शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
प्रतिक्रिया
20 Aug 2016 - 12:22 pm | मृत्युन्जय
बीज सोडलेल्या पुरुषाचे गर्भपात करणार्या डॉक्टरच्या ओळखीतल्या कुणाशी लग्न झालेले असेल आणि जर त्या मुलाला डॉक्टर ओळखत असतील तर कदाचित त्या डॉक्टरांना तशीच आपल्या मित्राला फसवल्याची भावना येइल. मला नाही वाटत इथे स्त्त्री आणी पुरुष या अर्थाने कुठे भेदभाव केलेला आहे. "व्हर्जिनिटी" या मुद्द्यावर फिरणारा नैतिक गोंधळ जरुर आहे पण त्यात स्त्री आणी पुरुष अशी विभागणी केलेली दिसत नाही. योगायोगाने किंवा अनुषंगाने म्हणा नैतिक गोंधळ घडवणारी व्यक्ती स्त्री आहे इतकेच. इथे फक्त स्त्रीच " डिफेक्टिव्ह माल " असते असे विधान कुठेही केलेले दिसत नाही.
19 Aug 2016 - 9:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
मला हे प्रकार रुचत नाहीत, त्यात डोके थोडे तापट पडते, माझ्या मुलाने/मुलीने असे केल्यास मी काय करेल?? माझेच संस्कार कमी पडले म्हणून I shall get into my full dress, ask for forgiveness to my beloved country, constitution, god and force after which I shall eat up my standard issue Beretta .45 pistol.
कोणाला बोल लावायला नको, अन कोणाचे अनैतिक वागणे जनरेशन गॅप किंवा लिबरल विचार, स्त्रीवाद, पुरुषाचे व्यक्तिस्वातंत्र्य नामक गोड़ मुलामे देऊन स्वतःही गिळायला नको.
20 Aug 2016 - 2:05 am | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
मला वाटतं की शृंगापत्तीतून सुटण्यासाठी तुमच्या डॉक्टर मित्राने सरळ रुपलीशी आपणहून संवाद साधावा. अर्थात तिच्या घरच्यांच्या नकळत. त्यावेळेस स्पष्ट करावे की मी माझ्या व्यावसायिक शपथेशी बांधील आहे म्हणून. आणि गप्प बसावे. रुपालीच्या सासऱ्याला फसवल्याची भावनाबिवना मनातून काढून टाकावी. या बदल्यात रुपालीकडून दोन वचनं अवश्य घ्यावीत.
१. जर तिने तिची पार्श्वभूमी तिच्या घरच्यांना सांगितली, तर त्या डॉक्टरमित्राचं नाव कुठेही येत कामा नये.
२. जर तिने तिची पार्श्वभूमी तिच्या घरच्यांना सांगितली, तर त्या डॉक्टरमित्राला या बदललेल्या परिस्थितीची कल्पना द्यावी.
रुपाली कशीही असली तरी प्राप्त परिस्थितीत विवाह टिकवण्यास प्राधान्य द्यावे.
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2016 - 6:13 pm | मार्मिक गोडसे
गोपनीयताच पाळावी, नसत्या भानगडीत पडू नये.
लेखावरून असे वाटते की डॉ. खरेंच्या मित्राला शृंगापत्तीतून (डिलेमा) बाहेर पडावयाचे आहे.
गामा पैलवान ह्यांनी दिलेला सल्ला योग्य वाटतो, अनुभवाने व वयाने परिपक्व असलेल्या डॉक्टरांच्या मित्राला त्या मुलीशी संवाद साधायला अडचण येऊ नये.
20 Aug 2016 - 2:10 am | गामा पैलवान
अनुप ढेरे,
>> आणि याहून पुढे, विवाहपूर्व संबंध ही चूक कशी?
आणि याहून पुढे, विवाह करायचाच कशाला?
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2016 - 3:01 am | ट्रेड मार्क
प्रश्न फक्त योनिशुचितेचा नसून वृत्तीचा पण आहे. वयाप्रमाणे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे परंतु या केसमध्ये हे निव्वळ शारीरिक आकर्षण ठरेल. एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने त्या मुलाचा साधारण पगार आधीपासूनच माहित असेल. परिणामांची जाण असूनही तिने संबंध ठेवले आणि वेळ आल्यावर त्या मुलाला डच्चू देऊन टाकला. लग्नाआधी मूल नको म्हणून गर्भपात करून घेतला असं पण असू शकेल. कशावरून लग्नाकडे ती एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून बघत नसेल? त्यामुळे तिने हे लग्नाआधी आधी नवऱ्याला सांगितले आहे का महत्वाचं आहे.
लग्न झाल्यावर ती परत त्या आधीच्या मुलाकडे आकर्षित होणार नाही याची खात्री काय? नकळत होईना पण तिच्या मनात जर तुलना सुरु झाली आणि त्यातून तिला वाटायला लागले की आधीचा मुलगा नवऱ्यापेक्षा काही बाबतीत सरस आहे तर मग काय होईल?
20 Aug 2016 - 4:19 am | स्मिता.
एरवी संयमित आणि आधुनिक मतं असणार्या खरेकाकांचा हा लेख बघून खरं तर आश्चर्य वाटलं. पण नंतर स्पष्ट झालं की लेखातले विचार त्यांचे स्वत:चे नसून त्यांच्या मित्राचे आहेत.
मला यात कुठेही फसवणूक वाटत नाही. रुपालीचे जे होते ते लग्नापूर्वी होते. लग्नानंतरही हे संबंध टिकून असते अथवा तो गर्भपात लग्नानंतरचा असता तर त्या घटनेला फसवणूक म्हणता आली असती. तसंही तेव्हा 'चुकून' गरोदर राहिली नसती तर तिचे लग्नापूर्वी कोणाशी आणि कसे संबंध होते हे कळण्याची काहिच शक्यता नव्हती. मला तर अशीच शक्यता जास्त वाटते की ती पुन्हा त्या आधीच्या मित्राकडे जाणं दूर, त्याचा विचारही करणार नाही.
हे हवेत मारलेले तीर नसून अनेक जवळच्या मित्र-मैत्रिणींची उदाहरणे बघून बनलेलं मत आहे. अनेक वर्ष एकत्र (लग्न न करता एका घरात दोघेच) राहिलेल्या मुला-मुलींना नंतर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करून सुखाचा संसार करताना बघतेय. अर्थात ८-१० वर्षांपूर्वी या उदाहरणांत मराठी मुलींचं प्रमाण खूप कमी होतं, आताचं माहिती नाही.
20 Aug 2016 - 11:54 am | शाम भागवत
एकदम सहमत
20 Aug 2016 - 8:28 am | अभिजीत अवलिया
लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणे म्हणजे काहीतरी महापाप आहे असा एक (गैर)समज आपल्याकडे आहे.
आणी असे संबंध ठेवण्याची संधी न मिळाल्याने राहिलेले (तथाकथित सज्जन) ठीगभर.
लग्नापूर्वी पण ज्याला जी मजा करायची असेल ती त्याने बिनधास्त करावी. फक्त लग्न करण्यापूर्वी आपण काय काय मजा केलीय ते सर्व भावी नवऱ्याला / नवरीला सांगून टाकावे (विचारले नसेल तरीही). नाहीतर अचानक अशा गोष्टी बाहेरून समजतात आणी दोन कुटुंबाच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते.
20 Aug 2016 - 8:49 am | कपिलमुनी
या प्रकरणाची लग्नापूर्वी अअसुरक्षित शरीर संबंध ठेवलेले आहेत , यातून एसटीडी होउ शकतात. हेल्मेट प्रबोधन किती गरजेचे आहे हे लक्षात येते.
20 Aug 2016 - 9:12 am | आनंदी गोपाळ
I admire the discussion on this thread. This kind of discussions is one of the reasons that i come to MiPa.
20 Aug 2016 - 11:34 am | कानडाऊ योगेशु
मला तर हा प्रकार इसापनीती का पंचतंत्रातल्या तत्सम "राजा के सर पे सिंग" ह्या कथेतल्या सारखा वाटला. स्वतःला माहीती असलेली रहस्ये इतरांना सांगणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. केवळ तुला म्हणुन सांगतो कुणाला सांगु नको अशी प्रस्तावना करुन बरीच रहस्ये मित्रमंडळीत ही उघड गुपिते ठरतात. इथेही हाच प्रकार झाला आहे. माणसाच्या सहजप्रवृत्तीने डॉ.मित्राने केवळ तुला म्हणुन सांगतो म्हणुन डॉ.खरेंना पोटात लाथा मारणारे रहस्य सांगितले डॉ.ने ते नाव गाव गोपनीय ठेवुन आपल्याला सांगितले. हे ही झाले नसते तर यदाकदाचित त्या डॉ मित्राने वा डॉ.खरेंनी उद्या आत्मचरित्र लिहिले असते तर त्यात व्यावसायिक नीतीमत्ता ह्या प्रकरणाखाली हे उदाहरण मांडले असते.
20 Aug 2016 - 12:29 pm | शाम भागवत
ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट झाले नसते तर बरे झाले असते असे वाटतय.
कोणता तरी प्रतिसाद स्कोअर सेटलमेंट सारखा वाटतो. त्याचा राग येतो़ मग आपली बाजू जोरात मांडण्यासाठी आणखी नवीन माहिती सादर केली जाते. असो.
या आभासी जिवनात न गुंतता वावरता आले व त्याचा उपयोग प्रत्यक्ष जिवनात करता आला तर काय मजा येईल नाही का?
20 Aug 2016 - 2:52 pm | असंका
+१...नॅऱोइंग डाउन फार सोपं झालंय...
सगळ्या प्रतिसादालाच +१..
21 Aug 2016 - 12:09 am | सुबोध खरे
ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट झाले नसते तर बरे झाले असते असे वाटतय.
चुकीचे गृहीतक.
वर कुणीतरी लिहिले आहे ते डॉक्टर किंवा त्यांचा मित्र मिसळपाव वर असेल तर या प्रश्नाचे ते उत्तर आहे. गुजराथी असल्याने मिसळपाव वर असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. कारण त्यांना जुजबीच मराठी येते. त्यांच्या मित्राबद्दल मला माहित नाही.
22 Aug 2016 - 11:49 am | शाम भागवत
अहो मला तुमच्या बद्दल आदर आहे. तुमच्या नितीमत्तेबद्दल मला काडीचीही शंका नाही. मला इतकेच सुचवायचे होते की, मुद्दा मांडण्याच्या प्रयत्नात तुमच्या कडून जास्त जास्त तपशील बाहेर येतो आहे. तेव्हा तुम्हाला सावध करणे इतकाच त्या प्रतिक्रियेचा हेतू होता. बस्स इतकेच.
उदा.
एकदा ते डॉ. ५५+ चे आहेत.
मग त्यानंतर कधीतरी साठीच्या जवळ आलेला माणूस
लग्न बाह्य आणि लग्न पूर्व संबंध चूक आहेत असे मानणाऱ्या पिढीचा माणूस
त्यानंतर ते गुजराथी आहेत.
त्यानंतर मात्र मला राहवले नाही व मी ती प्रतिक्रिया दिली होती. असो.
20 Aug 2016 - 3:08 pm | सपे-पुणे-३०
लग्नापूर्वी शरीरसंबंध असणे ही गोष्ट आजच्या काळात नवीन किंवा आश्चर्यजनक नक्कीच नाहीये. तरीही आपल्या समाजात ती सहजपणे स्वीकारली जात नाही. मला वाटतं डॉक्टर साहेबांचे मित्र स्वभावाने जास्त भावनाप्रधान आहेत. कारण अशी माणसं प्रत्येक गोष्टीत खूपच इन्व्हॉल्व्ह होतात. इथे तर त्यांच्या जवळच्या मित्राच्या बाबतीत हे घडलं असल्याने आणि त्याची त्यांना पूर्वकल्पना असल्याने त्यांना अपराधी वाटत आहे. पण ते तर त्या मुलीला लग्नाच्या रिसेप्शनला भेटले, तोपर्यंत त्यांना कल्पनाही नव्हती, त्यामुळे ह्यात त्यांचा काहीच दोष नाही.
ज्याप्रमाणे त्या मुलीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तसे त्यांनीही करावे. तसेच आपल्या व्यवसायाचं कारण देऊन मित्राकडे जाणं कमी करू शकतात.
20 Aug 2016 - 3:25 pm | श्रीगुरुजी
या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले आहेत. ज्याच्याशी शरीरसंबंध ठेवले आहेत त्याच्याशी लग्न करायचे नाही कारण तो पैसेवाला नाही, हे देखील पक्के ठरलेले आहे. शरीरसंबंधातून गर्भधारणा झाल्यावर मूल नको म्हणून तिने गर्भपात करून घेतला व नंतर दुसर्याच मुलाशी लग्नही केले. ज्या डॉक्टरने गर्भपात केला त्याच्याच मित्राची ही सून झाली. आपल्या मित्राला सांगावे का नाही या संभ्रमात तो आहे. सांगितले तर रूग्णाच्या गोपनीयतेची शपथ मोडली जाते व नाही सांगितले तर मित्राची फसवणूक झालेली आहे व आपल्याला माहिती असून आपण मित्राला सांगितले नाही ही खंत मनात आहे.
माझ्या दृष्टीने यात रूग्णाची गोपनीयता मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात ही मुलगी रूग्ण नव्हतीच. तिला कोणताही आजार नव्हता. गर्भातील बाळात जन्मतःच गंभीर दोष असणे, बाळाचा जन्म आईसाठी धोकादायक असणे, बलात्कारातून गर्भधारणा होणे, आईवडीलांना असलेले रोग (उदा. एचआयव्ही) बाळामध्ये संक्रमित होण्याची शक्यता असणे असे गर्भपातासाठी कोणतेही सबळ कारण तिच्याकडे नव्हते. जरी गर्भपात हा कायदेशीर असला तरी सबळ कारणाशिवाय गर्भपात करणे हे निदान माझ्या दृष्टीने तरी एका जीवाची हत्या करण्यासारखेच आहे. या डॉक्टरला गोपनीयतेची शपथ मोडण्याची खंत वाटत होती. त्याऐवजी सबळ कारणाशिवाय गर्भपात करण्यात सहभागी झाल्याची खंत वाटायला हवी. ही मुलगी मुळात रूग्णच नसल्याने रूग्णाच्या गोपनीयतेची शपथ मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याने आपल्या मित्राची फसवणूक टाळण्याकरिता मित्राला सत्य सांगायला हवे होते. अर्थात, मुलीने मुलाला पूर्वकल्पना दिली असेल तर कोणालाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही.
ज्या मुलीला लग्नाआधी वेगळ्याच मुलाशी शरीरसंबंध ठेवायची सवय आहे व जिच्या दृष्टीने पैसा सर्वाधिक महत्वाचा आहे, ती मुलगी भविष्यात अशाच तर्हेचे संबंध दुसर्याशी संबंध ठेवण्याची बरीच शक्यता आहे. तिला अजून एखादा जास्त धनाढ्य भेटला तर आताच्या नवर्याला सोडून ती त्या धनाढ्याबरोबर जाण्याची देखील शक्यता आहे. माझ्या माहितीतल्या एकदोन मुलींनी (व मुलांनी सुद्धा) लग्नानंतर सुद्धा अशा तर्हेचे संबंध कायम ठेवलेले मला माहीत आहे. लग्नाआधी बराच काळ एका मुलाशी संबंध ठेवून त्याच्याशीच लग्न केलेल्या मुलीने लग्नानंतर मुलाच्याच मित्रांशी संबंध सुरू केल्याने त्यांचा घटस्फोट झाल्याचे एक अगदी जवळ्चे उदाहरण मला माहित आहे. अजून एका उदाहरणात एका मुलीने लग्नानंतर व एक मुलगी झाल्यानंतर लग्नापूर्वीच्या प्रियकराशी लग्न करण्याचे ठरवून नवर्याशी घटस्फोट घेऊन मुलीसकट पूर्वीच्या प्रियकराशी लग्न केले. यात मधल्यामध्ये तिच्या नवर्याची वाट लागली. आपल्या बायकोच्या लग्नाआधीच्या प्रकरणाची त्याला कल्पनाच नव्हती व संसार सुरू झाल्यावर २-३ वर्षातच बायकोने संसार मोडला व जाताना सुद्धा नवर्याला हुंड्यावरून छळ केल्याची तक्रार करण्याची धमकी देऊन घटस्फोटाची किंमत म्हणून ८५ हजार रूपये उकळले. मुलाची परिस्थिती अगदीच सामान्य होती (मुलीची घरची परिस्थिती सुद्धा सामान्यच होती). बिचार्याला स्वतःची अजिबात चूक नसताना बळजबरीने संसार मोडावा लागला व परवडत नसताना सुद्धा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
त्यामुळे या विशिष्ट प्रकरणात ही मुलगी आताच्या नवर्याबरोबर कायम राहील ही शक्यता कमी वाटते. ही मुलगी लग्नानंतर काही काळाने मूळपदावर गेली तर तिच्या नवर्याला व त्याच्या घरच्यांना हे प्रकरण अत्यंत महागात जाईल. आपल्या डॉक्टर मित्राने सर्व इतिहास माहित असून सुद्धा आपल्याला अंधारात ठेवले हे जर त्या मित्राला समजले तर शेवटी या डॉक्टरवरच दोषारोप होतील.
माझ्या दृष्टीने या डॉकटरने आपल्या मित्राल हा पूर्वोतिहास सांगून सावध करायला हवे होते.
21 Aug 2016 - 10:46 am | चंपाबाई
Environmental clauses could include, by interpretation, drunkard husband, low-income group, large family etc. By and large, these explanations provide for two instances where continued pregnancy is assumed to constitute a grave injury to the mental health of the pregnant woman, namely where the pregnancy is alleged by a woman to have being caused by rape and second where the pregnancy occurs as a result of failure f any device by a married woman or her husband for purpose of limiting the number of children.
फायनान्शियल रीजन ... मूल सांभाळण्याची नवरा बायकोची ( किंवा बॉय फ्रेंड गर्ल फ्रेंडची ) इच्छा नसणे, हेही वॅलिड रीजन आहे.
प्रेग्नन्सी हा आजार नाही. प्रेग्नंंट स्त्री ही रुग्ण नाही, पण व्यावसायिक गोपनीयता त्यालाही लागू होते.
22 Aug 2016 - 8:38 pm | आनंदी गोपाळ
कसं सुचतं हो तुम्हाला हे असलं?
22 Aug 2016 - 8:40 pm | आनंदी गोपाळ
रुग्ण नसताना अशा मुलीची सोनोग्राफी करणार्या, अन तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करणार्या दोन्ही डॉक्टरांवर आजकालच्या फ्याशनप्रमाणे 'एफायार' दाखल करावा, अशी जोरदार मागणी नोंदवतो!
22 Aug 2016 - 11:49 pm | श्रीगुरुजी
कसं सुचतं हो तुम्हाला हे असलं अकलेचे तारे तोडणं?
याच फ्याशनपायी गर्भातील शेकडो मुलींचा जन्माआधीच गर्भपात करून देणार्या त्या सुदाम मुंडे नावाच्या डॉक्टरला आणि त्याच्या डॉक्टर बायडीला फ्याशनेबल लोकांनी पोलिसात एफायार दाखल करून तुरूंगात जायला लावलं! दोघेही बिचारे अजून तुरूंगात बसलेत. गर्भ मुलीचा असल्याने सोनोग्राफी करून गर्भपात करून देणार्या बर्याच डॉक्टरांना याच फ्याशनपायी त्रास होतोय!!
23 Aug 2016 - 12:12 am | चंपाबाई
का उगाच फुगड्या घालताय ?
गर्भ मुलीचा आहे याचे निदान करवुन तो गर्भपात करणे हा गुन्हा आहे.
पण गर्भ आपणास ठेवायचा नाही ( लिंग निदान न करता ) ... असे ठरवुन एम टी पी केली की गुन्हा नाही.
23 Aug 2016 - 12:13 am | पिलीयन रायडर
तेच तर.. आता लिंगनिदानापर्यंत कुठे गेले गुरुजी?
23 Aug 2016 - 12:25 am | श्रीगुरुजी
एफ आय आर करणे ही fashion आहे असं त्यांनी उपरोधिकपणे लिहिले म्हणून मी तो प्रतिसाद लिहिला.
22 Aug 2016 - 9:12 pm | श्रीगुरुजी
कोणता आजार होता?
असं सुचण्यावर तुमची मोनोपॉली आहे की काय?
22 Aug 2016 - 9:31 pm | पिलीयन रायडर
वर त्या चंपाबाईंनी सुद्धा लिहीलय की हो गुरुजी.. गरोदरपणा आजर नसतो, पण त्याची गोपनीयता पाळावी लागतेच की नाही?
आणि गर्भपातासाठी बाळ जन्माला घालण्याची इच्छा नसणे हे ही सबळ कारण आहेच. तुम्हाला वाटत नसलं म्हणुन काय झालं? पोटात जीव आहे म्हणुन तो जन्माला घातलाच पाहिजे असं लॉजिक कसं लावता येईल? अनेकदा चुकुन प्रेग्ननसी रहाते, आधीच मुलं असताना आणि अजिबात औकाद नसताना असं जीवाला जन्म द्यायचं ठरवलं तर कसं व्हायचं!!
22 Aug 2016 - 10:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
पोटात जीव आहे म्हणुन तो जन्माला घातलाच पाहिजे असं लॉजिक कसं लावता येईल?
सहमत,
गर्भपाता संबंधित असल्याच धार्मिक अन दलिंदर धारणा अन कायद्यांपाई, आयर्लंड मध्ये डॉक्टर सविता हलपन्नवार, ह्या तरुण दंतवैद्य स्त्रीचे २०१२ साली झालेले निधन एकदम डोळ्यासमोर तरळले!.असो :/
22 Aug 2016 - 11:32 pm | श्रीगुरुजी
या स्त्रीला बाळंतपण झाल्यास जीवाला धोका आहे हे खूप पूर्वीच डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. बाळंतपणापूर्वीच किंवा बाळंत होत असताना स्त्री व बाळ अशा दोघांचाही मृत्यु होण्याची शक्यता होती. अशा प्रकरणात गर्भपात करण्यास हरकत नसावी.
परंतु या विशिष्ट प्रकरणात अशी कोणतीच समस्या नव्हती. मूल नको असताना व गर्भधारणा होईल याची कल्पना असताना सुद्धा समजून उमजून असुरक्षित संबंध ठेवून ही मुलगी गर्भवती झाली आणि नंतर गर्भासंबंधी कोणतीच समस्या नसताना डॉक्टरकडे जाऊन गर्भपात केला. माझ्या दृष्टीने ही हत्या आहे.
22 Aug 2016 - 11:27 pm | श्रीगुरुजी
माझा प्रतिसाद नीट वाचा. गरोदरपणा हा आजार नसतो हेच मी माझ्या प्रतिसादात लिहिलं आहे. या विशिष्ट मुलीच्या बाबतीत ही प्रेग्नन्सी चुकुन राहिली, आधीची मुलं होती व नवीन मुलाची औकाद नव्हती इ. गोष्टी अजिबात नव्हत्या. ज्याच्याशी अजिबात लग्न करायचे नाही हे ठरविलेले होते त्याच मुलाशी या मुलीने पूर्णपणे समजून उमजून लग्नाआधीच असुरक्षित शरीरसंबंध ठेवले होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भात जन्मतःच दोष आहे, गर्भामुळे आईच्या जीवाला धोका आहे, बलात्कारामुळे गर्भधारणा झाली आहे इ. कोणतेही सबळ कारण गर्भपातासाठी नव्हते. गर्भधारणा होईल याची जाणीव असतानासुद्धा, आपल्याला मूल नको आहे, आपण ज्याच्याशी शरीरसंबंध ठेवत आहोत त्याच्याशी आपण लग्न करणार नाही हे पूर्णपणे ठरलेले असताना सुद्धा जाणूनबुजून असुरक्षित शरीरसंबंध ठेवणे व नंतर गर्भधारणा झाल्यावर कोणतेही सबळ कारण नसताना गर्भपात करणे हे माझ्या दृष्टीने हत्या करण्यासारखेच आहे. इतरांचे याबाबतीत पूर्ण वेगळे मत असू शकते.
अमेरिकेसारख्या देशात गर्भवती महिलेचा खून केला किंवा ती एखाद्याच्या चुकीने अपघातात गेली तर आरोपीवर फक्त महिलेच्या खुनाचा आरोप न ठेवता महिला व तिच्या पोटातील गर्भ अशा दोन खुनांचा आरोप लावला जातो. अशा प्रकरणात न जन्मलेल्या गर्भाची सुद्धा हत्या केली असा कायदेशीर आरोप लावला जातो.
22 Aug 2016 - 11:30 pm | चंपाबाई
भारतात भारताचा एम टी पी अॅक्ट लावायचा.
23 Aug 2016 - 12:11 am | पिलीयन रायडर
समजा त्या मुलीला फक्त तिच्या आनंदासाठी शरीरसंबंध ठेवायचे असतील आणि वापरलेले गर्भनिरोधक १००% सुरक्षित नसल्याने ही गर्भधारणा झाली असेल तर काय?
मला वाटत नाही की ज्या व्यक्तिला मुल नको आहे ती व्यक्ति "चला असुरक्षित संबंध ठेवुया. झालो गरोदर तरी करुन घेऊन गर्भपात..हाकानाका" असं म्हणत असेल. ज्याला मुल नको असतं तो घ्यायची ती काळजी घेतोच, त्यातुनही गर्भ राहिल्यास गर्भपात करण्याचा एक पर्याय असतो.
ज्याच्या सोबत लग्न करायचे नाही त्याच्या सोबत शरीरसंबंध ठेवले आणि त्यातुन जर गर्भधारणा झाली तरीही केवळ हत्या नको म्हणुन मुल जन्माला घालण्यासारखी मोठी गोष्ट करायची का? नको असलेले मुल जन्माला घालणे त्या बाळाच्याच दृष्टीने अवघड नाही का? जर एखादा वैद्यकीय मुद्दा असेल / बाळात काही दोष असेल तर मात्र हाच गर्भपात तत्त्वतः योग्य कसा होतो? अपंग, मतिमंद बाळांना मारलं तरी चालतं का म्हणजे?
दुसरा मुद्दा, कुणी गर्भवती महिलेची हत्या करणं आणि गर्भपात ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जे बाळाला जन्म देणार आहेत, ज्यांना त्याचे आयुष्यभर पालनपोषण करायचे आहे, त्यांना गर्भपाताचा निर्णय घेण्याचा हक्क आहेच. फक्त हा निर्णय लिंगाधारित असु नये, हे मलाही मान्य आहेच.
23 Aug 2016 - 12:21 am | श्रीगुरुजी
माझ्या मते ही हत्या आहे. तुमचं मत पूर्ण वेगळं आहे.
Let's agree to disagree.
23 Aug 2016 - 12:23 am | संदीप डांगे
तुमच्यामते तीने काय करायला हवे होते? एक हायपोथिसिस म्हणून सांगा.
23 Aug 2016 - 12:27 am | श्रीगुरुजी
गर्भपात करायला नको होता.
23 Aug 2016 - 1:39 am | चंपाबाई
बुट्टीत घालून नदीत सोडायला हवं होतं... मग गुर्जींच्या घरी ते आलं असतं व त्यानी ते संभाळंलं असतं.
मग पोरगं मोठं झाल्यावर बोलणार..
मै रूपेय नहीं , गुर्जेय हूं !
23 Aug 2016 - 10:38 am | अनुप ढेरे
हा हा हा =))
23 Aug 2016 - 10:49 am | अभ्या..
फिस्कन हसू आलं राव,
पण ते कदाचित असेही म्हणाले असते.
"यात मोदींची काही चूक नाही" ;)
23 Aug 2016 - 12:38 pm | अजया
:)
23 Aug 2016 - 2:30 pm | सतीश कुडतरकर
=))
23 Aug 2016 - 7:04 pm | साती
भारी प्रतिसाद!
20 Aug 2016 - 3:53 pm | संदीप डांगे
माझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला त्याच्या बायकोच्या पूर्व इतिहासाबद्दल सांगावे कि नको कारण तो माझा जीवश्च कंठाश्च मित्र आहे..
20 Aug 2016 - 4:05 pm | मृत्युन्जय
तुमच्या जिवश्च कंठश्च मित्राला तुमच्या मैत्रिणींबद्दल माहिती नाही हेच मुळात अघटित वाटते. तो कदाचित जिवश्च कंठश्च नसावा. ;)
20 Aug 2016 - 4:25 pm | संदीप डांगे
;) लोल!
चुकीची गृहीतके धरली कि असं होतं... चला, वन मोर गेस?
20 Aug 2016 - 11:38 pm | वाल्मिक
मनात पापी भावना नसली कि कोडे उलगडते
एक्स- gf म्हणजे बायको
22 Aug 2016 - 11:36 pm | संदीप डांगे
पॉसिबिलिटीज आर अनलिमिटेड!!! =))
१. एक्सगर्लफ्रेंड ने आम्हाला वयाच्या चोविसाव्या वर्षी डिच केले.
२. वयाच्या ३२ व्या वर्षी आम्हाला (कामानिमित्त) एक जबरदस्त मित्र भेटला.
३. त्याने त्याच्या (अरेंज्ड) लग्नाला बोलावले तेव्हा वधू आमची एक्सगफ्रे, होती.
आता बोला...???
=)) =))
23 Aug 2016 - 5:47 pm | अनिरुद्ध.वैद्य
आता बोलायंच? नांदा सौख्यभरे म्हणा अन जेवण करुन या!
=)) =))
22 Aug 2016 - 10:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
=)) डांगेबुआ भयानक डांबिस माणूस आहे =)) =))
22 Aug 2016 - 11:38 pm | संदीप डांगे
साली फितरतही कुछ ऐसी है बंदेकी...! =))
23 Aug 2016 - 8:37 am | नाखु
अतरंगीही आहे.
पुण्यात येऊनही न भेटल्यानी नाखु(ष) पत्रेवाला
20 Aug 2016 - 3:58 pm | पद्माक्षी
मला असं का वाटतंय कि या कथेत नायिका असल्यामुळे डॉक वर जास्त टीका झाली.
म्हणजे जर मुली ऐवजी मुलगा असता ज्याने आपल्या मैत्रिणीला गर्भपातासाठी आणले असते आणि तो नंतर मित्राचा जावई म्हणून भेटला असता तर लोकांनी काय सल्ला दिला असता? कदाचित असे सांगितले असते का कि मित्राला सावध करा किंवा मित्राने पूर्ण चौकशी केली आहे कि नाही हे विचारा इत्यादी..
इथे बरयाच लोकांनी म्हंटले आहे कि त्यांच्या मुलांनी असे लग्न केले तर हरकत नाही. पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे कि समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ज्या मुलीचा तुम्ही गर्भपात केला आहे ती मुलगी तुमच्या मुलाने सून म्हणून तुम्हाला दाखवली तर तुम्ही डॉक्टर पेशंट गोपनीयतेचा विचार करून गप्प बसाल कि मुलाला तुमच्याकडे असलेली माहिती द्याल?
डॉक्टरांच्या मित्राला जर ती मुलगी परत भेटली नसती तर प्रश्नच नव्हता. पण ती भेटली आणि काही नात्याने भेटली आहे. आता प्रॉब्लेम असा आहे अशा गोष्टी कायम लपून राहतातच असे नाही. त्यामुळे समजा उद्या हे त्या कुटुंबाला कळले तर काय?
काही लोकांचा विश्वास आहे कि मुलीने हे सर्व मुलाला सांगितले असणार वगैरे.. तर त्या केसमध्ये मुलीने हे पण सांगितले असणार कि याच डॉक्टरांकडे मी गेले होते. मग किमान त्या मित्राच्या मुलाने तरी डॉक्टरांच्या मित्राला भेटून खात्री द्यायला हवी होती. I mean, its common sense.
20 Aug 2016 - 4:07 pm | मृत्युन्जय
काही लोकांचा विश्वास आहे कि मुलीने हे सर्व मुलाला सांगितले असणार वगैरे.. तर त्या केसमध्ये मुलीने हे पण सांगितले असणार कि याच डॉक्टरांकडे मी गेले होते.
नॉट नेसेसरी. पण तुमच्या तर्कांची दिशा मात्र आवडली. तार्किकदृष्ट्या बोलायचे झाल्यास मुद्द्यात दम है :)
20 Aug 2016 - 4:13 pm | अभ्या..
हा ना.
हेच विचारतोय हैसियत का मामला म्हणून. घरची, आपली बाब येते तेंव्हा कुठली हैसियत अव्वल?
21 Aug 2016 - 12:05 pm | पद्माक्षी
मला तरी यात डॉक्टरांची काही चूक आहे असे वाटले नाही. सरळ साधा किस्सा आहे, रादर व्यावसायिक नीतिमत्ता हा मुद्दा मला काही फार महत्वाचा वाटला नाही या प्रसंगात.
म्हणजे तसे काही बंधन नसते तरी एकदा लग्न होऊन गेल्यावर डॉक्टर आपल्या मित्राला काही सांगू शकले असते का ? नॉट शुअर..
20 Aug 2016 - 4:57 pm | झेन
कमाल आहे, सगळी लाज बघणं-यालाच असावी का ? एका मित्राची कुचंबणा (शृंगापत्ती शब्द आवडलेला आहे) एक केस स्टडी म्हणून स्वीकारायची ब-याच जणांची तयारी नाही. धागाकर्ता बुर्झ्वा आणि ज्या मुलीने लग्नाआधी स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवले ति स्वातंत्र्याची देवता.
एक तर लेखकाने मांडलेल्या चौकटीतून घटनेबद्दल काथ्या कुटावा अन्यथा वास्तवातील पात्रे ओळखीची असतील तर दुसरी बाजू मांडावी.
बाकी आत्याबाईच्या मिश्या .....
- डॉक्टरांच्या मुलाने/मुलीने लग्नाआधी संबंध ठेवले तर,
- मुलगी ज्याच्यामुले गरोदर राहिली त्याच्याशी परत संबंध ठेवणारच नाही,
- ज्या मुलामुळे गरोदर होती त्याला एड्स झाला असेल तर,
- ज्याच्याशी लग्न झाले त्याच्यामुळे कुणी गर्भपात केला असेल तर,
- मुलीचे एकाच मुलाशी संबध असतील का,
- मुलीचा एकच गर्भपात झाला असेल का,
हि मालिका अशी चालू राहिल्यास तारक मेहता का उलटा चष्मा पेक्षा लांब मालिका होईल.
एक कल्पना ... समजा स्वत: ती मुलगी मिपावर आली तर काय म्हणेल/लिहील ?
ब-याचश्या प्रतिसादांवरून असे वाटते कि कथेतली मुलगी योनिशुचीतेच्या अवास्तव कल्पनांच्या विरुध्ध बंड करून उठलेली नायिका आहे आणि आपल्या समाजात लग्न हि गोष्ट “संपूर्ण स्वतंत्र्याच्या” आड येत असल्यामुळे आऊटडेटेड झाली आही.
20 Aug 2016 - 5:01 pm | संदीप डांगे
खरं सांगायचं तर खूप मनोरंजक धागा आणि चर्चा, मोबाईलवर असल्याने जास्त लिहू शकता नाही, पण ... असोच!!
22 Aug 2016 - 12:33 pm | साहेब..
आहे.
20 Aug 2016 - 7:03 pm | vcdatrange
कोंबडीपेक्षा मसालाच जास्त चवदार झालायं
यह कम्बखत श्रावण कब संपेगा?
20 Aug 2016 - 8:59 pm | नमकिन
महान शिक्षक आहे.
ही थोड़ी बहुत सर्व सामान्य गोष्ट ठरत चालली आहे लग्नाआधी शरीर संबंध हे निरीक्षण भारतातलेच.
म्हणजे एक अनुभव /ओढ/चढाओढ किंवा अपरिहार्यता इ सर्व परिस्थितित परिणति शरीर संबंधात होतेच, पण इतके गर्भवती होने पर्यंत फार कमी प्रमाण असावे असे वाटते, अहो पुढची पिढी हुशार नाहीं का!
तर घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे गर्भपात कराने साठी (जे काही अंशी पापच ठरते-जसे फक्त मजा करुन घेताना गर्भ धारण करायचा अन् मारायचा) धंदा करायचा, उगीच नैतिकता -मूल्यांकन काहीतरी बागूलबुवा उभा करायचा. नैतिक मूल्ये, आचरण हे व्यक्ति, धर्म,पंथ, जाती -पाती, रिति-रिवाज, देश-ठिकाने या दरम्यान बदलत रहातात, त्यात अडकून मैत्री -विश्वास याला तोड़ता पहाणे कष्टप्रद.
मागच्या पिढीने ठरवले की गर्भपात नैतिक (वरिल गोष्टीतल) पण संबंध अनैतिक, काहीही. बरं हेच पाप करुन स्वतःची मुले मोठी करुन मोक्ष प्राप्तिची अपेक्षा करणे म्हणजे हिप्पोक्रसी!
21 Aug 2016 - 12:22 am | सुबोध खरे
लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.
कुणी उत्तम विचार प्रवर्तक दिल्या.
काहींनी नीट वाचन न करता दिल्या, कुणी भावनेच्या भरात दिल्या.
जशा आहेत तशा त्या शिरसावंद्य.
माझ्या मित्राला शृंगापत्ती केवळ लेखात लिहिली आहे एवढ्याच कारणाने झाली नाही तर
त्याला हि चिंता वाटते कि उद्या हीच मुलगी (रुपाली) तिच्या घरचे गरोदर झाल्यावर "घरचे स्त्रीरोग तज्ञ" म्हणून माझ्याकडे परत घेऊन आले तर?
व्यावसायिक नीतिमत्ता बाळगून तिच्या जुन्या गर्भपाता बद्दल गप्प राहायचे आणि केस पेपर मध्ये पहिल्यांदाच गरोदर ( प्रायमि ग्रॅव्हिडा) असे खोटे लिहायचे ?
कि मित्राच्या कुटुंबाला सर्व खरे सांगायचे? (जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर)
22 Aug 2016 - 9:05 pm | पुंबा
आता हा खर्या अर्थाने नैतीक पेच होतो. विचार करावा लागेल.
23 Aug 2016 - 9:46 pm | आदूबाळ
हां. हा नैतिक पेच आहे.
प्रायमि ग्रॅव्हिडा असं अर्थातच लिहायचं नाही. कारण "घरच्या स्त्रीरोग तज्ञा"ला माहीत आहे की ही पहिली गर्भधारणा नाही. उलट प्रायमि ग्रॅव्हिडा असं लिहिलं तर ते व्यावसायिक नीतिमत्तेचं उल्लंघन होईल.
जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर तो तिच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. डॉक्टरच्या नव्हे.
21 Aug 2016 - 12:40 am | वाल्मिक
जर तर
1) गर्भाशयात राहिलेला भाग ,मुलगा म्हणून जिवंत असला तर आणि त्याने आई कुठे आहे विचारले असते तर ?
2) रुपाली समजा इम्पोटेन्ट झाली abortion नंतर तर ?
3) रुपाली ला तिच्या नवऱ्याहून अजून श्रीमंत कोणी मिळाला आणि त्या वेळी परत ती गर्भार असती तर ?
4) रुपेश ने IT मध्ये 2-3 switch मारले आणि तिच्या नवऱ्याहून जास्त श्रीमंत होऊन तिच्या आयुष्यात परत आला तर ?
5) रुपाली च्या डोळ्यात तिरस्कार ऐवजी प्रेम दिसले तर ?
21 Aug 2016 - 8:22 am | उडन खटोला
सगळ्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे प्रतिसाद दिलेले आहेत.
अपेक्षितच.
भार देणाराने दिला, घेणाराने काही काळ ठेवला नंतर नको वाटून टाकून दिला, टाकून देताना मदत करणारा गप्प बसला. नंतर काही काळाने आपण केलेलं काम दिसल्यानं मदत करणाऱ्याला त्रास होऊ लागला.
बोलून दुःख हलकं होतं म्हणतात. ते झालेलं दिसलं नाही. असो!
टोचून बोलल्यानं सुख व्हायला हरकत नाही, तेही दिसलं नाही, तेही असो!
एकंदरीत असोच असो!
गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.
23 Aug 2016 - 10:15 am | सामान्य वाचक
आपल्या स्वातंत्र्याच्या अतिरेकात आपण एखाद्या जीवाचे, एखाद्याच्या प्रेमाचे, एखाद्याच्या विश्वासाचे, एखाद्याच्या भावनांचे काय करतो आहे, याचाही विचार नाही हे अवघड आहे justify करायला
21 Aug 2016 - 8:22 am | उडन खटोला
सगळ्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे प्रतिसाद दिलेले आहेत.
अपेक्षितच.
भार देणाराने दिला, घेणाराने काही काळ ठेवला नंतर नको वाटून टाकून दिला, टाकून देताना मदत करणारा गप्प बसला. नंतर काही काळाने आपण केलेलं काम दिसल्यानं मदत करणाऱ्याला त्रास होऊ लागला.
बोलून दुःख हलकं होतं म्हणतात. ते झालेलं दिसलं नाही. असो!
टोचून बोलल्यानं सुख व्हायला हरकत नाही, तेही दिसलं नाही, तेही असो!
एकंदरीत असोच असो!
गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.
21 Aug 2016 - 11:50 pm | सुबोध खरे
गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.
अतिशय योग्य.
आपल्या आनंदासाठी एका जीवाला जन्मापूर्वीच नष्ट करणे यात आजकाल लोकांना वावगे वाटेनासे झाले आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे.
(आणि हे आमच्यासारख्या डॉक्टरना फार वेळा पाहावे लागते.)
भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?
पाळी चुकली तरीही काही दिवस थंड बसून राहता. मग मुलाचे अवयव तयार झालेले असतात. आता धावपळ करा.
कशासाठी?
22 Aug 2016 - 12:05 am | वाल्मिक
माझी परतिक्रिया आहे कि
23 Aug 2016 - 10:18 am | सामान्य वाचक
,
23 Aug 2016 - 10:36 am | श्रीगुरुजी
+१
मी हेच वर लिहिले आहे. या मुलीने पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा होऊन दिली आणि नंतर कोणतेही सबळ कारण नसताना गर्भाची हत्या केली.
23 Aug 2016 - 8:46 pm | कपिलमुनी
हे कुठुन कळला ?
त्यांच्या हेल्मेटचा प्रॉब्लेम झाला असेल तर ??
23 Aug 2016 - 9:09 pm | आजानुकर्ण
हो.ना किंवा आपल्या समुदायाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून हेल्मेटला छिद्र पाडूनही दिलेले असू शकते. पॉसिबिलीटीज आर एंडलेस
23 Aug 2016 - 11:45 pm | श्रीगुरुजी
गर्भधारणा होण्याची शक्यता किती हे डॉक्टरांनी वर लिहिलंच आहे आणि असा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं असतं हे देखील लिहिलं आहे.
23 Aug 2016 - 10:52 am | मार्मिक गोडसे
सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.
वरील लेखात मुलीच्या बाबतीत असे काही घडलेले आढळले नाही.
म्हणजे ती पहिल्या महिन्यातच तुमच्या मित्राकडे तपासायला आली असेल (त्या मुलीची पाळी नियमीत असेल असे गृहीत धरून).
युरीन प्रेगनन्सी टेस्ट केली असती तरी चालले असते ना? सोनोग्राफी कशासाठी ?
तुमच्या मित्रानी गर्भपाताच्या गोळया देऊनही दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही म्हणून छोटी शल्यक्रिया केली असे लेखात तुम्ही म्हटले आहे, ह्यात गर्भाचे अवयव तयार झाल्याचा उल्लेख आढळला नाही. ह्याचा अर्थ त्या मुलीने कायदेशीरपणे गर्भपात केलाय तर त्याला हत्या कसे म्हणता येईल?
मला तर ती मुलगी प्रामाणीक वाटते. तीने गर्भपाता करण्याचे कारण सांगताना कोणतीही गोष्ट लपवली नाही. उद्या समजा तुमच्या डॉक्टर मित्राने मेडीकल ईथिक्स तोडून त्या मुलीच्या नवर्याला किंवा त्याच्या वडलांना मुलीच्या गर्भपाताबद्दल सांगितले व पुढे प्रकरण घटस्पोटापर्यंत गेल्यास तुमच्या मित्रावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का?
23 Aug 2016 - 12:28 pm | सुबोध खरे
गोडसे साहेब
सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.हे मान्य आहे
पण
गर्भ गर्भाशयातच आहे कि फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे, गर्भ एकच आहे जुळं/ तिळं आहे हे मूत्र तपासणीत कळत नाही.
गर्भाशयात गर्भच आहे कि एका तऱ्हेचं कर्करोग आहे (ज्यात गरोदरपणाची मूत्र चाचणी + येते). ( पुरुषांच्या एका तर्हेच्या वृषणाच्या कर्करोगात सुद्धा गरोदरपणाची चाचणी + येते)
( http://www.cancer.org/cancer/gestationaltrophoblasticdisease/detailedgui...)
अशा सर्व तर्हेच्या शंका साठी सोनोग्राफी करावी लागते.
शिवाय जोवर गर्भ धारणा झाली आहे हे नक्की झालेले नसते तोवर लग्न न झालेली मुलगी "कुमारिका" आहे हे गृहीत धरून तिची आतून तपासणी करता येत नाही.
(आमच्या सरांना एका मुलीने गर्भाचे हात पाय दिसत असताना मी गरोदर असणे शक्यच नाही असे ठामपणे सांगितले. त्यावर सर शांत पणे म्हणाले बेटी एक तर तू खोटं बोलत आहेस किंवातू दुसरी व्हर्जिन मेरी असशील. तूच काय ते ठरव.)
सोनोग्राफीचा रिपोर्ट काय हे मी येथे सांगणार नाही कारण व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप माझ्यावर होईल.
स्वतःच्या बळावर जगू शकत नसलेल्या गर्भाचा( २८ आठवड्यापूर्वी) गर्भपात हि "हत्या" आहे का हे कायदेतज्ज्ञ सांगू शकतील. पण जे झालं ते पूर्ण कायदेशीर होतं एवढंच मी सांगू शकेन.
उदा. सैनिक जेंव्हा शत्रूच्या सैनिकाला गोळी घालतो तेंव्हा ती "कायदेशीर" हत्या असते
23 Aug 2016 - 12:46 pm | सुबोध खरे
एक महत्त्वाची गोष्ट राहिली. बहुसंख्य मुली तीन चार महिने झालेले असले तरी एकच महिना, दीडच महिना झाला आहे असे सर्रास खोटं बोलतात. कायद्याप्रमाणे १२ आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एकाच डॉक्टरचे मत लागते आणि १२ आठवड्यनंतर दोन डॉक्टरांची संमती लागते. हा कालावधी नक्की करण्यासाठी आणि वर म्हटल्याप्रमाणे इतर कारणांसाठी सोनोग्राफी केली जाते.
23 Aug 2016 - 5:11 pm | मार्मिक गोडसे
धन्यवाद डॉ.खरेसाहेब. युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर तुमच्या डॉक्टर मित्राने त्या मुलीला सोनोग्राफी करायला सांगितली असती का?असा मी विचार करत होतो, परंतू सगळ्याच गोष्टी खुल्या करता येत नसतात (उदा. डॉक्टर रुग्णामधील संवाद) हे तुमच्या प्रतिसादातून कळले. अशा केसमध्ये सोनोग्राफीचे फायदेही समजले.
23 Aug 2016 - 11:02 pm | सुबोध खरे
युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर
रुपाली स्त्री रोग तज्ञाकडे कशाला जाईल
आणि धागा जन्मालाच आला नसता.
24 Aug 2016 - 11:00 am | मार्मिक गोडसे
त्या मुलीची कोणतीही शारिरीक अथवा युरीन तपासणी न करता तुमच्या डॉक्ट मित्राने ती मुलगी गरोदरच आहे हे कसे ठरवले? गरोदरपणाच्या चाचणीचा क्रम थेट सोनोग्राफीने सुरू होतो का?
पाळी चुकणे हे १०० % गरोदरपणाचे लक्षण आहे का?
24 Aug 2016 - 11:29 am | सुबोध खरे
"उलटी" किंवा संशय ग्रस्त विचारसरणी.
रुपालीची पाळी चुकल्यावर तिने स्वतः मूत्र तपासणी केली( "कारण" तिला माहित होते.) त्यात ती गरोदर आहे हे समजल्यावर ती डॉक्टरांकडे आली.
त्यांनी तिला गर्भाचे वय आणि स्थान इ सर्व ( वर म्ह्टल्याप्रमाणे) तपासण्यासाठी सोनोग्राफीसाठी पाठवले.
मूत्र तपासणी "निगेटिव्ह" आली असती तर रूपालीला डॉक्टर कडे जायची गरजच नसती आणि धाग्याचे प्रयोजनच नसते
24 Aug 2016 - 12:09 pm | मार्मिक गोडसे
असे लेखात आहे.
असा उल्लेख आढळला नाही म्हणून शंका आली. त्यात तुम्ही वरील एका प्रतिसादात म्हटले आहे,
त्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल तुमचा डॉक्टर मित्र साशंक होता म्हणूनच खात्री करण्यासाठी सोनोग्राफीला पाठवले असाही अर्थ होऊ शकतो.
24 Aug 2016 - 12:12 pm | सुबोध खरे
सविस्तर १०० मार्कांचा निबंध पाहिजे का?
मला तो झेपणार नाही. मूळ मुद्दा पहा फाटे फोडण्यापेक्षा.
24 Aug 2016 - 12:53 pm | मार्मिक गोडसे
त्या मुद्द्यावर मी प्रतिसाद दिलेले आहेत आणि ते तुम्ही वाचलेही आहेत.
असे तुम्ही म्हटल्यामुळे तेव्हडे सोडून मला धाग्यावर पडलेल्या शंका विचारतोय, परंतू
असे चुकीची गृहीतके मांडू नका.
जशी लघवीची प्रेग्ननन्सी टेस्ट चूकीची + येऊ शकते तशी चुकीची निगेटीवही येऊ शकत असेलच ना?
21 Aug 2016 - 10:48 am | संदीप डांगे
अबाबो, कसलं घमासान झालं ह्या धाग्यावर,
अनेकांना खरेंचा साधासा मुद्दा लक्षात आलेला दिसला नाही, सगळे व्यावसायिक नितीमत्तेवर तोंडसुख घेत आहेत, चिंता वेगळीच होती डॉक्टरांच्या मित्राची!
21 Aug 2016 - 11:01 am | शाम भागवत
सहमत
22 Aug 2016 - 12:46 am | सुबोध खरे
जाला वर पूर्ण वेळ सक्रिय असणाऱ्या माणसांची एक विशिष्ट मनोवृत्ती दिसून येते. ते बऱयापैकी आभासी जगात वावरत असतात आणि त्यांना जाल हेच जग असे वाटते.
लग्नाआधी संबंध ठेवले तर त्यात वावगे नाही. आणि हे तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला/ बायकोला प्रामाणिकपणे सांगून टाका. यात सकृतदर्शनी काहीच चूक नाही. पण असे विचार करणारे लोक आपल्या भारतात किती आहेत. १-२ % ( एक ते दोन टक्के) पेक्षा जास्त नाहीत.
उरलेले ९८ टक्के लोक जाला वर नाहीत किंवा तशा विचार सरणीचे नाहीत. या २% लोकांमध्ये प्रेम विवाह करणारे किती असतील ४० %. म्हणजे लोकसंख्येच्या ०.८% लोकांना सकृत दर्शनी विवाह पूर्व संबंध मान्य असतील.
बाकी एकंदर प्रेमविवाहाचे प्रमाण किती असेल ते भारतात १०-१२ % पेक्षा जास्त नाही.
राहिली प्रचंड लोकसंख्या आजही ठरवून विवाह करते. यात आई वडिलांचा फार मोठा वाटा नक्कीच आहे. आई वडील प्रथम "बाकी सर्व" चौकशी करतात आणि मगच मुलगा/ मुलगी "पाहण्याचा" कार्यक्रम केला जातो.
आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत "बहुसंख्य" पुरुष दांभिक आहेत.स्वतः बाहेर कितीही शेण खाल्ले तरी त्यांना बायको मात्र अनाघ्रात कलिकाच हवी असते. आणि त्यांच्या आय बहिणींचे पण म्हणणे "पुरुषांनी काहीही केले तर चालते पण बाईच्या जातीला असे करून चालते का? असेच दुर्दैवाने असते.
वर कुणी तरी लिहिले आहे ते सत्य आहे. बरेच पुरुष "चोच मारण्याचा" प्रयत्न करतात त्यातील बहुसंख्य पुरुष "असफल" होतात. मग पुरुषी अहंकार आड येतो. मी जर धुतल्या तांदुळासारखा आहे, लग्न पूर्व संबंध ठेवला नाही( खरं तर ठेवू शकलो नाही) मग माझी बायको "स्त्री" असून कसे काय ठेवू शकते.
मी छातीठोक पणे हे सांगतो कि ठरवून केलेल्या विवाहात जर मुलीने लग्नाच्या अगोदर प्रामाणीकपणे सांगितले कि माझे विवाहपूर्व संबंध होते तर ९९ % विवाह मोडतील. कोण आई, बाप किंवा आत्या मावशी आपल्या मुलाचे लग्न "अशा" मुलीशी करून द्यायला तयार होतील. "असल्या" छप्पन्न मुली आणून उभ्या करिन हा घराघरात होणारा संवाद पुनःप्रक्षेपीत होत असतो. प्रेम विवाहाला विरोध करतानाही हाच संवाद ऐकायला मिळेल.
( "अशा / असल्या" मुली हि "माझी मनोवृत्ती" नसून ऐकू येणाऱ्या संवादातील शब्द आहेत अन्यथा छिद्रान्वेषी लोक यात हि बोट घालतील
प्रेम विवाह नसेल तर "मिपावरील किती लोक" आपल्या भावाचे/ मुलाचे लग्न अशा "प्रामाणिक" मुलीशी करायला तयार होतील.
माझा मुलगा / भाऊ जर "तिच्याशीच लग्न करायचे" असे म्हणाला तर मी त्याला आशीर्वाद देईन हा उदात्त विचार फक्त प्रेम विवाह असेल आणि त्या मुलाची भावनिक गुंतवणूक असेल तरच शक्य आहे.नाहीतरी मुलगा/ भाऊ लग्न करणारच आहे तर मोडता का घाला. उगाच "हात दाखवून अवलक्षण का करा" असा व्यवहारी विचार आहे
बघून बघायची तर "असली" मुलगी कशाला हाच सर्वसाधारण विचार.
दुर्दैवाने एखादी मुलगी अगदी तरुण वयात विधवा झाली तर तिच्याशी आपल्या भावाचे/मुलाचे लग्न करून द्यायला किती बायका तयार होतील? हे सर्व प्रेम विवाहातच शक्य आहे.
लग्नापूर्वी मुलीला फायब्रॉईड( गर्भाशयात गोळा) आहे असे समजल्यावर मोडलेली लग्ने मला माहित आहेत, जेथे मुलीच्या "हातात" काहीच नसते.
तसे जालावर "आधुनिक होणे" फार सोपे आहे.
हस्तादपि न दातव्यं, गृहादपि न दीयते
(मधली ओळ आत्ता आठवत नाही)
वचने किम दरिद्रता .
आणि प्रेम विवाहात जर मुलीने असे सांगितले कि माझे अगोदर प्रेम होते आणि शरीरसंबंध होते तर ४०-५० % विवाह मोडतील.हे प्रमाण प्रेमाच्या कोणत्या टप्प्यात सांगितले यावर अवलंबून असेल. भावनिक गुंतवणूक होण्याच्या अगोदर सांगितले तर जास्त विवाह मोडतील.
एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला अनुभवातून आलेले शहाणपण आहे ( आणि ज्याची शास्त्रीय कारण मीमांसा आता माहिती आहे) ते म्हणजे महिन्यातील एक दिवसच ( फार तर दोन दिवसच) गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याचा अर्थ काय कि एकदाच संबंध आला आणि गर्भार राहिली हि शक्यता ३० दिवसांपैकी १ दिवस म्हणजे ३. ३३ % इतकी कमी आहे. म्हणजेच एखादी मुलगी गरोदर राहिली तर तिचे एकदाच "भावनेच्या भरात" संबंध आला हि शक्यता ३% आहे आणि ९७ % शक्यता तीचा बऱ्याच वेळेस शरीर संबंध आला आहे असा आहे. हीच गोष्ट एखाद्या पुरुषाला अर्थातच लागू आहे.
म्हणजे "ती वेळच तशी होती" one night stand नाही.बरेच स्टँड्स झालेले असतात यामुळे त्या स्त्री पुरुषांची भावनिक गुंतवणूक जास्त असते.
वरील केस मध्ये रुपालीचा प्रेम विवाह आहे कि ठरवून ते मला माहित नाही. "व्यावसायिक गोपनीयतेमुळे"(हा शब्द आता योनिशुचितेपेक्षा पवित्र झाला आहे) माझ्या मित्राने मला सांगितले तेवढेच मी येथे लिहिले आहे त्यामुळे रुपालीने ते तिच्या नवऱ्याला सांगितले असेल कि नाही हे माहित नाही.
आजही बहुसंख्य (कदाचित १०० %) "ताईचा सल्ला' सारख्या सदरात येणारे सल्ले "तुम्ही लग्नापूर्वी काय केलेत हे नवऱ्याला/ बायकोला अजिबात सांगू नका" असेच असतात हे यामुळेच आहे. कारण अशा उपचार तज्ज्ञांना हे "अनुभवातून आलेले शहाणपण" आहे.
जालावरील जग हेच खरे जग आहे असे समजणारे बरेच लोक बऱयापैकी आभासी जगात वावरत असतात असे वाटते.प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यापासुन फार लांब आहे.
कोंबडीपेक्षा मसालाच जास्त चवदार झालायं
हि मात्र वस्तुस्थिती.
ते तसंच असतं. नुसती उकडलेली कोंबडी किती लोक खातील.
22 Aug 2016 - 9:42 am | संदीप डांगे
अतिशय सहमत! नाथिंग मोर टू ऍड.
22 Aug 2016 - 9:47 am | शाम भागवत
मस्त.
22 Aug 2016 - 9:53 am | शाम भागवत
हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते ।
परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता ॥
22 Aug 2016 - 9:56 am | सुबोध खरे
धन्यवाद
22 Aug 2016 - 12:41 pm | साहेब..
हा लेख लिहून तुमचे काही चुकले असे मला वाटत नाही.
23 Aug 2016 - 10:20 am | सामान्य वाचक
सहमत
22 Aug 2016 - 11:32 am | मराठी कथालेखक
त्या डॉक्टरनी आपल्या मित्राची फसवणूक केली असे मला वाटत नाही , कारण तो मित्र मुलाचे लग्न ठरवताना डॉक्टरकडे चौकशीस आला नव्हता त्यामुळे त्याला रुपालीबद्दल माहिती देणे वा सत्य न लपवणे हे डॉक्टरचे (मित्राच्या नात्याने) कर्तव्य होवूच शकत नाही ..बाकी एक डॉक्टर म्हणून त्यांना व्यावसायिक नितिमत्ता पाळावीच लागेल त्यामुळे अपराधीपणाचे कारण नाही.
बाकी लग्नाआधीचे शारिरिक संबंध हे भावी जोडीदाराला सांगितलेच पाहिजेत असे नाही पण भावी जोडीदाराने त्याबद्दल लग्नाआधी विचारले तर लपवू नये असे मला वाटते. पण त्याचबरोबर भावी जोडीदाराने त्याबद्दल (विचारायचे असल्यास) लग्नाआधि विचारावे लग्नानंतर विचारणे योग्य नाही. लग्न ठरताना मुला मुलीने स्वतःची मेडिकल हिस्टरीही एकमेकांना सांगावी असे मला वाटते . वेगवेगळे मोठे आजार, सर्जरी, फिट्स , अबॉर्शन्स , महत्वाचे अपघात, अपघाताच्या मोठ्या खुणा (जसे त्वचेवर जळाल्याचे डाग ई) याबाबत एकमेकांना अंधारात ठेवू नये. झालंच तर स्वतःला चष्मा आहे का नाही (की कॉन्टॅक्ट लेन्स वापरत आहे), केस खरेच काळे आहेत (की रंगवत आहे) , आणि पुढे जावून आपला जन्म गर्भारपणाच्या कितव्या महिन्यात झाला , कुटूंबातील अनुवंशिक स्वरुपाचे ज्ञात असणारे आजार, हे देखील होणार्या जोडीदाराला स्वतःहून सांगायला हवे (अर्थात हे माझे मत !!)
22 Aug 2016 - 12:19 pm | राही
प्रतिसाद अगदी पटला.
फक्त लग्नाआधीचे अॅबॉर्शन हा अजूनही (भयंकर) नैतिक गुन्हा समजला जातो. माझ्या मते तसे समजले जाऊ नये पण वास्तव हेच की ही गोष्ट खुल्या दिलाने स्वीकारणारे आणि ती माहीत झाल्यावर, आपल्या होणार्या बायकोशी आपली वागणू़क त्यामुळे न बदलणारे लोक फारच कमी सापडतील. योनिशुचितेचा पगडा समाजावर फारच मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टरांच्या मित्राला त्यामुळेच आपत्ती वाटत असावी. समागमामुळे स्त्री अशुद्ध होत नाही, अगदी लग्नपूर्व समागमानेसुद्धा, हे जर स्वीकारता आले तर गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो. आजकाल सुशिक्षित महाराष्ट्रीय समाजात चांगले शिकलेल्या मुलामुलींचे विवाह फारच उशीरा होतात. मुलामुलींचा लैंगिक कोंडमारा होतो. कित्येक मुले/मुली असे संबंध ठेवीत असतील. यात मुलाच्या बाजूला काहीच धोका नाही. पण मुलीला गर्भ राहिला तर कौटुंबिक आणि सामाजिक समस्या उद्भवते, हे वाईट आणि विषमतादर्शक असले तरी खरे आहे.
लवकर विवाह उरकणे हा यावर उपाय नाही, (नाही तर जुन्या काळी मोठी चळवळ उभारून कायदा करायला लावून बंद पाडले गेलेले बालविवाहच बरे होते असे म्हणावे लागेल) तर परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता असणे हा आहे.
22 Aug 2016 - 12:58 pm | राही
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी.
समागमसुख हे उच्च दर्जाचे सुख (मजा, आनंद काहीही म्हणा)आहे. ज्या काळात ते सर्वाधिक प्रमाणात हवेहवेसे वाटते, त्या काळात त्यापासून मुकावे लागू नये.
येथे टेनिसच्या जुन्या इतिहासातले एक उदाहरण अवांतर ठरू नये. पुष्कळ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कॅशने विंबल्डन स्पर्धा जिंकली. करंडक स्वीकारल्यानंतर मैदानात लगेचच घेतल्या जाणार्या मुलाखतीत नेहमीचा ठरीव प्रश्न 'तुला कसं वाटतंय विंबल्डन जिंकल्यावर' त्यालाही विचारण्यात आला. रांगड्या पीटने भर मैदानात तुडुंब स्टेडियमसमोर सांगितले 'I am thrilled. This is more thrilling than even sex'
केवळ अशा अद्वितीय कामगिरीतले यश हेच सेक्समधल्या आनंदापेक्षा अधिक आनंद देऊ शकते.
22 Aug 2016 - 2:12 pm | उडन खटोला
साधारण किती जणांमध्ये सेक्स केला तर चालेल?
कितीचा ग्रुप मान्य करावा असं आपलं मत आहे?
द्रौपदी स्टाईल एका स्त्रीचे चार पाच की एखाद्या नरपुंगवाप्रमाणे एका चे आठ दहा जणींशी की जोड्या जुळवा प्रमाणे इकडे चार तिकडे चार अशा कॉम्बिनेशन्स?
परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता कशी ठरवणार?
22 Aug 2016 - 2:40 pm | संदीप डांगे
वाह्यात प्रश्न
22 Aug 2016 - 2:49 pm | उडन खटोला
नाही. वाह्यात नाही
लैंगिक मुक्तता परस्पर संमतीने मान्य असेल तर अशा यात शक्यता लक्षात घ्यायला हव्यात ना?
अशा प्रकारच्या संबंधाने नंतर ज्या गोष्टी होतील त्याला कुणाला जबाबदार धरणार?
22 Aug 2016 - 2:39 pm | चंपाबाई
अगदी सहमत !
22 Aug 2016 - 7:08 pm | राजाभाउ
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी.
आता एकदा आपण लैंगिक मुक्तता मान्य केली आणि लग्न हे केवळ शरीर संबंधांसाठी नाही हेही मान्य केले तर मग असे परस्परसंमतीने मुक्त लैंगिक संबंध लग्नांनंतर ही चालू ठेवण चुकीच का ?
आता ते बेकायदेशीर आहे वगैरे मुद्दे असु शकतात, पण सध्या बेकायदेशीर हा मुद्दा जरा बाजुला ठेवला तर काय ?
22 Aug 2016 - 7:22 pm | मराठी कथालेखक
वैवाहिक जोडीदाराच्या संमतीने असायला हरकत नाही. पण स्त्रीस गर्भधारणा झाल्यास संतती कुणाची हा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून निदान स्त्रीला गर्भधारणा हवी असतानाच्या काळात तरी टाळायला हवं इतर काळात गर्भधारणा होणार नाही याची नीट काळजी घेवुन असायला हरकत नाही.
पण यातला दुसरा भावनिक मुद्दाही लक्षात घ्यायला हवा की अशा प्रकारच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैवाहिक जोडिदाराबद्दलच प्रेम , आपुलकी वगैरे न वाटण्याचा धोका...
थोडक्यात विवाहबाह्य शरिरिक संबंध हरकत नाही पण सदर विवाहिताने त्याकडे फक्त 'शारिरीक संबंध' म्हणून बघणे आणि भावनिक्/मानसिकदृष्ट्या न गुंतणे इष्ट. मग त्या विवाहबाह्य जोडिदाराचाही तसाच दृष्टीकोन असणे गरजेचे आहे नाहीतर ताण होवू शकतो. म्हणून विवाहबाह्य शारिरिक संबंध हे फक्त अपवादात्मक परिस्थितीतच (वैवाहिक जीवनातील शारिरिक संबंध सुरळीत नसल्याने) निर्माण झालेत तर ठीक. उदा: पती-पत्नी दीर्घकाळ एकमेकांपासून दूर असणे , कुणा एकाचा पदीर्घ आजार, कुणा एकाची प्रणयेच्छा दीर्घकाळ अत्यंत कमी वा नष्ट होणे ई ई.
24 Aug 2016 - 4:10 am | नेत्रेश
> 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी.
त्यासाठी "लग्नाचे अमीश देउन बलात्कार"साराखे कित्येक (कालबाह्य?) फौजदारी कायदे बदलावे लागतील नाही का?
मला नाही वाटत की अद्याप बहुसंख्य भारतीयांच्या संरक्षणासाठी बनवलेले कायदे काही २ - ५ ट्क्के लोकांच्या सोयीसाठी बदलता येतील.
तस्मात असे संबंध जेल मध्ये जावे लागण्याच्या रीस्क वरच ठेवावे लागतील
22 Aug 2016 - 2:43 pm | संदीप डांगे
त्यामुळेच लग्न केव्हाही करा किंवा करू नका, पण सेक्स १६पासून पुढे लवकरात लवकर झाला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे, मुलगा असो वा मुलगी, अनेक समस्या उद्भवणार नाहीत
22 Aug 2016 - 5:20 pm | मराठी कथालेखक
+१
फक्त १६ ऐवजी १८ म्हणेन नाहीतर कायदेशीर गुंतागुंत वाढेल
22 Aug 2016 - 3:25 pm | मराठी कथालेखक
गर्भपाताचे काही दीर्घकालीन परिणाम त्या स्त्रीच्या शरीरावर होवू शकतात असे मला वाटते म्हणून इतर मेडिकल हिस्टरी इतकेच महत्व मी गर्भपाताला दिले आहे. अर्थात मला वैद्यकीय ज्ञान नाही , डॉक्टर याबाबत अधिक काही सांगतील तर बरं होईल.
बाकी 'लैंगिक मुक्तता' याबद्दल तत्वतः सहमत ...ज्या वयात शरीरसुखाची फार जास्त गरज वाटते ते वय..खरेतर कित्येक वर्षे (१६ ते २५ म्हंटले तरी ९ वर्षे होतातच) त्या सुखाशिवायच काढणे चुकिचे आहे यामुळे त्यानंतरही वैवाहिक जीवनावर दुष्परिणाम होवू शकतात.
पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद संमजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे ? व्याह्वारिकदृष्ट्या अनेक प्रश्न /क्लेष निर्माण होवू शकतात, ही परिपक्वता येण्यास काही काळ जावा लागेल.
22 Aug 2016 - 4:07 pm | उडन खटोला
गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले लोक करतात असं म्हणणं आहे काय?
लैंगिक मुक्तता हा पुरोगामित्वाचा भाग आहे काय?
आपल्या सुखासाठी एखाद्या जीवाचा जगण्याचा अधिकार त्याला न देणं हे समांजसपणाचं द्योतक आहे काय?
नेहमीप्रमाणे मखरात बसून दिलेले प्रतिसाद दिसत आहेत.
22 Aug 2016 - 4:49 pm | मराठी कथालेखक
माझ्या प्रतिसादात असं कुठे दिसलं ?
हे काय लॉजिक ?
शिवाय प्रतिसाद तुम्हाला नव्ह्ताच राहीं यांना होता.
प्रतिसाद समजला नाहि तर त्यावर उत्तर द्यायची घाई कशाला ?
22 Aug 2016 - 7:27 pm | उडन खटोला
तुमच्या कथे एवढे प्रतिसाद भरकटलेले नाहीत त्यामुळे ते समजलेत. लैंगिक मुक्तते बरोबर येणारे side effects स्विकारण्याची तयारी नसताना उगाच त्या तथाकथित मुक्ततेचा स्वीकार परिपकवता आलेली नाही वगैरे कमेंट लोक करतात. म्हणजे तसं केल्यानंतर जे होईल त्याला परिपक्वता म्हणायचं असाच अर्थ होतो की.
साधा प्रश्न आहे लैंगिक मुक्तता कशी स्वीकारणार नि त्याच्या मर्यादा कशा ठरवणार?
मखरातला प्रतिसाद राही मॅडम नि तुम्ही (आणखी काही लोकांसारखे) दोघेही देता असं स्पष्ट नि थेट मत आहे. बाकी चालू द्या.
22 Aug 2016 - 7:40 pm | मराठी कथालेखक
ज्या कथेचं त्या त्या धाग्यावर बोला..
बाकी "मखरातला प्रतिसाद" ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला माहित नाही. सांगितलेत तर बरे होईल आणि नसेल सांगता येत तर तसं सांगा
22 Aug 2016 - 7:43 pm | उडन खटोला
मखरात बसून दिलेले प्रतिसाद म्हणजे ग्राउंड रिअलिटी माहिती नसताना उगाच उंचावर बसून दिलेले प्रतिसाद.
22 Aug 2016 - 11:34 pm | चंपाबाई
इंग्रजीत आयव्हरी टॉवर सींड्रोम म्हणतात
23 Aug 2016 - 12:55 pm | मराठी कथालेखक
असं....मला कोणती ग्राउंड रिअॅलिटी माहित नाही असं तुम्हाला वाटतं ? उदाहरण द्या . उगाच नसती खुसपटं काढण्यापेक्षा तर्क मांडा..
22 Aug 2016 - 5:23 pm | राही
'पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद समंजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे'
सहमतच. पण अशा केसेस ही त्या दिशेने वाटचाल आहे.
मूळ धाग्यातल्या आशयावर टीप : नको असलेला गर्भ राहिल्यावर बरेच दिवस ढिम्म राहाणे हा मूर्खपणाच. जर गर्भ राहिला नसता आणि वाढला नसता तर पुढची सगळी परिस्थिती उद्भवली नसती. मग कुणालाच अपराधगंड आला नसता.
22 Aug 2016 - 12:49 pm | चिनार
अश्या परिस्थितीत मी काय करेल ह्याविषयी थोडंसं...
1. मी जर खरे साहेबांच्या मित्राच्या जागी असतो, तर 'तुका म्हणे उगी राहावे ,जे जे होईल ते ते पाहावे' अशी भूमिका घेईल. भविष्यात जर मित्राला किंवा त्याच्या मुलाला या सगळ्या प्रकाराविषयी कळले तर " तुमच्या संसारात मला खोडा घालायचा नव्हता म्हणून मी शांत राहिलो" असे उत्तर देईल. आत्ता सुरु असलेला संसार मोडण्यापेक्षा नंतर संबन्ध बिघडलेले चालतील. ह्याचं कारण असं की त्या दोघा नवरा बायको मधील नातं कसं आहे ह्याची मला सुतराम कल्पना नाही. कदाचित तिने त्याला सगळं सांगितले असेल किंवा नसलेही. उद्या त्याला कळल्यावर त्याने निर्णय घ्यावा. शरीरसंबंधातून तिला काही STD झाले नसतील असं गृहीत धरून सांगतो की तिला स्वीकारायचे की नाही हा तात्विक प्रश्न आहे. ह्याविषयी प्रत्येकाचे तत्व/विचार वेगळे असू शकतात. कोण बरोबर कीं चूक ते परमेश्वर ठरवेल. थोडंसं अवांतर होईल पण तरी सांगतो, लग्न आणि हनिमून झाल्यावर ,एक मुलगी तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबरोबर पळून गेलेली मी पाहिली आहे. काही दिवसांनी (साधारण 3-4 महिन्यांनी) ती नवऱ्याकडे परत आली आणि त्याने तिचा स्वीकार केला !!! कारण एकच..त्याचे तिच्यावर मनापासून प्रेम होते..!!
खरे साहेब, तुमच्या मित्राला मानसिक दृष्ट्या ह्यातून बाहेर पडायला सांगा. एवढेच करणे त्यांच्या हातात आहे.
2. लग्नाआधी शरीरसंबंध असलेला/असलेली मुलगा /मुलगी मी जावई/सून म्हणून स्वीकारेल का ?
सद्य स्थितीत मला एक मुलगी आहे.
मुलाचे लग्नाआधी संबंध असल्याचे मला लग्नाधीच कळल्यास मी ते लग्न न होऊ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. लग्नाआधी शरीरसंबंध हे माझ्या तत्वात बसत नाहीत. पण हे कारण त्या मुलाला मी स्पष्ट सांगेल आणि त्याची बदनामी माझ्याकडून तरी होऊ देणार नाही.
लग्नानंतर जर मला असे काही कळले तर त्यांच्या संसाराचा एकंदरीत रागरंग बघून मध्यस्थी करेल. कोणत्याही परिस्थितीत लग्न मोडणे हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय असेल. माझ्या मुलीला या गोष्टीची कल्पना आल्यास तिचा जो काही निर्णय असेल तो मी स्वीकारेल आणि तिला पाठिंबा देईल.
माझ्या मुलीने लग्नाआधी शरीरसंबंध ठेऊ नये यासाठी मी तिला तशी शिकवण जरूर देईल. पण याउपरही तसे काही झाल्यास आणि मुलीला त्याच व्यक्तशी लग्न करायचे असल्यास, मी त्या मुलाची पूर्ण चौकशी करून लग्नाला परवानगी देईल. त्या मुलाचे इतरही बऱ्याच मुलींशी संबंध आहेत असे कळल्यावर मी मुलीची योग्य प्रकारे समजूत काढून हे लग्न होउ देणार नाही. आता ह्या केसमध्ये माझ्या मुलीचे मी दुसऱ्या कोणासोबत लग्न लावून देईल का हा महत्वाचा प्रश्न आहे...पोरीचा बाप म्हणून माझी भूमिका त्यावेळी काय असेल हे मी आत्तातरी सांगू शकत नाही...
पण कुठल्याही परिस्थितीत आदळआपट,भांडणतंटे, मारामारी,फसवाफसवी होणार नाही असा प्रयत्न करेल.
मुळात अनुभवांती माझे असे मत झाले की...कोणाच्याही आयुष्यात आपण एका प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करू शकत नाही आणि करू सुद्धा नाही...
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !!!
22 Aug 2016 - 4:04 pm | गामा पैलवान
राही,
पहिली गोष्ट म्हणजे, जर मुक्त लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर मग लग्न करायचंच कशाला?
दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी परस्परसंमत हा शब्द वापरला असला तरी या प्रकारात स्त्री पुरुषाकडून पार नागवली जाणार आहे. विवाहासारख्या संस्काराच्या बाबतीत बाजार भरतो, तर परस्परसंमतीचा काय थोर सत्संगमेळा भरणारे का? शेवटी पैसे देऊनच व्यवहार होणार आहे आणि त्यास लग्नाचं बंधन नाही. थोडक्यात काय परस्परसंमती = गणिकाहाट . वेश्येची काय हालत होते माहितीये ना !
आ.न.,
-गा.पै.
22 Aug 2016 - 5:08 pm | संदीप डांगे
वेगळा धागा काढायची वेळ आली!
22 Aug 2016 - 5:18 pm | मराठी कथालेखक
सहमत
हा नक्कीच महत्वाचा / संवेदनशील विषय आहे...(माझ्या सारख्या विनापत्यांना नाही पण )निदान पालाकांसाठी तरी ..पालकांना आपला/ली वयात आलेली मुलगा/मुलगी एखाद्या भिन्नलिंगी मित्राशी संबंध ठेवू इच्छित असेल तर त्याबद्दल आपली भूमिका आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण तयार ठेवावे लागेल.. "मी म्हंटला ना एकदा नाही, मग वाद घालायचा नाही..तंगडं तोडून हातात देईन" वगैरे शैलीत हा प्रश्न हाताळता येणार नाही..तुमचे विचार काहिही असले तरी प्रश्न खूप संयमाने हाताळावा लागेल.
याकरिता वेगळा धागा काढाच.
22 Aug 2016 - 5:11 pm | राही
लग्न केवळ शरीरसंबंधासाठीच करायचे हे मत आता मागे पडते आहे. आयुष्यात बर्यापैकी स्थैर्य आल्यावर, मुलांचे व्यवस्थित संगोपन करता येईल, राहाण्याची सोय मनाजोगती होईल अशी खात्री वाटल्यावर आजकाल मुले लग्न करतात. निदान मुंबईत आणि मराठी उच्चशिक्षित कुटुंबांत आज ही स्थिती आहे. सर्व समाजात आणि सर्व भारतात नाही हे मान्यच. पण त्या दिशेने वाटचाल आहे हे नक्की. ह्याला माणसाच्या (सुखाविषयीच्या) वाढलेल्या अपेक्षा, व्यक्तिस्वातंत्र्याचे नवीनच उमजलेले मोल आणि त्यामुळे एकत्र कुटुंबात आणि लहान जागेत राहाण्याची तयारी नसणे असे अनेक पैलू आहेत. शेतीवरचे अवलंबित्व कमी होणे किंवा कष्टाची शेती नकोशी वाटणे, पांढरपेशे व्यवसाय/नोकर्या वाढणे, शहरीकरण होणे, मूळ घरापासून दूर नोकर्या असणे, दिवसाचा मोठा वेळ त्यासाठीच्या प्रवासात जाणे असे अनेक नवे प्रश्न आहेत जे लग्नाचा विचार पुढे ढकलतात.
पुरुषाशी स्वखुशीने लग्नपूर्व संबंध ठेवणार्या स्त्रियांना गणिका म्हणणे ही हीन आणि पुरुषी मनोवृत्ती आहे. अनेक पुरुषही ही नैसर्गिक ऊर्मी विझवता न आल्यामुळे असे संबंध ठेवतात.
आपण जिथे राहाता त्या देशात आणि अनेक पाश्चिमात्य देशात हे समाजमान्य आहे. लिव इन तर आता कायदेशीरही आहे.
22 Aug 2016 - 5:14 pm | राही
किंबहुना गणिकेला तुच्छ समजणे ही हीन मनोवृत्ती आहे.
22 Aug 2016 - 6:17 pm | गामा पैलवान
राही,
मुळातून गणिकेस तुच्छ मानावेच कशाला? परस्परसंमतीने सगळा व्यवहार होतोय ना? मग तिला तुच्छ मानण्यात काय अर्थ? पुरूषांना फार आवडतील अशा गणिका.
समस्या लक्षात येतेय का? पुरुषी वर्चस्ववाद ही समस्या नाहीये. परस्परसंमतीने लैंगिक संबंध ठेवणारी स्त्री गणिकाधर्माचं पालन करतच असते. पुढे जेव्हा ती कुणाचीतरी पत्नी होते, तेव्हा तिला पत्नीधर्माचं पालन करावं लागतं. तर गणिकाधर्म आणि पत्नीधर्म आपापल्या ठिकाणी शोभून दिसंत असले तरी ती पार वेगळी दोन टोकं आहेत. एकीचं लग्न नवऱ्याशी झालंय तर एकीचं स्वत:शीच झालंय. एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जातांना स्त्रीची प्रचंड भावनिक ओढाताण होईल. तिचा आत्मसन्मान कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडेल. ही समस्या आहे.
आ.न.,
-गा.पै.
22 Aug 2016 - 6:40 pm | राही
आनगापै., लग्नबंधनात असेपर्यंत दोघांही जोडीदारांनी एकमेकांशी निष्ठा ठेवणे नैतिक आणि कायदेशीर आहे. पण लग्नबंधन काही कारणांनी तुटले, किंवा घडलेच नाही, किंवा फार उशीरा घडले तर स्त्री-पुरुष दोघांनीही त्या त्या काळात (कधी कधी अख्ख्या आयुष्यात) शरीरसुखापासून वंचित राहावे असे म्हणणे हे क्रूरपणाचे आहे.
ब्रह्मचर्य हेच जीवन, .... हे मरण' ही एकेकाळची आणि यथेच्छ टर उडवली गेलेली कल्पना तर आपल्या प्रतिसादांतून डोकावत नाहीय ना?
22 Aug 2016 - 11:51 pm | गामा पैलवान
राही,
मग शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करणं क्रूर नाही काय? गर्भारपण कुठे थांबायला/थांबवायला हवं हे रूपालीला कळंत नव्हतं का? का थांबायची/थांबवायची इच्छाच नव्हती? मग पोर पाडलंच कशाला?
आ.न.,
-गा.पै.
22 Aug 2016 - 11:54 pm | संदीप डांगे
आप महान हो _/\_
23 Aug 2016 - 12:00 am | गामा पैलवान
राही, रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. माझ्याकडून चुकीने हे तथ्य निसटलं. मात्र मूळ मुद्दा तसाच आहे. आपल्या शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करावी का!
आ.न.,
-गा.पै.
23 Aug 2016 - 12:13 am | अभ्या..
अवघड आहे राव गापै.
23 Aug 2016 - 12:21 am | संदीप डांगे
लै गोल गोल फिरताय राव तुम्ही. "आपल्या जिभेचे चोचले पुरवायला कोण्या जीवाची हत्या करावी काय" असा प्रश्न जणू विचारत आहात.
पिरांनी योग्य उत्तर दिलंय. कोणी संभोगसुख घेत असेल तर इतर कोणालाही नक्की काय समस्या आहे? त्यांचं प्रोटेक्शन वाया गेलं असेल, गोळ्या काम करु शकलेल्या नसतील. व्हाटेव्हर. पण सगळे अगदी ह्याच मुद्द्यावर का उभे राहून जोर देतायत की "तीने मजा मारली असावी" जस्ट डॉक्टरांच्या मित्राने डॉक सांगितले की तिचे अमूक एक विचार होते म्हणून?
23 Aug 2016 - 7:46 am | आजानुकर्ण
पैलवान,
न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी करतात?
23 Aug 2016 - 7:53 am | राजेश घासकडवी
तुम्ही कधी एखादा कंडोम फेकून दिलेला नाहीये का? त्यात लाखो न जन्मलेले जीव मेलेले असतात.
23 Aug 2016 - 7:59 am | आजानुकर्ण
हा हा. अर्थात तो वापरलेला कंडोम असेल तरच त्यात न जन्मलेले जीव असण्याची शक्यता आहे ना!
(दादा कोंडकेंच्या ओळी आठवल्या
चार आण्याचे तीन आणले काय गं तुम्ही केले,
मला वाटलं सख्या ते फुगंच हाय मी पोरांना दिले.
आता यात न जन्मलेले जीव असण्याची शक्यता बरीच कमी आहे असे वाटते)
(दादा कोंडकेप्रेमी) आजानुकर्ण
23 Aug 2016 - 8:37 am | उडन खटोला
न जन्मलेला जीवाची म्हणजे गर्भाची हत्या ही हत्या नसते काय?
गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भ आणि आईचा जीव वेगवेगळा नसतो काय? किती ती संवेदनाहीनता....
काही बायका वर 'चुकून' गर्भधारणा किंवा 'चुकून' सेक्स वगैरे म्हणत आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.
23 Aug 2016 - 9:43 am | सुबोध खरे
मी वर लिहिलेले आहे त्याप्रमाणे
महिन्यातील एक दिवसच ( फार तर दोन दिवसच) गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याचा अर्थ काय कि एकदाच संबंध आला आणि गर्भार राहिली हि शक्यता ३० दिवसांपैकी १ दिवस म्हणजे ३. ३३ % इतकी कमी आहे. म्हणजेच एखादी मुलगी गरोदर राहिली तर तिचे एकदाच "भावनेच्या भरात" संबंध आला हि शक्यता ३% आहे आणि ९७ % शक्यता तीचा बऱ्याच वेळेस शरीर संबंध आला आहे असा आहे. हीच गोष्ट एखाद्या पुरुषाला अर्थातच लागू आहे.
म्हणजे "ती वेळच तशी होती" one night stand नाही.बरेच स्टँड्स झालेले असतात
यात "चुकून सेक्स" एक वेळ मान्य करता येईल
परंतु "चुकून गरोदरपण" याची ३% शक्यता आहे.
23 Aug 2016 - 9:51 am | उडन खटोला
आदर नि कौतुक ९७% अधिक टॅक्सेस एवढं वाढलं.
23 Aug 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी
माझ्या मते ही हत्याच आहे. विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्या नसताना, गर्भधारणा होईल हे माहीत असताना सुद्धा आणि आपल्याला गर्भ नको आहे हेही मनाशी ठरविलेले असताना सुद्धा स्वखुशीने असुरक्षित शरीरसंबंध ठेवून गर्भधारणा होऊन दिल्यावर गर्भपात करणे हे माझ्या दृष्टीने हत्या केल्यासारखंच आहे.
जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.
सहमत. या विशिष्ट मुलीच्या बाबतीत गर्भपाताचे समर्थन करणार्यांचे मलाही कौतुक वाटते.
23 Aug 2016 - 5:53 pm | अनिरुद्ध.वैद्य
पूर्ण आदर, पण कायद्याच्या हिशोबात आपल्या मतास कायेक किंमत नाहीये.
23 Aug 2016 - 5:57 pm | मार्मिक गोडसे
नक्की का?
कारण वरच्या प्रतिसादात ठरावीक परिस्थितीत तुम्ही गर्भपाताला मान्यता देताय. उदा:
अशा परिस्थीतीत गर्भाचा काय दोष असतो ते सांगाल का?
23 Aug 2016 - 6:17 pm | पिलीयन रायडर
मी हेच केव्हाचं विचारतेय की ह्या केसेस मध्ये अचानक गर्भपात योग्य कसा होतो? बाळ बलात्कारातुन झालं म्हणुन त्याला मारता येतं???????
23 Aug 2016 - 6:33 pm | संदीप डांगे
अचूक पकडलंय पिरातै!!
23 Aug 2016 - 6:43 pm | उडन खटोला
अचानक?
तुम्हाला सगळ्या भूमिका एक सारख्याच वाटत आहेत?
23 Aug 2016 - 7:56 pm | पिलीयन रायडर
परिस्थिती वेगवेगळी असली, भुमिका वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी "हत्या" होतेच आहे ना?
तुम्हाला कुणालाही त्या मुलीची "फर्स्ट हॅण्ड" माहिती नाही. पण तरीही तिची "भुमिका" काय हे तुम्ही ठरवुन टाकलेलं आहे आणि तिने काय करावं हे ही. तिने तो निर्णय का घेतला हा खरं तर सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे. मुल न होऊ देण्यामागे अनेक कारणं असु शकतात. अगदी लग्नानंतर सुद्धा कुणी हा निर्णय घेऊ शकतं. कदाचित कुणाला कधी आई व्हायचंच नसेल. कदाचित एकटीने आई होण्याची तयारी नसेल (आपल्या समजात ते सोपंसुद्धा नाही), कदाचित बाळाच्या बापासोबत लग्न तडजोड म्हणुनही करायचं नसेल.. पण अर्थातच ह्यातलं एकही कारण तुम्हाला "योग्य" वाटणार नाही.
मात्र हिच गर्भधारणा जेव्हा बलातकारातुन होते तेव्हा मात्र तो जीव मारला तर ते चालतं. जर "जीवाला जगवणे, जन्म देणे" ही गोष्ट रुपालीच्या केस मध्ये तुम्हाला इतकी महत्वाची वाटते की खरं तर ससपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही हे ठाऊक असुनही आणि महत्वाचे म्हणजे तिचीच आई होण्याची इच्छा नसतानाही तिने बाळाला जन्म द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं. पण तोच जीव बलात्कारिता असेल तर मात्र तितका महत्वाचा ठरत नाही. असं कसं?
शिवाय ह्या बाळाला जन्म देताना आईची मानसिक तयारी नाही, आई वडीलांमध्ये प्रेम नाही, पण तडजोड म्हणुन लग्न होत आहे, किंवा कदाचित लग्न होणारही नाही आणि मुलगी एकटीच बाळ वाढवेल, आई-वडील-समाज अर्थातच हे सगळं आनंदाने मान्य करणार नाही, ही परिस्थिती तर कुणीच लक्षात घेत नाहीये. त्याचे बाळावर परिणाम होणार नाहीत का? अशा घरात बाळाला जन्म द्यावा का?
मला जन्म देण्यापेक्षाही वाढवणं फार मोठी गोष्ट वाटते. त्यामुळे गर्भ रहाणं ही एकच गोष्ट जीवाला जन्म देताना पुरेशी नसते हेच माझं ठाम मत आहे. आणि ह्याच कारणासाठी बलात्कारातुन झालेली गर्भधारणा, अपंग / मतिमंद गर्भ पाडल्या जातो ते तुम्हालाही योग्य वाटत आहे.
23 Aug 2016 - 8:37 pm | उडन खटोला
अहो त्या अनेक केसेस मध्ये होणारे परिणाम मान्य आहेतच की. डॉक्टरांनी सांगितलेल्या स्पेसिफिक किश्श्यात तशी स्थिती नाही हे त्यांनी स्पष्ट लिहिलंय म्हणूनच त्याचा राग आहे.
वैयक्तिक मतानुसार जसा जीव जन्माला येईल तसा तो घालावा. ते त्या त्या जीवाचं आणि त्या बरोबर त्या पालकांचं प्राक्तन असतं.
23 Aug 2016 - 8:52 pm | संदीप डांगे
ह्यालाच मोरल पोलिसींग म्हणतात!
24 Aug 2016 - 11:47 am | अनिरुद्ध.वैद्य
आपण डॉक्टरकडे जाणे सोडु, सगळ्या गोळ्या ज्या काही गोळ्या वगैरे घेत होतो, ते सगळं सोडुन देउ अन जीवन प्रांक्त्नावर सोडुन देऊ असं म्ह्ण्ट्लं तर काय वाटेल?
24 Aug 2016 - 12:08 pm | उडन खटोला
प्रयत्न करायचे नाहीत असं मी कुठं लिहिलं आहे? काही लोक जीव जन्माला घालायच्याच विरोधात आहेत.
23 Aug 2016 - 11:52 pm | श्रीगुरुजी
बरोबर आहे आणि तिने तो निर्णय तिने आधी घेतलेलाचा आहे. हा धागा काढला नसता तर हा काथ्याकूट झालाच नसता. एकदा धागा निघाल्यावर वेगवेगळी मते येणारच.
मूल होऊन द्यायचंच नव्हतं तर गर्भधारणाच होऊन द्यायची नव्हती.
बलात्कारातून झालेली गर्भधारणा ही मनातून इच्छा नसताना लादलेली गर्भधारणा आहे. या मुलीच्या बाबतीत गर्भधारणा लादलेली नव्हती. स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवून ही गर्भधारणा झालेली आहे.
हे सगळं माहिती होतं तर गर्भधारणा मुळातच टाळायला हवी होती.
23 Aug 2016 - 6:48 pm | सुबोध खरे
हा एक गहन विषय आहे आणि मी इतकी वर्षे बरयाच डॉक्टरांशी बोललो आहे त्यांना पण नक्की याचे उत्तर देता येत नाही.
पलायन म्हणा किंवा आपली सद्सद्विवेकबुद्धी म्हणा. बहुसंख्य डॉक्टर लग्नानंतर शक्यतो गर्भपात करू नका असाच सल्ला देताना आढळतात. गर्भपातानंतर परत मूल न होण्याची शक्यता १ % पेक्षा कमी असते हे गृहीत धरले तरी कदाचित तयार झालेला गर्भ नष्ट करणे हे बहुसंख्य डॉक्टरना पटत नाही. मूळ जीव केंव्हा असतो हे हि सान्गणे कठीण आहे. मुलाचे हृदय पाळी चुकण्याचा ४० ते ४२ व्या दिवशी दिसू लागते. तेंव्हा पासून ते २८ आठवडे पर्यंत गर्भाची वाढ होत असते परंतु या कालावधीत जर गर्भ बाहेर काढला तरबहुसंख्य वेळेस तो स्वतः हुन श्वसन करू शकत नाही म्हणून तो जिवंत आहे (live) पण स्वतंत्रपणे वाढ होऊ शकेल (viable) असा नाही. २८ आठवड्यानंतर मात्र बाळ स्वतंत्रपणे वाढ होऊ शकेल (viable) असे असते त्यामुळे त्यानंतर त्याला गर्भपात म्हणत नाहीत.
लग्नापूर्वीच्या गर्भधारणे बाबत डॉक्टर कायद्याचा आधार घेताना दिसतात. म्हणजे २० आठवड्या पर्यंत गर्भपात कायदेशीर आहे. ( आता हीच कालमर्यादा २४ आठवड्यापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत कारण काही जन्मजात व्यंगे २४ आठवड्यपर्यंत दिसत नाहीत.)
गर्भारपण चालू ठेवल्यामुळे मातेच्या जीवाला धोका असेल अथवा तिच्या मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्याला गंभीर धोका पोहोचेल किंवा बलात्कारातून गर्भ राहिला असेल तर अशा परीस्थितीत कायदा २० आठवड्यपर्यंत गर्भपाताची परवानगी देतो.
नैतिकतेचा प्रश्न हा समाजाने सोडवायचा आहे. हा प्रश्न डॉक्टरांचा नाही.
23 Aug 2016 - 7:37 pm | पिलीयन रायडर
डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न विचारलाच नाहीये. कारण तुम्ही फक्त त्या गेलेल्या जीवाबद्दल दु:ख व्यक्त केलंय. त्या मुलीने त्या बाळाची हत्या केली असं म्हणलेलं नाही. कारण तसं कायदाही म्हणत नाही.
23 Aug 2016 - 7:47 pm | उडन खटोला
कायदा सोयिस्कर वागतो. त्यात अनेक वेगवेगळ्या शक्यता असतात. मी त्याबद्दल सांगत नाहीये.
४ महिन्याचा गर्भ पाडायला काही वाटत नाही कारण त्याबद्दल 'तितकं' ममत्व नसतं. २ महिने/वर्षाच्या अपत्याबद्दल जीव तुटतो कारण त्याच्याबद्दल ममत्व निर्माण झालेलं असतं. त्याचा जीव वाचण्यासाठी आपण जीवाचं रान करतो.
23 Aug 2016 - 8:02 pm | पिलीयन रायडर
जी बाळं जन्माला येतात ती (बहुतांशी) तरी हवीच असतात पालकांना. इथे विषय नको असलेल्या बाळांचा आहे.
आणि जी नको असलेली बाळं जन्माला येतात ती कचर्यात किंवा अनाथाश्रमात सापडतात. त्यांचे पालक त्यांच्यासाठी जीवाचे रान करत नाहीत. ते त्यांना फेकुन देतात. किंवा त्यांना नीट वाढवत नाहीत. (आई वडीलांनी लहान मुलांचे अक्षरशः हाल केले अशा किती बातम्या देऊ सांगा..)
तेव्हा बहुतांश पालक मुलांसाठी जीवाचे रान करतात म्हणुन "सगळेच" करत नसतात. कायदा ह्याच "शक्यतांचा" विचार करत असतो.
23 Aug 2016 - 8:39 pm | उडन खटोला
अर्धसत्य. कायद्याला जशा गोष्टी दाखवल्या जातात तशा त्या दिसत असाव्यात.
23 Aug 2016 - 9:21 pm | पिलीयन रायडर
??
राहु द्या...