचा प्रयत्न करु

स्वाती राजेश's picture

29 Jan 2008 - 10:06 pm | स्वाती राजेश

प्राजु आणि चतुरंग यांच्याशी मी सहमत आहे.
आपला मुलगा परदेशात राहून सुद्धा मराठीत बोलतो याचे कौतुकच वाटायला पाहिजे. कारण परदेशात मुलांना मराठी शिकवायला किती कष्ट करावे लागतात ते मला महिती आहे.

माझा मुलगा इयत्ता ६ वी त( वय वर्षे ११) आहे. तो मराठी आणि हिंदी व्यवस्थित लिहितो, वाचतो. अस्खलित बोलतो सुद्धा.याचा मला काय्,माझ्या भारतातील सर्व नातेवाइकांना अभिमान आहे. यामागे त्याचे स्वतःचे कष्ट आहेत पण त्याचबरोबरीने आई/वडिलांचे सुद्धा आहेत.
तो घरी मराठी बोलतो .हिंदी ,मराठी सिनेमा तो एंजॉय करतो. तसेच इथे घराबाहेर पडले इंग्रजी( ब्रिटीश accent ने) येथील लोकांशी बोलतो. शाळेत इंग्रजी & स्पॅनिश आहे.मला खात्री आहे कि जरी परत भारतात आले तरी शाळेत अथवा इतर कोठेही त्याला भाषेचा प्रश्न येणार नाही.

कारण मी पाहिले आहे कि भारतात सुद्धा कितीतरी आई/वडिल आपल्या मुलाशी इंग्रजीतून बोलतात कारण का तर त्याला शाळेत, मित्रांशी बोलताना सवय व्हावी म्हणून. घरी सुद्धा इंग्रजीतून....?
मग आम्ही भारताबाहेर राहून सुद्धा मुलांना स्तोत्रे, श्लोक शिकवतो याचा आम्हाला अभिमान आहे. भारतात काही पालक मुलांना संस्कार शिबिरात घालतात, काहींना आजी/आजोबा शिकवतात. ते सर्व आम्ही (आई/वडिल)मुलांना शिकवतो. याचा आम्हाला अभिमान आहे.

हल्ली अनिवासी भारतीयांवर फारच बोलले जाते आहे....याचे कारण?

चतुरंग's picture

29 Jan 2008 - 10:27 pm | चतुरंग

हल्ली अनिवासी भारतीयांवर फारच बोलले जाते आहे....याचे कारण?
मला वाटते हे एक सॉफ्ट टारगेट आहे.
राजकारणात कोणताही प्रश्न आला की "ह्यात परकीय शक्तींचा हात आहे!" असे म्हणतात ना, त्याप्रमाणे सगळ्या संस्कृती विषयक प्रश्नांना अनिवासी भारतीय जबाबदार!

अवांतर - अनिवासी भारतीयसुध्दा ह्याला काही प्रमाणात जबाबदार आहेत, नाही असे नाही. माझ्या माहितीत असे बरेच लोक इथे आहेत की जे त्यांच्या बोलण्यात ह्या ना त्या प्रकारे भारतातील व्यवस्थे बाबत तक्रारींचा सूर लावतात. त्यांचे मन भारतात ओढ घेत असते पण ते मान्य करण्याची त्यांना लाज वाटत असावी बहुदा. तुम्ही इथे राहता आहात हे ठीक पण त्यासाठी भारताला नावे ठेवण्याचे काहीही कारण नाही, ही भूमिका मी त्यांच्यासमोर घेतो. अशाने माझे काही संपर्क हळूहळू तुटलेही आहेत पण मला ते चांगलेच वाटते कारण जे आपल्या मूल्यांविरुध्द आहे ते गेलेलेच बरे!
असो. पण अशा लोकांच्या भारत भेटी च्या वेळी त्यांच्या बोलण्याचे भारतद्वेष्टे संदर्भ हे तिथल्या असंतुष्टांसाठी कोलितच ठरते! त्यांना भारताबद्द्ल फार प्रेम असेल असे नाही, पण मग "बाहेरुन" आलेले लोक हे वाईट असा सरसकट निष्कर्ष काढला जातो!!
तेव्हा आपली बूज आपणच राखायची असते असे ध्यानात ठेवावे लागते.

चतुरंग

प्राजु's picture

30 Jan 2008 - 12:19 am | प्राजु

काहीही झालं की टार्गेट आपली अनिवासी भारतीय...
हातात कोलीत मिळाल्यासारखं अनिवासी भारतीयांच्या डोक्यावर खापर फोडायचं..
यापेक्षा आपण आपल्या मुलांना किती आणि काय शिकवता याकडे लक्ष द्या असेच मी सांगेन. जी शक्ती अनिवासी भारतीयांवर टीका करण्यात व्यर्थ जाते ती तुमच्या मुलांना मराठीचे धडे देण्याच्या सत्कारणी लावा.

- प्राजु.

मनिष's picture

30 Jan 2008 - 11:57 am | मनिष

@धोंडोपंत - सहमत -
इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात.

चतुरंग - दुव्याबद्द्ल शतशः धन्यवाद.

"रमेश पानसे" हे देखील शालेय शिक्षण हया विषयावर बरेच संशोधन, लिखाण करत असतात.

अक्षरनंदन ही पुण्यातील एक दर्जेदार, वेगळी मराठी शा़ळा आहे असे ऐकून आहे. कोल्हापुरातही अशीच एक शाळा आहे, पण नाव आठवत नाही. UK मधे अर्थातच 'समरहिल' ही अतिशय वेगळी आणि सर्वार्थाने legendary म्हणता येइल अशी शाळा आहे. पण किती पालकांना त्या मागील विचार उमगतील आणि आचरणात आणता येतील हा प्रश्नच आहे. "तारे जमींन पर" आवडणे वेगळे आणि तसे विचार आचरणात आणणे वेगळे. असो! 'समरहिल' विषयी इथे वाचता येईल -
http://www.deccanherald.com/Content/Nov222007/dheducation2007112136940.asp

At a time when schools have become giant factories churning out kids who must fit into the present order, who cooperate smoothly, and who consume more and more, Summerhill, which has been in existence since 1921, has shown the world that a school could abolish fear of teachers and adults and, deeper down, fear of life, writes Arvind Gupta.

- मनिष

अन्या दातार's picture

30 Jan 2008 - 10:53 pm | अन्या दातार

कोल्हापुरातही अशीच एक शाळा आहे
सृजन आनंद असं काही नाव आहे का त्या शाळेचं?
आपला,
(कोल्हापुरी) अभियंता

चतुरंग's picture

30 Jan 2008 - 11:15 pm | चतुरंग

ते "सृजन आनंदच"!

ठाण्याजवळ "ऐना" ह्या गावात "ग्राम-मंगल" आहे.
डॉ. अनुताई वाघ यांनी ती सुरु केली. त्या शाळेची कीर्ती हळूहळू पसरते आहे. त्यांनी तयार केलेली अतिशय सुंदर आणि तरीही स्वस्त खेळणी माझ्याकडे आहेत. पुण्यातही ती मिळतात. वरील दुव्यात पुण्याचाही पत्ता मिळेल.

चतुरंग

अवलिया's picture

30 Jan 2008 - 6:27 pm | अवलिया

"आम्ही आमच्या घरी मराठी कल्चर प्रिझर्व केलेय , एव्हरी संडेला आम्ही मिल्क राइस खातो"

- हे वाक्य ऋषीतुल्य गोनीदांच्या नातेचे आहे.

कीव कराविशी वाटते अशा निवासी अभारतीयांची; असो

पुन्हा सांगतो

भाषा दुय्यम आहे संस्कार विचार मह्त्वाचे

नाना

सूहास's picture

24 Mar 2009 - 2:19 pm | सूहास (not verified)

भाषा दुय्यम आहे संस्कार विचार मह्त्वाचे

हे वाक्य मी ढापतोय्.पे॑टट तर नाही ना !!

सुहास..
(द गुड)

स्वाती राजेश's picture

30 Jan 2008 - 6:50 pm | स्वाती राजेश

भारतीय आपली साइट खुपच उपयोगी , माहितीपुर्ण आहे.
आभारी आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jan 2008 - 10:43 pm | llपुण्याचे पेशवेll

'आपला मुलगा आजी आजोबांशी मराठीत बोलतो ह्याचे आईवडीलांना कौतुक वाटते. उद्या तो आपल्या आई वडीलांशी 'बोलतो' ह्याचे देखिल त्यांना कौतुक वाटेल.'
या वाक्याचा मतितार्थ पुण्यात राहील्याखेरीज नाही कळणार. तथाकथित आधुनिक पालक आपल्या पाल्याला 'गुड बॉय' म्हणून गौरवितात त्यांची मला फार कीव येते. मराठीची थोर उपेक्षा पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी व्हावी यासारखे दु:ख नाही. अघळपघळरावांचे हे वाक्य अनिवासी नाही तर निवासी भारतीयांना जास्त लागू आहे असे वाटते.
पुण्याचे पेशवे

वरदा's picture

30 Jan 2008 - 10:52 pm | वरदा

खूप छान विषय आहे. इथे मुलांना मराठी शिकवणं खरंच खूप कठीण आहे...मला जीआर ई देताना मराठी मिडियम मधली असल्याने जे सोपस्कार करावे लागले त्यावरून तरी इंग्रजीत शिकले असते तर बरं झालं असतं असं वाट्टं. नुसती तुमची ट्रांसफरच नाही पण ज्या मुलांना पुढे परदेशी शिक्षण घ्यायच. असेल त्याना इंग्रजीतुन शिकण्याचा खूप फायदा होतो असं वाट्टं

प्राजु's picture

30 Jan 2008 - 11:04 pm | प्राजु

खरंच..
भारतीय, आपली साईट खूपच छान आहे. आवडली.
- प्राजु

अन्या दातार's picture

30 Jan 2008 - 11:06 pm | अन्या दातार

माझ्या मते शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. माझे काही मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत; त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्यांना मराठी भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्दसुद्धा माहित नसतात. समजा कोणी श्लेष अलंकारातून कोटी केली तर त्यांना ती अजिबात कळत नाही. त्या विनोदातील अर्थ त्यांना समजावून सांगावा लागतो. बरं इंग्रजी शब्दही खूप माहीत आहेत, असंही नाही. क्लासमध्ये सरांनी वापरलेल्या एका शब्दाचा अर्थ विचारला तर त्यांना सांगता येईलच याची खात्री नाही. मग साला इंग्रजी माध्यमात शिकून काय घंटा मिळवलंत? एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची गत झालेली असते किंवा तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे
या सर्वात मध्यम मार्ग म्हणजे सेमी इंग्रजी माध्यम. गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीत शिकवल्याने त्यासंबंधी अवांतर इंग्रजी वाचनावेळेस फायदा होऊ शकतो.
आपला,
(मराठी माध्यमात शाळा शिकलेला) अभियंता

दीपा॑जली's picture

3 Feb 2008 - 10:35 am | दीपा॑जली

इ॑ग्रजी माध्यमात शिकण्याचे फायदे आणि तोटेहि आहेत. मी वरदाताईच्या मताशी सहमत आहे. पण काहीही झाल॑ तरीही आपल्या मराठीचा आभिमान मात्र कमी होता कामा नये, हे तितकच॑ महत्वाच॑...
- मगो

सख्याहरि's picture

4 Feb 2008 - 7:49 pm | सख्याहरि

माझ्या मते शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. माझे काही मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत; त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्यांना मराठी भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्दसुद्धा माहित नसतात.

अभियंता- आपल्याशी १००टक्के सहमत.

इंग्रजी शाळेत शिकलेल्या मुलन्मध्ये मत्रुभाषेबद्दल फारसा अभिमान दिसत नाही. शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे.

उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!!
(कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!)

चतुरंगरावांशी सहमत आहे...

अघळ पघळ च्या प्रतिक्रीया खेद जनक आहेत.

-सख्याहरि

प्रभाकर पेठकर's picture

7 Feb 2008 - 6:10 pm | प्रभाकर पेठकर

मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहे. ह्यामुळे ज्ञानार्जनात, अर्थार्जनात कधी नुकसान, कमतरता जाणवली नाही. परदेशात (आखाती देशात) कधी कुठली समस्या जाणवली नाही. इंग्लिश बोलणे, समजणे ह्यात कधी अडचण आली नाही. पण इंग्लिश माध्यमातील, (विशेषतः दिल्लीकर) इतर सहकार्‍यांची आक्रमक देहबोली त्रासदायक व्हायची. ह्यांना 'ज्ञान' कमी असले (किंवा अजिबात नसले) तरी ते 'गोर्‍या' साहेबावर छाप पाडायचे. तरी सुद्धा, आमच्या 'तर्खडकरी' इंग्लिशने आम्ही आमचे कचेरीतील महत्त्व टिकवून ठेवले. बरोबरीने बढत्या मिळवल्या, सन्मानाने नोकरी सोडली. असो.
माझा मुलगा ६ महिन्याचा असल्यापासून १०वी पर्यंत CBSC शाळेत इंग्लिश माध्यमातून शिकला. घरात आम्ही कटाक्षाने मराठीच बोलायचो. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन त्याची भारतीय आणि मराठी सांस्कृतिक जडण घडण केली. दहावी नंतर तो भारतात परतला. तेंव्हा त्याच्या मनात मराठीतून किंवा इंग्लिश मधून संवाद करण्याची भिती नव्हती. किंचित भिती होती ती फक्त इथल्या 'रॅगिंग'ची. पण माझ्या मौलिक सुचनांनी त्याला त्याचाही काही त्रास झाला नाही.
एका प्रसंगात, त्याच्यासह, त्याच्या पुण्यात मराठी माध्यमात शिकलेल्या दुसर्‍या एका कॉलेजच्या मित्राचीही दांडी उडाली. झालं असं की, त्याचा तो मित्र त्याला भेटायला एकदा आला असताना माझ्या मुलाला म्हणाला,'अरे भिडू, तुझ्या कॉलेजातही आपली 'वट' आहे हं' माझ्या मुलाला 'वट' हा शब्द नविन होता. साहजिकच त्याने विचारले,' 'वट' म्हणजे काय?' तोही हडबडला...'अरे 'वट' म्हणजे ते असं....म्हणजे.....अरे, .........'वट' म्हणजे 'वऽऽऽऽऽट'........... अरे यार, ते समजावून सांगणं कठीण आहे.' असो.
सांगण्याचा उद्देश हा की इंग्लिश माध्यमातून शिक्षण झालं तरी घरातून 'मराठी भाषा आणि संस्कारांचा' कृतीशील आग्रह धरला तर दोन्हीतील समन्वय साधता येतो.

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 10:49 pm | सुधीर कांदळकर

ही काय भानगड आहे? जो प्रश्न अनिवासींचा आहे तो महाराष्ट्राबाहेरील निवासींना नाही का? आम्ही कांही वर्षापुर्वी भाईंदर्ला राहात होतो. सोसायटितील ११४ फ्लॅटपैकी जेम्तेम १० मराठी होते. आमचा मुलगा कॉनव्हेंटध्ये शिकला. पण संस्कार मराठीच आहेत. घरी पण मराठीत्च बोलतो. तो संपूर्ण मराठी आहे. मी मराठीतून शिकलो. कॉलेजच्या १ ल्या वर्षी माध्यम बदलल्याचे जाणवले देखील नाही. ज्याला एक भाषा व्यवस्थित येते त्याला कोणतीहि भाषा येऊ शकते. मी जेम्स हॅडली चेस, आयर्विंग वॉलेस, ऑर्थर हॅले, इ. च्या कादंब-या, डॅनिअल गोलमनचे इमोशनल इंटेलिजन्स, फ्रीमनचे थे हुमन झू, मिचिओ काकू चे व्हीजन्स इ. पुस्तके वाचली व अजुनहि निवडक इंग्रजी पुस्तके वाचतो. काही प्रश्न येत नाही. थोडक्यात काय? माध्यम महत्वाचे नाही. घरचे संस्कार महत्वाचे. फक्त मराठी क्लासिक ऐवजी इंग्रजी क्लासिक वाचले जाईल. एवढेच. 'उपरा' काय किंवा 'द पर्ल' किंवा 'माय बिलव्हड कंट्री' असो. समाजाची वेदना तीच आहे. ती कळल्याशी कारण. उगीच नसते वाद उअपस्थित करू नये व प्रत्येक साहित्याचा आस्वाद घ्यावा. जर बालकवी कळले तर वर्ड्स्वर्थ देखील कळेल.

सृष्टीलावण्या's picture

10 Mar 2008 - 10:05 am | सृष्टीलावण्या

आजकाल जवळ जवळ सगळ्याच पालका॑ना असे वाटते की आपल्या पाल्याने english medium school ला जावे.

त्याला गतानुगतिकता असे ही म्हणतात. मेंढरासारखे जगायचे, लोक जातात त्या पाठून धावायचे. नाहीतर इतर माध्यमात शिकून मोठे (यशस्वी) होता येत नाही असे थोडीच आहे. मधुर भांडारकर, एकनाथ ठाकूर, जयंतराव साळगावकर, मनोहर जोशी, अभय बंग, अब्दुल कलाम, जयंतराव नारळीकर, शंतनुराव किर्लोस्कर अशी अनेक नावे वानगी दाखल देता येतील.

त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये.

इंग्रजी माध्यमातील इंग्रजी न येणारी आणि मराठी माध्यमातील इंग्रजी उत्तम बोलणारी अशी दोन्ही प्रकारची मुले / माणसे मी पाहिलेली आहेत. शेवटी कुठलीही भाषा शिकायची तर त्यासाठी भाषा आवड हवी. माध्यमाचा संबंध नाही. मी असे वाचले आहे की इश्वरचंद्र विद्यासागर इंग्रजांपेक्षा उत्तम इंग्रजी बोलत.

समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत.

आपल्या कडे म्हण आहे, "लग्न होत नाही म्हणून वेडा आहे आणि वेडा आहे म्हणून लग्न होत नाही". आपण मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही म्हणून मराठी शाळा चांगल्या नाहीत आणि मग म्हणायचे मराठी शाळा चांगल्या नाहीत म्हणून मुलांना मराठी माध्यमात घालायचे नाही. हे तर दुष्टचक्र आहे. नव्हे हा तर आपलाच दुटप्पीपणा.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल नावाचा बैल's picture

23 Mar 2009 - 12:51 am | धमाल नावाचा बैल

संत ज्ञानेश्वरांनी सर्वांना गीता समजावी म्हणून प्राकृत भाषेत आणली. ती लोकांनी डोक्यावर घेतली कारण ती रोजच्या वापरातील भाषेत होती. असाच प्रयोग इंग्रजी भाषेत झाला आहे. तो लेखक त्याचं लिखाण रोज त्याच्या मोलकरणीला वाचून दाखवत असे, जर तिला समजल तर ठीक अन्यथा तो उतारा पुन्हा लिहिल्या जायचा. लेखकाचे नाव आठवत नाही.

तसेही आपण तांत्रिक शब्द इंग्रजीतून का घ्यावे म्हणतो, पण त्यातले कित्येक शब्द मुळात फ्रेंच, जर्मन, ग्रीक किंवा लॅटीन आहेत. त्यावेळी इंग्लिश लोकांनी ते सरळसरळ स्वीकारले. मग आपण का नाही ?

जर सामान्यांच्या भाषेत विषय शिकवल्या गेले तरच ते रंजक आणि सोपे होतिल. काही दिवसांनी कंप्युटर आणि त्याचेशी संबंधीत शब्दसुद्धा मराठी शब्द वाटू लागेल यात आश्चर्य नाही.

मनीषा's picture

23 Mar 2009 - 10:12 am | मनीषा

मराठी माध्यम (ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांच्यासाठी )कधीही चांगले. कारण जी व्यवहारातील भाषा आहे तीच शिक्षणाचीही भाषा असणे चांगले असते. पण हल्ली आई वडिल , व्यवसाय किंवा नोकरी निमित्त राज्याबाहेर किंवा परदेशी जातात त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाखेरीज पर्याय च नसतो.
इंग्रजी ही अनिवार्यच आहे पण ८वी-१०वी विज्ञान आणि गणित विषय इंग्रजी माध्यमात शिकवावे ... बाकी विषय मराठी माध्यमात असावे ...
इंग्रजी माध्यमातील मुले ही मराठी माध्यमातील मुलांहून काही विशेष / वेगळे करु शकतात असे दिसत नाही . इंग्रजी संभाषण आत्मविश्वासाने करणे हा काही संपूर्ण करिअर साठी प्लस पॉइंट होतो असे नाही . शेवटी शैक्षणिक पात्रता/ योग्यता जास्त महत्वाची ...
आणि इंग्रजी संभाषण करण्याची कला आत्मसात करता येते.. काही वेळा सवईने अथवा त्या साठी असलेल्या क्लासेस च्या मदतीने.
माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो . मला सुरुवातीला अनेकदा असे जाणवले कि काही विषय त्याला मराठीतशिकवणे आणि त्याला समजणेही जास्त सोपे झाले असते .

चिरोटा's picture

23 Mar 2009 - 10:36 am | चिरोटा

शेवटी कुठलीही भाषा शिकायची तर त्यासाठी भाषा आवड हवी. माध्यमाचा संबंध नाही

बरोबर्.पण भारतात शेवटी डीग्री मिळाल्यावर नोकरीसाठी मुलाखत इन्ग्रजीतुनच होते ना?शिवाय भारतात माणुस किती 'स्मार्ट ' हे शेवटी त्याचे इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व किती ह्यावर अवलम्बुन.अर्थात नुसते इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व असुन चालत नाही पण इतर पण आवश्यक गोष्टी असाव्या लागतात.भारतिय प्रशासकिय सेवेतिल सर्वात उच्च अशी 'Indian Foreign Service' मध्ये रुजु होणार्या लोकान्ची यादी पाहिलीत तर जवळ्पास सगळिच इन्ग्रजी माध्यमातली(त्यात पण केन्द्रिय विद्यालय) असतात.तीच गोष्ट आय्.आय्.एम मध्ये सामिल होणार्यान्ची.जवळ्पास सर्व इन्ग्रजी माध्यामातले.दहावी नन्तर सर्व अभ्यास्क्रम इन्ग्रजीतुन असल्याने त्याना शिकताना भाषेची अडचण कमी येते.
माझ्यामते, आपला पाल्य जर अब्दुल कलाम, जयंतराव नारळीकर वगैरे सारखा असेल तर बिन्दिक्कत कुठल्याही माध्यमात घाला. जर इतरान्सारखच असेल तर इन्ग्रजी माध्यम योग्य.
भेन्डि

ऋचा's picture

23 Mar 2009 - 11:13 am | ऋचा

मी पण मराठी माध्यमातुन शिकलेय...अकरावी इंग्रजी मी शास्र शाखा घेतली...सहामाहीत नापास. :( काहीही कळायच नाही मग अगदी पहील्यापासुन सुरुवात करावी लागली कशाला काय म्हणतात इथपासुन....
आणि मी वार्षिक परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाले.... मला नाही वाटल इंग्रजी माध्यमात शिकल्याने काही फरक पडत असेल....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चिरोटा's picture

23 Mar 2009 - 11:40 am | चिरोटा

जर इन्ग्रजी माध्यमातुन शिकला असतात तर भाषा शिकण्याची वेगळी अडचण आली नसती.शेवटी तुमची बुध्धिमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते.मराठीत शिकुन गुणवत्ता यादीत येवुन नन्तर इन्ग्रजीच्या न्युनगन्डामुळे म्हणावी तशी पुढे न आलेली माणसे मी पाहिली आहेत.

नितिन थत्ते's picture

23 Mar 2009 - 12:24 pm | नितिन थत्ते

आमच्यापुढे एक नवीनच पेच निर्माण झाला आहे. आमची मुलगी पुढील वर्षी ५ वीत जाईल. तिच्या शाळेत आता सेमी इंग्लिश ची टूम निघाली आहे. विज्ञान व गणित हे विषय इंग्रजीतून शिकवणार म्हणे.
म्हणजे जे नको म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तेच माथी मारले जात आहे.
हे विषय मराठीतून शिकायचे असतील तर दुसरर्‍या तुकडीत जावे लागेल.
बघू काय होते ते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

23 Mar 2009 - 2:53 pm | विनायक प्रभू

मराठी बद्द्लचे कढ बघुन बरे वाटले

अभिरत भिरभि-या's picture

23 Mar 2009 - 3:54 pm | अभिरत भिरभि-या

वरची चर्चा वाचून मी स्वतःचा व माझ्या परिचयातील वेगवेगळ्या माध्यमातील शिकलेल्या मित्रांचा मनोमन केस स्टडी केला. <):) या सॅम्पल सर्व्हेची काही निरिक्षणे/फायदे/तोटे ..

पूर्ण मराठी माध्यम : :
यातील फार थोडे पुढे शिकले. जे शिकले त्यांची बुद्धीमत्ता चांगली असली तरी इंग्रजीतून व्यक्त होताना (Expression) समस्या येई. शिवाय ही मंडळी ईश्वरचंद्र विद्यासागर नसल्याने करियरमध्ये देशी माध्यमाचा नाही म्हटला तरी तोटा; किमानपक्षी अडथळा नक्कीच झाला. वर भेंडीबाजार यांनी म्हटल्याप्रमाणे तुमची बुद्धीमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते; हे खरे आहे.

त्याचवेळी मराठीतून शिकून पोल्ट्रीसारखे उद्योग सुरू करून चिक्कार पैसा कमावणरी मंडळी माहिती आहेत. आता पोल्ट्रीत विग्रजीपेक्षा मराठी 'भ'कार जास्त कामाला आला असेल ही बाब मान्य :)

सेमी-इंग्रजी
मी स्वत: या वर्गाचा प्रतिनिधी. प्रार्थमिक शिक्षण मराठीतून झाले व मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रजीचे Exposure चांगले झाल्याने तुलनेने समस्या कमी आल्या. माझ्या पाहण्यातील बहुतेक सर्व सेमीइंग्रजीवाली मंडळींचे करियर उत्तम निभावले आहे. अर्थात स्पोकन इंग्लिशचा प्रॉब्लेम असतोच. फक्त जरा लौकर सुटतो इतकेच.

इंग्रजी - नॉन कॉन्व्हेण्ट
यांचे दोन उपप्रकार पाहिले आहेत -
१ घर का न घाटका टाईप -
घरचे मराठी वातावरण किंवा पालकांना शंकासमाधान करण्याइतपत इंग्रजी न येणे यामुळे भरडलेली मंडळी आहेत. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांची वाट लागलेली असते.

२ कॉण्वेण्ट तोडीस तोड -
संस्काराने हिंदू पण इंग्रजी प्रभुत्वाच्या बाबतीत कॉण्वेण्टवाल्यांना तोडिस तोड असणारी मंदळी. करियरमध्ये बहुतेकांनी चांगली प्रगती केली हे सांगणे न लगे.

कॉन्व्हेण्ट :
आम्ही आमच्या संस्कृती/संस्कारांचा वगैरे कितीही डंका पिटला तरी या मंडळींबद्दल थोडासा मत्सर पूर्वीही होता आणि आजही थोडा वाटतोच. या मंदळींचे व्यक्तीमत्व काही वेगळेच घडते किमानपक्षी पांढरपेश्या जॉबमध्ये थोडी Edge मिळते हे नक्कीच.

"वट" शब्दाला चांगला प्रतिशब्द कोणता हे सेमीइंग्रजीवाला झटकन सांगेल हे आमचे मत.

एकूण जर आईबापास इंग्रजी येत नसेल तर पोराने सेमी-इंग्रजीतच जावे नाहीतर इंग्रजी उत्तम.
मराठीच्या अभिमानाकरिता मुलांनी मराठी माध्यमात जावे याला माझी सहमती नाही.

पालकांनी आवड लावली तर इंग्रजी माध्यमातील मुलांना देखिल परंपरेचा अभिमान वाटतो हे मी पाहिले आहे. ही मुले इंग्रजी उत्तम बोलू शकत असल्यामुळे त्यांना आयुष्यात भाषिक अडथळे येत नाहीत आणि स्वभाषेच्या परिचयामुळे मुळाशी बांधलेलीही असतात. (हेच का ते Best of both world ?) म्हणून वर चतुरंग, प्राजू आदी मंडळी करत असलेल्या प्रय्त्नांचे कौतुक वाटते.

त्याचवेळी मराठीतून शिकलेली पण इंग्रजी येत नसल्यामुआळे जिथेतिथे हिंदी झाडणारी (हरामखोर म्हणाय्ची इच्छा होते आहे) अनेक उदाहरणेही आहेत.
मराठीतून शिकल्याने कमीपणा येत नाही पण सर्व जण जयंत नारळीकर किंवा विद्यासागर नसतात हे ही खरे.

संस्कार वगैरेंचा माध्यमाशी काहीही संबंध नाही हे आणखी निरिक्षण. ( वाया गेलेली आणि न गेलेली अशी दोन्ही प्रकार सर्व माध्यमात पाहिलेत. )

वरील गोष्टी म्हणजे सार्वित्रीकरण नाही. केवळ मनोमन केलेल्या Sample Survey चे निष्कर्ष आहेत.

मराठी_माणूस's picture

23 Mar 2009 - 4:45 pm | मराठी_माणूस

ईंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेतल्यास कदाचीत करीअर मधे फायदा होईल हे गृहीत धरले तरी खालील गोष्टींचे काय

* ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे
* दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे
* हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे)
* वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे
* मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे
* मराठी साहित्य न वाचणे

मराठी असण्याचा न्युनगंड गळुन पडणे आवश्यक आहे, भाषेचे माध्यम ही समस्या त्या मानाने लहान आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Mar 2009 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

* ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे
तो घरीच चटकन वाचून होतो, वेळ लागतो तो इंग्लीश वाचायला!
* दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे
उपस्थित असणारा तिसरा, चौथा, पाचवी पुरूष/स्त्री अनुक्रमे बंगाली, आसामी आणि पोलिश असते.
* हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे)
घरी जे खाते तेच बाहेर काय खायचं? घरीच बनवून खाल्लं असतं ना!
* वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे
कारण त्यांना आपण काय बोलतो ते समजत नाही. मागायचं साधं पाणी आणि वेटर आणायचा बर्फवालं पाणी, असं होण्यापेक्षा माझं भयानक हिंदी वापरलं की मला इच्छित पदार्थ मिळतो, मी इप्सित स्थळी पोहोचते.
* मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे
"सालीनं केला घोटाळा"सारखे चित्रपट आणि "डोकं फिरलया"सारखी गाणी ऐकण्यापेक्षा मला "शॉशॅंक रिडंप्शन" आणि "भला हुआ मेरी मटकी टूटी रे" सारख्या सुंदर कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आवडतो.
* मराठी साहित्य न वाचणे
व्यक्तीगत आवड आणि साहित्यामधला बुद्ध्यांक कमी. सगळी आवड बोजड विषयांत आणि त्यांबद्दलची पुस्तकं फक्त आंग्लभाषेतच असणं.

ही माझी व्यक्तीगत (आणि/किंवा विक्षिप्त) उत्तरं. प्रत्येकाच्या बाबतीत हे आणि असंच खरं असतं असा माझा गैरसमज नाही.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

मराठी_माणूस's picture

24 Mar 2009 - 7:57 am | मराठी_माणूस

प्रतीसाद वाचुन धन्य झालो आणि मिपा च्या पहील्या पानावारचे खालील वाक्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.

मराठी_माणूस's picture

24 Mar 2009 - 3:20 pm | मराठी_माणूस

न्युनगंडाचे स्पष्टीकरण

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2009 - 3:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला माहित नसलेल्या, माझ्यात असलेल्या न्यूनगंडाची मला ओळख करून दिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद करते.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

मराठी_माणूस's picture

24 Mar 2009 - 4:54 pm | मराठी_माणूस

तो काढुन टाकायला मनापासुन प्रयत्न करा

मराठी माध्यमातुन शिकताना ईंग्रजीचे संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित होत नाही, त्यामुळे मराठी माध्यमातुन शिकलेल्या मुलांना न्युनगंड येतो. मराठी शाळांमध्ये ईंग्रजी संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित करता आले तर हा प्रश्न सुटेल. वर संजय अभ्यंकर आणि चतुरंग यांनी मांडलेला लहाणपणी कानावर पडाणार्‍या भाषेचा मुद्दा महत्वाचा आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

प्रमोद्_पुणे's picture

23 Mar 2009 - 5:56 pm | प्रमोद्_पुणे

कायदा आणि निगडीत क्शेत्रामध्ये आन्ग्ल् भाषा चान्गली अवगत असणे फार महत्वाचे आहे. माझे शालेय शिक्शण पूर्ण मराठीतून झाले. त्यामुळे वाणिज्य, कायदा आणि चिटणीस व्यवसायाचे शिक्शण घेताना थोडा (नाही बराच) त्रास झाला. अर्थशास्त्रातील, पिनल कोड मधिल शब्दान्चे अर्थ, त्यान्ची स्पेलीन्ग्स जमत नसत. व्यवसायाच्या ठीकाणी पण आन्ग्ल भाषाच वापरावी लागत असल्याने तिथे सुध्दा सुरुवातीला न्यूनगन्ड येतोच. आणि एखादा मुद्दा पटवून देताना पण आधि मराठीत विचार करून नन्तर त्याचे भाषान्तर करून मान्डावा लागतो. त्यामुळे असे वाटते की इन्ग्रजी माध्यमातून शिक्शण घेतले तर थोडा फायदा नक्कीच झाला असता.
कदाचित अभियान्त्रिकी शाखेचे शिक्शण घेताना हा त्रास कमी जाणवत असावा.

शिक्षणविषयक [बाल व प्रौढ- कोणाचेही असले तरी ] चर्चेत चाईल्ड सायकॉलजीचा उल्लेख अत्यावश्यक ठरतो. काही प्रतिसादकांनी उल्लेखलेल्या शाळांमधे हॉवर्ड गार्ड्नर ह्या चाईल्ड सायकॉलजीस्टच्या मल्टीपल इंटेलिजन्स्च्या सिद्धांतांचा वापर करुन नवी शिक्षणपद्धती विकसत करण्याचा स्तुत्य प्रयत्न चालला आहे.

हॉवर्ड गार्ड्नरच्या मते,
■प्रत्येक माणसात इंटेलिजन्सच्या ८ छटा असतात
■प्रत्येक माणसात ह्या ८ इंटेलिजन्सची सरमिसळ झालेली असते व त्याचे एक सर्वस्वी स्वतंत्र असे एक प्रोफ़ाईल असते
■शिक्षण देताना ह्या ८ इंटेलिजन्सची चेतना व्हावी म्हणून त्याप्रमाणे अध्यापन करणे अपेक्षित असते
■प्रत्येक इंटेलिजन्स मेंदूचा एक स्वतंत्र भाग व्यापतो
■८ इंटेलिजन्स एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे कार्यरत राहतात

८ इंटेलिजन्स व मानवाला त्यांची कार्यक्षमता: [मराठीत सगळे भाषांतर करु शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व]

१. भाषिक व शाब्दिक: वाचणे, लिहिणे, तारखा पाठे होणे, शब्दांची योग्य निवड व वापर, गोष्टी सांगता येणे
२. गणित व तत्वज्ञान: गणितात प्रगती असणे, तत्वज्ञान उत्तम असणे, अडचणींवर उपाय शोधता येण्याची क्षमता (problem-solving) संरचना मांडता येणे, कार्य-कारण
३. Visual / Spatial: Maps, reading charts, drawing, mazes, puzzles, imagining things, visualization
४. Bodily / Kinesthetic: Athletics, dancing, crafts, using tools, acting
५. Musical: Picking up sounds, remembering melodies, rhythms, singing
६. Interpersonal: Leading, organizing, understanding people, communicating, resolving conflicts, selling
७. Intrapersonal: Recognizing strengths and weaknesses, setting goals, understanding self
८. Nauralistic: Understanding nature, making distinctions, identifying flora and fauna

मला जेव्हढे चाईल्ड सायकॉलजी कळते त्या त्रोटक माहितीच्या आधाराने मी खालील मते मांडत आहे. ही मते मांडतांना, शिक्षणतज्ञांना/शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचा पुर्ण आदर आहे. ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत असल्यामुळेच आपण आज अनेक देशातील शिक्षणपध्दतीपेक्षा अनेक पटींनी पुढारलेले आहोत.
१. सेकंडरी व प्रायमरी शाळांत ह्या सर्व ८ इंटेलिजन्सचा विकास होण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आढळतो. पण वैयक्तिकपणे एखाद्या मुलांत काय प्रोफाईल आहे त्याप्रमाणे शिक्षण देण्यात अर्थातच अनेक अडचणी असतात.
२. तरीही, जर आपण जे विषय शाळेत शिकतो ते पाहिले असता, [२ ते ३ भाषा, इतिहास] असे विषय पाहता ज्यांचा इंटेलिजन्स प्रोफाईल कल भाषिक व शाब्दिक कडे जास्त झुकला आहे त्यांना त्याचा फायदा होतो. [मग त्यांना माध्यम कोणतेही असले तरी झटकन स्वतःला त्याप्रमाणे बदलता येते]. त्यामुळे मराठी माध्यमात शिकुनही शैक्षणिक प्रगती न झालेली मुले किंवा ईंग्लिश माध्यमात शिकुनही प्रगती न झालेली मुले पहावयास मिळतात.
३. गणित हा विषय तर पहिली पासुनच शिकवतात. इंजिनीअरींग, अकौटन्सी, सायन्स ह्या क्षेत्रात गणित, लॉजिकल रिझनिंग हा इंटेलिजन्स नसला की प्रगती होत नाही. मग माध्यम कोणतेही असो.
नोकरदार वर्ग प्रामुख्याने वरील इंटेलिजन्स वर अवलंबुन असतो
४. ज्याच्याकडे Interpersonal इंटेलिजन्सही आहे व वरील दोन्ही इंटेलिजन्स आहेत अशी व्यक्ति कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी, व्यावसायिक, इंजिनीअरींग मॅनेजरही यशस्वीपणे होते. पण Interpersonal इंटेलिजन्स आहे पण तो विकसित झाला नाही तर ती क्षमता असली तरी एखादा मागे पडतो
५. Intrapersonal इंटेलिजन्स असलेली मंडळी स्वतःच्या क्षमता ओळखू शकतात व असे लोक कष्टाने काहीही साध्य करु शकतात. अर्थातच तो इंटेलिजन्स लवकरात लवकर विकसित झाला पाहिजे. आपल्याकडे असा इंटेलिजन्स आहे ते त्या व्यक्तिला कळले पाहिजे.

वरील उदाहरणांवरुन मला इतकेच म्हणायचे आहे की, जेव्हा आपण म्हणतो की, मराठीत शिक्षण घेतल्यामुळे माझे काहीच अडले नाही तेव्हा त्याची कारणीमिमांसा अधिक खोलवर जाउन केली पाहिजे. असे झाले की, माझा पाल्यही असेच करु शकेल हे म्हणणे योग्य नाही.
येणाऱ्या काळात नॉलेज ईंग्लिशमधे जास्तीत जास्त निर्माण होणार असेल तर मुलांना ईंग्लिशवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे की नाही ते त्याच्या/तिच्या भविश्यातील कार्य्क्षेत्रावर अवलंबुन असेल. हे आधिच कसे कळणार?- हिच गोची आहे व त्यामुळेच आपण गोंधळतो.
जर अशा काही टेस्ट असतील की, ज्याने एखाद्यात काय इंटेलिजन्स प्रोफाईल आहे हे समजु शकेल असे असेल तर, ज्यांना भाषिक/शाब्दिक इंटेलिजन्स कमी आहे अशांनी मातृभाषेत शिकावे असे म्हणता येईल का?

[वेळे अभावी मला अपेक्षित असलेले लिखाण मी करु शकलो नाही]

मिहिर's picture

23 Mar 2009 - 11:13 pm | मिहिर

मराठी माध्यमच उत्तम. ११वीत इंग्रजी माध्यमाशी जमवुन घेताना फारशी अडचण येते असे वाटत नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2009 - 8:39 am | llपुण्याचे पेशवेll

अहो कुठे मराठी माध्यमात घालता. मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे. पुढच्या काही वर्षात मराठी ही पाली किंवा अर्धमागधी सारखी केवळ विद्यापिठात शिकवायची भाषा म्हणून तरी शिल्लक राहील किंवा हिंदीची एक बोलीभाषा म्हणून शिल्लक राहील.
त्या पेक्षा इंग्रजी माध्यमातून शिकवा, कसे?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

चिरोटा's picture

24 Mar 2009 - 11:14 am | चिरोटा

मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे

ही ओरड गेले अनेक वर्षे आपण ऐकत आहोत्.महाराष्ट्राची लोक्सन्ख्या साडे दहा कोटी, म्हणजे उत्तर प्रदेश्च्या खालोखाल लोकसन्ख्येत महाराश्ट्रचा नम्बर.! आता ह्यातले 'बाहेरचे',भैय्या,मद्रासी,गुज्जु,मारवाडी बाजुला काढले तरी मराठी बोलणारे खुप होतात.तेव्हा मराठी रहाणारच्. चिन्ता नसावी.
अवान्तर्-मराठी साहित्य सम्मेलन,कोकण सहित्य सम्मेलन्,विदर्भ साहित्य सम्मेलन्,अखिल भारतिय मराठी साहित्य सम्मेलन.... अशी असन्ख्य साहित्य सम्मेलने. त्यातराजकारण न करता रसभरीत साहित्याची चर्चा करणारे,भाषेला एक वेगळाच दर्जा प्राप्त करुन देणारे आपले साहित्यिक.कोण म्हणतो मराठी भाषा लुप्त होत चालली आहे?

अभिरत भिरभि-या's picture

24 Mar 2009 - 12:21 pm | अभिरत भिरभि-या

पेशव्यांच्या लिखाणातील उपरोध समजू शकतो. पण मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचे हितसंबंध जर परस्परविरोधी होत असतील तर दुसरे महत्वाचे ठरावे.

थोडे इतिहासात डोकावले असता १९६० दशकात मुंबईतील अनेक पांढरपेशा नोकर्‍या दाक्षिणात्यांनी पटकावल्या होत्या.
असे होण्यामागे तत्कालिन मराठी मंडळींपेक्षा दाक्षिणात्यांचे इंग्रजी प्रभुत्व हे एक कारण होते.
मराठीच्या नावाखाली इतिहासाची पुनरावृत्ती टाळलेलीच बरी!

केवळ माध्यम मराठी असले म्हणजे पुढच्या पिढीत मराठी भाषा टिकेल असा (गैर)समज आपल्यापैकी बर्‍याच जणांमध्ये दिसतो.
"बाहेरच्यांनाही" बघावी/ ऐकावीशी वाटतील असे चित्रपट/गाणी निघाली आणि चांगले साहित्य निघाले तर मराठीची फिकिर करण्याचे कारण नाही.

(अवांतर :) माझा एक इंग्रजी माध्यमातील मित्र पुल माझ्यापेक्षा जास्त वाचतो.

अभिरत