मला बाबा व्हायचं नाही!

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
20 Aug 2016 - 8:08 pm
गाभा: 

मुलाचे वडील तो दहावीत असतांना एका अपघातात गेलेले. आई मुंबईत सरकारी खात्यात नोकरीला. एकटीने वाढवले, मुलाला इंजिनीअर केले. एकुलता एक मुलगा प्रेमविवाहासाठी हट्ट धरुन बसला ते आढेवेढे घेत करुन दिले. मुलगी त्याच्याच वर्गातली समवयस्क. दोघांच्याही वयाच्या २४ व्या वर्षी हे लग्न झाले.

लग्नाला आठ वर्ष होऊन गेलीत. अजून गुड न्यूज नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाचा आजार असल्याचे ऐकिवात आले. हे कुटूंब म्हणजे खरं तर मुलाची आई आपल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाही, गुप्तता राखते. (त्याचवेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालायला चवीचवीने पुढाकार घेते) त्यामुळे खरे काय ते काही कळत नव्हते. तसे आमच्या सर्व नातेवाईकांत बर्‍यापैकी मोकळेपणा, समजूतदारपणा असल्याने "बाप्रे, अजून पाळणा हलला नाही?" वाले कुत्सित टोमणे असे काही नाही. सर्व लोक नैसर्गिक उत्सुक असतात तेवढेच. सुरुवातीला वय कमी असल्याने असेल प्लानिंग म्हणून कोणी लक्ष दिले नाही. नंतर मुलाचे वय कमी असले तरी मुलीचे वय वाढत आहे ह्याने चिंता वाटायला लागली. पाच सहा वर्षे झाल्यानंतर मात्र कुतूहल वाढायला लागले. त्यात आम्हा लोकांत इतर सर्व बाबींबद्दल नियमित मोकळ्या चर्चा होतांना नेमकं ह्या जोडप्याच्या मूल प्रकरणाबद्दल काही विचारावे अशी परिस्थिती नव्हती. काही मदत (वैद्यकिय, सल्लामसलत, निव्वळ मनमोकळं करण्यासाठीही) लागल्यास करावी असे वाटूनही उपयोग नव्हता. कारण ह्याबाबतीत आपण काही विचारले तर त्यांच्या मनाला त्रास होईल म्हणून कोणीही हा विषय त्यांच्याकडे काढत नव्हते.

अचानक आता एवढ्यात कळले की मुलाला 'वडील व्हायची इच्छाच नाही' म्हणून. ह्याबद्दल तो साय्कॅट्रीस्टकडे जातो आहे. आम्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला. एखाद्याला वडील व्हायची का इच्छा नसावी हे काही कोणास झेपले नाही. त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे. हे काहीतरी अनाकलनीय आहे असे वाटले. थोडं आणखी विचार करता लक्षात आले की ह्याचे मूळ त्याच्या आईच्या वागण्यात आहे का असा प्रश्न आला. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात, मिरवण्याच्या नादात "मी एकटीने किती खस्ता खावू मुलाला मोठे केले" हे ती सतत प्रसारित करत होती. त्याचा मुलाच्या मनावर भयंकर परिणाम झाला असे वाटते. जेणेकरुन 'मुले वाढवणे' म्हणजे फार कठिण, दुष्कर गोष्ट आहे असे त्याच्या सुप्त मनाने धरुन ठेवले असावे. दुसरी गोष्ट अशी की आईच्या अतिलाडाने, अतिलक्ष देण्याने, आयुष्य परिटघडीचे ठेवल्याने मुलाला आखीवरेखीव आयुष्याची सवय लागली आहे. त्यात त्याला मुलांमुळे येणारा अव्यवस्थितपणा, घडी बिघडण्याची भीती, आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांची उस्तरवार करायला लागण्याने स्वातंत्र्यावर येणारे बंधन ह्या सगळ्याचा त्याला धसका बसला असावा असे वाटते.

ह्या सर्वात अतिशय केविलवाणी स्थिती झाली आहे ती मुलीची. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. तिच्या आर्थोडॉक्स माहेराकडून काय ऐकून घेत असेल ते तिचे तिलाच माहिती. तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटत आहे.

दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण आयुष्य असा प्रश्न घेऊन उभं राहिल असे कुणालाही स्वप्नात वाटले नसेल.

मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर मिटक्या मारत ताशेरे ओढणे, उपदेश करणे, हा या धाग्याचा उद्देश नाही. एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

20 Aug 2016 - 8:24 pm | लालगरूड

:'(

वामन देशमुख's picture

20 Aug 2016 - 9:32 pm | वामन देशमुख

महत्त्वाचे मुद्दे:
१. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे.
२. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.

माझं मत:
त्या मुलीनं पुढाकार घेऊन, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन, आईंना या कामात सहभागी करून घेऊन त्या मुलाचे समुपदेशन करावे. मुद्दा क्र. २ लक्षात घेता, आपल्या नवऱ्याचं मन वळवणं ही बाब एखाद्या स्त्रीसाठी इतकीही अवघड नसावी. पुरुषाला एखाद्या गोष्टीसाठी राजी करण्याचे अनंत मार्ग स्त्रियांकडे असतात/ असू शकतात.

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 11:19 pm | बोका-ए-आझम

प्रश्न फक्त मूल जन्माला घालायचा नाहीये. त्याची पुढची जबाबदारी घ्यायचाही आहे. जर या माणसाला आपला निर्णय किंवा विचार बरोबरच आहे असं वाटतंय तर समुपदेशन यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे, कारण जर एखाद्याला आपल्याला समुपदेशनाची गरजच नाही असं वाटत असेल तर कितीही चांगला समुपदेशक असला तरीही तो काहीही करु शकणार नाही. शिवाय, मी आधी म्हटलंय तसं - मुलाला जेव्हा वडिलांची गरज असते तेव्हा या माणसाने ती जबाबदारी उचलायला नकार दिला तर? त्यावेळी समाजातले किंवा अजून पाळणा हलला नाही म्हणून कुत्सितपणे बोलणारे कोणीही येणार नाहीयेत.

की पुढील पिढीला त्या गोष्टीची दहशत बसावी....पण आता प्रत्यक्षात इतकी साधने उपलब्ध आहेत की दडपण जाणवत नाही.... मुळात ती गोष्ट स्वतः केल्यावरच कळतं की ते इतकं अवघड नाही....

ज्येष्ठांनी फक्त गरज असेल तिथेच मार्गदर्शन केल्यास हे प्रश्न उद्भवणार नाहीत...

त्या मुलाच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा आणि घरच्या लोकांनीही पाठिंबा देणे गरजेचं आहे....

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Aug 2016 - 9:53 pm | अनिरुद्ध.वैद्य

ह्यात मानसोपचार तज्ञच मदत करु शकतील.

रविकिरण फडके's picture

20 Aug 2016 - 10:09 pm | रविकिरण फडके

एखाद्याला जर बाप व्हायचे नसेल तर त्यात धक्कादायक काय आहे हे मला समजले नाही. जगात अनेक जोडपी असतात जी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात.
प्रश्न फक्त इतकाच की त्याने ही गोष्ट लग्नाआधीच बायकोला सांगितली की नाही? नसेल तर ती चूक. कारण सर्वमान्य प्रथा अशी की लग्न झाले म्हणजे एकतरी मूल असते.
पण म्हणून मूल नको असणे हे काही घोर वगैरे पातक नव्हे.

तर्राट जोकर's picture

20 Aug 2016 - 10:18 pm | तर्राट जोकर

फडके साहेब, कोणीही बाऊ करत नाही आहे किंवा पातकही समजत नाही. मूल नको असणे हे भारतीय समाजात प्रचलित नाही. म्हणजे 'नॉर्मल' नाही. प्रश्न 'जगा'चा नसून भारतातला आहे. मला तरी तुम्ही म्हणताय तशी अनेक जोडपी काय, एकही जोडपं संपर्कात बघितलेलं नाही. तसेच हा जोडप्याचा 'निर्णय' नसून मुलाच्या 'मानसिकते'चा आहे. त्याची विचारसरणी, जीवनशैली इत्यादी तशी चाकोरीबाहेरची नाही. हा 'निर्णय' नसून मानसशास्त्रीय भाषेत भीती आहे. फोबिया.

लग्नाआधी बायकोला सांगितले नाही याचे कारण कदाचित त्याला "आधीच" स्वतःला आपल्याला असे काही वाटते हे माहित नसेल. हा काही ठोस विचारांअंती घेतलेला निर्णय असता तर इथे टंकण्याचे कष्ट घेतले नसते हे नक्की.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

वामन देशमुख's picture

20 Aug 2016 - 10:27 pm | वामन देशमुख

प्रश्न आहे तो त्या मुलीच्या भावनांचा, तिला मूल हवे असेल तर ते तिला मिळायला हवे.
यात पातक, धक्कादायक असं म्हणणं गैरलागू आहे.

कंजूस's picture

20 Aug 2016 - 10:37 pm | कंजूस

ज्योतिष/कुंडलीत काय आहे?

कंजूस's picture

20 Aug 2016 - 10:37 pm | कंजूस

ज्योतिष/कुंडलीत काय आहे?

तर्राट जोकर's picture

20 Aug 2016 - 10:42 pm | तर्राट जोकर

ज्योतिषाने मानसोपचार तज्ञास दाखवायला सांगितले आहे.

उडन खटोला's picture

20 Aug 2016 - 11:17 pm | उडन खटोला

असंही कनेक्शन असतंय काय हल्ली??? ;)

बाकी माझा संसार हा माझ्या मुलाच्या लग्नापर्यंत/चार वर्षं पुढं एवढाच असायला हवा.
त्यानंतर रिले शर्यतीत देतात तसा बॅटन पुढच्याच्या हाती देऊन पुढची चार पावलं आपसुक ओव्हरलॅप होतात तसं करुन (मुलाच्या अपत्याचा पहिला वाढदिवस वगैरे) आनंदानं थांबावं.
पुढचा जिंकला ठीक, नाही जिंकला तरी ठीक.

सामान्य वाचक's picture

22 Aug 2016 - 9:35 am | सामान्य वाचक

लैच टाळ्या

स्वतन्त्र's picture

23 Nov 2016 - 8:57 am | स्वतन्त्र

लैच लैच टाळ्या

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 10:45 pm | बोका-ए-आझम

जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही काॅलेजमध्ये माझ्या वर्गात होते. तेव्हाच त्यांचं जमलं आणि नंतर त्यांनी लग्न केलं. Medically त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांनी हा निर्णय का घेतला हे मला माहित नाही आणि मी विचारलेलंही नाही, विचारणारही नाही. त्यांनी दोन मुलं - एक मुलगी आणि मुलगा दत्तक घेतलेले आहेत. हे आम्हाला - आमच्या सगळ्या मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना माहीत आहे. आम्ही अर्थातच हे कुणालाही सांगत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 10:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

ही केस वायली ती केस वायली बोक्याभाऊ!

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 11:12 pm | बोका-ए-आझम

मानवी सहजप्रवृत्तीच्या विरोधात आहे. ते साम्य दिसलं. शिवाय त्यांनी जो निर्णय घेतला तो परस्पर सामंजस्याने घेतलेला आहे. त्यांना तो घेताना त्रासही झाला असणारच. तरीही ते त्यावर ठाम राहिले. हे सर्वात महत्वाचं. इथे या केसमध्ये मानवी सहजप्रवृत्तीविरुद्ध जाण्याचाच तर मुद्दा आहे. त्यामुळे बरेचसे मुद्दे वेगळे असले तरी मी हे उदाहरण दिलं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 8:09 am | कैलासवासी सोन्याबापु

तजोंच्या केस मध्ये "परस्पर सामंजस्य" सपशेल गैरहजर आहे, ज्यामुळे ती केस वेगळी होते, तुम्ही म्हणताय तसा एक पार्टनर हा अनैसर्गिक चॉईस जरी स्वतःहून घेतोय तर दुसरा पार्टनर (ती मुलगी) फरफटली जाते आहे, तिला इच्छा नाहीये हा अनैसर्गिक निर्णय घ्यायची, बरं बोल तिलाच लागणार आहेत.

धडपड्या's picture

20 Aug 2016 - 11:53 pm | धडपड्या

माझ्याही पत्नीला वैद्यकीय त्रास आहे... तीला मूल होण्यात अडचणी आहेत.. मी तीला अनेक प्रकारे समजवायला प्रयत्न केला, मात्र तीला स्वतःचे मूल हवे आहे. आवड ही आहे, आणि दोन्ही घरचा वाढता दबावही आहे. मला मात्र ती या त्रासातून जावी, अशी अजिबात ईच्छा नाही. कारण आमच्या ओळखीतल्या एका जोडप्यांची केस पाहीली आहे. त्यांनी खूप प्रयन्त केले. शेवटी अती औषधोपचारामुळे, त्या वहीनींच्या किडण्या पूर्ण खराब झाल्यात.
हे आमच्या घरच्यांनाही माहित आहे. मात्र ते आपला हेका सोडायला तयार नाहीत.
मी मात्र दोन्हीकडून वाजवला जातोय. यावर काय मार्ग काढावा, हेच सुचत नाहीये.

तर्राट जोकर's picture

21 Aug 2016 - 12:18 am | तर्राट जोकर

तुमची समस्या येथे मांडल्याबद्दल खरंच मनापासून आभार. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांत यश लाभो व घरच्यांनी तुम्हाला समजून घेवो अशी प्रार्थना करतो. अशाच समस्येतून जाणारी दुसरी एक जवळची व्यक्ती माहित आहे. त्यांच्या धिरोदत्तपणाला मी खरंच सलाम करतो. अनेक नातेवाईकांच्या थेट, सूचक बोलण्यातून, उपाय सुचविण्यातून, जो मानसिक त्रास होतो तो विचित्र असतो. अशावेळेला संयम ठेवून, न चिडता प्रत्येकाला त्यास समजेल अशा योग्य व प्रेमळ भाषेत साधीसोपी उत्तरे देतांना पाहून माझा त्या व्यक्तिबद्दलचा आदर वाढत जातो.

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 12:35 am | सुबोध खरे

त जो साहेब
सविस्तर पणे सावकाश प्रतिसाद देतो.

तर्राट जोकर's picture

21 Aug 2016 - 12:45 am | तर्राट जोकर

धन्यवाद डॉक्टरसाहेब. आपले प्रतिसाद बहुमोल असतील याची खात्री आहे.

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 12:34 am | सुबोध खरे

धडपड्या साहेब
तुमच्या पत्नीला जर वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा करणे शक्य नसेल तर तिचे स्त्री बीज आणि आपले पुरुष बीज एकत्र करून त्यातुन तयार होणार गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपं करून वाढवून नऊ महिन्यांनी आपल्याला आपले स्वतःचे गुणसूत्रे असलेले बाळ मिळू शकते.
त्यांच्या बीजांडकोशात जर स्त्रीबीजे तयार होत नसतील( पण गर्भाशय व्यवस्थित असेल) तर त्यांना दुसऱ्या स्त्रीचे बीजांड आणि आपले शुक्राणू यातुन निर्माण होणार्या गर्भाचे त्याच्या गर्भाशयात रोपण करून त्यांना गरोदरपणाचा आणि मातृत्वाचा आनंद मिळवता येईल.
या दोन्ही गोष्टींना ८-१० लाख रुपये खर्च होतो आणि बहुसंख्य मोठ्या शहरात (मुंबई पुण्यात) अशा सुविधा उपलब्ध आहेत. .
अती औषधोपचारामुळे, त्या वहीनींच्या किडण्या पूर्ण खराब झाल्यात.या "औषधां"मुळे किडन्या खराब होण्याची शक्यता नाही. कारण हि औषधे तुमचे शरीरच तयार करणारी संप्रेरके आहेत. किडन्या खराब होण्याचे कारण दुसरे वाटते.
आपल्याला काही शंका असेल तर मला व्यनि करा किंवा ९८१९१७००४९ वर फोन करा.

किसन शिंदे's picture

21 Aug 2016 - 12:34 pm | किसन शिंदे

८ ते १० लाख खर्च?? बाब्बौ!!

सर्वसामान्य माणासांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे ही!

अ‍ॅडोप्शन हा पर्यायच नकोय का?
म्हणजे सर्वसामान्याच्या दृष्टीकोनातून म्हणतोय हं मी. एवढ्या पैशात त्याचे कीती चांगले संगोपन होईल.
स्वतःच्या रक्ताचाच पाहिजे हा हट्ट अशावेळी धरण्यात काय अर्थ आहे?

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 11:39 pm | सुबोध खरे

अभ्या सेठ
स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे.
बाकी सोडा हो दुसऱ्याच्या मुलाला सात आठ लाख रुपये देणगी किंवा खर्चासाठी किती . पण आपली सर्व संपत्ती आई बाप, मुलांच्या नावे मेल्यावरच नव्हे तर अर्धी संपत्ती जिवंतपणी सुद्धा सहज करून देतात.
ज्यांना मूल होतच नाही किंवा होत असताना सुद्धा विचारपूर्वक एखादे मूल दत्तक घेतात त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय सोपा नाहीच. साधे ज्या पुरुषांना शुक्राणू तयार न होणे हा रोग असतो( azoospermia) त्यांना सुद्धा दुसऱ्याच्या शुक्राणूंपासून( sperm donor) स्वतःच्या बायकोला मूल होऊ देणे फार अवघड जाते. शेवटी स्वतःचे मूल असावे हि एक आंतरिक उर्मी(instinct) असते. प्राणी जगतात तर नर यासाठी जीवाचे युद्ध करतात किंवा अगोदरच्या नराची अपत्ये मारूनही टाकतात.

स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे.

डॉक्टरसाहेब.. हे वाक्य काय पटले नाही. माझ्या मित्रमंडळींमध्ये बरेच जण आहेत ज्यांनी पहिले मूल झाल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेतले किंवा पहिलेच मूल दत्तक घेतले असे.

असे करणारे अनेक लोक असतील, माझे मित्र लै भारी; जगावेगळे असे माझे म्हणणे नाही. पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे.

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 12:54 am | सुबोध खरे

पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे.
मोदक राव
असे मुळीच नाही. आपण चुकीचा अर्थ लावलात.
उलट स्वतःचे मूल असताना दत्तक घेणे ( माझ्या हि एका मित्राने हे केले आहे)
किंवा
मूल होण्याची शक्यता असूनही दत्तक घेणे हे फारच उदात्त कार्य आहे कारण तुम्ही तुमच्या जीवशास्त्रीय मूलभूत प्रेरणेच्यावर (basic instinct )उठून अतिशय पवित्र असे कार्य करीत आहेत.
असेच दुसरे कार्य म्हणजे देशासाठी बलिदान करणे. कारण मृत्यू पासून दूर पाळणे हि आंतरिक प्रेरणा आहे त्यावर विजय मिळवून बलिदान देणे हे पवित्र कार्य आहे. तेंव्हा स्वतःचे मूल असताना दत्तक घेणे हे फारच थोर कार्य आहे. दुसऱ्याचे मूल स्वतःचे म्हणून वाढवणे त्याला प्रेम लावणे हि गोष्ट मुळीच सोपी नाही.
अशा लोकांना माझा नक्कीच मनापासून दंडवत आहे. माझ्या मित्राला मी हे बोलून हि दाखवले आहे.

मोदक's picture

22 Aug 2016 - 1:03 am | मोदक

धन्यवाद..!!

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2016 - 12:47 pm | अप्पा जोगळेकर

ज्यांना मुलेबाळे होत नाहीत त्यांच्यासाठी 'मुले दत्तक घेणे' हा एक चांगला पर्याय आहे आणि त्या जोडप्यांबद्दल साहानुभूति वाटते.
अन्यथा सक्षम असताना पहिलेच मूल दत्तक घेणे म्हणजे घरातले सुग्रास जेवणाचे ताट सोडून हॉटेलमधून जेवणाचे पार्सल मागवल्यासारखे वाटते. पण वैयक्तिक निर्णायाचे स्वातंत्र्य असतेच.
बाकी ते खरे काकांनी लिहिले ते देशासाठी बलिदान देणे आणि दत्तक विधान ही तुलना तर कैच्या कैच वाटली.
व्यक्तिश: 'जर अपत्य नाही तर लग्न नाही' असे मत.

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2016 - 11:35 pm | प्रभाकर पेठकर

सक्षम असताना पहिलेच मूल दत्तक घेणे म्हणजे घरातले सुग्रास जेवणाचे ताट सोडून हॉटेलमधून जेवणाचे पार्सल मागवल्यासारखे वाटते.

हे विधान अत्यंत चुकीचे आहे. आज अनाथाश्रमात अनेक मुले असतात. अनाथ, अर्थात आईवडीलांचे छत्र नसलेले अभागी असतात. त्यातील एखाद्याला आई-वडीलांचे छत्र मिळवून देणे हे एक थोर सामाजिक कार्य आहे. अनाथालयातील अभागी मुलांपैकी एकाचे भाग्य जरी आपल्याला उजळवता आले तरी उजळावे.

माझी दुसरे मुल दत्तक घेण्याची इच्छा होती. तसे मी घरात बोलून दाखविल्यावर आईकडून आक्षेप घेण्यात आला. तिचे म्हणणेही असेच होते तुम्ही दोघे सक्षम असताना दत्तक घेऊ नये. असो. तो काळ ३० वर्षांपूर्वीचा होता आणि आंतरजातिय विवाह करून, जो आईच्या मर्जी विरुद्धच होता, मी आईला क्लेश दिलेच होते त्यामुळे पुन्हा मुद्दामहून क्लेश द्यावे असे वाटले नाही आणि मी तो विचार मनाच्या मागे ढकलला. पण त्यामुळे कुणा एका अनाथाचे आयुष्य उजळून निघाले असते ते राहिलेच. इतकी भावनिक गुंतागुंत आणि गुंतणूक ह्या विषयात असताना आपली उपमा कांही मनाला रुचली नाही. असो. ज्याचे त्याचे मत.

अप्पा जोगळेकर's picture

25 Aug 2016 - 12:00 pm | अप्पा जोगळेकर

ओके. चुकीची उपमा वापरल्याबद्दल दिलगीर आहे.

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 1:02 pm | अभ्या..

डिअर डॉक,
फरक आहे हे कबूल पण वरच्या दोन गोष्टी वाचून मी तसे लिहिले. एका गोष्टीत ८-१० लाखापर्यंत खर्च येत आहे, दुसर्‍या ठिकाणी किडनीज फेल्युअर वगैरे लिहिलेय (अ‍ॅक्चुअली तसे होते का नाही मला माहीत नाही, फक्त फेटल शारिरिक त्रास हे कन्सीडर करुन) ह्या दोन्ही पर्यायापेक्षा अ‍ॅडोप्शन का नको असा प्रश्न पडला मला. बस्स.
बाकी वंशसातत्य, आपले रक्त हे विषय जितके विचार करावे तितके गहन.

धडपड्या's picture

22 Aug 2016 - 11:00 pm | धडपड्या

आपल्या सर्वांच्या आस्थेबद्दल धन्यवाद..
मी पण वंशसातत्य आणि आपले रक्त यातच रगडला जातोय.
दत्तकासाठी मी पण प्रयत्न केले. किंबहुना दोन मुलींना माझी स्पाॅन्सरशीपही चालू आहे, ज्यांना मी दत्तक घेऊ शकतो. मात्र यालाही विरोधच होतोय.

त्या वहिनींच्या किडण्या खराब होणे सत्य आहे... मात्र आता खरे सरांनी सांगितले तसे नेमके कारण शोधावे लागेल.

माझ्या पत्नीवरही वर्षभरात जवळपास सव्वा लाख खर्च झालेत. मात्र प्रश्न पैशाचा नसून, भोगाव्या लागणार्या यातनांचा आहे. दर महिन्याला लागून राहणारी आशा, आणि त्या पाठोपाठ येणारी निराशा, या दुष्टचक्रातून सुटका व्हावी एवढीच अपेक्षा उरलेली आहे आता....

धडपड्या's picture

22 Aug 2016 - 11:04 pm | धडपड्या

आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.. लवकरच आपल्याला संपर्क करतो.

या आभासी जगातही, असे आपुलकी दाखवणारे कोणी दिसले, की मन भरून येते...

चंपाबाई's picture

21 Aug 2016 - 10:55 am | चंपाबाई

जबाबदारी टाळायची म्हणून मूल नको हे पटत नाही. हा पळपुटेपणा वाटतो.

पण काय नवल नाही .. या देशात ( धर्मात) लग्न न केलेले, साखरपुड्ञातून पळालेले, लग्नातून पळालेले, ब्रह्मचारी , लग्न न करता डोंगर, जंगल, समाधी , समुद्रातला दगड असे कुठेतरी बसणारे .. इ ना ग्लॅमर आहे.

लग्नामध्ये धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि असे एकमेकाना वचन द्यायचे असते म्हणे. काम शब्दात आनंद व संतती दोन्हींचा समावेश होतो ना ?

लग्नाआधी मुलाने हे डिस्क्लोज केले असते तर मुलीने दुसरा नवरा निवडला असता.

त्यामुळे खरी फरपट आता बायकोची होणार.. वचन मोडणारा व पळपुटा नवरा मात्र स्वातंत्र्य व संतत्व आनंदाने उपभोगणार !

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 11:50 am | उडन खटोला

हयाची कुणीतरी शांती करा रे!
बघावं तेव्हा पेटलेला असतोय.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Aug 2016 - 10:28 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ते काय खोटं बोलत आहेत काय,सरळ सांगुण टाकावे की या माणसाचा प्रतिवाद करता येत नाही ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2016 - 2:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद पटला. :)

-दिलीप बिरुटे

बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला हा जागो मोहन प्यारे उर्फ जामोप्या उर्फ हितेस उर्फ माईसाहेब कुरसुंदीकर उर्फ नानासाहेब नेफळे उर्फ टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उर्फ मोगा उर्फ चंपाबाई उर्फ खालमुंडी पाताळ धुंडी उर्फ असे अनेक खोटे आयडी

हा समस्त मराठी संकेतस्थळांवर गरळ ओकून काढत असतो.बायकोचा असल्याने हिंदू धर्मावर विशेष राग. टिम्ब टिम्ब मध्ये दम नसल्याने दुसऱ्या मध्ययुगीन आणि बऱ्याच अंशी रानटी आणि हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्माचे जीव तोडून समर्थन करत असतो. खरंच जर टिम्ब टिम्ब मध्ये दम असता तर एक विधी करून खुलेआम पणे त्या धर्मात प्रवेश केला असता, पण तेवढी हिम्मत नाही मग ही अशी गरळ ओकून बायकोवर आणि तिच्या धर्मावर सूड घेतल्याचे समाधान मिळते. कारण काय ? तर माझ्या बाबतीत काही चांगले झाले नाही मग मी जिथे तिथे जाऊन घाण करणार.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Aug 2016 - 10:31 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

चंपाबाई ,सहमत.

सुबोध खरे's picture

28 Aug 2016 - 11:59 pm | सुबोध खरे

जास्त ग्लॕमर 13 बायका करणार्यालाच आहे. 53 व्या वर्षी 7 वर्षाच्या मुलीशी लग्न करुन तिच्या ९ व्या वर्षी तिच्याशी संबंध ठेवण्याला सुदधा केवढे ग्लॕमर आहे 1500 वर्षे झाली तरीही .

नगरीनिरंजन's picture

21 Aug 2016 - 8:16 pm | नगरीनिरंजन

मुलं होऊ न देण्यात काहीही वावगं नाही. बायकोला सांगायला हवे होते हे खरे; पण तिला चार-पाच वर्षांपासून आता माहित आहे तर तिने वय जाण्यापूर्वी निर्णय घ्यावा.
घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करता येईल.एखाद्याला मूल नको आहे म्हणून डायरेक्ट त्याला मनोरुग्ण ठरवायचं? कमाल आहे.
करोडो लोक करतात म्हणून ती गोष्ट शहाणपणाची असं लॉजिक आहे का? अशा बाबतीत जबरदस्ती होऊ शकत नाही.
मूल होऊ न देण्याचा निर्णय घेणारी भारतात अनेक जोडपी आहेत. तुमच्या आजूबाजूला नाहीत म्हणून ती सगळी मनोरुग्ण होत नाहीत. शिवाय अशीही असतात ज्यांना प्रयत्न करुनही होत नाहीत आणि दत्तक घ्यायची नसतात. काही जोडप्यांना झालेली मुले नंतर मरतात. ती माणसंही जुळवून घेत जीवन जगतात. अगदी भयंकर कुचंबणा व फरपट असं काही नसतं. त्या स्त्रीला पर्याय उपलब्ध आहेत.

संदीप डांगे's picture

21 Aug 2016 - 10:58 pm | संदीप डांगे

मलातरी कोठेही त्या व्यक्तीला मनोरुग्ण ठरवलेले दिसले नाही, प्रत्येकाच्या काहींना काही मानसिक समस्या असतातच, त्याचे मूळ लहानपणच्या वागणुकीत, इतिहासात असते,

मनोरुग्ण असणे आणि मानसिक समस्या असणे यात फरक आहे, एखाद्या गोष्टीची भीती बसली असेल तर ती दूर करणे यात गैर काय?

मुलं हवी असणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे, करोडो करतात म्हणून ती आयोग्यही ठरत नाही,

नगरीनिरंजन's picture

22 Aug 2016 - 6:47 am | नगरीनिरंजन

मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे फक्त मनोरुग्णच जातात. असो.
ज्यांना नैसर्गिक प्रेरणा आहे ते न सांगता मुलं जन्माला घालतातच. ज्यांना ती प्रेरणा नाहीय त्यांच्यावर जबरदस्ती कशाला?

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 9:34 am | सुबोध खरे

मनोरुग्ण असणे आणि मानसिक समस्या असणे यात फरक आहे.
मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे फक्त मनोरुग्णच जातात.

या दोन्ही प्रतिसादांसाठी --
आपल्याला शरीराची समस्या असेल उदा. टॉन्सिलला सूज अली तर कां नाक घसा तज्ञाकडे जातो तसेच
मानसिक समस्या असेल तर मनोविकार तज्ञाकडे जायला काय हरकत आहे.
मनोविकारा बद्दल समाजात गैरसमज आणि डागाळलेली प्रतिमा आहे याचे कारण मनोरुग्ण हे समाजापासून वाळीत टाकलेले/मनोरुग्णालयात वर्षानुवर्षे डांबून ठेवलेले आपण ऐकतो आणि त्याची भयंकर प्रतिमा सिनेमातून अजूनच भयानक करून दाखवली जाते. त्याला शॉक देणे इ. चे अवास्तव वर्णन यामुळे सामान्य माणूस गरज असूनही मनोविकार तज्ञाकडे जात नाही. हि शोकांतिका आहे.
एखादा माणूस मला मूल नको हे "ठाम विचारांती" म्हणत असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. परंतु हेच जर "अतिरिक्त भीती"पायी(फोबिया) असेल तर त्यासाठी मनोविकार तज्ञाची मदत घेणे अजिबात चूक नाही.
माझे यात एकच म्हणणे आहे कि लग्नाअगोदरच त्याला तसे वाटत असेल/ किंवा त्याचा निर्णय पक्का झाला असेल तर होणाऱ्या "जोडीदाराची संमती" आवश्यक आहे अन्यथा होणाऱ्या घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे हे दोन्ही बाजूनं फार क्लेशदायक जाते.
जर नवरा बायको दोघांनी संमतीने असा निर्णय घेतला असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण एका बाजूने हा निर्णय दुसऱ्या बाजूवर लादला गेला तर आयुष्य फार क्लेशदायक असते.
माझी वर्गमैत्रिण हिला मूल "नकोच" होते. परंतु तिने हा निर्णय आपल्या नवऱ्याला आधि सांगितला नाही. त्यामुळे वर्षभरातच खटके उडून परिणती घटस्फोटात झाली. आज ती एका अत्यंत प्रतिष्ठेच्या वैद्यकीय संस्थेत रेडियोलॉजीची विभागप्रमुख आहे.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2016 - 5:11 am | नगरीनिरंजन

वाढत्या लोकसंख्येमुळे संसाधनांवर ताण पडतो. रस्त्यांवर गर्दी, जास्तीचे अपघात, शाळाकॉलेजच्या अॅडमिशनला गर्दी, नोकर्‍यांसाठी मारामार, हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला वेटिंग लिस्ट हे सगळं माहित असताना केवळ स्वतःची इच्छा व नैसर्गिक प्रेरणा म्हणून आणखी एका जीवाला जन्म देऊन विनाप्रयोजन आयुष्यात निरर्थक सुख-दु:खे भोगण्यासाठी जबरदस्ती करणार्‍यांना मानसोपचाराची गरज आहे की "अशा परिस्थितीत अपत्याला जन्म देऊन त्याचं/तिचं माहित नाही; पण मी त्याच्या/तिच्या जबाबदार्‍यांमुळे सुखी होऊ शकणार नाही" असं म्हणणार्‍यांना मानसोपचाराची गरज आहे हा वादाचा मुद्दा आहे. (खरंतर नाहीय; पण करोडो लोक..).

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 2:11 pm | चंपाबाई

हे भोंगळ तत्वज्ञान आहे.

हजारो वर्षांपूर्वी सत्यवतीने भीष्माला हेच शहाणपण शिकवले होत्व.... तू लग्न केलेस तर पोर होईल , ते माझ्या पोराशी स्पर्धा करेल.

भीश्म बिचारा बिनलग्नाचा राहिला.

सत्यवतीने मात्र दोन मुले पैदा केली व ती जे बोलली ते तिच्याच वारसांमध्ये झाले.

......

लोकसंख्येमुळे ताण येतो असे मत असलेल्यानी मुलाना जन्म घेण्यास रओखण्यापेक्षा स्वतः आत्महत्या केल्यास त्यांची मानवजातीबाबतची कळकळ खरी असल्याचे सिद्ध होइइल

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2016 - 5:11 pm | नगरीनिरंजन

मानवजातीबद्दल यत्किंचितही कळकळ नाही. प्रत्येकाला स्वतःच्या सुखाची कळकळ असते. तुमच्यासारखे महाविचारवंत विरळा.

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 7:00 pm | चंपाबाई

दधिचीऋषी , सावरकरमुनी , सानेगुरुजी सगळे पापी का ?

नव्या कायद्यानुसार आत्महत्या गुन्हा नव्हे म्हणे

गामा पैलवान's picture

24 Aug 2016 - 7:26 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

प्रायोपवेशनामार्गे देहत्याग म्हणजे आत्महत्या नव्हे. तुमचं विधान सुधारा.

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 7:49 pm | चंपाबाई

लोकसंख्येच्या विस्फोटाचे कारण सांगून ज्याला मानवजातीवर उपकार करायचे आहेत , त्यानी प्रायोप्वेशन , दधिची ध्यान वगैरे लावून स्वतः नष्ट व्हावे.

अगदी सामान्य माणसाप्रमाणे गळफास लावला तरी चालेल.

पण , पुढची जन्माला न घालण्याचे जस्टिफिकेशन देउ नये...

आजानुकर्ण's picture

24 Aug 2016 - 8:03 pm | आजानुकर्ण

चंपाबाई,

कदाचित चंपाबाईंसारखं अपत्य असण्यापेक्षा नसलेलं बरं असं कुणाला वाटू शकतं की! त्याचा निसर्ग, लोकसंख्या वगैरेशी काही संबंध नाही. निव्वळ नॉशिया आल्यामुळेही होऊ शकतं.

मराठी कथालेखक's picture

24 Aug 2016 - 8:49 pm | मराठी कथालेखक

+१

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 10:57 pm | चंपाबाई

अपत्य चंपाबाई होइइल की शोभा डे हे आधीच कसे समजेल ?

आजानुकर्ण's picture

25 Aug 2016 - 12:57 am | आजानुकर्ण

चंपाबाई की शोभा डे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. दोन्ही पर्याय तितकेच धोकादायक आहेत.

मृत्युन्जय's picture

25 Aug 2016 - 12:05 pm | मृत्युन्जय

खिक्क

नाखु's picture

25 Aug 2016 - 4:16 pm | नाखु

का समानार्थी शब्द आहेत याचीच चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवतो..

सूचक नाखु

गामा पैलवान's picture

25 Aug 2016 - 12:43 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

आता हिशोब मांडाच म्हणतो मी. जर एकाने देहत्याग केला तर एकंच जीव कमी होईल. याउलट त्याने जिवंत राहून प्रबोधन केलं तर गेलाबाजार शंभरदीडशे जिवांची तरी बचत होईलंच ना?

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 12:57 pm | चंपाबाई

अगदी बरोबर.

आणि हा प्रबोधनकार कधी ना कधी स्वर्गवासी होणारच.

जो नवा जीव येईल तो त्याचे कार्य पुढे नेईल.

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 10:19 am | चंपाबाई

मूल न होण्याचा जोडप्याने निर्णय घेणे व फक्त नवर्‍याने निर्णय घेऊन बायकोवर त्या निर्णयाची जबरदस्ती करणे या भिन्न सिचुएशन्स आहेत.

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 10:23 am | सुबोध खरे

जर नवरा बायको दोघांनी संमतीने असा निर्णय घेतला असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण एका बाजूने हा निर्णय दुसऱ्या बाजूवर लादला गेला तर आयुष्य फार क्लेशदायक असते.
हे वाचलं नाही का?

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 1:47 pm | चंपाबाई

माझा तो प्रतिसाद नगरीनिरंजन यांच्या प्रतिसादासाठी आहे.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2016 - 6:33 pm | नगरीनिरंजन

त्या स्त्रीला पर्याय उपलब्ध आहेत हे वाचलं नाही का?

पक चिक पक राजा बाबू's picture

21 Aug 2016 - 10:32 pm | पक चिक पक राजा बाबू

अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी psychologist ची अतिशय चांगली मदत होऊ शकते. Behavioural science मधे अतिशय चांगले उपचार उपलब्ध zalele आहेत, बोधात्मक वर्तनात्मक उपचार पद्धत यासाठी उपयुक्त ठरू शकते, psychologist हे वर्तन उपचार आणि psychotherapy वापरून मानसिक समस्या दूर करतात

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 11:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

ते सगळे सोडा मालक, आम्ही तुमच्या आयडीचेच तुफान पंखे झालेलो आहोत!! "पक चिक पक राजबाबू कर गया कोई जादू न राहा दिल पे काबू क्या कर गयी हसीना" अहाहा खल्लास गाणे!! राजा बाबू नंतरच आमच्या लाडक्या गोंद्याने नंबर वन धमाका सुरु केलता त्याचा !!

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 1:02 am | बोका-ए-आझम

उसीसे तो गोविंदा और डेव्हिड धवन चालू हो गये!

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2016 - 7:40 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा वगैरे नंतर आले होते ना?

तुषार काळभोर's picture

22 Aug 2016 - 12:12 pm | तुषार काळभोर

अगेन्स्ट द पॉप्युलर बिलीफ, दुल्हेराजा डेव्हिड धवनद्वारे दिग्दर्शित नव्हता.
(पिच्चर भारी होता, यात शंका नाही.)

दुल्हेराजा एक नंबर सिनेमा आहे..कधीही पहा कुठूनही पहा...

सैफ अली खानला जर हम तुम सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो तर गोंविदाला दुल्हेराजासाठी मिळायलाच हवा असे आमचे वैयक्तिक मत आहे.

गाणे भारी होते, गोंद्या तुफान नाचलेला पण क्रेडीट गोज टू रहमान अँड प्रभुदेवा, विष्णूदेवा.
हे पाहा वरिजिनल चिक पुक चिक रैले

नगरीनिरंजन's picture

22 Aug 2016 - 6:49 am | नगरीनिरंजन

उपचार?

_/\_.

मराठी कथालेखक's picture

21 Aug 2016 - 11:02 pm | मराठी कथालेखक

हा विषय माझ्याकरिता अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.
मी स्वतःही याच विचारांचा ('स्वेच्छेने विनापत्य' किंवा childfree राहणे ) आहे आणि 'childfree' जीवनशैली जगत आहे.
ह्या लेखावरील प्रतिसाद दोन प्रकारचे होवू शकतील
१) फक्त या केसपुरता प्रतिसाद
२) एकूणातच 'स्वेच्छेने विनापत्य' या संकल्पनेबद्दल /या जीवनशैली बद्दलचा उहापोह करणारा प्रतिसाद
पैकी दूसर्‍या प्रकारचा प्रतिसाद इथे न देता लवकरच या विषयावर स्वतंत्र धागा काढण्याचा विचार करतो आहे.

आता या विशिष्ट केसपुरतं

आधी मुलाची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.
निर्णय की फोबिया ? -'मूल नको' हा त्याचा विचारांती घेतलेला निर्णय आहे की फोबिया हे कसे ठरवणार ?

निर्णय
तसे तर प्रत्येक व्यक्तीला कसली न कसली भिती वाटते आणि त्यामुळे तो काही गोष्टी करायच्या टाळतो. त्याला फोबिया कसं म्हणता येईल ? उदा: एखादा व्यवसाय करुन जे भरपूर वैभव प्राप्त होवू शकते त्याचे मला आकर्षण आहे, पदरी पदव्या आहेत, बँकेत चांगल्यापैकी शिल्लक आहे तरी व्यवसायातील अर्थिक चढउतार, अनिश्चितता यांच्याशी सामना करण्याचे धाडस नसल्याने मी नोकरीला रामराम ठोकत नाहीये , हा निर्णय म्हणावा की फोबिया ?
आयुष्यातील कोणत्याही महत्वाच्या बदलाचे जे परिणाम असतात ते एखाद्या पॅकेजप्रमाणे असतात, त्यात काही चांगल्या तर काही वाईट (म्हणजे त्रासदायक गोष्टी ) असतात. त्यातील त्रासदायक गोष्टींचा विचार करुन एखाद्याला वाटत असेल की 'माझी काही या त्रासाला सामोरे जाण्याची तयारी नाही' आणि त्याकरिता तो ते पुर्ण पॅकेजच नाकारत असेल तर त्याला फोबिया नाही म्हणता येणार. या केसमध्ये सदर मुलगा 'मूल होईल..त्याच्या बाळलीलांनी घरात आनंद येईल..त्याच्या बोबड्या बोलांनी कान सुखावतील वगैरे' रम्य चित्रांत न रमता त्यातील जबाबदार्‍यांचा , होवू शकणार्‍या त्रासाचा विचार करतो आहे, त्यांस स्वतःच्या कुवतीशी ताडत आहे, त्यातून त्याला या त्रासांना सामोरे जाण्याचे मानसिक बळ आपल्याकडे आहे असे वाटत नाही म्हणून तो मूल नाकारतो आहे असे असू शकेल.
मूल जन्माला घालणे ही फक्त एक छोटीशी क्रिया नाहीये , पालकत्व हे पंचवीस-तीस वर्ष किंवा अगदी अजन्म आहे आणि त्यातून मागे फिरणे अशक्य आहे (किंवा शक्य असले तरी अयोग्य निश्चितच आहे). [आता त्या मुलाची आईच बघा.. मुलगा बत्तीस वर्षाचा झाला तरी ती मुलाची चिंता वहातच आहे]
हा मुलगा निश्चितच बेजबाबदार किंवा पळपूटा नाहीये. जे पुरुष (काही प्रमाणात स्त्रियाही असतील अशा) मूल जन्माला घालतात पण पुढिल संगोपनाच्या जबाबदारीतून अंग काढतात, दुर्लक्ष करतात ते बेजबाबदार ...असो.
जर अशा प्रकारे हा निर्णय त्याने विचारांती घेतला असेल आणि आता फक्त बायको वा आईच्या आग्रहाने तो मानसोपचारतज्ञाकडे जात असेल तर मला नाही वाटत की मानसोपचारतज्ञ फार काही करु शकतील.
झालेच तर त्याला मुलांचि आवड नसेल आणि अशी आवड नसणे हा मानसिक विकार समजण्याचे कारण नाही असे मला वाटते.
वर एका प्रतिसादात म्हंटलय की

पुरुषाला एखाद्या गोष्टीसाठी राजी करण्याचे अनंत मार्ग स्त्रियांकडे असतात

पण साम दाम दंड वगैरे वापरुन फक्त तात्पुरतं राजी करणं आणि मन बदलणं यात फरक आहे.
अशा प्रकारे दबाव आणून तो राजी झाला तरी बाळाच्या जन्माच्या वेळी पतीच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहाणार नसेल तर ते त्या संसाराकरिता हितकारक असेल ? बाळाकरिता हितकारक असेल ?

फोबिया

त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे.

या वाक्यावरुन फोबिया असण्याची काहीशी शक्यता वाटते. लहान मुल थोडा वेळही आसपास असल्यास तो अस्वस्थ होतो का ?लहान मुलाला अगदी थोडा वेळ पण साभाळू शक्त नाही का ? तसे असल्यास फोबिया आहे असे म्हणता येईल आणि मानसोपचाराने फरक पडू शकेल. पण तरीही पुढे जावून असा फोबिया असल्यानेच त्याला मुल नको आहे की असा फोबिया असणे आणि 'मुल नको' हा निर्णय या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत याचा कीस पाडावा लागेल. म्हणजे फोबिया दूर होवून तो तास-दोन तास मुलांसोबत मजेत घालवूही शकेल कदाचित पण त्यामूळे त्याचा (विचारांती घेतलेला) निर्णय बदलेलच असं नाही.
Antinatalism हा एक अजून थोडा वेगळा विषय अलिकडेच वाचनात आला. ह्या पंथाच्या लोकांना एकूणातच मूल जन्माला घालणे , लोकसंख्या वाढवणे निरर्थक वाटते. पण या केसमध्ये तो मुलगा या पंथाचा असेल असं काही वाटत नाही. (आणि असल्यास त्यावर काही उपचार आहेत किंवा कसे याबद्दल काही वाचनात आले नाही).
मुलीची मानसिकता
मुलीला मूल हवे आहे...पण तिला स्वतःचे मूल असण्याची प्रचंड आसक्ती आहे की फक्त मुलांच्या सहवासाची आवड आहे की नातेवाईकांचा दबाव, नातेवाईकांत /समाजात वाट्याला येवू शकणारी कुचंबणा (आज येत नसेल तरि भविष्यात येवू शकेल अशी भीती) , तिला गर्भाशयाचा आजार असल्याची बातमी बाहेर फुटली असल्याने 'मी वांझ नाही,मूल जन्माला घालू शकते' हे सिद्द करण्याची जिद्द यापैकी नेमकं काय आहे हे समजणे कठीण आहे.

तिची फसवणूक ?
त्याने लग्नाआधि तिला याबाबत सांगितले नाहि म्हणुन त्याने चूक केली असे काहींना वाटत आहे. पण कदाचित त्यावेळी त्याच्याच मनात असा काही निर्णय पक्का झाला नसेल. लग्नाच्या वेळी दोघांचे वय २४ म्हणजे फार काही जास्त नव्हते. विचार पक्के झालेच असतील असे नाही. त्यामूळे त्याने खूप मोठी चूक केली असं वाटत नाही.

घटस्फोट न होण्याचे कारण दोघांत खूप प्रेम आहे असे आपण लिहिले.
म्हणजे एकतर त्या प्रेमापोटी ती त्याच्यापासून दूर होवू शकत नाही (म्हणजे त्याच्यापासुन दूर होण्याचे दु:ख ती स्वतः सहन करु शकत नाही )
किंवा 'घटस्फोटाने तो कोलमडेल' या भावनेने हळवी होवून ती घटस्फोट घेत नसेल
किंवा घटस्फोटिता म्हणुन समाजात /कुटूंबात होणारी बदनामी तिला नको असेल
आता काय करावे ?
त्याने - तिचे जीवन दु:खी करण्याचा त्याला अधिकार नाहि म्हणून त्याने मोकळे पणाने तिच्यासमोर प्रस्ताव ठेवावा की "माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला दीर्घकाळ दु:खी पाहू शकत नाही. पण तुझ्या आनंदाकरिता माझा निर्णय बदलणेही योग्य होणार नाही तेव्हा तुला या बंधनातून मोकळे व्हायचे असल्यास मी कोणतीही कटूता न ठेवता तुला मुक्त करेन, झालेच तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी जमेल ते प्रयत्न /मदत करेन."
तिने - या प्रस्तावावर तिने शांतपणे विचार करावा. म्हणजे खरेतर दोन कठीण पर्यायात कमी त्रासदायक पर्याय निवडावा. 'मूल नसण्याचे दु:ख " मोठे की "प्रिय पतीला सोडण्याचे दु:ख" मोठे याकरिता मनाचा कौल घ्यावा.
मला वाटते ती त्याला सोडणार नाही.
यापुढील सहजीवन - जर तिने त्याच्याबरोबर संसार न मोडण्याचा निर्णय घेतला तर तिच्या आयुष्यातले 'मूल नसण्याचे दु:ख' दोघांनी मिळून थोडे हलके करावे
- तिने नातेवाईक्/मित्र-मंडळी/शेजारी यांच्या मुलांसोबत जमेल तसा वेळ घालवावा त्यामुळे त्या पालकांनाही बालसंगोपनात तिची मदत होईलच.
- त्यातीलच एखाद्या लाडक्या मुला/मुलीशी दीर्घकाळासाठी मावशी/मैत्रिण/मार्गदर्शक असे नाते जोडावे.
एखाद्या अनाथ आश्रमात वा शाळेत जावून काही काम मिळू शकते का काही वेळ देता येतो का ते पहावे (अभियंता आहे असे आपण लिहिलेय, संगणक अभियंता असेल तर शाळेत संगणक शिकवणे वगैरे अर्धवेळ काम मिळू शकेल).
- इतर छंद जोपासावेत
- त्याने तिला भरपूर वेळ द्यावा..निदान त्याच्या सहवासाची उणीव तिला कधी भासू देवू नये.
- नेहमी तिच्याशी प्रेमाने वागावे, तिने कधी चिडचिड केली तरी स्वतः शांत रहाण्याचा प्रयत्न करावा.
- तिच्या इतर छंदांत रस घ्यावा, मदत करावी
- भटकंती, खरेदी , गृहसजावट, मनोरंजन (नाटक , सिनेमा , पार्टी ई) यापैकी ज्याप्रकारची चैन तिला आवडेल त्यात सढळ हाताने खर्च करावा. अनेकदा भौतिक सुखांच्या नशेत बाकीची दु:खे हलकी होतात / विसरली जातात.
- तिच्या वरील घरकामाचा भार कमी होवून तिला स्वतःची सौंदर्य /तारुण्य जोपासना करायला भरपूर वेळ मिळेल असे बघावे. त्याकरिता तिला नेहमी प्रोत्साहन द्यावे, तिच्या सौंदर्याची स्तुती करावी. तिच्या आहाराकडे स्वतः नीट लक्ष द्यावे. तरुण आणि सुंदर असल्याचे समाधान (काहिसा गर्व म्हणू हवंतर) स्त्रीची इतर दु:ख हलकी करते असे मला वाटते.
- त्याने स्वत:ही तंदुरुस्त राहून प्रणयात रस घेत रहावा , त्यात नावीन्य /रंजकता आणण्याचाही प्रयत्न करावा.

अखेरीस काय की आयुष्यात कोणता आनंद मिळेल्, कोंणता नाही याचा काही करार करुन माणूस जन्माला येत नाही, आयुष्य हे देखील एक पॅकेज आहे ज्यात चांगल्या वाईट गोष्टी, सुख दु:ख भरलेली आहेत. एखादे विशिष्ट सुख आयुष्यात नाही म्हणुन कुढण्यात अर्थ नाही, आयुष्यात प्रेम असणे महत्वाचे..

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 9:00 pm | चंपाबाई

म्हणजे बोर्डाचा फॉर्म भरायचा.

आणि नंतर बोंबलायचं की मी गणिताच्या पेप्राला बसणारच नाही.

तरी माझा निकाल पासच आला पाहिजे.

nanaba's picture

24 Aug 2016 - 12:27 pm | nanaba

are 2 worlds apart.. so I understand why someone may not want kids..
I too thought for some time that I do not want kids.. for around 7 yrs - post marriage.. and then even after my mind changed, I faced issues getting preggo for 2+ years..
but now that I have one.. I can not imagine life without her.. no bigger happiness, no bigger love.
Suddenly, everything is not about you, but about them and you don't feel bad about it. It just comes naturally!

पक चिक पक राजा बाबू's picture

21 Aug 2016 - 11:28 pm | पक चिक पक राजा बाबू

मैं खुद इ अपने णाम क़े प्रेम में पड़ा हूँ ,बापू, भोत म्हैनत करके खोजेला है यह णाम.

आजानुकर्ण's picture

22 Aug 2016 - 7:50 am | आजानुकर्ण

बहुमोल मत विचारले म्हणून सांगतो मात्र तत्पूर्वी

एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे.

मात्र सदर महत्त्वाच्या केसस्टडीवरील गंभीर चर्चेचा इथे जो काही निष्कर्ष आणि उपाय निघतील त्याची अंमलबजावणी कशी करणार याबाबत काही मतप्रदर्शन केले तर बरे होईल! ('हिंदूंनी अनेक मुले जन्माला घालावी' असे फतवे आजकाल निघत आहेत त्याच्याशी ही चर्चा संबंधित आहे काय?)

बाकी अनेक प्रतिसाद बेणारे बाईंच्या उलटतपासणीसारखे वाटले. समलैंगिक हे मनोरुग्ण आहेत असा एक गैरसमज आहे त्या स्वरुपाच्याच गैरसमजातून आलेले स्वेच्छेने निपुत्रिक राहणाऱ्यांनीही सायकियाट्रिस्ट नाही तर किमान सायकॉलॉजिस्टशी तरी चर्चा करावी ह्या स्वरुपाचे प्रतिसाद वाचून हहपुवा झाली.

आता शेवटी बहुमोल मतः
-नवरा आणि बायको जे काही आहे ते आपापसात बघून घेतील.

तर्राट जोकर's picture

22 Aug 2016 - 9:41 pm | तर्राट जोकर

अजानुकर्णसाहेब,

तुम्ही किती गांभिर्याने सदर धाग्याकडे बघत आहात हे आपल्या प्रतिसादावरुन कळतेच आहे. तरीही आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

सदर घटना रेअर केस (निदान माझ्यासाठी व आमच्या गोतावळ्यासाठी तरी) आहे. ह्या गोतावळ्यात काही व्यक्ति हे एकतर कमी शिक्षित, प्रगल्भ विचार करु शकणारे नाहीत, काही वयस्कर असून परंपरा, रुढींचा पगडा असल्याने जरी 'खुलेपण अंगिकारणार्‍या' किंवा 'नाक न खुपसणार्‍या' असल्या तरी त्यांना एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही समवयस्क सुशिक्षित समविचारी असल्या तरी साधारणपणे अशा घटना रोजच्या जीवनात आढळत नसल्याने काय भूमिका घ्यावी, कसा विचार करावा ह्याबद्दल गोंधळलेल्या आहेत. सदर गोतावळा एकमेकांना सुख्दु:खात सहभागी होत असल्याने चर्चा-विचारविनिमय नित्याचा असतो. या विशिष्ट प्रकरणात संबंधितांशी वागतांना नेमके कसे वागावे, काय बोलावे, मुळात स्वतः आपणच ह्या घटनेकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहावे ह्याबद्दल संभ्रम आहे. त्यांचे ते बघतील हे बोलायला सोपे असते पण प्रॅक्टिकली शक्य नसते जेव्हा संबंधित खूप जवळचे असतात.

आमच्या गोतावळ्यातल्या कोणीही त्यास आजही मनोरुग्ण वा तत्सम समजत नाही. सदर व्यक्ति अतिशय संस्कारी, सुशील व सद्वर्तनी आहे. सगळ्यांचे त्याच्याशी चांगलेच संबंध आहेत, सर्वांना त्याच्यासोबत चांगलेच व्हावे अशी अपेक्षा आहे. बेणारेबाईंच्या उलटतपासणी प्रकरणासारखे इथे काहीच होत नाहीये.

मिसळपाववर ही घटना मांडण्याचे कारण फार साधे आहे. इथे अनेक प्रकारची मंडळी आहेत, व्यावसायिक किंवा नोकरीनिमित्ताने अनेक अनुभव असलेली आहेत. काही उत्तम डॉक्टर्स, तर काही मानसशास्त्रात रुची ठेवणारे तसेच मनोविकारतज्ञही आहेत. अशांसमोर सदर घटना मांडल्यावर त्यांचे अनुभवसिद्ध दृष्टीकोन वाचायला मिळणे हे वर उल्लेखित गोतावळ्यास मार्गदर्शक ठरु शकते. ह्यात प्रत्यक्ष संबंधित व्यक्ति व त्याची पत्नीही असू शकतात (त्यांना हे माहिती नाही पण ते मिसळपावचे वाचक असण्याची किंवा नसण्याचीही शक्यता मी गॄहित धरली आहे)

तसेच, अशीच काहीशी समस्या असलेल्या, माहिती असलेल्या इतर मंडळींना ज्यांना इथे लिहावे हे सुचले नाही, किंवा भविष्यात कधी अशी घटना बघतील तर त्यांनाही माहिती व्हावी हा देखील दृष्टीकोन आहे.

आता तुमचे इथे व्यक्त केलेले मत बहुमोल आहे की नाही हे कळले असेलच.

प्रतिसादासाठी धन्यवाद. धाग्याचे गांभिर्य ठेवण्याची सूचना आपण कदाचित वाचली नसेल असे गृहित धरतो अन्यथा आपल्यासारख्या संतुलित सदस्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता.

आजानुकर्ण's picture

22 Aug 2016 - 10:38 pm | आजानुकर्ण

मी पुरेशा गांभीर्याने प्रतिसाद दिला होता. सदर प्रश्न हा त्या दांपत्याचा हा पूर्णपणे वैयक्तिक मामला आहे हे मत तुम्हाला गंभीर का वाटले नाही हे कळले नाही. बेणारेबाईंची उलटतपासणी हा त्या गोतावळ्याशी संबंधित शेरा नसून या धाग्यावर आलेले मानसोपचारतज्ञाकडे जा, ज्योतिष कुंडलीत काय आहे, पळपुटेपणाचा गौरव होण्याची देशाची परंपरा, गोविंदा-राजाबाबू आणि डेविड धवन, पक चिक पक लै लै वगैरे प्रतिसादांवर दिलेला शेरा होता.

अ‍ाता हे सर्व प्रतिसाद वगळता तुम्हाला माझ्या पुरेशा गंभीर प्रतिसादावर तो गंभीर नाही अशी टिप्पणी करावीशी वाटली हे रोचक आहे.

मत बहुमोल आहे की नाही हे कळले असेलच

हू केअर्स!

तर्राट जोकर's picture

22 Aug 2016 - 11:09 pm | तर्राट जोकर

महोदय, तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा वाटला म्हणून उत्तर दिले. अन्यथा टाळले असतेच. उत्तर देण्याचे कारणही मी प्रतिसादात दिले होते त्यावर आपण विचार केलेला दिसला नाही. नवरा-बायकोची आपसातली गोष्ट म्हणून काही गोष्टी टाळता येत नाहीत. उद्या काहीही होऊ शकते, मुलीला डिप्रेशन येउन तिने आत्महत्या केली तर, मुलानेही कदाचित केली तर, दोघांनीही केली तर, बरीच लोकं इथे घटस्फोट घटस्फोट करत आहेत पण इतकं सोपं असत नाही ते. तसंच तुम्ही म्हणताय तसं त्यांच्यात आपसात ठरवतील ते, हे इतकं सोपं नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाची काहीतरी समस्या झालेली, आम्ही अगदी प्रचंड योगायोगाने एकाच क्लिनिकमधे एकमेकांना भेटलो. ती तिथे रिपोर्ट्स दाखवायला आलेली, डॉक्टरने तिला कॅन्सरच्या शक्यतेची चाचणी करायला सांगितलेली. ती एकटीच तिथे हबकून बसलेली, डोळ्यात पाणी आलेले, नुसतं कॅन्सरचं नाव ऐकून ती प्रचंड घाबरलेली होती. आम्ही तिची विचारपूस केली, रिपोर्ट्स बघितले, मला ह्या विशिष्ट चाचणीबद्दल थोडी माहिती 'आधीच' असल्याने मी तिला योग्य भाषेत समजावून सांगु शकलो की ही फक्त शक्यतेची चाचणी आहे, मलेरिया,डेन्गुसारखी व रुटीन चेकप आहे. याचा अर्थ तुला कॅन्सर झाला किंवा होईल असा होत नाही. अर्धापाऊन तास तिला नीट समजावल्यावर ती नॉर्मलला आली. आम्ही कर्मधर्मसंयोगाने तिथे भेटलो नसतो तर तिने हे कोणालाही सांगितले नसते हे मला पक्के ठावूक आहे. आतल्याआत कुढत राहिली असती व काहीबाही विचार करत बसली असती.

आताही ही घटना मांडण्याचं कारण इतकंच होतं की काही विषय अपरिचित असतात, त्याबद्दल शास्त्रिय माहिती असली तर बरं असतं. कुनाच्या फाटक्यात पाय घालण्यासाठी हा उपद्व्याप मी निश्चितच करत नाही आहे. तसेच तुमच्या मताला बिनकामाचे म्हटलेले नाही हे लक्षात घ्यावे, फक्त त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन स्पष्ट केल्याने तुम्हाला त्याचे महत्त्व अजूनही पटतंय का एवढाच विचार करावा असे सूचित करायचे होते.

बाकी इतर अवांतर, महत्त्वहिन प्रतिसादांबद्दल तर त्यासंबंधी संपादकांना विनंती करतोय की असंबंधित, गांभिर्यहिन प्रतिसाद इथून काढावेत.

आजानुकर्ण's picture

23 Aug 2016 - 1:01 am | आजानुकर्ण

तुमच्या मताचा आदर आहे. पण तरीही हा प्रश्न त्या दोघांपुरताच आहे. मुलाला बाबा व्हायचं नाही, मुलीला आई व्हायचंय. ही खरी शृंगापत्ती आहे. :) या दोघांपैकी कुणीतरी पडतं घेऊन हा प्रश्न सोडवायचाय. जो काही निर्णय आहे त्याची जबाबदारी दोघांनाच उचलायची आहे. उद्या मूल झालं आणि मुलाची तेव्हाही मुलाला सांभाळायची इच्छा नसेल तर शंकाकुशंका काढणाऱ्या आणि चौकशा करणाऱ्या गोतावळ्याची कितपत मदत होऊ शकेल याबाबत साशंक आहे. तेव्हा बाकीचे काय म्हणतात याला काडीचे महत्त्व देऊ नये. मुलगा आणि मुलगी यात अमुकच बाजू बरोबर आहे असे मला वाटत नाही. समोरच्या व्यक्तीची इच्छा ही माझ्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे असा विचार दोघांपैकी एकाने केला तर प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

यात फार तर मॅरिज कौन्सिलर वगैरे मदत करु शकतील. या प्रश्नावर सायकिअॅट्रिस्ट काही करु शकतील असे मला वाटत नाही! (सायकिअॅट्रीची क्लिनिकल ट्रीटमेंटवगैरे घेतली तर सेक्स लाईफमध्ये काही दिवस अडचणी येऊ शकतात की काय याचीही कल्पना डॉक्टरकडून घेऊन ठेवा.)

बाकी आत्याबाईला मिश्या येऊ शकतात या धर्तीवर काहीही होऊ शकतं. मुलीला डिप्रेशन येऊ शकतं, मुलाला डिप्रेशन येऊ शकतं. दोघांनाही येऊ शकतं (या बाबतीत मात्र सायकिअॅट्रिस्ट नक्की मदत करु शकतो!) पुढं आत्महत्येचीही शक्यता तुम्ही वर्तवली आहे. (म्हणजे एक जीव जगात येऊ शकत नाही म्हणून दोन जीवांनी जग सोडायचं. आनंद आहे!)

पक चिक पक राजा बाबू's picture

22 Aug 2016 - 11:03 am | पक चिक पक राजा बाबू

अहो आजानुकर्ण साहेब, पुनरुत्पादन आणि समाजमान्य लैंगिक संबंध हे भारतीय विवाह संस्थेचा पाया आहेत. हाच हट्ट त्या मुलीने धरला असता तर त्या मुलाची प्रतिक्रिया काय असली असती ?.असले महान विचार त्याने लग्ना अगोदरच मूली जवळ शेअर केले असते तर, ती याच्या बरोबर लग्नाला तयार zali असती का ? ही त्या मुलीची फसवणूक आहे , ही मानसिक समस्या आहे दूसरे काही नाही,he needs treatment. आणि मूल जन्माला घालावे की घालु नये हा निंर्णय घेण्याचा अधिकार त्याचा एकाट्याचा कसा काय? निंर्णय घेण्याचा तिलाही tevdhach हक्क आहे .

मराठी कथालेखक's picture

22 Aug 2016 - 11:39 am | मराठी कथालेखक

फसवणूक झाली तर घटस्फोटाचा अधिकार आहेच की.
झालेच तर मुल जन्माला घालण्याचा निर्णयाचा अधिकार दोघांना आहे हे मान्य पण त्याचे असे आहे की
1 x 1 = 1
1 x 0 = 0
0 x 1 = 0
0 x 0 = 0
थोडक्यात नकाराधिकार महत्वाचा.

मराठी कथालेखक's picture

22 Aug 2016 - 11:40 am | मराठी कथालेखक

फसवणूक झाली तर पर्याय आहेच की.
असे वाचावे

पक चिक पक राजा बाबू's picture

22 Aug 2016 - 12:12 pm | पक चिक पक राजा बाबू

लग्न व्यवस्थेमधे समाज मान्य लैंगिक संबंध आणि अपत्य प्राप्ति या दोन्ही गोष्टिची अपेक्षा असणे यामधे काहीही अवाजवी आणि गैर नाही उलट या गोष्टि ना नकार देणे हे दुसऱ्या पार्टनर वर अन्याय आहे,त्यामुळे होकारधिकार महत्वाचा असे मला वाटते.

मराठी कथालेखक's picture

22 Aug 2016 - 12:28 pm | मराठी कथालेखक

मला एक मुलगी फार आवडते.
मी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला , पण तिला माझ्याशी लग्न करायचे नाही..सांगा होईल लग्न ?
पुढे जावून मी माझ्या घरच्यांची, तिच्या घरच्यांची संमती मिळवली पण तरी ती नकारावर ठाम राहिली तर मी तिला काय म्हणणार "तू एकटीच हा निर्णय कशी घेवू शकतेस ? सगळ्यांचा होकार असताना तुझ्या नकाराला काही किंमत नाही"...चालेल ?

लॉजिकलि विचार करा साहेब

उडन खटोला's picture

22 Aug 2016 - 12:36 pm | उडन खटोला

आपण म्हणताय ते लॉजिक लॉजिकल वाटत नाहीये

सामान्य वाचक's picture

22 Aug 2016 - 1:25 pm | सामान्य वाचक

तुमच्या उदाहरण मध्ये इंटरस्तेड पार्टी 1 च आहे , दुसरी नाही
पण जेंव्हा दोघे लग्न करतात म्हणजे दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होते कि नाही
तेंव्हा ते दोघेही इंटेरेस्टेड party होतात

त्यामुळे लग्न आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या, फायदे, तोटे, बरे, वाईट इ इ यामध्ये दोघांची जबाबदारी असते आणि दोघां च्या हि मताला वजन असते
त्याच वेळी एखाद्या निर्णयाने किती नुकसान होणार आहे त्यावर त्या निर्णयाचा बरे वाईट पणा ठरतो

मला वाटते , कशामुळे का असेना, पण भारतीय बायकांमध्ये मातृत्वाला खूप महत्व असते, त्याशिवाय त्यांना खूप leftout, रिकामे, अधुरे वाटते
. हे चूक का बरोबर हा विषय सोडून द्या

पण त्या मुलाच्या भीतीमुळे त्या मुलीचे खूप जास्त emotional नुकसान नाही का होत आहे?
त्यामुळे इथे होकाराधिकार जास्त महत्वाचा ठरतो

उद्या समजा त्या मुलीने काही समाजापोटी नवर्याला सांगितलं कि तुझ्या आई ने आपल्या बरोबर राहायचे नाही , तू तिची जबाबदारी घ्यायची नाही कारण मला नको वाटते
तर तिथे हि नकाराधिकार महत्वाचा का?

मूळ प्रश्ना मध्ये मुलाने मानसोपचार घ्यावेत हे बरोबर आहे
कारण त्याने कुठल्यातरी भीती पोटी, समजापोटी हा निर्णय घेतला आहे
त्याचे स्वतःचे मुळ किंवा आदिम मत वेगळे असू शकते
समजा , 15 वर्ष नंतर त्याची हि भीती आपोआप कमी झाली आणि त्याला मूल हवे वाटले, तर ते शक्य आहे का

त्या मुलीचे नवऱ्या वर प्रेम आहे पण काही वर्षांनी she might hold this against him.

पक चिक पक राजा बाबू's picture

22 Aug 2016 - 12:39 pm | पक चिक पक राजा बाबू

Mazyakde समुपदेशनासाठी एक केस आलि होती. 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर ,2 मुले zalyanantar नवरोबा 2014 साली सहज एका क्ष ठिकाणी निशुल्क मेडिटेशन शिबिरासाठी jaoon आले,तिथे zalelya आध्यात्मिक ब्रेन वाशिंग नंतर ते धर्मपत्नी ला बहिन म्हणू लागले.पत्नी हैरान zali ,तिने आणि सगळ्या नातेवाईकानी भरपूर samjawale पण गड़ी आपल्या मतावर ठाम.पुढे 8 महीने मानसशास्रीय समुपदेशन आणि कॉग्निटिव बीहेवियर थेरेपीचे बरेच सेशंस करुन सदर व्यक्तीचे मन वळविण्यात यश आले.

पक चिक पक राजा बाबू's picture

22 Aug 2016 - 12:55 pm | पक चिक पक राजा बाबू

मराठी कथा लेखक साहेब, लग्नाला होकार किंवा नकार देण्याचा हक्क दोघांनाही आहे.लग्नानंतर परिस्थिति वेगळी असते लग्न हा एक करार असतो.मुले जन्माला ghalnyasathi दोन व्यक्ति आवश्यक असतात.आणि लग्न भारतात ज्या गोष्टि साठी केले जाते त्याच गोष्टि ना एका पार्टनर चा नकार असेल तर kalyanch आहे.

मराठी कथालेखक's picture

22 Aug 2016 - 1:31 pm | मराठी कथालेखक

अहो पण मुलाने आता बाप व्हायलाचं हवं असं तरि कसं म्हणू शकतो ? असा दबाव आणून त्यला बाप बनवता येणार नाहीच...
मुलीसाठी घटस्फोटाचा पर्याय आहेच ना... प्रॅक्टिकली विचार करा.

पक चिक पक राजा बाबू's picture

22 Aug 2016 - 3:32 pm | पक चिक पक राजा बाबू

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो मूल न होऊ देण्याचे जी कारणे सांगत आहे ती तार्किक दृष्ट्या योग्य आहेत की नाही. आजनु कर्ण साहेब, मुलांच्या jababdarya अश्या काहि फार मोठ्या असतात ashyatala काही भाग नाही. मुलाची जबाबदारी घेण्यास भयंकर दबाव vatne ,मुले अवतिभवती असताना अस्वस्थ vatne, या सर्व गोष्टि असामान्य आहेत,psychology मधे याला maladaptive thinking म्हणतात. त्याच्या विचारांमधे समस्या आहे, ते बदलवे लागेल त्यांच्यासाठी साइकोथेरेपीचेच उपचार लागतील,फोबिया मधे ,चिंता विकृति मधे परिस्थिति धोकादायक नसते,रुग्णाचे विचार विकृत zalele असतात,त्याना badlave लागतें,

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 8:56 pm | सुबोध खरे

"नवर्याबद्दल" वरच्या प्रतिसादात लिहिले आहे एकदा "नीट" वाचून घ्या
प्रधानसेवक कोण? मराठीत असा शब्द वाचला नाही( माझी शब्द संपत्ती फार आहे असा माझा दावा नाही) समजावून सांगितले तर बरे होईल.

आजानुकर्ण's picture

22 Aug 2016 - 9:11 pm | आजानुकर्ण

http://www.pudhari.com/news/desh/47962.html

प्रधानसेवक हा शब्द आमचा नाही. ज्यांचा आहे त्यांच्याच शब्दांत.

मी प्रधान सेवक असून, लोकांची सेवा ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही आमच्या कामच हिशोब देण्यासाठी आलो आहोत. इति - मा. पंतप्रधान प्रधानसेवक श्री. मोदी

धन्यवाद. वरचा प्रतिसाद 'नीट' वाचतो.

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 11:14 pm | सुबोध खरे

प्रधान सेवक हे ते स्वतः ला म्हणत आहैत.त्यांचे अधिकृत नाव नाही.

आजानुकर्ण's picture

23 Aug 2016 - 6:28 am | आजानुकर्ण

प्रधान सेवक हे ते स्वतः ला म्हणत आहैत.त्यांचे अधिकृत नाव नाही.

हे मान्य. त्यांचे अधिकृत नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. मात्र ते स्वतःला लाडाने प्रधानसेवक म्हणतात. आम्हाला ते नाव आवडते.

तर्राट जोकर's picture

22 Aug 2016 - 9:57 pm | तर्राट जोकर

काही प्रतिसादकर्त्यांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. मुलाने 'वैचारिक बैठक' म्हणून हा 'घेतलेला निर्णय' नाही. ते कदाचित त्याला हळूहळू जाणवायला लागलं. त्यालाही आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत असेल अन्यथा तो सायकॅट्रीस्टकडे जायला तयार झाला नसता. त्याच्यावर कोणीही दबाव आणत नाही आहे हे माहिती आहे. पूर्ण विचारांती निर्णय घेणे आणि एखादी जबाबदारी घ्यायला भीती वाटणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

@मराठी कथालेखक,
कधी कधी आपण एखाद्या गोष्टीच्या छोट्याशाच अडचणीचा बाऊ करतो तसा काहीसा प्रकार असावा असे वाटतं. जसं बर्‍याचदा असं आढलंय की कार चालवायला शिकण्याअगोदर लोकांना क्लच, ब्रेक, गिअर, अ‍ॅक्सिलेटर असं सगळंच एकानंतर एक किंवा एकाचवेळी कसं वापरायचं ह्याबद्दल इमॅजिन करुन घाबरायला होतं, स्टीअरींग वर बसल्यावर घाम सुटतो. हळूहळू नीट शिकल्यावर मस्त मजेत गाडी चालवली जाते. पण शिकेपर्यंत तर भीती असतेच. ज्यांना ह्या भीतीला तोंड द्यायची हिंमत होत नाही ते गाडी चालवूच शकत नाही, पण काहीकाळाने त्यांना कळते की हे तितके काही कठिण नव्हते, आपण उगाच घाबरत होतो. नीट मार्गदर्शन, समुपदेशन झाले तर ही भीतीची स्टेज पार करता येते.

मराठी कथालेखक's picture

22 Aug 2016 - 10:25 pm | मराठी कथालेखक

या केसपुरतं तुम्ही म्हणताय तसं असेल बहूधा, तुम्ही या जोडप्याला जवळून ओळखता त्यामुळे तुम्हाला बरीच माहिती असेल.
मी शक्यता सांगितली.

बाकी गाडी चालवणं आपल्याला अनेकांना सरावाने सोपं वाटत आणि आपण आपल्या सुरुवातीला वाटणार्‍या भीतीवर मात केली हे खरेच आहे. (पण सुरुवातीलाहि खरंतर नुसती भिती नव्हतीच, त्या स्टिअरींग व गियरचं खूप आकर्षण , उत्सुकता असं सगळं होतंच ..खरंय ना ?). पण तरीही आजकालचं वाढतं ट्रॅफिक, होणारे अपघात ई ई चं दडपण घेवून कुणी ठरवत असेल की नको रे बाबा ते ड्रायविंग तर मी तो फोबिया मानणार नाही नक्कीच.

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 10:34 pm | चंपाबाई

एका धाग्यावर लग्नाआधी आई होण्यास न घाबरलेली मुलगी...

इथे , लग्न होउनही बाप होण्यास घाबरणारा मुलगा !

उडन खटोला's picture

22 Aug 2016 - 10:39 pm | उडन खटोला

आणि दोन्ही धाग्यावर असंबद्ध प्रतिसाद 'देणारं' चंपाबाई.

नावातकायआहे's picture

23 Aug 2016 - 7:54 am | नावातकायआहे

=))

जित्याची खोड....

नाव चंपाबाई हाती हितेशचाच वाळा !
दाद देती दरेकर,मोगाखानाचाच चाळा !!
काडीकामाचा अविरत इसाळ्या ! मुग्धपणे उखाळ्या!

नाखु म्हणे अता पुरे ही सहिष्णुता !!!
आणि कसल्या कुरापतीची वाट पहाता !!!

अखिल मिपा गणेशोत्सव निमित्त कुरापत आय्डी स्वच्छता अभियान आणि मिपा वाचकाम्चाही वचक संघटनेन्च्या संयुक्त निवेदनातील काही अंश

नावातकायआहे's picture

23 Aug 2016 - 8:49 am | नावातकायआहे

टेंपो...

अजया's picture

23 Aug 2016 - 9:04 am | अजया

=)))

आजानुकर्ण's picture

23 Aug 2016 - 7:38 am | आजानुकर्ण

तजो,

तुम्ही सांगितलेल्या केस वरुन हा एक लेख आठवला (फक्त मुलाऐवजी मुलीला अपत्य नको होतं पण नवऱ्यासाठी तिने बाळाला जन्म दिला). तिचं चूक का बरोबर हा मुद्दा बाजूला ठेवला तरी या बाईने जबरदस्त प्रामाणिक लिहिलंय.
नक्की वाचा.
http://www.dailymail.co.uk/femail/article-2303588/The-mother-says-having...

nanaba's picture

25 Aug 2016 - 7:20 am | nanaba

काहीही वाटला तो लेख.
प्रामाणिक वाटण्यापेक्षा टी आर पी साठी अती वाटलां
आणि जर खरच प्रामाणिक असेल तर त्या मुलांसाठी वाईट वाटल.
मी कशी भारी - माझ कर्तव्य करतेयं पण तुम्ही जन्माला आला नसतात तर कित्ती बरं झालं असतं! असा टोन आर्टिकल भर आहे
आणि मुलं जिवंत असताना त्यांच्या फोटोसकट हे छापण फरच वाईट.
मजेशीर भाग हा की असं वाटत असूनही दुसरं मुल जन्माला घालण!
आचरट आणि स्वयंकेद्रित. स्वत:कडे लक्ष देण्यात काहीच चूक नाही - पण तुम्ही नसता जन्मलात तर बर झल असता हे मुलाना म्हणत रहाण भयंकर वाईट! मुल काही फक्त अन्नावर वाढत नाही!

पिलीयन रायडर's picture

25 Aug 2016 - 8:04 am | पिलीयन रायडर

अगदी अगदी!

फारच कैच्याकै लेख..

आजानुकर्ण's picture

25 Aug 2016 - 7:17 pm | आजानुकर्ण

कुठल्याही गोष्टीला टीआरपीसाठी म्हटल्याने मूळ मुद्द्यापेक्षा वेगळेच वळण लागते. सदर 'लेखिके'ला कुठल्या टीआरपीचा काय फायदा होईल हे कळले नाही. झाली तर बदनामीच होते आहे असं दिसतंय. नवरा जिवंत असताना तुझ्याशी लग्न झाल्याने वाटोळं झालं अस म्हणणाऱ्या बायका नाहीत का? तसंच वाटलं हे. आणि आता लेख छापलाय तेव्हा त्या बाईची मुलं तिशी पस्तिशीत -प्रौढावस्थेत स्वतंत्र आयुष्य जगणारी - आहेत. आता ती काही मुलांना 'वाढवत' नाहीये.

('आहे मनोहर तरी' वाचलंय का?)

बाकी तिचं वागणं बरं-वाईट वाटण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 Aug 2016 - 2:40 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मुलं वाढवणं म्हणजे खुप मोठे काम असते,अगदी २५ ,३० वर्ष चालणारे व भरपुर खर्चिक.त्यात परत हौसमौज बाजुला ठेऊन ईतकी वर्ष काढणे आजकालच्य तरुणाईला अवघड वाटते.
मला वाटते मुलाने योग्य निर्णय घेतला आहे,त्याने बायकोलाही विश्वासात घ्यावे व दोघांनी विनाभाराचे व उच्चजीवनशैलीचे आयुष्य जगावे.फक्त म्हातारपणाची बक्कळ सोय करुन ठेवावी.

हा कदाचित मनोवृत्तीचा भाग असु शकेल.
माझ्या मुलीचे ( आणि त्यानंतर मुलाचे) केवळ जन्म देणे आणि दूध पाजणे एवढे सोडून सर्व सोपस्कार मी मोठ्या आनंदाने केले आणि आजही मला मुलांशिवाय कोणतीही गोष्ट सहज एन्जॉय करता येत नाही. खरं तर "मुलांशिवाय जीवन" ही मला कल्पना सुद्धा करता येत नाही.
म्हशींची शिंगे म्हशीला जड नसतात तसे एकदा अपत्य संगोपनात काय आनंद आहे हे तुम्ही समजून घेतलंत तर त्यात होणार अपरिमित आनंद काय आहे हे समजेल. आजही एखादे सहा महिने ते दोन वर्षे या वयातील बालकाबरोबर खेळणे हे मला अतिशय आवडते.
व्यवसायाच्या ओघात एकदा एक वारयोषिता गरोदर असताना सोनोग्राफी साठी माझ्याकडे आली होती तिने मला सांगितले ते शब्दशः असे आहे.
डॉक्टर साहब, बच्चे का बाप कोई भी हो लेकिन बच्चा तो मेरा है ना? जैसे भी है बच्चा पेट में खेलता कैसे है, उसको दूध कैसे पिलाते, उसको बडा कैसे करते है इसका अनुभव तो मिलेगा. नाही तो मेरी जिंदगी मे है हि क्या?
त्या स्त्रीकडे पाहून मला काय वाटले ते सांगता येणार नाही. कणव, उदासी,दया, शरम अशा अनेक छटा त्यात येतील.
अर्थात हि नैसर्गिक उर्मी ज्याला /जिला नाही तिला मूल होणं आणि ते सांभाळणे हे जिकिरीचे होऊ शकते हेही मला मान्य आहे.

प्रदीप's picture

25 Aug 2016 - 1:05 pm | प्रदीप

वारयोषिता: "डॉक्टर साहब, बच्चे का बाप कोई भी हो लेकिन बच्चा तो मेरा है ना? जैसे भी है बच्चा पेट में खेलता कैसे है, उसको दूध कैसे पिलाते, उसको बडा कैसे करते है इसका अनुभव तो मिलेगा. नाही तो मेरी जिंदगी मे है हि क्या?"

मला उगाच साहिरची 'तेरे बचपन को जवानी की दुवा देती हूं' आणि 'तू मेरे प्यार का फूल है, के मेरी भूल है' वगैरे आठवले. किती अचूक लिहून गेला तो!

पक चिक पक राजा बाबू's picture

24 Aug 2016 - 4:06 pm | पक चिक पक राजा बाबू

परत एकदा स्पष्ट करू इच्छितो,लहान मुले सांभाळने,मूल अवती भवती असताना अस्वस्थ वाटने, मुलांची जबाबदारी घेणे हे जर भयंकर दबावाचे वाटत असेल तर , त्याचे कारण त्याचे अतार्किक विचार आहेत. Psychologist त्याला प्रश्न उत्तरांच्या स्वरूपातील cbt थेरेपी session देऊन त्याच्या मनातील अतार्किक विचारांचे शोध घेतात.आणि मग ते विचार बदलन्याचे प्रशिक्षण देतात, एखाद्या प्रसंगाची ,गोष्टि ची किंवा जबाबदारीची अतार्किक भीति वाटने ,हा प्रकार anxiety डिसऑर्डर प्रकारा मधे येतो,सक्षम psychologist सदर व्यक्तीला त्वरित समस्या मुक्त करु शकतो.

मराठी कथालेखक's picture

25 Aug 2016 - 3:43 pm | मराठी कथालेखक

इथे अनेकांना वाटतंय की psychological consulting / treatment ने मोठा फरक पडेल. तो मुलगा psychiatrist कडे जात आहेच.
तजो साहेब, काही महिन्यांनी याबाबत कळवलत तर बर होईल.

मराठी कथालेखक's picture

21 Nov 2016 - 7:16 pm | मराठी कथालेखक

तजो साहेब ? याबद्दल नवीन काही माहिती ?
तो मुलगा psychiatrist कडे जात आहे का ? काही निर्णय झाला का ?

तर्राट जोकर's picture

28 Nov 2016 - 1:47 pm | तर्राट जोकर

सायकॅट्रीस्ट कडे जाऊन उपयोग झाला नाही. तसंच घोंगडं भिजत आहे.

संजय क्षीरसागर's picture

28 Nov 2016 - 1:52 pm | संजय क्षीरसागर

बाबा न होण्यासाठी नक्की काय करतोयं ?

तर्राट जोकर's picture

28 Nov 2016 - 2:02 pm | तर्राट जोकर

मुलीचं मत की त्याला स्वतःला जबाबदारी घ्यायची इच्छा होईल तेव्हा बघु. ती त्याचं डिसिजन फॉलो करत आहे. त्यांना त्यांचं लाईफ जगु देत असं माझं लेटेस्ट मत. आता उपायांची गरज नाही. धाग्याचा विषय या उदाहरणानिमित्त मानसशास्त्रीय चर्चा होता.

संजय क्षीरसागर's picture

28 Nov 2016 - 11:20 pm | संजय क्षीरसागर

मुलीचं मत की त्याला स्वतःला जबाबदारी घ्यायची इच्छा होईल तेव्हा बघु. ती त्याचं डिसिजन फॉलो करत आहे.

मग तिच्या तीव्र इच्छेचा काय उपयोग?

त्यांना त्यांचं लाईफ जगु देत असं माझं लेटेस्ट मत. आता उपायांची गरज नाही.

मग विषयच संपला!

धाग्याचा विषय या उदाहरणानिमित्त मानसशास्त्रीय चर्चा होता.

तुम्ही पोस्टमधे म्हटलंय :

मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे?

धाग्यातली हवाच गेली. आता जाऊं दे.

संजय क्षीरसागर's picture

28 Nov 2016 - 11:23 pm | संजय क्षीरसागर

मुलीचं मत की त्याला स्वतःला जबाबदारी घ्यायची इच्छा होईल तेव्हा बघु. ती त्याचं डिसिजन फॉलो करत आहे.

मग तिच्या तीव्र इच्छेचा काय उपयोग?

त्यांना त्यांचं लाईफ जगु देत असं माझं लेटेस्ट मत. आता उपायांची गरज नाही.

मग विषयच संपला!

धाग्याचा विषय या उदाहरणानिमित्त मानसशास्त्रीय चर्चा होता.

तुम्ही पोस्टमधे म्हटलंय :

मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे?

धाग्यातली हवाच गेली. आता जाऊं दे.

मराठी कथालेखक's picture

29 Nov 2016 - 12:50 pm | मराठी कथालेखक

या निमित्ताने या धाग्यावर चांगली चर्चा झाली इतकं नक्की.
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद.

त्यांना त्यांचं लाईफ जगु देत असं माझं लेटेस्ट मत. आता उपायांची गरज नाही.

अगदी बरोबर. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, गरजा वेगळ्या, समस्या वेगळ्या आणि उपायही वेगळे.

मुलीचं मत की त्याला स्वतःला जबाबदारी घ्यायची इच्छा होईल तेव्हा बघु. ती त्याचं डिसिजन फॉलो करत आहे.

काही अंशी तिचंही मत बदललं असण्याची शक्यता आहे. म्हणजे मूलाला जन्म देणं, ते मोठं करणं हे आता तिलाही नको वाटत असेल पण कौटूंबिक /सामाजिक कारणांमुळे उघडपणे ते मत व्यक्त करण्यापेक्षा नवर्‍याच्या निर्णयापुढे आपण हतबल आहोत असंच दाखवणं जास्त सोयीचं असेल.
असो. दोघे समाधानात असतील अशी अपेक्षा करुयात.

पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी नक्की काय करतोयं ?

रात्री जेवण झाल्यावर ATM च्या लायनीत उभा रहात असेल.

पैसा's picture

28 Nov 2016 - 11:49 pm | पैसा

लायनी संपल्या कवाच!

मराठी कथालेखक's picture

29 Nov 2016 - 12:50 pm | मराठी कथालेखक

नाही हो.
अजूनही रोख रकमेची तीच मारामारी चाललीये. ATM तर सोडा बॅंकेच्या काउंटरलाही तिचं बोंब आहे.

टवाळ कार्टा's picture

29 Nov 2016 - 11:53 am | टवाळ कार्टा

हे तुला कसे माहीत?

पक चिक पक राजा बाबू's picture

26 Aug 2016 - 12:10 am | पक चिक पक राजा बाबू

Psychatrist आणि psychologist मधे फरक असा आहे,psychatrist मानसिक विकारांसाठी औषधोपचार आणि गरज भासल्यास समुपदेशन वापरतात, psychologist सामान्यतः सायको थेरेपीज आणि समुपदेशनाचा वापर करतात,psychologist अतार्किक विचार बदलन्यावर जास्त भर देतात. Psychatrist मेंदूतील रासायनिक बिघड़ावर नियंत्रण ठेवनारी औषधे देतात.ज्याने रुग्नाला आपली मानसिक स्थिति चांगली ठेवन्यास मदत मिळते.मि सक्षम psychologist suggest केला आहे.आशा आहे मराठी भाऊ समजून घेतील.

तर्राट जोकर's picture

2 Sep 2016 - 11:03 pm | तर्राट जोकर

धागा काढण्याचे कारण ह्या समस्येशी संबंधीत मानसशास्त्रीय कोनावर चर्चा होणे अपेक्षित होते. मुलगा कौन्सेलिंग घेतोय ह्याचा अर्थ त्याला काही तरी चुकते आहे ह्याची जाणीव झाली आहे. राजा बाबू यांचे प्रतिसाद विषयाला धरुन होते. ह्या संबंधी अधिक माहिती मिळाल्यास कळवत राहिल.

त्याला मोघले आझम दाखवा... भर दरबारात सोन्याच्या पाळण्यात सोन्याचा कृष्ण घालून दिमाखात हलवणारा अकबर दाखवा... संसार -पोरं- करमणुन- छंद सगळं संभाळून हिंदुस्तान संभाळायचे कर्तव्यही करता येते , हे त्याचा कान पिरगाळून सांगा.

तर्राट जोकर's picture

2 Sep 2016 - 11:39 pm | तर्राट जोकर

ते असो देत हो. काचेच्या घरात राहणार्‍यांनी सांभाळून प्रतिसाद द्यावेत, काय म्हणता?

चंपाबाई's picture

3 Sep 2016 - 9:39 am | चंपाबाई

आमचं घरच कशाला , ही सगळी संस्कृतीच काचेच्या घरात रहाते , पण बघणारे डोळ्यावर झापड बांधून असल्याने त्याना ते दिसत नाही.

तर्राट जोकर's picture

3 Sep 2016 - 9:50 am | तर्राट जोकर

स्वत:ची बायको स्वतःला न सांभाळता येणार्‍यांनी स्वतःसाठी काही शोधलं की दुसर्‍यांना उपदेश करण्यातच आयुष्यं चंदनासारखं झिजवतात?

सुबोध खरे's picture

3 Sep 2016 - 10:30 am | सुबोध खरे

त जो साहेब
त्या चंपाबाईच्या नादाला कशाला लागताय ? (चंपाबाई नसून चम्पकबुवा आहेत भंपक बुवा म्हणालात तरी चालेल )
कुठलीही चांगली रंगवलेली भिंत दिसली कि तिला शाईची बोटं पुसणाऱ्या माणसाची मनोवृत्ती असलेल्या माणसांच्या नादाला लागून उपयोग नाही.

ते समजू शकेल का? तो प्रयत्न दूर केला की विषय संपला!

मराठी कथालेखक's picture

23 Nov 2016 - 5:47 pm | मराठी कथालेखक

तो एकटा अंगणात /बाल्कनीत झोपतो ..सांगा आता उपाय !!

संजय क्षीरसागर's picture

23 Nov 2016 - 6:13 pm | संजय क्षीरसागर

तजोनां ऑथेंटिक खुलासा करू देत .

मराठी कथालेखक's picture

23 Nov 2016 - 7:07 pm | मराठी कथालेखक

अहो तो 'बाबा न होण्यासाठी' काय प्रयत्न करतो त्याला काय महत्व आहे ? मुळात त्याची इच्छा नाही बाबा व्हायची तर काय त्याच्या 'रबराला' गुपचूप छेद करुन , फसवून बाबा बनवणार आहे का त्याची बायको ?

मराठी कथालेखक's picture

23 Nov 2016 - 7:11 pm | मराठी कथालेखक

बाकी तजो दिसत नाहीत आजकाल मिपावर

तर्राट जोकर's picture

15 Sep 2017 - 4:45 am | तर्राट जोकर

आता इथे:

https://www.facebook.com/tarratjoker/

लाइक करा शेअर करा फॉलो करा

मार्मिक गोडसे's picture

15 Sep 2017 - 10:18 am | मार्मिक गोडसे

आता तुम्ही मिपावर लिखाण करणार नाही का?
ह्यापुढे सकस लेख वाचण्यासाठी मिपाकरांच्या अनुदिनी किंवा फेबुमध्ये डोकावे लागणार असं दिसतंय.

तर्राट जोकर's picture

15 Sep 2017 - 1:35 pm | तर्राट जोकर

आरक्षणामुळे आम्हाला परदेशी जायला लागतं....

इतके दिवस विमानातच होतात की काय ??