सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

किणकिनाट's picture
किणकिनाट in काथ्याकूट
28 Aug 2015 - 2:47 pm
गाभा: 

धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत -
आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी.

संपादक मंडळ.

ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.

प्रतिक्रिया

सर्व डिटिएच सर्विस प्रवाइडर चानेल लिस्ट /पॅकेज मधले चॅनेल्स सारखे बदलत असतात.पाच वर्षे टाटा वापरून आता डिश टिव्ही आहे यात सरकारी फ्री चानेल दिसतात,सॅटेलाइट एकच आहे,रेकॅार्डिंग कितीही करता येते पेनड्राइवर/इकसटरनल रु१२०० अंदाजे.मिनि पॅकेज २६०,३६०मध्ये बरेच आहेत.सेकंड कने अंदाजे १६०.

आजुबाजूस टाटा आणि व्हिडिओकॅान चे प्रमाण जास्ती दिसेल.

रेकॅार्डिंग फार उपयुक्त वस्तु आहे.

तुषार काळभोर's picture

2 Sep 2015 - 12:55 pm | तुषार काळभोर

१९९६ ते २०१० केबलचा निकृष्ट दर्जा सहन केल्यावर २०१० मध्ये डीटूएच घ्यायचा निर्णय घेतला. सगळ्या कंपन्यांचे पॅकेज पाहिले. माझी गरज व्हिडीओकॉनने भागेल असे वाटले. बेसिक पॅकेजमध्ये (तेव्हा रु १५० प्रतिमहिना) सर्व मराठी वाहिन्या, सर्व हिंदी वाहिन्या, सर्व हिंदी चित्रपट वाहिन्या, डिस्क्वरी+नॅटजिओ+फॉक्स हिस्टरी(आता ट्रॅवलर), सर्व हिंदी वृत्तवाहिन्या हे सगळं अंतर्भूत होतं. क्रिडा वाहिन्या नव्हत्या. कार्टून मध्ये फक्त कार्टूननेटवर्क होतं. पण बाकिच्या डीटूएच सेवांपेक्षा मला हे चांगलं वाटलं. अजूनही असंच आहे.
लईच जोराचा वादळी पाऊस असेल तेव्हा कधी कधी बंद पडतं. एकदा घराचं बांधकाम करताना ३ महिन्यासाठी दुसरीकडे राहायला गेलो होतो, तेव्हा १५० रु मध्ये शिफ्टिंग करून दिलं. (पुन्हा जुन्या घरी शिफ्टिंग करताना पुन्हा १५० रु.)
ग्राहक सेवा केंद्राचा (कॉल सेंटर) अनुभव अतिशय चांगला आहे.

मल्टीरूम कनेक्शन की २ वेगळे कनेक्शन ?
-> मल्टीरूम कनेक्शन असेल तर पैसे वाचतात, पण रिचार्ज केले नाही तर सर्व टीव्हींची सेवा बंद होते. प्रत्येक टीव्हीला वेगळे कनेक्श्न असेल तर पैसे थोडे जास्त जातील, पण प्रत्येक टीव्हीला गरजे नुसार वेगळे पॅकेज घेता येईल. शिवाय रिचार्जचा कालावधी वेगवेगळ ठेवला तर एखाद्या टीव्हीची सेवा बंद झाली तर दुसर्‍यावर दिसत राहील.

ब़जरबट्टू's picture

3 Sep 2015 - 1:14 pm | ब़जरबट्टू

सध्या माझापण डिटिएच बदलण्याचा निर्णय सुरु आहे. आता ऐर्टेल आहे, पण ते महागा वाटतय.. २५० मध्ये बेसिक , HD नाही..त्याचे वेगळे..पण पिक्चर क्वालिटी जबरदस्त आहे, व सहसा बंद पडत नाही.
पण आता व्हिडीओकॉन बारा वाटतोय.. पिक्चर क्वालिटी कशी आहे ..

तुषार काळभोर's picture

3 Sep 2015 - 2:28 pm | तुषार काळभोर

मोठ्या टीव्हीवर/एच्डी माहिती नाही

सुनील's picture

2 Sep 2015 - 10:28 am | सुनील

शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या कुंभमेळ्यातील एक विधी हा 'शाही स्नान' म्हणून ओळखला जातो.

'शाही' हा यावनी शब्द ह्या विधीला कधी आणि कसा लागला?

अमुक महाराज की जय कसे आले तसेच.अगदी कृष्णाबाईमहाराज की जय हे सुद्धा ऐकले आहे वाईत.

नाव आडनाव's picture

2 Sep 2015 - 10:40 am | नाव आडनाव

महानगरपालिकेचं (चिंचवड) / बोअरिंगचं वापरायचं पाणी (पिण्याचं नाही) वापरण्याआधी प्रोसेस करायचं असेल तर काही कमी खर्चाचा आणि चांगला उपाय आहे का?

सोसायटीत ९४ घरं आहेत. बरेच जण पाण्यात क्षार जास्त आहेत अशी तक्रार करत आहेत. क्षारांमुळं हीटर / वॉशिंग मशीन खराब होइल आणि बिल जास्त येइल असा पण एक प्रॉब्लेम आहे.

पाणी टाकीत जाण्या आधी प्रोसेस करायचंय. ३ ईमारतींच्या ३ टाक्या आहेत.

नया है वह's picture

9 Sep 2015 - 6:25 pm | नया है वह

पण कदचित उपयोग होईल तुम्हाला.

स्पेस सिटी सिग्मा आणि जंतर मंतर या सिरीयल कुठे मिळतील ?

वारंवार नाक कोरडे पडण्यामुळे श्वास घेणे/बोलताना त्रास होतो.
काही स्प्रे वैगेरे उपलब्ध आहे का ?

नाक कोरडं पडण्यावर होमिओपॅथी / आयुर्वेदिक डॉ़क्टरांनी गावरान गाईचं तूप नाकाला लावायला सांगितलं होतं. त्याने एकदम फरक पडत नाही, पण थोडा फरक पडतो. होमिओपॅथी च्या औषधांनी फरक पडला. ईथे डॉक्टरांचं नाव लिहायला नको म्हणून मी तुम्हाला व्यनी करतो.

जेपी's picture

2 Sep 2015 - 11:34 am | जेपी

धन्यवाद नाव आडनाव.

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 11:55 am | नीलमोहर

Otrivin nasal spray

ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे.
नाकावर लावायच्या स्ट्रीप्सही मिळतात.
नेहमीचे डी-कोल्ड, विक्स इ.चे इन्हेलर पण उपयोगी येते.

अनुप ढेरे's picture

2 Sep 2015 - 12:04 pm | अनुप ढेरे

ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे.

अ‍ॅलोपथी डाक्टरच्या सल्यानुसार वापरा स्प्रे हा. अ‍ॅडिक्टीव असतो असं ऐकलं आहे.

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 12:18 pm | नीलमोहर

स्वतः वापरून पाहिले आहे, अ‍ॅडिक्टीव वगैरे काही वाटत नाही, प्रभावी मात्र आहे.
अर्थात जास्त त्रास होत असेल तर आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे.

अनुप ढेरे's picture

2 Sep 2015 - 12:32 pm | अनुप ढेरे

मिपावरच वाचलं होतं.

http://www.misalpav.com/comment/490490#comment-490490

मी-सौरभ's picture

29 Sep 2015 - 9:06 pm | मी-सौरभ

मी खोबरेल तेल (मराठीत: पॅरेशूट) रोज सकाळि दोन्ही नाकपूड्यात आंघोळीनंतर लावतो. त्याचा ऊपाय होतोय, नाक कोरडे पडणे कमी झालय.
ऊपाय होईलच पण अपाय होणार नाही हे नक्क्की...

पद्मावति's picture

30 Sep 2015 - 7:23 pm | पद्मावति

साजूक तूप किंचित कोमट करून पातळ करा आणि दोन्ही नाकपूड्या मधे एक एक थेंब टाका. खूप आराम पडेल.

सोनी टीव्ही नवीन असताना "आय ड्रीम ऑफ जिनी" आदि सीरियल्स हिंदीत डब करून दाखवत असत. हे हिंदी डब्ड व्हर्जन आंजावर कुठे उपलब्ध आहे का?

संजय पाटिल's picture

2 Sep 2015 - 12:08 pm | संजय पाटिल

इथे बघु शकाल

आदूबाळ's picture

2 Sep 2015 - 12:11 pm | आदूबाळ

हो. इंग्रजी पाहिलेलं आहे. हिंदी डब्ड व्हर्जन आहे का विचारत होतो.

काळा पहाड's picture

5 Nov 2015 - 1:21 am | काळा पहाड

नै. मिळालं तर मला पण सांगा. इंग्लिश मद्दे ती मज्जा नै.

कंजूस's picture

3 Sep 2015 - 5:58 am | कंजूस

Tata sky होणार हाइटेक?
रेकॅार्डड कार्यक्रम पाहा मोबाइलवर ₹८००० च्या डब्यातून.

तुडतुडी's picture

4 Sep 2015 - 3:20 pm | तुडतुडी

आय ड्रीम ऑफ जिनी अंड Bewitched my both my favourites. you tube वर कदाचित असू शकतं डबड वर्जन

इ टीवी मराठी वर एक सिरीयल होती भूमिका नावाची. सुनिल बर्वे रविंद्र मंकणी इ. काम करणारे होते. त्या सिरीयल्चं शिर्षक गीत काय होतं?

गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही मनात आलेले प्रश्न .

१. गणपतीची मुर्ती बनवण्याची पध्दत केव्हा पासून सुरु झाली ?
२. ती का निर्माण केली जाते ? त्याचा इतिहास काय आहे ( अगदी वैदिक काळापासून असला तरी चालेल) ?
३. पार्थिव मूर्ती म्हणजे काय ?
४. गणपतीचे विसर्जन का करतात ?
५. हि पद्धत जर पार्वतीने चालू केली आहे का ?

कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता/ खेचाखेची न होता माहिती मिळेल हि अपेक्षा करतो.

बाप्पा मोरया !!!

गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात? सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे ????

अविनाशकुलकर्णी's picture

29 Sep 2015 - 11:52 am | अविनाशकुलकर्णी

"कांदे पोहे" कार्यक्रम होतो व मुलगी आवडते..होकार कळवायचा विचार करत असतानाच मुलिच्या कडुन नकार येतो...

"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास अश्या नकारलेल्या मुलिची जेंव्हा काहि वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळ्ख करुन देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात.

.आनंद..सुड..अनुकंपा?

पैसा's picture

29 Sep 2015 - 12:10 pm | पैसा

तिलाच कदाचित "हुश्श! सुटले बुवा" असं वाटत असेल की वो!

मी नकार कळवलेला मुलगा एकदा भेटला तेव्हा त्याच्या किलोभर मेकप केलेल्या बायकोकडं बघून मला असंच वाटलं होतं हो पैसा

तर्राट जोकर's picture

29 Sep 2015 - 5:11 pm | तर्राट जोकर

हा प्रश्न कोण विचारतो यावर उत्तर अवलंबून आहे.
१. तोवर लग्न न झालेला
२. लग्न होऊन स्वतःच पोट सुटलेला व टक्कल पडलेला
३. लग्न व सहवास-प्रेम म्हणजे काय याचे शष्प ज्ञान नसलेला
४. आपण कायम र्‍हितीक दिसत होतो व राहू असा ययातिसम वर मिळालेला
५. तिच्या नवर्‍याच्या श्रीमंतीने (वा ती आनंदात आहे हे पाहून) न्यूनगंड येऊन पराभवाची लाज लपवण्यासाठी फुटकळ डीटेल्स शोधणारा.
६. अजिबात महत्त्वाचे नसलेले दुसर्‍यांचे ओझे वर्षानुवर्षे आपल्या टीचभर मेंदूवर वागवणारा.

यापैकी तो कोण तो प्रश्न विचारणारा?

अर्जुन's picture

30 Sep 2015 - 4:12 pm | अर्जुन

आमच्या माहितील एक मराठा मुलीचा काही कारणामुळे विवाह वेळेत होऊ शकला नाही. आज
तीचे वय ३९ पुर्ण आहे. रहाण्यास डोंबिवली येथे आहे. ती नोकरी करत असुन साधारण दहा हजार मासीक उत्पन्न आहे. इतर जाती मधे विवाह करण्याची तयारी आहे. शादी डॉट कॉम वर नाव नोंदले आहे. दुसर्या चांगल्या वेबसाइट किंवा विवाह मंड्ळाची माहीती असल्यास क्रुपया कळवा.

@कांदेपोहे , तुम्ही किती involve होता यावर
अवलंबून असेल.

सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय?

सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल?
सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते?
सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते?
सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?

काही काही उपहारगृहात अन्न वाढताना वाढप्यांनी हातात मोजे घातलेले दिसतात. कशासाठी असे मोजे घातले जातात?

स्वच्छतेचं इम्प्रेशन द्यायला. पाणीपुरी देणार्‍यांकडे पण पाहिला आहे हा प्रकार.

असंका's picture

6 Oct 2015 - 11:07 am | असंका

:-))

धर्मराजमुटके's picture

7 Oct 2015 - 9:39 am | धर्मराजमुटके

भारत नेपाळ संबंधांना काय झालयं ? नेपाळची नवीन राज्यघटना अस्तित्त्वात आल्यापासून भारताने नेपाळकडे जाणारा बराच सप्लाय रोखलाय अशा बातम्या वाचनात येतायेत. दोन्ही बाजूंनी (म्हणजे वाचकवर्गाच्या) तीव्र प्रतिक्रियादेखील येतायेत. एकाएकी नक्की काय बिघडलयं ?

तुडतुडी's picture

7 Oct 2015 - 3:15 pm | तुडतुडी

मंदार भालेराव आणि shawshanky .
पार्थिव मूर्ती म्हणजे मातीपासून (पृथ्वीपासून ) तयार केलेली मूर्ती . तिचं विसर्जन पाण्यात करतात . कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. हि सर्व भौतिक रुपकं आहेत . ह्यामागे अध्यात्मिक रहस्य असं आहे .कुंडलिनी मूलाधार मध्ये जागृत होते . अध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी म्हणजे मूलाधार चक्राचं उघडणं . ह्याची अधिष्ठात्री देवता गणेश आहे . हे प्रथम चक्र आहे म्हणून गणपती प्रथमपूज्य मानला गेला आहे . ह्या चक्राचं तत्व पृथ्वीतत्व . म्हणून गणेशाची पार्थिव मूर्ती करतात . मूलाधार चक्र पूर्णपणे शुद्ध झाल्यावर गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन होते . पुढचं २ नंबर चं चक्र स्वाधिष्ठान चक्र . ह्याचं तत्व जलतत्व . म्हणजे पृथ्वीतत्वाचा अंत जलतत्वा मध्ये होतो म्हणून गणेशाच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन पाण्यात करतात . प्लास्टर ऑफ प्यारीस च्या मूर्ती वापरणं पूर्णत: चुकीचं आहे . मूर्ती मातीचीच असायला हवी .

तुडतुडी's picture

7 Oct 2015 - 3:30 pm | तुडतुडी

धर्मराजमुटके
नेपाळ हे आधी हिंदू राष्ट्र होतं . पण सध्याची नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष केली गेलीये . हे मान्य नसणारा मोठा गट तिकडे आहे . त्यामुळे तिथे धुसफूस चालू आहे . भारतामुळेच आपली नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष झाली असा काहींचा गैरसमज झाल्यामुळे त्यांच्या मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय तर विरोधी गटाचं म्हणणं भारतामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना जोर धरू लागलीय . त्यामुळे त्यांच्याही मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय .भारतीयांवर तिथे हल्ले झाले . संबंध तणावपूर्ण आहेत आणि नेपालने भारतीय T V च्यानेल्स block केले आहेत . भारतातून नेपाळमध्ये माल घेवून जाणारे हल्ला होण्याच्या भीतीने जात नाहीयेत . त्यामुळे माल जाणारा सप्लाय रोखल्य अशी समजूत झालीय . आत्तापर्यंत भारताने नेपाल ला सर्वतोपरी मदत केली आहे . नेपाळचं वागणं अत्यंत चुकीचं आहे

प्रदीप's picture

7 Oct 2015 - 8:12 pm | प्रदीप

काही वेगळेच आहे.

इथे इथे पहा.

नेपाळच्या दक्षिणेच्या भागांत मधेसी ह्या जमातीचे लोक प्रामुख्याने रहातात. ते एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३२ % आहेत.
भारताला लागूनच असलेल्या भागांतील हे लोक असल्याने, ते अनेक दृष्ट्या भारताशी जवळून निगडीत आहेत.

नेपाळच्या नव्या राज्यघटनेनुसार देशांतर्गत ७ प्रांत (provinces) नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. मधेसींच्या म्हणण्यानुसार हे प्रांत मुद्दामहून अश्या तर्‍हेने निर्माण केले गेले की कुठल्याही प्रांतात त्यांचे प्राबल्य रहाणार नाही. तेव्हा त्यांचे आंदोलन सुरू आहे.

भारतातून पेट्रोल व इतर जीवनोपयोगी सामान घेऊन येणार्‍या ट्रक्सना ह्या आंदोलनामुळे काठमांडूपर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसले आहे, असे भारताचे अधिकृत म्हणणे आहे. पण ह्या कारणास्तव भारताने मुद्दाम ती वाहतूक ठप्प केलेली आहे, असा आरोप नेपाळमधील अनेकजण करताहेत.

गेल्या रविवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यावर सोमवारी पौर्णिमा असल्याने कोल्हापुरला जायचा योग आला. सोमवारी सकाळी सुध्दा मंडपात गणपतीची मुर्ती पाहुन नवल वाटले. चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते. मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सुर्याच्या साक्षीने काही मोठे गणपती विसर्जन करतात हे माहित आहे. पण पौर्णिमेला गणपती विसर्जन? कोणाला यामागचे शास्त्रिय / धार्मिक / इतर कारण माहित आहे का? कुतुहल म्हणुन विचारतो आहे.

चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते.

नक्की कुठे चौकशी केलीत म्हणे?

रिझर्व बँकेचे गव्हर्नर पद आत्तापर्यंत एकाही महिलेने भुषवले नाहीये. याला काही विशेष कारण / प्रतिबंध आहेत का?

अन्या दातार's picture

30 Oct 2015 - 3:41 pm | अन्या दातार

नाही. डेप्युटी गव्हर्नर या पदावर श्रीमती उषा थोरात कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्याने गव्हर्नर बनू शकल्या नाहीत.

पण पौर्णिमेला गणपती विसर्जन?

तसही सार्वजनिक गणेशोत्सवाला धर्माचा कोणताही आधार नसल्यामुळे विसर्जन अमुकच दिवशी करावं असं काही नाही . पौर्णिमेला गणपती विसर्जन केलं तर चालतं . पण प्रतिपदेला करू नये . प्रतिपदेला कोणतंही शुभकार्य करत नाहीत (बलिप्रतिपदा सोडून). तो वाईट मुहूर्त मानला जातो . पण पौर्णिम संपायच्या आत विसर्जन संपत नाही . प्रतिपदा चालू झाली तरी विसर्जन मिरवणूक आपली चालूच असते . म्हणून मग चतुर्दशीला करतात आणि पौर्णिमा चालू झाली तरी ते काही संपत नाही .

तुषार काळभोर's picture

8 Oct 2015 - 11:01 am | तुषार काळभोर

बाकी प्रतिसादाबद्दल काही माहिती नसल्याने नो कमेंट्स ऑन दॅट.
पण बलिप्रतिपदेबरोबर चैत्र-शुद्ध-प्रतिपदाही शुभ मानली जाते बहुतेक.

तुषार काळभोर's picture

24 Oct 2015 - 10:10 am | तुषार काळभोर

गाडीबरोबर येमारेफचे झॅपर टायर आले होते, सात वर्षात पहिल्यांदा आठ दिवसांपुर्वी गाडी पंक्चर झाली. आता बदलावेत म्हणतो. एकूण ४००००+ रनिंग झालंय. बदलावेत का?

१) ट्युबवाले घ्यावेत की ट्युबलेस?
२) ब्रॅण्ड्/मॉडेल?
३) पुण्यात किंमत किती असेल?

बटण टायर टाका. गाडी स्किड होण्याचे प्रमाण कमी होईल आणि पंक्चरही फार होणार नाही. सिएट चे टायर आहेत. एका परदेशी कंपनीचेही टायर आहेत. सिराझ स्ट्रीट म्हणून. कंपनीचे नाव लक्षात नाही. ते छान आहेत. एमआरएफ पेक्षा खूप चांगले.

ट्युबलेस उत्तमच. सगळीकडे चौकशी करूनच घासाघीस करूनच टायर टाकून घ्या. टायर बदलताना टायरवाल्याने व्हीलबॅलन्सिंग मोफत करून दिले पाहिजे. तसे आधीच ठरवून घ्या.

तुषार काळभोर's picture

24 Oct 2015 - 1:54 pm | तुषार काळभोर

भौतेक त्यात ट्युबलेस नै येत. ट्युब टाईप १८-२.७५ (फ्रंट) १६००-१७०० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५०
ट्युब टाईप १८-१००/९० (रिअर) १९००-२००० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५०.

सध्या झॅपर आहेत गाडीला. मला त्याची रस्त्यावरची ग्रिप तितकी पक्की नाही वाटली. गाडी ओलसर रस्त्यावर/वळणावर सहजासहजी स्किड होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

घासाघीस+व्हील बॅलन्सिंगचं माहिती नव्हतं. हे नक्की करेल.

तुषार काळभोर's picture

24 Oct 2015 - 1:56 pm | तुषार काळभोर

मस्त वाटतिये.

ट्यूबलेस नाहीये पण टायर गुणवत्ता जबरदस्त आहे. स्किड होऊ नये हेच तर महत्त्वाचं असतं. त्यासाठीच मिशेलिन सिराज चे ट्रीड डिझाइन भारी आहे.

जो डीलर व्हील बॅलन्सिंग करून देईल त्याच्याचकडे टायर बसवून घ्या.

तुषार काळभोर's picture

24 Oct 2015 - 2:24 pm | तुषार काळभोर

एकदा प्रत्यक्ष जाऊन बघतो आणि फायनल करतो.

नाव आडनाव's picture

24 Oct 2015 - 12:00 pm | नाव आडनाव

~६ महिन्याआधी मी जिथं राहतो त्या सोसायटीतले सगळे सीएफएल बल्ब (पार्किंग, पॅसेज, कंपाऊंड वॉल आणि लिफ्ट) बदलून एलइडी बल्ब लावले तेंव्हा खरडफळ्यावर लिहिलं होतं. आता सहा महिन्यांचं बिल बघितल्यानंतर बिल २०% - २२% कमी झालं म्हणून इथं लिहित आहे.

बल्ब बदलतांना एलइडीचं वॅटेज सीएफएल च्या (जवळपास तितक्याच ऊजेडासाठी) ~१/३ आहे. कंपाऊंड वॉल चे ४५ वॅटचे बल्ब बदलून त्या ऐवजी १४ वॅटचे एलइडी बल्ब लावले. तसंच, लिफ्ट च्या १५ वॅट ऐवजी २.७ वॅट, पार्किंग आणि पॅसेजचे १५ वॅट सीएफएल ऐवजी ४ वॅट लावले. ऊजेड जवळपास सारखा आहे, पण बिल ५३००० वरून ४२००० वर आलं आहे.

जर घरी लावयचे असतील तर मात्र एलइडी बल्ब ऐवजी ट्यूब लावा. ४० वॅट च्या जुन्या ट्यूब ऐवजी २० वॅट ची एलइडी ट्यूब मला तेव्हढीच ऊजेड देणारी वाटली. किचेन आणि बाकिच्या रूम मधे ९ वॅटचे एलइडी बल्ब लावले आहेत. बल्ब चा ऊजेड ठीक ठीक आहे पण वाचण्यासाठी ट्यूब चांगली असं वाटतं.

एलइडी घेतांना चांगल्या कंपनीचा घ्या. तुलना करतांना चायनामेड बल्ब आणि एक क्षक्षक्ष कंपनी याची किंमत अजिबात तुलना होणारी नव्हती पण ऊजेडाचं पण तसंच होतं :)

आम्ही कंपनीकडे काँटॅक्ट केला होता त्यामुळे डिस्काऊंट मिळाला. नंतर माझा एक मित्र बोलला पेयू / अशीच एक साइट वर कंपनीपेक्षा कमी किंमतीत मिळाले असते. एलइडी वर २ वर्षांची वॉरंटी आहे आणि त्याची लाईफ पण सीएफएल च्या तिप्प्ट आहे (असं कंपनीने क्लेम केलंय).

टीप - माझ्या ओळखीतला, नात्यातला किंवा मित्र यापैकी कोणी बल्ब च्या कंपनी / एजेंसीशी संबंधित नाही आणि ही जाहिरात नाही :) फक्त एक चांगला अनुभव म्हणून शेअर केला आहे.

नाव आडनाव's picture

24 Oct 2015 - 12:36 pm | नाव आडनाव

DIGIPASS Mobile Enterprise Sec
हे अँड्रॉइड अ‍ॅप विंडोज ७ वर चालवण्यासाठी एखादा इम्युलेटर आहे का?

प्रदीप's picture

24 Oct 2015 - 8:24 pm | प्रदीप

आमच्या मेक्सिकोच्या पश्चिम किनार्‍यावर काल एक मोठ्ठे वादळ आले व त्याने येथे बरीच हानी केली.-- अगदी जगबुडीच आली होती, म्हणा ना! ह्याअगोदर चारपाच दिवस टी. व्ही. वर सर्व हवामानाच्या बातम्यात सदर वादळाचे चित्र शेंदरी रंगात दाखवत होते.

ह्या वादळाने आणलेल्या जगबुडीच्या निषेर्धाथ मला कुठेतरी, काहीतरी परत करावेसे वाटते आहे. अनुभव्यांनी अथवा जाणकारांनी काय व कोठे परत करावी, ह्याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

मिपाच्या संपादकांना व्यनि करून निषेध नोंदवा. हे काय चालवलंय म्हणावं.

सालासकटचे अक्रोड घरी फोडताना चुरा होतो. चुरा न होता आख्खे मगज निघण्यासाठी काही उपाय आहे का?
(दुकानातून विकतचे मगज आणावेत असा सल्ला नको आहे.)

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 9:58 am | तर्राट जोकर

अक्रोडाच्या सिललाईनवर ठोका. शकले व्यवस्थित निघतात. आवरणाचे तुकडे न होऊ देता फोडले तर मगजही नीट मिळतो. कधी वेळ मिळाला की फोटो टाकेन.

आदूबाळ's picture

30 Oct 2015 - 7:35 pm | आदूबाळ

शा० खा० आणि ट्वि० ख० चा "बादशहा" शिणुमा बघा.

काळा पहाड's picture

5 Nov 2015 - 1:15 am | काळा पहाड

लैच कठीण असले तर मगज निघणार नै लौकर. तेव्हा रा० गो० व० चा रा० गो० व० की आग ची सी० डी० मिळाली तर आणून ठेवा. १० मिन्टात मगज निघेल.

मार्मिक गोडसे's picture

29 Oct 2015 - 9:59 am | मार्मिक गोडसे

विको वज्रदंती वापरा. अक्रोड दाताने फोडा, बरोबर दोन भाग होतात, चूरा होत नाही.

https://www.youtube.com/watch?v=coNJY1lqkLg

सिल लाइनवर ठोकूनही चुरा झाला.
दुसरा प्रयत्न म्हणून गरम करूनही फोडले पण चुराच झाला.

अक्रोड ला स्रू ड्राइवर ने भोक पाडा, जिथे अक्रोड चे देठ असते त्या ठीकाणी आणि मग अक्रोडला आपटा.

सेनापती बापटांबद्दल नेटवर फार काही सापडत नाही. गुग्ल तर सेनापती बापट रोड वरच अडकून पडतं. य दि फडकेंनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलेलं दिसतंय. ते वाचायचं तर ऑनलाइन आहे का हे मला शोधायचंय. हे कसं शोधायचं कुणी सांगेल का?

किंवा इतर काही ऑनलाइन साहित्य त्यांच्याबद्दलचं असेल तर कसं शोधायचं हेही सांगेल का कुणी?

तुषार काळभोर's picture

30 Oct 2015 - 11:28 am | तुषार काळभोर

"senapati bapat" -road -marg हे गुगला.

"senapati bapat" हे असं दुहेरी अवतरणात टाकल्याने senapati आणि bapat हे वेगळे शब्द असलेले रिजल्ट्स गुगल देत नाही. केवळ senapati bapat शब्द असेच्य असे एखाद्य वेबपेज वर असतील तर ते पेज रिजल्ट्स मध्ये येईल.

-road -marg यामुळे road आणि marg हे शब्द रिजल्ट्स मधून वगळले जातील.

"senapati bapat" -road -marg असं सर्च केलं तर सेनापती बापट हे शब्द याच क्रमात असलेली वेबपेजेस ज्यात road आणि marg हे शब्द नाहियेत, ती वेबपेजेस गुगल तुम्हाला शोधून देईल.

वा! काय सुरेख मार्गदर्शन!!
धन्यवाद!!

असंका's picture

30 Oct 2015 - 9:44 pm | असंका

धन्यवाद!!!

उपयोजक's picture

30 Oct 2015 - 7:21 pm | उपयोजक

असाच कोठे जन्म लाभतो
अशीच नियती ठरते.

असंका's picture

30 Oct 2015 - 9:42 pm | असंका

अरे वा!

खरं सांगू का, क्लिक होइना अजून. पण अनेक धन्यवाद या माहितीबद्दल.

काही वर्षापुर्वी ई टीव्ही मराठीवर एक मालीका होती,'तीन तेरा पिंपळपान'नावाची.मजा यायची पहायला.
पण आता ती तु नळीवर सापडत नाही.खुप वेळा शोधले पण नाही सापडली.
कुणाला आठवते का ती मालीका?आणि तिची लिंक देऊ शकेल का कोणी?

कुणालाच ती मालिका आठवत नाही का?

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2015 - 11:41 pm | टवाळ कार्टा

काळी जादू असते का

आदूबाळ's picture

4 Nov 2015 - 11:46 pm | आदूबाळ

असते की. ती चालते का हा खरा प्रश्न आहे ;)

शब्दबम्बाळ's picture

5 Nov 2015 - 12:11 am | शब्दबम्बाळ

निळा जादू 'रोशन' होताना पाहण्यात आहे, काय सांगावे त्याची "ती" असू शकेल... काळी जादू!
(टीप: हि वर्ण द्वेषी प्रतिक्रिया नाही!! )

बासुंदी's picture

15 Nov 2015 - 8:00 pm | बासुंदी

सध्या तुळेला साडेसातीचा शेवटचा चरण सुरू आहे म्हणतात पण नक्की कधी संपतेय साडेसाती कुणी सांगु शकेल काय?

अमित मुंबईचा's picture

15 Nov 2015 - 8:11 pm | अमित मुंबईचा

आजाच भविष्यवेध या कार्यक्रमात ऐकले

उपयोजक's picture

16 Nov 2015 - 1:35 pm | उपयोजक

कधी सुखद वाटले बंध ,हे रक्ताचे संबंध
धागा धागा जुळवीत जाता आनंदा ये भरते
किती भुमिका करते

अरे वा...तुमच्याकडे आहे का ही कविता? लिंक असेल तर देता येइल का?

कारण आपण दिलेले शब्द मी परत सर्च केले तरी फक्त एवढ्याच ओळी (आपण ज्या अगोदर दिल्या होत्या त्या) मिळत होत्या...

आगाउ धन्यवाद!

B amol's picture

18 Nov 2015 - 1:24 pm | B amol

मित्रहो शिर्डी वॉटर पार्क बद्दल माहिती हवी होती.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 1:28 pm | टवाळ कार्टा

हे कधी झाले

राजेश कुलकर्णी's picture

22 Nov 2015 - 10:46 pm | राजेश कुलकर्णी

.

१) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल.

२) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते?

३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे.

४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा.

५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही.

तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता.

६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी?

शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे?

तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.

अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे.

७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे.

८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो?

आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का?

“काय पांडबा कसला इचार करतुयास?”
“आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.”
“अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?”
“आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी."
"आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू."

दहा सेकंदांनी......

“काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?”
“इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.”
“हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही.
“आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?”
“अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2015 - 11:57 am | पिलीयन रायडर

जुने कपडे कुणाला द्यावेत?

मध्ये कुठेतरी एका संस्थेची माहिती वाचली होती. ते जुने कपडे, वस्तु घेऊन पुढे गरजु लोकांना त्याचे वाटप करत असत. पुण्यात ठराविक दिवशी त्यांची मीटींग होते असंही काहीसं वाचल्म होतं.

पुण्यातल्या अशा एखाद्या संस्थेची माहिती आहे का?

नाव आडनाव's picture

27 Nov 2015 - 12:21 pm | नाव आडनाव

संस्थेचं नाव विसरलो.
त्यांना फोन केला तर घरी येऊन घेऊन जातात. लहानांचे - मोठ्यांचे सगळ्यांचे कपडे देऊ शकता. त्यांच्या ऑफिस मधे जाऊन पण देऊ शकता. ऑफिस ब्रेमन सर्कल पासून सांगवीकडे येतांना (जेव्हढं मला आठवतंय पुलाच्या आधी ऊजवीकडे एका दुकानात) आहे. फोन केल्यावर ते सांगतीलंच.

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2015 - 12:52 pm | पिलीयन रायडर

फोन लावला. राँग नंबर निघाला. :(

ह्या निमित्ताने शोधता शोधता हा ही एक ग्रुप सापडला आहे:-
JAGRITI CLOTHES COLLECTION DRIVE

पण इथे फोन केला असता ते नेहमीच असे कपडे घेत नाहीत असं कळालं. त्यांनी मध्यंतरी एक कॅम्प केला होता. त्याचे हे पेज आहे.

नाव आडनाव's picture

27 Nov 2015 - 1:46 pm | नाव आडनाव

ओह... नंबर बदलला वाटतंय. मी फोन केला होता आत्ता. संपादक, जर शक्य असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकता येइल का? चुकिचा नंबर ठेवायला नको.
मी शनिवारी / रविवारी त्या भागात गेलो तर नवा नंबर आणि संस्थेचं नाव अपडेट करतो इथे.

केसरीवाड्याच्या शेजारी अशा एका संस्थेचं दुकान आहे.

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2015 - 12:38 pm | पिलीयन रायडर

हो.. बहुदा केसरीवाड्यात त्यांची मीटींग व्हायची. कुठेतरी अगदी पेठांमधलाच पत्ता होता.

एकंदरीत अशा संस्थाना कपडे देण्याचा अनुभव कसा आहे? कुणी कधी कपडे दिले आहेत का?
मला फक्त दिलेल्या गोष्टींचा सदुपयोगच व्हावा इतकीच इच्छा आहे.

नाव आडनाव
धन्यवाद! लगेच फोन करते.

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा

मी दिलेले आहेत पण ते मुंबैत

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2015 - 1:45 pm | पिलीयन रायडर

सहज म्हणुन लोक बिरादरी प्रकल्पाची साईट पाहिली. ते ही अशा वतु घेतात असं लिहीलय आणि पुण्या मुंबईतले संपर्क दिले आहेत. पैकी पुण्यातल्या व्यक्तिने सांगितले की इथुन कपडे नेणे अवघड जात असल्याने सध्या ते काही घेत नाहीयेत, पण त्यांनी सुद्धा केसरीवाड्यातल्या कलेक्शन सेंटरचा नंबर दिलाय.

स्नेहालय केसरी वाडा
सचिन - ९०११०३३०११
वेळ - गुरुवार आणि रविवार - सकाळी ११-२
सर्व प्रकारचे कपडे, खेळणे घेतात.
पुढे ह्या वतु २५ वेगवेगळ्या संस्थांना जातात.

मी ह्या रविवारी जाण्याचा विचार करत आहे. अनुभव सांगेन.

पिलीयन रायडर's picture

30 Nov 2015 - 12:24 pm | पिलीयन रायडर

जुने कपडे - केसरीवाड्यापर्यंत काही जाणे झाले नाही. तेव्हा वॉचमन, सफाईवाला, कामवाल्यामावशी.. अशा लोकांनाच कपडे वाटुन टाकले. खेळणी तेवढी आहेत. ती आजुबाजुलाच लहानमुलं बघणार आणी देऊन टाकणार.

पुढचा प्रश्नः-

पुण्यात चांगले फर्निचर कुठे मिळेल / चांगला सुतार कुणाला ठाऊक आहे का?

१. एकबोटेसारखे नामवंत शोरुम्स - उत्तम डिझाईन्स पण महाग

२. पेपरफ्राय - व्हरायटी आणि किफायतशीर , पण डायरेक्ट घरात आल्यावरच कळणार की प्रॉडक्ट कसे आहे. नाही आवडले तर परत पाठवा. पैसे परत मिळवा. ह्यात बराच वेळ जाण्याची शक्यता.

३. सुतार - हवे तसे घडवुन घेता येते पण मग एकदा घरात आले की ह्या मंडळींना बाहेर काढणे अवघड. शिवाय जसे ट्रेन्डी / एथनिक डिझाईन्स एकबोटे किंवा पेपरफ्राय सारख्या तत्सम साईट्स वर दिसतात तसे घडवुन घेता येतात का ते माहित नाही.

(मला घराचा कोपरा न कोपरा लाकडाने मढवुन "इंटिरियर" करयाचे नाहीये. आवश्यक तेवढ्या गोष्टी करुन घ्यायच्या आहेत किंवा तयार आणायच्या आहेत. उत्तम लाकुड आणि अ‍ॅण्टीक/ वेगळे डिझाईन हे निष्कर्ष आहेत)

प्रसाद१९७१'s picture

30 Nov 2015 - 1:21 pm | प्रसाद१९७१

पेपरफ्राय वरच्या प्रॉडक्ट बद्दल मला पण माहीती हवी होती. कोणाला काही अनुभव आहे का?

अभ्या..'s picture

30 Nov 2015 - 6:25 pm | अभ्या..

पपर फ्रायवरुन मित्राने डबल बेड मागवला. तेच डिझाईन गोदरेज ईंटेरिओचे पाह्यले. ते २० के च्या वर जात होते डिस्कांऊट पकडून. पेपरफ्राय वर ११७०० ला मिळाला. सीओडी पण दिली. सोलापूरात फ्री डिलीव्हरी दिली ५ दिवसात. पीसेस मध्ये आला. पुण्यात असेल तर इन्स्टॉलेशन फ्री मिळते म्हणे. कंपनीच्या पोरीने संगितले लोकल कारागीराकडून करुन घ्या. बिल मेल करा. तेवढी अमाऊंट पेबॅक पण झाली. (आम्ही आमचा कारागीर लावून ८०० चे बिल पाठवले. ६०० सँक्शन झाले ;) ) क्वालिटी एक नंबर आहे. फिनेश ईंटरनॅशनल लेवल चे आहे. बेडवर मेड इन मलेशियाचा स्टॅम्प आहे. ऑलोव्हर बेस्ट प्रॉडक्ट अन बेस्ट सर्विस वाटली. व्हरायटी पण भारीपैकी आहे गोदरेज ईंटेरिओपेक्षा. अर्बन लॅडर ज्यादाच महाग आहे.

पिलीयन रायडर's picture

1 Dec 2015 - 10:55 am | पिलीयन रायडर

माझ्या मैत्रिणीने एक मोठा वॉर्डरोब, बेड आणि शु रॅक मागवले. तिन्ही उत्तम आहेत. एकदा एका प्रॉड्क्ट मध्ये काही तरी मायनर प्रॉब्लेम होता तर त्यांनी परत नेला आणि नवीन आणुन दिला.

आता तर म्हणे त्यांची सर्व्हिसही चांगली झाली आहे. आधी थोडेसे प्रॉब्लेम होते ट्रान्सपोर्ट मध्ये ज्यामुळे तुटलेले फर्निचर यायचे. मग ते परत पाठवा वगैरे भानगडी.

काहीतरी मागवुन पहावे असे वाटत आहे खरे..

नाव आडनाव's picture

1 Dec 2015 - 11:48 am | नाव आडनाव

पेपरफ्रायच्या किचन ट्रॉली (आणि बाकी किचन मधलं फर्निचर) आहेत का? कोणी ट्रॉलीचं काम त्यांच्याकडून केलंय का? त्यांच्या साईट वर काही दिसलं नाही. माझ्या घरी करायचंय, पण इथे लिहिलंय तसं पेपरफ्राय ची क्वालिटी चांगली आहे आणि किंमत गोदरेज पेक्षा कमी आहे, तर पेपरफ्राय चा ऑप्शन चांगला आहे.

किचन ट्रॉली आहेत पण कमी आहेत. इतर ओप्शन चेक करा. गोदरेजचे रेट जास्त आहेत पण चीज एक नंबर असते. ते आरएन्डी वर केलेले पैसे काढतात. थोड्या दिवसात त्याच्या कॉप्या लोकल मार्केटला येतात. गोदरेजचे फिनीश अन ऑपरेशन स्मूथ आहे प्रचंड. ते मात्र कॉप्यात मिळत नाही. इंटेरिओचे आता घेऊ नका. सध्या लग्नसराईचा पीक पिरिअड असतो त्यांचा. ऑफर नसतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल्ल ऑफर येतात. क्लीअरन्स सेल असतात. अगदी निम्म्या किमतीपर्यंत मिळू शकतात. मी स्वतः माझे कम्प्युटर टेबल असेच ऑफर मधून उचलले. लै परफेक्ट आहे.
t

प्रमोद देर्देकर's picture

2 Dec 2015 - 9:36 am | प्रमोद देर्देकर

अहो साहेब तुम्ही http://www.pepperfry.com/ या साईटवर जा. भरपुर पर्याय आहेत तिथे.
मी आपला पत्ता , फोन क्रमांक देवुन स्वत:ला नोंदणी करुन घेतयावर लगेच एक संदेश आलाय की तुम्हाला रु. १०,००० चे कुपन प्राप्त झाले आहे. आत हे खरे खोटे देव जाणे.

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 11:31 am | संदीप डांगे

आमच्या घरच्या आंब्याला मोहोर आलाय. डिसेंबरात मोहोर येतो काय? तसेच झाडाला अर्धशिशि झाल्यागत एकाच बाजूने मोहोर आलाय. असे का होते ते कुणाला काय म्हाइत है का?

मामाच्या गावाला जाउया हे गाणे कोणत्या सिनेमातले आहे?(जुना सिनेमा)

तुषार काळभोर's picture

3 Apr 2016 - 3:49 pm | तुषार काळभोर

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले
चित्रपट - तू सुखी रहा
राग - भैरवी

संदर्भ

भिंगरी's picture

3 Apr 2016 - 4:04 pm | भिंगरी

धन्यवाद पैलवानजी

सिरुसेरि's picture

4 Apr 2016 - 7:38 am | सिरुसेरि

एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात .

परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये बहुतेक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया रास्त किंमतीत केल्या जातात, आणि त्यांच्या (वाडिया ट्रस्टच्या) आर्थिक मदतीचाही लाभ घेता येतो.

यकृताच्या दुखण्यासाठी शस्त्रक्रिया असेल तर या संस्थेद्वारा मदत मिळेल.

अन्यत्र आर्थिक मदत बहुतेक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेद्वारा मिळेल.

टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ?
जसे की - कलर शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस .
ऑडिओ - ट्रिबलम, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ

शाळेत असताना तिरंगी झेंड्याचे एक गीत पाठ केले होते.आता त्यातील काही ओळी आठवतात्,पण सुरुवात आठवत नाही......
ये चौबीसो अरे चक्र के हम को सिखलाते
सावधान चौबीसो घंटे हम में है बल भरते
येवढेच आठवते.
कोणाला आठवते का पुर्ण गाणे?

स्काउट गाइड झंडा गीत

भारत स्काउट गाइड, झंडा ऊँचा सदा रहेगा |
ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा |
नीला रंग गगन सा विस्तृत भ्रात भाव फैलाता |
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओ की याद दिलाता |
और चक्र कहता है प्रतिपल, आगे कदम बढ़ेगा |
ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा |
भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा |
ये चौबीसो अरे चक्र के हम से प्रतिपल कहते |
सावधान चौबीसों घंटे हम मे है बल भरते | |
तत्पर सदा रहे सेवा मे जीवन सफल बनेगा | ऊँचा०
हर हित रक्षा मे हम जीवन हँस- हँस दे दे अपना |
इस झंडे पर मर मिटने का है सुखदायी सपना | |
सेवा का पथ दर्शक झंडा घर- घर मे फहरेगा ऊँचा०
भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | |

भिंगरी's picture

19 Aug 2016 - 4:07 pm | भिंगरी

धन्यवाद बहुगुणी

पिलीयन रायडर's picture

16 Aug 2016 - 1:58 am | पिलीयन रायडर

१. अमेरिकेत मातीचा गणपती बनवायचा असेल तर माती कुठे मिळेल? मायबोलीवर मागे कधीतरी ह्यावर चर्चा आणि गणपतीचे फोटो पाहिले होते पण आता सापडत नाहीत. कुणी अमेरिकेत गणपती घरीच करतं का?

२. एखाद्या व्यक्तिची ओपन हार्ट सर्जरी झाली असेल, वय - ५५, डायबेटीस असेल तर मेडिकल इन्शुरन्स होत नाही का? (हार्ट सर्जरी व्हॉल्व्ह बदलण्यासाठी झाली होती. व्हॉल्व्हचे आयुस्।य १०-१२ वर्ष सांगितले होते. सर्जरी होऊन ७ वर्ष झाली.)

बहुगुणी's picture

16 Aug 2016 - 2:39 am | बहुगुणी

एक हौशी सहकारी कागदाच्या लगद्याचा गणपती (eco friendly papier mache) करतो. अति-सुंदर वगैरे नसलेला गणपती चालणार असेल तर विचारेन.

पिलीयन रायडर's picture

16 Aug 2016 - 2:54 am | पिलीयन रायडर

हो नक्की विचारा!

vikramaditya's picture

15 Sep 2016 - 6:45 pm | vikramaditya

मंडळी ,

मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो.

बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच.

वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही.

एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का?

धन्यवाद.

वामन देशमुख's picture

22 Oct 2019 - 7:56 am | वामन देशमुख

गाणी शोधण्यात मदत हवी आहे.

१. छान पालखी सजवा न माझ्या राजाला मिरवा ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ मराठी गाणं कोणतं ? "डोंगर", "सपान" असे शब्द त्या गाण्यात आहेत.

२. अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ गुजराती गाणं कोणतं? सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ऐकलं होतं आणि तेंव्हा खूप आवडलं होतं, पण आता नेमके शब्द आठवत नाहीत.

रच्याक, आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे हे सुमन कल्याणपुरांचे सुमधुर गीत मला परवापर्यंत माहित नव्हतं.