काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला.
घरात कांदे होते, टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले. फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील. एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला.
गॅस वर पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली.
गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.
प्रतिक्रिया
8 Sep 2016 - 8:56 pm | कवितानागेश
=))
7 Sep 2016 - 5:15 pm | कपिलमुनी
यांनी मॅगी आटा नूडल्स खाल्ले असे लिहिले असते तरी त्यांच्यावर टीका झाली असती !
7 Sep 2016 - 8:39 pm | आदूबाळ
म्हणजे प्रॉब्लेम आटा नूडल्समध्ये आहे!
8 Sep 2016 - 1:07 am | शलभ
नाही वाटत असं.. मॅगी वर मागे बंदी असताना डांगेंचा धागा आलेला मॅगीच्या पुनरागमनाच्या जाहिरातीसाठी. तेव्हा कुणी असा आक्षेप नव्हता घेतला. तो इनडायरेक्ट जाहिरातीचा प्रकार नव्हता का?
8 Sep 2016 - 1:29 am | चित्रगुप्त
विवेक पटाईत यांचे सर्व लेखन हे एक प्रकारच्या निरागस सहजपणातून केले गेलेले असते, त्यातून ते जाहिरातबाजी वगैरे करत असल्याचा आरोप अजिबात पटला नाही. अर्थात जाहिरात-क्षेत्रात कार्यरत असणारांना तसे वाटणे स्वाभाविक असले, तरी तसे इथे लिहीणे अनाठायी वाटले. डोक्यात एकाद्या विचाराची सणक आली की हाण प्रतिसाद .. यापासून स्वतःला वाचवणे श्रेयस्कर.
इरसाल यांच्या इरसाल प्रतिसादाला पुन्हा एकदा नमन.
8 Sep 2016 - 1:39 am | चित्रगुप्त
मै सिर्फ और सिर्फ पतंजली के स्वादिष्ट आटा नूडल्सही खाती हूं, और वो भी पटाईतजीने बनाये हुए.
8 Sep 2016 - 1:48 am | संदीप डांगे
प्रत्येक शब्दाशी सहमत आहे, कुठेतरी माझ्याकडूनच गडबड झाली आणि विषयाला भलतेच वळण लागले, जे व्हायला नको होते,
बिवेक पटाईत यांना दुखावण्याचा हेतू नव्हता, ते नेहमीच पतंजलीची पटणार नाही अशी भलामण करतात, पण ठीक आहे, तो त्यांचा चॉईस...
माझ्याकडून पटाईत काकांची जाहीर क्षमा मागतो,
पटाईत काका, लिहीत राहा! पुलेशु!!
8 Sep 2016 - 8:40 am | असंका
प्रतिसाद आवडला...
आपली चुक मान्य करण्यात काहीही कमीपणा नाही.
आमच्याकडून आपल्याला एखादा वावगा शब्द गेला असल्यास आम्हीही क्षमस्व...!
8 Sep 2016 - 3:41 pm | तेजस आठवले
+1
12 Sep 2016 - 2:05 pm | रुस्तम
चित्रगुप्त काका सहमत
8 Sep 2016 - 7:42 am | सुज्ञ
विवेकजींनी केली ती जाहिरात हा आरोप आहे . ( कसे?) तूर्तास असे समजू की त्यांनी पातंजली कडून पैसे घेतले
आता आम्ही असे म्हणू की आपण नेस्ले कडून पैसे घेऊन मुद्दाम पतंजली नूडल्स भंगार लागतात वगैरे reverse advertisement चालवली आहे.
माझे मत : एक साधी पाककृती आहे त्यात केवळ पातंजली नूडल वापरल्या असे लिहिले म्हणून लगेच जाहिरात केली वगैरे आरोप करणे चुकीचे आहे. पाककृतीतील त्यांचा मूळ मुद्दा मैदा ऐवजी आटा नूडल वापराव्या हा आहे .
8 Sep 2016 - 11:02 am | रुस्तम
बाडीस
8 Sep 2016 - 11:51 am | जेपी
100
8 Sep 2016 - 1:10 pm | संजय पाटिल
सत्काराचं बघाकी जरा आता..
9 Sep 2016 - 6:38 pm | चंपाबाई
http://zeenews.india.com/news/india/swami-ramdev-in-a-fix-insect-found-i...
9 Sep 2016 - 9:04 pm | आनंदी गोपाळ
टेपवर्म नावाचा जंत.
10 Sep 2016 - 8:47 am | चंपाबाई
10 Sep 2016 - 9:03 am | नाखु
तुम्ही बिस्कीटातला किडा दाखवताय, इथे मिपातही किडे केले जातात आम्ही करतो ना दुर्लक्ष्य तुम्हीबी करा तक्रार किंवा दुर्लक्ष्य.
11 Sep 2016 - 4:24 pm | विवेकपटाईत
चित्र विचित्र प्रतिसाद वाचून आज पहिल्यांदा प्रतिसाद देण्याचे ठरविले.
१. माझ्या पाककृतीचे नाव स्वादिष्ट आता नूडल्स आहे , यात कुठल्याही ब्रांडचे नाव नाही.
२. वापरलेल्या पदार्थांचे नाव लोक देतात. त्यात काही गैर नाही. मैद्याचे नूडल्स म्हणजे मेगी नूडल्स सर्वश्रुत आहे. कणकीचे नूडल्स नवीन प्रकार आहे. म्हणून पतंजलीचे नाव दिले. (प्रत्येक व्यक्ती पाककृती मध्ये वापरलेल्या पदार्थांचे नाव किंवा त्यांचे चित्र देते, यात वागवे काय आहे उदा: स्वीट न स्पायसी एग्http://www.misalpav.com/node/37047. यावर जेपी साहेबांनी आक्षेप का नाही घेतला. कि कुणाच्या नावाची एलर्जी आहे म्हणून.
३. बाकी पदार्थ स्वादिष्ट बनविण्यासाठी त्यात कांदे, टमाटर, फ्रेंच बिन्स इत्यादी घातले होते.
४. मी आधी पदार्थ करून बघतो, खाऊन बघतो आणि मग रेसिपी टाकतो. जेपी साहेब तूर्त तरी पतंजलीचे आटा नूडल्स खाण्यासाठी तैयार बाजारात विकल्या जात नाही. आणि तुम्हाला रामदेव बाबांची एलर्जी असल्यामुळे तुम्ही घरात करणे हि शक्य नाही. अर्थात बिना खाता तुम्ही स्वादावर टिप्पणी केली आहे.
५. बाकी मैद्याच्या नूडल्स पेक्षा चांगल्या तेलात बनलेले कणकीचे नूडल्स जास्त पोष्टिक. माझ्या अधिकांश रेसिपी मध्ये मी पोष्टिकते वर जोर दिला आहे. मुलांना न आवडणाऱ्या भाज्या अधिकांश रेसिपी मध्ये वापरल्या आहेत.
६. बाकी काही वाचकांनी मूर्खता सारखे आरोप केले आहे, त्यांचे उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही.
11 Sep 2016 - 4:53 pm | जेपी
काका,
खाया पिया कुछ नही,
ग्लासा तोडा बारा आणा..
असो पण तुमच्या एका प्रतिसादाने दिन बना दिला.
अवांतर - या धाग्यात जेवढ वेळेस माझ नाव आलय,तेवढ पंतजली आणी बाबा च आला नाय.जल्ला काय कलना.
11 Sep 2016 - 5:36 pm | असंका
आता मात्र खरंच कहर झाला!!!
हसावं की रडावं ते कळेना....!!!
11 Sep 2016 - 5:38 pm | असंका
(मंजे जेपी यांच्याशी सहमत आहे.)
11 Sep 2016 - 5:25 pm | संदीप डांगे
कणकेचे नूडल्स नवीन आहेत हे नवीन कळले,
तसेच पतंजली आटा नूडल्स बाजारात नाहीत हे हि नवीन कळले,
बाकी, रामदेव बाबाची ऍलर्जी असल्याने कोणाच्या घरात नूडल्स खाल्लेच गेले नाहीत हा कॉन्फिडन्स भारी!!
तुम्ही नवीन नवीन धागे टाकत राहा, कोण मूर्ख ते वाचक बघून घेतील, तुम्हाला काही समस्या नाही! तुम्ही बेदाग आहात!!
11 Sep 2016 - 6:39 pm | जेपी
बेदाग असण्यासाठी विशेष पावडर वापरावी.
बाकी देशाच्या नुकसानीला फक्त राजकारणीच नाही,तर नोकरशहा पण तितकेच जबाबदार आहेत ..यावर माझा पुर्ण विश्वास बसला.!
11 Sep 2016 - 6:45 pm | अभ्या..
lol
11 Sep 2016 - 5:45 pm | कैलासवासी सोन्याबापु
ह्याला म्हणतो बुआ मी लिखाणातला पॅटर्न!! पटतोय का बघा, अन हो ताकाला जाऊन भांडी लपवणे सुद्धा सापडेल ह्यातच :) बघा सापडले तर :)
12 Sep 2016 - 12:53 pm | डँबिस००७
माझा खायचा अनुभव सांगतो: पतंजली आटा नूडल्स अतिशय भंगार लागतात.
आटा नुडल्स अतिशय भंगार लागतात ? कोणाशी कंपेर केल्यावर ? मॅगीच्या मैदा नुडल्स बरोबर ?
बाजारात मिळणारे नुडल्स हे ईथुन तिथुन सारखेच असणार मग पतंजली नुडल्सच भंगार कसे काय ?
जर तुम्ही मैदा नुडल्स व आटा नुडल्स अशी कंपॅर करत असाल तर ते चुकीच आहे. मैदा मु़ळातच चोकर
(फाय्बर नसल्याने) आटाच्या मानाने स्वादात चांगला असतो, पण मैदा शरीराला अपायकारक आहे हे आता सिद्ध
झालेल आहे. त्यामुळे जरी आटा नुडल्स भंगार लागत असतील तरी ते वापरायचे की मैदा नुडल्स वापरायचे हा
तुमचा चॉईस आहे.
जर नुडल्स ईथुन तिथुन सारखेच मग मॅगी मध्ये अस काय आहे जे पतंजली मध्ये नाही ? अर्थात एम एस जी
म्हणजे चायनिज सॉल्ट किंवा अजिनोमोटो. ह्या पदार्थाला स्वताची काही चव नसते. अजिनोमोटोने जिभेवरचे टेस्ट
बड्स अॅक्टीव्हेट होतात व त्यामुळे मुळातला सपक पदार्थ सुद्धा स्वादिस्ट लागतो.
12 Sep 2016 - 12:58 pm | संदीप डांगे
पतंजालिशिवाय कुणाचेच आटा नूडल्स नाहीत या भ्रमातून बाहेर या,
तसेच हे कंपरीजन मैदा नूडल्स सोबत आहे हा तर्क कुठून??
बाजारात मिळणारे नूडल्स इथून तीतून सारखे हे कशावरून?
बाकी, मला खायला काय व का आवडतं याचं स्पष्टीकरण द्यावे लागेल का? ;))
12 Sep 2016 - 3:46 pm | चित्रगुप्त
नूडला कणकेच्या असोत वा मैद्याच्या, प्रकृतीस चांगल्या नाहीतच. एकादेवेळी बदल म्हणून काहीही खावे, पण रोजच्या आहाराच्या बाबतीत जागरूक रहाणे आवश्यक. तसे बघितले तर सरसकट गव्हाच्या कोणत्याही पदाथांऐवजी ज्वारी, बाजरी आणि विविध धान्या-डाळींची भाजणी वापरणे जास्त चांगले. पोळी आठवड्यातून एक-दोनदा. बाकी दिवस भाकरी, थालिपीठ. आम्ही गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून हे करत आहोत, त्याचा अतिशय चांगला परिणाम होतो आहे. अमेरिकेत वगैरे 'फॅट फ्री' 'शुगर फ्री' नंतर हल्ली 'ग्लूटेन फ्री' आणि 'व्हीट फ्री' ची हवा चालली आहे. म्हणजे उच्चभू दुकानात ताजे गरमागरम टॉमॅटो सूप ठेवलेले असले तर तेही टॉमॅटोचे आहे हे खाली बारीक अक्षरात लिहिलेले आणि 'व्हीट फ्री' हे ठळक. अर्थात हे खरोखर अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असते हे खरे.
12 Sep 2016 - 6:38 pm | फेदरवेट साहेब
आम्हाला काय फरक पडत नसतोय!! भुकेच्या टायमाला एखादी घरधनीण जवा नूडल्स फेकते तवा आपुन लै मनभरून आशीर्वाद देतो तिला, पतंजली असो वा म्यागी वा आयटीसी, आम्ही कुत्री बेलाशक तोंड मारतो :)