दुर्गदुर्गेश्वर रायगड ------ एक स्वर्गीय अनुभव!

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
23 Aug 2016 - 7:56 pm

नमस्कार मित्रहो. मैत्रिणींनो ,

सर्व प्रथम सर्व मिपाकरानी मला रायगडाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास , शिवचरित्र वाचून कृतकृत्य झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले बघण्याचा मनोदय अतिशय उशिरा आणि हळूहळू का होईना पूर्ण होत आहे. आतापर्यंत सिंहगड, सज्जनगड कित्येक वेळा पाहिला. पण इतर किल्ले पाहण्याचे जमत नव्हते. दुर्गदुर्गेश्वर रायगड रोपवेसकट पाहण्याचे मनात होते. आणि हा योग २० ऑगस्ट ला जमून आला. सुरुवातीला पाच जण मित्राच्या कारमधून जाण्याचा बेत होता पण नेहमीच्या अनुभवाप्रमाणे पाच पैकी तीन गळलेच! पण ही इष्टापत्ती होती. कारण आम्ही शांतपणे दोघे जण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकलो. तसेच रायगड पाहाताना तो दैदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.
या सफरीत जो माझा मित्र तुषार याने संपुर्ण वेळ सारथ्य केले, येतानाचा खराब रस्त्याचा ५० किमी वरंध घाटही त्याने गाडीतून सर केला म्हणूनच आम्ही एका दिवसात हि भटकंती पूर्ण करू शकलो. त्याचे शतश: आभार! मुख्य म्हणजे गणसंख्येअभावी हि भटकंती रद्द करणे आमच्या मनात आले नाही हे बरे!

पाऊस हजर पण मुसळधार नाही, लवकर निघाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नाही आणि श्रावणातील ऋतू हिरवा ऋतू बरवा , अशा सर्वच गोष्टी दुधात साखर मिसळल्याप्रमाणे जमून आल्या होत्या!

सकाळी ६३० वाजता कोथरूड डेपो इथून आम्ही निघालो. सुखद गारवा, आणि मधूनमधून येणाऱ्या सरी यांनी आमच्या भटकंतीला शेवट पर्यंत साथ केली.

कोथरूड वरून भूगाव मार्गे मुळशी सरोवरापर्यंत आल्यावर निसर्गाचा शृंगार दिसणे सुरु झाले.

हिरवीगार वनराई , भव्य मुळशी सरोवर , ढगांचे धुके आणि पाऊस उन्हाचा लपंडाव हे सर्व पाहत पाहत आम्ही ताम्हिणी गावापर्यंत कसे पोहोचलो कळलेच नाही. आणि मग ताम्हिणी घाटात
नटून थटून असलेल्या छोट्या मुलीला बाबांनी कडेवर घ्यावे तसे , डोंगर या वनराईला अंगाखांद्यावर खेळवत होते, ठिकठिकाणी दिसणारे छोटे जलप्रपात व लांब डोंगरावर दिसणारे मोठे उंचच उंच
धबधबे अतिशय सुंदर दिसत होते.

1

y

a

xx

y1

yy1

yhj1

धबधब्यांजवळ मर्यादित वेळ थांबून आम्ही किल्ले रायगडाचा दिशेने कूच झालो, ताम्हिणी घाट संपल्यानंतर सुमारे १५ किमी वर एक रस्ता सरळ कोलाड कडे जातो व
डावीकडे महाड आहे. या रस्त्याने प्रथम विळे हे गाव लागते. माझ्या आधीच्या माहितीप्रमाणे मग नंतर निजामपूर व नंतर १५ मिनिटात मुंबई गोवा रस्ता लागतो व माणगाव , महाड करून मग रायगडचा रस्ता आहे . पण
आम्हाला निजामपूर आधीच डाव्या दिशेला रायगडला जाणारा फलक दिसला व आम्ही तिकडे गाडी वळवून पाचाड कडे जाऊ लागलो. सुंदर वनराई , धबधबे , धुक्याची दुलई हे सर्व पदोपदी होतेच. या शॉर्टकट मुळे आमची
२० ते ३० मिनिटे वाचली. मग २० मिनिटात आम्ही पाचाड गावात पोहोचलो. पाचाड गावात जिथे जिजाऊंचा देहांत झाला होता तिथे समाधी उद्यान आहे, जिजाऊ मातेपुढे आम्ही नतमस्तक झालो.
तेथेच शिवरायांचे आज्ञापत्र आहे त्यात वृक्ष हे कसे जपावे व ते किती महत्त्वाचे आहेत हे लिहिले आहे.

jkl1

io1

kjl11

one

मग आम्ही रज्जुरथा जवळ (रोपवे) आलो. तिथे एका हॉटेलात चहापान करून पार्किंग वगैरे करून
रोपवेचे तिकीट काढले. रोपवेचे तिकीट २५० रिटर्न व १५० सिंगल आहे, पाऊस मोठा आलाच तर धोका नको म्हणून आम्ही रिटर्न तिकीट घेतले. माफक गर्दीमुळे आमचा नंबर लगेच लागला. पहिलाच रोपवे चा अनुभव असल्यामुळे आम्ही खूप उत्सुक होतो. मग रोपवे वर जाणे सुरु झाल्यावर काय? स्वर्ग सफारिचा आनंद ! भव्य डोंगर , आणि वेगवेगळे उंची कपडे नेसून स्नेहसंमेलनात अनेक गुणदर्शन करणाऱ्या नटलेल्या विद्यार्थिनींप्रमाणे , निसर्ग पाऊस, उन्ह आणि धुक्याची दुलई अंगावर लेवून
आमच्या डोळ्याचे पारणे फिटवित होता. रोपवेतील प्रत्येक क्षण थरारक आणि तितकाच आनंददायक! एकाच वेळी खालून वर आणि वरून खाली जाणारा रोपवे सुरु करतात त्यामुळे आम्हाला वर जाताना
बाजूला खाली येणारे पर्यटक दिसले. सुमारे १२ मिनिटात आम्ही वर रायगडावर पोहचलो, मग रायगडावर प्रवेश तिकीट काढून वर चालू लागलो. आम्ही गाईड घेतला नाही पण घेतला असता तर बरे झाले असते
असे नंतर वाटले. आमच्या वाचनाप्रमाणे आम्ही तेथील स्थळे पाहून माहिती घेतली,

t11

11

ui1

km1

सुरुवातीला आम्ही मेणा दरवाजा पाहिला मग नंतर खालील ऐतिहासिक ठिकाणे पाहिली.

१. गंगा सागर तलाव एक अप्रतिम मानव निर्मित सरोवर.
२. राजवाडा - राज्याभिषेकाचे ठिकाण.
३. राजांच्या राण्यांचे अंत:पुरातील खोल्या
४. बाजार पेठ.... अतीशय भव्य दालने असलेली दुकाने. असे सांगितले जाते कि घोड्यावरून हि बाजार करणे शक्य होते.
६. सचिवालय आणि खलबत खाना जिथे गुप्त आणि महत्त्वाच्या वाटाघाटी होत असत.
७. जगदीश्वर मंदिर
८. शिवराय समाधी
९. वाघ्या समाधी
१०. टकमक टोक ,, येथून
गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
हे सर्व स्थळे पावसामुळे झिजत चालली आहेत , तंत्रज्ञानाचा वापर करून , मूळ गाभ्याला धक्का ना लावता , डागडुजी करणे गरजेचे आहे.

टकमक टोकाजवळच एका कुटीत आम्ही झुणका भाकरी व भजीचा पुरेपूर आस्वाद घेतला. ऑर्डर दिल्यानंतर २० मिनिटात जेवण बनवले जाते या आम्ही टकमक टोक पाहून
आलो. त्यावेळी आसपासची शेळी सतत आमच्या बरोबर होती.

नंतर रोपवेने खाली येऊन आम्ही वरंधा मार्गे तुलनेने , जास्त अवघड मार्गाने ५ तास प्रवास करून पुण्याला येऊ या भटकंतीची सांगता केली

मेणा दरवाजा

md2

अंत:पूरातील सदनिका

apur1

राजवाडा आणि सचिवालय

rd1

raj1

raj3

raj4

खलबत खाना

khal1

राजांचे सिंहासन

sn1

बाजारपेठ

rajsach

mark2

mark3

जगदीश्वर मंदिर

j1

j11

j111

शिवरायांची समाधी
sam1

वाघ्याची समाधी
vag1

गंगा सागर तलाव

gst1

gst2

टकमक टोक व वरून दिसणारी विहंगम दृश्ये!

tt1

tt2

tt3

tt4

कस्टमर केअर

u1

या कुटीत आम्ही झुणका भाकरीचा आस्वाद घेतला.

kuti1

lu2

रोपवे वरून खाली
येताना

rdown

शिवराय भाग्य देशाचे , हे संजीवन प्राणांचे , हे रूप शक्ती युक्तीचे !

श्रीमंत योगी शिवरायांना त्रिवार नमन !

shivray

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

23 Aug 2016 - 8:05 pm | किसन शिंदे

रायगड?.. तो ही एका दिवसात??

रच्याकने फोटो दिसेनात.

शान्तिप्रिय's picture

23 Aug 2016 - 8:09 pm | शान्तिप्रिय

फोटो गुगल + वर पब्लिक शेअर करुन इथे अप्लोड केले आहेत.
काही चुकले असल्यास सं मंड्ळाने मर्गदर्शन करावे.
धन्यवाद!

प्रचेतस's picture

23 Aug 2016 - 9:55 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

गडाचं वर्णन अजून थोडं यायला हवं होतं. हिरवाइने नटलेला गड विलक्षण सुंदर दिसतोय.
जायला हवं परत आताच.

स्वच्छंदी_मनोज's picture

24 Aug 2016 - 11:46 am | स्वच्छंदी_मनोज

चला परत एकदा जाऊया.

शान्तिप्रिय's picture

24 Aug 2016 - 10:38 am | शान्तिप्रिय

खरोखरच , रायगड एक काय दोन दिवसातही पूर्ण पाहण शक्य नाहि इतका भव्य. आहे.
पुढच्या वेळी एक दिवस मुक्काम करुन पूर्ण गड पाहाणर.
रायगड दरवर्षी पाहाण्याचा मनोदय आहे.पाहुया कसे जमते ते.
एक्दा आपण काही मिपाकर सुद्धा रायगड ला जावू एकत्र!

रच्याकने : फोटो ज्यांना दिसत नाहित त्यांच्यासाठी साहिस संपादक मंडळ मदत करीत आहे आज.
थोडे थांबा.

मुक्त विहारि's picture

24 Aug 2016 - 11:17 am | मुक्त विहारि

असो...

जागु's picture

24 Aug 2016 - 11:55 am | जागु

छान.

काही विद्वानांनी रायगडावर महाराजांनी मुस्लिम सैनिकांसाठी मशीद बांधली असे संशोधन केले आहे , ही मशीद रायगडावर नक्की कुठे आहे ? कुणाला या बद्दल काही माहिती आहे का ?

शरभ's picture

24 Aug 2016 - 12:21 pm | शरभ

का कोणास ठाऊक आजकाल ऑफीसमध्ये मला 'गणेशा'च म्हणतात..

- श

अभिजीत अवलिया's picture

24 Aug 2016 - 7:03 pm | अभिजीत अवलिया

रायगडला मुक्काम करा एक दिवस तरी. रात्री आणि पहाटे रायगड फिरण्याची मजा काही औरच आहे.

छान!जगदिशराचा बाहेरचा फोटो काढला आहे का?
फोटो आणि लेख मस्तय.
तो आतला रस्ता पुर्वीपासून आहे.परंतू महाडकडून जाणारे फार असतात.

शान्तिप्रिय's picture

25 Aug 2016 - 10:35 am | शान्तिप्रिय

होय कंकाका,
आतला रस्ता यावेळीच आम्ही पाहिला.
बाहेरचा एकच तो संस्क्रुत श्लोक असलेला फोटो काढलेला आहे,
माझ्या सहप्रवाषाने काढलेले फोटो नंतर टाकतो.

निजामपूर पाचाड मार्गे गेल्यास जवळपास ४०/४५ किमी वाचतात.

स्वच्छंदी_मनोज's picture

25 Aug 2016 - 5:00 pm | स्वच्छंदी_मनोज

करेक्ट आणी लगे हातो मानगडही पदरात पाडून घेता येतो :)

आणी तसेही हाही मार्ग ऐतीहासीकच आहे. ह्या भागाला जोर-चनाट खोरे म्हणतात आणी हा पुर्वी नागोठणे बंदरातून रायगडला यायच्या मुख्यमार्गावर होता. ह्याच भागात महाराज आणी जावळीचे कारभारी हणमंतराव मोरे यांचे युद्ध झाल्याची नोंद आहे.

शान्तिप्रिय's picture

25 Aug 2016 - 5:29 pm | शान्तिप्रिय

स्वच्छंदी_मनोज आणि वल्ली,
धन्यवाद!
मस्त माहिति!

शान्तिप्रिय's picture

25 Aug 2016 - 10:42 am | शान्तिप्रिय

लिहिण्याच्या ओघात एक राहुन गेले.
येताना आम्ही तो सावित्रि नदिवरचा दुर्घटनाग्रस्त पूल जात जाता पाहिला.
लोक पुलावर उगाचच रेंगाळुन फोटो घेऊन , चालु वाहतुकित अडथळा आणत होते.